Skip to main content

दंगल, स्त्रीवाद, ट्रांजॅक्शन्स कॉस्ट इकॉनॉमिस्ट्स, इ.

कुस्ती रक्तात असते असं मानणारा आमीर खान शेवटी मूलगा न झाल्याने आपल्या मूलींनाच इतके लायक बनवतो कि त्याच जागतिक गोल्ड मेडल मिळवतात. नितांत सुंदर चित्रपट. सत्याधारित आहे. अवश्य पाहावा.
=============
बरेच शास्त्रीय गैरसमज पसरवणारा नि स्त्रीवाद्यांनी एडीट केलेला पण आहे, पण ते इग्नोरून भाऊकतेने पाहावा.

अजो१२३ Mon, 26/12/2016 - 15:59

In reply to by गब्बर सिंग

कालच म्हणत होतास कि बायकांना आपलं काय भलं त्याची अक्कल असते. या चित्रपटात आमिर खान त्यांचं (मुलींचं) स्वातंत्र्य पूर्ण काढून घेतो आणि त्यांचं भलं होतं.

गब्बर सिंग Mon, 26/12/2016 - 16:04

In reply to by अजो१२३

कालच म्हणत होतास कि बायकांना आपलं काय भलं त्याची अक्कल असते. या चित्रपटात आमिर खान त्यांचं (मुलींचं) स्वातंत्र्य पूर्ण काढून घेतो आणि त्यांचं भलं होतं.

निओक्लासिकल विरुद्ध ट्रांजॅक्शन्स कॉस्ट इकॉनॉमिस्ट्स यांच्यात हा फरक आहे.

समजलं नसेल तर सोडून दे.

पण ट्रांजॅक्शन्स कॉस्ट इकॉनॉमिस्ट्स हे मूल्यमापन करताना उपलब्ध विकल्पांमधे तुलना करतात. उपलब्ध नसलेल्या पण आदर्श विकल्पाशी तुलना करत नाहीत.

पुनश्च : समजलं नसेल तर सोडून दे.

अनु राव Mon, 26/12/2016 - 16:06

In reply to by गब्बर सिंग

गब्बु - तुझ्या ह्या प्रतिसादात आणि "अभ्यास वाढवा" ह्या प्रतिसादात गुणात्मकदृष्ट्या काहीच फरक नाही. तुझ्याकडुन अशी अपेक्षा नाही, नीट समजवुन सांग ना.

गब्बर सिंग Mon, 26/12/2016 - 16:23

In reply to by अनु राव

पिक्चर पाहताना प्रत्येक वेळी कुठल्यातरी आदर्श (पण अस्तित्वात नसलेल्या) सिच्युएशन शी तुलना न करता अस्तित्वात असलेल्या विकल्पांशी तुलना करावी.

पिता विरुद्ध ट्रेनर - या संघर्षात कोणाचे इन्सेंटिव्ह्ज काय व कोणते आहेत व कोणते नाहीत त्याकडे लक्ष द्यावे.

ती गीता फोगाट पित्याला फोन करून फोन वर का रडते ते पहावे. ती फोन वर मुसमुसत असताना ती आपल्या पित्याला आवाहन करते की गुरुला ते पहावे. आमिर ते आवाहन कसे घेतो -- "पित्यास" उद्देशून की "गुरूस" उद्देशून ते पहावे.

तिचे ट्रेनिंग चालू असते त्यादरम्यान ती अल्पकालासाठी घरी येते ... तेव्हा आमीर शी लढते. ते पित्याशी की गुरुशी ते पहावे.

नितिन थत्ते Wed, 28/12/2016 - 11:51

In reply to by गब्बर सिंग

>>ती फोन वर मुसमुसत असताना ती आपल्या पित्याला आवाहन करते की गुरुला ते पहावे. आमिर ते आवाहन कसे घेतो -- "पित्यास" उद्देशून की "गुरूस" उद्देशून ते पहावे.

तिचे ट्रेनिंग चालू असते त्यादरम्यान ती अल्पकालासाठी घरी येते ... तेव्हा आमीर शी लढते. ते पित्याशी की गुरुशी ते पहावे.

अजो१२३ Mon, 26/12/2016 - 17:01

In reply to by गब्बर सिंग

तुमच्या व्याख्या सोयीस्कर आहेत, शिवाय अर्थशास्त्रीय संदर्भ देखिल सोयीस्कर आहे, म्हणून सोडून देतो.

गब्बर सिंग Tue, 27/12/2016 - 09:19

In reply to by अजो१२३

तुमच्या व्याख्या सोयीस्कर आहेत

दोन विकल्प आहेत - (१) मग तुमच्या सोयिस्कर व्याख्या सांगा व मग युक्तीवाद करा., (२) मी माझ्या मुद्द्याच्या समर्थनार्थ काही व्याख्या खाली पेश करतो. माझा मुद्दा Barriers चे अस्तित्व व त्यांना पार करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं याबाबतचा आहे. Barriers च्या अनेक व्याख्या आहेत. खाली ७ व्याख्या देत आहे. त्यातली एक निवडा.

----

माझा मुद्दा असा आहे की -

(१) हरयाणातल्या मुलींना प्रचंड Barriers ना तोंड द्यावे लागते. (खरंतर हे हरियाणापुरते मर्यादित नाही.)
(२) हे Barriers मुख्यत्वे परंपरांमुळे निर्माण झालेले आहेत. कोणत्याही एका विशिष्ठ व्यक्तीने किंवा छोट्या गटाने ते निर्माण केलेले नाहीत. गेली अनेक दशके, शतके ते इव्हॉल्व्ह होत आलेले आहेत.
(३) नेमके Barriers कोणते ? - "बेटी पराया धन" होती है असं म्हणून तिचा कमी वयातच विवाह उरकून द्यायचा आणि त्याकरवी तिचे भविष्यातील options foreclose करायचे. हा मुद्दा त्या चित्रपटात अप्रत्यक्ष दाखवलेला आहे. अप्रत्यक्ष म्हंजे गीता व बबिता यांची मैत्रिण की जिचा विवाह असतो. दुसरा Barrier म्हंजे परंपरानुरुप स्त्रियांना विशिष्ठ कर्म करण्यास मनाई करायची. व विशिष्ठ कर्म म्हंजे कुस्ती खेळणे. आठवून पहा - जेव्हा आमीर(महावीरसिंग फोगाट) त्या गीताला घेऊन कुस्तीच्या फडा पाशी जातो तेव्हा महावीरसिंग ला धाकदपटशाला तोंड द्याचे लागते. तिसरा Barrier म्हंजे शाळेत असताना सुद्धा गीता व बबिता ला सोशल प्रेशर ला तोंड द्यावे लागते - हे प्रेशर - seeking confirmity चे च असते की.
(४) आता एवढे Barriers निर्माण केले की त्यांना पार करण्यासाठी गीता-बबिताला अगिदिव्यातून जावे लागले नाही तरच नवल.
(५) आणि जोडीला त्या खेळाची म्हणून काही कौशल्ये आहेत की जी आत्मसात करण्यासाठी त्यांना कष्ट, शिस्त यांची गरज आहेच.
(६) माझ्या मुद्द्याचा क्रक्स हा आहे की - परंपरा ह्या एन्फोर्स केल्या जात नाहीत. परंपरा ह्या ऑप्शनल असतात. पण या केस मधे तसे नव्हते. गीताला कुस्ती शिकण्यापासून व कुस्तीच्या स्पर्धेत भाग घेण्यापासून रोखण्यासाठी धाकदपटशा व सामाजिक मानहानीला तोंड द्यावे लागणे हे Barriers खूप मोठे आहेत.
(७) मी हे सहर्ष मान्य करतो की आमिर ने त्या मुलींची opportunity to choose their profession/work/passion काढून घेतली व त्यांच्यासमोर फक्त एकच विकल्प ठेवला - कुस्ती. त्यांच्या पैकी प्रत्येकीला तिचे तिचे काम स्वतःहून शोधण्याचा विकल्प नव्हता. (उदा बबिता ला जर कुस्तीऐवजी बॉक्सिंग शिकायचे असेल तर तो विकल्प तिला नव्हता हे मान्य).
(८) पण रियलिस्टिकली स्पीकिंग आदर्श स्थिती अस्तित्वातच नव्हती. म्हंजे त्याची स्वतःची इतकी ऐपत नव्हती. There weren't any other solid alternatives.
(९) जोडीला - त्या दोघींमधे असलेल्या नैसर्गिक लढवय्येपणाच्या जजब्याला व्यवस्थित चॅनलाईझ केले हा मुद्दा सुद्धा आहे.
(१०) गीता व बबिता चे विकल्प काढून घेऊन त्यांच्यासमोर कुस्ती हा एकच मार्ग ठेवणारी व्यक्ती ही तो निर्णय - पिता, गुरु, की entrepreneur - म्हणून घेते ? माझ्या मते entrepreneur.

---

मला तुमच्या कडून प्रतिसाद म्हणून काय हवंय ते सांगतो - वरील १ ते ९ पैकी नेमक्या कोणत्या मुद्द्याशी तुम्ही असहमत आहात व का - ते सांगा.

----

Definition 1 (Bain, 1956 p. 3): A barrier to
entry is an advantage of established sellers in an
industry over potential entrant sellers, which is
reflected in the extent to which established sellers
can persistently raise their prices above
competitive levels without attracting new firms
to enter the industry.

Definition 2 (Stigler, 1968 p. 67): A barrier to
entry is a cost of producing (at some or every
rate of output) that must be borne by firms
seeking to enter an industry but is not borne by
firms already in the industry.

Definition 3 (James M. Ferguson, 1974 p. 10):
A barrier to entry is a factor that makes entry
unprofitable while permitting established firms
to set prices above marginal cost, and to persistently
earn monopoly return.

Definition 4 (Franklin M. Fisher, 1979 p. 23):
A barrier to entry is anything that prevents entry
when entry is socially beneficial.

Definition 5 (C. C. von Weizsacker, 1980 p.
400): A barrier to entry is a cost of producing
that must be borne by a firm seeking to enter an
industry but is not borne by firms already in the
industry, and that implies a distortion in the
allocation of resources from the social point of
view.

Definition 6 (R. Gilbert, 1989 p. 478): An entry
barrier is a rent that is derived from
incumbency.

Definition 7 (Dennis Carlton and Jeffrey Perloff,
1994 p. 110): A barrier to entry is anything
that prevents an entrepreneur from instantaneously
creating a new firm in a market. A
long-run barrier to entry is a cost necessarily
incurred by a new entrant that incumbents do
not (or have not had to) bear.

( संदर्भ - ह्या व्याख्या कुठुन आल्या ??)

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 12:06

In reply to by गब्बर सिंग

मी या सगळ्याच मुद्द्यांशी असहमत आहे.
=============
बॅरियर वैगेरे काही नाही. ते स्त्रीयांना विशिष्ट कामे करावे लागणे रिजर्वेशन आहे. एक सोय आहे. परंपरा ही एक कायदा व्यवस्था आहे. तीच तुम्हाला मान्य नाही. ती मूळची कायदा व्यवस्था होती. तुमची नवी कायदा व्यवस्था सिस्टीम लावून देत नाही.
पित्याला व्यवसायी म्हणणे तर अजून कैच्या कै. गोल्ड मेडल जिंकल्यावर जन गण मन ऐकून डोल्यात अश्रू येणे हा व्यवसाय? मनुष्याच्या जीवनातली प्रत्येक कृती ही व्यवहारात्मक (मंजे हिशेबी) नसते. किती काटेकोर हिशेब ठेवायचा हे नाती जितकी परकी होत जातात तितके वाढते. नि यात राष्ट्र ही कल्पना हृदयाच्या अतिशय जवळची असू असते.
================
सिनेमाच्या रसग्रहणात तुम्ही निष्कारण अर्थकारण आणले आहे. कृपया अश्या प्रकारे पिक्चर पाहणे बंद करा. यू विल एंजॉय मोर.
=================
आणि बेटी पराया धनवर पुरोगाम्यांच्या कह्यात येऊन टिका करू नका. बेटी पराया धन असणेच योग्य आहे. मंजे पहा बेटी नसती तर काय ऑप्शन्स असते?
१. बेटा पराया धन - पण पुन्हा पुरुषांनी आमच्यावर अन्याय होतोय असा आक्रस्ताळेपणा केलाच असता. मग दोघांना न्याय द्यायचा कसा?
२. दोन्ही कुटुंबे एकत्र करा. मंजे जितकी लग्ने झाली तितक्या वेळा कुतुंबे जुडणार. शेवटी सगळे जगच एक जॉइंट फॅमिली अ‍ॅट वन प्लेस होणार. मग पुन्हा तुम्हीच म्हणणार कि प्रायवसी, स्वातंत्र्य नाही. शिवाय हे लॉजिस्ट्क्स व इकनॉमिक्स दृष्ट्या असंभव आहे. मग?
३. दोघांना घराबाहेर काढा - यात किमान मुलाला जे सुख मिळत होते तेही गेले. मंजे तुम अगर मुझको न चाहो टाइप प्रकार. यात पुन्हा बाहेर पडणारे लोक कुठे जाणार, काय करणार्,त्यांना त्यांच्या वाट्याची विभागताना संपती कशी द्यायची, मायबाप मेल्यावर त्यांना दोन जागचे असेट्स कसे सांभाळायचे...

असं दिसतं पर्याय १ हाच एक पर्याय आहे, तो श्रेष्ठ नाही पण समान आहे. त्यात जर परंपरा सोडली तर प्रत्येक लग्नाच्या वेळी कोण घर सोडून जाणार याची भांडणे होतील, नंतरही होतील, किचकट करार होतील नि त्यातून झालेल्या समस्या आजच्यापेक्षा १०० पट जास्त असतील.

काय गब्बर, नव्या कायद्याने नुसते स्वातंत्र्य व पर्याय देऊन चालत नाही. वर्किंग मेकॅनिझम द्यायला पाहिजे.

गब्बर सिंग Tue, 27/12/2016 - 12:19

In reply to by अजो१२३

सिनेमाच्या रसग्रहणात तुम्ही निष्कारण अर्थकारण आणले आहे. कृपया अश्या प्रकारे पिक्चर पाहणे बंद करा. यू विल एंजॉय मोर.

चित्रपट पाहून झाल्यानंतर केलेले हे विश्लेषण आहे. पिक्चर पाहताना नाही. इन्स्टिट्युशनल अ‍ॅनॅलिसिस असाच असतो. एक्स-पोस्ट.

--

काय गब्बर, नव्या कायद्याने नुसते स्वातंत्र्य व पर्याय देऊन चालत नाही. वर्किंग मेकॅनिझम द्यायला पाहिजे.

समजलं नाही. वर्किंग मेकॅनिझम्स ची एकदोन उदाहरणे द्या.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 12:33

In reply to by गब्बर सिंग

सगळ्या परंपरा, धर्म ही वर्किंग मेकॅनिझमची उदाहरणे आहेत.
बेटी पराया धन हीच परंपरा पहा. इट वर्क्स पर्फेक्टली. (कुठे कुठे बेटा पराया धन पण वर्क्स ). Gabbar, if the world is handed over to the moderns, they will spoil it before a child spoils its toy.
"मुलगी वयात आल्यावर लग्न होऊन सासरी जाते" ही एक परंपरा आहे. यात काय खोट आहे नि कोणत्या पर्यायी व्यवस्थेने ती दूर करता येते ते सांग. तुला कळेल परंपरांचे महत्त्व. मानवी गुन्हेगारीता काही टक्क्यांनी सर्वत्र असते. पण ती गुन्हेगारीता म्हणजेच परंपरा, परंपरेचे सर्बस्व म्हणणे ही पुरोगामी बोंब आहे. त्यापेक्षा कितीतरी पट गुन्हेगारीता नि अक्षमता आधुनिक पुरोगामी व्यवस्थांत आहे ज्यांकडे फॅशन म्हणून दुर्लक्ष केले जाते.
============================================
आत्ताच्या लोकशाह्या, कुटुंबे , समाज, इ इ स्वत:चे नाव लावतात पण बिल परंपरांना ठोकतात.

अनु राव Tue, 27/12/2016 - 12:37

In reply to by अजो१२३

"मुलगी वयात आल्यावर लग्न होऊन सासरी जाते" ही एक परंपरा आहे. यात काय खोट आहे नि कोणत्या पर्यायी व्यवस्थेने ती दूर करता येते ते सांग.

ह्यात फक्त खोटच खोट आहे.

पर्यायी व्यवस्था सोप्पी आहे. लग्न झाल्यावर नवरा बायको दोघांनीही कोणाच्याच माहेरी न रहाता दुसरीकडे रहाणे.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 12:54

In reply to by अनु राव

ओके. आता पुढचे प्रश्न.
१. माहेर दोघांनी कायमचं सोडायचं? कि परत यायचं? किती वर्षांनी? केव्हा? का?
२. जाताना माहेरांतून काय (संपत्ती) घेऊन जायची? का?
३. अन्यत्र राहणे ही एक भावनिक अ‍ॅडजस्टमेंट असते. ती १००% लोकांना भोगावी लागणे इष्ट कि ५०%?
४. मुलीला सासरी जावे लागणे हा एक अन्याय आहे असे म्हणायचे असेल तर मुलगा असलेले सगळे मातापिता गुन्हेगार असतात असे गृहितक निघते त्यामागचे. हा ५०% समाज झाला. म्हणजे प्रचंड मोठी संख्या. समाजात जर इतकी गुन्हेगारिता आहे, तर या समाजाला अल्पशक्ती सरकार काहीच करू शकत नाही. नुसती अनागोंदी.
५. नविन ठिकाणी जोडप्याची काय सोय असेल?
६. म्हातारपणी मायबापाला कोण सांभाळणार?
७. ५ एकर शेती असणारा शेतकरी स्वतः, बायको, मुले नि मुली मधे संपत्ती व उत्पन्न कसे वाटणार? मजूर लोक्कांत घरी आज्जीऐवजी मूले कोण सांभाळणार? प्रश्न शहरी बामनी केले तर उत्तरे येतात पण ...
८. दोघांनी अन्यत्र? समजा त्याची नोकरी हीगावात नि तिची शीगावात असली तर नक्की कोणी नोकरी सोडायची? कुठे जायचं? किती भांडायचं?

अनु राव Tue, 27/12/2016 - 13:39

In reply to by अजो१२३

१. माहेर दोघांनी कायमचं सोडायचं? कि परत यायचं? किती वर्षांनी? केव्हा? का?

परत कशाला आणि का यायचे?

रादर भारतीय पुरुषांना, त्यांचे माहेर सोडणे मँडेटरी केले पाहिजे. जरा इंडीपेंडंट होऊन जगण्याची सवय लागली पाहिजे.

२. जाताना माहेरांतून काय (संपत्ती) घेऊन जायची? का?

संप्पत्ती वाटपाचे जे नियम आहेत ते दोघांनाही सारखे लावणे अपेक्षीत आहे.

४. मुलीला सासरी जावे लागणे हा एक अन्याय आहे असे म्हणायचे असेल तर मुलगा असलेले सगळे मातापिता गुन्हेगार असतात असे गृहितक निघते त्यामागचे. हा ५०% समाज झाला. म्हणजे प्रचंड मोठी संख्या. समाजात जर इतकी गुन्हेगारिता आहे, तर या समाजाला अल्पशक्ती सरकार काहीच करू शकत नाही. नुसती अनागोंदी.

अन्याय नक्कीच आहे. पण त्याचा संबंध मातापिता गुन्हेगार असण्याशी नाहीत. तुमच्या मता प्रमाणे मुलगा मुलीच्या माहेरी रहात नाही याचे कारण मुलीचे मातापिता गुन्हेगार आहेत हे आहे का?
मुलाचे/मुलीचे मातापिता अगदी संत असतील तरी स्वतंत्रच रहायला पाहिजे.

५. नविन ठिकाणी जोडप्याची काय सोय असेल?

अर्थ कळला नाही, तरी जी काय सोय हवी असेल ती ते जोडपे करतील. सोय करणे झेपत नसेल तर लग्नच करु नये.

६. म्हातारपणी मायबापाला कोण सांभाळणार?

सांभाळतील की मुलगा/मुलगी. वेगळे रहाणे म्हणजे काही शत्रूत्व नाहीये.

८. दोघांनी अन्यत्र? समजा त्याची नोकरी हीगावात नि तिची शीगावात असली तर नक्की कोणी नोकरी सोडायची? कुठे जायचं? किती भांडायचं?

ते ती जोडपे ठरवतील ना. इतके काय विशेष?

--------------------
अजोंचा रीप्लाय आला नाही म्हणजे अजो सहमत आहेत माझ्या विचारांशी.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 13:47

In reply to by अनु राव

तुम्ही कधी कशाचं पॉलिसी फ्रेमवर्क बनवलं नाही (असतं तर असा प्रतिसाद दिला नसता.) तेव्हा मी प्रतिसाद टाळला. एका प्रोक्यूरमेंट डायरेक्टरसमोर एक अत्यंत हुशार ड्रायवर आणून ठेवला तर ते दोघे डिपार्टमेंट चालवू शकत नाहीत. ड्रायवरला अस्सच व्ही पी प्रॉक्यूरमेंट पदावर क्षणार्धात आणता येत नाही.
===================
असो. गंभीरपणे सार्‍या बारीक सारीक बाबींचा विचार करा, and try to find a complete and logically consistent solution.

अनु राव Tue, 27/12/2016 - 13:53

In reply to by अजो१२३

असो. गंभीरपणे सार्‍या बारीक सारीक बाबींचा विचार करा, and try to find a complete and logically consistent solution.

मी दिलेले सोल्युशन मी स्वता आणि माझ्या माहितीतल्या कित्येकांनी वापरलेले आहे आणि ते मुलीला सासरी धाडण्याच्या सोल्युशन पेक्षा नक्कीच जास्त आनंदी आहेत. कोणालाही पश्चाताप वगैरे नाही.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 14:02

In reply to by अनु राव

आईबाप, त्यांचे घर, संपत्ती, व्यवसाय, नोकरी, सगळे तिथेच असताना स्वतःची नोकरी, व्यवसाय हे देखिल तिथेच असताना वेगळ्या घरात भारतात फार कमी लोक राहतात - जवळजवळ ०%. 'मुलीने सासरी राहायचे नाही' (ते ही सासुसासरे सज्जन असताना) इतक्याच कारणासाठी भारतात कोणी अन्यत्र राहत नाही.
=================
नोकरीमुळे कपल वेगळे राहू लागले, इ इ ला तुमच्या क्लबात घेऊ नकात.

अनु राव Tue, 27/12/2016 - 14:07

In reply to by अजो१२३

भारतात इतकी शतके काय होत होते आणि काय होत नव्हते ह्या विदा किंवा परंपरांवर काय बरोबर आणि काय चुक हे ठरत नाही.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 14:19

In reply to by अनु राव

मग लग्न करणेच चूक असा नवा पुरोगामी पावित्रा घेणार का?
===================
मुलीने सासरी का जाऊ नये? याचं काही उत्तर मिळेल का? मंजे परंपरेत बदल होण्याची आवश्यकता आहे हे जस्तिफाय होईल. उगाच 'बेटी पराया धन' म्हटलं म्हणून वाइट का वाटून घ्यायचं? पराया कचरा असं तर म्हटलं नाही ना? मुलगी धन आहे, ते दान करून कोणाला उपकॄत करण्यात विकृत मानसिकता पुरोगामीच पाहू जाणोत.
-===========
शिवाय ते फक्त एका वर्किंग सोशल सिटमचं टायटल आहे.
========
आता धन मोठं करणं ही एक अवघड लाएबिलिटी आहे असा विचार महागाई आणि भौतिकवादाच्या काळात बळावतोय, पण बापाचं मुलीवर नि सासर्‍याचं सुनेवर प्रेम नसतं हा विचार देखिल फक्त पुरोगामीच समर्थू शकतात.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 14:41

In reply to by अनु राव

रेग्यूलर सेक्स करायला. मूले पैदा करायला. उत्क्रांतीचा रेटा (लोक म्हणतात असं) चालू ठेवायला. शिवाय संपत्ती आणि उत्पन्न कमवायला. (या गरजा फक्त पुरुषांच्या आहेत हा चष्मा काढून उत्तर/प्रतिसाद द्या.)
===============
ही गरज अन्य कोण्या मार्गाने भागवायची? विवाहसंस्थाच नसणे, भटके सेक्स जीवन असणे, इन्सेस्ट हाच एक पर्याय ठेवणे हे ऑस्प्शन्स असतील तर त्यावरही बोलू.
==============
भारतीय संस्कृतीला पूर्ण फाटा देऊन उत्तर दिलं आहे.
=================
मुलांनीही पर्मनंटली सासरी जायला हरकत नाही. ते एकच पडतं. मंजे इट डज नॉट मोर मेरिट.
=============
छापा काटा पुरुषांच्या बाजूने पडला. पण तिसरा उपाय नाही.

अनु राव Tue, 27/12/2016 - 14:50

In reply to by अजो१२३

रेग्यूलर सेक्स करायला. मूले पैदा करायला

ह्या साठी मुलीने सासरी जाण्याची काय गरज आहे? दोघांची माहेरं सोडुन तिसरी कडे सेक्स करायला जमत नाही काय?

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 15:07

In reply to by अनु राव

तिसर्‍या जागी झालेलं मूल कोणाच्या घरी न्यायचा त्याचा नियम बनवा. मग तो अन्यायकारक आहे म्हणून नव्या बोंबा ठोका.
===============
मला नै वाटत आपल्या अपत्याचं मूल कोण्या घरी न्यायचं यावर सहमती बनेल. दोघांचे मायबाप मरेस्तोर भांडतील. तो उत्क्रांतीचा रेटा आठवतो का?

अनु राव Tue, 27/12/2016 - 15:09

In reply to by अजो१२३

सगळा प्रॉब्लेम बापाला असतो कारण त्याला घरात काम करायला लागते.
माहेरी राहीले की आईच्या पदराआड लपता येते.

नितिन थत्ते Tue, 27/12/2016 - 16:48

In reply to by अनु राव

बुल्स आय !!!

अनु राव यांना माझ्यातर्फे पार्टी.
ऑल्सो ऑन द अदर हॅण्ड एकत्र कुटुंबात नवर्‍यावर बायकोला कामात मदत करावी वाटले तरी "मदत न करण्याचे प्रेशर" असते.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 27/12/2016 - 20:51

In reply to by नितिन थत्ते

अनु राव - स्त्री आहेत असं गृहितक - वाक्यरचना - ... त्याला घरात काम करायला लागते.
नितिन थत्ते - पुरुष आहेत असं गृहितक - वाक्यरचना - ...नवर्‍यावर बायकोला कामात मदत करावी वाटले ...

माझं लक्ष 'घरकाम करणं' आणि 'घरकामात मदत' या दोन शब्दरचनांकडे आहे. यापलीकडे मला काहीही म्हणायचं नाही.

नितिन थत्ते Wed, 28/12/2016 - 11:40

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शब्दरचना वगैरे इतका काही कीस करायला नको.
तुम्हाला जे दर्शवायचे आहे ते मी आधीच खालच्या सहीत मान्य केलेले आहे.

नितिन थत्ते Tue, 27/12/2016 - 16:37

In reply to by अजो१२३

आमच्या वडिलांच्याकडे - माझे तीन काका आणि आजोबा एकाच (चिपळूण) गावात रहात होते. पण दोन काका वेगळ्या घरात रहात होते. एक काका आजोबांचा वैद्यकीचा व्यवसाय पुढे चालवत त्याच घरात राहिले.

आमच्या आईकडे- आजोबांचे तीन भाऊ नाशकात रहात होते. त्यापैकी प्रथम एका भावाचे लग्न झाले होते आणि इतर दोन भाऊ त्यांच्याकडे शिकायला राहिले होते. त्या दोन्ही भावांची शिक्षणे होऊन त्यांची लग्ने होताच ते दोघेही भाऊ स्वतंत्र बिर्‍हाडे करून रहात होते. माझे दोन मामा पुण्यात रहात होते. पण तेही एका घरात रहात नव्हते.

किमान आमच्या दोन्हीकडच्या कुटुंबांमध्ये तीन पिढ्यांपासून एकत्र कुटुंब व्यवस्था अस्तित्वात नव्हती. एकत्र कुटुंब व्यवस्था ही काल्पनिक व्यवस्था आहे. वेगळे राहणे परवडत नसल्याने नाइलाज म्हणून अंमलात आणली जाणारी...... (नव्या जमान्यात जागांचे दर कैच्याकै जास्त झाल्याने एकत्र राहण्याचे प्रमाण वाढले आहे).

अनु राव म्हणतात तसे (सासूसासरे सज्जन असले तरी) नव्या जोडप्याने वेगळे राहणेच उत्तम. कारण ते (समाजाच्या दृष्टीने गुन्हेगार नसलेले) सज्जन असले तरी ते डॉमिनेटिंग, इंटरफिअरिंग, पॅट्रनायझिंग असू शकतात.

पुरुष Wed, 28/12/2016 - 08:58

In reply to by अनु राव

जरा इंडीपेंडंट होऊन जगण्याची सवय लागली पाहिजे.

अल्लेलेले... छकुलीपेक्षा ज्यास्त कमवणाला, स्वतःचे लक्ताचे नातेवैक शोडून फक्त छकुलीचेच ऐकणाला इंडिपेंडंट भावला पैजे काय छकुलीला? लब्बाऽऽऽड!

गब्बर सिंग Tue, 27/12/2016 - 12:42

In reply to by अजो१२३

तुला कळेल परंपरांचे महत्त्व.

अजो, परंपरा अनावश्यक आहेत असं मला म्हणायचं नाही, नव्हतं, नसेल.
परांपरा अस्तित्वात असतात, असाव्यात, असतील.
पण परंपरांचे पालन हे एन्फोर्स होता कामा नये हा माझा मुद्दा आहे.
परंपरा ह्या इन्फोर्स केल्या की आख्खी एक समाजव्यवस्था एककल्ली होते. उदा. मुलींची कुस्ती हा प्रकार अस्तित्वातच नसणे. व तो अस्तित्वात येण्यास प्रतिबंध असणे.
परंपरा ह्या इन्फोर्स करणे हे समस्याजनक असते याचे दुसरे कारण हे सुद्धा आहे की परंपरा ह्या बदलण्याचे प्रयत्न करणार्‍याला प्रचंड बलप्रयोगाला तोंड द्यावे लागते. कायद्याचे तसं नसतं. कायदा जरी एन्फोर्स केला गेला तरी तो परिवर्तनशील असतो. तो बदलण्याची सोय असते.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 13:16

In reply to by गब्बर सिंग

गब्बर, अज्ञानी राहणे नावाची कोणती परंपरा नाही. परंपरा लोक अज्ञानी असेपर्यंतच पाळतात. त्यानंतर लोक परंपरा बदलतात. (कायद्यांचं तसं एखादेवेळेस नसतं.)
================
पोरींनी कुस्ती खेळू नये अशी कोणती परंपरा नाही. गावचे लोक वर्षातून एकदा कुस्ती पाहतात. त्यात मुली नसतात. फडांना पण मुलींना कुस्ती खेळवून माहीत नाही. एखादी गोष्ट त्या गावाला नविन आहे मंजे भारतीय परंपरा नाही असे होत नाही. http://www.fscclub.com/history/indian-combat-e.shtml इथे पारंपारिक महिला कुस्तीवर लेखन आहे.
==================
शहरी पुरोगामी लोक देखिल भयंकर परंपरावादी असतात. माझे वडील जेव्हा दिवच्या बेटावर धोतर घालून गेले तेव्हा तिथले पियक्कड तरुण त्यांना चिडवू लागले. दंगल मधे जस्ते या मुलींनी केस कापले तेव्हा गावकरी त्यांना चिडवत तसे. मी त्यांना काय म्हणू? समुद्रकिनारी पर्यटनस्थळी धोतरात एंजॉय करणे त्यांना विचित्र वाटले. ईट्स ओके. कोणत्याही नाविन्यास विरोध होतो. याला परंपरांचा बॅरियर म्हणणे अर्थहिन आहे. कॉलेजात सकाळी ४-५ उठणारांना देखिल आम्ही चिडवत असू. माझ्या मुलाला त्याचे वर्गमित्र चायनिज म्हणून चिडवतात. नाविन्यास होणार्‍या मामूली विरोधाचा भयंकर कांगावा करणे हे पुरोगाम्यांचे व्यवच्छेदक (मंजे काय ते माहित नाही.) लक्षण आहे.
====================
गब्बर, मला वाटतं तू परंपरांच्या उत्क्रांतीची इतिहास वाचला पाहिजे. आणि कायद्याच्या पण.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 14:09

In reply to by अजो१२३

गब्बर लिंक पाहिली का?
====================
मतदान न करणारे वा चुकीचे करणारे वा चुक उमेदवाराला करणारे वा पैसे खाऊन करणारे बरेच लोक देशात आहेत. ते पाहून (त्यांचे वागणे सिनेमात तसे पाहून) लोकशाहीवरच टिका करणे गैर. एकतर कशालाही परंपरा म्हणणे आणि परंपरा चूक पाळणारांना पाहून परंपरांनाच नावे ठेवणे अयोग्य.
============
बाय द वे, भारतात बायकांच्या कुस्त्यांची परंपरा प्राचीन आहे. तिचा मला अभिमान आहे. आणि बायकांच्या कुस्तीचा शोध आधुनिक आहे असा पुरोगामी कांगावा अमान्य आहे.

चिंतातुर जंतू Tue, 27/12/2016 - 14:12

In reply to by अजो१२३

>> शहरी पुरोगामी लोक देखिल भयंकर परंपरावादी असतात. माझे वडील जेव्हा दिवच्या बेटावर धोतर घालून गेले तेव्हा तिथले पियक्कड तरुण त्यांना चिडवू लागले. दंगल मधे जस्ते या मुलींनी केस कापले तेव्हा गावकरी त्यांना चिडवत तसे. मी त्यांना काय म्हणू? समुद्रकिनारी पर्यटनस्थळी धोतरात एंजॉय करणे त्यांना विचित्र वाटले. ईट्स ओके. कोणत्याही नाविन्यास विरोध होतो. याला परंपरांचा बॅरियर म्हणणे अर्थहिन आहे. कॉलेजात सकाळी ४-५ उठणारांना देखिल आम्ही चिडवत असू. माझ्या मुलाला त्याचे वर्गमित्र चायनिज म्हणून चिडवतात. नाविन्यास होणार्‍या मामूली विरोधाचा भयंकर कांगावा करणे हे पुरोगाम्यांचे व्यवच्छेदक (मंजे काय ते माहित नाही.) लक्षण आहे.

आप आए बहार आई.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 14:28

In reply to by चिंतातुर जंतू

काय रे जंतू, नक्की काय झालं तुला?
=========
पियक्क्ड मंजे संपूर्ण संतुलन बिघडलेले नाय रे. ते व्यवस्थितच होते. आपल्याशी असंबंधित लोकांना आपण डायरेक्ट जाऊन असं चिडवत नाही असं म्हणायचं होतं.
===================
तुझ्या समीक्षेची भितीच न्यारी!!! हा हा हा

चिंतातुर जंतू Tue, 27/12/2016 - 14:33

In reply to by अजो१२३

>> पियक्क्ड मंजे संपूर्ण संतुलन बिघडलेले नाय रे. ते व्यवस्थितच होते.

ते काहीही असो. बीचवरचे सगळे पियक्कड तरुण आणि मुलाच्या वर्गातले सगळे जण पुरोगामी आहेत हे कळल्यामुळे जी काही बहार आली की माझे समीक्षेचे शब्दच अपुरे पडले जोशीभाऊ ;-)

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 14:51

In reply to by चिंतातुर जंतू

कसं आहे जंतुभाऊ, जगात रिलेटीविटी हा एक प्रकार आहे. बीचवरचे तरुण माझ्या वडिलांपेक्षा १०० पट पुरोगामी आहेतच.शिवाय माझ्या मुलाच्या क्लासमधल्या मुलांचे पालक हे देखिल अत्यंत पुरोगामी आहेत. त्यांचेच संस्कार त्यांच्या मुलांवर आहेत. यात एक संस्कार रेसिस्ट नसावे, सर्व मानव समान आहेत हा देखिल आहे.
===============
तू दंगल पाहिला आहे का? असेल वा नसेल, पण गब्बर ज्याला परंपरांचा त्रास म्हणतोय ते तसं नाहीच. मी समांतर उदाहरणं देतोय.
======================
नाविन्याची खिल्ली उडवण्याचा आधार घेऊन परंपरांना झोडणे योग नाही असे म्हणतोय. समीक्षेसाठी रियाज वाढवा जंतुभाऊ. ;)

चिंतातुर जंतू Tue, 27/12/2016 - 14:55

In reply to by अजो१२३

>> माझ्या मुलाच्या क्लासमधल्या मुलांचे पालक हे देखिल अत्यंत पुरोगामी आहेत. त्यांचेच संस्कार त्यांच्या मुलांवर आहेत. यात एक संस्कार रेसिस्ट नसावे, सर्व मानव समान आहेत हा देखिल आहे.

तुमचा मुलगा पुण्यात शाळेत जातो ना?

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 15:04

In reply to by चिंतातुर जंतू

हा अनुभव दिल्लीतल्या सर्वात प्रतिष्ठीत शाळेतला देखिल आहे.
========
पॉईंट तो नाही. व्यवस्था मंजे १९-२० होणारच. उगाच कशाचंही खापर परंपरांवर फोडणं योग्य नाही. आणि असंच असलं तर शहरात राहणारे प्रगत पुरोगामी (पुरोगामी मंजे नॉट रिलेटीव टू जंतुभाऊ) लोक देखिल वाघमारे साहेब म्हणतात तसं काही काही विचित्र गोष्टींच्या पुरोगामी परंपरा बनवतात. याचा आपल्याला त्रास झाला तर शहराच्या प्रगतीलाच नावे ठेवण्यात काही लॉजिक आहे का?

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 15:12

In reply to by चिंतातुर जंतू

तसं तुम्हाला हे कळून फार आनंद होईल पण जग खरोखरच फार पुरोगामी बनलं आहे. त्याचा प्रत्यय अनेक ठिकाणी येतो. काही क्लिष्ट मुद्द्यांवर पुरोगामीत्व मंजे नक्की काय यावर ऐसीवर गुद्दागुद्दी होत असली तरी काही ठळक तत्वे लोकांना फार आवडून गेली आहेत. त्याकरिता त्यांनी परंपरांना सरळ तिलांजली दिली आहे. हे प्रम्माण शहरात जास्त आहे. श्रीमंतात जास्त आहे. शिक्षितांत जास्त आहे.

चिंतातुर जंतू Tue, 27/12/2016 - 15:35

In reply to by अजो१२३

>> काही क्लिष्ट मुद्द्यांवर पुरोगामीत्व मंजे नक्की काय यावर ऐसीवर गुद्दागुद्दी होत असली तरी काही ठळक तत्वे लोकांना फार आवडून गेली आहेत. त्याकरिता त्यांनी परंपरांना सरळ तिलांजली दिली आहे. हे प्रम्माण शहरात जास्त आहे. श्रीमंतात जास्त आहे. शिक्षितांत जास्त आहे.

इशान्य भारतातल्या चेहरेपट्टीच्या मुलाला 'चिनी' म्हणून खिजवणं हे सरळसरळ वंशभेदी वर्तन आहे. लहान मुलं अनेकदा असं असहिष्णु वागू शकतातही, पण त्यांच्या पालकांना जर आपल्या पाल्याचं असं वर्तन क्षम्य वाटत असेल, तर माझ्या सहिष्णुतेच्या किंवा उदारमतवादाच्या व्याख्येत ते बसणार नाहीत. मग ते कितीही शिक्षित, कुठल्याही शहरातले किंवा कितीही श्रीमंत असोत.

अनुप ढेरे Tue, 27/12/2016 - 15:50

In reply to by चिंतातुर जंतू

समजा एखादा माणूस दलितांच्या (किवा स्त्रीयांच्या) हक्कांच समर्थन करून त्याबद्दल लढा देत असेल पण त्याच वेळेस तो होमोफोबिक असेल तर तो पुरोगामी का प्रतिगामी?

चिंतातुर जंतू Tue, 27/12/2016 - 16:14

In reply to by अनुप ढेरे

>> समजा एखादा माणूस दलितांच्या (किवा स्त्रीयांच्या) हक्कांच समर्थन करून त्याबद्दल लढा देत असेल पण त्याच वेळेस तो होमोफोबिक असेल तर तो पुरोगामी का प्रतिगामी?

होमोफोबिक वर्तन पुरोगामित्वाच्या, उदारमतवादाच्या किंवा सहिष्णुतेच्या व्याख्येत बसणार नाही. विशिष्ट व्यक्तीचं वेगवेगळ्या बाबतींतलं वर्तन तपासावं लागेल. आणि त्या वर्तनात एकसंधता आढळेलच असं नाही. उदाहरणार्थ, हे विकीपान पाहा. कृष्णवर्णीय म्हणून स्वतःच वंशभेदाला सामोरा जाणारा होमोफोबिक असू शकतो. पुण्यात मला असे किती तरी लोक भेटतात. उदा. ब्राह्मण असूनही जातपात न पाळणारे सापडतातही, पण त्याच वेळी ते होमोफोबिक किंवा वर उल्लेख केला त्याप्रमाणे इशान्य भारतातल्या लोकांविषयी वंशभेदीही असतात. किंवा दैनंदिन आयुष्यात जातपात पाळत नाहीत, पण विवाह जुळवून देणार्‍या संस्थेत मुला/मुलीची नोंदणी करताना विशिष्ट जाती/पोटजातीतलं स्थळच हवं म्हणून सांगतील आणि असं सांगितल्याचं लोकांपासून लपवून ठेवतील वगैरे.

थोडक्यात, ह्याला खूप कंगोरे आहेत. पुरोगामी-प्रतिगामी असे दोन एक्स्क्लूजिव्ह कप्पे करून करकरीत, त्यामुळे वरवर पाहता सोपी पण खोलवर पाहता फसवी विभागणी करण्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचं काही तरी विश्लेषण करावं लागेल.

अनुप ढेरे Tue, 27/12/2016 - 16:26

In reply to by चिंतातुर जंतू

पुरोगामी-प्रतिगामी असे दोन एक्स्क्लूजिव्ह कप्पे करून करकरीत, त्यामुळे वरवर पाहता सोपी पण खोलवर पाहता फसवी विभागणी करण्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचं काही तरी विश्लेषण करावं लागेल.

प्रिसाईजली! अजो बहुधा या मधल्या टप्प्यावरच्या लोकांबद्दल बोल्तायत. जे काही बाबतीत पुरोगामी आहेत पण काही बाबतीत नाहीत. अर्थात ते असे मधले लोक पाहून पुरोगामी वाईट असं म्हणतायत बहुधा.

चिंतातुर जंतू Tue, 27/12/2016 - 16:31

In reply to by अनुप ढेरे

>> अजो बहुधा या मधल्या टप्प्यावरच्या लोकांबद्दल बोल्तायत. जे काही बाबतीत पुरोगामी आहेत पण काही बाबतीत नाहीत. अर्थात ते असे मधले लोक पाहून पुरोगामी वाईट असं म्हणतायत बहुधा.

ते ज्यांना पुरोगामी म्हणताहेत ते लोक कोणत्या बाबतींत पुरोगामी आहेत ते कळत नाही. उदा. बीचवर बर्म्युडा घालणं पुरोगामी का, ते मला नीटसं समजलेलं नाही. आणि बीचवर धोतर नेसून (घालून नव्हे) फिरणं ह्यात मला काही प्रतिगामित्व आढळत नाही. उदा. माझी कोकणातली आजी बीचवर नऊवारी नेसून फिरे, पण स्वयंपाकघरात येणारं माणूस कोणत्या जातीचं आहे त्यानं तिला कधी फरक पडला नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 27/12/2016 - 20:55

In reply to by अनुप ढेरे

एका बाबतीत पुरोगामी, दुसऱ्या बाबतीत प्रतिगामी, अशा अर्थाचा धनंजयचा दिवाळी अंकातला लेख - अमेरिकेतील चळवळी : धागे उभे-आडवे, आडवे-तिडवे

ए ए वाघमारे Tue, 27/12/2016 - 18:22

In reply to by चिंतातुर जंतू

तुम्ही बहुधा माझ्या विधानाबद्दल बोल्ताय!

मी शहरी परंपरावादी म्हटलय- शहरी पुरोगामी नाही. शहरी असणं आणि पुरोगामी असणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.

चिंतातुर जंतू Tue, 27/12/2016 - 18:25

In reply to by ए ए वाघमारे

>>मी शहरी परंपरावादी म्हटलय- शहरी पुरोगामी नाही. शहरी असणं आणि पुरोगामी असणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.

मी ह्याबद्दल बोलतोय -

>> शहरी पुरोगामी लोक देखिल भयंकर परंपरावादी असतात. माझे वडील जेव्हा दिवच्या बेटावर धोतर घालून गेले तेव्हा तिथले पियक्कड तरुण त्यांना चिडवू लागले. दंगल मधे जस्ते या मुलींनी केस कापले तेव्हा गावकरी त्यांना चिडवत तसे. मी त्यांना काय म्हणू? समुद्रकिनारी पर्यटनस्थळी धोतरात एंजॉय करणे त्यांना विचित्र वाटले. ईट्स ओके. कोणत्याही नाविन्यास विरोध होतो. याला परंपरांचा बॅरियर म्हणणे अर्थहिन आहे. कॉलेजात सकाळी ४-५ उठणारांना देखिल आम्ही चिडवत असू. माझ्या मुलाला त्याचे वर्गमित्र चायनिज म्हणून चिडवतात. नाविन्यास होणार्‍या मामूली विरोधाचा भयंकर कांगावा करणे हे पुरोगाम्यांचे व्यवच्छेदक (मंजे काय ते माहित नाही.) लक्षण आहे.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 18:34

In reply to by चिंतातुर जंतू

तुम्ही तर पियक्कड लोक पुरोगामी नसूच शकतात असा समज करून घेतलेला दिसतो. काय राव, ते लोक पुरोगामी आहेत हे पहिलं, ते पिलेले होते हे दुसरं नि असंबंधित.
==========
आता प्लिज दुर्गम ग्रामीण भागात खरे पुरोगामी राहतात आणि शहरी लोक त्यामानाने प्रतिगामी असतात असे म्हणू नका.

चिंतातुर जंतू Tue, 27/12/2016 - 18:41

In reply to by अजो१२३

>> तुम्ही तर पियक्कड लोक पुरोगामी नसूच शकतात असा समज करून घेतलेला दिसतो. काय राव, ते लोक पुरोगामी आहेत हे पहिलं, ते पिलेले होते हे दुसरं नि असंबंधित.

नाही. मी एवढंच म्हटलं -

>> ते (पक्षी : अजो) ज्यांना पुरोगामी म्हणताहेत ते लोक कोणत्या बाबतींत पुरोगामी आहेत ते कळत नाही.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 18:30

In reply to by चिंतातुर जंतू

अहो चिंज, कितींदा सांगायचं, ऐसीवरचे पुरोगामित्वाचे निकष फार कडक आहेत. अगदी पुरीच्या मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करायला असतात तसे. माझ्या वा वाघमारे साहेबांच्या उदाहरणांत साईट केलेले म्हणजे तुच्छ, मर्त्य पुरोगामी. तुम्हाला ते पुरोगामी वाटणार नाहीत हे साहजिकच आहे (सूर्य कसा मेणबत्तीला तेजःपूंज म्हणेल?), पण ते अनंत भारतीयांच्या मानाने फार पुरोगामी आहेत.

चिंतातुर जंतू Tue, 27/12/2016 - 18:36

In reply to by अजो१२३

>> पण ते अनंत भारतीयांच्या मानाने फार पुरोगामी आहेत.

तुम्ही असं म्हणताय का?

  1. काही भारतीय बीचवर बर्म्युडा घालून फिरतात.
  2. बीचवर बर्म्युडा घालून फिरणार्‍या लोकांना कित्येक भारतीय पुरोगामी समजतात.

चिंतातुर जंतू Tue, 27/12/2016 - 19:03

In reply to by अजो१२३

>> १. समाजात वेगवेगळे सोशल क्लास असतात.
२. पैकी काही क्लास अधिक पुरोगामी असतात.

तुम्ही ज्यांना पुरोगामी म्हणताहात ते लोक कोणत्या बाबतींत पुरोगामी आहेत ते कळत नाही. माझ्या लेखी पुरोगामित्वाविषयीचे अंदाज वर्तनावरून आणि वक्तव्यांवरून करता येतील, पण सोशल क्लासवरून काही सांगता येईल असं नाही. तुमच्या शब्दांत, 'अनंत भारतीयां'चे पुरोगामित्वाविषयीचे निकष काय आहेत ते मला कळलं नाही.

ए ए वाघमारे Tue, 27/12/2016 - 14:55

In reply to by अजो१२३

शहरी पुरोगामी लोक देखिल भयंकर परंपरावादी असतात. समुद्रकिनारी पर्यटनस्थळी धोतरात एंजॉय करणे त्यांना विचित्र वाटले.

सहमत.

यासारखाच माझा अनुभव सांगतो.मी आय.टी.त काम करत असताना आम्ही तारकर्ली बीचवर ट्रिप काढली होती. मी आपला नेहमीसारखा शर्ट पॅण्ट घालून गेलो तर माझ्या मित्रांनी मला मूर्खात काढलं. म्हणाले इथे बीच वर असे कपडे घालायचे नसतात, तर रंगीबेरेंगी फुलाफुलांची टीशर्ट व बर्म्युडा घालत असतात म्हणे. मी म्हटलं- डासांचं काय?

तसंच स्वत:च्या कारने आउटींगला जातानाही वरीलप्र्कारचीच वेषभूषा करायची असते. रेल्वेच्या एसी बोगीतून प्रवास करतानाही असेच सैलसर ब्रॅण्डेड कपडे घालायचे असतात. अधिक डिझायनर स्लिपर्सही आवश्यक. विशेषकरून पुण्यामुंबईत आयटीत काम करणारे तुम्ही चाकरमाने वैदर्भीय असलात तर मस्टच. तर असो.

ए ए वाघमारे Tue, 27/12/2016 - 14:45

In reply to by अजो१२३

नव्या कायद्याने नुसते स्वातंत्र्य व पर्याय देऊन चालत नाही. वर्किंग मेकॅनिझम द्यायला पाहिजे

सहमत !

अनु राव Tue, 27/12/2016 - 14:49

In reply to by ए ए वाघमारे

स्वातंत्र्य देणे खूप झाले. वर्कींग मेकॅनिझम का द्यायचा.
कधीतरी स्पून फीडींग सोडायला नको का?

जेवण तयार केले तर, ताटात दे. ताटात दिले तर भरवुन दे. हे काय चाललय?

ए ए वाघमारे Tue, 27/12/2016 - 15:25

In reply to by अनु राव

असं आहे की आताचे कायदे का निर्माण झाले? तर आधीच्या अस्तित्वात परंपरांना संवैधानिक अधिष्ठान द्यायसाठी. त्यात तंटे निर्माण झाले तर ते सोडवण्याची न्यूट्रल यंत्रणा असावी म्हणून.

उदा. लग्नानंतर हिंदू मुलीने नवर्‍याचा घरी 'नांदायला' जाणे ही परंपरा आधीच होती. हिंदू मॅरेज आणि तत्सम अ‍ॅक्टने त्याला कायदेशीर अधिष्ठान दिले. नवर्‍याने नांदून घेतले नाही,त्रास दिला तर कोर्टात जाण्याचा अधिकार बाईला दिला.आता जर ही परंपरा बदलायची म्हणजे नवर्‍याने बायकोकडे नांदायला जावं किंवा दोघांनीही स्वतंत्र राहावं हे जर कायदेशीर (वा अनिवार्य) करायचं असेल तर त्याला कायदेशीर मॅकेनिझम हवं की नको? अजो म्हणतात तसं त्यातले तंटे कोणी आणि कसे सोडवायचे कारण शेवटी सगळे प्र्श्न इगो आणि पैसा याठिकाणी येवून थांबतात. इथे कायद्याची जबाबदारी जास्त आहे कारण मुलीने नवर्‍याकडे नांदायला जाणे ही 'परंपरा' आपण दुसर्‍या परंपरेने नव्हे तर 'कायदा' करून बदलत आहोत. नुसतं जनजागृती करून ही परंपरा बदलली तरी सुद्धा कायदे काही काळाने बदलावे लागतीलच पण मग ते आधीचाच 'आधी परंपरा मग कायदा' याच पॅटर्नमध्ये मोडतील.

दुसरं एक समांतर उदाहरण म्हणजे सवर्ण-दलितांमधील अस्पृष्यतेची परंपरा. ती आपण कायदे करून मोडली. पण त्यासोबतच समानतेची नवी परंपरा एष्टाब्लिष करताना येणारे संभाव्य अडथळे लक्षात घेऊन इतर कायदेशीर मॅकेनिझम्सही तयार केली जसं अ‍ॅट्रोसिटीस कायदा, अनुसूचित आयोग,मानवाधिकार आयोग,पोलिस, कोर्टस, आरक्षित मतदारसंघ, शिक्षण-नोकरीतील आरक्षण इत्यादी. असं करणं भाग होतं कारण ही आपल्यापुढील सर्वात मोठी सामाजिक समस्या होती.

मुलीनेच लग्न झाल्यावर नवर्‍याच्या घरी जाणे ही काही तितकीशी 'समस्या' नाही. फेमिनिष्टांना तसं वाटू शकेल कदाचित.

अनु राव Tue, 27/12/2016 - 15:32

In reply to by ए ए वाघमारे

तर आधीच्या अस्तित्वात परंपरांना संवैधानिक अधिष्ठान द्यायसाठी

तुमचे हे बिधान चुक आहे.
भारतातले बरेसचे कायदे हे परंपरांना मोडुन काढण्यासाठी तयार झाले आहेत. जसे की सतीचा, हुंडाबंदीचा, मुलीला संपत्तीत हिस्सा मिळण्याचा, पोटगीचा, अस्पृष्यता न पाळण्याचा. मुळात संपुर्णे न्याययंत्रणा जी तयार केली गेली ब्रिटीश काळापासुन ती पंचायत वगैरे परंपेरेला मोडुन काढण्यासाठीच.

लग्न हा वैयक्तीक भाग आहे, त्याची तुलना अस्पृष्यता निर्मुलनाशी करु नका. तो सामाजिक विषय होता.

लग्नानंतर वेगळे रहावे असा कायदा करावा असे मी म्हणत नाहीये. वेगळे न रहाणे चुक आहे असे मी म्हणतीय. हा वैयक्तीक प्रश्न असल्यामुळे कायदे वगैरे करु नये, त्याची काहीही गरज नाही.

ए ए वाघमारे Tue, 27/12/2016 - 17:07

In reply to by अनु राव

बरं

आधीच्या अस्तित्वात परंपरांना संवैधानिक अधिष्ठान द्यायसाठी

हे थोडं सुधारतो-

आधीच्या अस्तित्वात असलेल्या रॅशनल परंपरांना (म्हणजे त्यातला अन्यायकारक भाग गाळून) संवैधानिक अधिष्ठान द्यायसाठी

सतीचा, हुंडाबंदीचा, मुलीला संपत्तीत हिस्सा मिळण्याचा, पोटगीचा, अस्पृष्यता न पाळण्याचा.

या भेदभावी परंपरा बंद करणे म्हणजेच समानतेच्या नव्या परंपरा निर्माण करणे हाच उद्देश हे सामाजिक कायदे तयार करताना नव्हता काय?

तो कितपत साध्य झाला तो भाग वेगळा. निदान तसं 'रिझोल्युशन' तरी आपण केलेलं आहे. कायदे हा अशा रिझोल्युशनच्या अंमलबजावणीतील एक (महत्वाचा) भाग मात्र आहेत. इतर मॅकेनिझमच्या अस्तिवाशिवाय कायदयांना तसा काही फार अर्थ नाही.

लग्न हा वैयक्तीक भाग आहे

तो तसा पुरोगामी लिबरल मनोविश्वात वा अत्यंत फंडामेटली (नुसतं स्त्री-पुरुष संबंध या पातळीवर) विचार केला तर असेलही तरी प्रॅक्टीकल जगात नाही. तो आर्थिक, सामजिक,राजकीय असा सर्वव्यापी विषय आहे. उदा. (हे वैयक्तिक होते आहे तरी) राहुल गांधी हे राजीव व सोनिया यांचे लग्नातून झालेले अपत्य असल्यामुळे कॉन्ग्रेसी लोकांना त्यांचे नेतृत्व (इतर अनेक कारणांसकट) मारून मुटकून का होईना सहन करावे लागते आहे. हे इतर तमाम वारसापक्षांनाही लागू आहे. तरीही लग्न हा विषय सामाजिक कसा नाही?

या प्रश्नाला आर्थिक,पर्यावरणीय बाजूही आहे. जसं सध्याच्या शहरी फॅशनप्रमाणे लग्नानंतर जोडप्याने वेगळे राहण्याचा अर्थव्यवस्थेवर,पर्यावरणावर झालेला आणि होवू शकणारा नेमका परिणाम काय याचाही शास्त्रशुद्ध अभ्यास होणे आवश्यक आहे.

अजो१२३ Tue, 27/12/2016 - 15:51

In reply to by ए ए वाघमारे

दुसरं एक समांतर उदाहरण म्हणजे सवर्ण-दलितांमधील अस्पृष्यतेची परंपरा. ती आपण कायदे करून मोडली.

मला असं देखिल म्हणवत नाही. मंजे नाल्या काढणारे सवर्ण मी पाहिले नाहीत. दलितांमधले चार सवर्णांत समाविष्ट करून घेतले त्यांचा रोष आणि बंड मर्यादेत राहावं म्हणून. नैतर सगळं तशास तसं आहे. जग सगळं सवर्णांचे नवे चोचले पुरवण्यात मग्न आहे. केलेली प्रगती फक्त सर्वांच्या बेसिक गरजा भागवण्याकरिता वापरली गेली असती तर चित्र वेगळं असतं.
============
आपले प्रतिगामी पूर्वज छळ करायचा हा बुद्ध्या दुष्टपणा म्हणून कि 'त्यांचा मागजन्मीचं पाप' हा अज्ञानी मूर्खपणा ण्म्हणून अस्पृश्यता पाळत. पण परिस्थितींना थोडं इक्वेट केलं, ज्ञान, शिक्षण, संस्कार, माध्यमे, इ इ यांच्या संपूर्ण दृष्टीनं पाहिले तर आजचे नवसवर्ण (अधिकारी, नेते, कलाकार,व्यापारी इ) ज्या प्रकारे नवदलितांना (कामवाली, सेक्यूरिटी गार्ड, ड्रायवर, रेडीवाला, कामगार, मजूर, इ) वागवतात ते अधिकच केविलवाणं, आणि दुष्ट आहे. या नवसवर्णांना आपण कसे वागत आहोत याचं भान नाही.
पारंपारिक अस्पॄश्यतेचं ऑसिशियल कारण पापापासून दूर राहणं हे होतं. असं काही नसतं हे माहित असून फक्त अन्याय करणं हा त्यातला क्रिमिनल अँगल होता.
आधुनिक अस्पृश्यतेचं कारणच मुळात दुरावा, लूट, क्राईम हे आहे. घटनेने अन्याय करायला जे स्वातंत्र्य दिले आहे ते बाजूला ठेऊन आपण नीट, सन्मानाने नि औदार्याने वागावे हे वृत्ती अबसेंट आहे.
==============
कायदा आहे म्हणजे अस्पृश्यता नाही असं होत नाही. ती बळावत तर चालली नाहीय ना असा विचार देखिल बर्‍यापैकी व्हॅलिड आहे.

गब्बर सिंग Tue, 27/12/2016 - 23:05

मी व पुरोगामी मंडळीं यात मुख्य फरक हा आहे - की मी परंपरांप्रति होस्टाईल नाही. परंपरा ह्या अस्तित्वातच नसाव्यात आणि कुणीच पाळू नयेत असं मला बिल्कुल म्हणायचं नाही. ज्याला परंपरा पाळायच्या आहेत त्याने अवश्य पाळाव्यात. ज्यांना त्या पाळायच्या नाहीत त्यांना बलपूर्वक पाळायला लावणे चूक आहे हा माझा मुद्दा आहे. त्याचं कारण हे की परंपरांची सुद्धा एक जबरदस्त किंमत व्यक्तींना मोजावी लागते. या केस मधे मुलींच्या कुस्तीची भारतीय परंपरा असूनही महावीर सिंग च्या गावात मुलींच्या कुस्तीच्या एका मार्केट चा आवाका कमी झाला. अर्थातच हे कोणत्याही एका विशिष्ठ व्यक्तीने किंवा गटाने केले नाही. हे अनेक दशके होत गेले. यालाच तू परंपरांची उत्क्रांती म्हणशील. मुलींच्या कुस्तीचे मार्केट नष्ट झाले नाही पण त्याचा आवाका खूप कमी झाला व अनेक मुलींची संधी हुकली कारण त्यांच्या समोरचा तो विकल्प निर्माण व्हायच्या आधीच त्याची पहुच कमी केली गेली. The depth of the market got reduced. If a market is not available then what/who will send a signal to potential entrants to invest their time, effort, and energy in developing the skills and assets that will enable them to enter that market and compete in it ? It is at this juncture that an entrepreneur steps in.

--

एखादी गोष्ट त्या गावाला नविन आहे मंजे भारतीय परंपरा नाही असे होत नाही

अगदी.

तू दिलेली महिला कुस्तीची लिंक पाहीली.

महिला कुस्तीची भारतीय परंपरा होती. पण त्या विशिष्ठ गावात, तालुक्यात, जिल्ह्यात ते विशिष्ठ मार्केट (महिलांची कुस्ती) अस्तित्वात नव्हते.

म्हंजे तिथे संभाव्य मार्केट पार्टिसिपंट्स अस्तित्वात होते, पेमेंट करणारे अस्तित्वात होते. पण हे लोक एकत्र आणण्याची क्रिया सुरु झालेली न्व्हती. There was indeed demand for women's wrestling, and potential payors were also present. पण ट्रांन्जॅक्शन्स होत नव्हती. ही एक मर्यादित प्रमाणावर मार्केट फेल्युअर ची केस होती. The absence of the market (in that particular locality) meant that potential entrants did not have that option available to them. So nobody felt that they can/should invest time, effort, and energy to develop the skills required to enter that market and begin competing.

--

बाय द वे, भारतात बायकांच्या कुस्त्यांची परंपरा प्राचीन आहे. तिचा मला अभिमान आहे. आणि बायकांच्या कुस्तीचा शोध आधुनिक आहे असा पुरोगामी कांगावा अमान्य आहे.

परंपरांचा निक्षेप हा हिंदू या माझ्या ओळखीचा मुख्य भाग आहे.

भारतातल्या बहुतांश परंपरा या हिंदू धर्माचा भाग आहेत असा माझा समज आहे.

---

गब्बर, मला वाटतं तू परंपरांच्या उत्क्रांतीची इतिहास वाचला पाहिजे. आणि कायद्याच्या पण.

डग्लस नॉर्थ, एलेनॉर ऑस्ट्रम या लोकांनी नेमके हेच केलेले आहे. तिमूर कुराण यांनी सुद्धा. खरंतर त्या विषयाचा अभ्यास व संशोधन करणारी एक संस्थाच आहे. www.sioe.org

उदा डग्लस नॉर्थ यांचे हे पुस्तक - Institutions, Institutional Change and Economic Performance

---

१. माहेर दोघांनी कायमचं सोडायचं? कि परत यायचं? किती वर्षांनी? केव्हा? का?
२. जाताना माहेरांतून काय (संपत्ती) घेऊन जायची? का?
३. अन्यत्र राहणे ही एक भावनिक अ‍ॅडजस्टमेंट असते. ती १००% लोकांना भोगावी लागणे इष्ट कि ५०%?
४. मुलीला सासरी जावे लागणे हा एक अन्याय आहे असे म्हणायचे असेल तर मुलगा असलेले सगळे मातापिता गुन्हेगार असतात असे गृहितक निघते त्यामागचे. हा ५०% समाज झाला. म्हणजे प्रचंड मोठी संख्या. समाजात जर इतकी गुन्हेगारिता आहे, तर या समाजाला अल्पशक्ती सरकार काहीच करू शकत नाही. नुसती अनागोंदी.
५. नविन ठिकाणी जोडप्याची काय सोय असेल?
६. म्हातारपणी मायबापाला कोण सांभाळणार?
७. ५ एकर शेती असणारा शेतकरी स्वतः, बायको, मुले नि मुली मधे संपत्ती व उत्पन्न कसे वाटणार? मजूर लोक्कांत घरी आज्जीऐवजी मूले कोण सांभाळणार? प्रश्न शहरी बामनी केले तर उत्तरे येतात पण ...
८. दोघांनी अन्यत्र? समजा त्याची नोकरी हीगावात नि तिची शीगावात असली तर नक्की कोणी नोकरी सोडायची? कुठे जायचं? किती भांडायचं?

Welcome to Transactions Cost Economics.

अजो, तू जे प्रश्न विचारलेले आहेस ते एकदम उचित आहेत. कोणी, कोणाबरोबर, कुठे, कसे, किती दिवस, आणि का रहायचे त्याचे अनेक निर्णय आहेत, वाटाघाटी आहेत, काही इम्प्लिसिट व काही एक्सप्लिसिट क्लॉजेस आहेत. व सर्वात शेवटी अंमलबजावणी आणि तिचे मॉनिटरिंग आहे (की व्यक्ती त्या क्लॉज ला धरून वागत्ये की नाही). ह्या प्रश्नांवर उत्तर म्हणूनच अनेक परंपरा निर्माण झाल्या. निर्माण झाल्या म्हंजे कोणी एका विशिष्ठ व्यक्तीने केल्या नाहीत. ट्रांजॅक्शन्स कॉस्ट मधे ३ कॉस्ट्स येतात - Search costs, negotiation costs, policing and monitoring costs. तू काँट्रॅक्ट्स जाणतोस. या तीन कॉस्ट्स या काँट्रॅक्ट्स च्या मुळाशी आहेत. अर्थातच दंगल चित्रपटात कोणत्याही काँट्रॅक्ट बद्दलचा जिक्र नाही. पण परंपरां ही एक नियम असते. व काँट्रॅक्ट म्हंजे नियमांचा संच.

--

अजो, तू दिलेली लिंक पाहीली. पारंपरिक महिला कुस्तीची.

--

पण गब्बर ज्याला परंपरांचा त्रास म्हणतोय ते तसं नाहीच. मी समांतर उदाहरणं देतोय.

जर कुस्ती ही मौर्य कालापासून चालत आलेली आहे तर महावीरसिंग फोगाट ला विरोधाला तोंड का द्यावे लागले ? हजारो वर्षांची परंपरा असेल व अभिमानास्पद परंपरा असेल तर हरयाणा मधे कुस्तीचे मार्केट आजतागायत पूर्णपणे डेव्हलप व्हायला हवे होते ... ते का झाले नाही ? त्या कुस्तीच्या फडासमोर महावीरसिंग ला विरोधाचा सामना का करावा लागला ?

तू असं म्हणणार का की "असा विरोध झालाच नव्हता आणि दंगल च्या निर्मात्याने/दिग्दर्शकाने खोटंच दाखवलंय की विरोध झाला" ?

माझा मुद्दा हा आहे की त्या विशिष्ठ लोकॅलिटी मधे प्राचीन परंपरांकडे दुर्लक्ष करून "कुस्ती ही महिलांसाठी नसते" अशी परंपरा निर्माण झाली. इतकी की महावीर सिंग स्वतः सुद्धा त्या परंपरेस बळी पडला. तो स्वतः सुद्धा मुलगा नाही म्हणून काही कालासाठी निराश झाला होता. कारण त्याने असंच गृहित धरलं होतं की कुस्ती ही मुलींसाठी नसते. पण नंतर त्याचे डोळे उघडले. पण नंतर कुस्तीच्या फडासमोर त्या परंपरेपायी महावीरसिंग ला बलपूर्वक विरोध झाला. हिला परंपरा म्हणायचं नाही तर मग काय म्हणायचं ?? (ती विशिष्ठ लोकॅलिटीतली का होईना पण परंपरा नैय्ये का ?)

गब्बर सिंग Wed, 28/12/2016 - 00:02

पण ट्रांजॅक्शन्स कॉस्ट इकॉनॉमिस्ट्स हे मूल्यमापन करताना उपलब्ध विकल्पांमधे तुलना करतात. उपलब्ध नसलेल्या पण आदर्श विकल्पाशी तुलना करत नाहीत.

माझ्याच वाक्याचा खुलासा करतो.

या लेखात - लेखक निशांत शेखर यांनी मुद्दा मस्त मांडलाय.

The point that many critics have missed is the potential that Phogat spotted in his daughters which otherwise could have been wasted had he not guided their way to akhada. The scene where Geeta’s friend expresses her pain of being forced to marry an unknown without even her wish being considered, speaks a lot about Indian society and patriarchy.

या चित्रपटाकडे दोन दृष्टीकोनातून पाहिले जाऊ शकते -

(१) एंड्स जस्टिफाय मीन्स ( निशांत शेखर यांचे पुढचे वाक्य मी वरच्या प्यार्‍या मधून वगळलेले आहे.)
(२) What was their next best alternative ? किंवा - the alternative would have been even worse.

व मी दुसर्‍या बद्दल बोलतोय. फक्त त्याला "कंपॅरेटिव्ह इन्स्टिट्युशनल व्ह्यु" किंवा "ट्रांन्जॅक्शन कॉस्ट व्ह्यु" अशी फॅन्सी नावं दिलीत.

( मी असं ऐकलंय की सखारां बाईंडर मधे पण तेंडूलकरांनी असाच मुद्दा उपस्थित केलेला आहे. खखोदेजा.)

---

निशांत शेखर यांना कडकडीत सॅल्युट !!!

---

या निमित्तानं "निर्वाण फॉलसी" बद्दल विचार व्हावा.

चिंतातुर जंतू Wed, 28/12/2016 - 11:52

दंगल आणि स्त्रीवाद वगैरेंवरून चर्चा सुरू झाली आहे, तर हेदेखील वाचा -

आमीर खानचा ‘दंगल’ : बेगडी दिखाव्याचं सुबक पॅकिंग - निखिल जोशी

बाळ सप्रे Wed, 28/12/2016 - 12:18

In reply to by चिंतातुर जंतू

या लेखकाला (निखिल जोशी याला चिंजंना नव्हे ;-) )आमीर खानची अ‍ॅलर्जी आहे एवढ जाणवतं.
अन्यथा दंगलमधला प्रशिक्षक बाप आणि रँचो या पात्रांच्या विचारधारेची तुलना करून आमीरवर खापर फोडलं नसतं.

शारीरीक ताकदीचा दाखला देउन 'मुलगी मुलापेक्षा कमी नाही' हा दाखला मोडीत काढून इतरांना बेगडी स्त्रीमुक्तीवादी/पुरोगामी म्हणून स्वतःचे हसे करून घेतो.

एवढे सगळे झाल्यावर शेवटचे वाक्य "लेखक बुद्धिप्रामाण्यवादाचे अभ्यासक आहेत" खळखळून हसवते.. :-)

चिंतातुर जंतू Wed, 28/12/2016 - 13:31

In reply to by आदूबाळ

>> त्या जोशीभाऊंना 'डिस्नेकरण' म्हणजे काय म्हणायचंय नक्की?

लेखातलं वाक्य : >>‘डिस्नेकरण’ झालं की अतार्किकतासुद्धा पचायला गोंडस होते!

थोडक्यात असं सांगता येईल : कोणत्याही संस्कृतीतला एक भाग ठोकळ्यांचा (स्टीरिओटाइप्स) असतो. ते अधोरेखित करणारे सिनेमे बनवण्याबद्दल 'डिस्नी स्टुडिओज'वर अनेकांचे आक्षेप आहेत. मुळात, कोणत्याही ठोकळ्याला आव्हान देण्यामागचा एक विचार असा असतो की समोरच्याला असुरक्षिततेची जाणीव व्हावी, जुना ठोकळा विचार कालबाह्य झाला आहे की काय असं वाटावं, आणि त्यातून तो विचार करायला प्रवृत्त व्हावा. असे पुरेसे लोक प्रवृत्त झाले तर समाजाचं त्या ठोकळ्यांविरुद्ध प्रबोधन होऊ शकतं. त्याउलट, ठोकळेबाज मांडणी केली तर त्यातून सुरक्षिततेचा फीलगुड अनुभव त्यातून मिळतो, ठोकळ्यांची जपणूक होते आणि प्रबोधनाला खीळ बसते.

Gender Roles and Stereotypes Found in Disney Films

13 Shocking Times Disney Animated Movies Portrayed Racial Stereotypes

अनु राव Wed, 28/12/2016 - 13:37

In reply to by चिंतातुर जंतू

लेखक बुद्धिप्रामाण्यवादाचे अभ्यासक आहेत.

चिंज - ह्या वाक्याचा अर्थ तुम्ही सांगु शकाल का?
तसेच असा क्लेम करण्यासाठी नक्की काय करावे लागते?

चिंतातुर जंतू Wed, 28/12/2016 - 13:42

In reply to by अनु राव

>> चिंज - ह्या वाक्याचा अर्थ तुम्ही सांगु शकाल का?
तसेच असा क्लेम करण्यासाठी नक्की काय करावे लागते?

माझा अभ्यास नाही. तद्वत माझा पास. लेखकाने प्रकाशकाला 'पुरोगामी दहशतवादी' असाही पर्याय दिला होता असं सूत्रांकडून समजतं. इफ इट हेल्प्स ;-)

लोळगे सायकल कंपनी Wed, 28/12/2016 - 13:49

In reply to by चिंतातुर जंतू

याशिवाय डिस्नेबाबत लोकांचा मुख्य आक्षेप असा होता/आहे की डिस्ने स्टुडिओ, मूळ गोष्ट जास्त समाजमान्य व्हावी अशी बदलतात, जेणेकरुन लहान मुले व पालक मोठ्ठ्या प्रमाणात त्यांचा सिनेमा बघायला येतील. (बर्‍याच वेळेला मूळ गोष्टीत असलेले मृत्यू टाळणं, आईवडिल चुकीचे वागले असले तर तो भाग बदलण वगैरे.)
लगेच आठवणारे उदाहरण म्हणजे - टँगल्ड सिनेमात चेटकीण रॅपन्झेलचे अपहरण करते, पण ग्रिमच्या मूळ गोष्टीत चेटकीण रॅपन्झेलच्या आईवडीलांशी पद्धतशीर करार करुन तिला घेवूने जाते.
मला वाटते सिनेमा जास्त लोकांनी बघावा म्हणून चुकीच्या गोष्टी वगळणे किंवा समाजमान्यरितीने दाखवायचा प्रयत्न करणे, असे म्हणायचे आहे जोशींना.

आदूबाळ Wed, 28/12/2016 - 14:15

In reply to by चिंतातुर जंतू

पण समजा दोन ठोकळे असतील - एक मोठा आणि एक छोटा. मोठ्या ठोकळ्याला आव्हान द्यायचं आहे. अशा वेळी छोट्या ठोकळ्याला गोंजारलं तर हरकत नसावी.

(हे दंगलबद्दल नाहीये. जनरल डिस्नेकरणाबद्दल बोलतो आहे.)

चिंतातुर जंतू Wed, 28/12/2016 - 14:25

In reply to by आदूबाळ

>> पण समजा दोन ठोकळे असतील - एक मोठा आणि एक छोटा. मोठ्या ठोकळ्याला आव्हान द्यायचं आहे. अशा वेळी छोट्या ठोकळ्याला गोंजारलं तर हरकत नसावी.

मला वाटतं की आक्षेप गोंजारत केलेल्या गोंडसीकरणाला आहे. उदा. 'रामायणातलं स्त्रीचं चित्रण पुरुषप्रधान संस्कृतीतल्याप्रमाणे ठोकळेबाज आहे', असं म्हणण्यासाठी 'समस्त स्त्रीवर्ग बिच्चाराच असतो' असं म्हणायची गरज भासली तर ते कदाचित छोट्या ठोकळ्याला गोंजारणं होईल.

आदूबाळ Wed, 28/12/2016 - 15:35

In reply to by चिंतातुर जंतू

उदा. 'रामायणातलं स्त्रीचं चित्रण पुरुषप्रधान संस्कृतीतल्याप्रमाणे ठोकळेबाज आहे', असं म्हणण्यासाठी 'समस्त स्त्रीवर्ग बिच्चाराच असतो' असं म्हणायची गरज भासली तर ते कदाचित छोट्या ठोकळ्याला गोंजारणं होईल.

सहमत आहे.

पण माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. रामायणाचं उदाहरण घेऊन विचारतो.

मोठा ठोकळा: समस्त स्त्रीवर्ग बिच्चारा असतो. दृश्य रूपः सीतेला रामाने कोणातरी भलत्याचंच ऐकून सोडून दिलं.
छोटा ठोकळा: वानर ही माणसांपेक्षा कनिष्ठ प्रजात आहे. दृश्य रूपः हनुमान रामाच्या पायाशी बसतो.
(मोठा-छोटा हा भेद उदाहरणापुरता आहे. मिसोजिनी हा रेसिझमपेक्षा मोठा दोष आहे असं म्हणायचं नाहीये.)

पर्याय १: दोन्ही ठोकळे आहेत तसे ठेवणे
सीतेला रामाने कोणातरी भलत्याचंच ऐकून सोडून दिलं. सीतेनेही ते बिनतक्रार मानलं. हनुमानाच्या मनाला राम काही चुकीचं वागला असावा अशी शंकाही शिवली नाही.

पर्याय २: मोठा ठोकळा मोडणे, छोटा तसाच ठेवणे
सीतेला रामाने कोणातरी भलत्याचंच ऐकून सोडून दिलं. सीतेने बंड करून रामाचा पाणऊतारा केला - की तू हनुमानाला मला एकांतात भेटायला मुद्रिका घेऊन पाठवलंस तेव्हा बरा संशय घेतला नाहीस. (कारण तू वानरांना माणसांपेक्षा कनिष्ठ समजतोस. त्याची काय मजाल माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने पहायची...इ०) पण रावणाविषयी मात्र संशय घेतो आहेस.

हे आर्ग्युमेंट काही हनुमानाला पटलं नाही. हनुमानाच्या मनाला राम काही चुकीचं वागला असावा अशी शंकाही शिवली नाही.

पर्याय ३: दोन्ही ठोकळे मोडणे
सीतेला रामाने कोणातरी भलत्याचंच ऐकून सोडून दिलं. सीतेने बंड करून रामाचा पाणऊतारा केला - की तू हनुमानाला मला एकांतात भेटायला मुद्रिका घेऊन पाठवलंस तेव्हा बरा संशय घेतला नाहीस. (कारण तू वानरांना माणसांपेक्षा कनिष्ठ समजतोस. त्याची काय मजाल माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने पहायची...इ०) पण रावणाविषयी मात्र संशय घेतो आहेस.

हनुमानाला पटलं. तो सीतेचा पक्ष घेऊन उभा राहिला. असल्या दांभिक बॉसला सोडून परत किष्किंधा नगरीत गेला.

-------------------
तर आता प्रश्नः पर्याय २ वापरणं योग्य आहे का?

चिंतातुर जंतू Wed, 28/12/2016 - 15:54

In reply to by आदूबाळ

>> तर आता प्रश्नः पर्याय २ वापरणं योग्य आहे का?

मला जर प्रश्न नीट कळला असला तर (उत्तरावरून तुम्हाला असं वाटलं की कळलेला नाही, तर अधिक स्पष्टीकरण द्या) -

मुळात इथे अमुक एक चित्रण योग्य आणि तमुक एक अयोग्य असं म्हणता येतं असं मला तरी वाटत नाही. डिस्नीचे चित्रपट ही एक संहितांची मोळी झाली. तिचं पृथक्करण करताना तिच्यात अमुक तमुक ठोकळे दिसतात आणि त्यामुळे त्यातून काही ठोकळ्यांचं उदात्तीकरण होतं असं म्हणता येतं. त्याचप्रमाणे वाल्मिकी रामायण किंवा रामचरितमानस (कोणती तरी एक आवृत्ती प्रमाण मानून अर्थात) ही एक संहिता आणि त्यात ह्या ठोकळ्यांचं उदात्तीकरण होतं असं म्हणता येतं. तसंच पर्याय दोन वापरला तर असं म्हणता येईल की कनिष्ठ जातीच्या निरपेक्ष भक्तिभावाचं दर्शन घडवून उच्चवर्णीय नायकाला महान दाखवण्याचा एक सरंजामी ठोकळा त्यात आहे. पण पर्याय दोनमध्ये काही संदेश आहे का, असला तर तो काय, सीता नायिका झाली आहे का, की नायक रामच आहे आणि सीता सोडून अन्य बाबतींत त्याचं उदात्तीकरण केलेलं आहे ते कायमच आहे, अखेर एखादं तीट बाळाच्या चेहेर्‍याला गोड करतं किंवा डाग चंद्राला शोभून दिसतो इतपतच सीतेच्या गोष्टीची फोडणी दिलेली आहे, वगैरेंवर अनेक गोष्टी अवलंबून राहतील. तसंच पर्याय तीनमध्येही होईल.

अनु राव Wed, 28/12/2016 - 16:15

In reply to by आदूबाळ

पर्याय ४: दोन्ही ठोकळे मोडणे आणि तिसरा नविन ठोकळा तयार करणे : हनुमान सीतेला भेटायला गेल्यावर, दोघेही एकमेकांवर फिदा झाले आणि रामाला टांग मारुन मालदीव च्या बेटावर नविन किष्कींधा कम अयोध्या वसवुन मरे पर्यंत सुखाने राहिले.

राजेश घासकडवी Wed, 28/12/2016 - 19:38

In reply to by अनु राव

ओ तै, असलं काहीतरी बोलू नका. हनुमानाला नुसते आधुनिक कपडे घातले तरी लोकांच्या भावना दुखावतात. आणि तुम्ही त्याचं आणि सीतेचं अफेअर दाखवायला सांगताय. कुठे फेडाल हे पाप? या नुसत्या कल्पनाविलासासाठी तुम्ही अयोध्येला चार विटा नेऊन देऊन प्रायश्चित्त घेतलं पाहिजे.

अनुप ढेरे Wed, 28/12/2016 - 14:35

In reply to by चिंतातुर जंतू

स्वयंपाकाची जबाबदारी पत्नीवर आणि बायल्या पुतण्यावर टाकतो.

बायल्या म्हणजे?

बाकी सिनेमात राष्ट्रगीत आहे का? बापरे!!! लांबच राहिलेलं बरं असल्या सिनेमापासून. नाझी मेले जिथे तिथे घुसलेत आजकाल!

चिंतातुर जंतू Wed, 28/12/2016 - 15:01

In reply to by अनुप ढेरे

>> बायल्या म्हणजे?

effeminate म्हणायचं असावं. मी चित्रपट पाहिलेला नाही त्यामुळे पुरुषाच्या जेंडर ठोकळ्याला आव्हान देणारी भूमिका आहे का, आणि तिचा प्रस्तुत लेखकानं केलेला उल्लेख अप्रस्तुत आहे का, आणि त्यातून 'पुरुषानं कसं वागावं?' ह्याविषयी त्याच्या डोक्यात असलेला ठोकळा दिसतो का, वगैरेंविषयी मी मतप्रदर्शन करणं अप्रस्तुत ठरेल.

अनुप ढेरे Wed, 28/12/2016 - 15:20

In reply to by चिंतातुर जंतू

effeminate

ह्म्म्म... लेखात तरी हा शब्द डिरोगेटरी अर्थाने वापरलेला वाटला. स्त्रैण काम करणारा बायल्या असं काहिसं. याने लेखात घेतलेल्या पुरोगामी स्टांसवर व्यवस्थित विरजण पडलं आहे असं वाटलं. अर्थात आपण पुरोगामी आहोत अशी दवंडी पिटून नैतिक उच्चासन घेणारे लोक आणि असले विरोधाभास नवीन नाहितच. असो...

अनु राव Wed, 28/12/2016 - 16:23

In reply to by अनुप ढेरे

स्वयंपाकाची जबाबदारी पत्नीवर

काय हरकत आहे? चुक काय आहे? वाईट काय आहे?
पत्नी काय दिवसाचे १२ तास हिंजवडीला जाउन नोकरी करत होती का? घरी असेल तर स्वयंपाक तर करायलाच पाहिजे ना.

अतिशहाणा Thu, 29/12/2016 - 19:32

In reply to by अनु राव

मला वाटतं डॉ.नी तिसरा किस्सा सांगण्यापुरती पहिल्या दोन किश्श्यांची फोडणी दिली आहे. मूळ कंटेंट तिसरा किस्साच आहे. (त्यांची एकंदर वाटचाल पाहता.)

किमान आजरोजीपर्यंत संपूर्ण चर्चेत डॉ.कडून एक उपकिस्सा आलाय तोही तिसऱ्या किश्श्याच्याच अनुषंगाने आहे.
http://www.misalpav.com/comment/909543#comment-909543

असो. ;)

(डेटा सायंटिष्ट) अतिशहाणा

'न'वी बाजू Wed, 28/12/2016 - 23:38

In reply to by अनुप ढेरे

स्वयंपाकाची जबाबदारी पत्नीवर आणि बायल्या पुतण्यावर टाकतो.

बायल्या म्हणजे?

सर्वप्रथम, पुतण्या कोठल्याही अंगाने 'बायल्या' (व्हॉटेवर द्याट मे मीन) वगैरे वाटला नाही. कदाचित लेखकाच्या नज़रों का क़ुसूर असावा. तर ते असो.

ह्याविंग सेड द्याट,

बाकी सिनेमात राष्ट्रगीत आहे का? बापरे!!! लांबच राहिलेलं बरं असल्या सिनेमापासून. नाझी मेले जिथे तिथे घुसलेत आजकाल!

होय, चित्रपटात राष्ट्र्गीत आहे.

मात्र, नाझित्व चित्रपटात राष्ट्रगीत असण्यात नाही. तर, चित्रपटात(सुद्धा) राष्ट्रगीत लागल्यावर तमाम थेटराने (सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने) 'हेऽल हिंद!' म्हणत उभे राहा(वे लाग)ण्यात (आणि कोणी उभे न राहिल्यास (अ) त्यावर कारवाई होण्याच्या शक्यतेत, आणि (ब) कोठल्याही बायष्ट्याण्डरास प्राप्त झालेल्या त्यास बदडून काढण्याच्या (आणि त्याबद्दल त्या बायष्ट्याण्डरावर कोणत्याही कारवाईची अपेक्षा नसण्याच्या) अलिखित अधिकारात आहे.

फरक आहे. असो.

---------------------------------------------------------------------------

आमच्या ग्विनेट कौंटीतल्या थेटरातल्या शो१अला देशी/देशी ओरिजिन जनतेची बर्‍यापैकी गर्दी होती. पैकी (युअर्स ट्रूली इन्क्लूडेड) कोणीही उठून उभे राहिले नाही, की त्यांस उभे करण्यास कोणीही दंडुके घेऊन आले नाही. मात्र, ही तमाम जनता बहुतांशी भारतद्वेष्टी/कोकोनट (बोले तो, बाहेरून ब्राऊन, आतून पांढरी) असण्याची शक्यता, का कोण जाणे, परंतु सुतराम् वाटत नाही. असो.

१अ रेग्युलर मॉलातील रेग्युलर मल्टिप्लेक्षातील रेग्युलर शो. ठराविक वेळा असलेला नि आम जनतेस खुला असलेला. विशेष/प्रायोजित वगैरे नव्हे.

नंदन Wed, 28/12/2016 - 17:20

In reply to by चिंतातुर जंतू

The terms are generally used in a negative way, and they imply homogenization of consumption, merchandising, and emotional labor. They can be used more broadly to describe the processes of stripping a real place or event of its original character and repackaging it in a sanitized format. References to anything negative are removed, and the facts are watered down with the intent of making the subject more pleasant and easily grasped.

दुवा: https://en.wikipedia.org/wiki/Disneyfication

अवांतरः
१. हे Disney-फंक्शन वापरून 'f(Seinfeld) = Friends' असं म्हणता येईल का?

अतिअवांतरः
१. या फंक्शनला रिकर्सिव्ह+रिग्रेसिव्ह मोडात काही वर्षं भिजत घातलं की त्यावर (पावावर बुरशी यावी तशी) दावण्यकळेची झालर तर येत नसेल?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 28/12/2016 - 21:58

In reply to by चिंतातुर जंतू

लेख शेअर करण्याबद्दल आभार.

लेखकाची मतं किती पटली, किती आवडली हे सगळं सोडून निराळीच गंमत जाणवली. लेखाच्या सुरुवातीला, आमीर खानचं लक्ष तिकीटबारीवर, असं म्हणणारा लेखक शेवटी "देशद्रोहाचा आरोप ऐकून कंटाळलेल्या आमीरने कदाचित सूड म्हणूनच ही योजना केली असावी!" असं का म्हणतोय हे काही समजलं नाही. त्यातून मी चित्रपट बघितलेला नाही. एकसंध लेख लिहिण्यात लेखक अपयशी ठरला असं त्या 'सूड'-वाक्यामुळे वाटलं.

'न'वी बाजू Thu, 29/12/2016 - 08:06

In reply to by चिंतातुर जंतू

‘पीके’मुळे ‘हिंदूद्रोही’ आणि चित्रपटबाह्य कारणांनी ‘देशद्रोही’ ठरलेल्या आमीर खानने यावेळेस लोकप्रिय विषय निवडून हे सिद्ध केलं आहे की, त्याचा मूळ उद्देश ‘तिकिटं विकणं’ हाच आहे.

पण... पण... पण... तिकिटे विकण्यात नक्की गैर काय आहे? फक्त...

स्वतःला संवेदनशील आणि बुद्धिवान समजणारे प्रेक्षक हा आमीर खानचा मूळ ग्राहकवर्ग आहे.

...(या) त्याच्या ग्राहकवर्गाचे तिकिटाचे पैसे वसूल झाल्याशी कारण. ते जोपर्यंत होते आहे, तोवर कोणाला आणि नक्की काय अडचण आहे?

अन्यथा पुरोगामी विचारवंत त्याच्याकडे आशेनं बघू लागले होते!

बोले तो, स्वतःला (रैटली ऑर राँगली) संवेदनशील आणि बुद्धिवान समजणारे प्रेक्षक आणि पुरोगामी विचारवंत या दोन वेगवेगळ्या (कदाचित म्यूच्युअली एक्स्क्लूजिव) एंटिटीज़ आहेत?

'न'वी बाजू Thu, 29/12/2016 - 08:16

In reply to by चिंतातुर जंतू

‘दंगल’मध्ये वीरू सहस्रबुद्धेला विरोध करताना ‘कामयाबी’ऐवजी ‘काबिलियत’ शिकवणारा आमीर मात्र, सुवर्णपदकाच्या यशाचा ध्यास धरतो आणि रौप्य पदकाला लाजिरवाणं मानतो.

लाजिरवाणे??? कोठे ब्वॉ?

मुळात काबिलियत असताना त्या काबिलियतला मध्येच अबँडन न करता तिच्या (बोले तो, काबिलियतच्या) उच्चतर/उच्चतम टोकास पोहोचण्याचा प्रयत्न - अगदी ध्याससुद्धा - करण्यात नक्की गैर काय आहे?

'न'वी बाजू Thu, 29/12/2016 - 08:27

In reply to by चिंतातुर जंतू

चित्रपटगृहात प्रेक्षकांना राष्ट्रगीतासाठी उभं करण्याविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सध्या देशभरात चर्चा होते आहे. त्याउप्पर, ‘दंगल’मध्ये शेवटी डिस्नेशैलीतील एका रोमांचक प्रसंगात पुन्हा ‘राष्ट्रगीत’ आहे. कंटाळलेल्या मुलांना किंवा पॉपकॉर्न सांभाळत असलेल्या प्रेक्षकांना उठवण्यासाठी चित्रपटगृहात भक्कन उजेड केला जातो! देशद्रोहाचा आरोप ऐकून कंटाळलेल्या आमीरने कदाचित सूड म्हणूनच ही योजना केली असावी!

मुळात त्या प्रसंगातील राष्ट्रगीत हे प्रसंगाशी सुसंगत वाटते, प्रसंगोचित वाटते, ओढूनताणून घातल्यासारखे अजिबात वाटत नाही, अस्थानी तर मुळीच वाटत नाही. याउपर, त्या प्रसंगात तसे ते घालण्यामागे आमीर खानचा 'तसा' काही अल्टीरियर मोटिव होता किंवा नव्हता, याबाबात काही अधिकृत अथवा आतल्या गोटातील माहितीच्या अभावी त्यावर भाष्य करू शकत नाही. फक्त, एवढेच म्हणू शकतो, की त्या प्रसंगात राष्ट्रगीत घालण्यामागे आमीरचे तसेही काही छुपे उद्दिष्ट यदाकदाचित असलेच, तर 'मान गये, उस्ताद!'.

'न'वी बाजू Mon, 09/01/2017 - 06:49

In reply to by चिंतातुर जंतू

प्रस्तुत लेखक कधीकाळी इतरत्र कोठे 'टोपणनावा'ने लिहीत असावेत काय?

नाही म्हणजे, त्या 'लेखक बुद्धिप्रामाण्यवादाचे अभ्यासक आहेत'वरून (उगाचच) असे वाटले खरे, म्हणून (उगाचच) विचारले, इतकेच. विशेष काही नाही. असो.