Skip to main content

पांच

तप्त अशा या कुंद दुपारी
शैथिल्याची दाट सावली
फिरून घेतो झोके पंखा
माशी फिरते गूं गूं करूनी

अशक्त कण्हती किलबिल किरणे
भिंतीवरती सरपटताना
घामट ओले उदास वास्तव
प्रकाशसुद्धा अशक्त ओला.

शेवाळ्याची बीभत्स वस्ती!
बुरशीला शेजार कुणाचा?
तडयात फिरते सूक्ष्म वाळवी
मुंग्यांचा सहवास फुकाचा.

अशा खपटचुक वातावरणी
एकच आहे पाल पांढरी
भिंतीवरची ट्यूब लागता
फ्लिकर होऊनी जाते पळुनि

जमिनीवरती असंख्य कपडे
धुळीत पडले इकडे तिकडे
चपला,बूट अन कितीक मोजे
टाय,कोट अन बिल्ले-सल्ले

भूक लागता मॅगी खावी
तहानही बिसलेरी घाऊक
स्वयंपाक हा शब्द शोधला-
डिक्शनरीतही नसेल ठाऊक

१६ पेले १७ जागी
शंभर ताटे दाटीवाटी
भ्रष्ट बाटल्या उघड्या पडल्या-
पिझ्झा दिसतो जागोजागी

स्क्रीन पाहता खेचून घेती
सुंदर सुरेख ललना मादक,
इंटरनेटी मुशाफिरी ही
करती इकडे पुरी रात्रभर

भुरी मांजरी येऊन जाऊन
पलंगावरी खुशाल नाचे
आवारा अनिकेत अशी मग
मित्रमंडळी मागे मागे

असल्या ह्या घनचक्कर जागी
राहण्यास जे होती राजी
राजीखुशीने वसती तेथे
बॅचलर तयां दुनिया म्हणते!

.

* शीर्षक रेफरन्स्

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 29/05/2020 - 01:17

In reply to by 'न'वी बाजू

गणितातल्या पिजनहोल सिद्धांताचा व्यत्यास आहे तो! काय पण, एवढं साधंसाधंसुद्धा उलगडून लिहावं लागतं.

'न'वी बाजू Sun, 24/05/2020 - 07:08

अस्वलाला सकाळीसकाळी उंदीर१ चावले बहुधा!

----------

१ मर्ढेकरांचे.

'न'वी बाजू Sun, 24/05/2020 - 07:15

राजीखुशीने वसती तेथे
बॅचलर तयां दुनिया म्हणते!

इथे वृत्तात किंचित गंडलीशी वाटतीये. ('राजिखुशीने' चालेल का? पण समजा चालवले, तरी 'बॅचलर तयां'चे काय करायचे, समजत नाही.)

शेवाळ्याची बीभत्स वस्ती!

इथेही 'बीभत्सा'त धडपडलीये.

पण एरवी जमलीये झकास!

'न'वी बाजू Sun, 24/05/2020 - 08:02

अशा खपटचुक वातावरणी
एकच आहे पाल पांढरी
भिंतीवरची ट्यूब लागता
फ्लिकर होऊनी जाते पळुनि

... आपल्या हिंदू पालींना ट्यूबलाइटच्या उजेडाचे भय नसते काही. उलट, ट्यूबलाइटभोवती भरपूर किडे खायला मिळतात, म्हणून भर ट्यूबलाइटच्या उजेडात ठिय्या मांडतात. इतर जातींच्या पालींसारख्या अंधारात दबा धरून बसत नाहीत काही!

इथे पाहा.

While native geckos are more likely to stay out of sight when hunting, darting out of the shadows to catch nearby prey, the Asian gecko has no such qualms about being seen. Asian geckos often rest in brightly lit areas, relying on immobility to go unnoticed by their prey.

अस्वल Sun, 24/05/2020 - 12:53

In reply to by चिमणराव

नाही, म्हणूनच खाली रेफरन्स दिलाय हो.

अनुराग कश्यपचा पांच माझा तरी एकदम आवडता सिनेमा आहे.
कदाचित तो पाहिला तेव्हा मीही असाच बॅचलर होतो - थोडाफार नोकरी वगैरे सुरू असलेला.
त्यातली ती लूक/पाँडी/मुर्गी/जॉय ह्यांची खोली आठवली एकदम. म्हणून पांच.
.
पाच कविता वगैरे जुलूम कुठे करणार :)

चिमणराव Sun, 24/05/2020 - 13:24

In reply to by अस्वल

अरर. माझं चित्रपट ज्ञान तोकडं आहे.

पण उरलेल्या चार येत्या काही दिवसांत लिहिल्यांत तरी ऐकायला/वाचायला तयार आहे. म्हणजे आवडेलच.
जुलूम कसला? ब्याचलरचा बेफिकिरपणा बेमालुम बसवलाय.

ऐसीवर यासाठीच येतो.

'न'वी बाजू Sun, 24/05/2020 - 16:42

In reply to by मन्या ऽ

याहूनही गचाळ राहतात. वर्णने ऐकलीत, तर अंगावर शहारे येतील.

- (बीन देअर, डन दॅट) 'न'वी बाजू.

अस्वल Sun, 24/05/2020 - 12:50

धन्यवाद सामो,अचरटबाबा, उज्ज्वला!
@मन्या - "गचाळ"?? ह्याला तुम्ही गचाळ म्हणता? तुमच्याच शब्दांत म्हणायचं तर - "हे जीवन सुंदर आहे ..."
@अबापट - काय बोलावं? those were the best days of my life!
@न.बा- तुम्ही चक्क कविता आवडली असं म्हणालात? सगळं ठीक? :)

'न'वी बाजू Sun, 24/05/2020 - 16:58

@न.बा- तुम्ही चक्क कविता आवडली असं म्हणालात? सगळं ठीक? Smile

नाही हो! वय झाले आता. (पाहा ना! म्हातारचळ लागलाय. कवितासुद्धा वाचू लागलो म्हणजे... :-) ) काय करणार? चालायचेच.

तिरशिंगराव Sun, 24/05/2020 - 20:21

In reply to by 'न'वी बाजू

म्हातारे म्हणू नका. नाहीतर लोक तुमची माझ्यासारख्या थेरड्यांत गणना करायचे.