Skip to main content

ऐसे व्हॉट्सॅप संदेश

प्रस्तावना:
दररोज तुम्हाआम्हास एक शुभसकाळचं फूल आणि एक अतिशय उपदेशाचा डोस पाजणारा एक संदेश ठरलेला असतोच. त्यातले बरेच संदेश हे मुरलेल्या व्हॉट्सॅप लेखकाने, अगदी निरनिराळे मुलामे देऊन काहीही आगाऊ प्रकार पचनीय करण्याचा केविलवाणा प्रयत्न जो केलेला असतो, मुख्यत्वे त्याबद्दल चर्चा करण्यासाठी, सत्यता पडताळण्यासाठी; हा धागा.

--
कॅलिफोर्नियातील 'आय.टी.संपन्न' बे एरियात राहणारा भारतीय परिवार. चक्क मराठी. बाई स्वत: डॉक्टर आणि हा तिथल्या एका मोठया आय.टी. कंपनीत व्हाइस प्रेसिडेंट. घरी ही दोघं आणि यांची सोळा वर्षांची मुलगी. बस, इतकंच त्रिकोणी कुटुंब.

साधारण वर्षभरापूर्वी हा रागारागाने शेजारच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये भांडायला गेला. तिथल्या मॅनेजरला भेटला आणि तावातावाने सांगू लागला, ''हा काय चावटपणा लावलाय..? माझ्या घरी रोज तुमचे फ्लायर्स (पत्रकं) येतात. कशाचे? तर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, बेबी केअर वगैरे विषयांवरच्या उत्पादनांचे. अरे, आमचा काय संबंध..? कशाला आम्हाला रोज रोज त्याच विषयांवरची फ्लायर्स पाठवून त्रास देताहात?''

मॅनेजर अनुभवी होता. त्याने याची समजूत घातली. चुकून झालं असेल असं म्हणाला आणि ''परत असे फ्लायर्स तुमच्या घरी येणार नाहीत'' असंही म्हणाला.

विषय इथेच संपायला पाहिजे होता.

पण ह्या घटनेच्या साधारण पाच-सहा महिन्यांनी हा त्याच शेजारच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मॅनेजरला पुन्हा भेटायला गेला. मात्र या वेळेस त्याच्या बोलण्यात भांडण्याची खुमखुमी नव्हती. सुदैवाने मॅनेजर तोच होता. त्याला पाच-सहा महिन्यांपूर्वीची ती घटना आठवत होती.

''वी आर सॉरी. पण 'तसले' फ्लायर्स तुमच्याकडे अजूनही येताहेत का? मी तर मागेच बंद करायला सांगितले होते.''

''नाही. फ्लायर्स तर बंद झालेत.'' हा म्हणाला, ''मी आलोय हे विचारायला, की तुम्हाला कसं कळलं..?''

''काय कसं कळलं?''

''हेच, की माझी मुलगी प्रेग्नंट होती, हे तुम्हाला कसं कळलं?''

मॅनेजर घाबरला. त्याला वाटलं की हा बाप्या आता आपल्याला आणि आपल्या स्टोअरला 'स्यू' करेल, आपल्यावर केस करेल, म्हणून तो काहीही सांगायला नकार देऊ लागला. वकिलांचं नाव घेऊ लागला. यावर हा म्हणाला, ''लिहून देतो की मला तुमच्यावर कसलीही लीगल ऍक्शन घ्यायची नाही. मला फक्त कुतूहल आहे, तुम्ही कसं ओळखलं ते!''

मग त्यांच्या डेटा प्रोसेसिंग युनिटच्या हेडशी ह्याची गाठ घालून देण्यात आली. त्या हेडने ह्याला सविस्तर समजावून सांगितलं. तो म्हणाला, ''तुमची मुलगी आमच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये नियमित येत असणार. आम्ही सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याच्या मदतीने त्या व्यक्तीचा चेहरा कॅप्चर करतो. तो चेहरा सोशल सिक्युरिटी नंबरच्या डेटाबेसबरोबर मिळवतो. त्यातून तुमच्या मुलीची आयडेंटिटी मिळाली असेल. तिने कधीतरी क्रेडिट कार्डने / डेबिट कार्डने काही विकत घेतलं असेल. त्यावरून तुमच्या मुलीची आयडेंटिटी आमच्या अल्गोरिदमने निश्चित केली असेल.

मग आता ही मुलगी ज्या शेल्फपाशी रेंगाळते, वस्तू बघते, ते सर्व आमचे कॅमेरे टिपतात. मुलीने त्या वस्तू विकत घेण्याची गरज नाही. पण माणूस तिथेच रेंगाळतो, जिथे त्याच्या आवडीच्या वस्तू असतात. आता लिपस्टिक आणि नेल पेंटच्या शेल्फपाशी तुम्ही रेंगाळाल का? किंवा बायका उगीचंच आफ्टर शेव्ह लोशनच्या आणि शेव्हिंग क्रीमच्या वस्तू हाताळत बसणार का? तर या सर्व गोष्टींवरून आमच्या सिस्टिममधले अल्गोरिदम्स त्या व्यक्तीची आवड-निवड शोधतात, त्या व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाउंटची पडताळणी करतात, त्यांच्या आवडीला, कुतूहलाला क्रॉसव्हेरिफाय करतात आणि सिस्टिमच त्यानुसार फ्लायर्स तयार करून त्यावर त्या व्यक्तीचा पत्ता प्रिंट करते. तुमच्या मुलीने प्रेग्नन्सी, चाइल्ड केअर वगैरेसारख्या वस्तूंमध्ये कुतूहल दाखवलं असेल.''

हा अक्षरश: अवाक!

लक्षात घ्या - बापाला नाही कळलं. डॉक्टर असलेल्या, एकाच घरात राहत असलेल्या, सख्ख्या आईलाही नाही कळलं की आपली मुलगी प्रेग्नंट आहे. अन् ते त्या डिपार्टमेंटल स्टोअरला कळलं!

ही आहे आजच्या सोशल मीडियाची कमाल!

दुसरी घटना जबलपूरमधल्या माझ्या मित्राची. त्याने विचारलं की ''अर्थ्रायटिसमुळे पायाचा अंगठा किंचित वाकडा होतो, त्यावर उपाय करणाऱ्या उपकरणांच्या जाहिराती तुझ्या फेसबुकवर येतात का?'' मी सांगितलं, ''नाही. कधीच नाही. किंबहुना असं उपकरण असतं हे आजच मला कळतंय.''

मित्र म्हणाला, ''अरे, मी ज्याला ज्याला विचारलं, त्या प्रत्येकाने हेच सांगितलं. याचा अर्थ मलाच ह्या जाहिराती येताहेत.''

''पण तुलाच ह्या जाहिराती फेसबुकवर का दिसाव्यात?''

''कारण माझ्या उजव्या पायाचा अंगठा किंचित आत वळलाय, वाकडा आहे, म्हणून!''

''ऑं?'' आता आश्चर्यचकित होण्याची माझी पाळी. ''पण फेसबुकला हे समजलंच कसं?''

''कोणास ठाऊक.. मी त्या संदर्भात कुठलीही पोस्ट कुठेच टाकलेली नाही किंवा कुठे उल्लेखही केलेला नाही.''

'''तुझे फोटो दाखव बरं.''

मग आम्ही दोघं त्याचे फोटो बघू लागलो. कुठल्याही फोटोत त्याचे पाय दिसत नव्हते... मग अंगठा तर दूरच. बघता बघता, साधारण तीन महिन्यांपूर्वीचा त्याचा एक फोटो फेसबुकवर सापडला. त्यानेच टाकलेला. मंदिरात अनवाणी दर्शनासाठी जातानाचा. अन हो, त्या मित्राचा अंगठा किंचित वाकडा झालेला स्पष्ट दिसत होता!

मित्र लगेच म्हणाला, ''हो यार. गेल्या अडीच-तीन महिन्यांपासूनच ह्या जाहिराती मला दिसायला लागल्या आहेत.''

याचा अर्थ लक्षात येतोय तुमच्या?

तुमच्या-आमच्या वागण्या-बोलण्या-लिहिण्यातलाच नव्हे, तर दिसण्यातलाही लहानात लहानसा तपशील फेसबुकसारखं सोशल मीडियाचं माध्यम टिपून काढतंय अन त्यानुसार तयार झालेली उत्पादनं तुमच्या-आमच्यापर्यंत पोहोचवतंय.

मित्र सांगत होता, त्याच्या ऑॅफिसात त्याच्याबरोबर गेली बारा-तेरा वर्षं काम करणारा सहकारी आहे खंडेलवाल नावाचा. ह्या दोघांची अगदी घट्ट मैत्री. जिवलग मित्र असलेल्या त्या खंडेलवालला माझ्या ह्या मित्राच्या अंगठयाची भानगड माहीत नाही.

केंब्रिज ऍनालिटिका

फेसबुकवर उठलेल्या वादळाच्या केंद्रस्थानी असलेली केंब्रिज ऍनालिटिका ही तशी अगदी नवीन कंपनी. 31 डिसेंबर 2013ला स्थापन झालेली. सी.ए. ह्या लघुरूपाने ओळखली जाणारी. प्रामुख्याने राजकीय सल्लागाराचे काम करणाऱ्या ह्या कंपनीची टॅगलाइन आहे - 'Cambridge Analytica uses data to change audience behaviour!' याचा अर्थ स्पष्ट आहे - 'आम्ही डेटाच्या बळावर (तुम्हाला अभिप्रेत असलेल्या) समूहाची वर्तणूक बदलतो!'

पुराणमतवादी राजकीय विचारसरणीला मदत करणाऱ्या धनाढय अशा रॉबर्ट मर्सरच्या परिवाराने ह्या कंपनीच्या मागे पैसा उभा केला आहे. 'काहीही करून निकाल ओढून आणणारा' अशी ख्याती असलेला अलेक्झांडर निक्स हा ह्या कंपनीचा सी.ई.ओ. होता. मात्र फेसबुक प्रकरण बाहेर आल्यावर संचालक मंडळाने त्याला 20 मार्चला पदावरून दूर केले.

वास्तविक पहिल्याच मोहिमेत केंब्रिज ऍनालिटिकाला अपयश आले होते. अमेरिकन पध्दतीप्रमाणे रिपब्लिकन पक्षात राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी चुरस / निवडणूक असते. सन 2015मध्ये सी.ए.ने यासाठी डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात असलेल्या टेड क्रूझसाठी मोहीम चालवली होती. ह्यात जरी टेड क्रूझचा पराभव झाला, तरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोळयात सी.ए.ची कामगिरी भरली आणि ट्रम्पनी सी.ए.ला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी वापरण्याचं ठरवलं.

या निवडणुकीत मात्र सी.ए.ने आपली कामगिरी चोख बजावली. अमेरिकेच्या मेनस्ट्रीम मीडियाच्या अंदाजांच्या पूर्णपणे विरुध्द जाऊन ट्रम्प महाशयांचा विजय झाला आणि केंब्रिज ऍनालिटिका जगभर प्रसिध्दीच्या झोतात आली. पुढे ब्रेक्झिटच्या सार्वमताच्या वेळेसही, ब्रिटनला युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या भूमिकेसाठी 'ऍग्रिगेट आय क्यू' या एजन्सीबरोबर सी.ए.ने काम केले.

मात्र हे फार दिवस चालू शकले नाही. जगातील इतर देशांमधील प्रमुख राजकीय पक्ष सी.ए.ची सेवा घेण्याच्या विचारात असतानाच मार्च 2018मध्ये हा सी.ए.चा बुडबुडा फुटला. त्यांचा सी.ई.ओ. अलेक्झांडर निक्स हा सर्व प्रकारच्या अनैतिक गोष्टी करत असल्याचे सिध्द झाले अन अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी यशाच्या परमोच्च शिखरावर असलेली केंब्रिज ऍनालिटिका ही कंपनी खाली गडगडायला सुरुवात झाली. 20 मार्चला अलेक्झांडर निक्सची हकालपट्टी झाली अन त्याच वेळेस देशोदेशींच्या अनेक राजकीय पक्षांच्या ऑॅर्डर्स रद्द झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या!

केंब्रिज ऍनालिटिकामध्ये पूर्वी संशोधन प्रमुखाच्या पदावर असलेल्या क्रिस्टोफर वायलीने मंगळवार, 27 मार्चला ब्रिटिश संसदेत हे स्पष्ट केले की सी.ए.चे कार्यालय भारतातही होते आणि (राहुल गांधींचा) काँग्रेस पक्ष सी.ए.चा ग्राहक होता.

अन् फेसबुकला मात्र माहीत आहे!

आजचं मार्केटिंग हे सार्वत्रिक (जनरलाईज्ड) उरलेलंच नाही. ते व्यक्तिगत झालेलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीनुसार त्या त्या व्यक्तीला 'कस्टमाइज्ड' प्रॉडक्ट देणाऱ्या जाहिरातीची मोहीम हेच आजचं सत्य आहे. अशा 'कस्टमाइज्ड', व्यक्तिगत कॅम्पेनला लागणारा डेटा सोशल मीडिया पुरवत असतात. कारण आपण जरी त्यांना 'सोशल मीडिया प्लॅटफॉर्म' म्हणत असलो, तरी फेसबुक, टि्वटर, यू टयूब यासारखी माध्यमं ही निव्वळ व्यावसायिक माध्यमं आहेत. त्यांना तुमच्या-आमच्या 'सोशल क्रांती'शी काहीही घेणं-देणं नाही. 'सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज बदलू, जग बदलू' हा तुमचा-आमचा भाबडा आशावाद झाला. प्रत्यक्ष त्या सोशल माध्यमांना हवा असतो यातून मिळणारा पैसा. अन तो पैसा मिळतो सामान्य माणसांच्या माहितीतून. त्यामुळे एखादी मोहीम जितकी मोठी, त्यातील लोकांचा सहभाग तितकाच मोठा. आणि जितके लोक जास्त, तितकाच या सोशल मीडियाला मिळणारा डेटा जास्त. आणि जास्त डेटा म्हणजे चांगलं विश्लेषण. ऍनालिटिकल अल्गोरिदम्स अचूक ठरण्याची खात्री.

हे असं सर्व (दुष्ट) चक्र आहे!

आपण सर्व 'व्हॉट्स ऍप' वापरतो. जगात व्हॉट्स ऍप वापरणाऱ्यांची संख्या 150 कोटीपेक्षा जास्त आहे. अशा व्हॉट्स ऍपचं 'बिझनेस मॉडेल' काय आहे, हे आपल्या लक्षात आलंय? साधारणत: सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफर्ॉम्स जाहिरातीतून पैसे मिळवतात. व्हॉट्स ऍपवर एक तरी जाहिरात दिसते का आपल्याला? मग त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे? आणि काहीच स्रोत नसेल, तर व्हॉट्स ऍपचं हे प्रचंड मोठं तंत्र चालतं तरी कसं? आणि काहीही उत्पन्न नसताना फेसबुकने सन 2014मध्ये तब्बल 19.30 अब्ज अमेरिकन डॉलर्सला व्हॉट्स ऍप का विकत घेतलं?

या सर्व प्रश्नांचं उत्तर आहे - डेटा!

होय, डेटा. आजच्या जगात डेटाचं महत्त्व तेच आहे, जे मागील पन्नास वर्षांत तेलाचं (पेट्रोलियम पदार्थांचं) होतं. आज डेटा म्हणजे सोन्यापेक्षा महाग कमोडिटी आहे. ज्याच्याजवळ शास्त्रशुध्द आणि अचूक असा डेटा आहे, तो या जगाचा बादशहा आहे.

ट्रम्पच्या निवडणूक निकालांनी हे अक्षरश: खरं करून दाखवलं.

मुळात डेटा गोळा करणं, डेटाचं विश्लेषण करणं, ह्या विश्लेषणातून काही निष्कर्ष काढणं यात फारसं काही चूक नाही. आपण जेव्हा सोशल मीडियावर आपली माहिती टाकतो, तेव्हा 'सोशल मीडियाच्या सर्व अटी आपल्याला मान्य आहेत' असं बटन दाबूनच टाकतो. त्यामुळे काही प्रमाणात सोशल मीडिया आपली माहिती वापरू शकतो.

पण चूक आहे ते ह्या माहितीच्या आधारे एखाद्याचा असणारा राजकीय कल ओळखून तो बदलण्यासाठी केलेला खोटया,अर्धसत्य माहितीचा जबरदस्त मारा. केंब्रीज ऍनालिटिकाने नेमकं हेच केलं. ही माहिती बाहेर आल्यामुळे गेले आठ-दहा दिवस जगात अक्षरश: उलथापालथ चाललेली आहे. अनेक देशांतील लोकशाही पध्दतीवरच मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

हे सगळं नेमकं कसं घडलं?

सन 2015मध्ये फेसबुकने एक ऍप फेसबुकबरोबर वापरायला परवानगी दिली. हे ऍप तसं वरवर निरुपद्रवी होतं. अलेक्झांडर कोगेनने तयार केलेलं हे ऍप क्विझच्या स्वरूपातील होतं. फेसबुकच्या सर्व नियमांचं पालन करून हे ऍप तयार करण्यात आलेलं होतं. अमेरिकेतल्या पाच कोटी लोकांनी हे ऍप डाउनलोड केलं आणि ह्या ऍप मध्ये, अमेरिकेतल्या ह्या पाच कोटी लोकांची (जे प्रामुख्याने वयस्क होते, अर्थात मतदार होते) माहिती गोळा झाली.

आणि ही माहिती ह्या कोगेनने केंब्रिज ऍनालिटिकाला चक्क विकली!

मुळात केंब्रिज ऍनालिटिका ही कंपनीच 'राजकीय सल्ला देणारी कंपनी' म्हणून तयार करण्यात आली होती. ट्रम्पच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत केंब्रिज ऍनालिटिकाने ह्या माहितीचा पुरेपूर वापर केला आणि कुंपणावर असलेली मतं ट्रम्प महाशयांच्या बाजूने वळवली.

हे तसं अनैतिक होतं. मात्र केंब्रिज ऍनालिटिकाची पध्दत तशी सरळसोट होती. फेसबुकवरील यूजर्सच्या मिळालेल्या डेटामधून त्यांनी 'कॉग्नीटिव्ह बायस' असलेले - अर्थात स्पष्ट राजकीय कल असणारे बाहेर काढले. मग ते ट्रम्पचे समर्थक असतील किंवा कट्टर विरोधक. ही संख्या साधारण 80% निघाली. अर्थात 20% मतदार असे होते, जे कुंपणावर होते. त्यांनी आपली मतं तोपर्यंत निश्चित केलेली नव्हती. केंब्रिज ऍनालिटिकाने या वीस टक्क्यांनाच लक्ष्य केलं अन पध्दतशीररित्या त्यांना ट्रम्पच्या जाळयात ओढलं.

ही बातमी बाहेर आल्यावर खळबळ माजली. ब्रिटनच्या चॅनल 4ने तर व्हिडियो फूटेजेस दाखवली, ज्यात केंब्रिज ऍनालिटिकाचा सी.ई.ओ. अलेक्झांडर निक्स, हा माहिती मिळविण्यासाठी युक्रेनियन पोरींना, श्रीलंकेच्या राजकारण्यांना पुरवतोय. तोपर्यंत फेसबुकने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. दिनांक 20 मार्चला भारताचे कायदे आणि सूचना, तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेसबुक आणि केंब्रिज ऍनालिटिका यांच्यावर डेटा चोरी करून काँग्रेसला मदत करण्याचे थेट आरोप केले अन सारंच चित्र बदललं. चक्र वेगाने हलली. रविशंकर प्रसाद यांच्या पत्रकार परिषदेच्या काही तासांनंतरच केंब्रिज ऍनालिटिकाने त्यांचा सी.ई.ओ. अलेक्झांडर निक्सला काढून टाकलं.

दुसऱ्याच दिवशी, म्हणजे दिनांक 20 मार्चला फेसबुकचे सी.ई.ओ. मार्क झुकरबर्ग याने एक मोठं स्पष्टीकरण दिलं. या सर्व प्रकरणात फेसबुककडून आलेली ही पहिलीच प्रतिक्रिया होती. या स्पष्टीकरणात त्याने फेसबुक वापरणाऱ्यांची चक्क क्षमा मागितली आणि भविष्यात परत असं घडू देणार नाही, असं वचनही दिलं.

हे कमी म्हणून की काय, रविवार 25 मार्चला फेसबुकने इंग्लंडच्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत पानभर जाहिराती दिल्या. ह्या जाहिरातींमध्येही फेसबुकच्या वापरकर्त्यांची संपूर्ण क्षमा मागितली होती. जाहिरातीचं शीर्षकच होतं - 'We have a responsibility to protect your information. If we can't, we don't deserve it.'

अर्थात या क्षमायाचनेला तसा फारसा अर्थ नव्हता आणि नाही. ज्या 'बिझनेस मॉडेल'वर फेसबुक उभं राहिलंय, त्याबद्दल माफी मागणं हे फेसबुकच्या शेअर बाजारातील ढासळत्या किमती रोखण्यासाठी उपयोगी असेलही. प्रत्यक्षात नाही.

सध्यातरी फेसबुक वाईट अवस्थेतून जात आहे. गेला आठवडा त्यांच्यासाठी एक दु:स्वप्न ठरला. केंब्रिज ऍनालिटिकाबरोबरची भागीदारी त्यांना भलतीच महागात पडली.

आणि या संधीचा लाभ घेत अनेकांनी फेसबुकविरुध्द मोहीम उघडली आहे. व्हॉट्स ऍपचा सहसंस्थापक ब्रायन ऍक्टन याने या मोहिमेची सुरुवात केली आणि #DeleteFacebook हा त्याचा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. मुळात व्हॉट्स ऍपचं बिझनेस मॉडेलसुध्दा असंच होतं आणि आहे. पण वाहत्या गंगेत ब्रायन ऍक्टनसारखे अनेक हात धुऊन घेताहेत.

दरम्यान 23 मार्चला ब्रिटिश हायकोर्टाने केंब्रिज ऍनालिटिकाच्या लंडनमधील ऑॅफिसवर छापे मारण्याची परवानगी दिली आणि त्याप्रमाणे छापे घालण्यात आले.

या सर्व प्रकरणातून काही गोष्टी स्पष्ट होतात -

डेटाचा वापर यापुढेही होत राहणार. विशेषत: आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसंजसं प्रगत होत जाईल, व्यक्तिगत डेटाचा वापर तितकाच वाढत जाईल. याला पूर्णपणे रोखण्याची कोणतीही यंत्रणा सध्या नाही.
उद्या कदाचित फेसबुक नसेल. सोशल मीडियाचा दुसरा एखादा प्लॅटफॉर्म असेल. मात्र तरीही लोकांची वैयक्तिक माहिती गोळा होत राहील आणि तिचा व्यावसायिक उपयोगही होतच राहील.
कोणताही ऍप इन्स्टॉल होताना, ते परवानगी मागतं तुमच्या संपर्कांना, फोन क्रमांकांना, लोकेशनला, फोटो गॅलरीला बघण्याची. तुम्ही नकार दिला, तर ऍप इन्स्टॉलच होत नाही. त्यामुळे जितकी जास्त ऍप्स आपण डाउनलोड करू, तितकी जास्त आपली माहिती या माहितीच्या महाजालात पसरत जाईल.
त्यामुळे आपण फक्त इतकंच करू शकतो की केंब्रिज ऍनालिटिकासारख्या, माहितीचा गैरवापर करणाऱ्या कंपन्यांवर सक्त कारवाई करू शकतो.
अर्थात, जगभर वादळ निर्माण करणाऱ्या ह्या केंब्रिज ऍनालिटिकाच्या लफडयाने दोन गोष्टी नक्कीच अधोरेखित केल्या -

* जागतिक राजकारणात आणि अर्थकारणात भारताचा दबदबा नक्कीच वाढलेला आहे. फेसबुकला भारताच्या कायदेमंत्र्यांची दखल घ्यावीच लागली.

* ट्रम्प, ब्रेक्झिटनंतर भारतातही मोदींविरुध्द असलं काही करण्याची तयारी केंब्रिज ऍनालिटिका करत होती. काँग्रेसचा त्यात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहभाग होता. केंब्रिज ऍनालिटिकामध्ये पूर्वी संशोधन प्रमुख असलेल्या क्रिस्टोफर वायलीने दिनांक 27 मार्चला ब्रिटिश संसदेत तशी माहिती दिलेली आहे. मात्र हा डाव वेळीच हाणून पाडण्यात आला.

या प्रकरणात आणखी बऱ्याच गोष्टी समोर यायच्या आहेत. पुढे या चित्रात अधिक गहिरे रंग भरत जाणार, हे निश्चित!

१४टॅन Tue, 03/04/2018 - 13:43

बेसिकली फेस्बुकने फोटो पाहून, त्याचा अन्वयार्थ लावून कुठलंतरी उत्पादन गळ्यात मारायचा प्रयत्न केला हा ह्या धाग्याचा सारांश आहे.

माझं मत- आजकाल ह्युमन व्हेरिफिकेशन साठी कॅप्चा हा प्रकार जाऊन कोडेड पिक्चर व्हेरिफिकेशन अस्तित्वात आल्याचं तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे फेसबुकाने एखाद्या फोटोकडे पाहून, त्याचा अर्थ लावून (टेक्स्ट इनपुट नसताना) त्यासंबंधातल्या उत्पादनाची जाहिरात करणं हे अतर्क्य वाटतं. लेखात अति सजावट करून मांडलेलं म्हणणं हे अधिक माहिती न करुन घेता, पूर्वग्रहदूषित समजातून आलेलं आहे.

सुनील Tue, 03/04/2018 - 13:57

In reply to by १४टॅन

बेसिकली फेस्बुकने फोटो पाहून, त्याचा अन्वयार्थ लावून कुठलंतरी उत्पादन गळ्यात मारायचा प्रयत्न केला हा ह्या धाग्याचा सारांश आहे.

अजिबात नाही!

TLDR मंडळींनी शेवटचे दोन तारांकीत परिच्छेद वाचावेत. तोच ह्या लंब्याचवड्या पोस्टीचा सारांश आहे!

१४टॅन Tue, 03/04/2018 - 14:06

In reply to by सुनील

नसते तर्क लावून पुढचं रामायण लिहीलं असल्याने मला लेखकाने जो सारांश दिलाहे त्यात तसंही तथ्य वाटलं नाही.

अनुप ढेरे Wed, 04/04/2018 - 15:52

In reply to by १४टॅन

त्यामुळे फेसबुकाने एखाद्या फोटोकडे पाहून, त्याचा अर्थ लावून (टेक्स्ट इनपुट नसताना) त्यासंबंधातल्या उत्पादनाची जाहिरात करणं हे अतर्क्य वाटतं.

हे अजिबात अतर्क्य नाही. फेस्बुक आणि गुगल तुमच्या फोनच्या मायक्रोफोनने तुम्ही काय बोलताय हे ऐकत असतात. तुम्ही फोन वापरत नसाल आणि केवळ फोन जवळ बोलत असाल तरी. मला अनुभव आहे. हपिसात मित्राशी किंडलबद्दल बोलत होतो. गुगल/ॲमेझॉन किंवा एकंदर ब्रौझरमध्ये किंडल रिलेटेड शोधलं नव्हतं. त्या संभाषणानंतर दहा मिनिटात ॲमेझॉनचा इमेल आला की किंडलवर पुढील दोन तास २५% डिसकाउंट आहे तुमच्यासाठी. हा एरवी येतात त्या टाईप डील्स ऑफ द डे छाप संदेश नव्हता.
जालावर शोधले असता हा असाच अनुभव अनेकांना आलेला समजलं.

गुगल तर तुम्हाला त्याने कोणते वॉइस सँपल स्टोअर केले आहेत ते ऐकुही देतं. गुगल प्रोफाईलमध्ये मिळेल. सो टेक्स्ट इन्पुट हवच तुमच्याबाबत माहिती मिळवायला असं काही नाही.

१४टॅन Wed, 04/04/2018 - 21:52

In reply to by अनुप ढेरे

१. https://www.wired.com/story/facebooks-listening-smartphone-microphone/

To make it happen, Facebook would need to record everything your phone hears while it's on. This is functionally equivalent to an always-on phone call from you to Facebook. Your average voice-over-internet call takes something like 24kbps one way, which amounts to about 3 kBs of data per second. Assume you've got your phone on half the day, that's about 130 MBs per day, per user. There are around 150 million daily active users in the US, so that's about 20 petabytes per day, just in the US.

To put that in perspective, Facebook's entire data storage is 'only' about 300 petabytes, with a daily ingestion rate of about 600 terabytes. Put another way, constant audio surveillance would produce about 33 times more data daily than Facebook currently consumes.

Furthermore, such snooping would be eminently detectable, ringing up noticeable amounts of data on your smartphone as Facebook maintained your always-on call to Zuckerberg. Ever searched for something on your phone while making a call? Notice how it slows to a crawl? Your phone would be like that all the time if Facebook were listening.

२. फेसबुकने स्वत: जाहीर केलेला वचननामा
https://newsroom.fb.com/news/h/facebook-does-not-use-your-phones-microp…

अनुप ढेरे Thu, 05/04/2018 - 10:31

In reply to by १४टॅन

वायर्डच्या लेखकाविषयी विकिवरुन,

He is a former product manager for Facebook,

बाकि, फेसबुकच्या वचननाम्यावर विश्वास ठेवत असाल तर गंमत आहे. आणि जाहीरनामा नीट वाचलात तर चेपु मायक्रोफोनवरून ऐकत नाही असं लिहिलेलं नसून ते जाहिरातींसाठी वापरत नाही असं लिहिलं आहे. फ्रेंड सजेशनसाठी वापरतपण असेल. (मला आलेला अनुभव चेपुमुळे की गुगलमुळे हे सांगता येणं अवघड आहे. )

गुगल वॉइस सँपल ठेवतं. तुम्हाला एक दोन ऐकू पण देतं.
https://myactivity.google.com/
Activity Controls > (voice & Audio) > Manage Activity >
इथे पहा.

१४टॅन Thu, 05/04/2018 - 21:31

In reply to by अनुप ढेरे

आणि त्यात हेरगिरी अजिबात नाही. जिथे मी स्वत: त्या 'ओके गुगल' वाल्या व्हॉईस कमांड ॲपबरोबर चाळे करत होतो तेच सॅम्पल्स फक्त सेव्ह्ड आहेत. ती माझा आवाज ओळखण्यासाठी केलेली सॅम्पल्स आहेत. गुगलने व्हॉइस अनलॉक फीचर आणल्यानंतर तुमचाच आवाज ओळखण्यासाठी सॅम्पल गोळा केली जातील, अशी सूचना केल्याची स्मरते. उगीच स्टोअर केलीहेत म्हणून ते रात्रंदिवस आपल्यावर पाळत ठेवून आहेत वगैरेमध्ये तथ्य नाही. ते लेखक माजीचेपुकामगार असले, तरीही, वर दिलेलं गणितच बरंच बोलकं आहे.

अवांतर: गुगल असिस्टंट अनइन्स्टॉल केल्यामुळे माझं सगळ्यात शेवटचं सॅम्पल १७ जुलै, २०१७चं आहे.

अनुप ढेरे Fri, 06/04/2018 - 14:05

In reply to by १४टॅन

पर्मिशन दिली म्हणूनच ऐकताय्त. पर्मिशन दिली नाही असं मी म्ह्टलेलं नाही. पण फोनमधून तुमचे आवाज वापरुन उप्योग करतात हे लोक (गुगल किंवा चेपु. ) मित्र सजेशन असो, पेज सजेशन असो वा जहिराती.

बिटकॉइनजी बाळा Fri, 06/04/2018 - 12:43

In reply to by अनुप ढेरे

माझ्याकडे फेबु नाही. फक्त गुगल असि. आहे.
तुमच्या प्रतिसादामुळे मी दोन दिवस किशोर कुमार- किशोर कुमार, आर डी- आर डी असं randomly म्हणत होतो आणि मोबाईलला ऐकू जातं का तेही तपासत होतो. नंतर दोन दिवसांनी यु ट्यूब उघडले आज सकाळी तर किशोर आरडी कुणीही आलं नाही. गुगल म्युझिक मध्ये पण कुणीही आलं नाही.

बिटकॉइनजी बाळा Mon, 09/04/2018 - 10:18

In reply to by गवि

किंवा याचा अर्थ असाही निघू शकतो की गुगलजी इतके हुश्यार आहेत, त्यांना अस्सल आणि कृत्रिम संभाषण हे सुद्धा ताडता येत असेल.

१४टॅन Fri, 06/04/2018 - 19:29

In reply to by बिटकॉइनजी बाळा

मी गेली ५-६ वर्षं तरी सारखं सारखं बासरी-चौरसिया-राग-श्रीनिवासन-बंदिश-ताल-सचदेव-मात्रा इत्यादी हजारवेळा म्हणतो, बरेचदा मोबाईल जवळ असतानाच रियाज करतो, पण युट्यूबला मात्र मला ड्युआ लिपा, इंदुरीकर महाराज कीर्तन, सोनू के टिटू की स्वीटी हेच ऐकवावंसं वाट्टं.

अबापट Mon, 09/04/2018 - 18:59

In reply to by बिटकॉइनजी बाळा

नील , इंदुरीकर महाराज हे फुल्ल टीपी नॉनसेन्स आहेत . कुठल्याही रोड ट्रिपला जाताना डायवर कडे नवीन इंदुरीकर महाराज शिड्या आहेत ना ही खात्री करून मगच निघतो ... एक एकदा

पुंबा Tue, 10/04/2018 - 10:45

In reply to by अबापट

इंदुरीकर जास्त तगडा सेन्सॉफ्युमर असलेले, जास्त बेरकी, प्रोफेशनल मेल रामतीर्थकरबै आहेत..
आमच्या गावात दरवर्षी येऊन राडा घालतात. बऱ्याच गावात त्यांची जबरदस्त धुलाई(पार लाथा-बुक्क्या वगैरे) झाली आहे, पण तेच गावकरी 'चला हवा इउ द्या' बोर व्हायलं की प्रेमानं त्यांना बोलावतात. त्याअर्थाने ते मराठी किर्तनविश्वातले ब्रह्मानंदम पण आहेत.

पुंबा Tue, 10/04/2018 - 19:32

In reply to by बॅटमॅन

अहो, इंदुरीकर बाबा ज्या गावात किर्तनाला जातो, तिथल्याच गावकर्‍यांच्या वर्मावर बोट ठेवत त्यांची मापं काढतो, कधी लोकल नेता नाय तर प्रतिष्ठीत माणूस बघून त्याच्या लफड्या कुलंगड्यांचे दाखले किर्तनात देतो. मग पब्लिक पिसाळून बाबाला तुडवते. असे बर्‍याचदा झाल्याचे किस्से ऐकले आहेत. सध्या त्यांचा रामतीर्थकर मोड चालू असल्याने पब्लिक खुष असते.

अबापट Wed, 11/04/2018 - 13:13

In reply to by पुंबा

फक्त बुवा गायला लागला की सायलेंट करावे लागते . ठ्ठल ठ्ठल ठ्ठल ठ्ठल ...
पूर्वी रेट २५ हजार होता , सध्या किती असावा ?

पुंबा Wed, 11/04/2018 - 15:27

In reply to by अबापट

लाखाच्या आसपास आहे असे ऐकायला मिळते..
बुवा 'श्रीमंती वाईट, पैशाचा मोह फार वाईट, पैसा सगळ्या दुःखाचं मूळ' हे सांगायचे दाबून पैसे घेतात. लोकांना कॉमेडी पाहिजे असते, म्हणून जातात.

१४टॅन Wed, 11/04/2018 - 13:41

In reply to by पुंबा

मला रामतीर्थकर, ब्रह्मानंदम वगैरे संदर्भ समजले नाहीत पण इंमा मात्र माझ्या डोक्यात गेले. टिप्पीकल त्या जुन्या पिढीछाप दारू पिऊ नये न् रात्री बारापर्यंत बाहेर फिरु नये, डोळे मारू नये, श्रीमंतीत सुख अस्तं पण समाधान नाही वगैरे एकदा ऐकलं अन् सटकलीच.

अबापट Wed, 11/04/2018 - 16:04

In reply to by १४टॅन

अहो , एवढेच काय , एकदा तर ते तरुणांच्या मिशी काढण्यावर उडत होते .
विनोदाचा आणंद घ्यावा . चांगला वेळ जातो त्यांची भंकस ऐकताना . प्रवासात बोअर होत नाही . एवढीच त्यांची महती .
पुम्बा म्हणतात कि त्यांना दारू वर्ज्य नाही . च्यायला , न पिता हे बोलतात , पिऊन काय धमाल करत असतील .
भाडीपा किंवा कुठल्याही स्टँडअप कॉमेडियन पेक्षा भारी आहेत इंदुरीकर
बोला .. ठ्ठल ठ्ठल ठ्ठल ठ्ठल ...

गब्बर सिंग Thu, 12/04/2018 - 02:57

In reply to by १४टॅन

टिप्पीकल त्या जुन्या पिढीछाप दारू पिऊ नये न् रात्री बारापर्यंत बाहेर फिरु नये, डोळे मारू नये, श्रीमंतीत सुख अस्तं पण समाधान नाही वगैरे एकदा ऐकलं अन् सटकलीच.

ह्या अशा वाक्यांचा एक मोठा संग्रह करता येईल -

(१) स्वातंत्र्य म्हंजे स्वैराचार नव्हे
(२) आपण समाजाकडनं इतकं घेतो .... मग समाजाचं ॠण फेडलं पाहिजे .....
(३) Nobody is perfect
(४) वरील् (२) च्या च धर्तीवर - We believe in giving back to the society.
(५) सामाजिक बांधिलकी .......
(६) गरिबोंको लूटलूट कर वो अमीर बने ....
.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 14/04/2018 - 03:22

In reply to by १४टॅन

मग रामतीर्थकर हे प्रकरण अजिबात ऐकू नकोस. ती बाई यांच्यापेक्षा बरीच जास्त जहाल आहे. शिवाय, थोडं-बहुत सामाजिक काम करत असणार, त्यामुळे मूल्य म्हणजे काय ते फक्त आपल्यालाच समजतं, अशा गैरसमजातही असते.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/04/2018 - 21:25

In reply to by बिटकॉइनजी बाळा

मला वाटलं होतं, लोक काय वाट्टेल ते फेकलं की खरं मानतात, याचं उदाहरण म्हणून ते लिहिलं होतं!

चिमणराव Sat, 14/04/2018 - 13:57

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रिवाद प्रत्येक धाग्यात आणू नाका हो.
एनी दिव्या ( असंच नाव आहे) - बोइंग 777 ची पंचविशीतली पाइलट आहे. तिला काल मुलाखतीत हा विषय विचारून झालाच.
अशी मुलगी विमानात पहिल्या सीटवर ( कॅाकपिटमध्ये) नको असं म्हणणारे नालायक नक्कीच नाही.

नंदन Tue, 03/04/2018 - 14:38

कॅलिफोर्नियातील 'आय.टी.संपन्न' बे एरियात राहणारा भारतीय परिवार. चक्क मराठी.

:)

आश्चर्य वाटलेलं पाहून आश्चर्य वाटलं ;). बाकी सत्यनारायणाची कथा अशीच जन्मली असावी बहुधा!

चिमणराव Tue, 03/04/2018 - 19:17

आम्ही अगोदरच भरपूर मूर्ख आहोत त्यावर आणखी मूर्ख बनवून हसू नका.
अगदी हाच निवडून येणार फोल ठरवून दुसरेच अनपेक्षित उमेदवार बय्राचदा निवडले आहेत.
राहुलबाबा मागच्यावर्षी अचानक कसला कोर्स करायला अमरिकेत गेला तेव्हाच इकडे गुप्तपणे चक्रे फिरू लागली होती.
बाकी लेख झकास ओ

चिंतातुर जंतू Tue, 03/04/2018 - 19:20

हे असं सगळं लोकांना व्हाॅट्सअॅपवर येतं आणि एवढा मोठा मजकूर लोक वाचतातही? कोण रे ते सारखंसारखं म्हणतंय की आताच्या काळात लोक वाचत नाहीत म्हणून? :-)

अनुप ढेरे Tue, 03/04/2018 - 20:40

नेहेमिचे साबणं न घेता एकदम अनसेंटेड साबण आणि इतर अनसेंटेड वस्तू घेणे यावरून ती मुलगी प्रेग्नंट आहे असा निष्कर्ष काढला टार्गेतने अशी मूळ ष्टोरी आहे. (जी डिस्प्युटेड आहे बहुधा.) मराठी नाही फिरंगीच होती बहुधा

१४टॅन Tue, 03/04/2018 - 21:32

In reply to by अनुप ढेरे

ते 'चक्क मराठी' लिहीणं, 'मोठ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट' वगैरे म्हणजे

अगदी निरनिराळे मुलामे देऊन काहीही आगाऊ प्रकार पचनीय करण्याचा केविलवाणा प्रयत्न

होय.

अभ्या.. Tue, 03/04/2018 - 20:54

चैला, काल दुकानात पावभाजी मसाल्याचे पाकीट घेतले तर दुकानदाराने लगेच पावलादी आणि अमूल बटर पाहिजे का विचारले.
नुसते पानपट्टीवर जाउन उभारले तर बनारस १२० ३०० लावायला घेतले.
कोणबी लै पटकन निष्कर्ष काढायलेत ब्वा. गप न्युट्रल राह्याचे तर तसं नाही.

गवि Thu, 05/04/2018 - 22:05

In reply to by अभ्या..

चैला, काल दुकानात पावभाजी मसाल्याचे पाकीट घेतले तर दुकानदाराने लगेच पावलादी आणि अमूल बटर पाहिजे का विचारले.

हॅ हॅ हॅ.. अमूल बटर , पावलादी घेतले असतेत तर दुसऱ्या दिवशी केमिस्टाने कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या गोळ्या आणि इन्शुरन्सवाल्याने हार्ट प्रोटेक्शन पॉलिसी ऑफरवली असती.

चिमणराव Tue, 03/04/2018 - 21:29

कँटिनच्या भोपळा मसाला भाजीचे कौतुक कोणी करू लागला की नवीन लग्न झालेय अथवा बैको माहेरी गेलीय हा निष्कर्ष काढायला पोपटवाल्याची गरज नसते.

१४टॅन Wed, 04/04/2018 - 09:35

In reply to by टिवटिव

बरं झालं वर्जिनल दिलंत. म्हणजे ते दुकानाच्या क्यामेऱ्यांनी फेस रिकग्निशन वगैरे करणं आणि अमुक एका शेल्फसमोर रेंगाळण्याच्या कालावधीवरून तर्कटं रचणं ह्या, पब्लिकमध्ये नसती घबराट पसरवणाऱ्या गोष्टींना डिबंक केलंत. अनेक धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/04/2018 - 02:47

मला एकदम भीती वाटली, १४टॅन मोठमोठे धागे काढायला लागला! हल्लीच्या पोरांचा काय भरवसा नाही हो, कधी धागा जन्माला घालतील आणि कधी तो मोठा होईल!!

चिमणराव Wed, 04/04/2018 - 06:02

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

उत्साहावर पाणी मारलंत! झालं. आता धागा मोठा होऊन बेसबॅाल टीममध्ये कसा जाणार?

चिमणराव Wed, 04/04/2018 - 19:07

In reply to by १४टॅन

मध्यंतरी कोण म्हणालं मिपावर इकडून तिकधून आणून काप्या टाकतात? असं करू नका हो. काहीतरी खणलेली मा(हि)ती टाका. लोकसत्तात गिरीष कुबेर काय करतात? तसं वरिजनल हवं.
खरं म्हणजे असं एखादं आंतरजाल वार्ता सदर नियमित सोमवारी येणार असेल तर मात्र स्वागत.

प्रभाकर नानावटी Thu, 05/04/2018 - 11:18

(या संदर्भातील लोकसत्ताच्या (26 मार्च) लोकमानसमध्ये प्रकाशित झालेले पत्र, ऐसीच्या वाचकांसाठी )

‘समाज(कंटक) माध्यमे’ हा अग्रलेख (२४ मार्च) वाचला. फुकटेपणाची हाव, वैयक्तिक स्वातंत्र्य व खासगीपणाबद्दल तुच्छ वृत्ती, मेंढराप्रमाणे अनुकरण करत राहण्याची मानसिकता, प्रोपगंडाच्या विविध तंत्रज्ञानाबद्दल शहामृगी पवित्रा, इत्यादीमुळे केवळ समाजमाध्यमेच नव्हे तर आपले मायबाप सरकार व या सरकारवर प्रत्यक्ष/ अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवत असलेले कॉर्पोरेट्स मोठय़ा प्रमाणात फायदा उठवत आहेत हे नाकारता येत नाही.

‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’चे २२-२४ वयाच्या ख्रिस्तोफर वायली या व्हिसलब्लोअरने गौप्यस्फोट केल्यामुळे ब्रेग्झिटची जनमत चाचणी व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय अशी राजकीय उलथापालथ करू शकणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञानाचा आवाका नक्कीच लक्षात येईल. आताचा कालखंड डिजिटल क्रांतीचा परमोच्च काळ म्हणून इतिहास नोंद घेईल. माहिती तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक साधन-सुविधा व त्यात होत असलेल्या शोधामुळे संग्रहित होत असलेला डेटा अलीकडच्या काळात दर वर्षी दुप्पट वेगाने वाढत आहे. आपल्या आवडीनिवडी, आपण कुठले कपडे घालतो, आपल्याला कुठले खाद्यपदार्थ आवडतात, आपले छंद काय आहेत, यासंबंधीचा डेटाही संग्रहित होत आहे. पुढील १० वर्षांत १५ हजार कोटी सेन्सॉर्स नेटवर्कशी जोडलेले असतील. म्हणजे जगाच्या लोकसंख्येपेक्षा २० ते २५ पटीने जास्त! त्यामुळे दर बारा तासाला डेटा दुप्पट होत राहील. एका उद्योजकाच्या मते डेटा इज प्युअर गोल्ड. या सोन्याच्या खाणीमागे अमेरिकेतील गोल्डरशप्रमाणे अनेक लहान-मोठय़ा कंपन्या व कॉर्पोरेट्स धावत आहेत. हा उदंड डेटा मोठय़ा प्रमाणात पैशाच्या स्वरूपात बदलण्याच्या मागे लागलेले आहेत.

कदाचित यानंतरच्या काळात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून राजकीय प्रोपगंडाच्या व वस्तू विक्रीसाठीच्या जाहिरातीचा मारा जनमाध्यमातून न होता व्यक्तीनिहाय संदेशातून होत राहील. प्रगत तंत्रज्ञानामुळे वास्तव व आभासी वावरातल्या सीमारेषा पुसट होत जातील व जॉर्ज ऑर्वेलचा बिग ब्रदर आपल्यावर पाळत ठेवत आहे हे नक्कीच जाणवेल. कारण आपणच स्वेच्छेने आपले खासगी आयुष्य उघडे करत असतो. आपली ही सहमती फारच भयावह आहे, हे लक्षात येण्याआधीच अर्थव्यवस्था व सामाजिक व्यवहार पूर्णपणे बदललेले असतील व त्याचा थांगपत्ताही आपल्याला लागणार नाही!

बिटकॉइनजी बाळा Thu, 05/04/2018 - 20:35

In reply to by प्रभाकर नानावटी

काहीही होणार नाही.
दोनचार वर्षापूर्वी लोक तिसरं महायुद्ध पाण्यासाठी होणार असं म्हणत होते. आता डेटा साठी होणार म्हणे. जी गोष्ट इतकी जास्त प्रमाणात उपलब्ध होईल ती सोन्याची खाण कशी बरं?

अनुप ढेरे Wed, 04/04/2018 - 15:36

'ऐसी' हा सोशल मिडिया आहे काय? ऐसीतून युजर्सचा डेटा कोलेट केला जातो का?
( बाप रे! आत्ता लक्शात आलं की मालकीण बाई आर्टिफिशियल इन्टेलिजन्स/मशीन लर्निनशी संबंधीत काहीतरी शिकतायत ते का! बिग सिस्टर इज वाचिंग यु! )

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/04/2018 - 20:51

In reply to by अनुप ढेरे

घाबरू नकोस वत्सा; मी आळशी आहे. शिवाय सध्या पूर्णवेळ नोकरी मिळाल्ये; ते लोक रिक्कामटेकडं संशोधन करण्यासाठी मला मोप पैसेही देत आहेत. त्यामुळे टाईम इल्ला. शिवाय, असले धंदे करण्यासाठी अनुभवही इल्लाच.

गवि Thu, 05/04/2018 - 10:24

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नोकरी.. इथेच मराठी माणूस मार खातो. नायतर तो झुकरबर्ग बघा पाहू. दुनिया झुकती है, झुकरबर्ग चाहिये..

चिंतातुर जंतू Thu, 05/04/2018 - 14:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

टाईम इल्ला. शिवाय, असले धंदे करण्यासाठी अनुभवही इल्लाच.

अशीच अमुची मालकीण असती डेटा चौर्यकर्ती
अम्हीही डेटा चोरला असता वदले छत्रपती!

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 05/04/2018 - 20:04

In reply to by चिंतातुर जंतू

गवि आणि जंतू हे मला चोरी करण्यासाठी भाग पाडत आहेत, याची मी आधीच नोंद करून ठेवते. उद्या डेटा चोरलाबिरला तर या दोघांची जबाबदारी असेल.

पुंबा Wed, 04/04/2018 - 19:28

आपला डेटा फुकटात ढापला जातो म्हनून आपण हळहळ करत असतो. जर आपल्या डेटाबद्दल विशिष्ट रक्कम मिळाली तर आपल्याला इतकी चरफड वाटेल का?

गब्बर सिंग Wed, 04/04/2018 - 23:13

In reply to by पुंबा

आपला डेटा फुकटात ढापला जातो म्हनून आपण हळहळ करत असतो. जर आपल्या डेटाबद्दल विशिष्ट रक्कम मिळाली तर आपल्याला इतकी चरफड वाटेल का?

.
नाही.
.

अरविंद कोल्हटकर Thu, 05/04/2018 - 02:03

तसा मी चांगलाच टेक्नोमंद आहे तरीहि मला जाणवलेले लिहितो.

एखादी ईमेल लिहितांना त्यामध्ये अमुकतमुक चित्र/डॉक्युमेंट जोडलेले आहे असे लिहिले आणि पाठविण्यापूर्वी जोडायचे विसरले तर माझ्या हॉटमेलचा देव 'ते जोडायचे विसरले आहे' अशी आठवण करून देतो. म्हणजेच मी लिहितांना तो माझ्या खांद्यावरून ते वाचत असला पाहिजे!

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 05/04/2018 - 02:10

In reply to by अरविंद कोल्हटकर

या प्रकाराचा आणखी नवा अवतार म्हणजे फोनवरून इमेल तपासताना काही ठरावीक, साचेबद्ध प्रतिसाद सॉफ्टवेअर सुचवतं. इंग्लिशमधल्या इमेलसाठीच. हे प्रतिसाद साधारणतः 'वा वा चान चान' प्रकारचे असतात. (ही अशी उत्तरं मी इमेलींना द्यायला लागले तर माझ्या जवळच्या मैत्रमंडळींचं काय होईल, या भीतीनं मी ते वापरत नाही.)

आज आणखी कहर झाला. एका मुलीशी लिंक्डइनवर बोलत होते. तिला म्हटलं, "तंत्रज्ञानक्षेत्रात आणखी मुली दिसलेल्या मला आवडेल." तिनं उत्तर दिलं, "Me too." त्यावर लिंक्डइननं एक प्रतिसाद सुचवला, "Sorry!"

#MeTooचा धसका बघून हसायला येईल असं वाटलं नव्हतं. पण तेही मशीन-लर्निंगनं करून दाखवलं!

अनुप ढेरे Thu, 05/04/2018 - 10:33

In reply to by अरविंद कोल्हटकर

हे जुनंच आहे. अऊटलुकपण तुम्ही मेलमध्ये ॲटॅच्ड असा किंवा तत्सम शब्द लिहिला तर ॲटॅचमेंट लावायला विसरलात का ही आठवण करत. मेल क्लायंट्स तुमचे शब्द पार्स करतातच. स्पेलचेक हे पण वाचतातच तुमचे शब्द.

तिरशिंगराव Thu, 05/04/2018 - 02:28

एक संघोटे म्हणतात की ते हल्ली बटाट्याची भाजी खात नाहीत. त्यांनी सोडलेल्या गॅसेसवरुन गुगल ओळखतं म्हणे, काय खाल्लं ते!

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/04/2018 - 21:12

In reply to by मनीषा

७०-७५% वेळा जमलं तरीही स्वर्ग दिसल्याचा आनंद मानला जातो. मशीन लर्निंग नसतं तर तो शब्दशः हवेत गोळीबार ठरला असता; म्हणजे ५०% सुद्धा नव्हतं, ते आता ७०-७५% अॅक्युरसी. एवढंच नाही, तर अगदी कमी वेळात, कमी कष्टांत हे होतं. क्लाऊड कंप्युटिंग स्वस्त होत जातंय, तशी यंत्रांची किंमत आणखी कमी होत जाणार.

माझ्या कामाच्याच बाबतीत बोलायचं तर आज माझं संशोधन चाललं आहे ते विदेचा आकार कमी कसा करता येईल, आणि तरीही अॅक्यूरसी कमी होणार नाही, यावर. पण कदाचित आणखी १०-१५ वर्षांनी याच विदासंचाच्या बाबतीत कोणाला त्याचा विचारही करावासा वाटणार नाही. कारण आणखी अवाढव्य संगणक सगळ्या गणितासाठी उपलब्ध असतील.

मात्र हेच तंत्रज्ञान आणखी कशासाठी वापरून, आणखी विदेचं चर्वण करता येईल.

आणि या सगळ्यातून, नानावटींनी लिहिलं आहे तसा 'मॅन्युफॅक्चर्ड कन्सेंट' तयार करून, आपल्याला नकळत आपलं वर्तन बदललं जाईलही. कदाचित आजही हे होत आहेच.

गब्बर सिंग Fri, 13/04/2018 - 22:21

समस्त देशाला जागं करण्याची उदात्त महत्वाकांक्षा बाळगून लिहिलेला संदेश. त्यातली काही वाक्ये, जी सोनेरी अक्षरांत नोंदवून ठेवावीत, तांबड्या रंगाने रंगवत आहे.
.
.

नाना पाटेकर यांचा ब्लॉग वाचायलाच हवा. ब्लाॅग असा आहे:

शिर्डी साईबाबा
प्रत्येक वर्षीचे मिळणारे डोनेशन - ३५० करोड + सोने ३२ करोड, + गुंतवणूक ४२७ करोड.

सिद्धीविनायक, मुंबई:
पैसे - २०० करोड , FD : १२५ करोड.

लालबागचा राजा:
१८ करोड कमाई फक्त गणपतीच्या १० दिवसातली.

गावाकडे दोन रुपये हरवले तर पोराला घेऊन भर उन्हात तो अर्धा दिवस हुडकत बसणारे शेतकरी /मजूर मी स्वतः पाहिलेत अन त्याच मजुरांना देवाच्या दानपेटीत सढळ हाताने 5-10 रुपये टाकतानाही पाहिलंय.

फक्त 3 देवस्थानांची वेल्थ हजार करोडच्या आसपास आहे. 12-12 हजारासाठी आत्महत्या करणारे शेतकरी एका बाजूला अन अडीच हजार करोड एकट्या कुंभमेळयाला "अलोकेट" करणारे आमचेच सरकार एका बाजूला.

स्वतःची अजिबात परिस्थिती नसूनही देवाला साडी-चोळी-पोषाख करणारे, दान टाकणारे, आजवर देवांच्या दानपेट्या भर-भरून देणारे गरीब शेतकरी स्वतः जेव्हा त्रासून दुर्दैवाने आत्महत्येच्या निर्णयाला पोचतात तेव्हा हिच देवस्थाने आरामात आपला बँकेत ठेवलेल्या FDचे व्याज चाखत बसलेली असतात!!

मग ह्या गरीबांना मरताना सुद्धा २ रुपयाची मदत न करणाऱ्या विठ्ठल-तुळजाभवानी-स्वामी समर्थ-सिद्धिविनायक देवस्थानांना मी 'भिकारी' का म्हणू नये?

मी पत्रकार नाही, जो विचार मनात जन्मला तो आहे असा Raw स्वरुपात समोर मांडला.
एखाद्या पत्रकार अथवा सच्च्या समाजकारण्याने जर या सगळ्या मंदिरांचा आतापर्यंत फुकट मिळालेला पैसा अन गुंतवणूक बाहेर काढायचं ठरवलं तर जो आकडा समोर येईल तो Digest करायची आपल्या कोणात ताकद आहे का?

मुळात एवढा पैसा आला कोठून? देव कामाला गेले होते की पुजारी कामाला गेले होते, का मंदिरांच्या विश्वस्तांनी कामाला जाऊन हे करोडो रुपये घाम गाळून कमवून आणले?

लोकांचाच पैसा ना हा? मग आता दुष्काळात, गरज असताना लोकांनाच हा पैसा थोडासा मदत म्हणून दिला तर काय फरक पडणार आहे?

ही तर फक्त ३ देवस्थानांची नावे होती.
आळंदी- देहू- भीमाशंकर- अष्टविनायक- महालक्ष्मी- सप्तशृंगी- शनी अन शिखर शिंगणापूर-सिद्धेश्वर यांचा आजवरच्या दानपेटीतला पैसा किती असेल???
अन छोटी-छोटी तर हजारो मंदिरे आहेत आपल्या देशात, राज्यात. त्यांचे पैसे किती?

मुळात म्हणजे हा पैसा नेमका कोणाचा आहे? देव स्वतःकडे ठेवतो का हा पैसा? कि बाकीचेच लोक वर्षानुवर्षे देवाच्या नावावर हा पैसा हाणतात?
दोन मिनिट असं मानलं कि भक्तांची सोय करतात, तर तसंही नाही.
अक्कलकोट, पंढरपूर, गाणगापूरचे, गावातले सोडा नुसते मंदिरा शेजारचेच रस्ते पहा, देवाच्या गावात असूनही तोंडातून आपसूक शिवी निघून जाईल अशी परिस्थिती!

माझ्या इथं ओरडण्याने काहीच होणार नाही याची पुरेपूर जाणीव आहे मला.

पण एक दिवस आज जन्मलेल्या या विचाराचा फायदा या पैशांच्या खऱ्या मालकांना, गरीब शेतकऱ्यांना १०० टक्के मिळवून देईन हे मात्र नक्की.

- नाना पाटेकर

पटलं तर पूढे forward करा आणि देशाला जागं करा.

जय हिंद

१४टॅन Sat, 14/04/2018 - 08:05

In reply to by गब्बर सिंग

सोशल मिडीया हातात आल्यावर आपण कसे युनिक आणि पेशल हे दाखवण्याची अमाप खाज ९०% जन्तेला असते, त्यातून हे प्रकार तयार होतात. नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील इ. कोणाचाही फोटो डकवून, नाव लिहून असे टिपीकल संदेश पसरवणं सध्या फार जोमात आहे. नाना पाटेकर पहिलं म्हणजे ब्लॉग लिहित नसावेत. बरीच शोधाशोध करून मिळाला नाही. वरील संदेशातील निरनिराळी वाक्ये गुगल केल्यास असेच टीचभर दवणीय लोकांच्या चेपु पोष्टी आणि ब्लॉगपोष्टी मिळाल्या.
--
हे लिहीणारे आणि अशा पोष्टींना अनुमोदन देणारे लोक्सच सिद्धिविनायकाला जाणे, तिरुपतीला जाणे, डॅशबोर्डवर गणपती लावणे इ. कामे करतात.
तुमची एक अपरिमेय श्रद्धा आहे. ती एन्कॅश करायला, सत्रा पिढ्यांपासून लोक बसलेले आहेत. तुमचे आईवडील त्याला बळी पडलेयत. तुम्हाला बळी दिलं गेलं आहे, किंवा तुम्ही स्वेच्छेने बळी पडलाहात. तुम्हाला एकत्रच देऊळ हवं, तिथे पुजारी हवा, छान छान सण पद्धतीत साजरे व्हावेत ह्या अपेक्षा असतात आणि त्याचबरोबर देवळाला दिलेल्या पैशांचं देवळाने काय करावं हे ही तुम्हालाच ठरवता यावं. केलेल्या इन्व्हेस्टमेंटवर इतके रिटर्न्स शेबा देत नाही की म्यूफं.

१) तुम्ही देवळाला दान देणारे नसाल तर: देवळाच्या पैशांचं काय करावं हे तुम्ही फार फार तर विधेय प्रयोगात सांगून गप्प बसू शकता.
२) दान देणारे असाल तर: सिम्पली त्या नाम (नाना-मकरंद) वगैरे योजनेला पैसे द्यावेत. (मीही दिले आहेत चांगली दोन वर्षं.)
--
नानांच्या दवणीयत्वाबद्दल एक स्वतंत्र लेख लिहीता येईल.

नितिन थत्ते Sat, 14/04/2018 - 08:52

In reply to by १४टॅन

व्हॉट्सॲप संदेशांमधली एक अडचण अशी असते की त्यांची खातरजमा करता येत नाही - आर्य चाणक्य (कौटिलीय अर्थशास्त्र ५-१२७: द्वितीय आवृत्ती ख्रि.पू.. १०३)

गब्बर सिंग Sat, 14/04/2018 - 10:17

In reply to by १४टॅन

ना पाटेकर ना पाटील

१४टॅन, काय हे ?

प्रामाणिक, नीतीवान, कष्टाळू, व तरीही गरीब अशा महान शेतकऱ्यांबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही आहात. हे काय बरोबर नाय !!!
.