खआंफजा

नवे विरुद्ध जुने वादात मही काठावरुन घोटाभर पाण्यात उडी...
उन्यापुऱ्या चार म्हैन्यात आताशा ऐशी हय कैशी कळून ऱ्हायलय.
पिओपि ह्या संकल्पनेनी मव्ह चित्त हरलं न् तवा मी नुकतिच शिगरेट प्यायला चालू केलेलं पोरगं जसं दोन बोटायच्या कांड्यायच्या उच्चतम टोकावर शिगरेट पेलतं तसा व्हतो.
मंग चार-दोन मला मह्याच चांगल्या वाटणाऱ्या, हितल्या भाषेत मौक्तीकांची रतीब घाल्ली अन् जवा टोला बसला म्हूण सांगू जणू त्या पोऱ्याला पैल्या कश चा झटका बसून ते ढास लागल्यागत खोकत ऱ्हावं. त्या पोऱ्याचा खोकला कमी झाल्यागत मी बी जरा बुड टेकिलं. शिगरेट वरच्या कांड्याहून दुसऱ्या कांड्यावर आल्यागत. मंग मी हळूहळू जुनी ऐशी वाचायला घेतली, हितलं लिखाण मनात घर करु लागलं. शिगरेट ची चटक लागल्यागत त्यायची सवय लागत चाल्ली. कायप्पा न् चेपू दुर्लक्षीत झालं. मंग वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळ्या दिग्गजांचे अभ्यासपुर्ण लेख वाचून जणू त्या पोऱ्याला जागात अजून कितीतरी ब्रँडचे शिगरेटं हैत हे उमजायला लागतं तसं वाटून ऱ्हायलं. प्रतिवाद तं भौ अशे की बास. कै प्रतिवाद म्हंजे त्या पोऱ्यानं पैल्यांदाच सिगार ओढल्यावं भला थोरला धूर अन् ये क्या है सारखे, कै त्या पोऱ्याच्या डोल्यात धूर गेल्यावं बैचेन करुन टाकणारे. कै प्रतिसाद अंधारात एकच शिगरेट अन् त्या पोऱ्याच्या दोन दोस्तायपैकी यकाने ती बी उलटी पेटवल्यावं होणाऱ्या चिडचीडी सारखे वाटत्यात. कै त्या पोऱ्यानं शिगरेट संपुस्तो त्याची राख खाली नै पडण्याची शर्यत लावल्यागत.
लै जण हिथं अशे येउन जात्यात जणू त्या पोऱ्यानं तोंडाचा चंबू करुन काढलेलं धुराचं गोल हवेत इरगळून जातं.
ते शिर्षकांमधलं खफ अन् आंजा ह्ये लघुरुपं पैल्यांदा वाचले तवा काय है यह ह्याची उत्सुकता हेवडी ताणली गेली वरुन त्याचं पुर्णरुप मला नेटावं बी नै घावलं. हेवडा घुस्सा आला जणू त्या पोऱ्याला त्येज्या ब्रँडची शिगरेट नव्या ठिकाणी भणभण फिरुन बी मिळना. नवा असल्यामुळं. हितले जुने लोग मात्र सर्रास वापरायचे. ते चेपू, कायप्पा ह्याचं बी तसच.
लै घामाघुम झाल्यावं यकदाची ब्रँड घालवावी तसं यकदाचं ते बी घावलं न म्या जुन्यायच्या नावानं कडाकडा बोटं मोड्ली.
जुने अगर मेंथॉल लेते है तर नवे बी शिगरेट के फिल्टर मे आस्मानतारा लगाना जानते होंगे ना भै.
अजून लै हैत शिगरेटी अन् तुलना.
पैले मुझे धो लो बादमे आयेंगे...
(वैधानिक सुचना-शिगरेट स्मोकिंग वाज, इज अँड वेअर इंज्यूरस टू हेल्थ)

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाहवा!
आमीबी इत्त जाम टिक्कून हावो. काडीचा लेख नाइ पाडला इत्त्या वर्सांत पण मांडवात येका कोपय्रातली खुर्ची पकडून ठिवलीय. जा कुणी म्हणत नाय. चा घ्येतला का विचारलं कुणी तर योकदाच झाला म्हनतो.

आव्हडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसंही मला इग्नोरास्त्र झेलायची सवय होती/आहे. अनपेक्षित पणे तुमचा प्रतिसाद आला. लै बरं वाटलं. जणू त्या पोऱ्याला लै दिसानं शिगरेट ओढल्यानं किक बसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

मांडवातले पाहुणे आणि आपला आदरसत्कार विचारपूस हे नेहमी व्यस्त प्रमाणात असतं हे लक्षात ठेवलं तर कधीच डौन व्हायची पाळी येत नाही कुठेही. कौतुकाची टाळी वाजवण्यात कोताई मात्र करू नये हे फार उपयोगाचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रत्येक गोष्ट सिगरेटशी जोडण्याची ऐड्या आवल्डी हय.

आमचे शिग्रेट पिण्याचे दिवस आठवले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्ते सर...त्या पोऱ्याला त्याच्यासारखा शिगरेट वडून सोडनारा मित्र घावल्यागत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

अचरटबाबा, आलं बरका आलं आलं...शिगरेट वडनारा पोऱ्या जसा हुक्का वडनाऱ्यांच्या बैठकीत...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

गपगुमान ऱ्हातील बगा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिगरेटवालं पोऱ्या बिडी वडणाऱ्याकडं बघतो तसं का???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

उदय. ते बी बरच है

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं