Skip to main content

अतिशय उत्तम आणि समतोल अर्थशास्त्रीय लेख

https://www.loksatta.com/vishesh/poverty-rise-in-india-poverty-crisis-i…

वरील लेखाने मी फारच प्रभावित झालो. इतके दर्जेदार अर्थशास्त्रीय विश्लेषण आणि धोरणविषयक लिखाण मराठी वृत्तपत्रांत तरी दुर्मिळच आहे.

दै. लोकसत्तेच्या रविवार विशेषांकात आलेला हा लेख आपण वाचला नसल्यास जरूर वाचावा.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

Rajesh188 Tue, 07/12/2021 - 14:08

लेख दर्जेदार आहे हे ठरवणारी व्यक्ती ही खूप मोठी आर्थिक विषयातील तज्ञ असली पाहिजे.
जगातील कोणत्या बँकेचे गव्हर्नर आहेत का संबंधित व्यक्ती.
(सामान्य लोकांची मत दर्जेदार नसतात ,अनुभव फालतू आणि पुस्तक वाचून दुसऱ्या व्यक्ती वर विश्वास ठेवणारे आळशी लोक कथित्त. तज्ञ हेच दर्जेदार लिहतात असे समजणारे काही अर्थ वट शिक्षित तत्त्वावर आधारित)

नंदन Tue, 07/12/2021 - 14:49

लेख आवडला. दुव्याबद्दल अनेक आभार!

आर्थिक वाढीकडे अर्थशास्त्राच्या पलीकडे जाऊन पाहणे, नेमक्या आकडेवारीची गरज आणि निधी(ऐवजी/सोबतच) धोरणांत सुसूत्रता, देखरेख आणि उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने लवचीकतेची आवश्यकता हे मुद्दे वाचून Esther Duflo आणि Abhijit Banerjee यांचं Poor Economics हे पुस्तक आठवलं.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/12/2021 - 01:11

In reply to by नंदन

मुख्य प्रश्न काय आहे; तो प्रश्न सोडवण्यासाठी कुठल्या दिशांनी विचार करावा लागेल; त्यामागचा थोडा इतिहास; असा बहुविध विचार करणारा लेख आहे. अर्थशास्त्र हा विषय मी औपचारिकरीत्या शिकले नाही, तरीही लेख सहज समजला.

दुफ्लो-बॅनर्जींच्या पुस्तकाबद्दल +१. याच जोडगोळीचं Good Economics for Hard Times हेही अशाच पद्धतीनं मांडलेलं आहे. विषय अगदी ताजा आहे, आणि सदर लेखातला मुख्य मुद्दा - आदिवासी आणि भटक्या समाजांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काय करता येईल, असा काही पुस्तकाचा गाभा नसला तरीही.