परदेशस्थांना आयकराबाबत सावधानतेचा इशारा

असे वाचनात आले की Common Reporting Standard Multilateral Competent Authority Agreement, or CRS MCAA नावाच्या आन्तरराष्ट्रीय करारावर भारतासह १०० देशांनी सह्या केल्या आहेत.

आयकरदाता सामान्यत: ज्या देशामध्ये राहतो आणि जेथे आयकर भरतो त्या देशाबाहेर पैसा गुंतवून मूळ देशाचा कर चुकवायचा ह्या प्रवृत्तीचा मुकाबला करणे हे ह्या कराराचे उद्दिष्ट आहे. देशादेशांना आयकरदात्यांची माहिती एकमेकास कळविणे सुकर व्हावे ह्याची व्यवस्था ह्या करारामध्ये आहे.

भारतामध्ये Non-resident खाते ठेवणार्‍या खातेधारकांची KYC खाली माहिती गोळा करणे हे भारतीय बॅंकांनी सुरू केले आहे. अशा खातेधारकांचा आयकरासाठीच्या residence चा देश कोणता आहे आणि तेथे त्यांचा Income Tax साठीचा account number काय आहे अशी माहिती बॅंका गोळा करू लागल्या आहेत.

तेव्हा अन्य देशांच्या तुलनेमध्ये भारतात मुदतठेवींवर आकर्षक व्याज मिळते ह्या आणि अशा अन्य कारणांसाठी कोणी भारतात पैसे गुंतवले असतील तर सावध होऊन ह्यापुढे ते उत्पन्न प्रामाणिकपणे राहत्या देशाला कळवावे असे सुचवितो. NRE ठेवींवरचे व्याज भारतात करमुक्त असते ते पूर्णपणे उघड करावे. NRO ठेवींवर भारतात कर भरला असेल तर त्यासाठी Double Taxation Avoidance Agreement अनुसार सूट मागावी. कोणी भारत सरकारचा पेन्शनर परदेशात राहात असेल तर त्याने तो परदेश आणि भारत ह्यांच्यामधील Double Taxation Avoidance Agreement पाहून घ्यावे कारण पुष्कळ Agreements मध्ये असे पेन्शन भारतातच करपात्र आहे आणि परदेशात करमुक्त आहे अशी तरतूद असू शकते.

अखेरची पृच्छा. CRS MCAA खाली कोणाकडे कोठल्याहि देशाच्या आयकरखात्याची चौकशी आली आहे काय?

(देशाबाहेर किती मालमत्ता असल्यास त्याचा खुलासा कर भरतेवेळी करायला हवा असेहि नियम देशादेशांमध्ये आहेत. आपापल्या देशाच्या limit ची माहिती घेऊन ठेवणे आवश्यक होऊ लागले आहे.)

field_vote: 
0
No votes yet

NRO ठेवींवर भारतात कर भरला असेल तर त्यासाठी Double Taxation Avoidance Agreement अनुसार सूट मागावी

हा पत्रव्यवहार कोणाशी करायचा असतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ह्यासाठी लकाही पत्रव्यवहार करायला लागतो असे वाटत नाही. तुम्ही परदेशी व्याजाचे उत्पन्न दाखविले आणि देशाचे नाव लिहिले की कोठेतरी तेथेच तुम्ही भारतात ह्यावर किती कर भरला अशी चौकशी असते. ती रक्कम कॅनडासाठी ओळ ४०५ येथे दाखवायची असते. बाकी सर्व हिशेब Revenue Canada स्वत:च करते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लवकरच गेल्या आर्थिक वर्षाचा कर भरणं/परत मागणं हे प्रकार होतील. तेव्हा आणखी चौकशी करेनच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अधिक टक्के व्याज मिळते यासाठी इथेच भारतात गुंतवणूक करायची या मोहातून कधीनाकधी बाहेर पडावेच लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> तेव्हा अन्य देशांच्या तुलनेमध्ये भारतात मुदतठेवींवर आकर्षक व्याज मिळते 

हा हिशेब खोटा जरी नसला तरी त्यात अंमळ भानगडी आहेत. समजा आज मी एक अमेरिकन डॉलर भारतात नेऊन त्याचे ६४ रुपये केले, आणि ते मुदत ठेवीत गुंतवले. सात टक्के व्याज धरून वर्षभराने त्याचे ६८.४८ होतील. पण अमेरिकन डॉलरची किंमत तेव्हा जर ६७ असेल तर मला त्याचे फक्त एक १.०२२ डॉलर मिळतील, म्हणजे व्याज सव्वादोन टक्केच झालं. डॉलर-रुपया यांचा परस्परविनिमयदर सतत वरखाली होत असल्यामुळे मुदतठेव केव्हा मोडायची याचा निर्णय सोपा नाही. शिवाय selling rate आणि buying rate यांतली तफावत हाही भाग त्यात आलाच. यातही फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे आणून गुंतागुंत वाढवता येईल, पण एवढं करून फायदा किती जास्त होईल याबद्दल शंका आहे. होणारच नाही असं नाही, पण तो बिनघोर मार्ग नक्कीच नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

छोट्या मुदतीचा विचार केला तर चिपलकट्टींचे म्हणणे बरोबर आहे पण त्याला दोन संभाव्य उत्तरे आहेत. एकतर रुपया अलीकडे बऱ्यापैकी स्थिर झाला आहे असे वाटते. केवळ घसरणच असे जे पूर्वीचे चित्र होते ते आता काही प्रमाणात सुधारले आहेसे वाटते. तसेच भारतात NRE FDs मध्ये गुंतवणुकीकडे एक-दोन वर्षे अशा कमी मुदतीसाठी न पाहता १०+ वर्षांचा विचार केला आणि येणारे सर्व व्याज लगेचच नव्या FD मध्ये गुंतवत गेले तर १०+ वर्षांनंतर चक्रवाढीने व्याज मिळत राहून भांडवलाचा पाया पुरेसा रुंद होईल. भारतातील सर्व बँकांमध्ये आता online व्यवहार शक्य असल्याने स्वत:च हातात ताबा घेऊन हे सर्व वैयक्तिक देखरेखीने नीट करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकतर रुपया अलीकडे बऱ्यापैकी स्थिर झाला आहे असे वाटते. केवळ घसरणच असे जे पूर्वीचे चित्र होते ते आता काही प्रमाणात सुधारले आहेसे वाटते.

काय म्हणता! आम्हाला बातम्या वाचून, किंवा अनेक विचारवंतांचे विचार वाचून भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला चालली आहे असं दिसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट2
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

फ्रेम ऑफ रेफरन्सवर अवलंबून असावे काय?

बोले तो, समजा तुम्ही एखाद्या उंच इमारतीच्या टपावरून खाली उडी मारली. त्या वेळी मी समजा तुमच्या थोड्या वरून उडत जाणाऱ्या एका विमानाच्या पंखावर गंमत बघत बसलो होतो. थोड्या वेळाने मला काय हुक्की आली, कोणास ठाऊक, पण मी पॅराशूट घेतले, नि मीही उडी मारली. पॅराशूटमुळे मी संथ, स्थिर गतीने खाली येऊ लागलो, तर तुम्ही पॅराशूटअभावी गुरुत्वीय त्वरणाने पडत राहिलात. ही सुखस्थिती काही काळ चालू राहिली.

पण हाय रे दैवा! मध्येच माझे पॅराशूट फाटले. (भोक असावे बहुधा. त्यातून वारा जाऊन फाटत गेले असावे.) आता माझ्या गतीवरील पॅराशूटचा प्रभाव कमी होऊ लागला, नि गुरुत्वीय नाही, तरी थोड्या कमी त्वरणाने मी खाली येऊ लागलो. म्हटल्यावर, थोड्या वेळाने वैतागून, "काय वाट्टेल ते होवो" म्हणून मी ते पॅराशूट फेकून दिले, नि मीही सगळ्यांसारखाच गुरुत्वीय त्वरणाने खाली येऊ लागलो.

आता, तुम्ही किती वेगाने खाली कोसळताय याचे तुमचे पर्सेप्शन हे तुम्ही इमारतीकडे बघताय, की माझ्याकडे, यावर अवलंबून असणार, नाही काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला चालली आहे असं दिसतं

अर्थव्यवस्था सुधारणे म्हणजे १का रुपयाला ४०* डॉलर मिळणे अशी रुपयाच्या डॉलरसोबतच्या विनिमय दरावर आधारित संकल्पना ही बहुतांशी राजीव दीक्षित/रामदेव बाबा यांच्या भक्तमंडळीनी पसरवलेली आहे.

* हा आकडा कोणत्या वर्षी हे विधान केले आहे यावर अवलंबून असतो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१का रुपयाला ४०* डॉलर मिळणे

हे आम्ही कुठे म्हटलय चाचा?
अस्थिर चलन दर किंवा फ्री फॉलमधला चलन दर हे अशक्त अर्थव्यवस्थेचं लक्षण नाही असं म्हणताय का चाचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अस्थिर चलन दर किंवा फ्री फॉलमधला चलन दर हे अशक्त अर्थव्यवस्थेचं लक्षण नाही असं म्हणताय का चाचा?

असेलही कदाचित. (मला माहीत नाही.) परंतु मला एक (कदाचित अडाणचोट) शंका आहे.

$प्रति (किंवा €प्रति, किंवा £प्रति) ₹ची घसरण (अर्थात ₹प्रति $ची - किंवा €ची, किंवा £ची दरवाढ) हे (बाय इटसेल्फ) अमेरिकन (किंवा युरोझोनची, किंवा ब्रिटिश) अर्थव्यवस्था दिवसेंदिवस अधिकाधिक बळकट होत असल्याचे लक्षण मानता येईल काय?

की त्यासाठी काही वेगळे मानदंड आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुपया डॉलरच्या तुलनेत वधारला तर ते अर्थव्यवस्थेसाठी चांगलेच असते असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

एक्सपोर्ट्सची वाट लागते, वगैरे.

मला हा सगळा मामला नीटसा कळलेला नाही. असो, सवडीने पुन्हा केव्हातरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्थिर चलन चाचा, वधारणं नाही म्हटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>>एकतर रुपया अलीकडे बऱ्यापैकी स्थिर झाला आहे असे वाटते. केवळ घसरणच असे जे पूर्वीचे चित्र होते ते आता काही प्रमाणात सुधारले आहेसे वाटते.
डॉलर 40 चा 42 झाला आणि 60 चा 62 झाला तर वर चिपलकट्टींनी केलेल्या गणितात पडणारा फरक आणि डॉलर तसा स्थिर झालाय का नाही याचं उत्तर वेगवेगळं येऊ शकतं.

हा डॉलर वि. रुपयाचा ग्राफ. मला तरी रुपया (अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने) स्थिर झालाय असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

प्रो. चिपलकट्टी (नाव बरोबर लिहिलंय ना?) यांचं म्हणणं योग्य आहे.

मला भानगडी टाळायच्या म्हणून भारतातला पैसा अमेरिकेत आणायचा कंटाळा आहे आणि अमेरिकेतला भारतात पाठवायचा. सुदैवानं (किंवा दुर्दैवानं) मायबापदाद्यांनी ठेवलेली बऱ्यापैकी जायदाद अजूनही भारतातच आहे आणि मी अजूनही (येती अनेक वर्षं) भारतीय नागरिकच (असणार) आहे. त्यामुळेही तो पैसा हलवायचा नाहीये. मग भरपूर (जायदाद हो!) रुपये फक्त खात्यात ठेवण्यापेक्षा मुदत ठेवी म्हणून गुंतवून ठेवणं योग्य वाटतं. आधार कार्डाची भानगड टाळण्यासाठी आणि कायदेशीर म्हणूनही बँकेचं खातं NRO केलेलं आहे.

त्यामुळे Double Taxation Avoidance Agreement हे घोडे कुठे नाचवायचे, वगैरे चिंता करावी लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अमेरिकेतून भारतात एनआराय लोकांनी पाठवलेल्या पैशावर अमेरिकेत टॅक्स भरलेला असतो. भारताबाहेर राहणार्‍यांना भारत या देशात पाठवलेल्या पैशावर टॅक्स लावत नाही. देशातून बाहेर जाण्याअगोदरच्या ठेवी यात येणार नाहीत (जोपर्यंत इकडून तिकडे केलेल्या नाहीत) असे मला वाटते.

तरी खात्री करून घेतलेली बरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

प्याराशुट रुपक भारीच हं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॅरी ट्रेड नावाची स्ट्रेटेजी आहे. त्यानुसार जास्त व्याजदराच्या करंन्सी मध्ये गुंतवणुक करणं बऱ्याच वेळा फायद्याचं होतं असे आढळून येतं. ही स्ट्रेटेजी अनकव्हर्ड इंटरेस्ट रेट पॅरीटी थिअरीचे उल्लंघन होईल (शॉर्ट टाईम पिरियड मध्ये) यावर आधारलेली आहे. (आणि बऱ्याचवेळा शॉर्ट टाईम मध्ये अधिकचे व्याजदर असेलेल्या इमर्जिंग करन्सीज त्यांच्या व्याज दरा मानाने डेप्रीशीएट होत नाहीत. किंबहुना त्या वधारतात. त्याची बरीच कारणं आहेत. ग्रोथ रेट, एफडी आय...इ.इ.) फक्त इकॉनॉमिक क्रायसीस मध्ये इमर्जिंग करन्सीज मोठ्या फरकाने कोसळतात.. तेव्हा कॅरी ट्रेड अर्थात आतबट्याचा व्यवहार होतो. कॅरी ट्रेडची स्ट्रेटेजी आणि एक उदा. इथे आहे...

https://drive.google.com/drive/folders/15PdxeOflD7FchiJh1VzNSKG8ABFaBdsR...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0