Skip to main content

आजचे दिनवैशिष्ट्य - १५

आधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढला आहे.

---

गब्बर सिंग Wed, 11/07/2018 - 02:39

१९९७ : निअँडरथल सापळ्याचे डीएनए विश्लेषण करून ब्रिटिश संशोधकांनी आफ्रिकेतून मानववंशाची सुरुवात झाल्याच्या सिद्धांताला पुरावा दिला आणि आदिम 'अदिती' (African Eve) एक ते दोन लाख वर्षांपूर्वीची असल्याचे सिद्ध केले

.
(१) एक ते दोन लाख वर्षांपूर्वीची - हे सद्य एस्टिमेट.
(२) एक ते सव्वा लाख वर्षांपूर्वीची - हे आणखी बरं एस्टिमेट.
.
.
हे बरं एस्टिमेट करता येण्यावर काय Constraints असतील ?
.
.

गब्बर सिंग Fri, 13/07/2018 - 11:09

बड्डे : शांततावादी, मानवतावादी, नोबेलविजेते कवी पाब्लो नेरुदा (१९०४)

.
हे कम्युनिस्ट होते असं केतकरांच्या लेखांमधे वाचल्याचं आठवतंय.
.

गब्बर सिंग Sat, 14/07/2018 - 05:32

पुण्यस्मरण : वीर बाजीप्रभू देशपांडे (१६६०)

.
दिसू लागले अभ्र सभोती,
विदीर्ण झाली जरी ही छाती,
अजून जळते आंतरज्योती,
कसा सावरू देह परी?
.
ऐकलेले असं आहे की बाजी हे त्यांचे नाव व "प्रभुदेशपांडे" हे त्यांचे आडनाव.
.
.

नितिन थत्ते Sat, 14/07/2018 - 10:23

In reply to by गब्बर सिंग

>>बाजी हे त्यांचे नाव व "प्रभुदेशपांडे" हे त्यांचे आडनाव.

असेल. कारण ते कायस्थ होते असं ऐकलं आहे.

'न'वी बाजू Sat, 14/07/2018 - 19:44

In reply to by नितिन थत्ते

बोले तो, 'प्रभू देशपांडे'मधील (या स्पेसिफिक केसमधील) 'प्रभू' हे ज्ञातिवाचक असू शकेलही. (मला माहीत नाही.) परंतु 'प्रभुदेसाई' हे आडनाव कऱ्हाडे ब्राह्मणांत असते. ('प्रभुमिराशी'सुद्धा बहुधा भटांपैकीच. खात्री नाही; चूभूद्याघ्या.)

शिवाय, 'प्रभू'ने सुरू होणारी कित्येक आडनावे (इन्क्लूडिंग, इफ आय अॅम नॉट मिष्टेकन, 'प्रभुदेसाई') सारस्वतांतसुद्धा असतात, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

कारण ते कायस्थ होते असं ऐकलं आहे.

ही आणखी एक गंमत. सगळे प्रभू (अॅज़ इन जात) हे कायस्थ नसतात. (पाठारे प्रभू अशीही एक जात असते. त्यांच्यात नि चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंत नक्की काय कॉमन असते - 'परभट' / 'परभटले' या डेरॉगेटरी एक्सोनिमाखेरीज - ते एक प्रभूच जाणे. (आणि हो! प्रभू येशू सीकेपी नव्हता. पाठारे प्रभूही नसावा. चित्रगुप्त मात्र सीकेपी आहे अशी थियरी ऐकलेली आहे.))

शिवाय, सगळे कायस्थ हे प्रभूही नसावेत. उत्तरेत, बंगालातसुद्धा कायस्थ असतात. (हू, अॅज़ अ कम्यूनिटी, आर मोष्ट लाइकली रिलेटेड टू सीकेपीज़.) मात्र, त्यांनी स्वतःला कधी 'कायस्थ प्रभू' म्हणवून घेतल्याचे निदान मी तरी ऐकलेले नाही. (चूभूद्याघ्या.)

(थोडक्यात, कायस्थ म्हणजे काय, प्रभू म्हणजे काय, त्यांच्यात (महाराष्ट्रापुरताच) ओव्हरलॅप नेमका कसा, काही म्हणजे काही कळत नाही. जाऊद्यात झाले!)

अबापट Sat, 14/07/2018 - 20:07

In reply to by 'न'वी बाजू

न बा, आश्चर्य वाटेल , पण याविषयक तुम्हाला जास्त माहिती तुमचे मित्र चिंतातुर जंतू आणि अजो सांगू शकतील अशी खात्री वाटते.

गब्बर सिंग Sat, 14/07/2018 - 22:41

In reply to by नितिन थत्ते

बाकी ते गाणं लै म्हणजे लैच छान आहे.

.
इर्शाद. कवि कुसुमाग्रजांची कविता आहे ती. हे गाणं कै. मातोश्रींनी जवळ बसवून ऐकवलं होतं व गाण्याची पार्श्वभूमी व अर्थ समजावून सांगितला होता.
.
थत्तेचाचा, तुम्हास सुचवणी - जोडीला - "बर्फाचे तट पेटूनी उठले, सदन शिवाचे कोसळते" - ही पण त्यांची कविता वाचा.
.

गब्बर सिंग Sat, 14/07/2018 - 22:57

पुण्यस्मरण : मदन मोहन (मृत्यू: १४ जुलै १९७५)

.
मदन मोहनना अधुन मधुन स्वत: गाण्याची हुक्की यायची. या गाण्याच्या सुरुवातीस त्यांनी असंच थोडंसं गाऊन घेतलेलं आहे. नंतर लताबाईंचा अतिकोमल आवाज .... हे गाणं विविधभारतीवर क्वचितच लागतं.
.
.

.
------------
.
हे पण फक्त लताबाईंसाठी ऐकावं.
.
.

.

गब्बर सिंग Sat, 14/07/2018 - 23:10

बड्डे : संगीतकार रोशन (१९१७)

.
यात पहिल्या पंधरा सेकंदात बॅकग्राऊंडला धुन वाजते ती रोशन ने दोनतिन गाण्यांत वाजवलेली आहे असं वाटतं. गाणं चांगलंच रडवं आहे.
.
पडद्यावर मराठी माणूस - काशिनाथ घाणेकर.
.

.
.
.

गब्बर सिंग Mon, 16/07/2018 - 23:46

पुण्यस्मरण : अश्लीलताविरोधी विचारांना तर्कशुद्ध विचार देणारे लेखक दत्तात्रेय गोडबोले (१९७४)

.
अश्लील पत्र, अश्लील पत्र ! ..... ह्म्म्म ते मला वाचलंच पाहिजे.
.

गब्बर सिंग Tue, 17/07/2018 - 10:44

बड्डे : अभिनेत्री कतरीना कैफ (१९८४)

.
हिचं एखादं बरं गाणं कुणीतरी डकवा रे इथे.
.
"शीला की जवानी" आणि "चिकनी चमेली" ही दोन्ही बकवास आहेत गाणी.
.
.
हे कसं वाट्टंय ?
.
.

.

गब्बर सिंग Wed, 18/07/2018 - 03:57

स्नेहल भाटकरांचं हे "यारों किसीसे ना कहना" गाणं आज घरी गेल्यानंतर ऐकतो. पूर्वी ऐकलेलं नसावं असं वाटतंय.
.
"हाल ए दिल उनको सुनाना था" .... हे सुमन कल्याणपूर यांचं गाणं निपोंनी प्रथम मला ऐकवलं होतं. १९९४ - ९५ च्या आसपास.
.
.

.

गब्बर सिंग Wed, 18/07/2018 - 04:06

पुण्यस्मरण : अभिनेत्री शांता हुबळीकर (१९९२), गायिका अभिनेत्री कानन देवी (१९९२)

.

.
अब तुमने कितनी दूर, ठिकाने बना लिये
.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 19/07/2018 - 07:02

१९ जुलैला एडगर दगाचा वाढदिवस, हे वाचून गंमत आठवली. हल्लीच डोळ्यांत लेझर किरणं मारून (हुशारी) मिरवणं बंद केलं. त्या डॉक्टरच्या वेटिंग रूममध्ये दगा आणि रॉथकोच्या चित्रांची कॉफी टेबल पुस्तकं होती. चांगली जाडजाड आणि विकीपीडीत माहिती फारच कमी असलेली.

डॉक्टरकडे जाऊन 'आणखी थोडी वाट बघायला लागली तर बरं' असं पुन्हा कधी होईल असं वाटत नाही.

तर हे एक दगाचं चित्र. याचा प्रिंट घरी डकवलाय.
एडगर दगा देगा

गब्बर सिंग Fri, 20/07/2018 - 09:21

बड्डे : सिनेअभिनेता राजेंद्र कुमार (१९२९)

.
राजेंद्रकुमार चं वर्णन "अभिनेता" असं केलंत तुम्ही, निर्णयन मंडल ?
काय हे ? शिरिष कणेकरांनी त्यांचं वर्णन ठोकळा, माठ, पुतळा असं केलं होतं.
उद्या तुम्ही दिलीपकुमारला सपोर्टिंग ॲक्टर म्हणाल... तुमचं काही सांगता येत नाही !!!
.
.

.
.

.
.

गब्बर सिंग Fri, 20/07/2018 - 11:01

In reply to by मनीषा

प्रश्नच नाही.
.
ही एकदोन आणखी गाणी ऐकून टाका. पडद्यावर राजेंद्रकुमार बरोबर मीनाकुमारी.
.
आयमीन तिचं बघून तरी (कॉपीकॅट बनून तरी) याच्या चेहऱ्यावर काही एक्स्प्रेशन्स येतात का ते पहावे.
.
.

.
.

गब्बर सिंग Fri, 20/07/2018 - 11:10

In reply to by अनुप ढेरे

हो पण शिरिष कणेकर ओव्हररेटेड आहेत का ते सांगा ?
.
कणेकर एकदा म्हणाले की "शेंगदाणा हा गरिबांचा काजू आहे तसाच रवी शास्त्री हा गरिबांचा सुनील गावस्कर आहे". आमची यावर चर्चा सुरु असताना - निपो म्हणाले होते की कणेकर हे गरिबांचे पु ल देशपांडे आहेत.
("पुलं हे गरिबांचे कोण आहेत ते मात्र विचारू नका")

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/07/2018 - 22:44

In reply to by गब्बर सिंग

अमेरिका, 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी', आणि तत्सम गोष्टींबद्दल कणेकरांनी लिहिलेले लेख खरं तर विनोदी म्हणून वाचले पाहिजेत. आणि विनोदी म्हणून लिहिलेले शेंगदाण्यांच्या पुडीसाठी वापरले पाहिजेत.

गब्बर सिंग Fri, 20/07/2018 - 23:14

चिदंबरम यांच्यावर सीबीआयचे आरोपपत्र
.
पण हा राजकीय पूर्ववैमनस्याचा प्रकार आहे असा आरोप कसा काय झालेला नाही अजूनपर्यंत ? सूर्जेवाला काय करताहेत ?
.
.

नितिन थत्ते Sat, 21/07/2018 - 19:44

In reply to by गब्बर सिंग

>>हा राजकीय पूर्ववैमनस्याचा प्रकार आहे

छे !! उलट हा इनएफिशिअन्सीचा प्रकार आहे. ज्या माणसाच्या २जी स्कॅम मधील इन्व्हॉल्वमेंटबद्दल सरकार पक्षातल्या सर्वांना खात्री होती त्याच्यावर नुसतं आरोपपत्र दाखल करायला सर्वशक्तीमान (पूर्ण बहुमतवाल्या कॉॲलिशनची कम्पल्शन्स नसलेल्या) सरकारला सव्वाचार वर्षं लागली. उलट कोॲलिशनमध्ये असूनसुद्धा ए राजा आणि कनिमोळीला अटक/खटला भरणे वगैरे गोष्टी मागील फडतूस सरकारच्या काळात झाल्या.

गब्बर सिंग Sat, 21/07/2018 - 22:20

In reply to by नितिन थत्ते

उलट कोॲलिशनमध्ये असूनसुद्धा ए राजा आणि कनिमोळीला अटक/खटला भरणे वगैरे गोष्टी मागील फडतूस सरकारच्या काळात झाल्या.

.
फडतूस हा शब्द गब्बर चा इथे ट्रेडमार्क आहे ओ.
व तो तुम्ही वापरू शकता.
पण त्याचा मूळ अर्थ बदलून जाईल असा वापरलात तुम्ही. .... ये अच्छी बात नही है !!!
.
निळ्या रंगातला मजकूर अटल बिहारी वाजपेयींचा प्रसिद्ध डायलॉग आहे असा माझा समज आहे. त्याचा मूळ काँटेक्स्ट कोणाला माहीती आहे का ?
.
----
.
.

ज्या माणसाच्या २जी स्कॅम मधील इन्व्हॉल्वमेंटबद्दल सरकार पक्षातल्या सर्वांना खात्री होती त्याच्यावर नुसतं आरोपपत्र दाखल करायला सर्वशक्तीमान (पूर्ण बहुमतवाल्या कॉॲलिशनची कम्पल्शन्स नसलेल्या) सरकारला सव्वाचार वर्षं लागली.

.
इनिफिशियन्सी की Ensuring proper due diligence ?
.
२जी केस मधे जे घाईघाईने २०११ च्या एप्रिल मधे चार्जशीट दाखल केले होते त्याचा निकाल डिसे. २०१७ मधे लागला तो तुमच्या समोर आहेच की.
ममोसिंनी त्यानंतर "जितं मया" ची आरोळी ठोकली होती.
.

गब्बर सिंग Sat, 21/07/2018 - 11:01

बड्डे : गीतकार आनंद बक्षी (१९३०)

.

.
कुछ रीत जगत की ऐसी है
हर एक सुबह की शाम हुई
तू कौन है तेरा नाम है क्या
सीता भी यहां बदनाम हुई
.
फिर क्यो संसार की बातोंसे
भीग गये तेरे नैना....
......

गब्बर सिंग Tue, 24/07/2018 - 21:26

बड्डे : अभिनेते, दिग्दर्शक मधुकर तोरडमल (१९३२)

.
तू दगडी खल मी बत्ता
तू सुपारी चिकणी मी अडकित्ता
तू रसगुल्ला मी जंबू
तू झारी मी चंबू !!!
.

उज्ज्वला Thu, 26/07/2018 - 22:52

In reply to by गब्बर सिंग

गाण्याचं इतकं बंडल चित्रीकरण पाहून निराशा झाली. इतक्या छान गाण्यावर काही माकडचाळ्यांचे तेच तेच तुकडे फिरवलेत. काही काही गाणी ऐकायलाच छान असतात त्यात हेही !

मनीषा Sat, 28/07/2018 - 10:24

In reply to by 'न'वी बाजू

माकडांना देखिल इथे कुणी वाली आहे तर.

नाहीतर त्यांची बिचाऱ्यांची बाजू कोण मांडणार?
"खुद पाप करो - नाम हो शैतानका बदनाम " .... तशातली गत.

'न'वी बाजू Sun, 29/07/2018 - 03:03

In reply to by मनीषा

माकडांना देखिल इथे कुणी वाली आहे तर.

अर्थात! वालीदेखील माकडांपैकीच. आणि सुग्रीव, झालेच तर हनुमानसुद्धा. पण सुग्रीव डँबीस होता. माणसाला फितूर झाला. तेदेखील खुर्चीसाठी. (हौ ह्युमन!) सुग्रीव, हनुमान माणसाळलेली (अर्थात काहीशी भ्रष्ट) माकडे. वाली प्युअरब्रेड, विशुद्ध माकड. असो.

गब्बर सिंग Fri, 27/07/2018 - 10:18

In reply to by उज्ज्वला

काही काही गाणी ऐकायलाच छान असतात त्यात हेही !

.
मॅडम, प्रणाम. ही अशी गाणी - काही काही नाहीत. अनेक आहेत.
असह्य होतात बघायला. पण ऐकायला मस्त वाटतात.
.
.
हे एक घ्या....
.
.

.
.
आणखी एक
.

.
.
.
आता ह्या गाण्यात बिस्वजीत ने तंगड्या हव्यातशा हलवून .... गाण्याचं मातेरं केलेलं आहे. बाकी गाणं बऱ्यापैकी आहे.
.
.

सामो Thu, 26/07/2018 - 20:17

अरेच्च्या आज कार्ल जंग (युंग) चा जन्मदिवस आहे. मस्त!! या शास्त्रद्न्याबद्दल आदर आहे. मानसोपचार हे शास्त्र आहे की नाही? कारण प्रत्येक वेळी स्थलातीत, कालातीत तोच परीणाम दर्शवु शकत नाही.

गब्बर सिंग Fri, 27/07/2018 - 09:59

पुण्यस्मरण : भास्कर चंदावरकर (मृत्यू : २६ जुलै २००९)

.
आज लतादीदींनी त्यांच्या फेबु भिंतीवर "सख्या रे घायाळ मी हरीणी" हे गाणं पोस्ट केलं आहे.
.

गब्बर सिंग Tue, 31/07/2018 - 11:00

बड्डे : प्राच्यविद्यापंडित व गणितज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबी (१९०७), अर्थत्ज्ज्ञ मिल्टन फ्रीडमन (१९१२)

.
पहिला मार्क्सिस्ट आणि दुसरा भांडवलवादाचा अध्वर्यू.
.
.

Nothing is so permanent as a temporary government program. ___ Milton Friedman

.
.

The government solution to a problem is usually as bad as the problem. ____ Milton Friedman

.

गब्बर सिंग Thu, 02/08/2018 - 03:29

बड्डे : मा. भगवान (जन्म : १ ऑगस्ट १९१३)

.
शोला जो भडके हे गाणं लावल्याबद्दल सलाम ओ, निर्णयन मंडल.
.
जोडीला हे पण ... त्याच चित्रपटातले. पडद्यावर गोड चेहऱ्याची, व थत्ते चाचांची आवडती, गीता बाली.
लताबाईंचा मिठासभरा आवाज. अण्णासाहेब पुणतांबेकर-चितळकर यांचं संगीत.
.
.

.

गब्बर सिंग Fri, 03/08/2018 - 22:58

बड्डे : जयदेव (जन्म : ३ ऑगस्ट १९१९)

.
"हर आस अश्कबार है" - हे लताबाईंचं कमी फेमस पण अत्यंत गोड गाणं आहे ओ, निर्णयन मंडल. विविधभारतीवाले क्वचितच लावतात. पडद्यावर मीनाकुमारी.
"ये दिल और उनके निगाहोंके साए" हे त्यांचं सर्वात फेमस गाणं असावं.
.

.
.

सामो Sat, 04/08/2018 - 00:38

In reply to by गब्बर सिंग

"रात भी है कुछ भीगी भीगी" या गाण्याकरता 'मुझे जीने दो' पाहिला. वहीदा रेहमानचे या गाण्यातील भाव अवर्णनिय सुंदर आहेत.

सामो Tue, 07/08/2018 - 01:39

In reply to by गब्बर सिंग

आवाज मस्तच आहे ना. पण वहीदाचे या ओळींवरचे भाव /अदा पाहीलेत का-

'तपते दिल पर यूँ गिरती है
तेरी नज़र से प्यार की शबनम
जलते हुए जंगल पर जैसे
बरखा बरसे रुक रुक थम थम'

अतिशय मोहक आहेत.

गब्बर सिंग Tue, 07/08/2018 - 03:40

In reply to by सामो

मला वहिदा रेहमान आवडत नाही. का कोणजाणे.
पण त्यामुळे आमचे लक्ष्य फक्त लताबाईंच्या आवाजाकडे, जयदेव यांच्या संगीताकडे वगैरे जास्त.

गब्बर सिंग Sun, 05/08/2018 - 23:58

पुण्यस्मरण : समाजशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, राजकीय सैद्धांतिक, लेखक फ्रेडरिक एंगल्स (१८२०)

प्रिन्सिपल्स ऑफ कम्युनिझम या त्यांच्या पुस्तकातल्या पृष्ठ ११ व १२ वरून साभार -

हे पुस्तक त्यांनी प्रश्न-उत्तर या स्वरूपात लिहिलेले आहे. वाचणाऱ्याला समजून घेणं सोपं जावं म्हणून.
खालील परिच्छेद ही सोशॅलिझम च्या दिशेने प्राथमिक पाऊल म्हणायला हरकत नसावी.
.
.
Question 14: What kind of a new social order will this
have to be?
.
Answer: Above all, it will generally have to take the running
of industry and of all branches of production out of the
hands of mutually competing individuals and instead institute
a system in which all these branches of production are
operated by society as a whole, that is, for the common account,
according to a common plan and with the participation
of all members of society. It will, in other words, abolish
competition and replace it with association. Moreover, since
the management of industry by individuals has private property
as its inevitable result, and since competition is merely
the manner and form in which industry is run by individual
private owners, it follows that private property cannot be
separated from the individual management of industry and
from competition. Hence, private property will also have to
be abolished, and in its place must come the common utilization
of all instruments of production and the distribution of
all products according to common agreement — in a word, the
so-called communal ownership of goods. In fact, the abolition
of private property is the shortest and most significant way
to characterize the transformation of the whole social order
which has been made necessary by the development of industry,
and for this reason it is rightly advanced by communists
as their main demand.

गब्बर सिंग Mon, 06/08/2018 - 21:44

पुण्यस्मरण : संगीतकार वसंत पवार (मृत्यू : ६ ऑगस्ट १९६५)

.
तुझ्या ऊसाला लागल कोल्हा - चा अर्थ काय ?
.
ती कविता गदिमा डॉट कॉम वर पूर्ण वाचली. पण गदिमांना नक्की काय म्हणायचं होतं ते समजलं नाही.
आयमिन a cautionary note to a woman, who is coming of age - एवढंच त्यांना अभिप्रेत होतं का ? की त्याहीपेक्षा अधिक काही ?? कविला जे म्हणायचं असतं ते आमच्यासारख्या मराठीत शंभरापैकी चौपन्न** गुण मिळालेल्या लोकांना चटकन समजतंच असं नाही - म्हणुन विचारतो.
.
.
(** पुलं म्हणतात तसे - मार्क्सविरोधी गटातले आम्ही.)
.

चिंतातुर जंतू Tue, 07/08/2018 - 13:31

In reply to by गब्बर सिंग

ती कविता गदिमा डॉट कॉम वर पूर्ण वाचली. पण गदिमांना नक्की काय म्हणायचं होतं ते समजलं नाही.

मूळ जमीन काळं सोनं... ह्या कडव्यात त्या स्त्रीच्या तारुण्यानं मुसमुसलेल्या देहाचं वर्णन आहे.
कुंपण घालशील किती? अर्ध्या रात्री घाला... वगैरे कडव्यामध्ये अब्रू सांभाळणं किती कठीण जाणार आहे ह्याचा इशारा आहे.
पण कालची कोल्हेकुई, ढेकर, चिखल वगैरे शेवटच्या कडव्यातलं वर्णन पाहता तरुणीचा जार काल रात्रीच येऊन गेलेला आहे आणि 'सांभाळ..' म्हणणारीला हे कळलेलं दिसत नाही, किंवा ती मला कळलं आहे, हे सूचकपणे सांगते आहे.

घाटावरचे भट Wed, 08/08/2018 - 09:30

In reply to by चिंतातुर जंतू

पण कालची कोल्हेकुई, ढेकर, चिखल वगैरे शेवटच्या कडव्यातलं वर्णन पाहता तरुणीचा जार काल रात्रीच येऊन गेलेला आहे आणि 'सांभाळ..' म्हणणारीला हे कळलेलं दिसत नाही, किंवा ती मला कळलं आहे, हे सूचकपणे सांगते आहे.

उसाला कोल्हा लगणे याबद्दल असे वाचले आहे की कोल्हा उस पूर्ण न तोडता फक्त उसाच्या मुळाजवळ दात लावून उसातील रस शोषून घेतो. त्यामुळे वरवर चांगला वाटणारा उस आतून पूर्ण वाळका निघतो. खखोदेजा. पण ह्याची संगती तुम्ही दिलेल्या अर्थाशी जुळत आहे. धन्यवाद.

सैराट Tue, 07/08/2018 - 22:11

In reply to by गब्बर सिंग

भले लोकहो ! तुमचं अभिनंदन. वसंत पवारांची आठवणही आली नसेल काल कोणाला पण तुम्ही ठेवली.
कुठल्याच मराठी वाहिनीवर मी काल यांचं स्मरण झालेलं पाहिलेलं नाही. चांगलं काम करतात तुम्ही. शाब्बास.

गब्बर सिंग Tue, 07/08/2018 - 22:19

पुण्यस्मरण : गायिका अंजनीबाई मालपेकर(१९७४)

.
यांची एखादी कलाकृती इकडे डकवा ना ओ, निर्णयन मंडल. हे नाव सुद्धा मी कधी ऐकलेलं नाही. नै म्हंजे शास्त्रोक्त मधलं मला काही कळतं असं नाही. पण तुम्हाला माहीती असलेलं एखादं गोड सं पद इथे डकवलंत तर जरा मजा येईल. अन्यथा युट्युब धुंडाळतो आहेच मी.
.

गब्बर सिंग Wed, 08/08/2018 - 01:45

बड्डे : भारतीय हरितक्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन (१९२५)

.
यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग गठित केला होता. त्याचा अहवाल इथे आहे.
.
त्यातल्या सूचना -
.

The NCF suggests:

Expand the outreach of the formal credit system to reach the really poor and needy.
Reduce rate of interest for crop loans to 4 per cent simple, with government support.
Moratorium on debt recovery, including loans from non-institutional sources, and waiver of interest on loans in distress hotspots and during calamities, till capability is restored.
Establish an Agriculture Risk Fund to provide relief to farmers in the aftermath of successive natural calamities.
Issue Kisan Credit Cards to women farmers, with joint pattas as collateral.
Develop an integrated credit-cum-crop-livestock-human health insurance package.
Expand crop insurance cover to cover the entire country and all crops, with reduced premiums and create a Rural Insurance Development Fund to take up development work for spreading rural insurance.

.

पुंबा Fri, 10/08/2018 - 11:13

In reply to by गब्बर सिंग

श हे अक्षर ष ला खाऊन टाकेल अशी भिती त्यांना होती. पोटफोड्या ष टिकावा यासाठी आपल्यापुरता प्रयत्न म्हणून ते षांताराम असे नाव लिहायचे असं फेसबुकावर वाचलं.
षंढ हा ढळढळीत रोज वापरावा लागणारा शब्द असताना ष कसला जातोय मराठी भाषेतून..

'न'वी बाजू Sat, 11/08/2018 - 07:49

In reply to by तिरशिंगराव

लक्षवेधीपणाचा(च) प्रकार आहे. उगाच नाकारण्यात काय मतलब आहे?

(अर्थात, लक्षवेधीपणात अवैध तथा गैर असे काहीच नाही म्हणा. आम्ही नेहमीच करतो की!)

'न'वी बाजू Fri, 10/08/2018 - 15:28

In reply to by पुंबा

श हे अक्षर ष ला खाऊन टाकेल अशी भिती त्यांना होती. पोटफोड्या ष टिकावा यासाठी आपल्यापुरता प्रयत्न म्हणून ते षांताराम असे नाव लिहायचे असं फेसबुकावर वाचलं.

... चुकीच्या ठिकाणी चुकीचा 'ष' वापरलाय हो! 'श' आणि 'ष' यांच्या उच्चारांत फरक आहे; किंबहुना, हे दोन वेगवेगळे, डिस्टिंक्ट उच्चार असलेले वर्ण आहेत. 'ष'चे संवर्धन व्हावे वगैरे तथाकथित 'उच्च ध्येये' आपापल्या जागी ठीकच आहेत, परंतु म्हणून जेथे नाही तेथे उगाच 'ष' वापरण्यात काय हशील आहे? त्यापेक्षा, जेथे योग्य तेथे(च) 'ष' वापरून त्याचा त्या ठिकाणी योग्य उच्चार करण्याने ते उच्च ध्येय अधिक चांगल्या प्रकारे साध्य होणार नाही काय?

अर्थात, नाव हे प्रत्येकाचे आपापले असते, सबब ते ज्यानेतिने हवे तसे लिहावे (आणि इतरांनी त्याचा मान राखावा), हेही आर्ग्युमेंट आपल्या ठिकाणी ठीकच आहे. परंतु मग त्या परिस्थितीत "माझे नाव 'षांताराम' असे(च) आहे (, 'शांताराम' असे नव्हे) (, आणि म्हणून मी ते 'षांताराम' असे लिहितो)", असा (आणि एवढाच) दावा जर षांतारामबापूंनी केला असता, तर तो एक वेळ मानता आला असता. परंतु "'ष' हे अक्षर टिकून राहावे, म्हणून मी माझे नाव 'षांताराम' असे लिहितो" हा दावा भंपक अत एव निरर्थकच नव्हे, तर अज्ञानमूलकसुद्धा (म्हणजे, सोप्या मराठीत: अडाणचोट) आहे, एवढेच मांडून मी आता खाली बसतो.

(थोडक्यात: स्टंटबाजी आहे साली!)

(अर्थात, स्टंटबाजी ही भारतीय संविधानाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करीत नसल्याकारणाने, ती करणे हेही पूर्णपणे षांतारामबापूंच्या अधिकारकक्षेत आहेच म्हणा. त्यामुळे, तिला आक्षेप असा काहीच नाही. फक्त, स्टंटबाजीला स्टंटबाजीच म्हणू तथा स्टंटबाजी म्हणूनच ओळखू या का, एवढेच नम्र विचारणे आहे. आगाऊ धन्यवाद.)

नितिन थत्ते Fri, 10/08/2018 - 17:09

In reply to by 'न'वी बाजू

>>अज्ञानमूलकसुद्धा (म्हणजे, सोप्या मराठीत: अडाणचोट)

अज्ञान याबद्दल अडाण हा शब्द ठीकच पण मूलक बद्दल चोट म्हणजे चोट हेच (सर्वाचे) मूळ आहे असे सुचवताय का?

>>एवढेच नम्र विचारणे आहे.

'न' वी बाजू यांनी "नम्र" वगैरे विनंती करणे म्हणजे भारीच.

'न'वी बाजू Fri, 10/08/2018 - 18:09

In reply to by नितिन थत्ते

पण मूलक बद्दल चोट म्हणजे चोट हेच (सर्वाचे) मूळ आहे असे सुचवताय का?

त्यात सुचवायचे ते काय? ते उघड नाही काय?

'न' वी बाजू यांनी "नम्र" वगैरे विनंती करणे म्हणजे...

आमच्यात यालाच नम्र म्हणतात.

सैराट Fri, 10/08/2018 - 19:06

जर का हा गब्बर फडतुसांच्या ताब्यात सापडला तर ते त्याच्या ढुंगणावर थुकून सोट्याने इतकं चोपतील की ढुंगणाचे आयुष्यभरासाठी फुगे होतील लाल लाल. त्या गर्दीत मला चान्स मिळाला तर मी पण माझी सिगरेट याच्या बोच्यावर विझवायला तयार आहे. ( आठवा : अबसोलन निकोलस किस्सा - कँटरबरी टेल्स ). परत हा निकोलस पादायला येणारच नाही खिडकीत.

अबापट Fri, 10/08/2018 - 19:16

In reply to by सैराट

सैराटजी, युद्धात एकाचवेळी दोन दोन आघाड्या उघडू नये म्हणतात. तरी तुम्ही उघडताय ,हेही ठीक. एक सल्ला ......असभ्य शब्द टाळा (उदा, ढुंगण ठीक , बोचा नको) आणि एक सांगतो, की सभ्य भाषा वापरूनही जास्त आक्रमक , चढाईपूर्ण लिहिता येतं हे जाणत असालच .( एक लक्षात घ्या तुमच्या भावणा,उद्देश आणि कारवाईला मी अजिबात विरोध करत नाहीये )

सैराट Fri, 10/08/2018 - 19:20

In reply to by अबापट

बापटभाऊ ठीक आहे. तुम्ही सज्जन लोक आहात पण इथे काही काही खूप माजलेले लोकं दिसता आहेत त्यांच्या बाबतीत अनमान करायला मला जडच जाईल. तरी बघतो प्रयत्न करून.

सैराट Fri, 10/08/2018 - 19:27

In reply to by अबापट

काल तो अजो म्हणत होता बाबासाहेब पुरोगामी का आहेत ? अरे अक्ख आयुष्य जातव्यवस्थेविरुद्ध लढा देण्यात घालवलं आमच्या बापानं आणि हा भिड्याच्या आंब्याची पैदास म्हणतो बाबासाहेब पुरोगामी होते का ?

अजो१२३ Fri, 07/09/2018 - 18:00

In reply to by सैराट

बाबासाहेबांचे विचार मुसलमानांच्या बाबतीत तर अजिबात पुरोगामी नाहीत. कधी वाचून बघा. अगदी कट्टर मुस्लिमद्वेष्ट्या हिंदुत्ववाद्याला लाजवतील इतके जहाल आहेत.
===============================

भिड्याच्या आंब्याची पैदास

तू कोणत्या बागेतलं कोणतं फळ वापरलं म्हणून पैदा झालास? अरबस्तानातल्या खारका पोचतात का तुझ्याकडे? कुठली कीड लागून तुझं डोकं नासलं? तू माझी पैदास काढतो का? तुला काय वाटलं, मी तुझी पैदास काढू शकत नाही? घटनेत काय तुला एकट्यालाच अधिकार दिलेत का? मी तुला आतापर्यंत सभ्य प्रतिसाद दिलेत (तुझ्या प्रतिसादाच्या तुलनेत.), पण त्यालाही मर्यादा आहे. हे जे काय तू लिहित आहेस त्यामागे फक्त आणि फक्त जातीद्वेष आहे. हे असले द्वेष्टे लोक पैदा होऊ नयेत याची कितितरि काळजी "तुमच्या बापानं" घेतली होती तरीही तू असा असा द्वेष्टा आहेस, यातच तुझं सगळं आलं. इथ्थेच तुझी पैदास दिसते. तू असं समजू नको कि मी घाबरतो म्हणून. मी तुझ्यासारखे शंभर बघितलेत आन त्यांचं पाणी पिऊन बसलोय. पुन्हा पैदास काढलीस तर याद राख.
==============================

अरे अक्ख आयुष्य जातव्यवस्थेविरुद्ध लढा देण्यात घालवलं आमच्या बापानं

त्या धाग्यावर दिलेल्या लिंकेत बाबासाहेबांनी पुरोगामी नसलेली भूमिका मांडलेली आहे. जातीयवाद केला आहे. नीट ऐकून पहा. कोणताही बुद्धीप्रामाण्यवादी त्यांच्या विचारांचं समर्थन करू शकत नाही असं माझं आहे. तू असलास तर तू कर.
==========================
आंबेडकर पुरोगामी नव्हते ही एक अत्यंत सभ्य टिका आहे. ही काय शिवी नाही. भारताच्या इतिहासातल्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिंवर टिका करू नये असा काही नियम आहे का? तुझ्या आवडत्या नेत्यावर मी टिका केली म्हणून तू काहीही शिव्या घालणार का? चांगली सकस फळं खाल्याचा दावा करतोस ना? मग शेण का निघतंय तोंडातनं?
===========================
तू इगो हर्ट झालेला मूर्ख आहेस. काही दिवस तुझा तिळपापड होणं मी समजू शकत होतो. पण आता जरा नीट वाग.

अजो१२३ Fri, 07/09/2018 - 18:10

In reply to by अबापट

असभ्य शब्द टाळा

मला वाटतं या सल्ल्याचा या गड्यावर काही परिणाम होणार नाही.
----------------------
ऐसीवर अभिप्रेत अशी कठोर टीका काय आणि शीवी काय हे त्याला कळत नाही.
--------------------------
समोरचा जातीयवादीच असतो हे त्याच्या डोक्यात इतकं फीट्ट आहे आहे कि हा मूर्ख खुट्ट झालं माझी जात काढली, आमची जात काढली, इ इ कोल्हेकुई सुरु करतो. मुळात ह्या मूर्खाला जातीयवाद, जातपात इ आधारित भेद म्हणजे काय ते माहीतच नाही. ह्याचं डोकं इतकं कमी आहे कि त्याच्या भूश्श्यातून नेहमी सुतळीलाच साप समजून बडवतो. अंधारात लाईट लावली, उजेड पडला आणि सुतळी दिसली तरी मूर्खासारखा सारखा न झोपता सकाळपर्यंत सुतळी बडवतच असतो.
----------
ही कायतरी वेगळिच केस आहे. भडकायचा, शिव्या द्यायचा अधिकार फक्त आपला आहे, आपले आराध्य दैवत त्याला कुणी साधी टिका करू नये पण स्वत: कशाबद्दल काहीही कितीही बरळावे , इ इ विचारधारा! श्शी!!

गब्बर सिंग Fri, 10/08/2018 - 21:15

In reply to by सैराट

जर का हा गब्बर फडतुसांच्या ताब्यात सापडला तर ते त्याच्या ढुंगणावर थुकून सोट्याने इतकं चोपतील की ढुंगणाचे आयुष्यभरासाठी फुगे होतील लाल लाल. त्या गर्दीत मला चान्स मिळाला तर मी पण माझी सिगरेट याच्या बोच्यावर विझवायला तयार आहे. ( आठवा : अबसोलन निकोलस किस्सा - कँटरबरी टेल्स ). परत हा निकोलस पादायला येणारच नाही खिडकीत.

.
तुम्ही पुण्याचे वाटत नाही. नैतर किमान शब्दांत कमाल .....
.
उदाहरणार्थ - शोलेच्या शेवटच्या फाईट मधे ठाकूर बलदेवसिंग गब्बरला उद्देशून काय म्हणून गेलाय आठवतंय ना ?
.
सांप को पैरोंसे कुचला जाता है, गब्बर.
.
.
आणि शेवटी नेमकं - रामगढ गावातले फडतूस एकत्र येऊन लाठ्याकाठ्याकुऱ्हाडींनी गब्बर ला संपवतात.
.
.
बायदवे ठाकुर सिगरेट कशी ओढत असेल ?? हा प्रश्न आहेच.
.
.