एक गाणे
एक गाणे दूरवरुनी, निशिदिनी झंकारते
पैलतीरावरुनी काही ऐलतीरी आणते
हृदयस्पंदी ताल त्याचा, राग त्याचा अनवट
भिनत जातो नाद, मग अनुनाद येतो गर्जत
लय अशी अलवार मजवर प्राणफुंकर घालते
रोमरोमातून काही तरल मग ओसंडते
मुक्तछंदी शब्द, त्यांच्या सावल्या धूसर जरी
अर्थ उलगडती नवेसे ऐकले कितिही तरी
प्रतिक्रिया
सुंदर!!! आवडली.
सुंदर!!! आवडली.
वाह!!
खरे आहे.
मस्त.
मस्त.
तुमच्या कविता आवडतात मला.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
फारच सुंदर!
फारच सुंदर!
आवडली
आवडली.
खरंच!
अर्थ उलगडती नवेसे ऐकले कितिही तरी...