तेलाची किंमत, भविष्य इत्यादींसंदर्भात काही प्रश्न

कच्च्या तेलाची किंमत मुख्यतः युरोपमधल्या आर्थिक संकटामुळे पण कमी-अधिक प्रमाणात चीन, जपान आणि अमेरिकेमुळेही गेले काही महिने स्थिर ९०-१०० डॉलर प्रति बॅरल या मधे अडकली आहे. या वर्षाखेरीस कच्च्या तेलाची किंमत २०० डॉलर प्रति बॅरल इतकी चढी असू शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. हा अंदाज कदाचित चुकेलही, पण तेलाची किंमत सदासर्वकाळ आत्ताएवढी किंवा आहे त्यापेक्षा कमी रहाणार नाही हे निश्चित. कच्च्या तेलाच्या किंमतीच्या संदर्भात हा लेख वाचण्यात आला.
http://www.bloomberg.com/news/2012-09-23/how-high-oil-prices-will-perman...

थोडक्यात, लेखकाचं म्हणणं असं की तेलाच्या चढ्या किंमतीमुळे आर्थिक वाढीवर नियंत्रण येईल. त्यासाठी १९८३ चं योम किप्पूर युद्ध (इस्रायलवर इजिस्प्त आणि सिरीयाच्या नेतृत्त्वाखाली अरब देशांनी मिळून हल्ला चढवला आणि त्यापुढे इस्रायलला पाठींबा देणार्‍या देशांना तेलविक्री थांबवली होती.) आणि २००८ सालचं आर्थिक संकट याची उदाहरणं दिलेली आहेत. तेलाची मागणी सध्या स्थिर आहे, पण युरोपची आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर तिथून मागणी वाढेल, चीन आणि भारताची तेलाची तहान वाढती आहेच.

मला प्रश्न आहेत ते असे:
१. कच्च्या तेलाची किंमत वाढली तर अधिक भांडवल मिळून अधिक तेल उपसणं, जिथून तेल उपसणं सध्या फायदेशीर नाही ते ही, शक्य होईल का?
२. पर्यायी ऊर्जानिर्मिती आणि तत्सम उद्योगांना चालना मिळेल का? अलिकडच्या काळात जर्मनीत सौर उर्जेला खूप चालना, सबसिडी दिली गेली. अनेक खेड्यांमधे घरांच्या छतांवर सौर पॅनेल दिसली. या आलेखात अमेरिकेत पवनचक्क्यांवर बनवली जाणारी वीज कशी वाढती आहे हे दिसतं.

दहा वर्षांच्या आत, पाव टक्क्यावरून सव्वातीन टक्के अशी वाढ झालेली दिसते.
३. असलेल्या यंत्रांची कार्यक्षमता (efficiency) वाढवण्याच्या उद्योगांनाही चालना मिळेल का? विजेवर चालणार्‍या आणि हायब्रिड मोटारी आत्ताही बाजारात आहेत. 'हमर'सारख्या तेल पिणार्‍या गाड्या ज्या अमेरिकेत दिसत तिथे आता दोन लोकांसाठी असणार्‍या स्मार्ट कार्स, फियट ५०० अशा गाड्याही दिसायला लागल्या आहेत.

या संदर्भात भविष्य कसे दिसते?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

अदितीचा आयडी हॅक झाला काय? गुर्जींनी केला काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

IEA WEO Factsheet ह्यात थोडीफार माहिती मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजची ताजी खबर. भारतात पेट्रोलच्या किमती उतरणार! यातील राजकारणाचा भाग वगळला तरी, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा भाव प्रती बॅरल ११६ डॉलरवरून १०६ पर्यंत उतरला आहे, हे सत्य राहतेच.

खेरीज, अमेरिका टेक्सास तसेच कॅनडातील "तेलकट वाळू"तून तेल मिळविण्याचे तंत्रज्ञान विकसीत करीत आहे, असे नुकतेच वाचले (सध्या दुवा हाताशी नाही. ते एकदा पूर्ण विकसीत झाले, की, २०२० सालानंतर अमेरिकेस मध्यपूर्वेतून तेलाचा एक थेंबदेखिल आयात करावा लागणार नाही, असे समजते.

आता, अमेरिकेसारखे बडे गिर्‍हाईक बाजारातून गेल्यावर, तेलाच्या किमती चढतील की उतरतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ता पहाते आहे तर कच्च्या तेलाची किंमत 91.59 डॉलर प्रति पिंप (नायमेक्स क्रूड) 110.32 (डेटेड ब्रेंट, हे थोडं कमी अशुद्धी असणारं असतं.) अशी आहे. गेले दोनेक महिने ही किंमत अशी ९०-१०० च्या मधेच आहे, पण रूपयाची किंमत घसरली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस एका डॉलरसाठी ४९ रूपये द्यावे लागत होते, आज हीच किंमत ५३ च्या किंचित वर आहे. त्यातही ही किंमत ५७ ला स्पर्श करून आलेली आहे, आणि काही महिने ५५-५६ अशी होती. आत्ता किंमत घसरण्याच्या कारणांत अमेरिकेने जास्त डॉलर छापणं (quantitive easing) आहे.

होय, तेलकट वाळूबद्दल बातम्या बर्‍याचदा कानावर येतात. (सध्या मी टेक्ससमधे रहाते; तिथे तेलाच्या बातम्या तशा स्थानिकच समजल्या जातात.) कॅनडाच्या आल्बर्टा प्रांतामधली ही वाळूच नाही, अमेरिकेत नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडलेला आहे. ऊर्जानिर्मितीसाठी हा वायू वापरात आणण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
तेलाच्या किंमती फार पडतील अशी शंका यायला लागली की ओपेक आणि अन्य तेलोत्पादक देश आपले उत्पादन कमी करून किंमती राखण्याचा प्रयत्न करतील का?

ननि, लिंक वाचते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तेलकट वाळू हे एक मृगजळच आहे सध्या तरी. येत्या काही वर्षांमध्ये Peak Oil स्थिती गाठली जाईल (आधीच गाठली नसेल तर) असा अंदाज आहे.
"The Party's Over" हे Richard Heinberg यांचे पुस्तक या संदर्भात वाचनीय ठरावे.
त्या पुस्तकाचा सारांश इथे वाचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सारांशाबद्दल अनेक आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. कच्च्या तेलाची किंमत वाढली तर अधिक भांडवल मिळून अधिक तेल उपसणं, जिथून तेल उपसणं सध्या फायदेशीर नाही ते ही, शक्य होईल का?
कदाचित होईलही पण त्याही पुढे जाऊन तेल नसेल तर वायू असेल!
अनेक प्रकारची इंधने आहेत बाजारभावानुसार ती किती उपसायची याचा ताळा तेल कंपन्या घेत असतात. तसेच तेलाच्या किमतींवर परिणाम करणारा कोणता मतप्रवाह 'वाहता राहील', याचाही अतिशय उत्तम माग या कंपन्या राखतात. मागे सिडनीच्या एका प्राध्यापिकेने या विषयावर एक प्रबंधच सादर केला होता (सन २०११, पण नाव आत्ता लक्षात नाही.) त्यानुसार माध्यमांना प्रशिक्षणाच्या नावाखाली या अतिमहाकाय कंपन्या कश्या आपल्या तालावर(च) नाचवतात याचा मागोवा त्यात होता. - या विषयाची चर्चा फक्त एका सरकारी रेडियोवर झाली आणि हा विषय विरला. हे पण तेव्हढेच रोचक वाटले होते.

असो, जगात नैसर्गिक तेलाचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत/असावेत. पण ते फक्त आपल्याच हातात असावेत या साठी एक्झोन, मोबिल शेल सारख्या कंपन्या फार जोरदार मोर्चे बांधणी करत राहतात.
मागच्या वर्षीच चीनला ३० वर्षे नैसर्गिक वायू पुरवण्याचा करार ऑस्ट्रेलियाने केला. जपान बरोबर असा दीर्घ करार आधीच अस्तित्त्वात आहे. म्हणजेच नै. वायू उपलब्ध आहे.

२. पर्यायी उर्जानिर्मिती ही होतच राहील पण तेल आणि वायूची जागा घेणं किंवा त्याला पर्याय देणं यातून शक्य दिसत नाही. पवन किंवा सौर या जगाच्या ४-५% टक्केही गरज भागवू शकत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

पर्यायी उर्जानिर्मिती ही होतच राहील पण तेल आणि वायूची जागा घेणं किंवा त्याला पर्याय देणं यातून शक्य दिसत नाही. पवन किंवा सौर या जगाच्या ४-५% टक्केही गरज भागवू शकत नाहीत.

हे विधान आजच्या परिस्थितीविषयी कदाचित लागू असेल, पण सौर ऊर्जेच्या उपलब्धतेबाबत धादांत चूक आहे.

जगाची सध्याची ऊर्जेची गरज २० ते २५ टेरावॉट आहे. पृथ्वीला सूर्याकडून मिळणारी एकंदरीत ऊर्जा ही २००००० टेरावॉट इतकी आहे. त्यामुळे ती शक्ती केवळ १% वापरण्याची क्षमता आली की आत्तापर्यंत गेल्या दोन शतकांत आख्ख्या मानवजातीने वापरलेली ऊर्जा एका वर्षात मिळवता येईल.

सध्या सोलार पॅनल्सची मॅन्युफॅक्चरींग कपॅसिटी ५९ गिगावॉट आहे. मागणीच सध्या कमी आहे. याचं कारण तेल स्वस्त आहे.

इतकं असताना लोक पीक ऑईलचं आकाश पडलं पळा पळा म्हणून का घाबरतात ते कळत नाही. तेल सहज उपलब्ध होतं म्हणून इतके दिवस कोणी सौर ऊर्जा वापरण्याचा प्रयत्न केला नाही. आता तेल कमी आणि सौर ऊर्जा वापरण्याचं तंत्रज्ञान आहे. वीस वर्षांपूर्वी 'तेल पंचवीस वर्षांत संपणार' असं ऐकलेलं होतं. अजून वीस वर्षांनी हेच म्हणतील अशी शंका आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्याच अमेरिकेतली ३% ऊर्जा पवनऊर्जा आहे. सौरऊर्जा निराळीच. आणि सध्या कच्चं तेल अगदी पैशाला पासरी नसलं तरी या दोन ऊर्जास्रोतांच्या तुलनेत फार महाग नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तेलाचा खडखडाट झाला नसला तरी स्वस्त तेल संपलं आहे (तेलाला मागणी नाही तरी किंमती परत ३०-४० डॉलर प्रतिबॅरलच्या जुन्या पातळीला जात नाहीत, बीपीसारख्या कंपन्या जाहिरातबाजी करत असल्या तरी त्यांचे उत्पादन घटले आहे) आणि ज्यांना सतत आर्थिक वाढ हवी आहे असेच लोक त्या स्थितीला घाबरतात. सौर ऊर्जेसाठी बरीच गुंतवणूक करावी लागल्याने अगदी आकाश कोसळले नाही तरी आर्थिक वाढ आणि अन्नधान्योत्पादन यावर फरक पडणार.
काहीच फरक पडणार नाही असे म्हणणे हा वैज्ञानिक अंधश्रद्धाळूपणा आहे.
उलट सौर ऊर्जा मिळो वा न मिळो, तेल खरोखर संपले तर बराच विधायक फरक पडेल अशी काहींना खात्री आहे.:-)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधीच्या प्रतिसादात सौर ऊर्जेत तेलाइतकी शक्ती आहे का हाच मूलभूत प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर तर उघड उघड हो असा आहे.

काहीच फरक पडणार नाही असे म्हणणे हा वैज्ञानिक अंधश्रद्धाळूपणा आहे.

काहीच फरक न पडणे आणि बदल विनासायास होणे या दोनमध्ये गल्लत होते आहे. तेल-प्रधान ऊर्जाव्यवस्थेकडून सौर-प्रधान ऊर्जाव्यवस्थेकडे जाताना काही धक्के बसणारच. हे रूळ बदलताना खूप गचके बसतील की हळूवार बदल होतील हे त्यासाठी किती वेळ आहे यावरून ठरेल. माझा मुद्दा असा की सर्वसाधारणपणे या ट्रांझिशनसाठी पुरेसा वेळ आहे.

सौर ऊर्जेसाठी गुंतवणुक करावी लागणार हे निश्चितच. मात्र ती किफायतशीरही आहे. सध्या १० ते १५ वर्षांत परतावा मिळतो. त्यामुळे भांडवल तिथे वहायला अडचण नसावी. तेल जसं कमी होईल तशा तेलाच्या किमती वाढतील, आणि तंत्रज्ञान सुधारत जाईल, तसतसा सौर ऊर्जेसाठीचा खर्च कमी होत जाईल. त्यामुळे लवकरच मूळ खर्च भरून काढायला १० वर्षांपेक्षा कमी काळ लागेल, आणि भांडवलाचा ओघ तिथे वाहील. जर या बदलासाठी २५ ते ५० वर्षं मिळाली, तर सुरळित व्हावं. पुढच्या १० ते १५ वर्षांत करायचं झालं तर त्रास होईल. पण कोणीच इतक्या लवकर संपेल असं म्हणत नाही.

वैज्ञानिक अंधश्रद्धाळूपणा हा शब्द काही पटला नाही. तेलामागे विज्ञानापेक्षा अर्थकारण, राजकारणच जास्त आहे. किंबहुना सौर ऊर्जेकडे ट्रांझिशन झालं की ऊर्जेबाबतची काही देशांची मक्तेदारी संपेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वीस वर्षांपूर्वी 'तेल पंचवीस वर्षांत संपणार' असं ऐकलेलं होतं. अजून वीस वर्षांनी हेच म्हणतील अशी शंका आहे.

+१ आणि वरील विवेचनाशीही काहीसा सहमत... कदाचित माझे विधान वेगळ्या पद्धतीने रचले जायला हवे होते. असो.

आणि

तेलामागे विज्ञानापेक्षा अर्थकारण, राजकारणच जास्त आहे.

याच्याशी पुर्णपणे सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद