कवितास्पर्धा
नुकताच सुट्टीवर गेलेलो असताना तेथील सृष्टिसौंदर्य पाहून आपण एक कवितास्पर्धा भरवावी असा विचार मनात आला; तेव्हा सदस्यांनी आपल्या कविता पाठवाव्यात ही विनंती. कविता पाठवण्याची मुदत ग्रिमवेळेनुसार (अर्थात, ग्रीनिच मीन टाईम) रविवार, चौदा एप्रिलच्या रात्री ११:५९ पर्यंत असेल. कृपया कविता मला 'व्यनि' करून पाठवाव्यात, इथे धाग्यावर प्रतिक्रिया म्हणून पाठवू नयेत. मुदत संपल्यानंतर मला सर्वात आवडलेल्या व उत्तेजनार्थ वाटलेल्या कविता मी इथे देईन. स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे:
(१) कविता २० शब्दांपेक्षा लहान किंवा १०० शब्दांपेक्षा मोठी नसावी. छंदाचे किंवा वृत्ताचे बंधन नाही. एका व्यक्तीला दोनपेक्षा जास्त कविता पाठवता येणार नाहीत.
(२) खालील अाठ शब्द पाहा:
तुमच्या कवितेत यांपैकी कोणतेतरी चार शब्द आले पाहिजेत. (चारपेक्षा जास्त किंवा कमी चालणार नाहीत.) शब्द थोडेफार बदललेले चालतील (उदा. धुंदावलेले, पाऊलखुणांना..)
(३) अभिव्यक्तीचा नवेपणा अाणि अनुभवाचा ताजेपणा कवितेत शक्य तितका कमी असावा; थोडक्यात कविता जास्तीतजास्त निकृष्ट असावी.
निराशा
चांदणे, वसंत, गंध, वेडं मन, साद आणि आभाळ हे शब्द नसल्याने प्रचंड निराशा झाली.
निराशा कोणाची? तुझी का काही 'नामवंत''यशवंत'-'गुणवंतां'ची?
आंतरजालावरच्या कवितांचं तुझं दांडगं वाचन मात्र या प्रतिसादात दिसलं... ;-)
(यातले काही शब्द नेमके आहेत. गंध, वेडं मन, साद आणि आभाळ. चांदणे हा शब्द समग्र कवींसाठीच राखीव.)
आमची न-एंट्री
ही माझी कविता नाही. मी केवळ ताजमहालाला माझ्या विटा लावलेल्या आहेत ( कंपल्सरी वापरावयाच्या शब्दांच्या)
त्यामुळे ही माझी एंट्री नाही. पण केवळ निर्मल आनंदाकरता शेअर करतो आहे.
वापरलेले शब्द : हलकेच एकाकी धुंद अनामिक
निसतेले सुर ओन्जलितुन ते मल कुन्वित आहे
शावस घेत्तो मोकले की मी अत्ता निविरुत आहे
एकु द्या मज बासरि त्य्य बाबुन्च्या बेतातु नी
म्रुदुगन्ध हलके एक्दा भर्उद्या मला शावसतुनि
रत्रिच्य तिमिरत होति धालली जी आसवे
दवबिन्दु होउअन भेतलि मज एकाकी पुश्पासवे
पानाफुलातुन निर्झरतुन श्रुश्तिची ही स्पन्दने
उतुन्ग लाता रानवारा देती मज ही आमन्त्रने
धुंद ते धग चुम्बनि जाती फुलाचे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
अव्हेरले ते सौख्य मी की नोकरीचे पाश होते
क्शितिजासही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले क्रुतुचे बघाया हा पहा अनामिक मी चाललो
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
मूळ प्रेरणा (कृपया मूळ धाग्यावरचे प्रतिसाद वाचायला विसरू नये)
आणखी येऊद्यात…
आत्तापर्यंत काही उत्तम एंट्र्या आल्या आहेत. आणखी येऊद्यात…
टीप: माझ्या मते अट क्रमांक (२) चा अर्थ स्पष्ट आहे. यादीतल्या आठपैकी चार शब्द कवितेत यायला हवेत, पण यादीत समावेश नसलेल्या शब्दांच्या वापरावर काहीच बंधन नाही. उदाहरणार्थ, 'मनबावरी' किंवा 'पहाटवारा' कितीही वेळा आले तरी चालतील.
आत्तापर्यंत आलेल्या (चार) एंट्र्या
लोकाग्रहास्तव आत्तापर्यंत आलेल्या (चार) एंट्र्या कवींची नावे जाहीर न करता खाली देतो आहे; अर्थात संबंधित कवींनी आपापली नावे जाहीर करायला माझी काहीच हरकत नाही. यापैकी काही उत्कृष्ट निकृष्ट आहेत, तर काहींत माझ्या मते अजून निकृष्ट बनण्याचं अनरिअलाइज्ड पोटेंशियल आहे.
अलगद पसरे गाढ धुके -
धुक्यामध्ये झालो एकाकी
किती अनामिक आठवणींचे
तरी उसासे उरले बाकी
कुंद हवेच्या दुलईमध्ये
मनात भरली आशा भोळी
पुसटपुसट पाऊलखुणाही
दिसत राहिल्या कातरवेळी
❈
वसंताचं चांदणं
वसंताचं चांदणं आभाळात पसरलंय
इवल्या-इवल्या कवडशांपरी आहे ते भरपूर
वेड्या मनाला हलकेच साद ते घालतंय
त्याच्या धुंद गंधाने वाढली आहे हुरहूर
❈
नदीतीरावर कातरवेळी
एक अनामिक लागे हुरहूर
त्यांतच टिटवी जागे करते
आठवणींचे भग्न खंडहर|
दुरून दिसते ओली हिरवळ
असते शेवाळ्याचे मृगजळ
एकाकी या त्रस्त जीवाला
मनीं सारखी एकच तळमळ |
नदी कधीची खुणवत होती
जलमय होण्या विनवत होती
भयकंपित मी, हरता तो क्षण
उदास जगतो, उगाच ते पण||
❈
धुंद आम्ही दोघे
कुंद ही हवा
छंद हा असा
वेड लावे जीवा
एकाकी नसताना
दुचाकी वरती
तीचीच प्रीती
बिलगायची पाठी
पाऊलखूणा त्या उमटता
मनावरती चरा
उमटतो जरा
आठवांचा (अासवांचा? -जचि)
हुरहुर ती उरते
कुंद हवेतील दुचाकी वरती खोल खोल चरा देत!
❈
अट
अट क्रमांक तीन अत्यंत आवडली. त्यामुळं स्पर्धेत उतरण्यासाठी अवकाश तयार झाला आहे.