माहिती: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शंभर वर्ष
या वर्षी विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. माझा संघाशी प्रत्यक्ष संबंध फारसा आलेला नाही, तरीही देशातील सर्वात मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनेबाबत अंतरजालावर उपलब्ध माहिती या लेखात सादर करत आहे.
आज RSS च्या ५ लाखांहून अधिक शाखा देशभर कार्यरत आहेत. या शाखा सांस्कृतिक राष्ट्रवाद, व्यक्तिमत्त्व विकास, आणि नैतिक शिक्षण यावर भर देतात. विद्या भारती ही शैक्षणिक संस्था १२,७५४ शाळा चालवते, जिथे भारतीय मूल्यांवर आधारित शिक्षण दिले जाते आणि आधुनिक विषयांचाही समावेश असतो. सेवा भारती ही सामाजिक संस्था आरोग्य, शिक्षण आणि आपत्ती मदतीसाठी हजारो प्रकल्प राबवते, विशेषतः दुर्बल आणि दुर्गम भागांमध्ये. राष्ट्र सेविका समितीसारख्या स्त्री संघटनांद्वारे महिलांना नेतृत्व आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. या सर्व संस्था मिळून शिक्षण, सेवा आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देतात.
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम सध्या देशभरातील ६३,९२६ वनवासी गावांपैकी २१,८२९ गावांमध्ये विविध सेवा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पांमध्ये शाळा, बालवाडी, निवासी वसतिगृहे, आध्यात्मिक केंद्रे, दवाखाने आणि आरोग्य रक्षकांचे कार्य समाविष्ट आहे. महाराष्ट्रातील ५,६०० वनवासी गावांपैकी सुमारे २,००० गावांमध्ये आश्रमाचे कार्य सक्रिय आहे. याशिवाय, शिक्षण व आरोग्य सेवांबरोबरच ११३ कृषी विकास केंद्रेही कार्यरत आहेत, जी स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी मदत करतात.
१९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धकाळात RSS ने देशसेवेचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्वयंसेवकांनी रक्तदान, अन्नवाटप, मदत शिबिरे, आणि अनेक ठिकाणी प्रत्यक्ष सीमेवर सैनिकांना मदत केली. या योगदानाची दखल घेत, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ साली, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात RSS च्या स्वयंसेवकांना पथसंचलनासाठी आमंत्रित केले.
महात्मा गांधी यांनी १९३४ साली वर्धा येथे संघाच्या शिबिराला भेट दिली. त्या वेळी डॉ. हेडगेवार जिवंत होते. गांधीजींनी शिबिरातील शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव आणि साधेपणा पाहून संघाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे.” हे उद्गार ‘हरिजन’ साप्ताहिकात २८ सप्टेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ जानेवारी १९४० रोजी कराड (सातारा) येथे संघाच्या शाखेला भेट दिली. त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला आणि संघाच्या कार्यपद्धतीचे निरीक्षण केले. आपल्या भाषणात त्यांनी म्हटले, “जरी काही मुद्द्यांवर मतभेद असले, तरी मी संघाकडे आपुलकीच्या भावनेने पाहतो.” ही घटना ‘केसरी’ दैनिकात ९ जानेवारी १९४० रोजी प्रसिद्ध झाली होती.
देशावर जेव्हा नैसर्गिक आपत्ती येतात किंवा कोरोना सारखे आजार पसरतात, तेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते तत्काळ आपदाग्रस्त जनतेच्या सेवेसाठी सज्ज होतात. १९९३च लातूर भूकंप, २००१ गुजरात भूकंप, २०१३ उत्तराखंड पूर, २०१८ केरळ पूर अशा अनेक आपत्तींमध्ये संघाने मदत शिबिरे, वैद्यकीय सेवा आणि पुनर्बांधणीचे कार्य केले. हजारो कुटुंबांना नवजीवन मिळवून देण्यात संघाचा सेवाभाव महत्त्वाचा ठरला.
२००१ साली कच्छ जिल्ह्यातील भूकंपानंतर, आरएसएस आणि सेवा भारतीच्या स्वयंसेवकांनी भुज, अंजार आणि गांधीधाम परिसरात शेकडो मदत शिबिरे उभारले. अन्न, पाणी, औषधे आणि तात्पुरते निवारे पुरवण्यात आले. हुनरशाला फाउंडेशन आणि कच्छ महिला विकास संघटन यांच्या सहकार्याने पारंपरिक भुंगा घरांची रचना पुन्हा उभी करण्यात आली. स्थानिक मजुरांना भूकंप प्रतिरोधक बांधकामाचे प्रशिक्षण देण्यात आले आणि गुजराती भाषेत मॅन्युअल तयार करून मार्गदर्शन करण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळात, RSS चे ५ लाखांहून अधिक स्वयंसेवक रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत होते. काही स्वयंसेवकांनी आपला जीव गमावला, तरीही सेवा थांबली नाही. पाच जून २०२१ पर्यंत, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तानच्या सीमांपासून ते जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारण्यात आली. ११८ शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स, २८७ शहरांमध्ये आयसोलेशन सेंटर्स, ५ कोटी भोजन पॅकेट्स, ७३ लाखांहून अधिक कुटुंबांना राशन, आणि ४४ लाख स्थलांतरित मजुरांना सेवा पुरवण्यात आली.
२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.
शहरातील निवासी असो की वनवासी – सर्व भारतीयांची सेवा करणे आणि भारताला परम वैभवशाली बनविणे हेच आरएसएस च मुख्य ध्येय आहे.
>>>२०२५ मध्ये, देशभरातील…
>>>२०२५ मध्ये, देशभरातील पूरग्रस्त भागांमध्ये संघाने पुन्हा ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारून लाखो गरजूंना अन्न, औषधे, निवारा आणि वैद्यकीय सेवा पुरवली.
महाराष्ट्रात कुठेच पुरस्थिती नसल्याने शिबिरे उभारण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे १ लाख शिबिरांचे स्वप्न धुळीस मिळाले.
लवकरच प्रचंड पूर येवो आणि पाच लाखाचे उद्दीष्ट पूर्ण होवो यासाठी पटाईतांनी देव पाण्यात ठेवले असतीलच.
मोदी हय तो मुमकीन हय !!
!
वर ‘अहिरावण’ या सदस्याने दिलेले चारही प्रतिसाद — त्या प्रतिसादांबद्दल काहीच म्हणणे नाही (आक्षेप तर नाहीच नाही), परंतु… हे प्रतिसाद ‘अहिरावण’ या आयडीकडून यावेत, याचे महदाश्चर्य वाटले.
इतःपर,
१. ‘३_१४ विक्षिप्त अदिती’ या आयडीकडून स्त्रीद्वेष्टे (तथा मार्जारद्वेष्टे — Same difference!) प्रतिसाद,
२. ‘चिंतातुर जंतू’ या आयडीकडून ‘फ्रेंच आणि इराणी सिनेमे कसे महाभिकार असतात’ अशा आशयाचे प्रतिसाद,
३. ‘विवेक पटाईत’ या आयडीकडून ‘हिंदुत्व हे बिनबुडाचे दळभद्री तत्त्वज्ञान देशाला रसातळाला नेईल’ किंवा ‘आयुर्वेदात काही दम नाही’ अशा आशयाचे, अस्खलित सदाशिवपेठीत लिहिलेले प्रतिसाद,
४. ‘Rajesh188’ या आयडीकडून सुसंबद्ध, वाचनीय, सलग एकाच लिपीत टंकलेले प्रतिसाद,
५. ‘प्रभाकर नानावटी’ या आयडीकडून प्रतिसाद,
६. फार कशाला, ‘'न'वी बाजू’ या आयडीकडून संक्षिप्त, तळटीपविरहित, मुद्द्यास धरून, कोणावरही दुगाण्या न झाडणारे, विधायक प्रतिसाद…
…हेही पाहायची तयारी ठेवलेली आहे.
(मोदी आल्यापासून) या जगात काय वाटेल ते होऊ शकते!
असो चालायचेच.
.
का बाबा काय चुकले आमचे ? ऑ !!!
छे छे! चुकले असे कधी म्हणालो?
फक्त, आश्चर्य वाटले, इतकेच.
मी कट्टर हिंदू आहे म्हणून संघावर प्रेम असलेच पाहिजे असा मार्क्सिस्ट विचार का? का ? का? काका !!
नाही नाही, असा काहीही आग्रह नाही. फक्त, (कट्टर हिंदू आहे, परंतु संघावर प्रेम नाही) असे काँबिनेशन निसर्गात सहसा आढळत नाही, इतकेच.
(म्हणूनच तर आश्चर्य वाटले.)
(सहसा आढळत नाही, म्हणजे असूच शकत नाही, असाही आग्रह नाही. It takes all sorts to make a world, वगैरे वगैरे.)
असो चालायचेच.
हत्ती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव ऐकले तरी मनात नकळतपणे एखाद्या हत्तीची प्रतिमा उभी राहते. हत्ती हा प्राणी शक्तिशाली, स्थिर व संयमी म्हणून जगभरात ओळखला जातो. त्याचप्रमाणे आर.एस.एस. ही संस्था आपल्या कार्यपद्धतीत संयम, स्थैर्य आणि शक्ती यांचा समन्वय साधणारी आहे.
हत्ती दिसायला शांत असला तरी त्याच्यात प्रचंड ताकद असते. त्याचा एक पाऊल पुढे टाकला की संपूर्ण जमिन हलते. तसेच आर.एस.एस.ची कार्यपद्धती बाहेरून साधी, शांत वाटते; पण तिच्या प्रत्येक कृतीत सामाजिक जीवनात मोठा परिणाम घडवण्याची ताकद दडलेली असते.
हत्ती आपल्या कळपाचे रक्षण करतो, शत्रूंच्या आक्रमणापासून सावध राहतो. त्याचप्रमाणे आर.एस.एस. समाजातील दुर्बल घटकांचे रक्षण करण्यासाठी व राष्ट्रीय ऐक्य बळकट करण्यासाठी सदैव सज्ज असते. हत्तीप्रमाणेच आर.एस.एस.ही संस्था बाह्य आडंबर न माजवता कार्य करत राहते.
हत्ती दीर्घायुषी असतो, त्याची वाटचाल संथ पण अढळ असते. आर.एस.एस.ही संस्था कालचक्रानुसार संथ पण सातत्यपूर्णपणे समाजसेवा करत आलेली आहे. तिच्या विचारांचा व कार्याचा ठसा समाजमनावर कायम राहतो. त्यामुळे हत्ती व आर.एस.एस. यांच्यातील साम्य स्पष्ट जाणवते.
गजराज नमस्कार समजा rss च्या 100 वर्षाच्या
समजा rss या संस्थेचा वस्तूनिष्ठपणे 100 वर्ष कार्याचा आढावा घ्यायचे ठरविले तर तुम्ही समजा विधायक कार्य हे एका तराजूत ठेवले ज्यात त्यांनी केलेले सर्व प्रकारचे सामाजिक कार्य येईल
तर याच बरोबर या संस्थेने काही विघातक कार्य देखील केलेले आहे असे तुम्हास वाटते काय ?
म्हणजे अगदी ढोबळ मानाने जरी तराजू तुलना केली तर तुमच्या मते rss कडून झालेली विघातक कार्य कुठली तुम्ही सांगू शकता काय ? अर्थात विधायक कार्ये सुद्धा सांगा.
म्हणजे rss चे विधायक आणि विघातक असा तुलनात्मक आढावा घेता येऊ शकतो का?
की तुमच्या मते.असे नसून RSS ने आजवर केवळ विधायक च कार्य केलेले आहे असे आपले मत आहे ?
>समजा rss या संस्थेचा…
>समजा rss या संस्थेचा वस्तूनिष्ठपणे 100 वर्ष कार्याचा आढावा घ्यायचे ठरविले तर तुम्ही समजा विधायक कार्य हे एका >तराजूत ठेवले ज्यात त्यांनी केलेले सर्व प्रकारचे सामाजिक कार्य येईल
>तर याच बरोबर या संस्थेने काही विघातक कार्य देखील केलेले आहे असे तुम्हास वाटते काय ?
>म्हणजे अगदी ढोबळ मानाने जरी तराजू तुलना केली तर तुमच्या मते rss कडून झालेली विघातक कार्य कुठली तुम्ही सांगू >शकता काय ? अर्थात विधायक कार्ये सुद्धा सांगा.
>म्हणजे rss चे विधायक आणि विघातक असा तुलनात्मक आढावा घेता येऊ शकतो का?
>की तुमच्या मते.असे नसून RSS ने आजवर केवळ विधायक च कार्य केलेले आहे असे आपले मत आहे ?
ही प्रश्नावली सुंदर आहे. खूप उपयोगी आहे. अनेक संस्थांना लागू पडू शकते... :)
आरएसएस च्या जागी कॉग्रेस, सेवादल, राष्ट्रसेवादल, सीपीआय (सर्व), आरपीआय, शिवसेना, आययाटी, आय्यायम, आय्युका, अनिस, विज्ञानमंडळे, मराठी मंडळे, मसाप, साहित्य अकादमी हवं ते टाकता येईल. थोडा वर्षांमधे फरक करावा लागेल..
आपण लै हुशार आहोत हे बेरकीपणाने असल्या प्रश्नावलीतून दाखवता येते. वर खाजगीत बोलती बंद केली तोंडावर प्रश्न मारुन असा आव आणता येतो..
असो.
मारवात तीव्र मध्यम आणि नी कोमल ना...
स्वरगंगेच्या काठावरती...वचन दिले... तु...मला....
प्रश्नावली नक्कीच इतर…
प्रश्नावली नक्कीच इतर पक्षांना सुद्धा लावता येईल की कारण ती सुंदर नसून वस्तुनिष्ठ आहे. वरील विषय धाग्याचा आणि तुमच्या प्रतिसादाचा सुद्धा संघ हाच आहे म्हणून संघाबाबत विचारले.
पण यावरून एक निश्चित दिसते की तुम्हास ही संघास लावायची नाही आहे इतराना लावा असे तुम्ही मत दिले.
माझा प्रश्न बेरकी आहे हे सुद्धा मत तुम्ही दिले.
पण मूळ प्रश्न अनुत्तरित ठेवून नकळत जे उत्तर दिले त्यासाठी धन्यवाद !
दे के खत मूह देखता है नामाबर
कुछ तो पैगामे जुबानी और है.
खिक्क ! तुम्ही इतरांचे…
खिक्क ! तुम्ही इतरांचे प्रतिसाद नीट वाचत नाही का? माझा प्रतिसाद वाचला असता तर संघाबद्दल माझे मत कळले असते. असो. वाचा पुन्हा एकदा !!
आणि तुमचे कौतुक करुन ती प्रश्नावली आम्ही इतरांना सुद्धा लावता येईल हे म्हटले कारण आम्ही कुणाचेच समर्थक नाही आणि विरोधक नाही. समोरच्याच्या मुद्यातले कमजोर बाजु समोर आणणे हेच आम्ही करतो. तुम्हाला कौतुक आवडत नसेल तर राहिल!
हा का ना का
ते ठीकच आहे, परंतु...
...कसे आहे ना, इथे हत्ती काय किंवा मारवा काय, दोघांपैकी कोणालाच संघाबद्दल काहीही (one way or the other) पडलेले नाही. (असे वाटते; चूभूद्याघ्या.) त्यामुळे, हत्तीने एक फेकले, त्याला गप्प करायला मारवांनी आख्खी यादी फेकली. चलता है.
(अखेरीस, त्यातून हत्ती गप्प झाल्याशी मतलब. परंतु, तेही झाले नाही. यादीचा वार फुकट गेला. तेही चालायचेच, म्हणा.)
(अवांतर)
उद्या हत्तीवर चर्चा असली तरी हत्तीकडे बघून नकळतपणे मनात हत्तीची प्रतिमा उभी राहते असेच आम्ही म्हणणार.
'हत्तीकडे बघून मनात हत्तीची प्रतिमा उभी राहते' असे काय, कोणीही म्हणेल. त्यात विशेष ते काय?
तुमचे सौंदर्य यात आहे, की उद्या अमीबावर जरी चर्चा असली, तरी '(सूक्ष्मदर्शित्रातल्या) अमीबाकडे बघून मनात हत्तीची प्रतिमा उभी राहते' असे तुम्ही म्हणाल.
(अर्थात, अमीबा वाटेल ते आकार धारण करू शकत असल्यामुळे, एखाद्या अमीबाकडे बघून कोणाच्या मनात (सूक्ष्म) हत्तीची प्रतिमा उभी राहणे हे अगदीच अशक्य नाही, म्हणा.)
असो चालायचेच.
संघ ही नोंदणीकृत संस्था आहे का?
संघ ही नोंदणीकृत संस्था आहे का?
पटाईतजी, या एका प्रश्नाबाबत लोकांच्या मनात फार गोंधळ आहे. कृपया आपण माहिती देऊन तो दूर करावा.
उपप्रश्नः
१. संघाच्या स्वयंसेवकाला काही ओळखपत्र, सभासद क्र. असे काही असते का?
२. संघाचे पैशाचे व्यवहार सरकारला, आयकर विभागाला दाखवले जातात का? त्याचे ऑडीट होते का? लोकांना व देणगीदारांसाठी त्याचा हिशोब प्रसिध्द केला जातो का?
नोंदणीकॄत संस्था असेले तर वरील दोन्ही होत असणार. आपण आता रिसर्च केलाच आहे, तर वरीलप्रमाणे नोंदणी आहे का या मुख्य व उपप्रश्नांची उत्तरे मिळाली तर लोकांच्या शंकांचे निरसन होईल.
…
महात्मा गांधी यांनी १९३४ साली वर्धा येथे संघाच्या शिबिराला भेट दिली. त्या वेळी डॉ. हेडगेवार जिवंत होते. गांधीजींनी शिबिरातील शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव आणि साधेपणा पाहून संघाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले, “संघाची सेवा आणि आत्मत्याग यावर आधारित प्रेरणा ही संघाला बळकट करणार आहे.” हे उद्गार ‘हरिजन’ साप्ताहिकात २८ सप्टेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले.
गांधींनी संघाच्या शिबिराला भेट दिली १९३४ साली. त्या संदर्भात गांधींनी काही (कौतुकाचे) उद्गार काढले. ते उद्गार (गांधींच्याच) ‘हरिजन’ साप्ताहिकात प्रसिद्ध झाले, ते १९४७ साली…
इतक्या वर्षांनंतर??????
कोरोना महामारीच्या काळात, RSS चे ५ लाखांहून अधिक स्वयंसेवक रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करत होते. काही स्वयंसेवकांनी आपला जीव गमावला, तरीही सेवा थांबली नाही. पाच जून २०२१ पर्यंत, म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तानच्या सीमांपासून ते जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत ९२,६५६ ठिकाणी सेवा शिबिरे उभारण्यात आली. ११८ शहरांमध्ये कोविड केअर सेंटर्स, २८७ शहरांमध्ये आयसोलेशन सेंटर्स, ५ कोटी भोजन पॅकेट्स, ७३ लाखांहून अधिक कुटुंबांना राशन, आणि ४४ लाख स्थलांतरित मजुरांना सेवा पुरवण्यात आली.
का बुवा? अखिल भारतीय पातळीवर जर एखादी गोष्ट करायची झाली, तर ती काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत करावी, असा संकेत आहे ना? मग तुमचे हे स्वयंसेवक जम्मूपर्यंतच जाऊन का थांबले, म्हणे? काय कश्मीरमध्ये करोनाचा प्रादुर्भाव नव्हता? की कश्मीर आपले नाही? (मग ‘वह कश्मीर हमारा है’ वगैरे घोषणा कोणत्या भावाने?) ठीक आहे, अगदी पाकव्याप्त कश्मीरमध्ये गेले नाहीत, तर ते एक वेळ समजू शकतो. (खरे तर वह कश्मीर भी हमारा है — भारतीय संसदेचा ठराव आहे तसा! — परंतु तरीही.) परंतु, श्रीनगर, बारामुल्ला, अनंतनाग… तिथे जायला नक्की काय अडचण होती? एकीकडे म्यानमार, बांगलादेश, पाकिस्तानच्या सीमांपर्यंत गेले म्हणता. इथे पाकिस्तानच्या नाही, तरी गेला बाजार पाकव्याप्त कश्मीरच्या ‘सीमे’पर्यंत — प्रत्यक्ष ताबारेषेपर्यंतसुद्धा जावेसे वाटले नाही? की, ‘ते’ लोक आपले वाटत नाहीत, याची ही कबुली आहे? (भले ‘त्यांना’ तुम्ही आपले वाटता की नाही, हा वेगळा मुद्दा. खरे तर ‘त्यांना’ आपलेसे करून घेण्याकरिता ही सुवर्णसंधी ठरली असती. परंतु ते सोडा.)
हे म्हणजे बरे आहे — तिकडे तिरंगा फडकवायला अट्टाहासाने जाल! (म्हणजे, जा, त्याबद्दल काही म्हणणे नाही.) परंतु, मग करोनाच्या वेळेला, तिथले लोक — आपल्याच देशातले लोक! — अडचणीत असताना तिथे मदत करायला जायला नको? नाही म्हणजे, इतर सगळ्या ठिकाणी गेलात, म्हणून विचारतो.
बरे, ‘ते’ लोक आपले वाटत नाहीत. लद्दाखचे काय?
असो. ‘जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत’मागची भूमिका कळल्यासारखे वाटते. चालायचेच.
या योगदानाची दखल घेत, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९६३ साली, २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात RSS च्या स्वयंसेवकांना पथसंचलनासाठी आमंत्रित केले.
अच्छा. नेहरूंनी दखल घेतली, ही चांगली/अभिमानाची गोष्ट आहे काय? नेहरूजी थोर होते काय?
बाब्बो ! किती तो वकीली बाणा …
बाब्बो ! किती तो वकीली बाणा !! वा !!
आपल्याला काही नबाकाकांइतकी समज, उमज नाही आणि आपण त्यांच्याइतके संघद्वेष्टे नाही. आपण उदासिन आहोत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे तटस्थपणे पहाता येते असे वाटते.
ज्या संस्थेच्या मिशन विजन मधे The Hindu culture is the life-breath of Hindusthan. It is therefore clear that if Hindusthan is to be protected, we should first nourish the Hindu culture.
संदर्भ : https://www.rss.org//Encyc/2015/3/13/Vision-and-Mission.html
इतके स्पष्ट म्हटले आहे ते इतरांकडे का जात नाहीत वगैरे म्हणणे चुकीचे नाही का?
उद्या मार्क्सिस्टाने अदाणी अंबाणीचे गोडवे गाण्यासारखेच आहे. भले त्या मार्क्सवाद्याचे पोट अडाणी अंबाणीमुळे भरते... तरी पन प्रश्न तत्त्वाचा आहे. नाही का?
>>>. नेहरूंनी दखल घेतली, ही चांगली/अभिमानाची गोष्ट आहे काय? नेहरूजी थोर होते काय?
छे छे ते नेहरुंना सुद्धा समजले ते तुमच्यासारख्या हुशारांना कळत नाही. असे कसे हुशार तुम्ही ? ऑ
(अशा पद्धतीने वाचून पहा.. पटले ना? पटणारच)
.
(तुमचे) दोन्ही मुद्दे ग्राह्य आहेत.
बाकी:
ज्या संस्थेच्या मिशन विजन मधे The Hindu culture is the life-breath of Hindusthan. It is therefore clear that if Hindusthan is to be protected, we should first nourish the Hindu culture.
त्याच Hindu cultureच्या परंपरेत, 'वयं पञ्चाधिकं शतम्' असेही कोठेतरी लिहून ठेवलेले आहे, म्हणे. (ऐकीव माहिती. चूभूद्याघ्या.)
बरोबरच आहे. म्हणूनच तर (इतके सगळे झाले, तरी) पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळतो आपण. (आणि त्याबद्दल हे चकार शब्दही काढत नाहीत.)
नाहीतरी, पाकिस्तान हासुद्धा कधीतरी 'अखंड हिंदुस्थाना'चा, 'आसिंधुसिंधुपर्यंता हिंदभू'चाच भाग होता, त्यामुळे, तूर्तास जरी आपल्यात वितुष्ट असले, तरीही, पाकिस्तान (नि पाकिस्तानीही) आपलेच बांधव, त्यामुळे, 'वयं पञ्चाधिकं शतम्'.
पण, आपल्याच देशातल्या आपल्याच कश्मीरमधल्या आपद्ग्रस्तांना मदत? काय संबंध? (मुस्सलमान आहेत ना ते? हिंदू नव्हेत! (म्हणजे, 'आपले' नव्हेत!))
(हं, उद्या जर का ते लोक खरोखरच फुटून पाकिस्तानला सामील वगैरे झाले, तर मात्र, बाकी काही नाही, तरी, निदान त्यांच्याबरोबर क्रिकेट तरी खेळता येईल. 'वयं पञ्चाधिकं शतम्' तत्त्वाखाली. चालायचेच.)
(अतिअवांतर:
(आमच्यासारख्या) भारतीय वंशाच्या परकीय नागरिकांची फारा काळापासूनची मागणी होती, म्हणे. (ऐकीव माहिती; चूभूद्याघ्या.) ती म्हणजे, (भारताचे) दुहेरी नागरिकत्व. बोले तो, भारत आणि दुसरा एखादा (किंवा एकाहून अधिक) देश यांची नागरिकत्वे एकसमयावच्छेदेकरून कायदेशीररीत्या धारण करता येणे. (आणि, त्याहीपेक्षा महत्त्वाचे, इतर कोठल्या देशाचे नागरिकत्व स्वीकारताना भारताचे नागरिकत्व त्यागावे न लागणे.)
काही कारणास्तव, भारत सरकारला हे मान्य होण्यासारखे नव्हते. (ठीक आहे. भारत सरकारची धोरणे — आणि, त्यातही, नागरिकत्वासारख्या महत्त्वाच्या बाबतीतली धोरणे — काय असावीत, हा भारत सरकारच्या अखत्यारीतला प्रश्न आहे, त्यामुळे, (एक परकीय नागरिक म्हणून) त्याबद्दल तक्रार नाही; किंबहुना, त्याबद्दल काही तक्रार असण्याचा अधिकार असण्याचा प्रश्नही उद्भवत नाही.) किंबहुना, अगोदरच्या काँग्रेस प्रशासनांनी या मागणीकडे लक्षही पुरविले नव्हते.
पुढे एकदा भाजपच्या श्री. अटलबिहारी वाजपेयींच्या प्रशासनाच्या काळात हा प्रश्न ऐरणीवर घेण्यात आला. दुहेरी नागरिकत्वाची मागणी तेव्हाही मान्य करण्यात आली नाहीच. परंतु, एक विधेयक पारित करून, ओव्हरसीज़ सिटिझनशिप ऑफ इंडिया (ओसीआय) अधियोजना अमलात आणली गेली, नि त्या अधियोजनेखाली बर्याच सवलती प्रदान करण्यात आल्या. (भारतात अनिश्चित काळापर्यंत अनियंत्रित रहिवासाकरिता परवानगी, परकीय नागरिक म्हणून पोलिसांकडे नोंदणी करावी न लागणे, आर्थिक, शैक्षणिक, मालमत्ता, तथा करसंबंधी बाबतींत अनिवासी भारतीयांच्या बरोबरीने वागणूक, (सरकारी नोकरी वगळता) भारतातील नोकरीच्या संबंधांत निर्बंध नसणे, परकीय नागरिकत्व त्यागून पुन्हा एकदा भारताचे नागरिकत्व पत्करायचे जर झाले, तर त्याकरिता भारतातील किमान रहिवासाच्या बाबतीत (इतर परकीय नागरिकांच्या तुलनेत) बरीच शिथिलता, वगैरे.) मात्र, अधिकृतरीत्या अशा व्यक्ती या कोठल्याही प्रकारे भारताच्या नागरिक म्हणून गणल्या जाणार नाहीत, तथा भारतीय नागरिकांचे म्हणून जे विशेष अधिकार असतात (जसे, भारतातील निवडणुकांत मतदान करणे, भारतातील निवडणुकांकरिता उमेदवार म्हणून उभे राहणे, भारतीय पासपोर्ट धारण करणे, भारत सरकारची नोकरी, भारतात शेतजमिनीची मालकी, वगैरे), ते अधिकार अशा व्यक्तींस उपलब्ध असणार नाहीत, असेही जाहीर करण्यात आले. इथवरही सर्व ठीक.
एकंदरीत, भारतीय वंशाच्या बहुतांश परकीय नागरिकांकरिता यात तक्रार करण्यासारखे काहीच नव्हते. दुहेरी नागरिकत्व जरी मंजूर झालेले नसले, तरीही, अशा (भारतीय वंशाच्या) परकीय नागरिकांच्या भारताशी निगडित अशा ज्या गरजा होत्या, त्या या अधियोजनेखाली बहुतांशी पूर्ण होण्यासारख्या होत्या. त्यामुळे, बहुतांशी सर्वत्र आनंद होता.
मात्र, ज्या पद्धतीने ही अधियोजना अमलात आणली गेली (किंवा, ज्या पद्धतीने या अधियोजनेचे नियम बनविले गेले), त्यात एक बारीकशी गोची होती. अर्थात, या अधियोजनेचा लाभ घेऊ पाहणार्या बहुतांश लाभार्थींच्या दृष्टीने या गोचीमुळे काहीही फरक पडण्यासारखा नव्हता. परंतु, अशा संभाव्य लाभार्थींच्या ज्या एका छोट्या गटाकरिता यामुळे फरक पडत होता, तो लक्षात घेता, ही गोची अतिशय चमत्कारिक होती, तथा, यासंबंधीचे नियम बनविताना मागचापुढचा फारसा विचार करण्यात आलेला नव्हता, हे उघड होते.
ही गोची होती, या अधियोजनेखाली कोणाला नोंदणीकृत केले जाऊ शकते (अत एव, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते), यासंबंधीच्या नियमांत.
भारतीय वंशाच्या प्रौढ (१८ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या) परकीय नागरिकांच्या बाबतीत नियम तुलनेने सरळसोट होते. या अधियोजनेखाली लाभाकरिता आवेदन करण्याकरिता: (१) तुम्ही तूर्तास भारताचे नागरिक असता कामा नये. (उघड आहे. तूर्तास भारतीय नागरिक नसणारांकरिताच तर ही अधियोजना आहे.) (२) तुम्ही, तुमचे आईवडील, तुमचे (कोठल्याही बाजूचे) सख्खे आजीआजोबा, किंवा तुमचे (कोठल्याही बाजूचे) सख्खे पणजी-पणजोबा, यांच्यापैकी किमान एक व्यक्ती ही, त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीतरी, (अ) स्वतंत्र भारताची नागरिक, (ब) भारतीय राज्यघटना पारित होण्याचे दिवशी भारतीय नागरिकत्वास पात्र, किंवा (क) १९३५ सालच्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया अॅक्टान्वये (ब्रिटिश) हिंदुस्थानात अधिवास असलेली ब्रिटिश प्रजाजन, यांपैकी किमान काहीतरी एक असली पाहिजे, तथा (सर्वात महत्त्वाचे) (३) उपरोल्लेखित व्यक्तींपैकी कोठलीही व्यक्ती ही, त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीही, पाकिस्तान अथवा बांग्लादेशची नागरिक असता कामा नये.
प्रौढांसंबंधींच्या या नियमांमुळे फारशी कोणालाच काही अडचण येण्याचे कारण नव्हते, तथा, त्यातून भारत सरकारच्या ज्या सुरक्षेविषयीच्या चिंता असण्याची शक्यता होती, त्यांचेही पुरेसे निवारण होत होते (विन-विन सिच्युएशन!), त्यामुळे, त्याबद्दल सोडून देऊ. गोची होती, ती भारतीय वंशाच्या १८ वर्षे वयाखालील परकीय नागरिकांच्या संदर्भात.
अशा व्यक्तींना स्वतः होऊन स्वतंत्रपणे आवेदन करण्याकरिता अधिकार नव्हता. मात्र, अशा व्यक्तींच्या पालकांपैकी कोणी प्रौढ व्यक्ती जर या योजनेखाली आवेदन करण्यास पात्र असेल, तर अशा प्रौढ पालकास स्वतःकरिता केलेल्या आवेदनाच्या लाभार्थींमध्ये अशा पाल्यास अंतर्भूत करण्याची अनुमती असे.
आता, समजा, (उदाहरणादाखल) अमेरिकेत जन्माला आलेली १५ वर्षे वयाची एखादी व्यक्ती आहे. प्रस्तुत व्यक्ती तथा तिचे आईवडील तिघेही अमेरिकेत वास्तव्यास आहेत. प्रस्तुत व्यक्तीचे आईवडील दोघेही तूर्तास भारतीय नागरिक आहेत. (आईवडिलांपैकी कोणीही तूर्तास अमेरिकेचे किंवा भारताव्यतिरिक्त इतर कोठल्याही देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले नाही, अथवा भारताचे नागरिकत्व त्यागलेले नाही.)
आता, प्रस्तुत १५ वर्षाची व्यक्ती:
- (अमेरिकेत जन्मलेली असल्याकारणाने) अमेरिकेची जन्मसिद्ध नागरिक आहे, त्यामुळे, दोघेही पालक भारतीय नागरिक असूनही (दुहेरी नागरिकत्व निषेधामुळे) थेट भारतीय नागरिकत्वास पात्र नाही.
- या व्यक्तीचे दोन्ही पालक हे अगोदरच भारताचे थेट नागरिक असल्याकारणाने ओसीआय अधियोजनेस पात्र नाहीत, त्यामुळे, प्रस्तुत पाल्यास स्वतःच्या आवेदनात अंतर्भूत करू शकत नाहीत, त्यामुळे प्रस्तुत पाल्य या अधियोजनेचा लाभ घेऊ शकत नाही (आणि, परिणामी, या अधियोजनेचा लाभ घेण्यास पात्र नाही).
मात्र, या व्यक्तीच्या पालकांपैकी कोणीही एकाने आपले भारतीय नागरिकत्व गमावले रे गमावले, की असा (भारतीय नागरिकत्व गमावलेला) पालक, आणि त्या अनुषंगाने अशी पाल्य व्यक्ती, या अधियोजनेचा लाभ घेण्यास ताबडतोब पात्र होत असे.
म्हणजे, दोघेही पालक भारतीय नागरिक आहेत: आम्हाला तोंड दाखवू नका! पालकांपैकी एकाने भारतीय नागरिकत्व त्यागले: या, या, या! स्वागतम्|
(अर्थात, ज्या विधेयकानुसार प्रस्तुत अधियोजना आणली गेली, त्या विधेयकाखालील त्या विधेयकाच्या प्रस्तावकांच्या स्वाक्षर्यांपैकी एक प्रमुख स्वाक्षरी पाहिली असता, ही योजना मागचापुढचा फारसा बारीक विचार न करता बेधडकपणे आणलेली आहे, यात आश्चर्य वाटण्यासारखे खरे तर काहीही नव्हते. ती स्वाक्षरी होती: एल. के. अडवानी.)
गंमत म्हणजे, यात काही दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने वाजपेयींचे सरकार असेपर्यंत कोणतीही हालचाल झाली नाही. या त्रुटीचे निवारण होऊन अशा व्यक्ती या (पालकांच्या अनुमतीने, परंतु दोन्ही पालक भारतीय नागरिक असतानासुद्धा) या योजनेचा लाभ घेण्यास पात्र होण्यास डॉ. मनमोहन सिंहांचे (काँग्रेसचे!) प्रशासन उजाडावे लागले!)
असो. तर हे सगळे आताच आठवण्याचे कारण म्हणजे,
- 'ते' लोक अद्याप आमचेच नागरिक आहेत ना? (फुटण्याच्या केवळ बाताच करताहेत ना?) मग आपत्तीत सापडले, तरी आम्ही त्यांना मदत करायला जाणार नाही. (का जावे? मुस्सलमान आहेत! 'आमचे' नाहीत.)
- काय सांगता? फुटले? जाऊन पाकिस्तानला सामीलसुद्धा झाले? अरे वा, वा, वा, वा, वा! चला जाऊन त्यांच्यासोबत क्रिकेट खेळू! 'वयं पञ्चाधिकं शतम्'!
थोडक्यात, 'त्यां'च्यासोबत 'आम्ही' खेळण्याकरिता अगोदर 'त्यां'नी 'आमच्या'तून फुटणे भाग आहे!
आणि, हे केवळ भारतीय मुसलमानांच्याच बाबतीत आहे, असे नव्हे. (म्हणजे, आता तसे असेलही, परंतु,) ही आम्हां (उच्चवर्णीय) हिंदूंची जुनीच खोड आहे. पूर्वीच्या काळच्या मराठी लेखकांच्या कथांतून याचे बर्यापैकी डॉक्युमेंटेशनसुद्धा वाचायला मिळालेले आहे. (नक्की आठवत नाही, परंतु, बहुधा श्रीपादराव कोल्हटकर. (चूभूद्याघ्या.))
- हिंदू आहेस, परंतु अस्पृश्य आहेस ना? मग तुला माझ्या घरात प्रवेश नाही! (तुझे पाऊल पडल्याने माझे घर विटाळते ना!)
- काय सांगतोस? बाटून ख्रिस्ती झालास? अरे, कालपर्यंत शूद्र असलास, म्हणून काय झाले? आता तू शूद्र नाहीस. आता तुला थेट माझ्या स्वयंपाकघरापर्यंत प्रवेश — अगदी सुटाबुटासहित!
(जातकुळी तीच आहे. फक्त, आता तिला 'राष्ट्रवादा'चे आवरण चढले आहे, इतकेच.)
चालायचेच.
>>>पाकिस्तानबरोबर क्रिकेट…
>>>पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळतो आपण. (आणि त्याबद्दल हे चकार शब्दही काढत नाहीत.)
माझ्या अल्प माहितीनुसार (आधीच सांगितले ना मी तुमच्याइतका हुश्शार नाही ते... ) आयसीसीच्या स्पर्धांमधे सर्व देशांना सहभागी व्हावेच लागते अन्यथा बंदी आणली जाते. भारत पाक थेट सामने, मालिका, दौरे होत नाहीत. नुकताच आशिया कप झाला तो आयसीसीच्या मार्फत राबवला जातो. चुकले असेल तर सांगा. त्यामुळे तुमचा मुद्दा बाद.
बाकी भला थोर निबंध मस्त झाला आहे. तुम्हाला बराच वेळ दिसतो आणि तुमचा अभ्यास सुद्धा दांडगा आहे. यावर मोठा प्रबंध लिहाच आणि डिलीट साठी प्रयत्न करा. पीएचडी नको. हल्ली बरेच पीएचडी सुलभ शौचालयाच्या गल्यावर बसुन दोन दोन रुपये गोळा करत असतात. त्यात मजा नाही. आणि तुम्हाला ते बरेही दिसणार नाही.
घ्याच मनावर !
एक माफक शंका
गांधींनी संघाच्या शिबिराला भेट दिली १९३४ साली. त्या संदर्भात गांधींनी काही (कौतुकाचे) उद्गार काढले. ते उद्गार (गांधींच्याच) ‘हरिजन’ साप्ताहिकात प्रसिद्ध झाले, ते १९४७ साली…
इतक्या वर्षांनंतर??????
गांधीजी असे म्हणाले होते की माझी जर दोन विधाने परस्परविरोधी असतील तर माझे नंतर चे विधान ग्राह्य धरावे. कारण व्यक्ती म्हणून मी विकसित होत असतो आणि नव्या सत्याचा स्वीकार करत असतो. त्यामुळे त्यांचे सर्वात शेवटचे मत ग्राह्य धरण्यास हरकत काय आहे ?
उशीर झाला तर काय झाले ?
जपान ने उशिराने युद्धासाठी माफी मागितली होती.
फार तर उशिराने सुचलेलं शहाणपण म्हणू या
पण त्याने विधान कमजोर कसे काय पडते ?
अच्छा. नेहरूंनी दखल घेतली, ही चांगली/अभिमानाची गोष्ट आहे काय? नेहरूजी थोर होते काय?
ते थोर होते अशा अर्थाने नाही.."तुमचा" (म्हणजे तुमच्या सारख्या आम्हास नावे ठेवणाऱ्या लोकांचा अशा अर्थाने हा टोला आहे. तर तुम्ही ज्याना मान देता तुमच्या मते जे नेहरू हुशार आहे तुमच्या मते जे नेहरू बुद्धिमान आहेत त्यांनी सुद्धा अशा "तुमच्या" नेहरूंनी सुद्धा दखल घेतली असे ते आहे
उदाहरणार्थ बाबा लोक म्हणतात "तुमच्या वैज्ञानिकांनी सुद्धा मान्य केले आहे की. अमुक अमुक....."
किंवा
ग्रामीण भागातील झगड्यात "अरे आमचे नाही तर नाही तुझ्या बापाचे तरी ऐकशील का ?"
यात नेहरूंचा गौरव कुठे ही अभिप्रेत दिसत नाही.
उत्तराचा प्रयत्न
पण त्याने विधान कमजोर कसे काय पडते ?
गांधींचे विधान कमजोर पडण्याचा-न पडण्याचा प्रश्न नाही. किंबहुना, तशा प्रकारचा दावासुद्धा (कोठल्याही बाजूने) नाही.
फार कशाला, गांधी जे म्हणाले, ते बरोबर होते, की चूक, या विषयाला हातसुद्धा घातलेला नाही.
प्रश्न असा आहे, की एखादी घटना (मग ती अतिशय क्षुल्लक स्वरूपाची असो, की आत्यंतिक महत्त्वाची) जेव्हा घडते, तेव्हा तिची बातमी वर्तमानपत्रांमधून सर्वसाधारणपणे केव्हा छापून येते? शक्यतो दुसर्या दिवशी. ठीक आहे, त्या काळातला दळणवळणाचा वेग जर लक्षात घेतला, तर (विशेषतः घटना जर दूरवरच्या भागात घडलेली असेल, तर) घटना घडल्यानंतर वर्तमानपत्राच्या ऑफिसातल्या न्यूजरूमपर्यंत ती बातमी पोहोचून, त्यानंतर मग तेथल्या एखाद्या उपसंपादकाने (किंवा हे काम जो कोणी करीत असेल, त्याने) ती छापण्याकरिता मजकूर जुळवून, मग खिळेजुळार्याने खिळे जुळवून, ती बातमी छापून येईपर्यंत तीनचार दिवस, अगदी आठवडासुद्धा, लागणे, हे सहज समजण्यासारखे आहे. (आणि म्हणूनच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ जानेवारी १९४० रोजी कराड येथे केलेल्या वक्तव्याची बातमी पुण्याच्या 'केसरी'त ९ जानेवारी १९४०च्या अंकात (म्हणजे तब्बल एका आठवड्याने) जर छापून आली, तरी त्यात विशेष वाटण्यासारखे काही नाही.)
मात्र, १३ वर्षे??????
(आणि, त्यातसुद्धा गंमत म्हणजे, गांधींनी एखादे वक्तव्य करावे, आणि गांधींच्याच वर्तमानपत्राला ('मुखपत्राला' म्हटलेत, तरी चालेल.) त्याचा पत्ता १३ वर्षांपर्यंत असू नये?????)
(मूळ लेखात, गांधींचे उद्गार १९४७ साली प्रसिद्ध झाल्याबद्दल म्हटलेले आहे. गांधींनी ते उद्गार १९४७ साली काढले, असे म्हटलेले नाही. किंबहुना, 'गांधींनी ते उद्गार १९३४ साली (संघाचे) शिबिर पाहिल्यापाहिल्या काढले', असे जरी लेखात स्पष्टपणे कोठेही म्हटलेले नसले, तरी, एकंदर वाक्यरचनेवरून, निदान मला तरी ते तसे प्रतीत झाले. (पाहा: 'त्या वेळी डॉ. हेडगेवार जिवंत होते. गांधीजींनी शिबिरातील शिस्त, अस्पृश्यतेचा अभाव आणि साधेपणा पाहून संघाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले,' वगैरे वगैरे. आणि, त्यापुढे: 'हे उद्गार ‘हरिजन’ साप्ताहिकात २८ सप्टेंबर १९४७ रोजी प्रसिद्ध झाले.'))
नाही म्हणजे, मोदी हय, तो (साला कुछ भी) मुमकिन हय, हे खरेच, परंतु तरीही, तपशिलात काहीतरी गडबड वाटते.
असो चालायचेच.
(स्वगत: छ्या:! या संघोट्यांना स्वतःचा प्रचारसुद्धा धड लिहिता येत नाही. कसे होणार यांचे!)
बोन्साय निर्मितीचा कारखाना
बोन्साय बघितलं की स्मिता तळवलकरांचा "चौकट राजा" आठवतो. बोन्साय वरून कितीही सुंदर दिसत असलं तरी त्याची मुळं खोलवर रुजलेली नसतात.... गतिमंद वा मतिमंद माणसाची शारीरिक वाढ होते पण मानसिक वाढ नाही, याचं बोन्साय हे प्रतीक... द्वेष, न्यूनगंड, अवैज्ञानिक दृष्टीकोन, खोटा अभिमान, कुजबुज संस्कृती हे या अपुऱ्या मानसिक वाढीच लक्षण.. बरं हे बोन्साय छान दिसावं आणि मुख्य म्हणजे कुंडीच्या बाहेर जाऊ नये म्हणून त्याची सतत (वैचारिक) छाटणी करावी लागते..जगभर असे असंख्य वैचारिक बोन्साय निर्माण करणाऱ्या संघटनेची शंभरी साजरी करण्यात काय अर्थ...
न्यूनगंड व खोटा अभिमान
तुमचा प्रतिसाद अतिशय परखड आहे. बघू या पटाईत काका काही उत्तर देतात का.
बाकी न्यूनगंड व अभिमान हे एकत्र कसे नांदू शकतात हा प्रश्न पडला. म्हणून खोटा हा शब्द वापरला आहे का? मला तर वाटते संघ स्वयंसेवकांमध्ये आपली संस्कृती, धर्म, परंपरा याचा अगदी मनापासून अभिमान असतो. खोटा का म्हणत आहात?
बोन्साय
कुठलीही संघटना किंवा पक्ष किंवा गेला बाजार एखादी पक्की भांडवलशाही कंपनी सुद्धा बोन्सायच तयार करत असते. कित्येक अशा संघटना तर पंधराशे सोळाशे वर्ष जुन्या आहेत आणि त्यांचे दोनतीनशे करोड सदस्य आहेत. बहुतेक माणसांची एका मर्यादेत परिघ आखून घेत जगण्याची इच्छा असते आणि तो परिघ सोडायला ते तयारच नसतात.
इतरांवर कमी आगपाखड होते आणि संघावर जास्त. कारण संघोटे फारसे मनावर घेत नाही. इतर बोन्साईज वर बोलले तर डोके धडाच्यावर शाबुत रहाण्याची शक्यता कमी. त्यामुळे संघोट्यांवर बोलून आपली झोडण्याची क्षमता घासून पूसून लख्ख करुन घेता येते आणि वर मिरवता येते हे काय कमी !!
असो. चालायचेच.
सुदर्शन शोधणे आले आता..
बरं झालं! आरएसएसची शंभरी भरली एकदाची !! सुटलो आता !!