ऑनलाइन डेटाचे मृत्यूपत्र
आजकाल बहुतांश लोक अँड्रॉइड प्रणालीवर चालणारे फोन वापरतात ज्याचा सर्व डेटा Google कडे सुरक्षित साठवला जातो. यामध्ये तुम्ही दिलेल्या भेटी(location), Google drive वर साठवलेले कागदपत्रे, छायाचित्रे, आलेले व पाठवलेले ई-मेल, जतन केलेले पासवर्ड इत्यादींचा अंतरभाव होतो.
कल्पना करा जर तुम्ही अचानक Google ची सेवा घेण्याचे थांबवलं तर तुमच्या एवढ्या माहितीच काय होईल?यासाठी गूगल ची निष्क्रिय खाते व्यवस्थापन सेवा कामी येते.
जर गब्बर ने ठराविक महिने सेवा वापरली नाही तर गूगल त्यांनी नमूद केलेल्या इतर ई-मेल व फोन नंबर ला सूचित करते कि गब्बर सेवा वापरत नाही. तरीही ग. ने लॉगिन केलं नाही तर तर त्याचा सर्व डेटा ग. ने दुसऱ्या कुण्या विश्वासू सांबा ला नोंद केलं असेल त्याला मिळेल(ज्या मध्ये त्याच्या गॅंगचे महत्वाचे कागद असू शकतात) किंवा नष्ट होईल.
गूगल ठराविक काळाने आपल्याला याबद्दल स्मरण करून देतो व या नोंदी आपण कधीही बदलू शकतो.
अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा https://myaccount.google.com/inactive
खरी कागदपत्रे तिथे नसतातच,
खरी कागदपत्रे तिथे नसतातच, फोटोकॉपी असतात ना?
याबाबत माइक्रोसॉफ्टच्या वनड्राइवची काय परिस्थिती आहे?