ठाणे अरबस्तानला जोडण्याचा कुटील डाव ?
स्वदेशी चा नारा देणाऱ्या सरकारकडून मराठमोळ्या ठाण्यातील एक नवं सांस्कृतिक केंद्र विवियाना मॉल हा विदेशी शक्तींना , खास करून अरबांना विकला हे ऐकले आणि मन सुन्न झाले, चित्त विचलित झाले, पायाखालची जमीन सरकली.
आज ठाणे विकले गेले
माझी खात्री आहे आज सर्व विवेकवादी , पुरोगामी ठाणेकर रडत असतील
आज मॉल विकला गेलाय उद्या सरकारी ऑफीसेस विकली जातील, मग महापालिका मग विधानसभा, लोकसभा, सेंट्रल व्हिस्टा आणि राष्ट्रपती भवनही विकले जाईल. काय काय बघायला लागणार आहे मोदींच्या राज्यात काय माहित.
ठाणे आता संपले आहे
ते अरब लोकांना विकले आहे
आता ठाण्यात स्त्रीयांना बुरखा घालून फिरावे लागणार .
जिकडे लक्झरी गाड्या होत्या तिकडे आता उंट फिरणार
लक्षात घ्या नेहरूंच्या काळात एकही मॉल विकला गेला नव्हता ...
कोणत्याही सुजाण, पुरोगामी, लोकशाहीप्रेमी पंतप्रधानाने या परिस्थिती मध्ये राजीनामा दिला असता ,अर्थात मोदींकडून ही अपेक्षा नाहीच !
मी "कदाचित "म्हणालो "असावा" म्हणालो
माझा अंदाज चुकू शकतो. मला वाटतं त्यांना माहित आहे नेहरूंच्या काळात मॉल नव्हते. हे वाक्य उपहासाने लिहिले असावे.
खरं म्हणजे ते नक्की डाव्यांना धुवून राहिले की उजव्यांना धुवून राहिले ?
हे ही माझ्या आकलना पलीकडे आहे.
खरे खोटे प्रेत जाणो आता जाणारा गेला लिहून
म्हणून आपण राहिलेले अंदाज लावतोय दुसर काय?
वर जाऊन verify करण्याची इच्छा नाही.
ताजा तवाना मारवा
अतिशय अवांतर प्रश्न
If you don't mind
ताजे प्रेत हा मोठा युनिक आय डी घेतलाय तुम्ही.
या आय डी मागे काही विशेष प्रेरणा आहे /होती की
गंमत म्हणून घेतला ?
की तुम्ही काही postmortem वगैरे विभागात आहात का ?
म्हणजे एरवी इतरांना जो ताज्या प्रेताचा access नसतो तसा तुम्हाला आहे का ?
कारण प्रेताचा ताजेपणा हा ताज्या फुलांचा ताटवा सहज उपलब्ध असावा आणि त्यामुळे ताज्या शिळ्या फुलांत फरक करता यावा तसा काही प्रेतांचा ताटवा उपलब्ध नसतो.
सहज एक कुतूहल म्हणून विचारतोय
उत्तर नाही दिले तरी चालेल
बाकी अभिनंदन आणि शुभेच्छा !
‘अरबस्तान’ नव्हे! (टायपो आहे तो!)
ठाण्याचा भूगोल जर तुम्ही नीट तपासलात, तर ठाणे हे ठाण्याच्या खाडीवर आहे, थेट अरबी समुद्रावर नाही. आता, ठाणेकरांना जर कधी चौपाटीवर जावेसे वाटलेच, तर तशा ठाण्याच्या नाहीतर वसईच्या खाडीवर वाटेल तेवढ्या चौपाट्या (बीच) असतीलही, परंतु गिरगाव चौपाटीची नाहीतर जुहू चौपाटीची सर एवढ्याश्या खाडीवरच्या चौपाटीला ती काय असणार, नाही का! (तिकडे म्हणजे कसे, ‘पलीकडच्या बाजू’स दूऽरवर काऽहीऽही नाही. इकडे तसे नाही. त्यामुळे, उदाहरणादाखल, समुद्रकिनाऱ्यावरचा सूर्यास्त१ जर पाहायचा म्हटला, तर तो गिरगाव नाहीतर जुहू चौपाटीवर जाऊनच पाहिला पाहिजे, बरोबर?)
आता, गिरगाव चौपाटी काय, किंवा जुहू चौपाटी काय, ही दोन्ही ठिकाणे अरबी समुद्रावर आहेत. ठाणेकरांना तिकडे जाण्याकरिता ठाणे खाडीतून वल्हवीत वल्हवीत, मुंबईला वळसा घालून जाणे भाग आहे. (पूर्वीच्या काळी केप ऑफ गुड होपला वळसा घालून इंग्लंडातून हिंदुस्थानात यायचे, तसे. तसे म्हटले तर ठाणे-दादर (म)-दादर (प)-चर्नीरोड नाहीतर ठाणे-दादर (म)-दादर (प)-विलेपार्ले करीत लोकलने जाणे शक्य आहे, म्हणा, परंतु, मुंबईच्या लोकलला गर्दी किती असते, माहित्येय? चौपाटीवर पोहोचेपर्यंत अर्धा जीव जाईल, नि उरलेला अर्धा नकोसा होईल!) हा असा एवढा मोठा वळसा घालून जाण्यापेक्षा, ठाणेकरांच्या सोयीसाठी म्हणून ठाणे आणि अरबी समुद्र यांना थेट जोडणारा, मुंबईतून आरपार जाणारा एखादा कालवा (सुएझच्या कालव्यासारखा) अथवा (एक्स्कलूज़िव) कॉरिडॉर (बॅ. जीना यांनी पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान यांना जोडण्याकरिता मागितला होता, तसा) यांच्यापैकी काहीतरी एक (किंवा, कदाचित, दोन्ही!) बांधण्याची योजना विचाराधीन होती. या योजनेमुळे ठाणेकरांची (चांगलीच!) सोय झाली असती खरी, परंतु, मुंबई दुभंगली असती. त्यामुळे, सच्च्या मुंबईकरांस ही योजना मान्य होणे कदापि शक्य नव्हते. (आणि, ‘आमच्या मुंबई’त ‘आव्वाज’ कोणाचा चालतो, याबद्दल कल्पना असेलच.)
त्यामुळे, भडकलेल्या मुंबईकरांनी लिहिलेल्या लेखाचा मथळा आहे हा. फक्त, ‘ठाणे अरबी समुद्राला जोडण्याचा कुटील डाव’ याऐवजी, ‘ठाणे अरबस्तानला जोडण्याचा कुटील डाव’ असा टायपो झाला, इतकेच. आता, याला जबाबदार कंपॉझिटरचा सूड आहे, की कंपॉझिटरला रात्रीची जास्त झाली होती, ही बाब आहे, ते तुम्हीच तपासून ठरवा!
(किंवा, कदाचित, टायपो नसेलही. ऑटोकरेक्ट असेल. (मोदी है, तो) साला कुछ भी मुमकिन है।)
असो चालायचेच.
१ आमचा एक कॉलेजकालीन सन्मित्र, आयुष्यात मुंबईस पहिल्यांदाच गेला होता, तो, उत्साहाच्या भरात, ‘बीचवरून सूर्योदय पाहायला’ म्हणून पहाटेपहाटे गिरगाव चौपाटीवर जाऊन बसला होता, म्हणतात.१अ
१अ वास्तविक, ही गोष्ट आम्हांस (ऐकून) चांगलीच ठाऊक होती. परंतु, पुढे असे झाले, की त्यानंतर अनेक वर्षांनंतर, दस्तुरखुद्द आम्ही मुंबईत नोकरी करीत असताना — नाही! आम्ही पहाटेपहाटे गिरगाव चौपाटीवर जाऊन बसलो नाही! — आमची जी कंपनी होती, ती नुकतीच आयपीओ वगैरे होऊन प्रा.लि.ची नुसतीच लि. होऊ घातली होती, त्या आनंदाप्रीत्यर्थ (कंपन्यांना कसलाकसला आनंद होऊ शकतो, कोणी सांगावे!), कंपनीच्या अखिल भारतात जितक्या म्हणून शाखा होत्या, त्यांतील जे जे म्हणून येऊ इच्छितील, अशा सर्व कर्मचाऱ्यांना पूर्णपणे कंपनीखर्चाने चार दिवसांकरिता गोव्याची सहल घडवून आणली. (सहल म्हणजे विशेष काही नाही; स्थळदर्शन वगैरे चार दिवसांपैकी जेमतेम अर्धा दिवस वगैरे घडविले, नि उरलेला वेळ एका पंचतारांकित हॉटेलात डांबून, ‘आयएसओ-९००१’ नि ‘टोटल क्वालिटी मॅनेजमेंट’ (त्या काळातले बझवर्ड्ज़ होते ते!) या विषयांवर संततधार लेक्चरांवर लेक्चरे ऐकवलीनीत्. ‘कॅप्टिव ऑड्यन्स’ असणे म्हणजे काय बला असते, हे तेव्हा आम्हांस स्वानुभवाने चांगलेच कळले. तर ते एक असो.) पंचतारांकित हॉटेलात रहिवास असल्याकारणाने, दिवसाचा वेळ वगळता एरवी चंगळ होती. रात्रीच्या वेळेस कंपनीने हॉटेलात आयोजित केलेल्या मेजवान्या, त्यात (कंपनीखर्चाने) पाण्यासारखी वाहणारी दारू, झालेच तर हॉटेलाचा खाजगी किनारा, इतरही अनेक (बापजन्मी कधी न पाहिलेल्या) सुखसोयी, वगैरे वगैरे. मजा होती.
तर अशाच एका रात्रीच्या जेवणानंतर, भरपूर खाऊन (नि मुख्य म्हणजे भरपूर पिऊन) झालेले असताना, आमच्या ग्रूपमध्ये एकदोघे दिल्लीवरून आलेले होते, कधी समुद्र किंवा समुद्रकिनारा पाहिलेला नव्हता, त्यांच्यापैकी एकाच्या टाळक्यात एक भन्नाट कल्पना आली. बीचवर जाऊया! इथे तर प्रायव्हेट बीच आहे, साला कसा दिसतो, तो पाहूया. प्रायव्हेट बीच म्हटल्यावर, रात्रभर जरी तळ ठोकून बसलो, तरी कोणी हाकलणार नाही. छानपैकी वारा खात बीचवर गप्पा मारत पडू, झोप लागली, तर तिथेच ताणून देऊ, नि सकाळी उठल्याउठल्या बोनस म्हणून सूर्योदय! (अगोदर, पहाटे उठून सूर्योदय पाहायला बीचवर जायची कल्पना निघाली होती. परंतु, गजर लावूनसुद्धा पहाटे जर जाग आली नाही, तर काय घ्या! आणि, तसाही सकाळी उठल्याउठल्या तंगडतोड करीत बीचपर्यंत कोण जातो! त्यापेक्षा, ‘इथेच ठोका तंबू’!) रात्रीच्या जेवणात जरा जास्तच झालेली असल्याकारणाने, आम्हीही मागचापुढचा फारसा विचार न करता अत्यंत उत्साहाने या योजनेत सामील झालो. (गंमत म्हणजे, आमच्यात एकजण मुंबईकरसुद्धा होता, तोदेखील सामील झाला.) तर अशा रीतीने आम्ही सहासात जण भल्या रात्री त्या निर्जन खाजगी किनाऱ्यावर मुक्काम ठोकून बसलो.
मुक्काम ठोकून गप्पा मारीत पहुडलो खरे, परंतु लवकरच झोप लागली. (बहुधा रात्रीची जास्त झालेली अधिक वारा यांचा संयुक्त परिणाम.) कर्मधर्मसंयोगाने, पहाटे पाचाच्या सुमारास जागसुद्धा आली. (या खेपेस बहुधा फक्त वाऱ्याचा परिणाम.) मग सूर्य वर येण्याची वाट पाहात किनाऱ्याकडे तोंड करून बसून राहिलो. सहा वाजले, सात वाजले, साडेसात वाजले, परंतु सूर्य काही तोंड दाखवायचे नाव घेईना! बरे, आभाळ म्हणावे, तर तेदेखील चांगले स्वच्छ, निरभ्र वगैरे म्हणतात, तसले होते; ढगाळ वगैरे अजिबात नव्हते. आता हे काय बरे?
थोड्या वेळाने आकाशात उजेडसुद्धा दिसू लागला, परंतु सूर्य काही दिसेना. तेव्हा कोठे आम्हाला (१) आमच्या कॉलेजकालीन सन्मित्राचा किस्सा, तथा (२) गोव्याचा भूगोल, या दोन गोष्टी एकसमयावच्छेदेकरून आठवल्या.
पुढच्यास बसलेल्या ठेचेने मागचा हा नेहमी शहाणा होतोच, असे नाही.
?
नेहरूंच्या काळात स्वतंत्र भारतात किती मॉल होते?