महाराष्ट्र - महापालिका निवडणूका
मुंबई-ठाण्यात शिवसेना येणार असं दिसतंय. बाकी पुणे, नाशिक आणि नागपुरात भाजप पुढे आहे. नाशकात मनसे झोपली.
नको नको जंतुराव. मला धंदा
नको नको जंतुराव. मला धंदा करता येत नाही, कस्टमरच्या विचारांचा आदर करता येत नाही हे इथंच ऐकलय. आता कस्टमरांची प्रायवसीही जपता येत नाही म्हनून ऐकावे लागेल.
या एकदा सोलापूरला. सगळा पोर्टफोलिओ दाखवेन.
.
बापटाण्णा, थ्यांकू बरका. एक पार्टी घ्या माझ्याकडून. कवाबी, कसलीबी. ;)
अभिनंदन अभ्या! स्वतःच्या
अभिनंदन अभ्या!
स्वतःच्या चांगल्या कामाची झैरात, प्रअँमा करण्यात का हिचकीचाहट? क्लायन्टशी जे काही काँन्फीडन्शीअलीटी, प्रायवसीचे T&C ठरलेत ते ब्रीच न करता स्वतःला प्रमोट करता येइलच की!
अजोंच माहीत नाही पण मी फक्त माझं मत सांगत होते की 'ग्राहकांना त्यांच्या आवडीनिवडीबद्दल पीठपिछे नावं ठेवणं मलातरी योग्य वाटलं नाही'.
एनीवे ओळखीतल्या पुरोगाम्यांना पोर्टफोलियो दाखवायची आयड्यादेखील छान. तुला आवडतील असे ग्राहक त्यांच्यामार्फत मिळाले तर चांगलेच आहे. त्यासाठी शुभेच्छा! मग बिनधास्त डंप त्या प्रतिगामी ग्राहकांना आणि घाल काय शिव्या घालायच्यात त्या ;-)
(या विषयावर ही शेवटची पोस्ट)
अभ्या शेठ , जरा कंफ्युजन आहे
अभ्या शेठ ,
जरा कंफ्युजन आहे इथे. तुम्ही कस्टमर करता पब्लिसिटी मटेरियल तयार केलं होतत . कस्टमर नि पब्लिसिटी केली आणि जिकला . आता कस्टमर नि जगाला दाखवलेली गोष्ट तुम्ही आम्हाला दाखवल्याने नक्की कसली प्रायव्हसी ब्रीच होणारे , काय समजलं नाही . कस्टमर फार तर अभ्याशेठ नि सोत्ताहून प्रचार केला म्हणेल . ( त्याचे वेगळे हजार रुपये आणि बिर्याणी सोडू नका !!! ;) तवा लावा हितं पोश्टर ते !!!
आणि " मला धंदा करता येत नाही, "वगैरे काय भानगड आहे ?
बापटाण्णा, कॅम्पेनिंग आजकाल
बापटाण्णा, कॅम्पेनिंग आजकाल विकासाचे थोडीच होते? प्रतिस्पर्ध्याच्या वीक पॉइंटावर इलेक्शन खेळल्या जातात. याचेच कॅम्पेनिंग सोशल मिडीयावर केले जाते. लोक वाईटातला चांगला हुडकतात. आम्ही आमच्या ग्राहकाच्या प्रतिस्पर्ध्यांना जास्त वाईट करतो. आणि सांगायचे म्हणजे ते प्रतिस्पर्धी अजून जिवंत/अॅक्टीव्ह आहेत. ;) मलाही राह्यचेय.
शिवसेनेला शेवटच्या आधी
शिवसेनेला शेवटच्या आधी दिसणार्या लीड सीट्सवर काँग्रेसने शेवटी शेवटी अगदी थोडक्या मार्जिनने हरवलेलं दिसतंय.
आधी कल २००च्या आसपासच्या सीट्सचे दिसत होते. उरलेल्या २०-२२ पैकी भाजपाने खूप मारल्या आणि शिवसेनेच्या ६-७ तरी काँग्रस/एन्सीपीच्याकडे गेल्या असाव्यात.
आता राज्यसरकार पडत नाही! हुश्श!
वन डे
मुंबईतल्या निकालाचा शेवट, वन डे मॅच सारखा वाटला. शिवसेना जिंकते असे वाटत असताना अचानक ९३ वरुन ८४ वर घसरली आणि भाजपचे कासव ८२ पर्यंत पोचले.
उद्धव ठाकरे म्हणतात की हा भाजपाचा पैशाचा विजय आहे, पण लोकसत्तेत रोज भाजपाच्या फुल पेज जाहिरातीबरोबर यांची दोन फुलपेज जाहिरात असायची.
दुपारी एक दीड नंतर लैच पालटलं
दुपारी एक दीड नंतर लैच पालटलं चित्र. कटटूकट फाईट आहे मुंबईमध्ये. फडणवीस आजचे मॅन ऑफ द मॅच. लातूरमध्ये म्हणे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कॉंंग्रेसचा पराभव.