एलेजी

कधी काळ आपला नाही म्हणून
कधी लोक आपले नाहीत म्हणून

कधी रस्ते ओळखीचे नाहीत म्हणून
कधी आधार सापडले नाहीत म्हणून

कधी व्यवस्था आपली नाही म्हणून
कधी आपली व्यवस्था उभारता आली नाही म्हणून

कधी भूमिका फसल्यात म्हणून
कधी बाजू ठरवताच आल्या नाहीत म्हणून

कधी भोगवादाचा चीड आली म्हणून
कधी वस्तूंच्या झगमगाटात हरऊन गेलोत म्हणून

कधी आदर्श सापडले नाहीत म्हणून
कधी वाटा पाडता आल्या नाहीत म्हणून

कधी इतिहास समजला नाही म्हणून
कधी वारसा खोटाय हे समजलं म्हणून

कधी नाकारलो गेलोत म्हणून
कधी तग धरू शकलो नाहीत म्हणून

कधी संतापण्याच्या सर्व शक्यता मावळल्याहेत म्हणून
कधी आरामात जगण्याची सवय झाली आहे म्हणून

मी विचार करतो की आपण सगळे
असे रस्त्याकाठी हतबल उभे आहोत का म्हणून -

अनंत ढवळे

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

कविता आवडली.
पण शीर्षक मात्र समजलं नाही.
(म्हणजे कविता समजली असं नाही ..)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कळतेय / पोचतेय वाटेस्तोवर निसटणारी कविता

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता अतिशय आवडली. कविता वाचतांना जाणवलेल्या लयीमुळे कवितेला 'रेक्विय्म' असे शीर्षक कमी सूचक पण अधिक समर्पक ठरले असते असे वाटून गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता खूप आवडली. अशाच दर्जेदार कवितांची अपेक्षा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम कविता. इतर कवितांइतकीच आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

कविता आवडली...पटली म्हणता येइल किंवा व्यक्त केलेला विचार आपल्याच मानातला आहे असं वाटलं. शेवटचा "पंच" (शेवटच्या दोन ओळी) मस्त जमलाय.
'एलेजी'चा अर्थ माहित नव्हता. जालावर पाहिला. पण तो या कवितेचा प्रकार म्हणता येइल, शीर्षक म्हणून तितका योग्य शब्द वाटला नाही. असो. पारिभाषिक शब्दकोशात शोधले असता 'विलापिका' हा मराठी प्रतिशब्द मिळाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0