मानवी शरीर आणि पाश्चिमात्य संस्कृती (भाग २)
गेल्या भागात ग्रीक-रोमन काळापर्यंतच्या कलाकृती दिल्या होत्या. नंतरच्या काळात ख्रिस्ती धर्माचा झपाट्यानं प्रसार झाला. ग्रोपिनो (इटली) इथल्या सेंट पीटर चर्चमधली (८वं-९वं शतक) ही शिल्पाकृती पाहा :
अर्कचित्र भासणाऱ्या काड्यांच्या मानवी आकृती किंवा आदिम मुखवटे वगैरेंची आठवण हे पाहून होते.
याच काळात अनेक संस्कृतींत सुंदर हस्तलिखित ग्रंथ निर्माण झाले. इतर धर्मांप्रमाणे ख्रिस्ती धर्मातदेखील पुष्कळ ग्रंथनिर्मिती झाली. सहाव्या शतकातल्या राब्युला गॉस्पेलमध्ये ख्रिस्ताच्या स्वर्गप्राप्तीचा प्रसंग पाहा :
किंवा जर्मनीतल्या हिल्डसहाइम चर्चमधला ब्राँझमध्ये घडवलेला अॅडम आणि इव्हला देव रागावतो हा प्रसंग पाहा (अकरावं शतक) :
“Adam and Eve Reproached by the Lord,” bronze panel from the doors of Bishop Bernward at the cathedral, Hildesheim, Germany, 1015.
वास्तववादी शरीर दाखवण्याची गरज अद्याप त्यात दिसत नाही. प्रसंगातलं नाट्य अधोरेखित करण्याचं कसब मात्र त्यात आहे.
कापडावर चित्रं काढणं हा प्रकारही या काळात चांगलाच विकसित झालेला दिसतो. फ्रान्समधली बाय टॅपेस्ट्री ही ह्याचा एक उत्तम नमुना आहे (अकरावं शतक). नॉर्मन लोकांनी इंग्लंडवर आपलं राज्य प्रस्थापित केलं त्यावेळच्या विविध घटना यात दाखवल्या आहेत.
उदा : हॅलेचा धूमकेतू पाहताना काही लोक :
विकिपीडियावर अख्खी टॅपेस्ट्री पाहता येईल.
ख्रिस्ती धर्माच्या गौरवाऐवजी राजसत्तेचा गौरव दाखवणं हे इथे ध्येय आहे. मानवी आकृती दर्शवण्यात असणारी अवास्तवता यात मात्र दोन्हींत साम्य आढळतं.
प्रसंगाची नाट्यमयता दाखवणारं बायझंटाईन शैलीतलं एका पुस्तकातलं हे चित्र पाहा :
The Martyrdom of Saint Timothy (11th century)
कपड्यांच्या चुण्या वगैरे तपशील इथे कष्टपूर्वक चितारले आहेत. पण मानवी आकृती मात्र वास्तवदर्शी नाही.
याच काळात काही अप्रतिम देखणी चर्च उभारली गेली. फ्रान्समधल्या शार्त्रमधलं हे काचेवरचं (स्टेन्ड ग्लास) चित्र :
चेहऱ्यावरचे भाव चितारताना घेतलेले कष्ट इथे जाणवतील.
हा बाराव्या शतकातला एक फ्रेस्को आहे. यात ख्रिस्ताच्या शवापाशी शोक करणारी त्याची आई दिसते. चित्रातलं भावदर्शन इथेही प्रभावी आहे. तर मानवी शरीर हे रेखीव आणि उठावदार आहे, पण वास्तवदर्शी नाही.
बाल येशूला मांडीवर घेतलेली ही त्याची आई तेराव्या शतकात चितारली गेली. सोनेरी रंगाची रेलचेल आणि त्यावर काळ्या वेषातली मारी उठून दिसते. चेहरे, डोळे, हातांची बोटं अशा अनेक तपशीलांत चित्रकाराचे श्रम दिसतात.
अशा अनेक उदाहरणांतून लक्षात येतं की ग्रीकांचा प्रमाणबद्ध शरीरांचा हव्यास या काळात नाही; तसाच मानवी शरीर ‘जसंच्या तसं’ दाखवणं हादेखील त्याकाळी चित्राचा गुणविशेष मानला जात नव्हता. आणि तरीही अनेक माध्यमांतून आशय स्पष्टपणे व्यक्त करणाऱ्या वेधक प्रतिमा वेगवेगळ्या शैलींत मानवी शरीर चित्रित करत होत्या.
ड्यूक ऑफ बेरीच्या ‘बुक ऑफ अवर्स’मधलं एक चित्र (१५वं शतक)
नंतरच्या काळात युरोपियन कलाविश्वात अनेक आमूलाग्र बदल झाले. त्यांचे परिणाम पुढच्या भागात पाहू.
या कालखंडातल्या युरोपियन कलेविषयी अधिक माहिती इथे मिळेल.
प्राचीन ग्रीकांना एकूणच
प्राचीन ग्रीकांना एकूणच 'हार्मनी' आणि परफेक्ट आकारांचं वेड होतं का? ग्रहांचे आकार, ग्रहांच्या कक्षा सगळ्या गोष्टी गोल, वर्तुळाकार असाव्यात असा त्यांचा हट्ट असे. त्यामुळे विज्ञान मागे पडलं. मनुष्याच्या चित्रणातही स्त्री-पुरूषांचे 'परफेक्ट' आकार दिसतात. (आजही ग्रीक लोकं, समाज तसे शिडशिडीत म्हणावे असेच दिसतात.)
प्लुरल ऑफ अॅनेक्डोट इज नॉट डेटा
(आजही ग्रीक लोकं, समाज तसे शिडशिडीत म्हणावे असेच दिसतात.)
२००७ मध्ये केलेल्या सर्वेक्षणानूसार जाडीबाबत ग्रीसचा जगात १६ वा क्रमांक आहे.
(आजही ग्रीक लोकं, समाज तसे
(आजही ग्रीक लोकं, समाज तसे शिडशिडीत म्हणावे असेच दिसतात.)
हे विधान डेटाशिवायच केलेलं आहे. आठ दिवसांत ग्रीसमधे फिरताना डोळ्याला जे दिसलं तसं. विशेषतः ब्रिटनमधून ग्रीसमधे गेल्यानंतर डोळ्यांना जाणवेल इतपत फरक होता. कदाचित मी ज्या भागात गेले तो भाग पर्यटनावर बर्यापैकी विसंबून असल्यामुळे असा फरक दिसला असेल.
शिडशिडीत बांधा आणि पर्यटन
शिडशिडीत बांधा आणि पर्यटन याचा संबंध थोडासा असा की या व्यवसायात नोकरी करणारे लोक शक्यतोवर प्रेझेंटबल असतात; त्यामुळे थुलथुलीत लोकांना या क्षेत्रात फार नोकर्या मिळत नसाव्यात. दुसरं लोकांकडे बर्यापैकी पैसा असावा असं घरं बाहेरून पाहून वाटत होतं. पैसा असल्यामुळेही चीप, जंक फूड खाणं कमी असावं. तिसरं तिथे स्थानिक आणि पर्यटकांचीही सोय म्हणून सार्वजनिक वाहतूकव्यवस्था होती, जिथे चिक्कार स्थानिक दिसत होते. या बसेस वगैरे वापरायच्या (आणे बेशिस्त ग्रीक ड्रायव्हरांपासून तात्पुरती सुटका मिळवायची) तर नाही म्हटलं तरी थोडंफार चालावं लागतं. या सगळ्या वरवर बघून दिसणार्या गोष्टी. (आपल्याकडच्या गोरटेल्या लोकांना ते लोकं ग्रीक समजून ग्रीकमधेच संभाषण सुरू करत होते अशासारख्याच.)
'बिग फॅट ग्रीक वेडींग'मधले तरूण लोकही थुलथुलीत नसून अंमळ व्यवस्थित आकारांचेच वाटले. पुन्हा हा चित्रपट पाहिला त्या काळात ब्रिटनमधे रहाण्याचा परिणामही असेल. डोळ्यांना सुखावह बदल मोजका असेल तरीही लगेच दिसत असेल. पश्चिम युरोप, अमेरिकेत घराबाहेर पडलं की आपण फार बारीक आहोत असं वाटतं. मुंबईत भटकताना, फारच जाड झाले आहे अशी भावना निर्माण होते. वजन आणि आकारात फार फरक पडलेला नसतो.
आठ दिवसांत ग्रीसमधे फिरताना
आठ दिवसांत ग्रीसमधे फिरताना डोळ्याला जे दिसलं तसं.
'बिग फॅट ग्रीक वेडींग'मधले तरूण लोकही थुलथुलीत नसून अंमळ व्यवस्थित आकारांचेच वाटले.
कायहो, तुम्हाला काय अस्टिग्माटिझम वगैरेचा त्रास आहे का? की हा त्रास तुम्हाल थंड ब्रिटिश हवेतून उबदार ग्रीक हवेत गेल्यावरच सुरू होतो? नाही, म्हणजे तुम्हाला ग्रीक लोक सडपातळ दिसले म्हणून म्हटलं.
पैसा असल्यामुळेही चीप, जंक फूड खाणं कमी असावं.
हे आणखीनच विचित्र लॉजिक. या न्यायाने अमेरिकन सर्वात कमी चीप जंक फूड खाणारे, आणि म्हणून सडपातळ असते. तर भारतीय आणि चीनी लोक जाडगेले झाले असते. काहीतरीच आपलं...
आपल्याकडच्या गोरटेल्या लोकांना ते लोकं ग्रीक समजून ग्रीकमधेच संभाषण सुरू करत होते अशासारख्याच.
आयला, म्हणजे तुम्ही ज्यांना साधारण गोरटेले म्हणून ग्रीक समजलात तेही कदाचित ग्रीक नसतील. मग उगाच वरवर बघितलेल्या गोष्टी निव्वळ 'आपण ब्रिटनमध्ये होतो व तिथून ग्रीसला किमान आठवड्याभरासाठी गेलो आणि ब्रिटनमधल्या वास्तव्यात बिग फॅट ग्रीक वेडिंग बघितला - हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न' करण्यासाठी सांगितल्यात असं म्हणायलाही वाव आहे. (माझ्याकडे काही विदा नाही, आपलं वरवरचं निरीक्षण.)
+१
पश्चिम युरोप, अमेरिकेत घराबाहेर पडलं की आपण फार बारीक आहोत असं वाटतं.
आम्हाला तर बुवा नुसते बारीक आहोत असे नाही, तर खूप उंच नाहीत हे जाणवतं.
मुंबईत भटकताना, फारच जाड झाले आहे अशी भावना निर्माण होते.
असं वाटून घ्यायची तीव्रता वाढवून घ्यायची असेल तर एकदा चीनला चक्कर मारा, विशेषतः कामगार वर्गाकडे.अधिक तीव्रतेने वाटेल.
मला म्हणूनच वाटतं आपण किती उंच आहोत ह्याला आपण तितकं महत्व देत नाही, इतरांच्या मानाने आपण किती उंच आहोत, हे महत्वाचं. जो तो आपापल्या प्रकारे गलिव्हर ट्रॅव्हल्स सारखी यात्रा करीतच असतो.
चित्रपट
तुम्ही 'माय बिग फॅट ग्रीक वेडिंग' हा चित्रपट पाहिला नाही का? ज्यांचे लग्न जाड ते लोकही जाड असा सामान्य सिद्धांत मला समजतो. (कार्यकारणभाव येथे)
तुम्ही डेटा वगैरे म्हटलंच नव्हतं पण आम्हाला ते वाक्य वापरायचं होतं. :)
वाचतो आहे...
कलेतील फारशी माहिती नाही, पण बरेच काही नव्याने समजते आहे.
बादवे, मिसळपाववरील http://www.misalpav.com/node/22378 ह्या धाग्याच्या निमित्ताने हुडकल्यावर http://en.wikipedia.org/wiki/Lady_Godiva सापडलं. इथं आनुषंगिक होइल म्हणून लिंकवतोय.
छान! काळात माणसाचे आकार
छान!
काळात माणसाचे आकार 'जसेच्या तसे' नसले तरी सहज समजतील असे आहेत. मग ते 'अवास्तव' कसे झाले याच्या उत्सुकतेमुळे पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत आहे