आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ४
दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.
काही वेळा आपल्याला एखाद्या सिनेमाला, नाटकाला, भाषणाला जायची इच्छा असते. काही वेळा ऐसीवरचेच काही लोक एखादा कार्यक्रम सादर करणार असतील. आपल्या बरोबर कोणी जाणार असेल तर उत्तमच, नाहीतर आपला कार्यक्रम ठरलेला असतो. अशा वेळी 'मी/आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहोत' असं जाहीर आमंत्रण द्यायचं असेल तर या धाग्यावर टाका. ज्या काही लोकांना जमायचं असेल ते धाग्यावर जाहीर करून येतील - एकमेकांशी व्यनिसंपर्क करतील अशी अपेक्षा आहे. जमल्यास कार्यक्रम कसा झाला याबद्दल चार शब्द जर त्यांपैकी कोणी नंतर लिहिले तर ज्यांना यायला जमलं नाही त्यांनाही जळवण्याची संधी साधता येईल.
या धाग्यावरच्या प्रतिसादांत कार्यक्रम जाहीर करणारांनी खालील माहिती पुरवावी.
कार्यक्रम -
अपेक्षित शुल्क -
स्थळ -
तारीख व वेळ -
कुठे भेटायचं -
आधीच्या धाग्यांवर १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा केला आहे.
---
काही वेळा मुख्य प्रवाहातला एखादा रंजनप्रधान चित्रपट वेगळ्या शैलीमुळे चर्चेत येतो. तसाच एक चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी पुणेकरांना आहे. 'अंगमली डायरीज' हा लिजो जोसे पेलिसरी दिग्दर्शित मल्याळी चित्रपट केवळ एका खेळापुरता पुण्यात आहे.
स्थळ : सिनेपोलिस वेस्टएंड माॅल औंध
वेळ : गुरुवार ६ जुलै रात्री ८:१५
चित्रपटात तब्बल ८६ नवे चेहरे आहेत आणि कथनशैलीही गंमतीशीर आहे. अंगमली नावाच्या गावातल्या काही तरुणांची ही धांदलधम्माल गोष्ट आहे आणि त्यासाठी अंगमलीमधलेच न-नट वापरले आहेत. तारांतिनोपासून के.जी. जाॅर्जपर्यंत विविध शैलीतले दिग्दर्शक पेलिसरीला आवडतात. अत्यंत स्थानविशिष्ट तपशील वापरूनदेखील प्रांताबाहेरही आवडेल असा चित्रपट करायला पेलिसरीला जमलं असावं, कारण मोहनलालपासून अनुराग कश्यपपर्यंत अनेकांनी त्याची स्तुती केली आहे. ट्रेलर -
वत्सपावर हे फिरायलंय, पण इथे कसं टाकायचं?
>>वत्सपावर हे फिरायलंय, पण इथे कसं टाकायचं ही समस्या होती.<<
अशी प्रतिमा इथे देण्याचा सहज सोपा मार्ग : आपल्या एखाद्या क्लाउड खात्यातून (उदा. गूगल ड्राइव्ह, गूगल फोटोज, फ्लिकर, मायक्रोसाॅफ्ट वन ड्राइव्ह वगैरे) ती सेव्ह करून सार्वजनिक करायची. मग तिची एम्बेड यूआरएल घेऊन ती इथल्या 'Insert/Edit Image' सुविधेतून शेअर करायची.
प्रा. राम बापट स्मृती व्याख्यान
२०१३पासून सुरू असलेल्या प्रा. राम बापट स्मृती व्याख्यानमालेतील पुढील व्याख्यान येत्या शनिवारी पुण्यात आहे.
वक्ता : गायक आणि मॅगसेसे पुरस्कारप्राप्त टी. एम. कृष्णा
विषय : 'मी मुक्त आहे काय? एका संगीतकाराचा शोध' (इंग्रजीत)
स्थळ : एस. एम. जोशी सभागृह
वेळ : शनिवार १५ जुलै संध्याकाळी ६ वाजता.
कार्यक्रमाचे स्वरूप : आधी एक चित्रफीत दाखवली जाईल, मग कृष्णा यांचे व्याख्यान होईल व मग सदानंद मेनन त्यांच्याशी संवाद साधतील.
कार्यक्रम सर्वांना खुला आणि विनामूल्य आहे.
'वडार देव्हाऱ्यावरील चित्रपरंपरा'
सुदर्शन कला दालन , पुणे प्रस्तुत चित्रसंवाद : भाग ४९
'वडार देव्हाऱ्यावरील चित्रपरंपरा'
वक्ते : डॉ . विक्रम कुलकर्णी
विक्रम यांनी सदर विषयावर गेली चार वर्षे संशोधन केले असून त्यातील वैविध्य आणि चित्रकलाविषयक संशोधनाचा आवाका, सध्या व पूर्वी होत असणाऱ्या संशोधनाचे स्वरूप, व्याप्ती, मर्यादा, निष्कर्ष, पुढील संशोधन अशा मुद्द्यांवर विक्रम स्लाईडशोद्वारे चर्चा करतील.
वेळ : सकाळी ११:०० ते १२:३०
दिनांक : रविवार २३ जुलै २०१७
सुदर्शन रंगमंच ,शनिवार पेठ , पुणे
आयोजक : डॉ . नितीन हडप आणि प्रमोद काळे
र धो कर्वे -- समास्वास्थ्य @ भरत नाट्य मंदिर
http://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel_ipad.aspx?ed=Pune%2cM…
.
.
ह्या पानावर सर्वात खालच्या ओळीत दडावीकडून पहिली जाहिरात. "धारदार तेजस्वी देखणी" असं लिहिलेली.
मी जाइन बहुतेक्. नेमकी जाहिरात बघायची तर ही --
http://epaper.esakal.com/FlashClient/Show_Story_IPad.aspx?storySrc=http…
फेसबुकवरून
विज्ञानाच्या गळचेपीविरूध ९ ऑगस्टच्या नियोजित मोर्चात समाजविज्ञान,भाषाविज्ञान , संस्कृतिविज्ञान या प्रांतातील
शिक्षक, विद्यार्थी ,प्राध्यापक ,लेखक, विचारवंत व वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगणारे यांना देखील सामील करून घेतले जावे : डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे आवाहन
______________________________
विज्ञानाच्या गळचेपीविरूद्ध वैज्ञानिक वातावरण निर्मितीसाठी ९ ऑगस्टला मुंबईत दु. ३.३० वा. आझाद मैदानावरून वैज्ञानिकांच्या मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून देशातील ढासळती वैज्ञानिक विचारसरणी, अवैज्ञानिक गोष्टींचा प्रचार, ऑनर किलींग, विज्ञान संस्थांच्या निधीत कपात, धार्मिक असहिष्णुता, निधी उपलब्ध करून न देणे, या साऱ्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
या आंदोलनात वैज्ञानिक, संशोधक, शिक्षक, विद्यार्थी यांना एकत्र येण्याचे आवाहन ब्रेक थ्रू फाउंडेशनने केले आहे. शिक्षणात विज्ञाननिष्ठ संकल्पनांनाच स्थान द्यावे,विज्ञान तंत्रज्ञान संशोधनासाठी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तीन टक्के तरतूद व शिक्षणासाठी दहा टक्के तरतूद करावी अश्या मागण्याही आहेत. समाजविज्ञान, भाषाविज्ञान, संस्कृतीविज्ञान या देखील वैज्ञानिक विचार व कार्यपद्धत रूजवून मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या महत्वाच्या ज्ञानशाखा आहेत. भाषा, साहित्य, संस्कृतीविषयक संस्था व लेखक, कलावंत,प्राध्यापक, शिक्षक, समाजविज्ञान संस्था इ.नी देखील त्यांच्या देखील असलेल्या या मागण्यांसाठी त्यामुळे या मोर्चात सहभागी होणे गरजेचे आहे.
मोर्चा आयोजकांनी त्यासाठी त्यांचे आवाहन व्यापक करून त्यांनाही हे आवाहन करावे व तसे त्यांनी केल्यास त्यास व्यापक प्रतिसाद दिला जावा असे आवाहन महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले आहे.
वैज्ञानिक विचारसरणीच्या अभिव्यक्तीचे दहशतमुक्त स्वातंत्र्य, तसेच भाषेचे वैज्ञानिक ज्ञान व जाण उपलब्ध करून देणे, भाषा, साहित्य, संस्कृति याच्या रक्षण, जतन, संवर्धनासाठी तसेच संशोधनासाठी व अभिवृद्धीसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद दहा टक्के असणे, मराठी विद्यापीठ, अभिजात दर्जा या व अशा मागण्यांसाठी अशी सर्वांनी संयुक्त कृती करण्याची वेळ आलेली आहे हे ओळखून असे संयुक्त बळ उभारण्याचे मनावर घेतले जावे असे आवाहनही डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले आहे.
----
मुंबईतील मोर्चा दुपारी १६:०० वाजता ऑगस्ट क्रांती मैदान येथून निघेल व बाबुलनाथ मार्गे गिरगाव चौपाटीपर्यंत जाईल. पुण्यामधील मोर्चा संध्याकाळी १७:०० वाजता पुणे रेल्व स्थानकासमोरील गांधी पुतळ्यापासून निघणार आहे. याखेरीज वर्धा व इतर शहरांतही याच दिवशी मोर्चांच्या आयोजनाचे ठरत आहे. या मोर्चांमध्ये सहभागी होऊन विज्ञानाचा आवाज बुलंद करावा ही विनंती.
बाकी ठिक आहे, पण फक्त
बाकी ठिक आहे, पण फक्त वैज्ञानिक दृष्टीकोनच बाळगणाऱ्या लोकांनी ( मी ,मनोबा, ढेरेशास्त्री, आबा आणि अचरटबाबांसारखे ) जबरदस्तीने सो कॉल्ड सिक्युलर असलेच पाहिजे का?
वैज्ञानिक दृष्टीकोन आणि "धार्मिक सहिष्णुतेचा" संबंध काय? विज्ञानाच्या नावाखाली कोण दुसरा अजेंडा पुढे करतोय? अश्या नॉन-वैज्ञानिक गोष्टी घुसडुन "विज्ञानाचा आवाज बुलंद" कसा होणार?
कुठली समानता अन काय
हिंदूंमध्ये जातीव्यवस्था.
मुसलमानांत शियासुन्नी.
ख्रिश्चनांत क्याथलिक-प्रोटेस्टंट वगैरे.
शिखांत अम्रितधारी-सहजधारी वगैरे.
जैनांत श्वेतांबर-दिगंबर वगैरे.
बाकी सोडा अगदी झरथुष्ट्राला मानणाऱ्यांमध्येही इराणी आणि पारशी असे भेद आहेत.
सो कुठली समानता अन काय?
हजारबाराशे वर्षांपूर्वी
हजारबाराशे वर्षांपूर्वी भारतात आलेले ते पारशी. गेल्या शेदोनशे वर्षांपासून भारतात आलेले ते इराणी. दोन्ही ग्रुपांचे होमल्यांड एकच. त्यात इराण्यांचे होमल्यांड म्ह. इराणातील याझ्द नामक प्रोविन्स. हे दोन्ही लोक झरथ्रुष्टाला मानतात, अग्निपूजक आहेत वगैरे वगैरे. पण पंचांग, इतर काही बारीकसारीक रूढी इ. मध्ये फरक आहेत आणि परवापरवापर्यंत इंटरम्यारेजेस होत नव्हती असे वाचल्याचे आठवते.
"वास्तवाची प्रतिमा आणि प्रतिमेचे वास्तव"
रझा फाउंडेशन, महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि नादरूप (रोहिणी भाटे यांची कथक संस्था) यांच्यातर्फे पुण्यत दोन दिवसांचे व्याख्यान सत्र आयोजित करण्यात आले आहे. "वास्तवाची प्रतिमा आणि प्रतिमेचे वास्तव" हा सत्राचा विषय आहे. पं. सुरेश तळवलकर, कथक नृत्यांगना प्रेरणा श्रीमाली, कवी उदयन वाजपेयी, पं. सत्यशील देशपांडे आणि चित्रकार प्रभाकर कोलते यांची व्याख्यानं आहेत.
स्थळ : ज्योत्स्ना भोळे सभागृह
१८ आणि १९ आॅगस्ट
तपशीलवार कार्यक्रम इथे पाहता येईल.
इकडचे उदय तेच का? >> हो तेच
इकडचे उदय तेच का? >> हो तेच आहेत.
२) पुण्याच्या कट्ट्याची वेळ :
शुक्रवार ८ सप्टेंबर, संध्याकाळी ६ वाजता:
बार्बेक्यू नेशन, डेक्कन जिमखाना
--> हा 6 वाजता आहे. पण आम्ही गावकुसाबाहेरून येणार असल्याने 4/4.30 ला कॅफे गुडलक मधे भेटणार आहोत. इतर कोणाला शक्य असेल तर नक्की या.
माझं २७ चं नक्की झालय जायचं.
माझं २७ चं नक्की झालय जायचं. ( आताच तिकिट काढलं इंद्रायणी एक्स०) नऊ वाजता शिवाजीनगरला उतरेन. नकाशावर एंजिनिअंरिंग कॅालेजच्या मागे पाताळेश्वर दिसतोय जवळच. साडे नऊ होतील. मिपाकर अकरा वाजता येतील तोपर्यंत तिथे थांबेनच. त्यानंतरचा कार्यक्रम पुणेकरांच्या हातात. रविवारचे परतायचे आरक्षण कधीच मिळत नाही त्यामुळे ते काढलेच नाही.
फोन नं शनिवारी देतो भाऊ.
आज पुणे इंटरनॅशनल लिटररी
आज पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवल चालू होतोय यशदा मध्ये ... तीन दिवस .. कोणी जाणार आहे का ?
या लिंक मध्ये उद्याचा कार्यक्रम :
मी आणि मनोबा गेल्तो काल
मी आणि मनोबा गेल्तो काल नॉर्मल कपडे घालून.
==================================================
एका सेशनात पुरोगामी बायका आपल्या सिंगलहूडचं कौतुक सांगत होत्या. आपण सिंगल असल्यामुळं आपल्याला समाज कसा वेगळा वागवतो याच्या कागाळ्या तर इतक्या फालतू होत्या की पुढे जाऊन "मागच्या पिढित स्त्रीयांवर काय अन्याय झाले" चे मटेरियल काय असेल त्याचा अंदाज आला.
लग्न होणे हीच आयुष्याची
लग्न होणे हीच आयुष्याची इतिकर्तव्यता असे सांगणारी इतकी अफाट संख्येने प्रजा सभोवती आहे की त्यामुळे असा आरडाओरडा केला तर क्षम्यच नव्हे तर समर्थनीय आहे. लग्न झाले/केले नाही म्हणजे आपल्यात काहीतरी कमी आहे असे सांगणारे लोक मूर्ख आहेत. उद्या अशाच मानसिकतेचे लोक सिंगल लोकांनी मरून जावे असा फतवा काढायलाही मागेपुढे पाहणार नाहीत.
इति बॅटमॅण २:
इति बॅटमॅण २:
जेवण करणे हीच आयुष्याची इतिकर्तव्यता असे सांगणारी इतकी अफाट संख्येने प्रजा सभोवती आहे की त्यामुळे असा आरडाओरडा केला तर क्षम्यच नव्हे तर समर्थनीय आहे.
तर काय जेवणे, न जेवणे, इतरांना जेऊ न देणे, सगळं काही "नॉर्मल" आणि "सेम" आहे.
जेवणे करणे का चूक? तर ते करणे योग्य म्हणणारी मंडळी अफाट संख्येने!!! आणि बुद्धिमान लोक रेअर असतात हो.
त्रिनाट्यधारा -- वाडा चिरेबंदी
नाट्यदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी वीस वर्षापूर्वी मराठी रंगभूमीवर एक आगळावेगळा प्रयोग केला होता. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाटककार महेश एलकुंचवार यांची ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगांत’ ही तीन नाटकं त्रिनाट्यधारेच्या रूपात रंगभूमीवर आणली होती. सलग आठ तासांचा हा नाट्यानुभव प्रेक्षकांना नाट्यसमृद्ध करणारा होताच, पण एक दिग्दर्शक म्हणून कुलकर्णी यांनाही तेवढाच समृद्ध करणारा होता. हे अभिजात नाटक कुलकर्णी यांच्या आयुष्याचाच एक भाग झालं.
.
.
अजो, ह्या १९ तारखेला ही त्रिनाट्य धारा पुन्हा सादर होते आहे. मी जाणार आहे. कार्यक्रम दर्जेदार आहे असं ऐकून आहे.
कुणाला यायला आवडेल का ?
.
http://prahaar.in/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%…
ह्या लेखातला परिचयाचा भाग
‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगांत’ अशी तीन नाटकं. प्रत्येक नाटकाच्या दरम्यान दहा-बारा वर्षाचा कालावधी आहे. म्हणजे एकूण तीन नाटकांत मिळून पस्तीस वर्षाचा काळ, अशी ही वेगळ्याच प्रकारची त्रिनाट्यधारा होती. तिच्यात देशपांडे नावाच्या विदर्भातील एका खेडेगावातील कुटुंबाची कथा असली तरी ती कुठल्याही एका कुटुंबाची गोष्ट नाहीय. हे नाटक सगळं सिंबॉलिकल आहे. खेडं आणि शहर यातलं अंतर, एकत्र कुटुंब पद्धती, जुन्या परंपरा, रीतीरिवाज यांचं आपल्यावर असलेलं दडपण, अंतर्गत नातेसंबंधाचं बिघडत जाणं, आजूबाजूच्या परिसराचं बदलणं हे सगळं या नाटकात आलंय. प्रत्येक प्रसंगाला एक अर्थ आहे. आता बदलत्या काळात हे नाटक आजही तितकंच प्रभावी आहे. ‘वाडा चिरेबंदी’ची गणना उत्तम कलाकृती, अभिजात नाटक म्हणून गणना होते.आजवर अनेक भाषांत या नाटकाचा अनुवाद झाला आहे. बंगाली, हिंदीत दोन भाग झालेत आणि फ्रेंच भाषेत ते ट्रायोलॉजीच्या स्वरूपात सादर झालं. ते अभ्यासक्रमात आहे. अनेक जण या नाटकाच्या संदर्भाने एलकुंचवार यांच्यावर पीएच.डी. करत आहेत. इतकं ते महत्त्वाचं नाटक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते प्रत्येकासाठी आव्हान आहे. काही जणांच्या तोंडी यात वैदर्भीय बोली आहे, काही जणांच्या तोंडी प्रमाण भाषा आहे. कुठल्याही पद्धतीने ‘आता बघा कसं परिणामकारक करतो मी नाटक’, अशा आविर्भावात ते लिहिलेलं नाही. ते त्याच्या त्याच्या संथलयीत जातं आणि तुम्हाला वाडय़ामध्ये गुंतवून टाकतं. ते घटनाप्रधान नाटक नाही. त्यात घटना अजिबात घडत नाहीत. आपल्याकडे असं म्हणतात की, मरणाला आणि तोरणाला एकत्र यायला पाहिजे. अशी एकत्र कुटुंबाची, गावगाडय़ाची रीतच असते. त्यानुसार आपल्या वयस्कर वडिलांच्या निमित्ताने यातलं कुटुंब एकत्र आलंय. तसं बघितलं तर या पूर्ण नाटकाचा कालावधी केवळ आठ ते नऊ दिवसांचा आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर पाचव्या दिवशी मधला मुलगा मुंबईहून गावी येतो आणि चौदाव्या दिवशी तो निघून जातो, या दरम्यान ते नाटक घडतं. त्यात यातली अनेक पात्र प्रत्यक्ष रंगमंचावर येत नाहीत. ही पात्रं रंगमंचावर न येताही आपल्याला दिसायला लागतात. इतकं हे नाटक जिवंत लिहिलं आहे.
या नाटकातल्या प्रत्येक पात्राचं एक म्हणणं आहे. त्याचं एक व्यक्तिमत्त्व आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात काळ्या-पांढ-या व्यक्तिरेखा नाहीत. आपण जशी माणसं असतो, तशी ती माणसं आहेत.
'पिफ'विषयी
पिफ (पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) ११ ते १८ जानेवारीदरम्यान होणार आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. महोत्सवासाठी वयाची १८ वर्षं पूर्ण झालेली आवश्यक आहेत. विद्यार्थी, फिल्म क्लबचे सदस्य व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी रु. ६०० आणि इतरांसाठी रु. ८०० नोंदणीशुल्क आहे आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातल्या चित्रपटांची यादी काल जाहीर झाली :
- I am nobody (Bir Şey Değilim), Director - Muharrem Özabat, Country – Turkey
- REQUIEM FOR MRS. J (Rekvijem za gospodju J), Director - Bojan VULETIC, Country – Serbia
- FREE AND EASY, Director - JUN GENG, Country – China
- WOMEN OF THE WEEPING RIVER, Director - Sheron Dayoc, Country – Philippines & France
- EUTHANIZER ('Armomurhaaja'), Director - Teemu Nikki, Country – FINLAND
- Goliath, Director - Dominik Locher, Country – SWITZERLAND
- THE LONGING, Director - Joram LÜRSEN, Country – NETHERLAND
- ZAMA, Director - Lucrecia martel, Country – Argentina, Brazil, Spain, France, Netherlands, Portugal, Mexico, USA
- MORE (Daha), Director - Onur SAYLAK, Country – TURKEY
- The Nothing Factory, Director - Pedro Pinho, Country – PORTUGAL
- I'M A KILLER (Jestem Morderca), Director - Maciej PIEPRZYCA, Country – POLAND
- Djam, Director - TONY GATLIF, Country – TURKEY, GREECE, FRANCE
- The Quartette, Director - Miroslav Krobot, Country - Czech Republic
- NOCTURNAL TIMES (Pathirakalam), Director – PRIYANANDANAN TR , Country - INDIA
वेचक आणि वेधक
आज पेपरला वाचले की पिफ मधे "राज कपुर" चे सिनेमे विशेषत्वाने दाखवणार आहेत. म्हणजे पिफ ची पातळि नेहमीच इतकी खाली होती का ह्या वर्षी खाली गेलीय?
तुमच्या वर्तमानपत्राने जर तुम्हाला इंगमार बर्गमनच्या जन्मशताब्दीविषयी काहीच माहिती दिलेली नसेल, तर तो दोष महोत्सवाच्या संयोजकांचा नाही.
पातळी
बर्गमन आहे म्हणुन राजकपुर चे सिनेमा दाखवणे कसे काय जस्टिफाय होते बाई?
मी समर्थन केलेलं नाही. मी विरोधही केलेला नाही. जर राज कपूरमुळे पातळी नीच दर्जाची ठरत असेल, तर पातळी ठरवण्यासाठी कोणकोणते निकष लावलेत, असा सवाल आहे. बर्गमन हा एक (उदाहरणार्थ) निकष आहे.
वाचायचं कसं?
अनुतै, न लिहिलेल्या गोष्टी वाचायला शिकलात तर जंतूची मतं सहज समजतील. या धाग्यावर बर्गमनचा विषय काढणं असो किंवा नगरकरांच्या मुलाखतीच्या धाग्यावर अवधूत यांच्याशी केलेली चर्चा असो.
निर्णय न घेणं, हा ही एक प्रकारचा निर्णयच असतो. तसं मत व्यक्त न करणं ही सुद्धा अभिव्यक्तीच असते.
पिफ मधे "राज कपुर" चे सिनेमे
पिफ मधे "राज कपुर" चे सिनेमे विशेषत्वाने दाखवणार आहेत. म्हणजे पिफ ची पातळि नेहमीच इतकी खाली होती का ह्या वर्षी खाली गेलीय?
अनु, मी राजकपूर चा चाहता नाही. पण तुझ्या दृष्टीने वरच्या दर्जाचा हिंदी नायक, दिग्दर्शक कोण ? एक पेक्षा जास्त असतील तरी चालेल पण् नावं सांग.
( हा प्रश्न फक्त कुतूहल म्हणून विचारत आहे. थेट उत्तर अपेक्षित. )
एकुण दिड च हिरो भारतीय
एकुण दिड च हिरो भारतीय सिनेमांमधे. देवानंद एक पूर्ण आणि काका अर्धा. बाकीचे कसले बावळट विदुषक.
हिरवणी मात्र बऱ्याच चांगल्या होत्या आणि आहेत, सध्याच्या हिरवणी तर हॉलिवुड पेक्षा भारी आहेत.
दिग्दर्शक काही बरे होते, म्हणजे चांगले स्टोरी टेलर. गोल्डी, राज खोसला, शक्ती सामंता, मनोज कुमार
लोकांचे न चमकलेले पैलू
लोकांचे न चमकलेले पैलू इतरांना दाखवणे , समोर आणण्याचं काम मुलाखत कार करतो. मुलाखत घेतली जाणारी व्यक्ती स्वत:ला गिनिपिग समजू लागली तर दुर्दैव. दुसरं काय?
मागे एकदा हाफकिनमध्ये गेलो होतो ( दर गुरुवारी अडीच ते पाच लोकांना हाफकिन दाखवत असत.)स्वत: डीन ( त्यावेळी डॅा० गायतोंडे होते. ही माहिती नबांसाठी) माहिती देत सरओव डिपार्टमेंटसची. सापाचे विष काढून दाखवणे हा मुख्य कार्यक्रम असे. कुत्र्याच्या,सापाच्या लशीसाठी ठेवलेले घोडे तसेच इतर लहानमोठे प्रयोगांसाठी असणारे उंदीर,ससे आणि गिनिपिग. पिंजय्रातले तजेलदार प्राणी पाहून विचारले "हे एवढे सुंदर तरतरीत कसे?"
" आम्ही प्रत्येक प्राण्याचे वजन करतो, त्याप्रमाणे त्यांना एक दोनवेळा सुकामेवा,फळांचे तुकडे ठराविक वेळेस खायला देतो, अर्ध्या तासाने पाणी पाणी पाजतो. त्यांच्या पिंजय्रात सतत पाणी आणि खाणे ठेवले की सतत चरतात,घाण होते,केस लडबडतात तसे करत नाही."
"असे गिनिपिग प्रयोगासाठी लागतात."
द डिसपझेस्ड
मातिअ रॉय ह्या कनेडियन दिग्दर्शकाचा जगभरातल्या शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीविषयीचा 'द डिसपझेस्ड' हा चित्रपट उद्या (१ फेब्रुवारी) पुण्यात दाखवला जाणार आहे.
तपशील -
खेळ १ :
स्थळ : नामदेव सभागृह, पुणे विद्यापीठ
वेळ : दुपारी २ वा.
खेळ २ :
स्थळ : FTII Main Theatre
वेळ : सं. ६:३० वा.
दोन्ही खेळ विनामूल्य आहेत.
मराठी मुद्रितशोधन आणि संपादनकौशल्य कार्यशाळा
'एडिट मित्र'तर्फे
मराठी मुद्रितशोधन आणि संपादनकौशल्य कार्यशाळा
दिनांक २६ फेब्रुवारी ते ०३ मार्च २०१८ (सोमवार ते शनिवार)
वेळ : १०.३० ते ४.३०
शास्त्र + प्रात्यक्षिके + अभ्याससाहित्य
मार्गदर्शक : श्री अरुण फडके
@ डेक्कन जिमखाना हाउ. सो. सभागृह, कर्वे रोड, मधुकर भावे पथ, पुणे.
शुल्क : ₹ ४२००/-
नोंदणीसाठी संपर्क -
अस्मिता - ९८ २३ ४१ ७३ ९४
चिन्मया - ८६ ९८ ९१ ५१ ९०
विनोद दोशी नाट्य महोत्सव
आजपासून पुण्यात विनोद दोशी नाट्य महोत्सव सुरू होत आहे.
स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
वेळ : सं. ७:३० वा
आज सतीश आळेकर लिखित आणि दिग्दर्शित (नवीन संचात) 'महानिर्वाण' नाटकाने महोत्सवाचा आरंभ होईल. इतर नाटकांची यादी आणि तिकिटांविषयी माहिती महोत्सवाच्या फेसबुक पानावर आहे.
मुदलात खोट
साले हे थिएटर अकॅडेमी वाले , महानिर्वाण परत करू शकतात ,पण तीन पैशांचा तमाशा नाही करू शकत ना ?
'नाटक कंपनी'तर्फे पूर्ण नव्या (आणि बहुतांश अपरिचित) संचात बसवलेला प्रयोग होता. त्यामुळे टीएचा संबंध नाही. चंद्रकांत काळे, राजीव परांजपे आणि किमान दोन 'रमा' प्रेक्षकांत बसल्या होत्या.
पुन्हा असा प्रयोग होणार असेल
पुन्हा असा प्रयोग होणार असेल तर कळवणार का ?
गायक गायिका किती दमाचे होते ? ( रवींद्र साठे , अन्वर कुरेशी ,चंद्रकांत काळे ,तुमच्या माधुरी तै आणि आमचे भेंडे यांच्या दर्जाचे करणे अवघड आहे हो !!)
च्यायला ,पण अंकुश नागावकर म्हणून अमेय वाघ ला बघायला लागणार कि काय ?
आजच्या मटामधून माहिती
आजच्या मटामधून माहिती मिळाली. पुणेकरांची मज्जाय..!
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ९ जुलै ते १८ ऑगस्ट दरम्यान सलग ४२ दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रम विनामूल्य असून गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ते होतील.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गणेश मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांना ९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे. रोज सकाळी विविध याग होणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ५ वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच येथे प्रमोद गायकवाड व भीमण्णा जाधव यांच्या सनई -सुंद्री जुगलबंदीने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. देवकी पंडित, शौनक अभिषेकी, रवींद्र साठे, माधुरी करमरकर, महेश काळे, पं. नीलाद्री कुमार, सत्यजित तळवलकर, मधुरा दातार, ॠषिकेश रानडे, विभावरी आपटे, शिल्पा पुणतांबेकर, सावनी दातार, रूपकुमार राठोड, सुनील राठोड, पं. हरिप्रसाद चौरसिया, अभिजित पोहनकर, तौफिक कुरेशी, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, पं. विजय घाटे, श्रीधर फडके, पं. रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे, मंजूषा कुलकर्णी, नंदेश उमप, अनुराधा पौडवाल, एन. राजन व संगीता रागिणी, नंदिनी शंकर, पं. संजीव अभ्यंकर, पं. अमान अली व अयान अली बंगश, सावनी शेंडे, जयतीर्थ मेवुंडी, आशा खाडीलकर, राहुल देशपांडे, सुरेखा पुणेकर, राधा मंगेशकर, प्रशांत नासेरी, विभावरी आपटे, पं. शिवकुमार शर्मा, इक्बाल दरबार, श्रीरंग गोडबोले, आरती अंकलीकर-टिकेकर, साधना सरगम, पं. राशीद खान, पं. सुरेश तळवलकर, पं.हृदयनाथ मंगेशकर, बेला शेंडे, पं. राजन साजन मिश्रा, सुरेश वाडकर आदी दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम रोज सायंकाळी ७ वाजता होणार आहेत.
याच दरम्यान बाबामहाराज सातारकर, सुधांशूजी महाराज, दादा जे. पी. वासवानी, विजेंदरसिंगजी महाराज, प्रीती सुधाजी, डॉ. बाबासाहेब तराणेकर, डॉ. सुनील काळे, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, आचार्य गोविंदगिरी, भक्तिप्रिय स्वामीजी, गाणपत्य स्वानंदजी पुंड शास्त्री यांचे प्रवचन होणार आहे.