Skip to main content

बायपोलर डिसॉर्डर - माहिती

https://cdn.psychologytoday.com/sites/default/files/blogs/89816/2012/06/98951-96374.jpg
.
बायपोलर डिसॉर्डरचे अजून एक नाव आहे ते म्हणजे मॅनिक-डिप्रेसिव्ह इलनेस. अवसाद किंवा ज्याला नैराश्य म्हणतात त्या आणि उन्माद या २ टोकांच्या मध्ये हेलकावे खाणारा मूड. या डिसॉर्डरची अगदी सर्वसामान्य लक्षणे व माहिती पाहू यात.
(१) बायपोलर डिसऑर्डर म्हणजे उन्मादाचे शिखर आणि अवसादाची खोल गर्ता यामध्ये हेलकावे खाणारा मूड हाच मुख्य आजार.
(२) अवसाद व उन्मादाच्या आलटून पालटून येणाऱ्या कालखंडांमध्ये काही काळ मूड सामान्य/नॉर्मलही राहातो.
(३) ही डिसऑर्डर टीनएज किंवा विशीच्या सुरवातीच्या काळात उचल खाते, लक्षात येते.
(४) हा आजार बारा होता नाही पण अतिशय कुशलतेने व परिणामकारक रीत्या मॅनेज करता येतो किंबहुना सर्वाधिक कमी क्लिष्ट आणि मॅनेज करण्यास सोपी अशी ही व्याधी आहे.
(५) अनेकदा बायपोलर असणाऱ्या रुग्ण स्त्रियांचे चुकीचे निदान "डिप्रेशन" असे होते तर रुग्ण पुरुषांमध्ये तसेच चुकीचे निदान "स्किझोफ्रेनिया" असे होते.
(६) अजून एक चुकीचा रूढ प्रकार म्हणजे बॉर्डरलाईन व्यक्तिमत्वांमना बायपोलर व्याधीचे रुग्ण मानले जाणे. अनेकजण बॉर्डरलाईन असू शकतात. याचा अर्थ ते बायपोलर रुग्ण आहेत असा नसतो.
(७) दुर्लक्षित किंवा निदान झालेली बायपोलर व्याधी ही घातक असते. यामध्ये अवसाद काळात रुग्ण आत्महत्या करू शकतो. उन्मादाच्या काळात स्वतः:ला आर्थिक, भावनिक, शारीरिक नुकसान पोचवू शकतो उदा. - जुगारात, खरेदीत पैसे उधळून टाकणे, लैंगिक वर्तनाबाबत अविचार, वैवाहिक आयुष्यात निष्ठेला, विश्वासाला तडा जाईल अशी वागणूक आदि घटना घडू शकतात.
(८) ही व्याधी वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार तज्ञानकडूनच निदान व मॅनेज केली जाऊ शकते.
(९) अवसादाची, नैराश्याची लक्षणे : चिडचिडेपणा, सतत रडू येणे, कारणाशिवाय रडू येणे, ऊर्जेची इतकी कमतरता जाणवणे की दैनंदिन व्यवहारात अडथळा येणे, वाईट स्वप्ने, स्वप्नात रडु येणे.
(१०) या उलट उन्मादाची लक्षणे म्हणजे - अतिशय ऊर्जा असणे, ३-४ तासांची झोपही पुरेशी होणे, चित्तवृत्ती उल्हसित असणे, हाय सेल्फाएसटीम, स्वतः:बद्दल ऊंच भ्रामक कल्पना असणे. बोलताना भराभरा बोलणे, एकामागोमाग एक झपाट्याने विचार व कल्पना सुचणे. व्यभिचार करण्यास, वैवाहिक विश्वासाला तडा जाऊन देण्यात, वाट्टेल तसा खर्च करण्यास मागेपुढे ना पाहणे. एकंदर रिस्की वागणे. अनेक प्रकल्प एकाच वेळी हाती घेणे, महत्त्वाकांक्षी व एकंदरच आऊटगोईंग वागणे.
(११) ही व्याधी जरी अनुवांशिक असली तरी ती एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित होईलच अशी खात्री देता येत नाही. अजून तरी अशी खात्रीशील लिंक मिळालेली नाही.
(१२) खूपदा व्यक्ती ही या व्याधीकरता प्रिडिस्पोज्ड असते, ससेप्टीबल असते आणि एखाद्या स्ट्रेस factor मुळे या व्याधीची सुरुवात होते.
(१३) या व्याधीचे वर्गीकरण ३ प्रकारात केलेले आहे. प्रत्येकामध्ये लंबकाचा अवसाद-उन्मादात हेलकावे खाण्याचा कालावधी व मुख्य वारंवारिता वेगवेगळी आहे.
(१४) या व्याधीची एक विचित्र विशेषता म्हणजे - assortative मॅटिंग अर्थात या व्यक्ती अन्य तशीच व्याधी असलेले मित्र-मैत्रिणींकडे आकृष्ट होतात.
(१५) एन्टायडिप्रेसंट, एंटायसायकॉटिक मेडस, मूड स्टॅबिलायझर्स असहा अनेक प्रकारच्या औषधांचे कॉकटेल रुग्णास घ्यावे लागते.
(१८) COMBINE MEDICATION AND TALK थेरपी हे दोन्ही एकत्र अतिशय परिणामकारक असतात.
(१९) Cognitive behavioral therapy (CBT), Psycho-education , Narrative therapy , Solution Focused थेरपी, Interpersonal and social rhythm therapy (IPSRT) , अशा नाना थेरपी आहेत. या सर्वच थेरपीनबद्दल मला माहीत नाही पैकी Psycho-education ही पद्धत माझ्याकरता अतिशय सूट झालेली आहे. म्हणजे या व्याधीबद्दल मिळेल तेवढे वाचून काढायचे व सेल्फ-अवेअरनेस वाढवत ठेवायचा.जवळजवळ १० वर्षे हे सातत्याने केल्याने मला स्वतः:च्या वर्तनातील किंचितही बदल लक्षात येतो - अरे आज कॉफी जास्त झाली म्हणून उन्मादक वाटतंय, आज झोप कमी झाली म्हणून उन्मादक वाटतंय, आज झोप जास्त झाली म्हणून निराश वाटतंय आदि स्वतः:चे स्वतः:लाच नीट कळू लागते.
(२०) Electroconvulsive therapy (ECT) म्हणजे Shock ट्रीटमेंट ही एक कुरूप पद्धत सुद्धा या व्याधीवरचा इलाज आहे व एके काळी होता पण आता ही पद्धत फार कमी प्रमाणात वापरली जाते. तिचे साईड इफेक्टसही कमी त्रासाचे झालेले आहेत. सहसा जरा औषधे अजिबातच लागू पडत नसतील तर अथवा औषधांचा गर्भावरती परिणाम होउ नये म्हणून तात्पुरता पर्याय म्हणून ही पद्धत वापरात आणली जाते.
(२१) जरा नीट मॅनेज झालेली नसेल तर प्रियजनांकरताही हे रुग्ण कसोटी असतात. अशावेळी घरातील लोकांनीही या व्याधीबद्दलचा स्वतः:चा अवेअरनेस वाढविणे महत्त्वाचे असते.
(२२) रुग्नाला मूड, झोप, व्यायाम, अन्न आदि माहितीची स्वतः:ची दैनंदिनी ठेवण्याने खूप फायदा होतो.
(२३) बायपोलर व्यक्ती जोडीदार असल्याचे फायदे व तोटे दोन्ही आहेत. तोटे अर्थात वरती आलेलेच आहेत पण एक प्रेमळ आणि captivating , creative जोडीदार मिळणे हा फायदाही असतो.
(२४) या व्याधीचा रुग्ण अवसाद व उन्माद या स्पेक्ट्रमवर कोठेही असू शकतो. यामध्ये विविधता आहे, प्रत्येकाच्या आजारात एकमेवता आहे.
(२५) अनेक गैरसमजांपैकी दोन बिनबुडाचे गैरसमज म्हणजे या व्यक्ती वेड्या असतात, किंवा नीट नोकरी करू शकत नाहीत हे. काही लोकांना नोकरी टिकविण्यास समस्याच येतही असतील पण ७५% व्यक्ती या जॉबमध्ये यशस्वी आढळतात.
(२६) अजून एक गैरसमज हा की - हा खरा आजाराचं नाही. तसे नव्हे. हा गंभीर आजाराचं आहे. यातून आत्महत्येपासून ते घातक परिणामांपर्यंत काहीही उद्भवू शकते.
(२७) अजून एक गैरसमज हा की या व्यक्ती गुन्हेगार, पिसाट असतात. प्रत्यक्षात तसे नसून उलट रुग्ण हे अशा गुन्ह्याच्या, क्रूरतेच्या व्हिक्टीम असण्याचीच संभावना जास्त असते.
(२८) बायपोलर व्याधी आणि लठ्ठपणा यांचा घनिष्ठ संबंध आहे. ६८% बायपोलर रुग्ण हे लठ्ठ असण्याची शक्यता असते.
(२९) March 12, 2002 या दिवशी अमेरिकन न्यायाधीश हेन्री केनेडी यांनी निकाल दिला की हा खराखुरा आजार आहे ज्याचे मेंदू स्कॅनिंग ने निदान होउ शकते, जो सिद्ध होऊ शकतो, मेंदूतील रासायनिक बदल जे मोजले जाऊ शकतात.
(३०) या रुगणांनी घ्यावयाच्या काही काळजाला म्हणजे - ड्रग्ज, मादक द्रव्ये यांपासून दुर राहणे, झोपेचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे, नियमित व्यायाम करणे, दैनंदिनी लिहिणे, स्वतः:च्या आजाराबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवणे.
(३१) 'जेलसि' हा अनेक सिम्पटम्स पैकी एक सिम्प्टम्.
(३२) व्हॅन गॉग चा जन्मदिन - ३० March हा जागतिक बायपोलर दिन मानला जातो.
__________________________

http://ecx.images-amazon.com/images/I/51nHlp6ayVL._SX331_BO1,204,203,200_.jpg
Ruth C. White यांचे "Preventing Bipolar Relapse" हे पुस्तक वाचून झालेले आहे. परत पारायण करणार आहे. बायपोलर बद्दल अनेक पुस्तके आहेत ज्यामध्ये "वैयक्तिक अनुभव" = OPersonal Account मांडलेले आहेत पण वरती उल्लेख केलेल्या पुस्तकात स्वतःच्या आजाराविषयी लेखिकेने अत्यंत मोघम उल्लेख केलेला आहे रोग्याच्या वागणूकीत काय बदल स्वागतार्ह आहे यावर कटाक्षाने भर दिलेला आहे. SNAP अ‍ॅप्रोच बद्दल वाचलेले होते. या पुस्तकातही तोच अ‍ॅप्रोच सांगीतलेला आहे.
SNAP = Sleep, Nutrition, Activity and People
Sleep - आजार बरा होण्याच्या प्रोसेस मधील अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. पुरेशी झोप झाली नाही तर अन्य लोकांना जितका मूड-स्विंग्सचा त्रास होतो त्यापेक्षा अनेक पटींनी बायपोलरच्या रुग्णास होतो. शिवाय बरे होण्याच्या आधी स्लीप डिसॉर्डर्स व बायपोलर हे हातात हात घालूनच नांदताना दिसतात. शरीरातील circadian सिस्टीम (घड्याळ), निद्रा कंट्रोल करते. ही सिस्टिम बायपोलरच्या रुग्णांमध्ये फॉल्टी असते. प्रकाश-अंधार यांच्या तालावरती हे घड्याळ चालते. तेव्हा वेळेवर (नो मॅटर व्हॉट) झोपणे व ऊठणेसुद्धा हे या रुग्णांकरता अत्यावश्यक असते.
Nutrition - सकस व योग्य आहार हा शरीराइतकाच मेंदूकरता आवश्यक आहे. भरपूर प्रतिकारशक्ती, अन्नातील सुयोग्य घटकांनीच वाढू शकते. तेव्हा Recommended आहार हा बायपोलरच्या रुग्णांकरता आवश्यक असतो.
Activity - ठरावीक वेळी व्यायाम हा प्रचंड महत्वाचा घटक म्हणता येइल. चालण्याच्या व्यायामात प्रत्येक टाकलेले पाऊल हे रुग्णास अधिक चांगल्या दर्जाचे आयुष्य देण्यास उपकारक ठरते.
People - रुग्णाला सपोर्ट देणार्‍या सकारात्मक लोकांची अतिशय गरज असते. शिवाय मूड्स्विंग्स चा जोवर अवेअरनेस रुग्णास येत नाही तोवर कोणीतरी मॉनिटर करुन दिशा देणारे असेल तर अत्युत्तमच.
रुग्णाने - झोप, आहार्,व्यायाम व तदनुषंगीक दुसर्‍या दिवशीचा मूड याचे जर्नल ठेवले तर खूप उपयोगाचे पडू शकते नव्हे ठेवलच पाहीजे.
अर्थात हे सर्व घटक पूरक झाले मुख्य लाइन ऑफ ट्रीटमेन्ट औषधोपचार ही असते. रुग्णास औषधांचे कॉकटेलच घ्यावे लागते - मूड स्टॅबिलायझर + स्लीप मेडिकेशन + अँटी-कन्व्हल्सन्ट्स + अँटी सायकॉटीक. अन या आजारातील सर्वात अवघड भाग असतो असे कॉकटेल सापडणे व लागू पडणे. तोपर्यंत ट्रायल-एरर ने रुग्ण जेरीस येतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा औषधे नियमित घेणे , कधीही बंद न करणे. कारण बरेचदा "मॅनिया/उन्माद" ही इतकी सुखावह अवस्था असते - Enthusiasm + high libido + energy + confidence अक्षरक्षः जगाच्या माथ्यावर पाय रोवून उभे राहील्यासारखे वाटते अन मग ही अवस्था हरवू नये या लोभाने काही रुग्ण औषधे बंद करतात. जे की घातक असते कारण Wherever there is high, there is low (= abysmal depression)
ही डिसॉर्डर बरी होत नाही पण अत्यंत कुशलतेने १००% मॅनेज केली जाऊ शकते.
________________
https://lh3.googleusercontent.com/jxl13G9gGYLeAY4_kgR8rL10bIKMXWbFgoPyh751sXYqjS345qhMIRbVErsxgnHcZNgy4x60Zpmn50LvNOg4UiCPhlw7q7260XNQrjxWJlx_Ho_ld1LGysfxm1OCzPOdl6lCTFkSfXQXEM73ZWYE-eX9lJ-XLA8rSxDC6yNUl_jORbnioI09i8An5VGCpOPIsiyTqCFMlo0xfmjXCytu2cnrL0ITFEfsMjZwiXw833JZ3M1M033nBWCnAR3KVPwo6cVEdiD6p_w_W9Qeqc_95hsmTh2x7aXBifo7wIKlZLd0tqscZ1mDFNMdkT-6IcB-iMk_SVHSouGthxXsnKKOkmVaASk_3kGdPFd9b0mqdLq0GIDomZE6_mLptsFdC9OqNMyUs-UBODv8l-ODRLhlxhBNLa_Vpz3FAD_0MJZOD120UYQl9059hobOPBz0s2dISH6ncZ606VRdAwE5o98Z7eKNtgzkemyk_q8S89y1qvqvSk9fZ2dBz3lP8B5-oSRDp-d_ExG8WJ26-jmEOlXpg1-ZPcIWFzjCNV6GrG737TD34KqreSpKDuFG9ugOpiSKuKCG6Uj17XxQL-I4_GbTTWbDCkD4u5v1_FSe5Lno4blECLono_x8zTUXFvaeG_z3Q9kHkPmKwpb1vPJnGM95RhYrseuqufl-uD2wcU3b8kMXf0Om5QADnMLwfv00ki8BrgD1TJudSw890Ne9SJgnVJDo0hwTh8Bx7xCMfBlUibsSz7wg=w912-h510-no
.
आपल्या हर्ष/आनंद आदी भावनांना कारणीभूत अशी ४ रसायने आहेत : एंडोर्फिन्स , डोपेमाईन ,ओक्सिटोसिन आणि सेरोटोनिन.प्रत्येकाचे ठरलेले कार्यक्षेत्र आहे.

एंडोर्फिन्स मुळे वेदना जाणवत नाहीत. जरा तुमच्यावरती एखाद्या प्राणघातक पशूने हल्ला केला तारा एंडोर्फिन्स तयार होतात ज्यायोगे जोवर तुम्ही सुरक्षित स्थळी पोचत नाहीत, तोवर तुम्हाला वेदना जाणवत नाहीत. उदा - मला संधिवात आहे, मी २२ व्या मजल्यावर राहाते. आग लागते. आणि मी धावत धावत २२ माजले उतरते, अशावेळी मला गुडघ्यात वेदना जाणवत नाहीत याचे कारण असते रिलीझ झालेले एंडोर्फिन्स. मग कोणी म्हणेल कि एंडोर्फिन्स सतत रिलीझ होता राहिले तर उत्तमच कि तर तसे नाही. कारण त्यामुळे काय होईल, तुम्हाला कधी वेदनाच जाणवणार नाहीत. वेदनांमुळे आपण धोक्यांपासून बचावात्मक उपाय शोधतो. आपले अस्तित्वात टिकवण्यामध्ये (survival ) वेदनांचा सहभाग असतो. एंडोर्फिन्स हे आत्यंतिक सुखद भावना अथवा भीतीही निर्माण करण्यास कारणीभूत असतात. जणू काही आपल्या मानवी गरजा लक्षात घेऊन, धोके टाळण्याकरता नियुक्त केलेला देखरेख्या म्हणजे एंडोर्फिन्स. तेव्हा एंडोर्फिन्स हे सतत निर्माण होता नाहीत हे उत्तमच आहे.

आता डोपेमाईन पाहू यात. डोपेमाईन केव्हा रिलीझ होतात तर तुम्हाला एखादे बक्षीस, काहीतरी आवडणारे मिळण्याच्या तुम्ही अगदी जवळ येऊन पोहोचला आहात. तुम्ही समजा रसाळ फळ तोडण्याच्या मिषाने, एखाद्या झाडावरती चढता आहात तर हे जे शेवटच्या २-४ फांद्या तुम्ही सहजगतेने ओलांडून जाता ते डोपेमाईनच्या जोरावर. जर तुमचे डोपेमाईन सदासर्व काळ निर्माण होतच राहिले असते तर तुम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये मग ती किती का किरकोळ असेना, तुम्ही आपली ऊर्जा तीमध्ये ओतत राहिला असता आणि महत्वाच्या गोष्टींकरता तुमची ऊर्जा वाचलीच नसती. तेव्हा डोपेमाईन सतत निर्माण होत नाही हे बरेच आहे. डोपेमाईन हे मुख्यतः एकाग्रता, फोकस यावरती काम करते म्हणजे आपल्याला काही साध्य करायचे आहे त्याकरता जी एकाग्रता लागते त्याचे कारकत्व आहे डोपेमाईन कडे. गाजराचे आमिष म्हणजे डोपेमाईन चे कर्तृत्व. सतत गाजर दिसत राहिले तर बैल/घोडा कसे पळत राहातील तसे हे रसायन आपली ऊर्जा एकाग्र करते. कोणतीही गोष्ट प्राप्त होणे या पेक्षा त्या गोष्टीच्या प्राप्तीचा ध्यास, तळमळ, ऍंटीसिपॅशन म्हणजे डोपेमाईनचे कारकत्व.
.
https://lh3.googleusercontent.com/SIqBRAiOjPIniY4H6igPll1VBFBLFVS8PQNH0dhgiL7VW19mnixL1lc--sUTEYPHtWGiNuXMFXoMmrNdr2ZFUJ3NkJzn3Tp1qncTh_XR3G_0BoTlNdbbZcLcXNYa_Xax-SCImjQOktiFeOoNR4hsMjsbIHMf4m2TcxV7Wd61o2VWikBWI1uJ-c_W4EqwOQjxN1lbvInFfEuawrZ9LbHScOJVHSf7CIkfOsoQG1lpE7Mms0hrHJKSegKrjiZ2-aG6M4s1o1GxQ4wtyoRDlhWeZAbOS8DQQEdBDjRQpUgRJqbY7ApXEOtChgc_P4OaVV817WX8IY9DWySnVzXCKWUWnAIX-KhK9yo2-8NCjP7twwySvVTY2hh5n0EZmQP0-yslmlRBYYd1lzk_j7EU7auT4ZrqaDk7Yvo9QdaSrhQVeCYogc7k_sUurRuxASFBBdHNbesd_VwIpIWw-M73dwW6tga-ZgLYTjfR0v1gx1PnS-ZwfwPlG3vmk4ZGcMcxd_S12VJJiAVpeDqunk2za6leKWKRr8PyrK4oveXlKV8VEbghn1Kk_Gvqab2QC7igsrbWHL7j6kUMD7iXkSa4qOmK3VOFKkYyHIIoTwi7tsqpPJ2_f8fKWzs5O4yiMw0TC7HS_XXqb9pCSl7VfneilPsJYToE36Vzf8GZIOO1gKZ7mU3Qbve9cuXdyYEIKxbdPNVg54LL47p4y70KfCIiLzvcqQuceEHMBAC5M7fWO6063qROPwBE=w450-h248-no
.
ऑक्सिटोसिन हे विश्वास निर्माण करणारे रसायन आहे. ते जरा सातत्याने निर्माण होता राहिले असते तर तुम्ही वाट्टेल त्या परक्या लोकांवर, वाईट झाला वृत्तीच्या लोकांवरही विश्वास टाकला असतात. मसाज, ऑर्गेझम, प्रसूती या काही ऑक्सिटोसिन, निर्माण करणाऱ्या क्रिया आहेत. जेव्हा गाय वासराला चाटते, किंवा आई मुलास जवळ हृदयाशी धरते, तेव्हा ऑक्सिटोसिन निर्माण होते. मानव आई जेव्हा मुलं अन्य कोणाकडे सोपवते किंवा प्राण्यांतही जेव्हा पिल्लू कळपात सोडले जाते तेव्हा जे सामाजिक बंध निर्माण होतात, त्यातही ऑक्सिटोसिन निर्मिती होत असते. वर सांगितल्याप्रमाणे, ऑक्सिटोसिन सतत निर्माण होणे हे survival च्या दृष्ट्या अनुकूल नाहीच.

सेरोटोनिन हे रसायन जेव्हा तुम्ही अधिकार गाजवता तेव्हा रिलीझ होते. मेंदूपेक्षा, माणसांच्या पोटात सेरोटोनिन अधिक असते, कारण आपले पूर्वज हे तेव्हा शांतपणे खाऊ शकायचे, पोटभर खाऊ शकायचे जेव्हा त्यांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल हमी असायची, विश्वास असायचा. ही हमी केव्हा वाटते जेव्हा तुम्ही अधिक बलवान असता, जसे बलवान पूर्वज अन्न चोरण्यास येणाऱ्या अन्य प्राण्यांना पळवून लावत . सतत जरा सेरोटोनिन रिलीझ होता राहिलं तर तुम्ही सर्वांकरता एक डोकेदुखी होऊन बसाल.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

-प्रणव- Fri, 17/03/2017 - 07:57

डिसऑर्डर आणि आजार/रोग (इलनेस) यात काय फरक असतो ? मागे एकदा tv वर ऐकलं होतं की ऑटिझम हि अवस्था (condition) आहे , आजार नाही? म्हणजे मग कंडिशन , डिसऑर्डर आणि इलनेस अशा ३ कॅटेगेरी होतात काय?

सामो Fri, 17/03/2017 - 10:30

In reply to by -प्रणव-

मला वाटते आजार हा बरा होणारा असतो तर व्याधी ही तुमच्याबरोबरच सरणावर जाते - संधीवात. मधुमेह या व्याधी.
"कंडीशन" म्हणजे बहुतेक नैसर्गिकच अवस्था फक्त नॉर्मल/सरासरी थ्रेशोल्डच्या बाहेरची. म्हणजे ऑटिस्टिक मुले काहीतरी रंग/गंध/स्पर्श आदि गोष्टीबद्दल अन्य मुलांहून अधिक संवेदनशील असतात. म्हणजे उद्या जरा तशी लोकं , मुले वाढली तर तिला नैसर्गिक मानता येऊ शकेल.

सामो Fri, 17/03/2017 - 10:46

Aditi, is Facebook Plugin working? I shared the article but that did not reflect on my Home Page.
Sorry but if & only when you have time, can you look into it? Thanks,
.
If it takes too much time/energy then forget it. Not a big deal.

१४टॅन Fri, 17/03/2017 - 10:50

खूपच माहिती मिळाली ह्या आजाराची. असे बरेच आजार क्रिमिनल माईंड्स नावाच्या अतिलांब मालिकेत पहायला मिळाले होते.
ह्या अशा सगळ्या आजारां/विकारांची लक्षणं ऐकली, की मला तरी ते सगळेच झालेले आहेत ह्याची खात्री पटते;
किंवा, आपल्या आजूबा़जूच्या कोणाला हा आजार झालाय, हे शोध घ्यायचा मला छंद जडतो.

१४टॅन Fri, 17/03/2017 - 11:06

In reply to by सामो

The subject of serial is suggestive from it's title. The FBI's Behavioral Analysis Unit is shown to solve crimes just by estimating psychological profiles of suspects.e. g. Bipolar, Sadist, Arsonist etc. are discussed at lengths in various episodes. The serial is way too long (read as: boring) to watch, and lacks a major plot.

सामो Fri, 17/03/2017 - 11:14

In reply to by नितिन थत्ते

औषधांची धरसोड न केल्यास काही वर्षातच इतका सेल्फ अवेअरनेस येतो की चटकन कळतं हां watch आऊट आज मॅनिक वाटतंय. किंवा आज low वाटतंय.
पूर्वी जो रुग्ण बाहेर एक्सटेर्नल stimulie वरती ठपका ठेवायचा तो काही वर्षातच हे ठामपणे सांगू शकतो की त्याच्या मूडस स्विन्गचे चे मूळ त्याच्या मेंदूत आहे, व्याधीत आहे.
.
धरसोड ना केल्यास हे महत्वाचे कारण हायपो मॅनिक स्टेट इतकी मस्त असते थत्ते. उत्साह + कामेच्छा + आत्मविश्वास+ सकारात्मकता ओसंडून वहाते. उधाण आलेले असते. पण डॉक्टर हेच सांगतात की ही स्टेट तात्पुरती आहे तेव्हा औषधं सोडायची नाहीत. औषधांशिवाय पर्याय नाही. या व्याधीचा हा एक pitfall आहे की मस्त वाटू लागल्यावर रुग्णास वाटू लागतं "त्यात काय, आपण तर एकदम ठणठणीत आहोत. जगाला ठोकर मारण्याची जिगर आहे आपल्यात. स्काय is the लिमिट."

सामो Fri, 17/03/2017 - 11:24

In reply to by नितिन थत्ते

रुग्णास सेल्फ अवेअरनेस येईपर्यंत "Terrible " च. Infidelity , spendthriftness , रेकलेसनेस यहे बेहेविअरल हझार्डस इतके कॉमन आहेत. कारण मॅनिआ हा रोगाचा प्रकार आहे हेच व्यक्तीच्या गावी नसते. अरे आपुन तो ऐसाईच है भौ. आपली तर बातच निराळी. मग त्या निराळेपणाची अशी नशा चढते की त्यात कौटुंबिक स्वास्थ्य, विवाहांमधील विश्वासार्हता खरं तर सॅक्रेड ट्रस्ट वाहून जाते, पैशाची उधळपट्टी होते. जोडीदार अफाट ताकदीचा लागतो. अ-फा-ट!!
त्यातही स्त्रीला जर ही व्याधी असेल तर बरं पडतं कारण नवरा व्हेटो वापरू शकतो की तू डॉक्टरकडे चलच. नाहीतर आपले लग्न तुटले असे समाज.
पण पुरुषाला कसं डॉक्टरकडे यायला तयार करायचं? त्यात स्वतः:च्या क्षमतेबद्दलच्या भ्रामक कल्पना तर उतू जात असतात मग मला गरजच काय डॉक्टरांची? तुझाच डोकं फिरलोय तू च दुर्मुखलेली आहेस असे पुरुष बिनदिक्कत सांगू शकतात.

माचीवरला बुधा Fri, 17/03/2017 - 23:12

बायपोलर चे दोन मुख्य प्रकार असतात - टाईप १ आणि टाईप २. अवसाद/खिन्नता दोन्ही प्रकारात असतात, पण उन्मादाच्या प्रमाणात फरक असतो. पैकी पहिल्यात उन्माद पराकोटीचा (full-blown mania) असतो आणि दुसऱ्यात उन्मादाची पातळी बेताची (hypomania) असते. टाईप १ मधे उन्मादावस्थेत वास्तवतेशी संबंध तुटतो (psychosis) आणि रुग्णाचा स्वतःवरचा ताबा सुटू शकतो. या परिस्थितीत रुग्णास स्वतःच्या इच्छेविरुद्ध मनोरुग्णालयात दाखल करावे लागते (committing to a hospital). हा एक गंभीर आजार आहे. त्यामुळे “सर्वाधिक कमी क्लिष्ट आणि मॅनेज करण्यास सोपी अशी ही व्याधी आहे” हे वाक्य मात्र धक्कादायक वाटले…

सामो Fri, 17/03/2017 - 23:23

In reply to by माचीवरला बुधा

Despite being a life long illness, bipolar disorder is very manageable. In fact, it is one of the “best” mental illnesses to have in that there are many effective bipolar treatments available.

संदर्भ - http://www.bipolar-lives.com/bipolar-disorder-facts.html

कदाछित हे वाक्य छोओकेएछे असेल‌. किंबवा असेलच. लक्शात आणोन दिल्याबद्दल धन्यवाद्.

ppkya Sat, 18/03/2017 - 06:40

छान माहिती आहे..ह्या विषयावर(एकूणच मानसिक आजार) समाजात खुपच गैरसमज आहेत. मी गेली काही वर्षे ह्या क्षेत्रात काम करत आहे. पुण्यात Schizophrenia Awareness Association नावाची एक संस्था आहे, तेथे मी volunteer म्हणून, आमच्या भागात(पिंपरी चिंचवड�) स्वमदत गट चालवतो. मी माझ्या ब्लॉगवर देखील ह्यावर बरेच लिहिले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 18/03/2017 - 20:11

In reply to by सामो

चिपलकट्टींशी सहमत आहे. लिहिण्याची क्षमता बाळगणाऱ्या आणि मानसिक विकारांचा सामना करणाऱ्यांनी, मग ते प्रत्यक्ष विकारांचे बळी असोत वा त्यांचे जवळचे नातेवाईक, आत्मकथनपर लेखन करावं.

सामो Sun, 19/03/2017 - 23:59

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वेगळा धागा काढू इच्छित नाही. हायलाईट करू इच्छित नाही. माझया आयुष्यावरती चर्चा घडावी हा उद्देश नसून या व्याधीची माहिती पोचविणे हा उद्देश आहे तेव्हा...
.
.
बी एस सी ला फर्ग्युसन कॉलेज मध्ये होते तेव्हा घरात काही कारणांनी अतिशय स्ट्रेसफुल वातावरण असे. मला तर ते भयानकच वाटे. याला कारण चवथ्या घरातील प्लूटो नसून त्या काळात उद्भवलेली व्याधी होती हे कळायला तब्बल १० वर्षे जावी लागली. टीनएज मध्ये आणि विशीच्या सुरुवातीस बायपोलार व्याधी उचल खाते असे नंतर वाचनात आले. त्या काळात मी सतत तणावाखाली वावरत असे. रात्री बेरात्री दचकून जागी होता असे. मला सतत आपण काहीतरी गिळणार आहोत मग ते काहीही असो असे वाटतं असे. भयंकर प्रकार म्हणजे अगदी ट्रान्सिस्टर, घरसुद्धा आपण गिळू अशी भयंकर भीती वाटे. रात्री झोपेत दचकून उठून बाबांकडे धावत जाऊन "मला भीती वाटते." असे सांगत असे. ते सर्वच विचित्र व भयंकर होते - आणि त्याचे कारण वास्तूत काही दोष आहे, घर पछाडलेले आहे असे घरातील लोकांना वाटे. आम्ही घर बदलले आणि मी आय आय टी मध्ये गेले. होस्टेलवर एक उत्तम झाले की मला स्ट्रेसफुल वातावरणापासून मुक्ती मिळाली. त्या काळात मला खूप उत्साह होता "मला जग पहायचय, मला नवेनवे अनुभव घ्यायचे आहेत." किती तरी स्वप्ने होती. अभ्यास कमालीचा हेक्टिक होता. अवघड होताच पण तो प्रहचंड अवघड मला वाटे कारण ही अंडायग्नॉस्ड व्याधी. मला सकाळी झोप येई, दुपारी झोप येई आणि संध्याकाळ होता आली की झोप छू मंतर होत असे. पुढे २० वर्षांनी मला समजले ते हे की circadian rhythm जी की निद्रेचे घड्याळ नियंत्रित करते ती बायपोलार रुग्णात दोषास्पद असते, फॉल्टी असते. मला क्वचित डोळ्यांसमोर अंधेरी येत असे. माझे विशेष कोणाशी पटत नसे. पण ज्यांच्याशी पटे त्यांच्यासाठी जीव द्यायला मी तयार असे. कदाचित वृश्चिकेचे स्टॅलियम हे कारण नसून ते फक्त या सिम्प्टमकडे अंगुलीनिर्देश करत असावे. मूळ कारण व्याधी हेच आहे. मला गणिताचा म्हणजे मुख्य विषयाचा अभ्यास अतिशय अत्यंत अवघड वाटे. त्या विषयाचा धसका अजूनही आहे. त्या काळात माझी एंगेजमेंट झाली.
पुढे नोकरी लागली. सासरी मला जी मन:शांती मिळाली व अजूनही मिळते ती निव्वळ अमेझिंग आहे. मी नवरा, सासूबाई यांची ऋणी आहे की मला एक शांत घर मिळाले. माझ्या जीवाला शांती लाभू देणारी माणसे मला मिळाली.त्यांचे १००० गुन्हे मी माफ करू शकते. पण ते तसे माफ करण्याची गरजच नाही कारण गुन्हे अस्तित्वातच नाहीत. नवरा भयंकर कडक शिस्तीचा आहे तेवढेच एक. मी अद्याप rebel करणे सोडले नाही. असो हे अवांतर झाले.
पुढे मुलगी ३ वर्षांची असते वेळी मला अमेरिकेत नोकरी मिळाली व मी येथे आले. पण बराच काळ नवर्याला नोकरी नव्हती कारण तो होता खलाशि आणि अमेरेएकेत फक्त सिटिझन्स जहाजावर जाउ शकतात्. जरी तो स्कॉलरशिपवर आणि स्टायपेंड वरती शिक्षण पूर्ण करत होता तरी हा काळ फार अवघड होता. परत एकदा घरात स्ट्रेस निर्माण झालेला होता आणि परत एकदा मला तो सहन झाला नाही व आजाराने फारच जोराने उचल खाल्ली. कारणाशिवाय जेलसी, संशय हे देखील या रोगाचे लक्षण आहे आणि ते त्या काळात दृगोचर झालेले होते. मी खूप भांडत असे. मी खरंच फार भांडत असे. शेवटी एकदा नवरा म्हणाला "तू डॉक्टरांकडे आली नाहीस तर हे लग्न तुटले असे समाज." मला खरंच वाटत नसे की मला वैद्यकीय मदतीची गरज आहे. आणि हा माझा भ्रम अगदी रोग डायग्नोस झाल्यानंतरही अनेक महिने कायम होता. की आपल्याला अशी विचित्र व्याधी असूच शकत नाही हाच माझा दांडगा पण बेसलेस विश्वास होता. अमेरिकेत डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळायला फार काळ लागतो जो की आमच्याकडे नव्हता. मी खरंच सिरीयसली व्हायलंट होता असे. म्हणजे मी कोणाला हानि पोचवेन अशी सुदैवाने नव्हते पण भांड्यांची आदळआपट करत असे. आधी सांगितल्याप्रमाणे सासर खरंच शांत व समजूतदार आहे. त्यामुळे नवर्याला ही आदळआपट भयानक वाटे. शेवटी एक डॉक्टरीणबाई मला पाहायला तयार झाल्या. त्या दिवशी मी तयार झाले आणि मला आत्मविश्वास होता की त्या म्हणणार आहेत की तुम्ही मॅरेज काऊन्सिलिंगला जा कारण मला हिच्यात काहीही दोष दिसत नाही. पण नवर्याने त्यांना माझ्या वागणुकीची कल्पना दिलेली होतीच आणि त्यां माझ्यापाशी १० मिनिटे बोलल्या व त्यांनी ताबडतोब अचूक निदान केले - बायपोलार २. मला हा शॉक होता. कारण माझी १०१ % खात्री होती की आपण निरोगी आहोत शारीरिक व मानसिक दृष्ट्याही. आपला गार्डियन एंजल समोर आला तर आपल्याला कळेल ना, इन्ट्युशन होईल ना की त्याचे व आपले अदृश्य ऋणानुबंध आहेत? नाही तसे होत नाही. डॉक्टरिणबाई या माझया आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहेत अगदी नवर्याइतकी आणि तरी त्यांना पाहिल्यानंतर मला काहीही intuition झाले नाही.
नंतर मात्र लगेच औषधे सुरु झाली. प्रत्येक औषध लागू पडे असे नव्हते, लागू पडलेल्या औषधांचाही साईड इफेक्त्त विचित्र होते. मग ते दिवसा अतोनात झोप येणे ते श्वास कोंडणे, चिडचिड होणे ते वेळ अत्यंत मंद चाललेला आहे असा भास होणे, अत्यंत वाईट आठवणी डोके वर काढणे इतक्या की ती घटना घडते आहे असे वाटणे इथपर्यंत त्रास होई. मुलगी फार लहान होती. एकदा बार्न्स & नॉबल्स मध्ये आम्ही दोघी होतो आणि एक वाईट आठवण मला इतकी vividly आठवत होती की मला सहन होत नव्हते , ती घटना घडत आहे असे वाटत होते आणि मी कोणाला कळू नये म्हणून पायात मान खुपसून बसले.... मुलगी खेळत होती आणि मी खरंच वेडाच्या दारीपाशी एका फांदीला पकडून लटकलेले होते. मला वाटत होते "नाही हे सहन होत नाही. मी आता किंचाळू लागेन. इथे लहान मुलांच्या सेक्शनमध्ये माझया लहानग्या मुलीसमोर मी किंचाळू लागेन." तो दिवस टळला खरा . डॉक्टरीणबाईंनी मला काउन्सिलिंग अपरिहार्य केलेले होते. मला ते का हे काळात होते. काऊन्सिलरला जराही शंका आली असती की मी इतर कोणाहीसाठी घातक आहे तर मुलीची कस्टडी नवर्याला दिली गेली असती व माझी रवानगी हॉस्पिटलात. मला हा धोका काळात होता किंबहुना तो माझ्या मनात amplify झाला होता की जरा मुलीला फॉस्टर care मध्ये टाकले तर काय? नवर्याला भारतात पाठवून दिले पण मला इथेच अडकवून ठेवले तर काय? कारण एकदा मी भारतात परतण्याचा मानस बोलून दाखवला तेव्हा डॉक्टरीणबाई म्हणालेल्या की त्या अशा स्थितीत मला जाऊ कुठेही देऊच शकत नाही. मी अंथरुणावर पडून आढ्याकडे डोळे लावून पडून राहात असे, आणि माझया लहान मुलीच्या नशिबी हे सर्व पाहणे होते.
नवर्याने जी सेवा केली तिला तोड नाही. He is a power House. माझा दुसरा गार्डियन एंजल माझा नवरा आहे. औषधांच्या ट्रायल एरर मध्ये त्याने कमालीची साथ दिली. मला फार भयंकर स्वप्न पडत ज्यात माझ्यावर करणी होते आहे पासून ते मला कोणीतरी चापट मारून ऊठवते आहे अशा भासापर्यंत सर्व काही आले. रात्री फार फार भयानक होत्या. दिवसा मी ऑफिसमध्ये कसाबसा facade मेंटेन करे पण अगदीच अति झाले की ऑफिसातच एकाकी बाकावर जाऊन बसून येत असे. ऑफशोअरचे रात्रीबेरात्रीचे कॉल्स माझी शक्ती, आरोग्य अधिकच ढासळवत होते. औषधांमुळे अक्षरक्षा: असे वाटे की काहीतरी आपल्याला खाली खेचून धरतेय. आपला मूड एलेव्हेटच होत नाहीये. आपलयाला काहीतरी खाली ओढताय. मी तो जॉब सोडून दिला. माझ्याने करवेना. माझ्याझयाने खरोखर होईना. आता होइल ते होवो. आता महिन्यात जर दुसरा जॉब मिळाला नाही तर भारतात परतावे लागणार होते, पैसे हातात नाहीत, जॉब नाही, डॉक्टर तर भारतात जाऊ देत नाहीत आता भविष्य काय? मुख्य म्हणजे माझी मुलगी माझयापासून तुटेल का ही भीती. असे भयंकर दिवस होते. मधल्या काळात औषधे सापडू लागली. काहींचा उतार पडू लागला.मी वैद्यनाथ अष्टक म्हणत असे, कुलदेवतेची प्रार्थना करत असे. "औषधे चिंतायेत‌ विष्णु" वाले विष्णु षोडशानाम स्तोत्र म्हणत असे. त्यात उलटसुलट सल्ला देणारे मूर्ख नातेवाईक होतेच - तू औषधे घेऊ नकोस अतिशय वाईट परिणाम होतात हा एक चक्रम‌ सल्ला. माझा आत्मविश्वास अत्यंत लो होता,पण नोकरीत ते दिसून कसे चालणार? खरंच वाईट दिवस होते. एकच चांगले होते मला नवरा व डॉक्टरीणबाईंची साथ होती.
काही काळाने औषधांचे कॉकटेल मिळाले. त्याचे फाईन ट्युनिंग झाले. आणि ते कॉकटेल अजूनही थोड्याफार फरकाने मला लागू पडत आहे, मला शक्य तितके sane ठेवत आहे. शक्य तितके कारण अजूनही आजाराचे चढउतार होतात. मी वाहवत जाते, डिप्रेस होते, कधी हायपॉमेनिआ च्या स्थितीतून जाते. पण टचवूड, तेव्हासारखी वेडाच्या उम्बारठ्यापर्यंत गेलेले नाही. मूड स्टॅबिलाझर्स मुळे मूड फ्लॅट होऊन गेलेले आहेत. आई गेली तेव्हाही रडता आले नाही, घसा फक्त दुखत राहिला. आनंद फार होत नाही. आयुष्य अगदी सपक पण नॉर्मल आहे. नो news is अ गुड news . काहीही स्पाईक्स नाही. किंबहुना जेव्हा काही स्पाईक्स येतात तेव्हा मागोमाग डिप्रेशनही येते. या व्याधिबद्दल खुप वाचते. कॉफि, झोप्, व्यायाम रुटिन साम्भाळायचा प्रयत्न करते. सेल्फवेअर्नेस आलेला आहे.
मुलीला हेच आणि हेच सांगते - कशालाही घाबरायचे नाही. प्रत्येक संकटावरती उपाय आहे. सर सलामत तो पगडी पचास. आपण भक्कम राहायचे. आयुष्य सरळ नसणारच आहे हे गृहीत धार पण आयुष्याला भिऊ नकोस. सदासर्वदा राम संनिध आहे, कृपाळूपणे अल्प धारिष्ट्य पाहे.

घाटावरचे भट Mon, 20/03/2017 - 10:18

In reply to by अनुप ढेरे

खरंय. इतकं सगळं सहन करणं कठिण काम आहे. मामींना सलाम!

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 20/03/2017 - 02:59

In reply to by सामो

शुचि, तुझ्याकडून क्वचित कधी या गोष्टी ऐकल्याही आहेत. पण हे सगळं वाचताना पुन्हा अंगावर आलं. ताकदीची आहेस.

चिमणराव Mon, 20/03/2017 - 18:39

In reply to by सामो

गुंतागुंतीचे आणि तुमची परीक्षा पाहणारे वाटतय. एक सल्ला दिल्याशिवाय राहवत नाही. ज्योतिष फार अभ्यासू नका. पुढेपुढे खरे होणारे ज्योतिषच त्रास देऊ लागते. तुमच्या गाइडवर सोडा निर्णय घेण्याचे काम. त्यामुळे मानसिक शांतता राहाते.काय जो विचार करायचा असतो तो गाइडने केलेला असतो. आपण फक्त दिलेला निर्णय अमलात आणायचं काम करायचं॥ ते सोपं असतं. स्तोत्रवगैरे हे एक काळ घालवण्यासाठी उत्म साधन आहे. दुसरे एक प्राणी पाळणे. त्यातून नको असलेले विचार येत नाहीत. तिसरं म्हणजे न येणाय्रा गोष्टी शिकणे.छंद म्हणून.
ज्योतिष एक विनोदाचं साधन म्हणून ठीक आहे. फार खोलात जाण्याने नसती फलितं अगोदर कळून त्रास होतो.
विचित्र सल्ला वाटेल.

सामो Tue, 21/03/2017 - 05:11

In reply to by चिमणराव

नाहि अचरटजि ज्योतिष्ह हा माझा विरंगुळा आहे. मि फक्त स्वभाव बघते, बाकेए प्रेडिक्टिव्ह अॅस्ट्रॉलॉजित‌ मला रस नाहि.

रावसाहेब म्हणत्यात Tue, 21/03/2017 - 05:53

In reply to by सामो

मला ह्या पोस्टमधल्या बऱ्याचश्या गोष्टी पटलेल्या नाहीत. पहिली न पटलेली गोष्ट - वेगळा धागा का नाही? हे लिहिलेलं ५ स्टार धाग्याचं लायकीचं आहे.

मी इथे तुम्हालाच सगळ्यात जास्त ओळखतो. तुमच्या एकूण ऐसी वावरावरून तुम्ही एक खुशालचेंडू, कुणावर न रागावण्याऱ्या व्यक्ती वाटता. त्यामुळे हे वाचून पटत नाही कि हे तुमचंच वर्णन आहे. पण मला हे न पटणं म्हणजे तुमच्या धैर्याचं चीज आहे असंच म्हणता येईल नाही का. so you need to take a bow.

अजून एक पटत नाही कि तुम्हाला आनंद होत नाही. इतकं छान आनंदी तर लिहिता. जर ह्याला आनंद न होणं म्हणायचं असेल तर कशाला म्हणायचं?

ब्रिज ह्या पत्त्यांच्या गेम बद्दल एक वाक्य आहे - "Life is like a game of bridge. The cards are dealt out to us, whether they be good or bad, but we can play the game well or play it badly. A skillful player may have a poor hand and yet win the game".

आयुष्याचा हा गेम जिंकल्याबद्दल तुमचे अभिनंदन.

सामो Tue, 21/03/2017 - 05:58

In reply to by रावसाहेब म्हणत्यात

अजून एक पटत नाही कि तुम्हाला आनंद होत नाही. इतकं छान आनंदी तर लिहिता. जर ह्याला आनंद न होणं म्हणायचं असेल तर कशाला म्हणायचं?

हाहाहा चोक्कस ...... अगदि बरोबर आहे टिल्कुजि ;) ते चुकिचे लिहिले गेले.
मि आनंदिच्च व्यक्ति आहे :) १००% आनंदि
______
वेगळा धागा का नाहि तर धागा केव्हा काढतात जेव्हा त्या कंटेंट्वरति चर्चा व्हावि असे वाटते.
मला रोगाच्या रोगाच्या लक्षणांवर, उपायांवर चर्चा व्हावी असेच वाटते. पण माझ्या जिवनावर (च्यायला त्या गमभच्या, जिवनावर लिहिले तर जेवणावर होतय्) होउ नये असे वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 21/03/2017 - 08:36

In reply to by सामो

तुझ्या स्वतःच्या गोष्टीत जंत्रीचा कोरडेपणा नाही. वरवर ठीकठाक दिसणाऱ्या व्यक्तीला किती सहन करावं लागतं हे दिसतंय. हा विकार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांना मानवी चेहरा मिळतो.

धनंजयनं 'कोणार्कच्या मंदिरातील शिल्पे' लिहिलं; आणि आपल्यापैकी अनेकांच्या विचारविश्वात समलैंगिकतेला चेहरा मिळाला. पुस्तकाबाहेर माहीत नसलेल्या जगाबद्दल आपुलकी वाढली. तेच इथेही.

सामो Tue, 21/03/2017 - 11:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

खरे आहे तुझे एक चेहरा मिळाला. माझिहि जालिय वर्तणुक अगदि impeccable आहे अशातला भाग नाहि किंबहुना जरि बायपोलर हि व्याधि माझि आय्डेन्टिटि नसलि तरि व्याधि डोके हि वर काढत रहातेच्च्.
मला बसमध्ये एक बायपोलरच व्याधि असलेलि स्त्रि भेटलि होति, केवळ १० मिनिटाच्या कालावधित ति माझ्याशिजन्मोजन्मिचि ओळख असल्यासारखि वागु लागलि, आम्हि फोन नंबर्स एक्सचेज केले. ति मैत्रिणिना भेटायला उपहारगृहात चाललि होति. तिने मला इन्वाईट केले व पैसे तिच देइल् सो नॉट टु वरि असे साङितले. नंतरहि तिने २ दा फोन केला.

Wait a minute! Did I see a mirror. This is/was me many times सुतावरुन स्वर्ग गाठणारि, २ गप्पांत चंद्रावर पोचणारि. इतकि प्रेमळ्, दिलदार्, उदार , मोकळि कि त्याला सिमाच नाहि. पण थांबा हि आहे व्याधि, अं हं हा स्वभाव नाहि. हे आहे IMPAIRED JUDGEMENT.

Bipolar disorder also affects your energy level, judgment, memory, concentration, appetite, sleep patterns, sex drive, and self-esteem

..

So many times my judgement has gone for a toss & so many times I have taken risks, यादि करते तेव्हा सेल्फ एस्टिम एकदम ढासळते. पण तु १००% नॉर्मल नाहिस, नसणारेस्, हे चढ उतार् होत रहाणारेत्. आणि म्हणुन तुझे मग pitfalls हि दुर्दैवाने असामान्य असणार्, तुझे ecstatic क्शण जसे इतरांपेक्शा ऊंच असणार तसा अध्:पात म्हणा गुन्हेहि असामान्य असणार्. आणि हे मि अभिमानानेहि सांगत नाहि पण मला त्याचि लाजहि नाहि.
नवऱ्याला मात्र जे सहन करावे लागले ते ...... :(
तरि जेव्हा सर्वजण स‍-र्व म्हणत होते कि "तिला वेड्यांच्या इस्पितळात टाक तेव्हा तो भक्कमपणे प्रवाहाविरुद्ध जाउन माझ्यासाठि माझ्या पाठिशि उभा राहिला. He had a vision that She will one day come out of this hell. She needs helping hand NOW!! & It's my moral duty to provide that.
सप्तपदिंतिल "for better, for worse" चे जे मराठि व्हर्शन असते,ते त्याने धिराने तडिस नेले.
खरच चेहरा मिळाला. ..... हे तुझे म्हणणे Bull's Eye आहे.

सामो Fri, 11/01/2019 - 21:25

In reply to by शिवोऽहम्

धन्यवाद. भूतकाळाकडे पहाणं सोपं तर असतच पण आपल्यासारख्या अन्य कोणाला धीर देणं फार महत्वचं आहे. लपवून छपवुन फयदा काय? अन घाबरायचं कोणाला? तेव्हा लिहून टाकलं.

सामो Sat, 18/03/2017 - 20:18

In reply to by चिमणराव

वेडाचे झटके म्हणजे मला वाटतं हिस्टेरिया. हिस्टेरियाचि एक मि ऐकलेलि खुबि (जि कि खरि नसेलहि) हि कि त्या झटक्याकरता रुग्णास ऑडियन्स लागतो. अजुन एक बायपोल‌र व्याधितिल लोकांना उन्माद व अवसाद हे दिवस दिवस चालतात.

चिमणराव Sat, 18/03/2017 - 21:45

आमच्या एका नातेवाइकाला उन्माद झालेला ( भावाशी भांडण झाल्यावर) त्याच्याबरोबर दोन नातेवाइकांना डॅा अडकवून ठेवतात. एक दिवस मी होतो. कारण लोकं पेशंटला तिकडे ठेवून गायब होतात.

रावसाहेब म्हणत्यात Mon, 20/03/2017 - 00:06

सगळंच नाही वाचलं कारण फार टेक्निकल आहे. पण मेडिकल इशुस मध्ये तुम्हाला एकूण रस दिसतो. बरीच माहिती एकत्र केलीय.

चिमणराव Mon, 27/03/2017 - 18:55

मानसिक रोगांना निरनिराळी नावे दिलेली आहेत त्यांच्या लक्षण / ग्रेडवरून. माहित नसलेले माझ्यासारखे लोक त्या सर्वांस एकातच टाकतात. त्यात काही अधुनमधून डोके वर काढणारे अन काही सुप्त होणारे एवढंच कळलं.

सामो Wed, 09/01/2019 - 00:13

कविता वाचल्याने अपेक्षित 'स्लो डाउन' होते, कवितेला समजायला, ती उतरायला अवधी द्यावा लागतो. आणि वाचनानंतरही खूप काळ ती मनात तर रेंगाळत रहातेच पण कदाचित अमूर्त असाही परिणाम होतो.
हायपोमॅनिया च्या काळात कविता वाचनाने प्रचंड बरे वाटते, स्लो डाउन होते, एक माईंडफुलनेस येतो असे लक्षात आलेले आहे.

सामो Tue, 15/01/2019 - 22:50

In reply to by anant_yaatree

The rose communicates instantly with the woman by sight, collapsing its
boundaries, and the woman widens her boundaries.
Her "rate of perception" slows down, because of its complexity.
There's a feeling of touching and being touched, the shadings of color she can sense
from touch.
There's an affinity between awareness and blossom.

https://www.poetryfoundation.org/poems/58186/hello-the-roses

shantadurga Thu, 10/01/2019 - 18:05

परिचितांत ही व्याधी असणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांची आणि त्यांच्या जवळच्या लोकांची काळजी वाटते. परंतु तुमचा लेख आश्वासक वाटला.

सामो Thu, 10/01/2019 - 19:57

In reply to by shantadurga

जोवर रुग्ण पथ्य/औषधे सांभाळतो तोवर काळजी करण्याची गरज नाही किंबहुना हायपोमॅनियाच्या औषधांमुळे, रेसिंग थॉटस तर जातातच पण मन बरेचदा निर्विचार होते, अक्षरक्ष: सामान्य लोकांपेक्षा अधिक शांती लाभते. पण औषधांचे कॉकटेल वेळच्या वेळी घ्यायलाच हवे.

परंतु तुमचा लेख आश्वासक वाटला.

:) धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 15/01/2019 - 23:00

जगावेगळं असणाऱ्या लोकांना कधीमधी 'आपण एकटेच नाही', अशा दिलासा, धीराची गरज असते. त्यामुळे अशा विषयांवर आणखी जास्त लिहिलं जाण्याची गरज आहे. शुचे, लिहीत राहा गो.

सामो Wed, 16/01/2019 - 00:21

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नक्की.
____________________
डोंगराएवढां अध्यात्म वाचून एका कळलं/आकललं, ते म्हणजे, साचलेपण हाच शाप, साचलेपण हेच पाप. वहातं राहणं फार गरजेचं तर आहेच पण तोच निसर्गाचा नियम आहे. मग ना प्रेमातच, ना पैशातच ना एखाद्या आठवणीतच कुठेही गुंतून न राहणं हीच प्रकृती तर stagnancy , नको असलेल्या आठवणींच्या चिखलात रुतून बसणं काय अथवा आसक्ती , जीवापाड अभिलाषा, कामना काय हे पापचा आहे, लोढणं आहे. कळायला वेळ लागला पण नीट कळले आहे असे आत्ता तरी वाटते.

पण हे कळून उपयोग नसतो. एकवेळ आसक्ती , इच्छा आणि अभिलाषा सोडता येतात पण काचणाऱ्या आठवणींचे काय? अशा वेळी नामस्मरण/स्तोत्रे यांचा खूप फायदा होतो. अगदी तितकाच फायदा, कवितावाचनाचाही होतो. तेव्हा नामस्मरण आणि स्तोत्रात काही फार जादुई, नसून कदाचित slowing down , हेच महत्वाचे. कविता कॉम्प्लेक्स असते, तिला अनेक पदर असतात. दर वेळी वाचू तसा नवनवा पदर उलगडत जातो. कॉलेजमध्ये एखादे प्रमेय सोडवताना जो आनंद मिळे, जी एकाग्रता साधे ती एकाग्रता कविता वाचताना साधली जाते. प्रत्येकाच्या मेडिटेशन च्या, प्रार्थनेचा, स्वानंद भोगण्याच्या पद्धती निराळ्या असतीलही. हजार पद्धती माहीत सल्याने डोक्यात फक्त कचरा गर्दी होते त्या पेक्षा एकच पद्धत नीट आत्मसात झालेली असेल तरी तिचा खूप फायदा होतो.

अध्यात्मात मनाला माकडाची उपमा दिलेली आहे, कधी या विचारावर तर कधी त्या. चंचल-अस्थिर. सामान्य माणसाचे मन तसे असेलही, पण आमच्यासारख्या रोगट विचारांच्या व्यक्तींना गोमाशीची उपमा द्यावीशी वाटते. नको असलेल्या, painful आठवणींच्या शेणात, घाणीत पंख लडबडून तिथेच वळवळणारी गोमाशी. औषधांशिवाय मन तिथून बाहेर निघूच न शकणारं. अशी व्याधी असलेल्या आणखी कोणीतरी व्यनीत एक साईट सुचवली होती - patientslikeme त्या साईटवरही अनेक लक्षणे दिलेली होती त्यात एक लक्षण होते वाईट आठवणीची वारंवारीता.

सामो Fri, 13/09/2019 - 20:11

https://lh3.googleusercontent.com/jxl13G9gGYLeAY4_kgR8rL10bIKMXWbFgoPyh751sXYqjS345qhMIRbVErsxgnHcZNgy4x60Zpmn50LvNOg4UiCPhlw7q7260XNQrjxWJlx_Ho_ld1LGysfxm1OCzPOdl6lCTFkSfXQXEM73ZWYE-eX9lJ-XLA8rSxDC6yNUl_jORbnioI09i8An5VGCpOPIsiyTqCFMlo0xfmjXCytu2cnrL0ITFEfsMjZwiXw833JZ3M1M033nBWCnAR3KVPwo6cVEdiD6p_w_W9Qeqc_95hsmTh2x7aXBifo7wIKlZLd0tqscZ1mDFNMdkT-6IcB-iMk_SVHSouGthxXsnKKOkmVaASk_3kGdPFd9b0mqdLq0GIDomZE6_mLptsFdC9OqNMyUs-UBODv8l-ODRLhlxhBNLa_Vpz3FAD_0MJZOD120UYQl9059hobOPBz0s2dISH6ncZ606VRdAwE5o98Z7eKNtgzkemyk_q8S89y1qvqvSk9fZ2dBz3lP8B5-oSRDp-d_ExG8WJ26-jmEOlXpg1-ZPcIWFzjCNV6GrG737TD34KqreSpKDuFG9ugOpiSKuKCG6Uj17XxQL-I4_GbTTWbDCkD4u5v1_FSe5Lno4blECLono_x8zTUXFvaeG_z3Q9kHkPmKwpb1vPJnGM95RhYrseuqufl-uD2wcU3b8kMXf0Om5QADnMLwfv00ki8BrgD1TJudSw890Ne9SJgnVJDo0hwTh8Bx7xCMfBlUibsSz7wg=w912-h510-no
.
आपल्या हर्ष/आनंद आदी भावनांना कारणीभूत अशी ४ रसायने आहेत : एंडोर्फिन्स , डोपेमाईन ,ओक्सिटोसिन आणि सेरोटोनिन.प्रत्येकाचे ठरलेले कार्यक्षेत्र आहे.

एंडोर्फिन्स मुळे वेदना जाणवत नाहीत. जरा तुमच्यावरती एखाद्या प्राणघातक पशूने हल्ला केला तारा एंडोर्फिन्स तयार होतात ज्यायोगे जोवर तुम्ही सुरक्षित स्थळी पोचत नाहीत, तोवर तुम्हाला वेदना जाणवत नाहीत. उदा - मला संधिवात आहे, मी २२ व्या मजल्यावर राहाते. आग लागते. आणि मी धावत धावत २२ माजले उतरते, अशावेळी मला गुडघ्यात वेदना जाणवत नाहीत याचे कारण असते रिलीझ झालेले एंडोर्फिन्स. मग कोणी म्हणेल कि एंडोर्फिन्स सतत रिलीझ होता राहिले तर उत्तमच कि तर तसे नाही. कारण त्यामुळे काय होईल, तुम्हाला कधी वेदनाच जाणवणार नाहीत. वेदनांमुळे आपण धोक्यांपासून बचावात्मक उपाय शोधतो. आपले अस्तित्वात टिकवण्यामध्ये (survival ) वेदनांचा सहभाग असतो. एंडोर्फिन्स हे आत्यंतिक सुखद भावना अथवा भीतीही निर्माण करण्यास कारणीभूत असतात. जणू काही आपल्या मानवी गरजा लक्षात घेऊन, धोके टाळण्याकरता नियुक्त केलेला देखरेख्या म्हणजे एंडोर्फिन्स. तेव्हा एंडोर्फिन्स हे सतत निर्माण होता नाहीत हे उत्तमच आहे.

आता डोपेमाईन पाहू यात. डोपेमाईन केव्हा रिलीझ होतात तर तुम्हाला एखादे बक्षीस, काहीतरी आवडणारे मिळण्याच्या तुम्ही अगदी जवळ येऊन पोहोचला आहात. तुम्ही समजा रसाळ फळ तोडण्याच्या मिषाने, एखाद्या झाडावरती चढता आहात तर हे जे शेवटच्या २-४ फांद्या तुम्ही सहजगतेने ओलांडून जाता ते डोपेमाईनच्या जोरावर. जर तुमचे डोपेमाईन सदासर्व काळ निर्माण होतच राहिले असते तर तुम्ही प्रत्येक गोष्टींमध्ये मग ती किती का किरकोळ असेना, तुम्ही आपली ऊर्जा तीमध्ये ओतत राहिला असता आणि महत्वाच्या गोष्टींकरता तुमची ऊर्जा वाचलीच नसती. तेव्हा डोपेमाईन सतत निर्माण होत नाही हे बरेच आहे. डोपेमाईन हे मुख्यतः एकाग्रता, फोकस यावरती काम करते म्हणजे आपल्याला काही साध्य करायचे आहे त्याकरता जी एकाग्रता लागते त्याचे कारकत्व आहे डोपेमाईन कडे. गाजराचे आमिष म्हणजे डोपेमाईन चे कर्तृत्व. सतत गाजर दिसत राहिले तर बैल/घोडा कसे पळत राहातील तसे हे रसायन आपली ऊर्जा एकाग्र करते. कोणतीही गोष्ट प्राप्त होणे या पेक्षा त्या गोष्टीच्या प्राप्तीचा ध्यास, तळमळ, ऍंटीसिपॅशन म्हणजे डोपेमाईनचे कारकत्व.
.
https://lh3.googleusercontent.com/SIqBRAiOjPIniY4H6igPll1VBFBLFVS8PQNH0dhgiL7VW19mnixL1lc--sUTEYPHtWGiNuXMFXoMmrNdr2ZFUJ3NkJzn3Tp1qncTh_XR3G_0BoTlNdbbZcLcXNYa_Xax-SCImjQOktiFeOoNR4hsMjsbIHMf4m2TcxV7Wd61o2VWikBWI1uJ-c_W4EqwOQjxN1lbvInFfEuawrZ9LbHScOJVHSf7CIkfOsoQG1lpE7Mms0hrHJKSegKrjiZ2-aG6M4s1o1GxQ4wtyoRDlhWeZAbOS8DQQEdBDjRQpUgRJqbY7ApXEOtChgc_P4OaVV817WX8IY9DWySnVzXCKWUWnAIX-KhK9yo2-8NCjP7twwySvVTY2hh5n0EZmQP0-yslmlRBYYd1lzk_j7EU7auT4ZrqaDk7Yvo9QdaSrhQVeCYogc7k_sUurRuxASFBBdHNbesd_VwIpIWw-M73dwW6tga-ZgLYTjfR0v1gx1PnS-ZwfwPlG3vmk4ZGcMcxd_S12VJJiAVpeDqunk2za6leKWKRr8PyrK4oveXlKV8VEbghn1Kk_Gvqab2QC7igsrbWHL7j6kUMD7iXkSa4qOmK3VOFKkYyHIIoTwi7tsqpPJ2_f8fKWzs5O4yiMw0TC7HS_XXqb9pCSl7VfneilPsJYToE36Vzf8GZIOO1gKZ7mU3Qbve9cuXdyYEIKxbdPNVg54LL47p4y70KfCIiLzvcqQuceEHMBAC5M7fWO6063qROPwBE=w450-h248-no
.
ऑक्सिटोसिन हे विश्वास निर्माण करणारे रसायन आहे. ते जरा सातत्याने निर्माण होता राहिले असते तर तुम्ही वाट्टेल त्या परक्या लोकांवर, वाईट झाला वृत्तीच्या लोकांवरही विश्वास टाकला असतात. मसाज, ऑर्गेझम, प्रसूती या काही ऑक्सिटोसिन, निर्माण करणाऱ्या क्रिया आहेत. जेव्हा गाय वासराला चाटते, किंवा आई मुलास जवळ हृदयाशी धरते, तेव्हा ऑक्सिटोसिन निर्माण होते. मानव आई जेव्हा मुलं अन्य कोणाकडे सोपवते किंवा प्राण्यांतही जेव्हा पिल्लू कळपात सोडले जाते तेव्हा जे सामाजिक बंध निर्माण होतात, त्यातही ऑक्सिटोसिन निर्मिती होत असते. वर सांगितल्याप्रमाणे, ऑक्सिटोसिन सतत निर्माण होणे हे survival च्या दृष्ट्या अनुकूल नाहीच.

सेरोटोनिन हे रसायन जेव्हा तुम्ही अधिकार गाजवता तेव्हा रिलीझ होते. मेंदूपेक्षा, माणसांच्या पोटात सेरोटोनिन अधिक असते, कारण आपले पूर्वज हे तेव्हा शांतपणे खाऊ शकायचे, पोटभर खाऊ शकायचे जेव्हा त्यांना त्यांच्या सुरक्षिततेबद्दल हमी असायची, विश्वास असायचा. ही हमी केव्हा वाटते जेव्हा तुम्ही अधिक बलवान असता, जसे बलवान पूर्वज अन्न चोरण्यास येणाऱ्या अन्य प्राण्यांना पळवून लावत . सतत जरा सेरोटोनिन रिलीझ होता राहिलं तर तुम्ही सर्वांकरता एक डोकेदुखी होऊन बसाल.

सुधीर Sun, 15/09/2019 - 23:44

नेहमीप्रमाणे शुचिंच्या दांडग्या वाचनसवयीमुळे वाचकांस समृद्ध करणारा धागा. डोपेमाईनचा संदर्भ सर्वप्रथम निकोलस तलिबच्या ब्लॅकस्वान मध्ये आला होता. (अर्थात डोपेमाईनवर अधिकारवाणीने बोलणे हा तलिबचा प्रांत नाही) पण त्याच्या मते (आणि मला जे समजलं ते असं), डोपामाईनच्या अधिकतेमुळे व्यक्ती स्वतंत्र घटनांमध्ये कार्यकारण भाव (एखादी लिंक) शोधून काढतात (नरेटीव्ह फॉलसी/कॉझालिटी थिअरी - दोन स्वतंत्र्य घटनांमध्ये इमॅजिनरी लिंक शोधणे, जेणेकरून त्या लक्षात ठेवायला सोप्या जातील). डोपेमाईनचा जास्त डोस झाला तर माणसं कमी शंका उपस्थित करतात (कमी स्केप्टीक असतात) . शेअर मार्केट/कॅसिनोमध्ये हाय रिस्क घेण्याची शक्यता बळावते. दुसरा संदर्भ हेलन फिशरच्या ह्या टेड टॉक मध्ये आला होता.

सामो Mon, 18/11/2019 - 20:15

In reply to by छिद्रान्वेषी

हम्म्म!!! एकदा औषधांचे कॉकटेल सेट झाले व स्वभान आले की मग खरच सोपी आहे असा स्वानुभव.
अर्थात अन्य पेशंटसचे , त्यांच्या नातेवाईकांचे, अनुभव वेगळे असू शकतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 18/11/2019 - 21:36

In reply to by सामो

औषधं आणि एकूणच वैद्यकीय सुविधा-व्यवस्थेच्या आधारानं तू तुझ्या आजाराचा बाऊ न करता धीरानं तोंड द्यायला शिकली आहेस. सगळ्यांना त्या सुविधा मिळतीलच आणि मिळाल्या तरी जमेलच असं नाही.

सीताफळसिंग हत्ती Tue, 19/11/2019 - 09:15

बायपोलार डिसॉर्डर म्हणजेच स्प्लीट पर्सनॅलिटी का? मला कितीतरी वेळा स्प्लीट पर्सनॅलिटी आहे असे वाटते आणि कधीकधी नाही असेही वाटते. माझ्या आवडीचे विषय निघाले-- ट्रेडिंगसारखे की मी त्यावर कितीही वेळ चर्चा करू शकतो. पण इतर वेळा खरडफळ्यावर मी कसा कोणाकोणाला पायदळी तुडवितो ते सांगतो किंवा वेगवेगळी अक्षरे घेऊन अनुप्रास करत राहतो. हे स्प्लीट पर्सनॅलिटीचे लक्षण आहे ना?

घनु Tue, 19/11/2019 - 10:36

अमेझॉन प्राईमवर "मॉडर्न लव" नावाची सिरीज पाहिली, त्यात "ॲन हाथवे" चा एपिसोड पाहून तूमच्या या लेखाची फार आठवण आली. पाहिला नसल्यास जरुर पहा. ॲन हाथवेचा अभिनय लाजाब आहे.

सामो Tue, 19/11/2019 - 19:25

पहाते घनु.
_________________
हत्ती स्प्लिट पर्सनॅलिटी हा वेगळा आजार आहे. बायपोलर डिसॉर्डर म्हणजे उन्माद व अवसाद यांच्यामध्ये रॅपिड हेलकावे खाणे. म्हणजे अगदी खरच लंबकाप्रमाणेच हेलकावे असतात.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 20/11/2019 - 08:23

In reply to by चिमणराव

कृपया, अशा गंभीर विकारांबद्दल अवैज्ञानिक गोष्टी, अंधश्रद्धा पसरवू नका. विकार, रोगांवर काय इलाज करायचे, कशामुळे आराम पडतो, लक्षणं कशी मॅनेज करावीत वगैरे गोष्टी सांगण्यासाठी डॉक्टर, समुपदेकश वगैरे रीतसर शिक्षण घेतलेले लोक असतात. एरवी अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे ठीक आहे; पण लोकांच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो अशा गोष्टींना अभिव्यक्तीस्वातंत्र्याचं संरक्षण मिळू नये.

अतिशहाणा Thu, 28/11/2019 - 20:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नक्की काय लिहिलं होतं की त्यामुळे लोकांच्या आरोग्याला अपाय होऊ शकतो?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 28/11/2019 - 22:15

In reply to by अतिशहाणा

माहिती हवीच असेल तर बायपोलर किंवा अन्य मानसिक विकार असणारे लोक कुणाकुणा बाबा बंगाल्यांवर विश्वास ठेवतात; स्वतःवर काय, काय 'इलाज' करवून घेतात; आणि पुढे जर योग्य डॉक्टर, समुपदेशकांकडून उपचार मिळाले तर तेव्हाच्या 'इलाजां'बद्दल, आपल्या मनःस्थितीबद्दल काय म्हणतात, ह्याचा तपास घ्यावा.

चिमणराव Fri, 29/11/2019 - 08:15

In reply to by अतिशहाणा

नाझर नावाचा एक हुद्दा होता संस्थानात. ते वैद्य असत. काही असाध्य रोगांवर ते इलाज करत. तेव्हा रुग्णांना नाझरवाड्यात सोडून जात. नातेवाईकांना "भेटायला येऊ नका, तो बरा झाला की स्वत:च घरी येईल." अशी ताकीद असे.
अँटीबायोटिक्स नसतानाचा तो काळ.

शाळांना सुट्ट्या लागल्यावर गावी गेल्यावर कधी पहिलाच सण हनुमान जयंती असे आणि त्या वाड्यात मोठा उत्सव, कीर्तन असे. मारुतीची गोष्ट ऐकणे मग जेवण अशी मजा असे. तर तिकडे हे पाहिलं आहे.

मी जे काही प्रतिसादात लिहिलं ते या गोष्टीस्वरुपात लिहायला हवं होतं.
------

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 21/11/2019 - 02:19

In reply to by चिमणराव

अंधश्रद्धांबद्दल 'पंधरा दिवस करून बघायला हरकत नाही' वगैरे सबबी इथे चालणार नाहीत. तुम्ही डॉक्टर नाहीत, समुपदेशक नाहीत; तुम्हाला ह्या विषयातलं, ह्या विकारांचा त्रास होणाऱ्या लोकांबद्दल फार काही समजत नाही हे स्पष्टच दिसतंय. भलत्या आणि लोकांना हानीकारक ठरतील अशा गोष्टी लिहिण्यासाठी 'ऐसी'चं व्यासपीठ उपलब्ध नाही.

ह्यापुढे अशा प्रकारचं लेखन, प्रतिसाद आल्यास ते काढून टाकण्यात येईल.

कोणीही ह्या असल्या भंपक, अंधश्रद्ध, भूलथापांकडे लक्ष देऊ नये. आपापले उपचार वगैरे करण्याच्या फंदात पडू नये; सरळ मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशकांकडे जावं.