ब्राम्हणी पितृसत्ता आणि सोशल मीडिया
भारताबाहेर राहून, उच्चजातीत जन्माला येऊन किंवा 'एसी ऑफिसात गुबगुबीत खुर्चीत बसून'ही भारतात, आपल्या घरापासून दोन किलोमीटर लांब असलेल्या वस्तीत आणि अगदी आपल्या शेजारच्या खुर्चीत बसलेल्या सहकर्मचाऱ्यांच्या मनात खरोखर काय विचार आहेत, हे समजून घ्यायचं असेल तर आज सोशल मिडीया - लोकमाध्यमांना पर्याय नाही. माणूस समोर असताना त्यांच्या बोलण्याची, वर्तनाची समीक्षाही न करणारे लोक आंतरजालाच्या आभासी मितीमध्ये जातात तेव्हा विषारी, विखारी बोलायलाही त्यांना अडचण वाटत नाही. आपल्याला कोणी बघत नाही तर आपण कसंही वागू शकतो; त्याऐवजी माणसाच्या चेहऱ्याचं चित्र चिकटवलं तरीही समाजाचे बरेच नीतीनियम पाळले जातात; असं दर्शवणारं संशोधन मानसशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. याचा प्रत्यय अनेकांना आभासी जगात वावरताना येत राहतो.
दुसऱ्या बाजूनं, सोशल मिडीया आपलं, माणसांचं ध्रुवीकरणही करत आहे. राजकारणी टाळ्याखाऊ वक्तव्यं करून, काहीशा हिंसक मार्गांनी समाजाचं ध्रुवीकरण करतात; हा जुना नुस्खा आहे, तो सहज ओळखता येतो. सोशल मिडीयामधून होणारं ध्रुवीकरण हिंसक किंवा धडाकेबाज पद्धतीचं नाही. ते चुपचाप होतं. आपल्यासारखा विचार करणाऱ्या किंवा आपल्याच आर्थिक-सामाजिक गटातल्या लोकांसोबत आपण मिसळतो; त्यांचंच बोलणं ऐकून घेतो. धार्मिक-अधार्मिक, राष्ट्रवादी-उदारमतवादी असे परस्परविरोधी विचार करणारी माणसं एक तर विरोधी गटांत जाऊन बोलत नाहीत किंवा बोलली तरीही 'मी थोर का तू थोर' या रस्सीखेचीपलीकडे त्यांचा आवाका नसतो.
'ऐसी अक्षरे'वर या पलीकडे जाऊन, आपल्या कंफर्ट झोनच्या बाहेरचं, आपल्याला अजिबातच न पटलेलं किंवा आपल्यापेक्षा निराळ्या पार्श्वभूमीच्या लोकांचे मूलतः निराळे विचार मांडले जावेत; अशी सुरुवातीपासून ऐसी-प्रवर्तकांची इच्छा होती, आहे. सोशल मिडीया, आंतरजालावर अशा प्रकारचं लेखन जरा कमीच दिसतं, ज्यातून 'आम्हीच थोर' यापेक्षा 'काही तरी चुकतंय आणि ते बदलण्याची गरज आहे', असा विचार मांडलेला असतो. हे असं लेखन दिसतं तेव्हा ते मुद्दाम 'ऐसी'वर मागवून प्रकाशित केलं जातं.
असाच एक लेख राऊंड टेबल इंडिया या संस्थळावर सापडला. भाग्येशाच्या परवानगीनं तो पुनःप्रकाशित करत आहोत.
-- ऐसी अक्षरे व्यवस्थापक
---
सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा सध्या एक अविभाज्य घटक झालेला आहे. सोशल मीडियाचा वापर करावा की करू नये अथवा कशाप्रकारे करावा याबद्दल समाजामध्ये अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जातात. काही व्यक्तींना वाटतं सोशल मीडिया हे टाइमपास करण्याचं एक साधन आहे. उगाच त्यावर वेळ खर्ची करू नये. अनेक मुलींच्या पालकांना असं वाटतं की सोशल मीडियाद्वारा समाजकंटक मुलींना त्रास देऊ शकतात. यामुळे मुलींनीच या माध्यमांपासून दूर राहावं. या गोष्टींचा विचार करता असं लक्षात येत की सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक व्यक्तिंशी एकाचवेळी जोडले जावू शकतो. भलेही आपला त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध असो अगर नसो. आपण आपल्या विचारांची देवाणघेवाण करू शकतो. प्रस्थापित माध्यमांना एक पर्याय उभा करता येईल का हा विचार करत मी देखील सोशल मीडिया जॉईन केलं. फ़ेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमातून लोकांशी संबंध ठेवू लागले. गेली सहा वर्षे मी फ़ेसबुकवर आहे. पर्यायी माध्यम असा सोशल मीडियाचा विचार करत असतानाच ही माध्यमे मुलींच्या बाबतीत कितपत सुरक्षित आहेत याबद्दल मला थोडी विस्ताराने चर्चा करावीशी वाटते. अर्थात नुकत्याच घडलेल्या अमर खाडे प्रकरणाचा यास संबंध आहे.
प्रथम आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्या ब्राह्मणी पितृसत्ताक समाजामध्ये मुलींनी मोबाईल कसा वापरावा, कितपत वापरावा याचे काही नियम ठरलेले आहेत. अनेकवेळा काही अडचण येऊ नये म्हणून मुलींना मोबाईल वापरण्यास देण्यात येतो. पण मुलीच्या मोबाईलच्या वापरावर कठोर निर्बंध घातले जातात. कारण आपला स्त्री-जात्याधारीत समाज मुलीला कुटुंबाची 'इज्जत' मानतो. त्यामुळे तिचा मोबाईलद्वारा अन्य व्यक्तिंशी संबंध येऊन ती कोणाशी भावनिक दृष्टीने जोडली गेली व जर तिने स्व:मर्जीने विवाह करण्याचा निर्णय घेतला तर कुटुंबाची 'अब्रू' जाईल असे पालकांना वाटते. यामुळे मुलीचे हे संपर्काचे साधन मर्यादित राहावे यासाठी पालक प्रयत्न करतात. यातूनच मग मुलींचे मोबाईल तपासले जातात. त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले जातात. या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक मुलींसाठी सोशल मीडियाचा सहजरित्या वापर करणं हीच एक मोठी गोष्ट असते. समाजाचे पारंपरिक निर्बंध झुगारुन ती समाजमाध्यमातून व्यक्त होण्याचा प्रयत्न करते परंतू आपला ब्राह्मणी पितृधारी समाज तिच्याकडे एक व्यक्ती म्हणून न बघता मनोरंजनाचे आयते उपलब्ध झालेले साधन असंच पाहत असतो. यामुळे मुलींना ऑनलाइन जगात अनेकवेळा लैंगिक शोषणास सामोरं जावं लागतं.
मुलींच्या फोटोचा गैरवापर करणे, ह्या फोटोचा वापर अश्लील संदेश पाठवण्यासाठी करणे, मुलींची संमती नसताना तिला नग्न फोटोमध्ये टॅग करून तिची बदनामी करणे, असे प्रकार दररोज सुरू असतात. व्हॉट्सअॅपवरील ग्रूपवर देखील मुलींविषयक निर्भत्सना करणारे विनोद फिरत असतात. परंतु ब्राम्हणी पितृसत्ताक मानसिकतेमध्ये अडकलेल्या समाजाला हे असे प्रकार आक्षेपार्ह वाटत नाहीत. त्यामूळे लाइक आणि शेअर करून असे संदेश लगेचच व्हायरल होतात. एका नवबौद्ध कुटुंबातून आलेली स्त्री या नात्याने मी जेव्हा ह्या सर्व घटकांचा विचार करते तेव्हा असं लक्षात येतं की या समाजमाध्यमात जातीय भेदभाव व पुरुषसत्ता अशा दोन्ही प्रकारच्या अन्यायाला दलित आदिवासी मागासवर्गीय स्त्रियांना सामोरं जावं लागतं. 'आरक्षणाची अवलाद' अशा पोस्टना तोंड देत असतानाच 'लड़कियां ऐसीही होती है' यांसारख्या तर्कहीन गोष्टींना सामोरं जावं लागतं. नुकतेच जेव्हा लातूरमधील संविधान मोर्चामध्ये एका मुलीचं भाषण झालं तेव्हा त्याला आलेली प्रत्यूत्तरे भयानक होती. "तुम्ही दलित आदिवासी बायका तुमची लायकीच आहे रांडा म्हणून रहाण्याची... माझ्या बापाने एक नाही चार चार रांडा ठेवल्या आहेत," असं लोक उघडपणे म्हणत होते. या घटनेचा विचार करता दलित आदिवासी स्त्रियांना या व्यवस्थेत अधिक मानहानीला सामोरे जावे लागते असे मला वाटते.
मुळात एक आंबेडकरवादी या नात्याने आम्ही अनेक तरुण मुली सोशल मीडियाचा एक पर्यायी माहीती प्रसार यंत्रणा असा वापर करतो. देशभरात वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकणारा वर्ग, प्राध्यापक, अधिकारी, लेखक, विचारवंत यांच्या संपर्कामध्ये राहून त्यांचे लेख, नवीन संशोधन यांचा उपयोग करून स्वतःचे ज्ञान कालसुसंगत करणे असा आमचा उद्देश असतो. शिवाय छोट्या-छोट्या गाव भागात शहरात राहणा-या लोकांशी संवाद साधता यावा, त्यांच्यासोबत विचारांची देवाणघेवाण व्हावी हासुद्धा एक उद्देश असतो. याचा मला आजवर मोठ्या प्रमाणात उपयोग झालेला आहे हे मी प्रथमतः मान्य करते. परंतु असा उद्देश ठेवून मार्गक्रमण करत असताना अनेक अपिरिचित व्यक्तिंशी संबंध ठेवावा लागतो. यावेळी अनेक अडचणी येतात. कारण फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली केली की धडधड हाय, हेलो हाय... असे मेसेजेस येणं सुरू होतं. कधीकधी लोक स्त्रीयांच्या लैंगिकतेवरून आक्षेपार्ह विधाने करतात. नुकताच माझ्या एका आंबेडकरवादी मैत्रिणीला स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेणाऱ्या एका मुलाने असाच त्रास दिला. तिने प्रत्यक्ष ओळख नसताना देखील समविचारी वाटल्याने फेसबुकवर त्याच्या मैत्रीचा स्वीकार केला व त्याने मात्र याचा गैरफायदा घेतला. त्याच्या अनेक मित्रांसाठी ही गोष्ट धक्कादायक होती कारण ही व्यक्ति सामाजिक प्रश्नावर तावातावाने गप्पा मारायची. लोकांना उपदेशाचे डोस द्यायची. त्यामुळे जेव्हा हे प्रकरण समोर आले तेव्हा त्याच्या बऱ्याच मित्रांनी त्याचे फेसबुक अकाउंट हॅकतर झाले नसेल ना अशी शंका व्यक्त केली. पण पुढे या व्यक्तीने अनेक मुलींना त्रास दिल्याचे समोर आले. या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर मला एक विचारावंसं वाटतं की स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेऊन काही लोक आपल्याच आंबेडकरवादी मैत्रिणींना त्रास देत असतील तर यांचा बंदोबस्त आपण कसा करणार् आहोत? माझ्या अनेक मैत्रिणींनी असं मत व्यक्त केल की यापूर्वीही हा व्यक्ती लिंगभावातीत (gender biased) पोस्ट टाकायचा तेंव्हा मात्र अनेक आंबेडकरवादी तरुण शांत रहायचे... आज अनेक आंबेडकरवादी तरुण ह्या तरुणाच्या कृत्याने व्यथित झालेले आहेत. त्यांनी त्याच वेळी जर कठोर भूमिका घेतली असती तर कदाचित आज ही वेळ आली नसती.
आणखी एक मुद्दा मला इथे उपस्थित करावासा वाटतो, तो म्हणजे विश्वासार्हता. जेव्हा हे प्रकरण पहिल्यांदा उघडकीस आले तेव्हा अनेक लोकांनी हे अकाउंट हॅक झालेले असेल असे मानून त्याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा चार पाच मुलींनी त्याच्या विरोधात तक्रार केली तेंव्हादेखील तुम्ही दुर्लक्ष करा, त्याला ब्लॉक करा, हे मुद्दे खूपच लहान आहेत, आपल्याला अजून बरेच मोठे विषय हाताऴायाचे आहेत, असं सांगून आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न केला. काहींनी तर यास निष्फळ चर्चा मानली. काहींना हे वैयक्तिक भांडण वाटले. याचा आम्ही काय अर्थ घ्यायचा? तुमच्यासारख्या एका दलित आदिवासी कुटुंबामधून आलेल्या स्त्रीयांवर तुमचा विश्वास कमी आहे का? की एखादया स्त्रीची सार्वजनिक जीवनात लैंगिक निर्भत्सना होणे हे प्रकरण तुम्हाला शुल्लक वाटते? ज्या फुले आंबेडकरांनी स्त्रीयांच्या प्रतिष्ठेकरता आयुष्यभर लढा दिला, त्या स्त्रियांची सार्वजनिक जीवनात होणारी अप्रतिष्ठा आपण शुल्लक कशी काय मानू शकता?
शेवटी मला एवढंच म्हणावंसं वाटतं की या घडलेल्या प्रकरणाचा आपण समूऴ विचार करावा. ह्या गोष्टीतून आपण योग्य तो बोध घेतला पाहिजे. मुलींनीदेखील अनोळखी मुलांशी मैत्री करताना सावधगिरी बाळगावी. कारण आपले विचार जरी बदललेले असले तरी समाज मात्र अजूनही त्याच बुरसटलेल्या पारंपारिक मानसिकतेचा आहे व हा समाज सोशल मीडियामध्ये प्रतिबिंबीत होतोय.
समताधारक समाजाच्या उभारणीकरता धडपडत असताना दलित आदिवासी इतर मागासवर्गीय स्त्रीयांना जात आणि स्त्रीदास्य ह्या दोन्ही आघाड्यांवर संघर्ष करावा लागतो. कुटुंब आणि समाज अशा दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढत असताना अनेक वेळा त्यांचं मनोबल कमी-जास्त होत असतं. पितृसत्ताक कुटुंबातून संघर्ष करून बाहेर येऊन स्त्रिया आता कुठे विचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपलं मत ठळकपणे मांडत आहेत. तेव्हा आपला व्यवहार त्यांच्याशी सौहार्दतापूर्ण असला पाहिजे. उदाहरणार्थ, त्या जेव्हा रस्त्यावर उतरून आंदोलनातून आपले मागणे मांडण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा "रस्त्यावर उतरून काय फायदा" अशी टीका करण्यापेक्षा हा रस्त्यावर येण्याचा हक्कसुद्धा त्यांनी कुटुंबियांशी आणि समाजाशी भांडून प्राप्त केला आहे याचे आपण भान ठेवायला हवे. त्यांच्या चुका आपण टिंगलटवाळी न करता समाजावून सांगितल्या पाहीजेत नाहीतर कदाचित त्यांचं खच्चीकरण होऊन त्या भविष्यात व्यक्त होणेही टाळू शकतात. तेव्हा एकंदरीत त्यांच्याशी सौहार्दपूर्ण वर्तन असावे. बाबासाहेब म्हणाले होते की "एखादया समाजाची प्रगती मी त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगती वरून मोजतो." तेव्हा समाजातील स्त्रियांचा लढा हा प्रत्येकाचा लढा आहे व तो आपल्या प्रत्येकाला लढावा लागेल हे आपल्या लक्षात असू द्या.
तुमच्या-माझ्या परिसरात हे होत
तुमच्या-माझ्या परिसरात हे होत नसेल, पण घरातल्या मुलींच्या मोबाईल वापरावर निर्बंध आहेत आणि मुलग्यांच्या वापरावर ते नाहीत हे भारतात अनेक ठिकाणी होतं.
नक्कीच होते असे. पण त्याचा "ब्राह्मणी" शब्दाचा संबंध काय?
आणि हे जे काही होते ते ब्राह्मण घरात होण्याचे प्रमाण कीती आणि बाकी समाजात होण्याचे प्रमाण कीती?
पितृसत्ताक व्यवस्था
>> नक्कीच होते असे. पण त्याचा "ब्राह्मणी" शब्दाचा संबंध काय?
आणि हे जे काही होते ते ब्राह्मण घरात होण्याचे प्रमाण कीती आणि बाकी समाजात होण्याचे प्रमाण कीती?
'ब्राह्मणी पितृसत्ताक समाज' ह्या शब्दप्रयोगाच्या आकलनात गोंधळ होतो आहे. हा रोख आजच्या ब्राह्मणांकडे नाही; पारंपरिक पितृसत्ताक व्यवस्था ब्राह्मणी मांडणीतून आलेली आहे ('न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' वगैरे). लेखिकेचं म्हणणं असं आहे की आज अगदी आंबेडकरी चळवळीमधले (म्हणजे ब्राह्मण / सवर्ण नसलेले) लोकदेखील मुलींकडे त्या पितृसत्ताक व्यवस्थेच्या चष्म्यातूनच पाहत आहेत.
जाता जाता : उत्तरेकडचे ब्राह्मण आणि महाराष्ट्रातले ब्राह्मण ह्यांच्या परंपरा पाळण्याच्या प्रमाणातही फरक असावा. त्यामुळे आपण काही प्रमाणात तोदेखील लक्षात घ्यायला हवा.
पारंपरिक पितृसत्ताक व्यवस्था
पारंपरिक पितृसत्ताक व्यवस्था ब्राह्मणी मांडणीतून आलेली आहे
मुळात हे खरे आहे का चिंज.
मग जिथे ब्राह्मण नव्हतेच अश्या युरोपमधे, वाळवंटी प्रदेशात स्त्रीयांची अवस्था भारतातल्या स्त्रीयांपेक्षा चांगली होती असे लेखकाला म्हणायचे आहे का? आणि लेखकाला काहीही म्हणायचे असेल, पण ते खरे आहे का?
तशी ती नसेल ( स्त्रीयांची अवस्था चांगली नसेल ) तर युरोप आणि वाळवंटी लोकांवर पण भारतातल्या ब्राह्मणांनी प्रभाव टाकला होता असे लेखकाला म्हणायचे आहे का?>
म्हणुनच मी हा प्रश्न विचारला होता. फक्त पितृसत्ताक इतकाच शब्द वापरला असता तर ते जास्त बरोबर झाले नसते का?
महात्मा फुले
>> मग जिथे ब्राह्मण नव्हतेच अश्या युरोपमधे, वाळवंटी प्रदेशात स्त्रीयांची अवस्था भारतातल्या स्त्रीयांपेक्षा चांगली होती असे लेखकाला म्हणायचे आहे का? आणि लेखकाला काहीही म्हणायचे असेल, पण ते खरे आहे का?
तशी ती नसेल ( स्त्रीयांची अवस्था चांगली नसेल ) तर युरोप आणि वाळवंटी लोकांवर पण भारतातल्या ब्राह्मणांनी प्रभाव टाकला होता असे लेखकाला म्हणायचे आहे का?>
म्हणुनच मी हा प्रश्न विचारला होता. फक्त पितृसत्ताक इतकाच शब्द वापरला असता तर ते जास्त बरोबर झाले नसते का?
लेखिकेची संदर्भचौकट भारतापुरती आहे, त्यामुळे मनुस्मृति आदि लक्षात घेऊन तो शब्द वापरला जातो. ह्याचं मूळ माझ्या मते म. फुल्यांच्या मांडणीत होतं. उदा. हा लेख पाहा.
सहमती?
>> चला तुम्हाला मी काय म्हणतीय ते पटले तर चिंज.
लेखिकेचा शब्दप्रयोग कोणत्या संदर्भचौकटीतून येतो आहे आणि त्या चौकटीचं मूळ काय आहे हे मी सांगितलं. तुम्हाला त्या शब्दप्रयोगाविषयी जर आक्षेप असला तर तुम्हाला ह्या लेखाविषयी नव्हे, तर म. फुल्यांच्या मूळ मांडणीवर आक्षेप घ्यावे लागतील. तसे तुम्ही अद्याप तरी घेतलेले नाहीत. त्यामुळे मी तुमच्याशी सहमत होण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
विद्या संपादन करण्याचा अधिकार
विद्या संपादन करण्याचा अधिकार नाकारल्यामुळे बहुजनांनी बुद्धीचा वापर, सारासार विचार करण्याचे स्वातंत्र्य नाकारले गेले.
असे फुल्यांच्या लेखात लिहिले आहे. आता घासुगुर्जींच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्यांनी खूप विद्या संपादन केल्यावर (२०१४ मधे १९५२ ते २००९ पेक्षा विद्या संपादन जास्तच असणार) त्यांनी बुद्धीचा वापर केला असणार , स्वातंत्र्य वापरले असणार आणि भाजपला निवडले असणार. पण भाजप तर जाहिर सनातनी, ब्राह्मणवादी, हिंदूवादी, संघवादी आहे हे सगळ्यांना (ते शिक्षित असल्यामुळे) माहित आहे. तर बहुसंख्य बहुजन असे विचित्र आणि असंबद्ध का वागत असतील?
ब्राह्मणी
>> तुम्हाला त्या शब्दप्रयोगाविषयी जर आक्षेप असला तर तुम्हाला ह्या लेखाविषयी नव्हे, तर म. फुल्यांच्या मूळ मांडणीवर आक्षेप घ्यावे लागतील.
आणखी एक गोष्ट सांगायची राहिली - 'ब्राह्मणी' ह्या शब्दाविषयीच्या कथित आक्षेपांशिवाय इथल्या कुणाला लेखाविषयी फारसं काही म्हणायचंच नसेल, आणि बरीचशी चर्चा जर केवळ त्या एका शब्दाच्या वापराभोवतीच घोटाळणार असेल, तर मग 'ब्राह्मणी साईटवर असा लेख टाकल्यामुळे तिथल्या ब्राह्मणी लोकांनी केवळ तेवढ्या एका शब्दावरच चिवडाचिवडी केली' असा आक्षेपही इतर कुणी तरी घेऊ शकेल. त्यामुळे माझ्याकडून ह्याविषयी आता इथे लेखनसीमा.
+१ शिवाय असं (मंजे चिवडाचिवडी
+१
शिवाय असं (मंजे चिवडाचिवडी केली) म्हण्णं बरोबर पण असेल.
====================================
अहो, पण मी फुल्यांच्या मूळ लेखाचा विरोध करतोय.
========
http://beyondheadlines.in/2014/04/brahmins-are-terrorists/ तसं ब्राह्मण अतिरेकी आहेत म्हटलं तरी आजकाल ब्राह्मण तिकडे लक्ष देत नाहीत.
???
'ब्राह्मणी साईटवर असा लेख टाकल्यामुळे तिथल्या ब्राह्मणी लोकांनी केवळ तेवढ्या एका शब्दावरच चिवडाचिवडी केली' असा आक्षेपही इतर कुणी तरी घेऊ शकेल.
ही जर खरोखरच ब्राह्मणी साइट असेल, तर मग अजूनपर्यंत तुम्ही काय करताय इथे, चिंजं?
सबब, त्या आक्षेपांस फारसा काही अर्थ आहे, असे वाटत नाही. (निदान, 'ब्राह्मणी साइट' हे बेसिक प्रेमाइस गंडलेय, असे म्हणावेसे वाटते.)
...
लेखिकेचा शब्दप्रयोग कोणत्या संदर्भचौकटीतून येतो आहे आणि त्या चौकटीचं मूळ काय आहे हे मी सांगितलं. तुम्हाला त्या शब्दप्रयोगाविषयी जर आक्षेप असला तर तुम्हाला ह्या लेखाविषयी नव्हे, तर म. फुल्यांच्या मूळ मांडणीवर आक्षेप घ्यावे लागतील.
महात्मा फुल्यांच्या मूळ मांडणीवर आक्षेप घेण्यात रस नाही. त्याकरिता फुल्यांचा मूळ लेख मी वाचलेला नाही, आणि केवळ आक्षेप घेण्याकरिता तूर्तास तातडीने वाचण्यात स्वारस्य नाही. अॅकॅडेमिक इंटरेष्टखातर पुढेमागे वाचणार नाहीच, असे नाही, परंतु तूर्तास घाई नाही. शिवाय, फुल्यांनी लेख लिहिला, त्या काळाकरिता (आणि/किंवा फुल्यांच्या व्ह्याण्टेज पॉइंटवरून) ती मांडणी कदाचित योग्य असू शकेलही (मला माहीत नाही); आजमितीस ती कितपत योग्य आहे, ही बाब वेगळी असू शकेल. इन एनी केस, फुल्यांशी माझा (तूर्तास तरी) पंगा नाही.
मात्र, फुल्यांची मांडणी काहीही असो, ती वापरण्या-न वापरण्याचे निर्णयस्वातंत्र्य लेखिकेस खचितच आहे, आणि ते स्वातंत्र्य वापरून ती मांडणी वापरण्याचा निर्णय सर्वस्वी लेखिकेचा आहे. सबब, कोणास काही आक्षेप असलाच, तर तो लेखिकेप्रतिच असू शकतो; फुल्यांप्रति नाही.
अभ्यासोनि प्रकटावे
>> महात्मा फुल्यांच्या मूळ मांडणीवर आक्षेप घेण्यात रस नाही. त्याकरिता फुल्यांचा मूळ लेख मी वाचलेला नाही, आणि केवळ आक्षेप घेण्याकरिता तूर्तास तातडीने वाचण्यात स्वारस्य नाही. अॅकॅडेमिक इंटरेष्टखातर पुढेमागे वाचणार नाहीच, असे नाही, परंतु तूर्तास घाई नाही. शिवाय, फुल्यांनी लेख लिहिला, त्या काळाकरिता (आणि/किंवा फुल्यांच्या व्ह्याण्टेज पॉइंटवरून) ती मांडणी कदाचित योग्य असू शकेलही (मला माहीत नाही); आजमितीस ती कितपत योग्य आहे, ही बाब वेगळी असू शकेल. इन एनी केस, फुल्यांशी माझा (तूर्तास तरी) पंगा नाही.
अगदी सुसंगत. 'अभ्यासोनि प्रकटावे, नाहीतर झाकोनि असावे, प्रकटोनि नासावे, बरे नव्हें' असे एक ब्राह्मण म्हणून गेलाच आहे. आणि अभ्यास वगैरे करायची आंजावर ब्राह्मणांचीच काय, कुणाचीच फारशी तयारी तशीही नसतेच.
>>मात्र, फुल्यांची मांडणी काहीही असो, ती वापरण्या-न वापरण्याचे निर्णयस्वातंत्र्य लेखिकेस खचितच आहे, आणि ते स्वातंत्र्य वापरून ती मांडणी वापरण्याचा निर्णय सर्वस्वी लेखिकेचा आहे. सबब, कोणास काही आक्षेप असलाच, तर तो लेखिकेप्रतिच असू शकतो; फुल्यांप्रति नाही.
रुळलेला शब्दप्रयोग करण्यावर आक्षेप घ्यायचा तर घ्या; त्यामुळे रुळलेला शब्दप्रयोग बदलेल अशा भ्रमात न राहाल तर बरे. वेगळा शब्दप्रयोग करून भाषाव्यवहारात क्रांती वगैरे करायची झाली, तर ती करणारे पुन्हा वेगळे असणार. जे करायला लेखिका निघालेली नाही ते न केल्याबद्दल तिच्यावर आक्षेप घेतल्याने हशील काहीच होणार नाही. हां, आता आक्षेप घेऊन स्वतःचे ब्राह्मणत्व वगैरे सिद्ध करायच्या नादात असाल तर शुभेच्छा.
?
हां, आता आक्षेप घेऊन स्वतःचे ब्राह्मणत्व वगैरे सिद्ध करायच्या नादात असाल तर शुभेच्छा.
सिद्ध कशास करावयास हवे? उद्या समजा मी म्हणालो, की बाबांनो, मी ब्राह्मण नाही, तर कोणी मानणार आहे काय?
सम आर बॉर्न ब्रॅह्मिन्स, सम मे ऑर मे नॉट अचीव्ह ब्रॅह्मिनिटी, व्हेअरअॅज़ सम हॅव ब्रॅह्मिनिटी थ्रष्ट अपॉन देम. आमची क्याटेगरी पहिली आणि तिसरी. साली बीफ खाऊनही आमची ब्रॅह्मिनिटी जात नाही. (मुद्दाम घालविण्यात तितकासा सीरियस इंटरेष्टही नाही, ही बाब अलाहिदा.)
Madam, how like you this play?
>> सिद्ध कशास करावयास हवे? उद्या समजा मी म्हणालो, की बाबांनो, मी ब्राह्मण नाही, तर कोणी मानणार आहे काय?
सम आर बॉर्न ब्रॅह्मिन्स, सम मे ऑर मे नॉट अचीव्ह ब्रॅह्मिनिटी, व्हेअरअॅज़ सम हॅव ब्रॅह्मिनिटी थ्रष्ट अपॉन देम. आमची क्याटेगरी पहिली आणि तिसरी. साली बीफ खाऊनही आमची ब्रॅह्मिनिटी जात नाही. (मुद्दाम घालविण्यात तितकासा सीरियस इंटरेष्टही नाही, ही बाब अलाहिदा.)
The lady doth protest too much, methinks. लेखनसीमा.
वेदांत वर्णांचा "उल्लेख" आहे
वेदांत वर्णांचा "उल्लेख" आहे म्हणून तत्कालीन व्यवस्था निंद्य असेल तर फुल्यांना सरळसरळ जातीयवादी म्हणायला पाहिजे. ते जातीची नावे घेऊन दूषणे देतात. जातीची नावे घेऊन शिफारशी करतात. लेख वाचून फुले म्हणजे १०० वर्षापूर्वीचे मुलायमसिंग यादव तर नव्हेत ना असं वाटलं (भ्रष्ट या अर्थाने नाही, स्वतःस समाजवादी समजणारे जातीयवादी या अर्थाने). आणि कुठेतरी पुराणांत जिथे स्त्रीयांची स्तुति करणारी हजारो वाक्ये आहेत त्यातून एखादे वाकडे उचलून समाज तसलाच होता म्हणायचे म्हणजे अवघड प्रकार आहे.
युरोपबद्दल माहीत नाही, पण...
तशी ती नसेल ( स्त्रीयांची अवस्था चांगली नसेल ) तर युरोप आणि वाळवंटी लोकांवर पण भारतातल्या ब्राह्मणांनी प्रभाव टाकला होता असे लेखकाला म्हणायचे आहे का?>
युरोपबद्दल माहीत नाही, पण तुम्ही ज्यांना 'वाळवंटी' म्हणता, ते लोक्स मुळात शैव होते, ही थियरी कधी ऐकली नाहीयेत काय?
अनुतै, मी प्रश्न जंतूंना
अनुतै, मी प्रश्न जंतूंना केलाय हो.
==========================
माझा मुद्दा नक्की काय ते सांगतो. संपत्तीला अतिशय काटेकोर नाव देणे, तिचे खूप काटेकोर वर्णन करणे, तिच्या काटेकोर सीमा आखणे, तिचे अचूक मूल्यमापन करणे, तिच्या मालकीचे हक्कदार आणि टक्केवारी डिटेलमधे लिहून काढणे आणि सरकारदरबारी या सगळ्या गोष्टींची नोंद करून पोचपावती घेणे हे सगळे फार आधुनिक (आणि माझ्यामते अनावश्यक) ट्रेंड्स आहेत. अगोदरच्या काळी स्त्रीयांना काय पुरुषांना देखिल असले कसलेच हक्क नव्हते. जसे संपत्तीचे तसेच्च स्वातंत्र्याचे.
>>धर्म-कर्मविषयक निर्णय
>>धर्म-कर्मविषयक निर्णय करण्याचे काम ब्राह्मणांकडे आणि त्याच्या अंमलबजावणीचे काम इतर जातींकडे) होते म्हणून ब्राह्मणी मांडणी म्हणत असतील.
ब्राह्मणांकडे (ब्राह्मण म्हणून) हे अधिकार कधीच नव्हते. राजाला जे हवं आहे ते कायदा असल्याचं सांगणे हे ब्राह्मणांचं काम. गुरुत्वाकर्णणाचा नियम न्यूटन लिहितो तेव्हा न्यूटन गुरुत्वाकर्षण निर्माण करत नाही. असलेल्या गुरुत्वाकर्षणाच्या गुणधर्माचं कोडिफ़िकेशन करतो.
कुरुंदकरांनी म्हटल्याप्रमाणे...... ब्राह्मणांनी समाजव्यवस्था (जशी आहे तशी) निर्माण केली हे असत्य आहे. ज्या ब्राह्मणांना स्वत:च्या समाजाची व्यवस्था देशभरात एकसारखी करता आली नाही ते सगळ्या समाजाची व्यवस्था कुठली निर्माण करायला !!
सिविल आणि सेक्यूलर
मला वाटते पूर्वी जगात सर्वत्रच सिविल आणि सेक्यूलर बाबीत राजसत्ता निर्णय करीत असावी आणि धर्मसत्ता नावाचे एक वेगळे प्रकरण होते ते धर्मनिर्णय करीत असावे. मध्यंतरीच्या काळात या धर्मसत्तेने काही ठिकाणी राजसत्तेवर कुरघोडी केली. पण राजाच्या कलाकलाने धर्मनिर्णय घेतले जात होते असे नव्हते. अर्थात भ्रष्ट ब्राह्मण तेव्हाही होते असणारच. म्हणूनच एखादा रामशास्त्री प्रभुणे उठून दिसतो. पण सगळेच ब्राह्मण राजाच्या 'हो'ला 'हो' करीत असतील असे नाही.
आणि धर्मनिर्णयाचा अधिकार काही विद्वान् ब्राह्मणांकडे ते विद्वान आणि ब्राह्मण होते म्हणून होता. अशांसाठी ब्रह्मवृंद हा शब्द अनेकदा वापरला गेला आहे.एरवीही वापरला गेला आहेच, पण ते ब्राह्मणमंडळ असे, हे स्पष्ट आहे.मध्ययुगात जातिधर्मकर्मविषयक तंटेबखेडे चार प्रमुख धर्मपीठे आणि ठिकठिकाणची उपपीठे यांच्याकडूनच सोडवले जात.धर्मव्यवस्था हळू हळू निर्माण झाली आणि तिला आकार ब्राह्मणांनी दिला. तिचे त्या त्या काळाप्रमाणे सुगठन केले. नंतर काळाप्रमाणे बदल केले नाहीत म्हणून ती कालबाह्य आणि काही प्रमाणात ऑप्रेसिव ठरली.
माझ्याकडून स्पष्टीकरण
ब्राह्मणांकडे (ब्राह्मण म्हणून) हे अधिकार कधीच नव्हते. राजाला जे हवं आहे ते कायदा असल्याचं सांगणे हे ब्राह्मणांचं काम
असे नितिन थत्ते म्हणतात.
माझ्या समजुतीनुसार परिस्थिति अगदी उलटी होती. धर्मशास्त्रांमध्ये कायदा लिहिला जाई आणि त्याचे पालन केले जाते आहे का नाही हे पहाणे इतकेच राजाचे काम होते. धर्मशास्त्राचे शेकडो ग्रंथ गेले २००० वर्षे वापरात आहेत आणि ते अमक्या राजाकडे पाहून, त्याचा भृकुटिभंग होणार नाही अशा पद्धतीने लिहिले जात असे मुळीच नाही. धर्मशास्त्रानुसार राज्य न करणार्या राजाला खाली खेचण्याचा अधिकारहि धर्मशास्त्री समूहाला होता. पुराणांमधील वेन राजाची गोष्ट प्रसिद्ध आहे.
कायद्याचा स्रोत secular सत्तेकडे असणे ही बाब इंग्रज येईपर्यंत भारतात अश्रुतपूर्व होती. तोपर्यंत कायदा जो काही असेल तो धर्मशास्त्रांमधून शोधायचा अशीच पद्धति होती. ह्यामध्ये civil आणि criminal ह्या दोनहि प्रकाराचे नियम होते. कालान्तराने इंग्रज आल्यानंतर त्यांनी criminal आणि civilच्या काही भागांमध्ये अतिक्रमण करून कायदे केले आणि विशेष विरोध न होता ते समाजाच्या अंगवळणीहि पडले. पण ज्या बाबी धर्मशास्त्राने खास आपल्या म्हणून मानल्या होत्या - ज्याला Personal Law म्हणतात (विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक, इत्यादि) - त्यात राजसत्तेने कायदा लिहिणे ही कल्पना भारतीय समाजाला पूर्णतः नवीन होती. ह्याच कारणाने अशा बाबीत सतीविरोधापासून जे जे कायदे इंग्रजांनी आणि तदनंतर स्वतन्त्र भारताने समाजाला घालून दिले त्यांना त्यांना सनातनी बाजूने विरोध झाला, अशासाठी ह्या विषयांतील कायदे राजसत्तेने निर्माण करायचे ही पद्धति भारताला मान्य नव्हती. अजूनहि ही परिस्थिति काही प्रमाणात सुरू आहे. Uniform Civil Code आणण्याच्या बाबतीत हाच प्रमुख अडथळा - हिंदूंकडून - राहिलेला आहे. (मुस्लिम वेगळ्या शब्दात हेच म्हणतात. त्यांच्यासाठी सर्व बाबतीत परिपूर्ण शारिआ कायदा आहे असे त्यांचे म्हणणे असते.)
ह्याच कारणासाठी १९४७ नंतर एकच Uniform Civil Code करण्याचा नेहरू अणि आंबेडकरांचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. एका कायद्याऐवजी तुकड्यातुकड्यांनी अनेक कायदे करण्याची तडजोड त्यांना स्वीकारावी लागली.
>>पतीने एकाच स्त्रीशी एकनिष्ठ
>>पतीने एकाच स्त्रीशी एकनिष्ठ नसले तरी चालेल, अनेक भार्या केल्या तरी चालतील हे अदण्डनीय कोणी ठरवले असेल?
(सस्तन?) प्राण्यांच्या कळपात एक नर अनेक माद्या ही सिस्टिम योग्य आहे हे ज्यांनी* ठरवले त्यांनीच अनेक भार्या करायला हरकत नाही असे ठरवले. ब्राम्हणांनी ते पोथीत फक्त लिहिले**.
आणि त्यांनीच पत्नीने पतीशी एकनिष्ठ रहावे असे ठरवले.
*उत्क्रांतीचा रेटा वगैरे
**ते त्यांच्या स्वार्थाला पोषक होतेच.
प्रथा बदलणारे निर्णय नव्हते?
काय प्रचलित प्रथा बदलणारे निर्णय केले गेले नाहीत?
काय मांसाशन सार्वत्रिक असताना ते काही लोकांना निषिद्ध करण्याचे नियम केले गेले नाहीत?
काय गोहत्या प्रचलित असताना त्याविरुद्ध जबर दंडाचे नियम केले गेले नाहीत?
कोणत्याही व्यक्तीची दंडनीयता (जातीनिहाय)किती असावी याचे नियम, कदाचित समाजात तसे प्रचलित नसताना ठरवले गेले नाहीत?
'ब्राह्मणी पितृसत्ताक समाज'
'ब्राह्मणी पितृसत्ताक समाज' ह्या शब्दप्रयोगाच्या आकलनात गोंधळ होतो आहे. हा रोख आजच्या ब्राह्मणांकडे नाही
समजा, कोणी ब्राह्मण लेखकाने दलितांवर खच्चून टीका करणारा / शिव्या घालणारा लेख लिहिला, तर "रोख आजच्या दलितांकडे नाही" हे स्पष्टीकरण त्याला अॅट्रोसिटीपासून वाचवण्यासाठी पुरेसं आहे का?
अवांतर
>> समजा, कोणी ब्राह्मण लेखकाने दलितांवर खच्चून टीका करणारा / शिव्या घालणारा लेख लिहिला, तर "रोख आजच्या दलितांकडे नाही" हे स्पष्टीकरण त्याला अॅट्रोसिटीपासून वाचवण्यासाठी पुरेसं आहे का?
हा प्रश्न इथे उपस्थित करण्याचं कारण समजलं नाही.
- भारतात पितृसत्ताक व्यवस्थेची मांडणी ब्राह्मण वर्गातल्या लोकांनी केली म्हणून लेखातलं 'ब्राह्मणी' हे विशेषण व्यवस्थेला लागू होतं; व्यक्तीला नाही असा माझा मुद्दा आहे.
- वरच्या लेखात ब्राह्मणांवर खच्चून टीका आहे किंवा शिव्या घातल्या आहेत असं मला वाटलं नाही. त्यामुळे असा प्रश्न इथे अप्रस्तुत वाटतो.
- शिवाय, एका संदर्भचौकटीत रूढ असलेला शब्दप्रयोग लेखिका करते आहे. त्या संदर्भचौकटीत असा शब्दप्रयोग योग्य की अयोग्य असा उहापोह करण्याचा हक्क अर्थात कुणालाही आहे. मात्र, ते इथे अवांतर ठरतं. किंबहुना लेखाचा विषय सोडून असा उहापोह इथे केल्यामुळे तो करणारे लोक ब्राह्मणी पूर्वग्रहांचे बळी आहेत असाच आरोप होऊ शकतो.
त्यामुळे तुम्ही उपस्थित केलेला प्रश्न इथे अवांतर वाटला. हवी तर इतरत्र त्यावर चर्चा होऊ शकते.
...
भारतात पितृसत्ताक व्यवस्थेची मांडणी ब्राह्मण वर्गातल्या लोकांनी केली म्हणून लेखातलं 'ब्राह्मणी' हे विशेषण व्यवस्थेला लागू होतं; व्यक्तीला नाही असा माझा मुद्दा आहे.
शिवसेना नावाच्या एका ठोकशाही अव्यवस्थेची मांडणी सीकेपी वर्गातल्या लोकांनी केली. भले त्याचे समर्थक/अनुयायी बहुसंख्येने सीकेपी नसतीलही. (आणि उलटपक्षी, सगळेच सीकेपी त्यांना सामील नसतीलही.) पण म्हणून त्या अव्यवस्थेचे वर्णन सरसकट 'सीकेपी ठोकशाही अव्यवस्था' असे करणे सयुक्तिक ठरेल काय, चिंजं?
वरच्या लेखात ब्राह्मणांवर खच्चून टीका आहे किंवा शिव्या घातल्या आहेत असं मला वाटलं नाही. त्यामुळे असा प्रश्न इथे अप्रस्तुत वाटतो.
ब्राह्मणांवर प्रत्यक्ष टीका नसेलही. परंतु ज्यावर टीका केलेली आहे, त्याचा उल्लेख 'ब्राह्मणी' असा केलेला आहे. आता, ब्राह्मण हे अॅट्रॉसिटी अॅक्टच्या कक्षेत येत नाहीत, हे खरे आहे. परंतु, अॅट्रॉसिटी अॅक्टच्या कक्षेत जे समाज येतात, त्यांच्यावर प्रत्यक्ष टीका न करतासुद्धा, एखाद्या पर्पर्टेडली टीकार्ह गोष्टीचा त्यांपैकी एखाद्या समाजाशी अशा प्रकारे दूरान्व्ययाने संबंध जोडणे हे त्या कायद्याच्या कक्षेत यावे, किंवा कसे? (अवांतर कुतूहलात्मक चौकशी: 'तुला रे कशाला चांभारचौकशा?' हे वाक्य संबंधित समाजातील एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीत एखाद्याने म्हटल्यास प्रस्तुत कायदा लागू व्हावा, किंवा कसे?)
शिवाय, एका संदर्भचौकटीत रूढ असलेला शब्दप्रयोग लेखिका करते आहे. त्या संदर्भचौकटीत असा शब्दप्रयोग योग्य की अयोग्य असा उहापोह करण्याचा हक्क अर्थात कुणालाही आहे. मात्र, ते इथे अवांतर ठरतं. किंबहुना लेखाचा विषय सोडून असा उहापोह इथे केल्यामुळे तो करणारे लोक ब्राह्मणी पूर्वग्रहांचे बळी आहेत असाच आरोप होऊ शकतो.
१. 'भोचक चौकशी' या संदर्भचौकटीत 'चांभारचौकशी' हा शब्दही तसा रूढ आहे. भले त्यात काही विशिष्ट जातीवर प्रत्यक्ष टीका करण्याचा उद्देश असो वा नसो.
२. बाकी, कोठलाही आरोप कोणत्याही पर्सीव्ड किंवा अॅक्च्युअल कारणास्तव वा कारणाविना कोणीही कोणावरही करावा. मला वाटते अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेत तेवढे यायला हरकत नसावी.
खुश्शाल
>> म्हणून त्या अव्यवस्थेचे वर्णन सरसकट 'सीकेपी ठोकशाही अव्यवस्था' असे करणे सयुक्तिक ठरेल काय, चिंजं?
खुश्शाल करा. माझा त्याला अजिबातच आक्षेप नाही :-)
>> बाकी, कोठलाही आरोप कोणत्याही पर्सीव्ड किंवा अॅक्च्युअल कारणास्तव वा कारणाविना कोणीही कोणावरही करावा. मला वाटते अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेत तेवढे यायला हरकत नसावी.
खुस्शाल करावा. आरोप करण्यावर माझा आक्षेप नाहीच. मात्र, प्रस्तुत लेखातल्या 'ब्राह्मणी' ह्या एका शब्दावर इथे जितका उहापोह झाला तो पाहता, आणि त्यामुळे लेखातला आशय ज्या प्रकारे दुर्लक्षित झाला ते पाहता 'ऐसी ही ब्राह्मणी साईट आहे. इथे ब्राह्मणी पूर्वग्रह बोकाळले आहेत. इथले ब्राह्मणी लोक स्वत:पलीकडचं उपेक्षितांचं जग पाहायला तयारच नाहीत.' असा निष्कर्ष कुणी सहज काढू शकेल इतका मासला आपण पुरवीत आहात एवढाच मुद्दा आहे.
खुश्शाल करा. माझा त्याला
खुश्शाल करा. माझा त्याला अजिबातच आक्षेप नाही
तुमचा आक्षेप असण्यानसण्याचा संबंध नाही; त्याने काहीच फरक पडत नाही. सयुक्तिक आहे किंवा नाही, एवढाच प्रश्न आहे.
खुस्शाल करावा. आरोप करण्यावर माझा आक्षेप नाहीच. मात्र, प्रस्तुत लेखातल्या 'ब्राह्मणी' ह्या एका शब्दावर इथे जितका उहापोह झाला तो पाहता, आणि त्यामुळे लेखातला आशय ज्या प्रकारे दुर्लक्षित झाला ते पाहता 'ऐसी ही ब्राह्मणी साईट आहे. इथे ब्राह्मणी पूर्वग्रह बोकाळले आहेत. इथले ब्राह्मणी लोक स्वत:पलीकडचं उपेक्षितांचं जग पाहायला तयारच नाहीत.' असा निष्कर्ष कुणी सहज काढू शकेल इतका मासला आपण पुरवीत आहात एवढाच मुद्दा आहे.
लेखाच्या आशयाशी वाद नाहीच. बहुतांश मुद्दे पटण्यासारखेच आहेत. तो एक शब्द मात्र अनावश्यक वाटला. त्यावर आक्षेप हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेत यावा. बाकी निष्कर्ष कोणीही काहीही काढावा. त्याला मासला पुरविण्या-न-पुरविण्याने निष्कर्ष काढला जाणार नाही, असेही नाही, आणि केवळ कोणीतरी काहीतरी निष्कर्ष काढेल म्हणून आपलीच अभिव्यक्ती - त्यातही, आपल्यास जे योग्य वाटते, त्याची अभिव्यक्ती - रोखणे हेही सयुक्तिक वाटत नाही. असो.
नाही. ================== आजचा
नाही.
==================
आजचा आणि कालचा असा काही प्रकार नसतो. किमान त्याची सीमारेषा म्हणून काहीच सांगता येत नाही. जे जहाल दलित आहेत त्यांना ब्राह्मण नष्ट करणे ( देशाबाह्रेर काढणे, मारून टाकणे, धर्मांतरीत करणे, त्यांच्या (फक्त) बायकांशी आंतरजातीय विवाह करणे , इ इ ) हा एक पर्याय वाटतो. जे चांगले दलित आहेत त्यांना ब्राह्मण फक्त सुधरले (आतापासून नीट वागले, भेदभाव नाही केला, समानता आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, आरक्षणाला विरोध नाही केला, इ इ ) तर मोप झाले.
पण सुधारलेले वा ना सुधारलेले ब्राह्मण असा भेद न करता, असं कोणतंही विशेषण न लावता फक्त "ब्राह्मणी" (किंवा अगदी मराठाही) असा शब्द वापरणं जंतु म्हणतात तसं फुले प्रणित नाही. आहे तर फुल्यांची पुनः चिकित्सा करायला लागेल. लहानपणी आम्हाला फुले फार महान असं शिकवलं होतं पण फुल्यांचं एकूण लिखाण आणि विचारसरणी पाहून आजचा दलित लोकांचा कडवटपणा का आहे ते कळतं.
===============
जाता जाता - फुले आद्य समाजसुधारक (सावता माळ्यापेक्षा वेगळे) मानले तर फर्स्ट शॉटलाच इतकी कडवट चळवळ कशी जमली त्यांना? अमेरिकेत काळ्यांचे जे आद्य नेते होते त्यांच्येशी फुल्यांशी तुलना केली तर काय दिसून येते?
...
'ब्राह्मणी पितृसत्ताक समाज' ह्या शब्दप्रयोगाच्या आकलनात गोंधळ होतो आहे. हा रोख आजच्या ब्राह्मणांकडे नाही; पारंपरिक पितृसत्ताक व्यवस्था ब्राह्मणी मांडणीतून आलेली आहे ('न स्त्री स्वातंत्र्यमर्हति' वगैरे).
एखाद्या वाळवंटातल्या एखाद्या महात्म्याने चौदाशे वर्षांपूर्वी मांडून दिलेल्या व्यवस्थेत काही दोष असतीलही१. आणि आजमितीस भले त्या परंपरेत वाढलेले अनेक जण त्या दोषांसह ती व्यवस्था शिरसावंद्य मानत असतीलही, तर उलटपक्षी अनेकजण ती परंपरा/व्यवस्था अगदी 'ट' अक्षरापर्यंत पाळत नसतीलही. परंतु म्हणून त्या दोषांचा उल्लेख वारंवार नि सरसकट 'वाळवंटी' म्हणून व्हावा का, चिंजं?
जाता जाता : उत्तरेकडचे ब्राह्मण आणि महाराष्ट्रातले ब्राह्मण ह्यांच्या परंपरा पाळण्याच्या प्रमाणातही फरक असावा. त्यामुळे आपण काही प्रमाणात तोदेखील लक्षात घ्यायला हवा.
मुद्दा कळला नाही. आंबेडकरी चळवळ ही महाराष्ट्रातली, की उत्तरेकडची? बोले तो, ज्या ब्राह्मणांशी त्यांचा पाला पडू शकतो, ते महाराष्ट्रातले, की उत्तरेकडचे?
----------
१ असे म्हणणे हेही त्या व्यवस्थेत पाप - कदाचित दंडनीय पाप - असू शकते, ही बाब अलाहिदा. अन्यथा, कोठलीही व्यवस्था म्हटली, की दोष असायचेच.
हेही मान्य. मी पाहिलेल्या
हेही मान्य. मी पाहिलेल्या मुलींमध्ये आजकाल ज्यांना 'लिबरल' किंवा 'अति स्वातंत्र्य दिल्या' गेलेल्या, इ. त्या जनरली कोब्रा असतात. (सिरीअस्ली. दिसलं ते सांगतोय. बाय्स्ड नाहीये.)
आणि बहुजन मुली, साधारणतः मोबाईल चेक, कपडे तथाकथित 'योग्य' घालण्याची सक्ती, सातच्या आत घरात इत्यादींना तोंड देतात.
आणि, ही जनरल ऑब्सर्व्हेशन्स आहेत. अपवाद दोन्हीमध्ये अगणित आहेत. बहुतेक सोशिओ पेक्षा इकॉनॉमिक मुद्दे वरील गोष्टींना कारणीभूत आहेत. (हेही जनरलच.)
मुले सगळीकडे जवळपास सारखीच. (मुलगे सारखेच. :P)
असो.
लेख तितकाही वाईट वाटला नाही.
बाकी बायसेसबद्दलच म्हणाल, तर मला आहेत, तुम्हाला तर आहेतच आहेत; तेव्हा त्यांनाही असले, तर त्याने तितकेही काही बिघडू नये, नाही का? ते बायसेस मान्य करायला नकोत, त्यांचा प्रतिवाद नक्कीच करता येईल, पण... ते टॉलरेट करायला तितकीही अडचण नसावी; कसें?
नुकतेच जेव्हा लातूरमधील
नुकतेच जेव्हा लातूरमधील संविधान मोर्चामध्ये एका मुलीचं भाषण झालं तेव्हा त्याला आलेली प्रत्यूत्तरे भयानक होती. "तुम्ही दलित आदिवासी बायका तुमची लायकीच आहे रांडा म्हणून रहाण्याची... माझ्या बापाने एक नाही चार चार रांडा ठेवल्या आहेत," असं लोक उघडपणे म्हणत होते.
https://www.youtube.com/watch?v=cL8MWncm2Ts
ही एका लातूरच्या भाषणाची लिंक आहे. त्याखालचे कमेंट आमच्या देशाची निश्चित स्थिती काय आहे हे सांगतात. पण लेखिका म्हणते (म्हणजे म्हणत नाही, पण मला तसं वाटलं) तसे वाईट लेखन फक्त सर्वण करताहेत असे नाही. दलित पार्टीचे लोक देखिल तोडीस तोड आहेत.
=============
ज्या लोकांनी स्वतः अपशब्द वापरले नाहीत आणि मात्र इतरांनी त्यांच्याबद्दल वापरले तर कायदेशीर कारवाई करावी. समाजाला सगळं शिकवता येईल, पण तोंड आवरायला काहीतरी कडक केलं पाहिजे.
अमर खाडे
>> हे अमर खाडे प्रकरण काय आहे?
आंबेडकरी चळवळीतल्या ह्या तरुणानं नुकतीच फेसबुकवरून दलित स्त्रियांविषयी हीन टिप्पणी केली होती. काही दिवसांपूर्वी ते प्रकरण विशिष्ट वर्तुळांत व्हायरल झालेलं होतं. आता खातं डीअॅक्टिव्हेट केलेलं असावं. अशी इतर प्रकरणंदेखील आहेत. एका फेसबुक पानावरून आंबेडकरी मीम्स चालू झाले होते. त्यातले काही इथे पाहता येतील. आता ते पान बंद झालं आहे, पण दुसर्या नावानं सुरू झालं आहे असं समजतं (मी पाहिलेलं नाही).
शिवाजी महाराज जरी व्हॉटस
शिवाजी महाराज जरी व्हॉटस अॅपवर असते तरी त्यांना बेजार करणार्या त्या राणीबद्दल मेसेजेस पाठवलेच असते असं म्हणायचं आहे का?
=========
सांता बांता वरचे जोक शेअर करणारांना सरदार लोक स्पर्धा इ करून परेशान करत असतात का? उगाच काहीही.
========
स्त्रीयांना समाजात अधिकार नव्हते इ इ शुद्ध आवई आहे.
टू स्टेप्स लेफ्ट ऑफ मार्क्स.
इतक्या दिवसांनी असं काहीतरी वाचायला मिळालं की प्रतिक्रिया द्यायला बोटं अक्षरशः शिवशिवली.
प्रस्तावनेशी अगदीच सहमत. नो क्रॉस.
पहिल्या परिच्छेदात लेखिकेला सामान्य स्त्रीवर्गाला सोमि वर कशाकशाला तोंड द्यावं लागतं ह्याचा उहापोह आहे. मु़ळात सरासरी समाजाच्या कोणत्याही स्त्रीवर्गाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात इतकी प्रचंड मन्वंतराची गरज आहे, की त्याला जवळपास काही जनरेशन गॅप्स एव्हढा कालावधी नक्कीच लागेल, असं माझं प्रामाणिक मत आहे. तेव्हा सांप्रत स्थिती पाहता मुलींना जे घरातून धडे दिले जातात ती, दुर्दैवाने, काळाची गरज आहे. अर्थात सोमि पासून दूर रहावं हा प्रचंड एक्स्ट्रेमिस्ट विचार आहे, आणि अशा कुठल्याही विचारांत जराही तथ्य नसतं.
दुसर्या परिच्छेदापासून
ब्राह्मणी पितृसत्ताक
हा प्रकार इतक्या जास्तवेळा वापरला गेला आहे, की संपूर्ण स्त्रीवादी लेखाला आपसूक जातीय रंग चढलाय. राहुल सांस्कृत्यायन ह्यांचं व्होल्गा ते गंगा किंवा साधं तिसरीचं इतिहासाचं पुस्तक वाचलं तर हे साधारण निरीक्षण आहे की मातृसत्ताक पद्धतीतूनच आजकालची पितृसत्ताक पद्धती अस्तित्वात आलेली आहे, आणि त्यामागचं जे काही आदिम कारण असेल तेच सध्याच्या स्थितीस कारणीभूत आहे. आता ब्राह्मण्यप्राबल्याचा विचार केला तर ते साधारण पेशव्यांच्या काळात उदयास आलेलं आहे, किम्बहुना त्याच्याही नंतर. त्यामुळे केवळ ब्राह्मणांना ह्या कारणासाठी दोष देण्यात अर्थ नाही.
बलुतं, उपरा, बन्द दरवाजा, झोम्बी इत्यादी पुस्तकं वाचताना लक्षात येतं की लेखकाच्या काळात त्याच्यावर जातीय अत्याचार, मुख्यत्वे एका तिसर्याच जातीच्या लोकांनी केलेले आहेत. अर्थात ब्राह्मणांनी अत्याचार केले नाहीत असा ह्याचा निष्कर्ष नाही. परंतू ब्राह्मणांना त्याचं ड्यू क्रेडिट बर्यापैकी मिळालंय, मिळतंय, मिळत राहणारे. पण, let me go out on a limb and say; ह्या दुसर्या लोकांचे कांगावे (भलत्याच बेसिसवर) आजकाल जरा अतीच सुरू आहेत, आणि ते व्यवस्थित ऐकूनही घेतले जाणार आहेत.
तिसर्या परिच्छेदात लेखिका नव्याकोर्या, भयानक सामाजिक विषयाला वाचा फोडते, आणि लोणच्यासारखा ब्राह्मणी शब्द जिथेतिथे तोण्डी लावते. मटा/लोकसत्ता/सकाळ आदी फेसबुक पानांवर जर ब्राह्मणां(च्या अस्मिते)विरुद्ध काही मजकूर असला आणि ह्या तिसर्या लोकां(च्या अस्मिते)विरुद्ध काही असलं तर त्यावरच्या हेट कमेन्ट्स, भाषेची प्रत, शब्दान्चा दर्जा ह्याच गोष्टी ह्यांवर जSरा तुलनात्मक लक्ष ठेवलं की, सोमिंवर प्राबल्याने वरील दोनपैकी बहुसांख्यिक कोण आहेत, आणि त्यांची साधारण आकलन पातळी (Read as: Butthurt level) केव्हढी ह्यागोष्टी लगेच लक्षात येतात. अरुणजोशींनी दिलेल्या दुव्यातल्या कमेंट्समध्येही ह्या दोघांतल्या नक्की कोणाचे प्रतिनिधी बडबडताहेत ते जाऊन पाहता येईल. लेखिकेने क्वोट केलेले विचार, त्या तकियाकलममुळे उगीच फक्त ब्राह्मणांनी केल्यासारखे वाटतात, किंवा ज्यांनी केलेत त्यांना ब्राह्मणांची फूस असल्यासारखी वाटते.
चौथ्या परिच्छेदात लेखिकेने, एकूण लेखाचा तोल जSSSरा उजवीकडे झुकवण्यासाठी एक उदाहरण दिलंय. त्यातही समाजात स्वत:ला आंबेडकरवादी म्हणवून घेणारा इसम वैयक्तिक आयुष्यात पशू असेल तर तो आंबेडकरवादी (Read as:आम्च्यातला) नाही, असं सोयिस्कर मत मांडलेलं आहे. 'हिन्दू' किंवा 'ब्राह्मणी पितृसत्ताक' एमसीपीज् ना हे स्वातंत्र्य नाही. त्यांच्यातही पशू असतातच, आणि ते त्यांना पचवून घ्यावे लागतातच, कारण दहशतवादाला धर्म नसतो, पण योगाभ्यासाला असतो.
एकूण सोमि वरच्या 'तशा' प्राण्यांना, ते ज्यांच्या मागे पडले असतात त्या मुलीच्या जातीशी काही देणंघेणं असतं असं मला वाटत नाही. अर्थात जातिंवर आधारित वादविवाद चालू असेल तर अर्थातच सगळेच पशू होतात हे सांगणे नलगे, आणि त्यासंदर्भात शेवटच्या परिच्छेदाला नो क्रॉस. त्यातल्या प्रत्येक शब्दाशी मी सहमत आहे.
मुळात राजकारण्यांच्या पद्धतींवर टीका करताना लेखिका आपले 'प्रतिब्राह्मणी'(हेन्स, राजकीय) मुद्दे मांडण्यासाठी सोमिवरच्या स्त्री शोषणाचा आधार घेते म्हणणं फार अतिशयोक्त होणार नाही.
शूट अवे.
मुळात राजकारण्यांच्या
मुळात राजकारण्यांच्या पद्धतींवर टीका करताना लेखिका आपले 'प्रतिब्राह्मणी'(हेन्स, राजकीय) मुद्दे मांडण्यासाठी सोमिवरच्या स्त्री शोषणाचा आधार घेते म्हणणं फार अतिशयोक्त होणार नाही.
असा हेतूंवर आरोप करणे योग्य नाही. या लेखाची दिशाहिनता मला एक प्रकारे लेखिकेची प्रामाणिकता दाखवते. आपण ज्या पार्श्वभूमीतून येतो तेव्हा तिथले खूप बायसेस घेऊन येतो. नवीबाजू म्हणतात तसे त्यात एवढं काय नाही. ब्राह्मणी आणि पुरुष हे असेच बदनाम झालेले शब्द पेरणे हा असाच एक बायस आहे. ते दुर्लक्षिले तर लेखिकेला वेगवेगळ्या सर्वण आणि दलित लोकांनी आणि पुरुषांनी काय अनुभव दिले आहेत हे तिने सांगीतले आहे.
=======
यात राजकीय/राजकारणी देखिल काही नाही. सामाजिक विचार मांडताना एक दोन राजकारण्यांचे उल्लेख येतातच.
पटलंय.
पटलंय. परंतु हे सगळं लेखिकेच्या इनोसन्स वर चॉक अप करायचं म्हटलं मग मुळात पूर्ण लेखच निरागस आहे. प्रतिक्रिया द्यायचीच गरज नाही. कारण ब्राह्मणी हा शब्द वगळता बाकी जे लिहीलंय त्यात अंशमात्रही चूक नाहीये. हे मी शंभर टक्के, मनात कोणताही आकस न ठेवता लिहीतोय. ह्यावर बहुतेक बाकी सगळ्यांचं एकमतही आहे.
माझे ते तिसर्या जमावाबद्दलचे मुद्दे मात्र मी जन्मात मागे घेणार नाहीये.
बाकीचे सगळे मुद्दे पटण्यासारखे आहेत, पण...
कधीकधी लोक स्त्रीयांच्या लैंगिकतेवरून आक्षेपार्ह विधाने करतात. नुकताच माझ्या एका आंबेडकरवादी मैत्रिणीला स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेणाऱ्या एका मुलाने असाच त्रास दिला. तिने प्रत्यक्ष ओळख नसताना देखील समविचारी वाटल्याने फेसबुकवर त्याच्या मैत्रीचा स्वीकार केला व त्याने मात्र याचा गैरफायदा घेतला.
एका आंबेडकरी मुलाने एका आंबेडकरी मुलीशी काही गैरवर्तन केले, (ही बाब कितीही गर्हणीय असली, तरी१) यात ब्राह्मणी पितृसत्ताक समाजाचा नक्की काय संबंध आहे? बोले तो, आजकाल आंबेडकरी चळवळीत ब्राह्मणांचाही सहभाग आहे काय?२ की आंबेडकरी चळवळीस तूर्तास ब्राह्मणांनी इन्फिल्ट्रेट केलेले आहे?३ की, (गॉड फॉर्बिड, पण) आंबेडकरी समाजातसुद्धा (दुर्दैवाने) त्याच (तथाकथित ब्राह्मणी) पितृसत्ताक 'मूल्यां'चा प्रादुर्भाव आहे?४ यांपैकी नक्की काय म्हणायचे आहे, असा प्रश्न (बाबासाहेबांबद्दल पूर्ण आदर बाळगून) विचारावासा वाटतो.
..........
१ म्हणजे, एका मुलाने एका मुलीशी काही गैरवर्तन केले, ही बाब. स्पेसिफिकली एका आंबेडकरी मुलाने एका आंबेडकरी मुलीशी काही गैरवर्तन केले, ही नव्हे. (न्युआन्समध्ये फरक पडतो, म्हणून स्पष्ट केले, इतकेच. शिवाय, दुसऱ्या पर्यायात, एका (उदा.) ब्राह्मण मुलाने एका (उदा.) ब्राह्मण मुलीशी काही गैरवर्तन करणे हे गर्हणीय नाही, असे अभावितपणे सुचविले जाते, विच कुड बी फार्देष्ट फ्रॉम द ट्रूथ अँड द लीष्ट ऑफ माय इण्टेन्शन्स. म्हणून.)
२ असे खरोखरच असल्यास हे प्रगतीचे लक्षण मानावे काय? पूर्वी असे नव्हते.
३ असे असल्यास दुर्दैव!
४ शेवटी घरोघरी मातीच्याच चुली. चालायचेच.
नाही, म्हणजे...
...ब्राह्मणांचे जर काही भले व्हावयाचे असेल, तर सर्वप्रथम पारंपरिक ब्राह्मणी थेरडेशाहीचा नि:पात झाला पाहिजे, हे तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे, शतश: मान्य होण्यासारखे आहे. पण मग ते ब्राह्मणांना आपापसात पाहून घेऊ द्यात की! इतरांनी त्यात का पडावे? ब्राह्मणांचे भले झालेच पाहिजे, असा आग्रह धरण्याकरिता इतरांचा लोकस ष्ट्याण्डाय काय?
समाजाचाच भाग ना?
भारतातले दलित किंवा सवर्ण हे काही एखाद्या मोठ्या अंतरिक्षकुपीतून इथे अवतरलेले नाहीत. त्यांची जडणघडण इथेच झाली आहे आणि ते एका अंतर्विरोध आणि वैविध्य असलेल्या समाजाचा हिस्सा आहेत. तेव्हा ह्या व्यापक ओळखीमध्ये जे गुणदोष असतील ते या छोट्या छोट्या (दलित,आंबेडकरवादी,ओबीसी वगैरे)हिश्श्यांच्या ओळखीमध्ये असणारच. समग्र आणि सकल (आहे ना पुरेसे 'भारदस्तक'?)समाज जी वेडीवाकडी वळणे घेईल त्याच वळणांवरून हे छोटे गटही जातील. जर या गटांपैकी अनेकांनी स्वयंप्रेरणेने वेगळे वळण घ्यायचे ठरवले तर हळूहळू सगळ्या समाजाच्या दिशेवर प्रभाव पडू शकतो. तेव्हा आता समाज अथवा त्याची मानसिकता बदलण्याची जबाबदारी स्वतंत्रपणे आणि एकत्रपणे या छोट्या छोट्या प्रत्येक गटावरच आहे. ही रस्सीखेचच असणार आहे. बलवान बाजूकडे नेहमीच सगळे ओढले जातील असे नाही. दुर्बळांच्या सत्तच्या नेटामुळे सबळांची शक्ती क्षीण होऊ शकते. होतेच.
दुर्गुण हे जातिविशिष्टच आहेत असे नाही पण ते असण्याची जाणीव मात्र जातिविशिष्ट दिसते.
कुठल्याही न पटलेल्या
कुठल्याही न पटलेल्या गोष्टींचा उहापोह करताना ब्राह्मणी/ मनुवादी अशा शब्दांची बाय डिफॉल्ट वापर विद्रोही चळवळीत होतो हे मी अनुभवाने सांगू शकतो. जिथे संधी मिळेत तिथे व संधि मिळाली नाही तर घुसडून या शब्दांची फोडणी दिली जाते. मनातील सुप्त रागाला वा मोकळी करुन समाधान देण्याचा तो प्रयत्न असतो. अब्राह्मणी प्रबोधनाला पर्याय नाही" - प्रा. प्रतिमा परदेशी http://aisiakshare.com/node/3361 या ऐसीवरील लेखात ते दिसून येते.
ते पंचिंग बॅग म्हणतात ना तसे ते आहे.
त्या लेखातूनच
त्या मुलाखतवजा लेखातही प्रा. परदेशी म्हणतात -
पुन्हा पुन्हा सांगतेय, ब्राह्मणी/अब्राह्मणी स्त्रीवाद याचा शब्दशः अर्थ घेऊ नये. या संकल्पना म्हणून वापरल्या जातात. स्त्रीदास्य आणि पुरुषसत्ता यांचं समर्थन करणारा विचार ब्राह्मणी म्हणून ओळखला जातो. जाती, वर्ग, स्त्रीदास्य यांचा अंत करते ती विचारधारा अब्राह्मणी म्हणून ओळखली जाते. मांडणी करणार्य़ाची जन्मदत्त जात कोणतीही असली, तरी पुरुषसत्ता, भांडवलशाही यांना विरोध करणाऱ्यांना अब्राह्मणी प्रवाहातलं समजलं जातं.
तरीही 'ब्राह्मणी' या शब्दाचा शब्दशः अर्थ लावून, पुन्हापुन्हा अस्मिता दुखावून घेणारे ऐसीकर बघून 'मौज' वाटली. तेच ते आणि तेच ते.
----
परवाच मी आणि एक मैत्रीण बोलत होतो. तिनं 'गार्डियन'वरची ही बातमी वाचली - Girls believe brilliance is a male trait, research into gender stereotypes shows . ती असं काहीसं म्हणाली की, 'गार्डियन'सारख्या डाव्या विचारांच्या संस्थळावरही जेव्हा अशा प्रकारच्या बातम्या येतात तेव्हा किती ट्रोलिंग होतं. या लोकांना स्त्रियांची बुद्धी, आणि त्यांच्यावर अन्याय होतो या गोष्टी पटतच नाहीत का!
त्यावर मी तिला म्हटलं ते काहीसं असं - ऐसीवरही पाहा; एरवी सुसंगत बोलणारे लोकही स्त्रीवादाचा विषय निघाला की काय वाट्टेल ते बोलतात. पिंडी ते ब्रह्मांडी!
यावर अधिक चर्चा करून काहीही साध्य होणार नाही, हे जाणवून आम्ही दोघींनीही विषय बदलला. तिच्या-माझ्यासारख्या सुशिक्षित, ब्राह्मण स्त्रियांना जात या प्रकाराचा उपद्रव होतच नाही. भाग्येशासारख्यांना, बहुसंख्य भारतीय स्त्रियांना ते सुख नाही.
स्त्रियांचे प्रश्न नक्की काय असतात, हे पुरुषांना मुळातच समजत नाही; असं विधान अलीकडेच (ट्रंपच्या 'ग्रॅब देम बाय द पुसी' विधानानंतर) केल्यावर माझ्या मित्राच्या भावना दुखावल्याचं मला जाणवलं होतं. ब्राह्मणेतर स्त्रियांचे प्रश्न काय असतात, हे बहुदा ब्राह्मणी पुरुषांना कधीही समजणार नाही. आपल्याला समजत नाही, हे सुद्धा ज्यांना समजत नाही, त्यांना या लेखाचा आणि कसलाच काहीही फायदा होणार नाही. पण उरलेल्यांना कदाचित आपापल्या 'एको चेंबर्स'च्या, परीघाच्या बाहेर काय सुरू आहे याची जाणीव देणारं, संयत लेखन वाचून काही नवीन मिळेल, असं वाटतं.
...
कदाचित आपापल्या 'एको चेंबर्स'च्या, परीघाच्या बाहेर काय सुरू आहे याची जाणीव देणारं...
कदाचित दुसऱ्या एको चेंबरमधलं?
आणि दुसऱ्या एको चेंबरमधली कर्कशताच जर ऐकायची असेल, तर तिच्यामारी मग माझा एको चेंबर काय वाईट आहे? निदान आय याम यूज़्ड टू अँड कंफर्टेबल विथ द क्याकोफनी ऑफ माय ओन एको चेंबर!
कॉमन कॉज़ करायचा असेल, तर बोला. बरोबरीने बोला, लेव्हलवर बोला. मग कित्येक कॉमन इश्यूज़ निघतील. किंबहुना, कित्येक इश्यूज़ हे खरे तर कॉमन आहेत, हे लक्षात येईल. मग बात होऊ शकेल कदाचित. पण नुसतेच किंचाळायचे जर असेल, तर बोलण्यात सोडा, ऐकून घेण्यातही स्वारस्य नाही. तुम्ही तुमच्या एको चेंबरात किंचाळा, आम्ही आमच्या एको चेंबरात बरे आहोत.
तरीही 'ब्राह्मणी' या शब्दाचा
तरीही 'ब्राह्मणी' या शब्दाचा शब्दशः अर्थ लावून, पुन्हापुन्हा अस्मिता दुखावून घेणारे ऐसीकर बघून 'मौज' वाटली. तेच ते आणि तेच ते.
ब्राह्मण्य ब्राह्मणी हे शब्दच्छलाचे विषय आहेत. मायबोलीवर एके ठिकाणी चर्चा केली आहे. http://www.maayboli.com/node/52369 ऐसी वर ही ती झाली असणार. प्रा प्रतिमा परदेशी या विद्रोही चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. ब्राह्मण ब्राह्मण्य या शब्दांचे विद्रोही चळवळ वेगळेच अर्थ लावते असते ते भाषा शास्त्राशी सुसंगत असतातच असे नाही. लिखित शब्द , बोली व देहबोली यातून व्यक्त होणारे अर्थ वेगळे असू शकतात. जसे देवा धर्माला आमचा विरोध नाही हे अंनिस चळवळीत लिखित स्वरुपात होते पण प्रत्यक्ष चळवळीत व कार्यकर्त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होणारे अर्थ हे विरोधातच आहे हे जाणवून देणारे असतात.
असो या शाब्दिक कसरती केवळ कायद्यात वा तत्वज्ञानात नसून समाजकारणार राजकारणात ही आपण पहात असतो. अंनिस तल्या वीस पंचवीस वर्षातल्या काळात मी यावर मौन बाळगणे पसंत करीत असे. हल्ली जरा मौन कमी केल आहे एवढच.
तेच ते आणि तेच ते लिहायचा कंटाळा येतो हे मात्र खरे. दाभोलकरांशी माझी यावर व्यक्तिगत चर्चा होत असे. सगळ्याच गोष्टी सांगता येत नाहीत.
पुन्हा पुन्हा सांगतेय,
पुन्हा पुन्हा सांगतेय, ब्राह्मणी/अब्राह्मणी स्त्रीवाद याचा शब्दशः अर्थ घेऊ नये. या संकल्पना म्हणून वापरल्या जातात. स्त्रीदास्य आणि पुरुषसत्ता यांचं समर्थन करणारा विचार ब्राह्मणी म्हणून ओळखला जातो. जाती, वर्ग, स्त्रीदास्य यांचा अंत करते ती विचारधारा अब्राह्मणी म्हणून ओळखली जाते. मांडणी करणार्य़ाची जन्मदत्त जात कोणतीही असली, तरी पुरुषसत्ता, भांडवलशाही यांना विरोध करणाऱ्यांना अब्राह्मणी प्रवाहातलं समजलं जातं.
आंबेडकरी चळवळीत काम करणारे जे मूर्ख स्त्री-पुरुष आहेत ते म्हारडेवादी किंवा चांभारडेवादी आणि जे सूज्ञ आहेत ते ब्राम्हणी अशी नविन डेफिनेशन एखाद्याने तयार केली तर त्याबद्दल तुमचे आणि परदेशी यांचे मत काय आहे हे वाचायला आवडेल.
येथे म्हारडे किंवा ब्राम्हणी या शब्दांचा रुढ किंवा शब्दशः अर्थ घेउ नये.
असे प्रतिसाद लिहित जाऊ नका.
असे प्रतिसाद लिहित जाऊ नका. तुमचा उद्देश दलितांचा अपमान करणे इ आहे असे मानले जाईल. जाऊ शकते. लोकांना फटकन दुष्ट मानणे, मूर्ख मानणे आणि जातीयवादी मानणे ही या काळाची प्रवृत्ती आहे. कायद्याप्रमाणे ब्राह्मण या शब्दाचं गुंडगिरीकरण केलं तर ते कसं चूक आहे हे सांगत बसणं इतकंच आपल्या (ब्राह्मणांच्या वा त्यांच्या समर्थकांच्या) हातात आहे. पण तस्सेच उलटे आरोप करणे, त्याच शब्दांत करणे कायदेशीरच नाही. ते टाळा असा सल्ला.
ब्राम्हणी /पितृसत्ता /अथवा
ब्राम्हणी /पितृसत्ता /अथवा पुरुषसत्ताक?
१) फार पुर्वी एक राजा असतो त्याच्या राज्यात समृद्धी असते. पण राजा दु:खी असतो. राज्याला वारस नसतो......
- अशा गोष्टी वाचताना लहान मुलींना नक्कीच दु:ख होत असेल.
असली चर्चा घराघरात आताही चालू असते ती मुलीना हळूहळू कळते तशी मुलांनाही कळते. आपण काही स्पेशल आहोत.पुढे कधीकधी बॅास म्हणून एक मुलगी येऊ शकते. एखादी मुलगी बाप मेल्यावर चुलतभावाला भाव न देता मडके घेऊन स्मशानात जाते,अग्नी देते. मग पुरुषवर्गाचा संताप ,तिळपापड होतो.
तरी पण यात ब्राह्मणी काय आहे?
तरी पण यात ब्राह्मणी काय आहे?
माझी एक (ब्राह्मण) काकू नुकतीच वारली. (माझी चुलतबहीण अमेरिकेत गेली असल्यामुळे) तेव्हा तिचे सर्व सोपस्कार जावयाने केले.
काकूच्या घरी आणि माझ्याही घरी हे सोपस्कार मी करायला हवे असा विचार (मी तिथे हजर असूनही) कोणाच्या मनात आला नाही.
फार पुर्वी एक राजा असतो
फार पुर्वी एक राजा असतो त्याच्या राज्यात समृद्धी असते. पण राजा दु:खी असतो. राज्याला वारस नसतो......
- अशा गोष्टी वाचताना लहान मुलींना नक्कीच दु:ख होत असेल.
मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती ऐकून लहान मुलामुलींना सुख किंवा दु:ख काय होईल ते सांगा.
फार पूर्वी एक-दोन-तीन राजे नि एक -दोन -तीन राण्या असतात (त्यांच्या पक्क्या जोड्या लावायच्या का नाही ते मुलांवर सोडू). त्यांच्या राज्यात समृद्धी असते. कोणताही राजा किंवा राणी दु:खी पण नसतो. राज्याला वारस पण खंडीभर असतात.... अज्याबात कै प्रॉब्लेम नसतो. मग एकेक करून सगळे राजे मरतात आणि राण्या मरतात. सगळे राजकुमार आणि राजकुमार्या तिथे राहू लागतात. त्यांच्या बायका नि नवरे पण तिथे राहायला येतात. (या दुरुन आलेल्या नव्या सदस्यांना लेकरे दूर गेली म्हणून दु:ख होते पण ते सहन करतात. शिवाय म्हातारपणी त्या काळात जे कल्याणकारी राज्य होते ते म्हातार्यांची सेवा करत नसे म्हणून ते तडफडून मरत. शिवाय ते लोक मेले कि घरात राहायला कोणी नसल्याने तिथे कबुतरे राहत.) ते पण राजवाड्यात सुखाने राहतात. मग ते सगळे हळूहळू मरतात आणि राजवाड्यात नव्या पिढीची गर्दी मात्र वाढते. शेवटी माणसे कोंबून कोंबून वाड्याच्या भिंती तुटतात. मग हे लोक अजूनच मोठा राजवाडा बांधतात. शेवटी हा राजवाडा एका नगराइतका होतो. पण समस्या कै सुटत नाही. मग एकजण म्हणतो कि योग्यतेच्या आधारावर आपण गृहप्रमुख नेमू. जो जास्त योग्य आहे तो इथे राहिल, जो नाही तो आपल्या नवर्या वा बायको कडे राजवाड्याबाहेरच्या घरात राहायला जाईल. मग भाऊ- बहिण चर्चा करायला लागले, त्यांनी योग्यतेचे निकष ठरवले, आणि जो जास्त योग्य आहे तो सगळे निणर्य घेई. अर्थातच योग्य व्यक्तिने निर्णय घेतल्यामुळे, जे आता सर्वत्र होत आहे, कोणी दु:खी नाही.
* ब्राह्मणी हा शब्द इथे
* ब्राह्मणी हा शब्द इथे ब्राह्मण समाजाची अशा अर्थाने वापरलेला नसून ब्राह्मणांचे वर्चस्व ज्या व्यवस्थेला मान्य आहे/ ज्या व्यवस्थेमुळे ते टिकून राहिले आहे, ती व्यवस्था असा घ्यावा.
* पितृसत्ता आणि जातिसंस्थेचा संबंध काय? तर या दोन्ही व्यवस्था एकमेकींच्या मदतीने बळकट होत आल्या आहेत. उदा. स्त्रियांवर अन्यायकारक अनेक प्रथा या त्या त्या जातीच्या रूढींच्या द्वारे प्रचलित होत्या/ आहेत. याचा अर्थ जातिसंस्था नसेल तर पितृसत्ताक पद्धती निर्माणच होणार नाही किंवा या दोन व्य्वस्था एकमेकींशिवाय दिसून येत नाहीत असे नव्हे.
लेख/प्रतिसाद
लेख नि प्रतिसाद रोचक.
"समताधारक समाजाच्या उभारणीकरता धडपडत असताना दलित आदिवासी इतर मागासवर्गीय स्त्रीयांना जात आणि स्त्रीदास्य ह्या दोन्ही आघाड्यांवर संघर्ष करावा लागतो." हे लेखातलं वाक्य कळीचं वाटलं. बरेचसे मुद्दे त्या अनुषंगाने येतात.
इथे झालेल्या चर्चेनुसार "ब्राह्मणी" या विशेषणाने एकंदर लेखाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन मोठ्या प्रमाणात बदललेला जाणवला. त्या विशेषणाच्या निमित्ताने जे आक्षेप उपस्थित केले गेले आणि त्या आक्षेपांबद्दल स्पष्टीकरण देण्यात बरीच सामूहिक ऊर्जा खर्च झालेली आहे असं दिसतंय. तर ठीक आहे, ते विशेषण एकंदर ऐतिहासिक संदर्भातलं आहे इतपत मुद्दा किमान मला मान्य आहे आणि त्यापलिकडे या लेखाचं आकलन करून घेण्याची इच्छा एक वाचक म्हणून माझ्यात आहे इतकं याबाबत म्हणतो.
लेख चांगला आहे. काही प्रकारची लिखाणं अवतीभवती घडणार्या घटनांचा पॅटर्न समजावून सांगतात, त्यातून वर्तमानाचं अधिक टोकदार आकलन आपल्याला होतं. लेखातला (वरच्या वाक्यात उधृत केलेला) तात्त्विक मुद्दा तसा परिचित आहे. त्याचंच अधिक घटना/पॅटर्न्सनुसार खोलवरचं आकलन मला लेखामुळे झालं. समकालीन जगण्याच्या वेगवेगळ्या संदर्भातच हा भेदभाव, अन्याय, विसंगती या गोष्टी कुठे नि कशी जाणवतात, मुख्य म्हणजे अन्य प्रागतिक म्हणवून घेणार्या घटकांबरोबर त्या कशा अनुभवाला येतात हे सर्व इथे नव्याने जाणवलं.
ब्राम्हणी विचार आणि मनुस्मृती हेच
ब्राम्हण आणि मनुस्मृती हेच आपले शत्रु आहे असे आजच्या युगातही माननार्या साध्याभोळ्या (???) लोकांची खरोखरीच कीव येते.
साधने नवीन वापरायची पण ती वापरताना नवीन विचार रुजवायचा नाही, उदाहरणे पुराणकाळातीलच द्यायची आणि तीच ती जुनी घाण चिवडत सारखी चिवडत राहायची याला काय अर्थ आहे कळत नाही ?
मुळात ब्राम्हण असो की दलित, एक पुरुष म्हणून आपल्यात स्त्रियांविषयी काल कसे विचार होते, आज काय विचार आहेत, विचारांत काही उदारमतवादीपणा, चांगुलपणा आलाय का ? काही फरक पडलाय एवढे बघीतले तरी पुरेसे नाही काय ?
पण, पण, पण ...
"आपल्या ब्राह्मणी पितृसत्ताक समाजामध्ये" या ऐवजी नुसतं "आपल्या पितृसत्ताक समाजामध्ये" असं लिहिणं शक्य होतं की नाही ?
एका शब्दाबद्दल आक्षेप आहे, तर तो टाळून किंवा त्या शब्दवापराबद्दल 'असहमतीबद्दल सहमत' होऊन, बाकीचा लेख वाचून त्याबद्दल विचार व्यक्त करणं शक्य होतं का नाही? किंवा अनेकदा चर्चांमधून असं दिसलेलं आहे की काही गोष्टींमध्ये, काही लोकांशी सहमती होणं शक्य नाही; तरीही त्या विषयांबद्दल तेच-ते आणि तेच-ते बोलणारे लोक जालावर दिसतात का नाही?
ब्राम्हण आणि मनुस्मृती हेच आपले शत्रु आहे असे आजच्या युगातही माननार्या साध्याभोळ्या (???) लोकांची खरोखरीच कीव येते.
जरूर कीव करा.
लेखात ब्राह्मणांना नावं ठेवलेली आहेत, असं समजणाऱ्यांचं, विशेषतः हा आणि हा प्रतिसाद आल्यानंतरही हेच मानणाऱ्या लोकांचं काय करायचं तेही लिहा.
ब्राह्मण आणि दलित
ब्राह्मण आणि दलित एवढे दोन शब्द उठता बसता वापरायची जुनी सवय सोडून दिली तरी बरीचशी मानसिक दु:खे हलकी होतील असे वाटते.
बाकी लेखात ब्राह्मणांना नावे ठेवलेली आहेत असा आक्षेप नाही मात्र केवळ एका शद्बाबद्द्ल आक्षेप असेल तर दुसर्या लेखात तो एक शब्द गाळून म्हणणे मांडण्याचा प्रयोग लेखिकेने एकदा तरी करुन बघायला हरकत नसावी असे साधारणपणे वाटते.
कोण, कुठे, कधी म्हणाले?
ब्राह्मण हा शब्द कोणी, कुठे आणि काय संदर्भात उठता-बसता वापरलेला आहे?
एका शद्बाबद्द्ल आक्षेप असेल तर दुसर्या लेखात तो एक शब्द गाळून म्हणणे मांडण्याचा प्रयोग लेखिकेने एकदा तरी करुन बघायला हरकत नसावी असे साधारणपणे वाटते.
का बदलावा? कोणाचा आक्षेप? खरं म्हणजे, या आक्षेपामागचं गांभीर्य नक्की किती? का फक्त 'आमच्या भावना दुखावल्या, तुमची अभिव्यक्ती बदला' एवढंच म्हणणं आहे?
जाताजाता - स्त्रीवादाची भाषा काय असावी, पर्यायानं स्त्रियांची अभिव्यक्ती कशी असावी, याबद्दल पुरुषांनी सल्ले देणं हा स्त्रीद्वेषच हो!
'आरक्षणाची अवलाद' अशा पोस्टना
'आरक्षणाची अवलाद' अशा पोस्टना तोंड देत असतानाच 'लड़कियां ऐसीही होती है' यांसारख्या तर्कहीन गोष्टींना सामोरं जावं लागतं. नुकतेच जेव्हा लातूरमधील संविधान मोर्चामध्ये एका मुलीचं भाषण झालं तेव्हा त्याला आलेली प्रत्यूत्तरे भयानक होती. "तुम्ही दलित आदिवासी बायका तुमची लायकीच आहे रांडा म्हणून रहाण्याची... माझ्या बापाने एक नाही चार चार रांडा ठेवल्या आहेत," असं लोक उघडपणे म्हणत होते. या घटनेचा विचार करता दलित आदिवासी स्त्रियांना या व्यवस्थेत अधिक मानहानीला सामोरे जावे लागते असे मला वाटते.
बाप रे!!! हॉरिबल.
.
"लडकियां ऐसीही होती है" हा जेंडरस्टिरिओटाइप विचार तर मुली/बायका सुद्धा करतात. मूर्खपणा आहे तो निव्वळ.
लेख आणि प्रतिक्रिया वाचल्या.
लेख आणि प्रतिक्रिया वाचल्या. ऐसीसारख्या काहीशा प्रगल्भ साइटवरही केवळ 'ब्राह्मणी' हा शब्द हीन अर्थाने वापरल्याने अनेक लोकांना राग आल्याचं स्पष्ट दिसलं. आणि गंमत अशी आहे की लेखिकेचा मुद्दा 'ज्या ब्राह्मणी व्यवस्थेला आंबेडकरवाद्यांनी विरोध केला, त्याच व्यवस्थेची राबवणुक स्वतःला आंबेडकरवादी म्हणवणारे करत आहेत.' हा विरोधाभास रागराग व्यक्त करणाऱ्या कोणाच्याच लक्षात आलेला नाही.
'ब्राह्मणी पितृसत्ताक व्यवस्था' हा शब्द लेखिकेने एक तांत्रिक शब्द म्हणून वापरलेला आहे. तो शब्द प्रस्थापित आहे. आणि तो तसा प्रस्थापित होण्यासाठी ऐतिहासिक कारणंही आहेत. यातलं मुख्य कारण म्हणजे सर्व धर्मशास्त्रं लिहिणारांनी ब्राह्मणप्रधान आणि पुरुषप्रधान मांडणी केलेली आहे. हा इतिहास नाकारण्याचा प्रयत्न का करत बसावं?
मुख्य मुद्दा असा आहे की जातीय दृष्टिकोनातून दलित जाती आहेत. या जातीवर्चस्ववादी व्यवस्थेविरुद्ध लढा द्यायला त्यांतले अनेक जण तयार असतात. मात्र याच पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रिया या सार्वत्रिकदृष्ट्या दलित आहेत. (ही परिस्थिती हळूहळू बदलत आहे, त्यामुळे अपवाद अर्थातच सापडतात.) जात्याधिष्ठित दालित्याचा विरोध करणारे स्वतः लिंगाधिष्ठित दालित्य राबवत आहेत हा अंतर्विरोध हा लेखाचा गाभा. मात्र लोक 'ब्राह्मणी' शब्दावरच अकारण अडकलेले दिसतात.
>>लोक 'ब्राह्मणी' शब्दावरच
>>लोक 'ब्राह्मणी' शब्दावरच अकारण अडकलेले दिसतात.
हो. कारण त्यामुळे अन्याय्य असलेली समाज व्यवस्था "ब्राह्मणांनी निर्माण केली" असा (आणि ती बदलून/मुळात तशी न बनवता न्याय्य बनवणे ब्राह्मणांना शक्य होते असा) अर्थ उगाच निघतो.
मुळात अन्याय्य असलेल्या व्यवस्थेला ब्राह्मणांनी नैतिक अधिष्ठान दिले
आणि
अन्याय्य व्यवस्था ब्राह्मणांनी निर्माण केली
या दोन विधानात फरक आहे. पहिल्या विधानासाठी ब्राह्मण टीकेस पात्र आहेतच. दुसर्या विधानासाठी नाहीत.
अन्याय्य व्यवस्था योग्य होती असे कोणी ब्राह्मण किंवा इतर म्हणत असतील किंवा तशी व्यवस्था राबवण्याची इच्छा कोणी राखून असेल तर ते निंदेस पात्र आहेत.
-------------------------------------------------
शब्दाचा अर्थ भलताच घ्यावा असा आग्रह योग्य नाही.
-------------------------------------------------
परदेशींच्या लेखात सुधारकांमधील (नेमक्या) ब्राह्मणांची (आगरकर, शारदा साठे, ज्योती म्हापसेकर वगैरे) बोळवण व्यवस्था बदलण्याची इच्छा नसलेले (ती व्यवस्था टिकनण्यासाठी धडपडणारे) अशी केली होती तेव्हा कितीही नाकारले तरी "ब्राह्मणी" शब्दाचा त्यांच्या मनातला अर्थ उघडच आहे. तोच शब्द इथेही वापरला आहे.
मुळात अन्याय्य असलेल्या
मुळात अन्याय्य असलेल्या व्यवस्थेला ब्राह्मणांनी नैतिक अधिष्ठान दिले
आणि
अन्याय्य व्यवस्था ब्राह्मणांनी निर्माण केली
हा शब्दच्छल आहे. सत्य हे आहे की जीवनपद्धती असलेल्या धर्माचे नियम ब्राह्मणांनी बनवले. त्या नियमांनुसार समाज वागत राहिला. त्या नियमांच्या अंमलबजावणीबाबत काही तक्रार असेल तर ती ब्रह्मवृंदाकडे म्हणजे पैठण वगैरे ठिकाणी असलेल्या खंडपीठांकडे करावी लागे. आणि त्यांचा शब्द अंतिम होता. ज्ञानेश्वरांना आपल्याला वाळीत टाकण्याबाबत जी तक्रार होती ती पैठणला जाऊन करावी लागली. तत्कालीन राजाकडे नाही. त्यामुळे नुसतंच नैतिक अधिष्ठान, अंमलबजावणीचे काहीच अधिकार नाहीत वगैरे विचार अनुराव गब्बरला म्हणतात त्याप्रमाणे नाइव्ह आहेत.
अंहं...
हा शब्दच्छल आहे.
अंहं! हे भावना, अस्मिता दुखावून घेणं आहे. कोणी एक शब्द वापरला, त्या शब्दवापरामागचा तर्क, विचार, मतं आणि विदा दिला तरीही आम्ही म्हणतो तेच खरं, आमच्या भावना दुखावल्या! आम्हाला सोयीचं होतं तेव्हा आमच्या पूर्वजांनी उत्क्रांतीला प्रिस्क्रिप्शन मानलं; आम्ही त्यांचा भोळसटपणा काय तो पाहाणार, त्यांची स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेण्याची आणि इतरांना लाथाडण्याची वृत्ती आम्ही सोयीस्कररीत्या नाकारणार!
तुम्ही फारच दयाबुद्धीनं या प्रकारांकडे बघताय!
>>जीवनपद्धती असलेल्या धर्माचे
>>जीवनपद्धती असलेल्या धर्माचे नियम ब्राह्मणांनी बनवले. त्या नियमांनुसार समाज वागत राहिला.
तसं असतं तर "शास्त्रात् रूढीर्बलीयसि" असं सांगण्याची वेळ स्मृतिग्रंथांवर आली नसती.
>>ज्ञानेश्वरांना आपल्याला वाळीत टाकण्याबाबत जी तक्रार होती ती पैठणला जाऊन करावी लागली. तत्कालीन राजाकडे नाही.
एक म्हणजे तो ब्राह्मणांतला अंतर्गत मामला होता. कायदा इंटरप्रीट करायची हायरार्की असेलच. आजही असते.
माझा मुद्दा हा आहे की स्त्रीला पायातल्या वहाणेप्रमाणे वागवावे ही व्यवस्था ब्राह्मणनिर्मित नाही. पुरुषसत्ताक कोणत्याही समाजातली ती व्यवस्था आहे. ब्राह्मणांनी ती उचलून धरली ही गोष्ट मान्य आहे.
एग्झॅक्टली. मनुस्मृतीसारखे एक
एग्झॅक्टली. मनुस्मृतीसारखे एक पुस्तक लिहिले आणि त्याने अख्खा समाजच बदलून टाकला असे भारतात झाले नाही. कुरुंदकरांचा मनुस्मृतीविषयक लेख वाचा. त्यात ते हेच म्हणतात की समाजात जे कमीअधिक फरकाने होत होते तेच मनुस्मृतीत सांगितलेले आहे. आणि मनुस्मृतीत हजार गोष्टी लिहिल्यात. सर्व काही त्याप्रमाणे चालते का? विठ्ठल त्र्यंबक गुणे यांचे "ज्युडिशिअल सिस्टिम ऑफ मराठाज़" हे पुस्तक फ्री डाउनलोडला उपलब्ध आहे. त्यात पाहिले असता कळते की मराठी राज्यातला न्यायनिवाडा सरसकट मनुस्मृतीप्रमाणे चालत नसे. काही ठिकाणी अवश्य आधार घेत पण सगळीकडे नाही. शिवाय या सगळ्या काड्या करणारा मनू स्वतः क्षत्रिय होता हा प्वाइंट सोयीस्करपणे विसरलेले दिसतात लोक्स.
शिवाय, संख्येने ३.५% (त्यातही स्त्रियांना हक्क नाही म्हणून १.७५% धरू) असलेल्या आणि हाणामारीत भाग न घेणार्या वर्गाने समाजावर असे वर्चस्व गाजवावे यातच कळून येते की बाकीच्यांचीही या व्यवस्थेला मान्यता होतीच. नाहीतर फक्त ३.५% लोक कसले टिकतात? ऋग्वेदाचा घनपाठ म्हटल्यावर लोक आपसूक पळून जातील वगैरे क्यूट फँटस्या असतील तर असोत. ब्राह्मण-क्षत्रिय यांची थ्रूऔट हिस्टरी सगळीकडेच मिलीभगत होती काही अपवाद वगळता.
महाराष्ट्रातला ब्राह्मण-मराठा वाद या पार्श्वभूमीवर पाहिला असता ऑड वाटतो पण त्याला राजकीय सत्तेतील प्रत्यक्ष स्पर्धा कारणीभूत आहे. पेशवाईत इन युवर फेस ब्राह्मण डोक्यावर येऊन बसल्यामुळे जुन्या धेंडांची जी जळू लागली ती अजूनही थांबलेली नाही इतकेच त्यातले सत्य.
त्यामुळे या व्यवस्थेतील सर्वांत मोठे बेनिफिशिअरी जे क्षत्रिय, त्यांना वगळून फक्त एकाच जातीला झोडायचे आणि वर सांगायचे की इट्स नॉट पर्सनल हा चावटपणा आहे. याला काहीच अर्थ नाही. अशा आक्रस्ताळ्या लेबलाची तळी उचलून धरणारांचीही कीव करावी अशीच परिस्थिती आहे.
ऋषीचे कूळ, आणि...
मनु वाटतं प्रजापतीचा मुलगा.प्रजापती ब्रह्मदेवाचा मुलगा वाटतं. मग मनु क्षत्रिय कसा?
कोणास ठाऊक. आंतरजातीय विवाहातून असेल कदाचित.
इन फॅक्ट ब्रह्मदेवाचीच जात काय?
कोण जाणे. ब्रह्मदेवाच्या जातीबद्दल नक्की कल्पना नाही. पण चित्रगुप्त मात्र सीकेपी असल्याबद्दल ऐकून आहे ब्वॉ. खरेखोटे चित्रगुप्तासच ठाऊक. (हे आपले उगाच अवांतर.)
You always steal my words, Batman.
शिवाय, संख्येने ३.५% (त्यातही स्त्रियांना हक्क नाही म्हणून १.७५% धरू) असलेल्या आणि हाणामारीत भाग न घेणार्या वर्गाने समाजावर असे वर्चस्व गाजवावे यातच कळून येते की बाकीच्यांचीही या व्यवस्थेला मान्यता होतीच. नाहीतर फक्त ३.५% लोक कसले टिकतात? ऋग्वेदाचा घनपाठ म्हटल्यावर लोक आपसूक पळून जातील वगैरे क्यूट फँटस्या असतील तर असोत. ब्राह्मण-क्षत्रिय यांची थ्रूऔट हिस्टरी सगळीकडेच मिलीभगत होती काही अपवाद वगळता.
हे एक लॉजिकल आर्ग्युमेन्ट मान्य केलं तर इतर जमातींचीही ब्राह्मणांची होते तशी, किम्बहुना 'तितकी' संभावना झाली तरी पुरे. ब्राह्मण, इतिहासात 'अॅट फॉल्ट' होते हे कोणीही अमान्य केलेलं नाहीये. परंतु, इतिहासातल्या घटनांपोटी, स्वतःच्या ब्राह्मण्याची लाज वाटणारे लोक्स जास्त फोफावलेत आजकाल. स्टेटमेंट स्ट्राँगे, पण मीही त्या जमातीत होतो एकेकाळी.
त्यामुळे या व्यवस्थेतील सर्वांत मोठे बेनिफिशिअरी जे क्षत्रिय, त्यांना वगळून फक्त एकाच जातीला झोडायचे आणि वर सांगायचे की इट्स नॉट पर्सनल हा चावटपणा आहे. याला काहीच अर्थ नाही. अशा आक्रस्ताळ्या लेबलाची तळी उचलून धरणारांचीही कीव करावी अशीच परिस्थिती आहे.
मी जे तिसरी जमात तिसरी जमात म्हणून कंठशोष करत होतो तिचं जाहीर नाव घेतल्याबद्दल आभार.
मीही सिग्नेचर मध्ये 'Fanatic Brahminical Patriarchal Hinduist MCP' लिहीन म्हणतो.
का हो घासकडवी, उद्या मी ऐसीवर
का हो घासकडवी, उद्या मी ऐसीवर चार धागे काढले - ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सांगीतलं उद्यापासून हेच्च ऐसीचे नियम आहेत तर मानायला चालू कराल का तुम्ही? का? अजून भारंभार धागे काढले आणि पाळा म्हटलं तर ?
============
घटनाकारांनी दिल्लीत बसून घटना बनवली. त्या नियमांच्या बाबतीत काही तक्रार असेल तर पैठणच्या शेजारच्या औरंगाबाद खंडपीठात जावेच लागते कि. आणि ज्ञानेश्वर जेव्हा पैठणला जात होते तेव्हा तिथल्या राजाला मोडी लिपी चालू करायला पैठणची परवानगी लागली का देवगिरीची?
यातलं मुख्य कारण म्हणजे सर्व
यातलं मुख्य कारण म्हणजे सर्व धर्मशास्त्रं लिहिणारांनी ब्राह्मणप्रधान आणि पुरुषप्रधान मांडणी केलेली आहे. हा इतिहास नाकारण्याचा प्रयत्न का करत बसावं?
अगोदर मातृसत्ताक असलेल्या पद्धतीला धर्मशास्त्र लिहिणारांनी पलटून पुरुषसत्ताक आणि ब्राह्मणसत्ताक बनवले (तशी मांडणी केली) म्हणून त्यांचा दोष आहे हा मोठा जावईशोध आहे. असला कोणता इतिहास नाहीच.
शास्त्रे लिहिणारांनी अगोदरपासूनच जे काय चालू आहे त्या चौकटीत नियम बनवले आहेत. मंजे अगोदर शूद्र ज्ञान घेत आणि उद्यापासून ब्राह्मणांनी घ्यावे असे शास्त्रकारांनी सांगीतलेले नाही.
===========
उठसूट प्रत्येक गोष्टीला ब्राह्मणी म्हणून नावे ठेवणारे लोक इतिहास नाकारतात.
तो शब्द प्रस्थापित आहे.
तो शब्द प्रस्थापित आहे.
कधीपासून? कोणी केला प्रस्थापित? ब्राह्मण पुरुषांनी - ब्राह्मण स्त्रीया, मुली, वैश्य, क्षत्रिय, शूद्र, अतिशूद्र, यवन, ईश्वर (याला तरी बाजूला का ठेवा? ) पुरुष आणि त्यांच्या बायका, मुले , मुली यांना आपल्या सेवेत, बंधनात ठेवावे, त्यांचे शोषण करावे - अशी समाजरचना ५००० वर्षे इ होती अश्या अर्थाने ब्राह्मण हा शब्द कधीपासून प्रचलित झाला म्हणे?
मात्र याच पुरुषप्रधान
मात्र याच पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रिया या सार्वत्रिकदृष्ट्या दलित आहेत. (ही परिस्थिती हळूहळू बदलत आहे, त्यामुळे अपवाद अर्थातच सापडतात.) जात्याधिष्ठित दालित्याचा विरोध करणारे स्वतः लिंगाधिष्ठित दालित्य राबवत आहेत हा अंतर्विरोध हा लेखाचा गाभा. मात्र लोक 'ब्राह्मणी' शब्दावरच अकारण अडकलेले दिसतात.
हा लेख एका दलित फोरमसाठी लिहिला आहे. त्यातला "आपण" हा शब्द वाचून लक्षात येते.
=============
लिंगाधिष्ठित दालित्य वैगेरे वर पण लेखिकेची भूमिका धरसोडीची आहे. मूलींनी सांभाळून सोशल मिडिया वापरावा असे सांगण्याचा अधिकार ती स्वतःकडे घेते. मात्र हेच दलित पित्याने आपल्या दलित कन्येला सांगितले कि मात्र "ब्राह्मणी पितृसत्ताक ..."
===============
ब्राह्मण ही सौम्य जात आहे. असेच शब्द मराठ्यांना वापरले तेव्हा कशा प्रतिक्रिया आल्यात ते वरच्या लातूरच्या मी दिलेल्या लिंकेत पहा. मिसळपाव वर मी ब्राह्मण सर्वात प्रखर राष्ट्रवादी म्हणालो तेव्हा लोक असे चवताळून आले जणू काही ब्राह्मण सर्वात राष्ट्रद्रोही असल्याचे करोडो पुरावे त्यांचेकडे आहेत.
स्त्रीवाद आणि जातीवाद या
स्त्रीवाद आणि जातीवाद या दोन्ही वेगवेगळ्या मिती (Dimensions) आहेत... त्या एकत्र न करता मुद्दा जास्त योग्यपणे मांडता आला असता व मूळ मुद्द्यावर चर्चा होउ शकली असती...
तांत्रिक मुद्दा वगैरे याला काहिही अर्थ नाही.. हे राजकारण्यांसारखं "मला असं म्हणायच नव्हतं" वगैरे यातला प्रकार झाला..
मग हिंदू समाज असही म्हणता आलं असतं.. ते ही तांत्रिक दृष्ट्या बरोबरच.. पण मग चर्चा हिंदू मुस्लिम ख्रिश्चन.. अशी भरकटली असती.. कारण धर्म ही वेगळी मिती आहे.. भारतीय समाज असही म्हणता आलं असतं. ते ही तांत्रिक दृष्ट्या बरोबरच.. पण मग चर्चा भारत्-पाश्चिमात्य देश अशी भरकटली असती.. कारण देश ही वेगळी मिती आहे.. आणखीही महाराष्ट्र/ मराठी/शहरी/ग्रामीण्/श्रीमंत्/गरीब/सुशिक्षित्/अशिक्षित हे पण येउ शकतं ...
त्यामुळे शब्दयोजना नक्किच चुकीची आहे.. आणि त्यामुळे चर्चा गंडली हे मान्य करायला काय हरकत नसावी..
व्यक्तिशः मला 'ब्राह्मणी' हा शब्द कधीच टोचत नाही.. त्यामुळे 'ब्राह्मणी' अस्मिता दुखावल्याने चर्चा भरकटली हे सर्वस्वी बरोबर वाटत नाही.. काहींच्या बाबतीत असेलही..
एकंदरीत भावना दुखावल्या
एकंदरीत भावना दुखावल्या गेल्या की चर्चा संभवत नाही हेच दिसून येतं. कुणीतरी ही ब्राह्मणी शब्दावरून होणारी चर्चा थांबवून लेखाच्या मूळ गाभ्याबद्दल बोलू शकत नाही का? समजा, तुमच्या मते तो शब्द वापरणं ही लेखिकेची चूक असेल. मग तो शब्द टाळून जो लेख तयार होतो त्याबद्दल लेखिका आंबेडकरवादी तरुण-पुरुषांबद्दल ताशेरे ओढते आहे हे दिसत नाही का? एकंदरीत उत्तर 'नाही' असं दिसतं आहे.
इथल्या समूहाच्या भावना
इथल्या समूहाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असं वाटलं नाही. लेखाचा मला जाणवलेला गाभा जो मी माझ्या वरच्या प्रतिसादात निर्देशित केलेला आहे त्याच्याशी मतभेद होण्यासारखं इथल्या वाचकवर्गाला वाटलं असेल असं दिसत नाही. "ब्राह्मणी" या विशेषणामागे जो संदर्भ आहे तो वादाचा मुद्दा आहे. आणि म्हणून त्यावर मोठी चर्चा घडताना दिसते.
हा एकंदरीत पॅटर्न आहे. जे सर्वमान्य असतं त्यावर फार चर्चा होत नाही. त्याला मूकपणे "+१" मिळतं. मतभेद असतात तिथे बरीच - मूळ लेखाच्या संदर्भात अवांतर ठरेल अशी - चर्चा होते.
सगळ्यांच्याच भावना दुखावल्या
सगळ्यांच्याच भावना दुखावल्या गेल्या आहेत असं नाही. इतर अनेकांनी (चिंतातुर जंतू, अदिती, राही, चार्वी वगैरे) भावना बिलकुल दुखावून न घेता प्रतिसाद दिलेले आहेत. मात्र केवळ या एका शब्दाबाबत इतकं रान उठलेलं आहे हे पाहून निदान काहींना तरी असा वापर करणं आवडलेलं नाही हे उघड आहे. 'त्यावरून ब्राह्मणांनी काहीतरी वाईट केलं असं दिसू शकतं' असे आक्षेप आलेले आहेत. तो शब्द ओलांडून लेखातल्या मुद्द्यांवर इतकी कमी चर्चा हे दुसरं कसलं लक्षण आहे?
असो. तो शब्द, त्याचा संदर्भ, आणि त्यावरून लोकांच्या उठलेल्या प्रतिक्रिया - यावर माझं पुरेसं बोलून झालेलं आहे. या विषयाला अजून फारसं महत्त्व देण्याची माझी इच्छा नाही.
लेखिका आंबेडकरवादी
लेखिका आंबेडकरवादी तरुण-पुरुषांबद्दल ताशेरे ओढते आहे हे दिसत नाही का?
आंबेडकरवादी म्हणजे सारे दलित कि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते? ती नक्कीच काही आंबेडकरवादी पुरुषांवर ताशेरे ओढतेय. पण त्यांना ब्राह्मणी पुरुषसत्तावदी देखिल म्हणतेय. म्हणजे तिला तो शब्द सार्या दलित लोकांना वापरायचा असेल.
सवर्ण तर भयंकरच आहेत पण एका आंबेडवादी पुरुषाने दुसर्या आंबेडकर्वादी स्त्रीला त्रास देतो त्याला काय अर्थ आहे इ तिचा ताशेर्यांचा सुर आहे. वास्तविक भारतात दलितांतच क्राइम रेट सर्वाधिक असल्याने या विधानावर काय बोलावे?
कुणीतरी ही ब्राह्मणी
कुणीतरी ही ब्राह्मणी शब्दावरून होणारी चर्चा थांबवून लेखाच्या मूळ गाभ्याबद्दल बोलू शकत नाही का?
गुर्जी, लेखाला काहीतरी गाभा वगैरे आहे अश्या समजातुन तुम्ही हे वाक्य लिहीले असावे. लेखाला काही गाभा वगैरे असता तर टाळ्याखाऊ/भडकाऊ "ब्राह्मणी" शब्द वापरलाच गेला नसता.
लेखा कडे लक्ष द्या, एक शब्द काय घेऊन बसलायत हे चमत्कारीक विधान २-३ प्रतिसादकांच्या ( अगदीच मायनॉरीटी हो ) वाचायला मिळाले. वाईट नीयतीने लिहीलेल्या लेखात कसला गाभा वगैरे शोधत बसायचे म्हणते मी.
गाभा
सवंग पुरोगामी उत्साहाच्या भरात आपण कोनत्या मंचाला किती चढवतो आहेत याचे भान असायाला. त्या संकेतस्थळावरचा अजून एक लेख (लेखन) खाली पेस्टवत आहे.
सरदार अजमेर सिंह (Sardar Ajmer Singh)
(यह लेख सरदार अजमेर सिंह की बहुचर्चित किताब 'बीसवीं सदी की सिख राजनीति: एक ग़ुलामी से दूसरी ग़ुलामी तक' जो कि पंजाबी भाषा में है, से हिंदी में अनुदित किया गया है। सरदार अजमेर सिंह पंजाब के एक जाने माने इतिहासकार हैं। ब्राह्मणवाद की गहन समझ रखने वाले अजमेर सिंह महसूस करते हैं कि पंजाब अपने असली इतिहास के साथ तभी बच सकता है, एवं उसका भविष्य सुरक्षित हो सकता है अगर वह अलग सिख स्टेट बने। पंजाब की तारीख़ का सिख परीपेक्ष्य में मूल्यांकन करने वाले शायद वह इकलौते साहित्यकार हैं जिन्होंने ब्राह्मणवाद की नब्ज़ को पकड़कर सिखों में घुस चुके ब्राह्मणवाद की निशानदेही की है। उनकी लिखी किताबों के माध्यम से व्यापक जगत ने दृष्टिकोण के वह कोने भी छूये हैं जिससे खुद सिख संसार अनभिज्ञ था या यूं कहिये ब्राह्मणवादी स्टेट ने ऐसा कर दिया था। उनके इस आलेख में वह जट्टवाद को परत दर परत खोलते हैं। सिख एवं दलित बहुजन दृष्टिकोण से यह लेख बेहद पठनीय है। ~ गुरिंदर आज़ाद [अनुवादक])
ब्राह्मणी वैगेरेच्या नादात ऐसीकर खलिस्तानला सपोर्ट करून बसतील.
ते द्रविड मंतात आर्य लोक
ते द्रविड मंतात आर्य लोक आमच्यावर अन्याय करून राहिले म्हणून आम्हला वेगळे राज्य द्या आणि हा म्हणतो आम्हा कुशाणांना इ इ आर्यानी बुद्धिभ्रष्ट केले म्हणून आम्हाला वेगळे राज्य द्या. काय काय चोचले. राष्ट्रद्रोहाची ढाल म्हणून ब्रह्मविरोध चालणार नाही. ब्राह्मणी गोष्टींचा विरोध आंबेडकर स्टाइलने करावा (प्रचंड टिका करून, धर्म बदलून, आपले न्याय्य अधिकार मागून, सामाजिक समतेसाठी आरक्षण आणि सवलती घेऊन, इ), पेरियार स्टाइलने नाही.
दुसरा धर्म कशाला...
नानकांनी त्यांना जन्माने मिळालेल्या जातिधर्माचे नियम न पाळता वेगळा नियमधर्म बनवला. त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी ब्राह्मण धर्माचे पालन केले नाही.
येशु ख्रिस्त जन्माने ज्यू होता. त्याने आईवडिलांचा धर्म बाजूला ठेवून नवी तत्त्वे आणि नवी आचरणपद्धती मांडली.
तेव्हा नानकांचे अनुयायी असा अर्थ घेऊ शकतात की जन्मजात मिळालेल्या वारश्याला विटून नानकांनी नवी जीवनपद्धती मांडली.
विटणे आंबेडकरांना लागू होते.
विटणे आंबेडकरांना लागू होते. नानकांना नाही.
===========
नानक आणि तत्सम लाभार्थ्यांनी जर आपल्याच जातीच्या अन्य लोकांपासून अन्य जातींच्या भल्याचे पाहिले आहे तर ब्राह्मणी व्यवस्थेत देखिल न्यायाचे पूजक प्रसविण्याची शक्ती होती असे सिद्ध होते. घासकडवी ज्या ज्ञानेश्वरांचे उदाहरण वारंवार देतात त्या ज्ञानेश्वरांनी आपले ब्राह्मणत्व त्यागले नाही. म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेच्या आत देखिल अन्य जातीच्या कल्याणाची भावना होती (वा शक्य होती) असे सिद्ध होते.
अहो तेच तर सांगतीय मी. सर्व
अहो तेच तर सांगतीय मी. सर्व दलित, त्रासलेल्या, शोषीत लोकांच्या मदतीला फक्त ब्राह्मणच येतात. मग ते नानक्देव असो, आगरकर, रानडे, कर्वे, सावरकर असोत, फुलेंच्या शाळेला वापरायला वाडा देणारे असोत, किंवा आंबेडकराना स्वताचे आडनाव देणारे असोत. तुमचे लाडके गांधी असोत किंवा आमचा लाडका नथुराम असो.
काही आर्ग्युमेंट्स
तीन आर्ग्युमेन्ट्स
१)वरच्या प्रतिसादातून निघू शकणार्या 'सर्व अपप्रथांविरुद्ध ब्राह्मणच लढले' या अर्थावरून असे म्हणता येईल की या अपप्रथा आहेत हे १अ)बहुसंख्य ब्राहमणांना मान्य होते पण त्याविरुद्ध आवाज काही थोड्या ब्राह्मणांनी उठवला.२ब)बहुसंख्य ब्राह्मण असेच वर्चस्वाने वागत होते. अशी सगळी स्थिती पाहून काही थोड्यांना याविरुद्ध बंड करावेसे वाटले.
२)आपल्या लोकांकडून भ्रष्ट आचरण माजवले जात आहे हे पाहून काही सुधारकांनी आपल्याच धर्माविरुद्ध रान उठवले. हे म्हणजे अगदी अलीकडच्या सुधारकांसारखे झाले. आपल्याच हिंदुधर्माविरुद्ध ते बोलताहेत. ते वाईट आहेत. स्वधर्महानि करताहेत. यांनी स्वधर्म त्यागला किंवा नवा धर्म स्थापन केला तर काही बिघडत नाही. त्यांना काय करायचे ते करू दे.
३)ज्यांना अन्याय म्हणजे काय हे समजतच नाही, ते काय लढा देणार? ते कुठे दाद मागणार? कुठे सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार? त्यांना दाद मागायचा अधिकार तरी होता असेल का? ते कदाचित स्थानिक पातळीवर बळी पडत असतील. निमूट सहन करत असतील.मोठ्या पीठांपर्यंत त्यांचे आवाज पोचतच नसतील.त्यांना आयडेंटिटीच नव्हती.(कुठल्याही पोथ्यापुस्तकांत ब्राहमणाची गोष्ट असली की त्याचे आईवडील, शाखा, गोत्रप्रवर याचा आवर्जून उल्लेख असतो. पण तोच रजक,मोळीविक्या, लाकूडतोड्या,शेतकरी असला की त्याला नावगाव अतापता काही नाही. रजक, मोळीविक्या ही आणि अशीच त्याची ओळख.)त्यांचा इतिहास नाही.
ता.क.- गांधी हे ब्राहमण नव्हते.
सार्वकालिक
अन्याय हा सार्वकालिक असतो. जी व्यवस्था सध्या न्यायी वाटते आहे ती काही काळाने जुलमी वाटू शकते. आणि अन्यायाच्या पहिल्या जाणीवेचे पहिले प्रकटन हे विद्रोहातून होते. ह्या विद्रोहात पुरेशी ताकद असेल तर 'अन्यायी' व्यवस्था बदलू शकते. पण परिस्थिती हवी तशी आणि हव्या त्या अपेक्षित काळात नाही बदलली तर एक तर विद्रोह तीव्र करण्याचे प्रयत्न होतात, किंवा आत्मपरीक्षण सुरू होते. आपण कमी पडलो का, किंवा कुठे कमी पडलो याचा शोध घेतला जातो. हीच आत्मभानाची आणि जागृतीची अवस्था असते. ही वैयक्तिक आणि सामूहिक (वैयक्तो-सामूहिक असे 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक' किंवा 'सोशिओपुलिटिकल' या इंग्लिश पद्धतीने म्हणावे का?)या दोन्ही पातळ्यांवर काम करते. हे सर्व हळू हळू होत असते,पण होत असतेच. तोपर्यंत विद्रोहाच्या रेट्याचे हादरे अधूनमधून बसत राहतात. एक तर मोठा उद्रेक होतो (जो थांबवणे शक्य नसते,) किंवा काही काळाने पोटातली सगळी आग बाहेर आली की ज्वालामुखी आपोआप शांत होतो.
थोडक्यात, पुरेसा वेळ जावाच लागतो. आणि कितीही न्याय प्रस्थापित केला तरी अन्याय उरतोच.
आज तुम्हालाही 'ब्राह्मणांवर अन्याय होतोय' असे वाटतेच की नाही? त्याविरुद्ध तुम्ही खवळून उठताच की नाही?
अन्याय हा सार्वकालिक असतो. या
अन्याय हा सार्वकालिक असतो.
या वाक्यावर जाम कंफ्यूज झालोय. मंजे असेल सार्वकालिक पण लोकांना सार्वकालिकतेची कल्पना नसते म्हणून ते व्यवस्था बदलत राहतात ( जसे दरवेळी नविन पक्षाचे सरकार आणणे, लोकशाहीच्या जागी लोकशाही -२ आणणे इ.). पण दुसरीकडे हे सगळं निरर्थक असतं असंदेखिल निघतं यातनं. माझ्यामते अन्याय एका थ्रेशोल्डखाली असेल तर तो काळ अपवाद मानावा. बाकी लॉजिक परफेक्ट आहे.
फायनली, कामाची गोष्ट, (धाग्याच्या विषयाबाबत) आज क्या हाल है? ज्वालामुखी व्हायचा आहे? उद्रेकाची भाषा आपणांस आवश्यक वाटते काय? असो.
=======================
आज तुम्हालाही 'ब्राह्मणांवर अन्याय होतोय' असे वाटतेच की नाही? त्याविरुद्ध तुम्ही खवळून उठताच की नाही?
बरं झालं कोणी मला विचारलं मला काय वाटतं ते. मला ब्राह्मणांवर अन्याय होतो का नाही ते माहित नाही. होत नाही असा माझा गेस आहे. म्हणून राग असायचा, खवळायचा सोडाच , प्रश्न नाही. पण सर्वसाधारणपणे ते फार माजले आहेत आणि बाकीही सगळे आपल्यासारखेच माजले आहेत म्हणून त्यांना (ब्राह्मणांना) माजवणार्या व्यवस्था अधिकच सबल कराव्यात अशा अन्यायी आणि अंध मताचे ते दिसतात असे माझे निरीक्षण आहे. कायद्याच्या चौकटीत, अन्य जात म्हणून नावे न घेता, वा घ्यायची गरज न वाटता, अन्य जातीतले चार फुटीर साथीला घेऊन, स्वतःचे नाव देखिल ब्राह्मण असे न घेता फार ड्यांबिस प्रकारचे शोषण भारतीय समाजात चालू आहे. त्याच्या विरुद्ध मी भयंकर खवळलेला माणूस आहे.
--------------
माजणे हा शब्द ऑफेन्स करण्यासाठी वापरला नाही.
कुठल्याही पोथ्यापुस्तकांत
कुठल्याही पोथ्यापुस्तकांत ब्राहमणाची गोष्ट असली की त्याचे आईवडील, शाखा, गोत्रप्रवर याचा आवर्जून उल्लेख असतो.
कालिदासाची हस्ति भारतीय इतिहासात मोठी आहे कि नाही?
कालिदास कोण्या गावचा? (आई वडील, गोत्र , प्रवर, इ असू द्या)
कालिदास कोणत्या शतकातला किंवा दशकातला?
ते असोच ...
एकूण कालिदास (मंजे ते संस्कृत नाटक ग्रंथ महान लेखक) किती?
ते ही असोच ...
आपल्या गुर्जींचे आवडते ज्ञानेश्वर एकूण किती?
धार्मिक
माझी शब्दयोजना थोडी चुकली. मला ललित साहित्य अभिप्रेत नव्हते. (मला वाटले की 'पोथ्या' शब्दावरून अर्थ स्पष्ट होईल.) तसे तर खूप साहित्य आहे. स्वप्नवासवदत्तम् मध्ये तर राजाची पूर्ण विवाहस्टोरी आहे ह.आ.हैं.कौ.प्रमाणे. त्यात राण्यांचे कुलवृत्तांत आहेत. आणखी अनेक आहेत. मृच्छकटिकही आहे,उत्तररामचरित आहे. (कित्येक ठिकाणी राजा यज्ञ करतो आणि अनेक ब्राह्मणांस दक्षिणा देऊन तृप्त करतो आणि मग ऋषिमुनी संतुष्ट होऊन राजाला हवा तो वर देतात अश्याही वर्णनाचे पार्श्वसंगीत असते.वगैरे.शिवलीलामृताचा अख्खा अध्याय यावर आहे.) मला धार्मिक साहित्य अभिप्रेत होते. एक मराठी गुरुचरित्र वाचले तरी मध्ययुगातल्या/यादवकालाच्या अलीकडच्या-पलीकडच्या महाराष्ट्रातल्या समाजव्यवस्थेचे थोडे आकलन होऊ शकते.
आणि ब्राह्मणांचा दरारा दाखवणारी,त्यांचा अनादर-नुकसान-हानी झाल्यास तसे करणार्याचे काय होईल याविषयी दंडशाप सांगणारी वाक्ये ठायी ठायी आढळतात.
वै.मत : जुने नियम त्या त्या काळातल्या व्यवस्थेस योग्य मार्गावर राखण्यास मदत करीतही असतील. कारण तत्कालीन व्यवस्था नक्की कशी होती याचे स्पष्ट आकलन अजूनही आपल्याला नाही. आपली अवस्था 'हत्ती आणि आंधळे' सारखी आहे. ज्याला जे साधन हाती येते त्यावरून तो आपले निष्कर्ष काढतो. आणि परस्परविरोधी अशी बरीच साधने आहेत.
पण त्या काळात ती नियमव्यवस्था योग्य होती म्हणून आजही तशीच योग्य असावी किंवा आहे हे मात्र योग्य नाही. तशा नियमांविरुद्ध प्रबोधन व्हावे हेही योग्यच. तसे नियम आज कुठेच अस्तित्वात नाहीत असे नाही. काही पॉकेट्स, स्ट्राँगहोल्ड्स्मध्ये अजूनही त्यांतल्या काही नियमांचा पगडा आहे. अर्थात आज निदान महाराष्ट्रात तरी ब्राहमण जात यातून बाहेर पडली आहे. ही प्रगती तळागाळात झिरपण्यासाठीसुद्धा काही ब्राह्मण इतर अनेकांसोबत तळमळीने काम करीत आहेत. हे काम द्वेषरहित भावनेने थेट तृणमूल पातळीपर्यंत पोचण्याची सध्या अधिक निकड आहे याविषयी दुमत नसावे.
ता.क. 'ब्राह्मिनिकल आर्किटेक्चर' किंवा 'ब्राह्मिनिकल टेम्पल्स्' ही संज्ञा पुरातन भारतीयकला-इतिहास-संस्कृतीच्या अभ्यासात एका जातिविहीन अशा व्यापक संदर्भात वापरली जाते.
तुमच्या प्रतिसादाचा जो
तुमच्या प्रतिसादाचा जो मतितार्थ (जे आपण वै. मत म्हणून लिहिले आहे) त्याचेशी पूर्णतः सहमत आहे.
============
१. राजा राणी हे क्षत्रिय असतात.
२.
ब्राह्मणांचा दरारा दाखवणारी,त्यांचा अनादर-नुकसान-हानी झाल्यास तसे करणार्याचे काय होईल याविषयी दंडशाप सांगणारी वाक्ये
दुर्वास ऋषी इ?
लेखाच्या गाभ्याबाबतचे मत
लेखाच्या गाभ्याबाबतचे मत पहिल्याच प्रतिसादात नमूद केले आहे.
> या संपूर्ण प्रकरणाचा आढावा
> या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर मला एक विचारावंसं वाटतं की स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेऊन काही लोक आपल्याच आंबेडकरवादी मैत्रिणींना त्रास देत असतील तर यांचा बंदोबस्त आपण कसा करणार् आहोत?
फेसबुक मधे ब्लॉक / रिपोर्ट करता येतं ना .. मग एवढी दीर्घ चर्चा कशासाठी ? फार फार तर एक ऑनलाइन डिरेक्टरी बनवा अशा लोकांची (with profile links)
आजचा अभ्यास आमचा विरोध
आजचा अभ्यास
आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे या धर्तीवर काही वाक्ये तयार करा
.
.
आमचा विरोध दलितांना नसून दालित्याला आहे
आमचा विरोध मराठ्यांना नसून मारठ्याला आहे
आमचा विरोध माळ्यांना नसून माळव्याला आहे
आमचा विरोध मांगांना नसून मांगव्याला आहे
आमचा विरोध हिंदूना नसून हिंदुव्याला आहे
आमचा विरोध मुस्लिमांना नसून मौस्लिम्याला आहे
.
.
चला ऐसी करांनो आपल्या बौद्धिक्याला चालना द्या
>>आपल्या ब्राह्मणी पितृसत्ताक
>>आपल्या ब्राह्मणी पितृसत्ताक समाजामध्ये मुलींनी मोबाईल कसा वापरावा, कितपत वापरावा याचे काही नियम ठरलेले आहेत. अनेकवेळा काही अडचण येऊ नये म्हणून मुलींना मोबाईल वापरण्यास देण्यात येतो. पण मुलीच्या मोबाईलच्या वापरावर कठोर निर्बंध घातले जातात.
हे कोणत्या काळाचं वर्णन आहे?