माता वाक्यम् प्रमाणम्।
ऋजुता दिवेकर यांचे 'Don't lose your mind, lose your weight' या पुस्तकाचं मराठी भाषांतर 'वजन कमी करा, मनःशांती नाही' नामक पुस्तक अर्ध्याधिक वाचलं१. वाचण्याचं कारण भोचक उत्सुकता. ऋजुताच्या भक्तगणात झिरो फिगरवाली करीना, अलिकडच्या काळात पिळदार स्नायू दाखवणारा सैफ हे तर आहेतच. शिवाय इतर प्रसिद्ध लोकांमधे अनिल अंबानी, इ. लोकं आहेत. मला या पुस्तकाबद्दल कुतूहल असण्याचं कारण हे प्रसिद्ध लोकं नसून या पुस्तकाचा होणारा हातोहात खप हे आहे. सामान्य लोकांना या पुस्तकात काय एवढं आवडतं असा मला पडलेला प्रश्न होता आणि आहे.
वजन कमी असावं, शरीर प्रमाणबद्ध असावं असा आग्रह आजच्या जमान्यात फक्त कॉलेजकन्यकांचा नसतो. तो जमाना गेला. आजकाल तरूण, मध्यमवयीन स्त्रिया आणि पुरूषांनादेखील प्रमाणबद्ध शरीर असण्याची आवश्यकता वाटते. उंचीच्या प्रमाणात दोन-चार किलोने वजन जास्त असणार्या लोकांनाही आपण फार जाडे आहोत असं वाटतं आणि वैद्यकीयदृष्ट्या overweight किंवा obese असणार्या अनेक लोकांनातर हा प्रश्न अगदी जीवनमरणाचा वाटतो. वैद्यकीयदृष्ट्या अनफिट लोकांसाठी वजन हा प्रश्न कळीचा ठरतो हा एक मुद्दा झालाच, पण त्याच्याच जोडीला समाजात, मित्रमंडळात असणारी पत हा ही एक मुद्दा लोकांना खूप महत्त्वाचा वाटतो. स्त्रियांमधे विशेषतः प्रमाणबद्ध शरीराचा ध्यास असतोच, पण पुरूषांमधेही हा विचार आता पसरतो आहे. यात वाईट असं काही नाही, पण प्रमाणबद्ध शरीर हवं म्हणून आपण स्वतःलाच किती गुन्हेगार ठरवून खातो, पितो, वागतो, जगतो याचा विचार मला महत्त्वाचा वाटतो.
एक प्रकारे शरीराचा आकार हा एक मोठा व्यवसाय (इंडस्ट्री) आहे. एक प्रकारची संस्कृती, प्रवाह. आणि मग यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक प्रवाहपतित आहेत. स्थूल लोकांना शारीरिक व्याधींपासून बचाव म्हणून मेद कमी करण्याची आवश्यकता असते यात संशय नाही. पण किंचित जाडगेल्या लोकांना थोडासा व्यायाम पुरतो. एकतर लोकांना ठासून ठासून झिरो फिगरचं महत्त्व सांगायचं आणि वर आपणच त्यांचे तारणहार आहोत, आपण या विषयावर शिकून, अतिशय विचार करून, लिहीतो आहोत असं दाखवायचं. अधूनमधून शास्त्र, आयुर्वेद, जीवनशैली वगैरे शब्द पेरायचे. कोणीतरी अवतार, तारणहार येऊन आपली मदत करणार, या विचारसरणीचा किंवा वैचारिक गुलामगिरीचा फायदा घेणारे 'माता', 'बाबा' म्हणजे हे डाएटिशन असं काहीसं चित्रं समोर येतं. ऋजुता दिवेकर ही पण त्यांच्यातलीच एक "माता ऋजुता दिवेकर" वाटते. हिग्ज बोसॉनच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आलेले बाबा बालाजी तांबे असोत वा चार दिवसात झटपट इंग्लिश शिकवणारे कोकाटे, ते ही याच रांगेतले!
या बाई पुस्तकातून प्रचंड प्रमाणात अंधश्रद्धा पसरवत आहेत. विज्ञान-संशोधनातून सिद्ध न झालेल्या गोष्टी सरळ सरळ विज्ञान या नावाखाली खपवल्या आहेत. काही उदाहरणं, अगदी त्यांच्या शब्दात नाहीत२. मी अर्थाचा अनर्थ केलेला नाही हे निश्चित:
१. परंपरागत अन्न पचवण्याची माहिती आपल्याकडे आपल्या गुणसूत्रांमधून येते. उदाहरणार्थ दक्षिण भारतीयांकडे इडली, डोसे पचवण्याची शक्ती त्यांच्या जीन्समधून येते अशा अर्थाचं विधान केलं आहे. पुढे पुन्हा खोटं ठरू नये म्हणून का काय, माझी एक मैत्रीण चेन्नईची आहे. तिने दिवसातून एकदा त्यांचं परंपरागत अन्न, इडली, डोसा, सांबार, नारळाची चटणी घ्यावं, अशा अर्थाचं एक सरसकट वाक्य.
मुळात अन्न पचवण्याची, त्यांतली पोषणमूल्य शरीरात शोषण्याची अशी गुणसूत्रं असतात का? असतील तर वेगवेगळ्या भागांत रहाणारे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे भारतीय एकमेकांपेक्षा कितपत वेगळे आहेत?३ मुळात ऋजुताबाई हे जे सांगत आहेत याला शास्त्रीय आधार काय? त्यांनी असे संदर्भ देण्याची तसदी घेतलेली नाहीच. घेतील अशी आशाही नाही.
२. जेवताना म्हणे टीव्ही बघू नका, फोनवर बोलू नका. हे सांगताना त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. दोन अगदी समान व्यक्ती आहेत. त्यातल्या एकाबरोबर जेवताना त्याची मैत्रीण होती, रोमँटीक गप्पा झाल्या तर जेवण अंगी चांगलं लागेल. (इतपत मला मान्यच आहे.) दुसर्या व्यक्तीने जेवताना फोनवर भांडण केलं तर जेवण अंगी लागणार नाही. (वरवर पहाता यातही अमान्य करण्यासारखं काहीही नाही.)
पण लोकं फोनवर भांडतातच, टीव्हीवर बघतात ते सर्व त्रासदायकच असतं असा समज का? आजकालच्या जगात, जिथे तंत्रज्ञान सगळीकडे पसरलं आहे किंवा पसरतं आहे, दळणवळणाची साधनं प्रचंड विकसित झालेली, होत आहेत तिथे आपला मित्रपरिवार जगभर पसरलेला असू शकतो. फोनवर लोकं आवडत्या चित्रपटाबद्दल बोलतात, स्पाऊज अथवा पार्टनरशीही रोमँटीक गप्पा मारतात आणि टीव्हीवरही अतिशय रोचक कार्यक्रम पहातात. (भारतातही टीव्हीवर चांगले कार्यक्रम असतात.) बरं, या सगळ्यात खाण्याकडे दुर्लक्ष होऊन आवश्यकतेपेक्षा चार घास अधिक जेवले जातील असा मुद्दा त्यांनी काढलेलाच नाही. जेवताना आनंदी असावे असं जे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं शहाणपण आहे ते सांगताना सामान्यांच्या आयुष्यांबद्दल एवढं नकारात्मक सरसकटीकरण करावं का? टीव्ही बघणे आणि फोनवरचे संवाद याबद्दल एवढं सरसकटीकरण करणार्या व्यक्तीला सर्वसामान्य लोकांच्या आयुष्याबद्दल काही कल्पना आहे असं कसं म्हणायचं? तशी कल्पना नसेल तर यांनी सर्वसामान्य लोकांच्या फायद्यासाठी लिहीलेल्या पुस्तकातून काय फायदा होणार?
३. दारू प्यायल्यास शरीरातलं इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढतं. (इथे पुरूष अभिप्रेत असावेत.) पुढे त्या म्हणतात की अल्कोहोलच्या सेवनामुळे (पुरूषांच्या) शरीरातलं इस्ट्रोजेनचं प्रमाण (तात्पुरतं) वाढतं४ आणि म्हणून पुरूष दारू घेतल्यानंतर हळवे होतात, मोठ्याने बोलतात. आणि असं 'बायकी' आहे वागतात याचं कारण इस्ट्रोजेन. (वाक्यरचना अशीच्या अशी नाही, पण मूळ पुस्तकात असं वागणं "हे बायकी वागणं आहे" असा स्पष्ट उल्लेख आहे.)
हे विधान किती पातळ्यांवर चूक आहे! मुळात स्त्रिया मोठ्याने बोलतात, वारंवार हळव्या होतात आणि असं वागणं 'बायकी' आहे ही एक चूक. आणि मुख्य म्हणजे अल्कोहोलमुळे मेंदूवरचा ताबा कमी होतो आणि त्यामुळे पुरूष आणि स्त्रियाही 'जास्त झाल्यावर माकडचाळे' करतात ही गोष्ट अनेक दशकं-शतकांपूर्वी सिद्ध झाली असावी. अगदी शाळेतही शिकवल्या जाणार्या या पुराव्याने शाबीत शास्त्रीय सिद्धांताच्या विपरीत काही लिहीताना त्यासंदर्भात पुरावे देण्याची जबाबदारी कोणाची?
ही काही उदाहरणं झाली. अशा प्रकारच्या सैलसर, उथळ विधानांचा या पुस्तकात सुळसुळाट आहे. पुस्तकातला मुख्य संदेश म्हणजे चांगल्या तब्येतीसाठी "थोडा व्यायाम, थोडा आहार" वाईट नाही, चूक नाही हे मान्य. पण हे बराच काळ चालत आलेलं शहाणपण सांगण्यासाठीच वापरून गुळगुळीत झालेली उदाहरणं वापरली आहेत हे तर सोडाच धडधडीत अशास्त्रीय माहिती, काही प्रमाणात स्त्रियांविरोधात असहिष्णू विधानं यांचा वापर या पुस्तकात केलेला आहे. या पुस्तकाचा हातोहात होणारा खप पहाता उद्या कोणी "प्रसिद्ध आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांच्या मते मोठ्याने बोलणे, वारंवार हळवे होणे हे बायकी गुणधर्म आहेत", अशा प्रकारची विधानं शास्त्रीय सत्य म्हणून केल्यास नवल वाटू नये. कोणा चार लोकांचं वजन तिने आटोक्यात आणलं म्हणून तिची इतर विषयांमधली मतं लक्षणीय नसतीलच ही शक्यता किती लोकं तपासतील? "माता वाक्यम् प्रमाणम्।"
मुळात ३६-२४-३६ अशा फिगरची आशा अनेक स्त्रियांना असते हेच मला मुळात चूक वाटतं. त्यातून शिल्पा शेट्टीटाईप सपाट पोटं शस्त्रक्रियेशिवाय होऊ शकतात का? अनेक महिला अॅथलीट, खेळाडू या शिल्पा शेट्टीपेक्षाही वैद्यकीयदृष्ट्या अधिक फिट असतील पण त्यांचीही ओटीपोटं थोडी बाहेर आलेली दिसतात. पण पुरूषांना सुखावणार्या या फिगरच्या मागे स्त्रिया लागतात, अगदी जगण्यातला सर्वात महत्त्वाचा आनंद फिगरमधे आहे इतपत टोकाला पोहोचणार्या स्त्रियाही आपल्या सर्वांनाच हस्ते-परहस्ते माहित असतील. अगदी दोन-चार किलो वजन जास्त असणार्या स्त्रीचं 'दु:ख'ही पुस्तकात अगदी विस्ताराने मांडलं आहे. स्त्रीवादाचा हा एक पराभव आहेच. पण त्याच जोडीला अशा प्रकारचा विचारही स्त्री-पुरूष कोणासाठीही आरोग्यकारक आणि आनंददायी नाही.
तळटीपा:
१. पुढे कंटाळा आला. लेखात मांडलेले विचार डोक्यात आले आणि पुस्तक पूर्ण वाचण्याची आवश्यकता नसल्याचं लक्षात आलं.
२. माझ्या हाताशी पुस्तक नाही. कोणाकडे पुस्तक असल्यास मदत कराल काय?
३. उदाहरणार्थ इरावती कर्व्यांनी महाराष्ट्रातल्या लोकांच्या कवट्यांचा अभ्यास करून इथली जनता एकमेकांपेक्षा फार निराळी नाही, अगदी आदिवासी आणि नागर-महाजन लोकही, असा निष्कर्ष काढल्याचं स्मरतं. तसंच संपूर्ण भारताबद्दलही.
४. दारूमुळे शरीरातलं इस्ट्रोजेन वाढतं का याचा शोध जालावर घेण्यासाठी alcohol estrogen levels असे शब्द वापरले. मिळालेल्या पहिल्या दुव्यात दिलेल्या माहितीप्रमाणे सततच्या अतिअल्कोहोल सेवनामुळे पुरूषांमधे टेस्टोस्टरॉन या हॉर्मोनची निर्मिती कमी प्रमाणात होते. त्यामुळे पुरूषांचे स्तनही आकाराने मोठे होऊ शकतात, पुनरूत्पादनात अडचणी येऊ शकतात. पुनरूत्पादन करण्याच्या वयाच्या स्त्रियांमधे अतिसेवनामुळे स्त्रियांच्या मासिक पाळीचं चक्र बिनसते इ. एकंदर अल्कोहोलचे अतिसेवन वाईटच याबद्दल कोणालाही फार शंका नसावी.
प्रतिसाद आवडला.
परिक्षणापेक्षा प्रतिसाद जास्त बॅलेन्स्ड आहे.
फ्रेंच लोकं जास्त चीझ खातात तरी सुद्धा त्यांच्यात हृदयविकाराचं प्रमाण कमी आहे आणि त्याचं कारण त्यांच वाईन पिणं. या संदर्भात पण एक संशोधन वाचल्याचं अंधुकपणे स्मरतं.
भरमसाट खाऊन, अजिबात व्यायाम न करता बारीक रहाणारी आणि हवा खाऊन सुद्धा जाद होणारी माझ्या सारखी लोकं बरीच पाहिली आहेत. त्याचं स्पष्टीकरण कसं करणार? मेटॅबॉलिझम वर हे ठरतं हे माहित आहे. पण मेटॅबॉलिझ्म पण कोण ठरवतो हा पुढ्चा प्रश्न आहे..
छान प्रतिसाद
Missing the forest for the trees
सदर परीक्षणाचे चपखल वर्णन.
पुस्तक वाचायला छान आहे. लेखिकेने खेळकर भाषेत आपल्या पारंपरिक आहाराचे आणि आहारविषयक पारंपरिक सवयींचे महत्त्व सांगितले आहे. पुस्तकात कवर केलेले बरेच आहारविषयक मुद्दे जसेच्या तसे अभय बंग यांच्या पुस्तकातही वाचले होते असे आठवते.
पुस्तकातील मुद्दे स्त्रीद्वेष्टे आहेत हा हास्यास्पद आरोप आहे. उदाहरणार्थ पुस्तकात गुजराथी लोकांच्या काही सवयी सांगितल्या आहेत (पुसटसे आठवणारे उदाहरण म्हणजे "लक्ष्मीची मूर्ती बैठी हवी उभी नको कारण ती चंचल असते" असा एका गुजराती क्लायंटचा दावा) म्हणून एखाद्याने हे पुस्तक गुजरातीद्वेष्टे आहे असे म्हणावे का?
बाय द वे पुस्तकात झीरो फिगर किंवा वजन कमी करा असा सल्ला दिलेला नाही. लेखिकेने वारंवार अधोरेखित केलेला मुद्दा म्हणजे तुम्हाला ज्या वजनाने 'कंफर्टेबल' वाटते तेवढे योग्य वजन मानावे
चू.भू.द्या.घ्या.
पण पुरूषांना सुखावणार्या या
पण पुरूषांना सुखावणार्या या फिगरच्या मागे स्त्रिया लागतात,
मला हे वाक्य खूप खटकलं. धागाकर्तीने लठठ्पणाच्या दूष्परिणामांवर काहीच पूर्ववाचन केलेले दिसत नाही.
परंपरागत अन्न पचवण्याची माहिती आपल्याकडे आपल्या गुणसूत्रांमधून येते.
यातही खटकण्यासारखं काही नाही. सामान्यतर्काच्या (कॉमन्सेन्स) मदतीने हे सहज पटू शकत. मी केव्हमॅन आहाराकडे जायचा प्रयत्न हळुहळु करत आहे पण तो माझ्या पचनसंस्थेला स्वीकारणे किती अवघड आहे हे मला आता कळत आहे.
लठ्ठपणावर मी जे संशोधनापर लिखाण गेले काही वर्षे वाचत आहे त्यावरून माझ्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे लठ्ठपणाची असंख्य कारणे असतात. त्या कारणांना "डाएट" हे एकमेव उत्तर असू शकते हे मात्र काही केल्या पटत नाही.
मला हे वाक्य खूप खटकलं.
मला हे वाक्य खूप खटकलं. धागाकर्तीने लठठ्पणाच्या दूष्परिणामांवर काहीच पूर्ववाचन केलेले दिसत नाही.
लठ्ठपणाच्या दुष्परिणामांबद्दल मला बर्यापैकी कल्पना आहे. आक्षेप आहे तो झिरो, किंवा ३६-२४-३६ टायपांच्या फिगर्सबद्दल. दोन-चार किलो वजन इकडेतिकडे असणं आणि लठ्ठपणा या दोन वेगळ्या गोष्टी असाव्यात.
यातही खटकण्यासारखं काही नाही. सामान्यतर्काच्या (कॉमन्सेन्स) मदतीने हे सहज पटू शकत. मी केव्हमॅन आहाराकडे जायचा प्रयत्न हळुहळु करत आहे पण तो माझ्या पचनसंस्थेला स्वीकारणे किती अवघड आहे हे मला आता कळत आहे.
इथे थोडी अधिक माहिती द्यावी असं वाटतं. दिवेकर बाईंच्या लिखाणाचा अर्थ, भारताच्या निरनिराळ्या भागांत रहाणार्या माणसांची गुणसूत्रं निरनिराळी आहेत. त्यांच्या मते दक्षिण भारतीय आणि गुजराथी वेगवेगळे आहेत. भारतीय लोकांच्या गुणसूत्रांमधे असे गट पाडणं शक्य आहे का असा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरं असं की आपल्याकडे अनेक भागांमधे ब्राह्मणांनी मांसाहार घेण्याची परंपरा नाही. ही गोष्ट निदान काही शतकं जुनी असावी, बहुदा आदी शंकराचार्यांच्या काळापासून. अलिकडच्या काळात मांसाहारात फार जातीभेद दिसत नाहीत, आणि या पारंपरिक शाकाहारी लोकांच्या पोटाच्या तक्रारी फक्त मांसाहारामुळे वाढल्या असंही दिसत नाही.
आपण म्हणताना सर्व दक्षिण भारत एकच असं समजलो तरी त्यांच्या आहारातही प्रचंड वैविध्य आहे. भाषेप्रमाणे त्यांचे आहार वेगवेगळे आहेतच, शिवाय बहुदा आर्थिक स्थिती, जाती यांच्याप्रमाणेही खाणं, पाककृती बदलत असाव्यात. (महाराष्ट्रात जे दिसतं ते भारतात इतरत्र का दिसू नये?)
केव्हमॅन आहार काय ते इथे पाहिलं. यातले काही निषिद्ध पदार्थ गंमतीदार वाटले, उदा: कडधान्य, तृणधान्य.
लठ्ठपणावर मी जे संशोधनापर लिखाण गेले काही वर्षे वाचत आहे त्यावरून माझ्या लक्षात आलेली गोष्ट म्हणजे लठ्ठपणाची असंख्य कारणे असतात. त्या कारणांना "डाएट" हे एकमेव उत्तर असू शकते हे मात्र काही केल्या पटत नाही.
सहमत आहे.
पुस्तकातही व्यायाम न करता चरबी कमी होईल असं काहीही आश्वासन दिलेलं नाहीच. अगदी सुरूवातीलाच व्यायामाला पर्याय नाही अशा प्रकारची वाक्य आलेली आहेत. शिवाय फ्याड डाएट असं ज्याला संबोधलं जातं त्यांच्यावर टीकाही आहे. ही टीका करताना ती बिनबुडाची होणार नाही याचीही दखल घेतली गेली आहे. म्हणूनच त्यापुढे विज्ञानाचा खून करणारी वाक्य वाचली तेव्हा अधिक आश्चर्य वाटलं.
"भारतीय लोकांच्या
"भारतीय लोकांच्या गुणसूत्रांमधे असे गट पाडणं शक्य आहे का असा माझा पहिला प्रश्न आहे."
माझ्या जनुकशास्त्राबद्दलच्या अल्प ज्ञानानुसार असे गट निश्चित पाडता येतील, असे मला वाटते. साधं पाण्याचं उदाहरण घ्या - मला नाशिकचं पाणि अजिबात सोसत नाही (सारखं पळावं लागतं). पुर्वी मुंबईच्या पाण्यानं पोटाच्या ब-याच तक्रारी थांबायच्या! असे अनुभव ब-याच जणाना येतात. गुणसूत्रांचा संबंध यात नक्कीच असावा
@प्रकाश घाटपाडे
केव्ह्मॅन डाएट म्हणजे गुहेत राहणा-या मानवाचा आहार. यात प्रामुख्याने पीठे नसतात. प्रथिनांचे प्रमाण जास्त असते आणि कच्चे खाण्यावर भर जास्त असतो. मला याबद्द्ल माझ्या आवडीच्या जर्मन चॅनेलवरील एका कार्यक्रमात कळले. हा कार्यक्रम इतका प्रभावित करणारा होता की मी माझे प्रयोग चालू करण्या अगोदर जालावर फारसा शोध घेतला नाही.
मला हा प्रकार फॅड नक्कीच वाटत नाही...
मी केव्हमॅन आहाराकडे जायचा
मी केव्हमॅन आहाराकडे जायचा प्रयत्न हळुहळु करत आहे पण तो माझ्या पचनसंस्थेला स्वीकारणे किती अवघड आहे हे मला आता कळत आहे.
केव्हमॅन आहार म्हणजे नक्की कोणता आणि तेवढी विविधता सध्याच्या काळात कुठुन मिळवता ते वाचण्यास आवडेल.
शिवाय त्यातही आपण राहतो त्या प्रदेशातच पिकणारे/वाढणारे अन्न आणि परकीय अन्न अशीही वर्गवारी करता का हे ही कळले तर बरे.
केव्हमॅन डाएटबद्दल मी
केव्हमॅन डाएटबद्दल मी (धाग्याच्या निमित्ताने) इथे वाचलं. तुम्हाला पडलेले प्रश्न मलाही पडले. विविधतेच्या बाबतीत म्हणाल तर आज कोणत्याही देशात जेवणात जेवढी विविधता असते तेवढी १०० वर्षांपूर्वीही नव्हती. या लिंकेवर दिलेल्या चांगल्या आणि निषिद्ध अन्नामधेही फळभाज्या, पालेभाज्या यांचा उल्लेखच नाही. निश्चितच पाश्चात्य प्रकरण आहे.
दिवेकर बाई आणि हे डाएट या दोन्ही 'रेजीम'मधे खाताना सर्व सेन्सेस वापरावे असं सुचवलं आहे. थोडक्यात चॉपस्टीक्स, काटे-सुर्या, चमचे बाद. ही सगळी उपकरणं वापरली जातात त्यात अन्नाचं तापमान आधी जिभेला समजत नाही, म्हणून कटलरी वापरू नये असं त्यांचं मत आहे. शिवाय फार गरम अन्न खाल्ल्याचे काहीतरी दुष्परीणाम असतात असंही विधान आहे. (भारतात अनेक लोकांना हाताने जेवूनही पहिली वाफ पोटातच जिरवून आनंद मिळतो हे या दिवेकर बाईंना कोण सांगणार?)
आज कोणत्याही देशात जेवणात
आज कोणत्याही देशात जेवणात जेवढी विविधता असते तेवढी १०० वर्षांपूर्वीही नव्हती
याच्याशी सहमत आहे आणि हे वाक्य यापूर्वीच्या कोणत्याही शेती करणार्या नागरी संस्कृतीला लागू आहे. पण ज्यांना आपण केव्हमॅन म्हणतो अशा Hunter-Gatherer लोकांचा आहार निश्चितच जास्त विविधतेने भरलेला असावा.
Jared Diamond च्या त्या लेखातले हे उतारे उद्बोधक ठरावे.
hunter-gatherers enjoyed a varied diet, while early fanners obtained most of their food from one or a few starchy crops. The farmers gained cheap calories at the cost of poor nutrition, (today just three high-carbohydrate plants -- wheat, rice, and corn -- provide the bulk of the calories consumed by the human species)
While farmers concentrate on high-carbohydrate crops like rice and potatoes, the mix of wild plants and animals in the diets of surviving hunter-gatherers provides more protein and a bettter balance of other nutrients. In one study, the Bushmen's average daily food intake (during a month when food was plentiful) was 2,140 calories and 93 grams of protein, considerably greater than the recommended daily allowance for people of their size. It's almost inconceivable that Bushmen, who eat 75 or so wild plants, could die of starvation the way hundreds of thousands of Irish farmers and their families did during the potato famine of the 1840s
आज आपण गेल्या पाच वर्षांत खाल्लेल्या वेगवेगळ्या फळांची व भाज्यांची यादी केली तर ती ७५ पर्यंत जाईल का ही शंकाच आहे.
शिवाय Marshal Sahlins च्या "The Original Affluent Society" पुस्तकात १९५०-६० च्या दशकात Richard Borshay Lee यांनी केलेल्या San Bushmen च्या अभ्यासावरून वनस्पती, फळे, नट्स आणि कंदमुळे धरून ही संख्या ९० च्या वर जाते असे नमूद केलेले आहे.
And despite the staggering variety of plant and animal sources in their diet, the San do not eat many items which other people find edible
.
ह्या अनुषंगाने Simplified Carbohydratesमुळे काय परिणाम होतो हे सांगणारा हा लेख रोचक आहे.
वाचला....
हात्तेच्या भर घालण्यासारखं काही ठेवलच नाही की पब्लिकनं. सगळं काही आधीच खरडून झालय.
तर्कतीर्थ, ननि, अदिती ह्यांची चर्चा उत्तम.
अदितीची तक्रार बारीक होण्याच्या फ्याडबद्दल आहे की प्रामुख्याने केवळ त्या एका पुस्तकाबद्दल आहे हे कळलं तर बरं.
बारीक होण्याचं फ्याड वाढलेलं दिसतं हे खरं. इथं ऐसी वरतीच एक धागा मागे पाहिला होता, कुणा तरुण मुलीनं सडपातळ होण्यासाठी लिपोअसक्शन नावाचा प्रकार केला होता ते. इतका भयानक स्वतःच्या शरीराला पिडणे, इजा करुन घेणे हे तेव्हाही विचित्रच वाटले होते.
(सं)ताप समजू शकतो
एकुणात उथळ, पोकळ आणि सरसकटीकरण करून लेखन करणे हा हमखास यशाचा राजमार्ग झाला आहे. मग एखादे बालाजी तांबे लेखामधुन जाहिराती करताना आमच्याकडचं तूप कसं सर्वरोगनिवारक(!) आहे म्हणतात, ७ हॅबिट्स सारख्या पुस्तकांत 'खोटे धी बोलु नये, चोरी कधी करू नये' किंवा 'बिकट वाट वहिवाट नसावी' वगैरेचा कित्येक पटीत केलेला (आणि म्हणूनच या कवितांपेक्षा अधिक असे काही हाती न लागणारा) विस्तार असतो. त्याच धर्तीवर 'लूज युअर वेट..' वाचून तुला झालेला (सं)ताप समजू शकतो :)
वर मुसू म्हणतात त्याप्रमाणे मूळ मुद्दा सोडून इतरत्र झोडपले गेले आहे, एकूणच व्यवसाय करताना आम्ही कसे तुमच्यावर उपकार करत आहोत या दांभिकतेला झोडपायच्या ऐवजी काहीसे तपशीलातले लेखन विनाकारण वाटते. दुसरे असे ऋजूता या काही पुस्तकाच्या लेखिका नाहीत. त्यांनी केवळ अनुवाद केला आहे. तेव्हा मुळ लेखनाची (कंटेन्टची) जी काही स्तुती - निंदा असेल ती मूळ लेखकाच्या माथी जाते. अनुवादातील चुकांबद्दल ऋजूता यांच्यावर नावासहीत टिका झाली असती तर योग्य ठरले असते.
बाकी, अश्या 'आव' आणणार्या प्रकाराच्या रागाशी, खेदाशी सहमत आहेच!
सहमत आहे.
लेखाच्या एकूण आशयाशी आणि वरील प्रतिसादाशी सहमती.
विशेषतः "मुळात स्त्रिया मोठ्याने बोलतात, वारंवार हळव्या होतात आणि असं वागणं 'बायकी' आहे ही एक चूक" या वाक्याशी शतप्रतिशत सहमत आहे. मृदुभाषी असलेल्या किंवा खंबीर असलेल्या अनेक स्त्रिया असतात. सरसकटीकरण करणे चूकच आहे. बर्याच स्त्रियांना स्वतःच्या मनासारखे करून घ्यायचे असल्यासच त्या हळव्या होऊन टिपे गाळतात आणि तरीही तसे होत नसल्यास त्यांना नाईलाजाने मोठ्याने बोलावे लागते. हे पुरुषांनाही लागू आहे पण पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे अशी वेळ पुरुषांवर फार कमी वेळा येते इतकेच. :)
अवांतरः शीर्षक वाचून लेखात तथाकथित 'ममाज् बॉय' असलेल्या पुरुषांना झोडपले असेल असे वाटले होते.
बर्याच स्त्रियांना स्वतःच्या
बर्याच स्त्रियांना स्वतःच्या मनासारखे करून घ्यायचे असल्यासच त्या हळव्या होऊन टिपे गाळतात आणि तरीही तसे होत नसल्यास त्यांना नाईलाजाने मोठ्याने बोलावे लागते. हे पुरुषांनाही लागू आहे पण पुरुषप्रधान व्यवस्थेमुळे अशी वेळ पुरुषांवर फार कमी वेळा येते इतकेच.
यामागे असणारी सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. ("हौ टू" पुस्तकं लिहीणार्या व्यक्तीला अशा प्रकारच्या परिस्थितीबदलाची कल्पना असावी अशी अपेक्षा अवास्तव नसावी.) स्वानुभवानुसार, एखाद्या स्त्रीने पुरूषाच्या अधिकाराला, वर्चस्वाला शह दिल्यास, विधानांवर आक्षेप घेतल्यास आत्मविश्वासाचा अभाव असणारे आणि/किंवा मेल इगो जपणारे पुरूषच अशा प्रकारचं वर्तन करतात. अशा प्रकारचे लक्ष वेधण्याचे प्रयोग स्त्रियाच करतात असे नव्हे. (अगदी आंजावरही अशा सँपलांची कमतरता नाही.) थोडक्यात या 'बायकी' वागण्याचा हॉर्मोनशी, विशेषतः इस्ट्रोजेन, फारसा संबंध नाही.
स्त्रियांमधे होणार्या अंतस्रावांमधल्या मासिक बदलामुळे काही स्त्रिया, महिन्यातले काही दिवस, मूड स्विंग्ज दाखवत अशा वागतात. हे फारसं आवडत नसलं तरीही त्यांचा अंतस्रावाच्या बदलामुळे होणार्या परिणामांवर काहीही ताबा नसतो. असुरक्षितता वाटणारे लोकं (स्त्रिया आणि पुरूष) ठराविक प्रसंगांमधे असे वागतात.
सविस्तर उत्तर नंतर देतेच
१. हे (फक्त) पुस्तक परीक्षण नव्हे.
२. एका लोकप्रिय पुस्तकात लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल बोलताना तद्दन खोटी आणि अशास्त्रीय माहिती दिलेली आहे. (एवढं करून पहिल्या अर्ध्या भागात काही नवीन विचार, माहिती दिलेली आहे असं नाहीच. उत्तरार्ध चाळून पाहिला होता, हायलाईट केलेल्या भागात असं काही सापडलं नाही.)
३. एवढंच नव्हे तर "चटकन हळवे होणे, मोठमोठ्याने बोलणे या बायकी सवयी आहेत" अशा प्रकारच्या वाक्यांतून, खोट्या आणि अशास्त्रीय माहितीशिवाय स्त्रियांना उगाचच झोडपून काढलेलं आहे.
कल्ट स्टेटस मिळवू पहाणार्या किंवा त्या दिशेला जाणार्या मराठीतल्या एका पुस्तकाच्या निमित्ताने, धडधडीत खोटं, अवैज्ञानिक बोलणार्या आणि सर्व स्त्रियांना निष्कारण झोडपून काढणार्या व्यक्तीच्या लिखाणाला आणि एकूण अशा प्रवृत्तींना झोडपून काढणं चूक का आहे हे मला समजलेलं नाही. इतर लोकं उथळ आहेत त्यांना झोडपा, ही फक्त खोटंच तर बोलते आहे, बिचारीला झोडपू नका हा आक्षेप माझ्यापर्यंत पोहोचलेला नाही.
हे पुस्तक ऋजुता दिवेकर यांनीच लिहीलेलं आहे. अनुवाद कोणी केला आहे ते मी पाहिलं नाही. त्यांच्या संस्थळावरच तसं लिहीलेलं आहे.
लेख पटला नाही. थोडक्यात काही
लेख पटला नाही. थोडक्यात काही आक्षेप मांडेन म्हणतो.
>>>किंचित जाडगेल्या लोकांना थोडासा व्यायाम पुरतो.
हे विधान काही वैद्यकीय आधारावर केलं आहे का? माझ्या अल्पमतीप्रमाणे डाएट किंवा व्यायाम केवळ 'बारीक' होण्यासाठीच, (किंवा पुरुषांना आवडेल असं सपाट पोट होण्यासाठी स्त्रिया) करीत नाहीत. मधुमेह, हार्ट अॅटॅक, रक्तदाब यांवर प्रभाव पाडणारे कित्येक घटक आणि त्याचे शरीरातील प्रमाण यांच्यावर एखाद्या व्यक्तिची डाएट आणि व्यायामाची निकड किती आहे हे ठरवतात. त्यांच्या पोटाच्या घेरावरून ते ठरत नाही.
>>>या बाई पुस्तकातून प्रचंड प्रमाणात अंधश्रद्धा पसरवत आहेत. विज्ञान-संशोधनातून सिद्ध न झालेल्या गोष्टी सरळ सरळ विज्ञान या नावाखाली खपवल्या आहेत.
डाएटबद्दल माहिती देणारं पुस्तक आणि अॅस्ट्रोफिजिक्समधला रिसर्च पेपर यात फरक आहे हो. पुस्तकातली प्रत्येक ओळ न् ओळ शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे तावून-सुलाखून निघालेली असण्याची अपेक्षा ठेवता येणार नाही. जेवताना टीव्ही बघू नका म्हणून सांगणे म्हणजे 'प्रचंड प्रमाणात अंधश्रद्धा' पसरवणं आहे असं म्हणणं आणि तेवढ्या आधारावर एखाद्या लेखिकेला बालाजी तांब्यांसारख्यांच्या रांगेत बसवणं पटत नाही. परंपरागत अन्न खाण्याबाबत, भले त्यात गुणसूत्रांचा संबध नसेल, पण एक 'कॉमन सेन्स विधान' म्हणून ते आपल्याला मान्य नाही काय? अशी विधान 'विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट' घ्यावीत आणि मोठ्या चित्राकडे बघावं. (आणि रेशियल मेमरी असा प्रकारदेखिल असतो म्हणतात. उदा. भारतीयांची तीनचार वर्षांची मुलं जेवढं तिखट खाऊ शकतात तेवढं अमेरिकन प्रौढ व्यक्तिंनाही जमत नाही हे एक निरीक्षण).
>>>शिल्पा शेट्टीटाईप सपाट पोटं शस्त्रक्रियेशिवाय होऊ शकतात का?
You're kidding, right? दोनतीन मुलं झाल्यानंतरसुद्धा फिगर मेन्टेन केलेल्या (अगदी सप्पाट पोटाच्या) कित्येक स्त्रिया ढीगाने दिसतात. (माझा सूक्ष्म अभ्यास आहे हो याबाबतीत!) त्या सर्व निश्चित शस्त्रक्रिया करीत नसाव्यात.
डाएट अॅण्ड न्युट्रिशन हा धागालेखिकेचा अभ्यासविषय असावा असं वाटत नाही. त्या पार्श्वभूमीवर वरच्यासारखी विधानं धाडसी वाटतात.
मला वाटतं, आदितीनं इतकं लक्ष
मला वाटतं, आदितीनं इतकं लक्ष पुरवण्याइतकं वा इतकं गांभीर्यानं घेण्याइतकं काही ऋजुताचं पुस्तक महत्त्वाचं नाहीय. ऋजुताला जे काही तारे तोडायचेत ते तोडू द्यावेत. तशीही सुलभीकरण केलेले आणि सोईचे सल्ले देणारी पुस्तकं खूप लोकप्रिय होतात, लोक त्यांच्यातली उद्धृतं ब्रह्मवाक्यासारखी वापरतात, ऐतिहासिक कादंबर्यांना इतिहास समजतात...; पण आपण त्याचं काय करू शकत असतो?
सोड...
लेख आवडला
या झिरो फिगरच्या नादी लागून अनेक जिम्स ची चलती झाली आहे. वर्तमानपत्रासोबत येणारी प्यांपलेटांनी उच्छाद मांडलाय. बहुसंख्य स्त्रियांना आपण सडपातळ असाव अस मनोमन वाटत. सडपातळ असणार्या स्त्रियांविषयी त्यांना असूयायुक्त आदर असतो. काही स्त्रिया जिम व आहारपथ्य चालू केल कि काही अंशी बारीक होतात ही पण ही सांगड तुटली लागलीच परत पुर्ववत होतात.
जी गोष्ट आपल्या हातुन निसटायाला लागते ती गोष्ट मनुष्य पकडायचा प्रयत्न करतो. पैसा,सत्ता, तारुण्य, आता इथे फिगर इ.इ.
काही काळाने ठेविले अनंते तैसेची रहावे हा विचार येउ लागतो. तो पर्यंत खिसा बराच हलका झालेला असतो.
जी गोष्ट आपल्या हातुन
जी गोष्ट आपल्या हातुन निसटायाला लागते ती गोष्ट मनुष्य पकडायचा प्रयत्न करतो. पैसा,सत्ता, तारुण्य, आता इथे फिगर इ.इ.
:-) हे पटणेबल आहे.
अलिकडच्या काळात कॉलेस्टेरॉल, हृदयविकार, धमनीकाठिण्य इ. संदर्भात निदान श्रीमंत आणि मध्यमवर्गात जागरूकता येत आहे. त्यामुळे निदान काही लोकं, भले संख्येने कमी असतील, स्वास्थ्यासाठीही व्यायाम करतात.
बाकीचे मरू द्या, पण...
ऋजुता दिवेकर यांचे 'Don't loose your mind Loose Your Weight' या पुस्तकाचं मराठी भाषांतर...
या मूळ इंग्रजी पुस्तकाचे मूळ शीर्षक असे आहे???
(शंकानिरसनाकरिता वर दिलेला मूळ लेखिकेच्या संस्थळाचा दुवा पाहिला. तेथे ते काहीसे वेगळेच दिलेले दिसते. बहुधा कंपॉझिटरने / प्रूफरीडरने आपले काम केलेले दिसते. चांगले आहे. 'आपल्या' भारतात आजकाल असे कंपॉझिटर / प्रूफरीडर विरळा!)
आता, (वरवरच चाळलेल्या) या पुस्तकपरीक्षणावर माझे प्रामाणिक मत. स्वानुभवावरून सांगतो.
असे काही पुस्तक आहे, याबद्दल मला मुळात कल्पनाही नव्हती. कल्पना असती, तरी (किंवा तर) या (किंवा एकंदरीतच असल्या जाँर - genre - च्या) पुस्तकाच्या मी आजूबाजूसही फिरकलो नसतो. विशेषतः या वयात. (एका ठराविक वयात काय वाटेल ते ट्रॅश विकत घेण्याकडे कल सामान्यतः असतो. तेव्हाही, 'हे ट्रॅश आहे' हे लवकरच लक्षात येऊन ते पंधरावीस पानांहून अधिक वाचले जात नाही, हा भाग वेगळा. पण विकत घेतले जाते, हे खरे. पुढे जशी वर्षे उलटतात, तसा ट्रॅशचा अनुभव वाढलेला असल्याकारणाने, ट्रॅशच्या नुसत्या वासावरून त्यापासून दूर सरण्याची कला साधते - इतकी, की दुसरा निसर्ग बनते, मनुष्य झोपेतसुद्धा तसले पुस्तक पाहून फूटपाथ बदलतो - हो, आम्ही कधीकधी झोपेत(सुद्धा) चालतो. अर्थात, काही लोक वयाने वाढले तरी असल्या छापाच्या पुस्तकांचे गुणगान गातच राहतात म्हणा - आमच्या तारुण्यात आम्हांसही आमच्या काही काकालोकांनी कार्नेगीच्या हौटुमालिकेवरून पकवले आहेच; 'हौटु ष्टाप वरीइंग अँड स्टार्ट लिविंग', 'हौटु विन फ्रेंड्ज़ अँड इन्फ्लुएन्स पीपल', माझे डावे पाऊल! - पण ही मंडळी असली पुस्तके स्वतः फारशी खोलात शिरून वाचत नसावीत, फार फार तर त्यातील इतरांना पिडण्यासारखी ठेवणीतील वाक्ये वरवर चाळून तेवढीच लक्षात ठेवत असावीत, अशी मला दाट शंका आहे. एकंदर पब्लिकमध्ये 'कॉन्वर्सेशन पीस' म्हणून, इतरांना आपण किती 'वेल-रेड' (!) आहोत असे भासवण्यासाठी असली पुस्तके बरी असतात. आणि साधारणतः ज्या वातावरणात - आणि ज्या लोकांकडून / ज्या लोकांच्यात - असल्या पुस्तकांची नावे फेकली जातात आणि गौरविली जातात, तेथे - आणि त्यांच्यात - सहसा 'वेल-रेड'ची व्याख्या तितपतच असते, म्हणून खपून जाते, इतकेच. तर ते एक असो.) माझ्यासारखे येथे अनेक असतील, ज्यांना या पुस्तकाच्या अस्तित्वाबद्दल कल्पनाही नसेल, आणि आपल्या अज्ञानात ते सुखी असतील, याची मला खात्री आहे. मग अशा परिस्थितीत, असे काही पुस्तक आहे, अशी माहिती प्रसिद्ध करून आपण नेमके काय मिळवलेत? आपल्या या परीक्षणामधून नाहक त्या पुस्तकाची प्रसिद्धी होत आहे, हे आपणांस लक्षात येत नाही काय? येऊ नये काय?
उलटपक्षी, ज्या गोटांत अशी पुस्तके सामान्यतः वाचली जातात, अशा गोटांत (१) आपण येथे प्रसिद्ध केलेले प्रस्तुत परीक्षण वाचले जाणार नाही, आणि (२) वाचले गेलेच, तरी त्याचा अपेक्षित परिणाम होणार नाही, किंवा (३) चुकून झालाच, तर अपेक्षेविरुद्ध परिणाम होण्याचीच शक्यता अधिक ('बॅन्ड इन बॉस्टन' या वाक्प्रचाराबद्दल कधी ऐकलेले नाही काय?), आणि (४) काही केले, तरी या असल्या पुस्तकांचा खप एक किमान पातळी सोडणे कधीही शक्य नाही, याची आपणांस जाणीव नसावी काय? अशा पुस्तकांना एक त्रिकालाबाधित मार्केट आहे, याची जर आपणांस कल्पना नसेल, तर आपण आजवरची वाटचाल डोळे झाकून केलेली आहे, असे खेदाने म्हणावेसे वाटते. (आमचे उपरोल्लेखित झोपेत चालणे वेगळे, हे वेगळे. झोपी गेलेल्यास जागे करता येते, डोळे झाकलेल्यास नाही, हा यातील मूलभूत फरक असावा, असा एक तुक्का येथे लावून पहावासा वाटतो.)
अशा पुस्तकांना एक त्रिकालाबाधित मार्केट आहे, याला एक कारण आहे. ती एक सामाजिक गरज आहे. वाटेल ते वाचून पाहण्याच्या वयातील मंडळींची मानसिक भूक हा एक भाग झाला. (शेवटी, काय ट्रॅश आहे आणि काय नाही याचा नीरक्षीरविवेक वाढीस लागण्याकरितासुद्धा उमेदीच्या काळात बर्यापैकी ट्रॅश वाचलेले असावे लागते.) असली पुस्तके लिहिणार्यांची शारीरिक भूक ('पापी पेट का सवाल है' अशा अर्थी), हा दुसरा भाग, पण त्यास मी तितकेसे महत्त्व देऊ इच्छीत नाही. पण तिसरा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आपण सर्वच जण विसरत आहोत. (अ.) लकडी पुलावर आणि (ब.) गरवारे पुलाखाली वाटेवर पुस्तके मांडून बसणारे असंख्य विक्रेते - त्यांच्या भुकेचे काय? तीही माणसेच आहेत ना? त्यांना भुका नाहीत? की त्यांनी अनुक्रमे (अ.) खालून (कधीकधी) वाहणार्या मुठा नदीत आणि (ब.) वरून वाहणार्या रहदारीखाली जीव देऊन भारताच्या वाढत्या लोकसंख्येस आळा घालण्यास हातभार लावावा, अशी काहीशी आपली अपेक्षा आहे? भले शाबास!
अशा प्रकारचं पुस्तक मी आपणहून
अशा प्रकारचं पुस्तक मी आपणहून विकत घेण्याची आणि/किंवा वाचण्याची वेळ सहसा येत नाही, आलेली नाही. समोर दिसलं म्हणूनही मी हे पुस्तक वाचलं नाही. पण महाराष्ट्रात रहाणार्या मराठी लोकांकडून या पुस्तकाबद्दल बरंच ऐकलं आहे आणि अगदी अमेरिकेत रहाणार्या मराठी लोकांनाही सदर पुस्तकाबद्दल असलेलं प्रेम कानावर आलं. यातल्या बर्याचशा लोकांकडे अशा प्रकारचा 'कचरा' दिसत नाही आणि तरीही या माझ्या ओळखीतल्या लोकांकडून या पुस्तकाचं गुणवर्णन ऐकून अशा प्रकारच्या पुस्तकांत "या लोकांना नक्की काय वाचायला आवडतं" असा प्रश्न पडला म्हणून हे पुस्तक हातात घेतलं. माझ्या लिखाणामुळे या पुस्तकाचा खप वाढेल याची काळजी करावी असं मला वाटत नाही. पुण्यातल्या एका पुस्तकप्रदर्शनात दुकानदाराकडून या पुस्तकाच्या खपाची स्तुती ऐकलेली आहे. किंबहुना अशा प्रकारच्या पुस्तकांमधेही या पुस्तकाची असणारी अधिक लोकप्रियता यामुळेच मला हे पुस्तक वाचण्याची इच्छा झाली.
या लोकांनी आपली पोटं भरू नयेत असा माझा अजिबात आग्रह नाही. एकेकाळी मी सुद्धा जिममधे जाऊन लोकांची वजनं कमी करणं आणि तब्येती सुधारणं हेच आपलं ध्येय आहे असं दाखवणार्या लोकांना थोडा व्यवसाय दिला आहे. (तिथेही एक आहारतज्ञ होती. तिचा सल्ला वेळोवेळी वाद घालून, प्रश्न विचारून उत्तरं न मिळाल्यामुळे, धुडकावण्यात मला अंमळ मौज वाटत असे. असो.) अनेक लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणार्या गोष्टीकडे, वजन/अंगावरची चरबी कमी करणे, ग्राहक म्हणून मी दुर्लक्ष केलं तरीही भोचक कुतूहल कमी होत नाही.
आणि मग या पुस्तकाबद्दलच का? हे पुस्तक इथल्या बहुतांश वाचकांच्या आवडीनिवडीप्रमाणे खालच्या दर्जाचं आहे हे अर्थातच मला मान्य आहे. तर एकंदर सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलायचं, त्यात त्यांना अपराधीपण द्यायचं आणि मग तुम्हां पापी लोकांचा उद्धार करायला मी आहे ना, अशा प्रकारे बोलायचं यावर आक्षेप आहे. मग यात आहार, शरीराचा आकार हे आलंच; आणि याची तुलना धार्मिक, आध्यात्मिक बाबा, बुवा, मातांशी करता येईल. अशा प्रकारचा एक बाबा 'फायर' चित्रपटात दाखवलेला आहे. (एकंदरच या बाबतीत माझा "व्यासंग" कमी असल्यामुळे फार उदाहरणं देता येणं शक्य नाही.) मुळात आपल्या ग्राहकवर्गाला, जे आधीच वाढत्या वजन, ताणतणाव, इत्यादींमुळे वैतागले आहेत, हीन लेखून मग पुन्हा मदत करायला जाण्याच्या आवेशावर आक्षेप आहे. कंटाळलेल्या मनुष्याला मदत करायचा देखावातरी निर्माण करायचा असेल तर निदान अशा लोकांना बरं वाटेल इतपत काळजी घ्यावी एवढी अपेक्षा अवास्तव नसावी.
आपल्यालाच दोष देणार्या बाबा, बुवा, मातांच्या भजनी लोकं का लागतात असं भोचक कुतूहल अजूनही शमलेलं नाहीच.
हौटु ष्टाप वरीइंग अँड स्टार्ट लिविंग यावरून How I Learned to Stop Worrying and Love the Bomb अशी ट्यागलाईन मिरवणारा पण सेल्फ-हेल्प नसणारा एक महान चित्रपट आठवला.
भयानक सामाजिक दबाव
बारीक होण्याचं हा जो सामाजिक दबाव आहे ना तो तद्दन मूर्खपणा आहे. अनेक नवरे बायकोमध्ये काय चांगले आहे हे सोडून बारीक हो / बारीक हो म्हणून भंडावून सोडतात. बायका एकमेकींना टोमणे मारतात. मूर्खपणाचा कळस आहे नुसता. मी अनेक सुंदर/रसरशीत दिसणार्या जाडगेल्या स्त्रिया पाहील्या आहेत तशाच सडपातळही पाहील्या आहेत. ही असली बकवास पुस्तके या सामाजिक दबावात भर घालण्याचेच काम करतात. धर्म/श्रद्धा/लैंगिकता इतकीच खासगी गोष्ट तुम्ही काय खाता/पीता ही असते. कारण प्रत्यकाची प्रकृती निराळी असते. पण इतकं "ओरल फिक्सेशन" (खाणं / अन्न/ काय खावं/खाऊ नये) झालं आहे आणि अनेक बेअक्कल लोकं स्वतः मागे लागतातच पण इतरांना भरीस पाडत आहेत. मला फार राग येतो आजकाल या विषयाचा.
अदितीने चांगले तासडले आहे. असल्या पुस्तकांच्या वाटेला जाऊ नये हे उत्तम. हा जो लेख लिहीला आहे अशा अणि अनेक लेखांचे गरज आहे. मत मांड ग तू बिन्धास्त. आवेश तर आवेश. या असल्या तद्दन फालतू पुस्तकांवर सडकून टीका झालीच पाहीजे. नुसता ताप आहे डोक्याला हा झीरो फिगर दबाव म्हणजे.
शेवटचे दोन-चार किलो उतरवायचे
शेवटचे दोन-चार किलो उतरवायचे बाकी आहेत अशा स्त्रीला तिच्या 'सोशल सर्कल'मधे किती मानहानी स्वीकारावी लागली अशा प्रकारचं वर्णन वाचून तिडीक गेली. चरबीचा अतिरिक्त साठा शरीराला त्रास देईल इतपत जमा होऊ देऊ नये, असल्यास उतरवण्यास सुरूवात करावी याबद्दल काही संशय नाही. पण कुठे दोन इंच कमी जास्त आहेत, प्रमाणित वजनापेक्षा ५-६% वजन जास्त आहे तर त्याबद्दल किती बाऊ करायचा? शिवाय तर्कतीर्थ यांनी प्रतिसादात मांडलेला मुद्दा आहेच. अतिरिक्त चरबी साठण्याचं कारण जीवनपद्धतीतला दोष एवढंच असतं असं नाही.
निदान व्यायाम करायला सांगते आहे एवढं श्रेय द्यायला ना नाही. पण इथे गांधीजींची साधनशुचिता आठवते. व्यायाम करायला, खाण्याच्या आरोग्यपूर्ण सवयी लावायला जरूर सांगावं पण भलत्या कारणांची तरफदारी कशाला? त्यातही शाळेत शिकवल्या जाणार्या माहितीतही अक्षम्य चुका करून!
सुंदर....
ऋजुता हे नाव आपल्याला जाम आवडलं बुवा. बाकी आकारान्त ठेवलेल्या स्त्री नावांचा फारच कंटाळा येतो. अर्पिता, बबिता, कोमिका ह्या स्त्रिया कितीही सुंदर आणि कर्तबगार असल्या तरी त्यांची नावे आपल्याला आवडत नाहीत. ऋजुता ह्या नावावर आपण फिदा आहोत (आणि "ऋतुजा"वरही ); त्याचा आस्वाद घ्यायचा सोडून सदर धागाकर्ती पुस्तकाच्या आत डोकावून का पहात असावी बुवा?
टीव्ही वगैरेवर पाहून मला जाम आवडलेली अजून काही नावे :- सायली, स्नेहा,स्पृहा, तृप्ती, केतकी वगैरे वगैरे.
या पुस्तकाचं नाव तर ऐकलंच
या पुस्तकाचं नाव तर ऐकलंच होतं आणि दुकानांमध्ये सुद्धा ते दिसलं होतं..तर्क करणार्यांनी अशी पुस्तकं वाचायला जाऊ नये आणि ती वाचलीच तर काय होतं याचं उदाहरण म्हणजे हा लेख.
हे पुस्तक ज्यांना आवडलं/फार नावडलं नाही आहे त्यांच्याशी वाद घातला तर 'तुम्हाला कशातलं काही चांगलं दिसतच नाही'..किंवा 'पटत नाही ते सोडून द्यावं' अशी उत्तरं मिळण्याची शक्यता..
आणि मला वाटतं या पुस्तकांची प्रसिद्धी म्हणजे 'ग्लॅमर' आहे..आज आहे, उद्या नाही. दुसरं काही पुस्तक येईल आणि या पुस्तकाचे दिवस संपतील.
लेखात तीन वेगवेगळे मुद्दे
लेखात तीन वेगवेगळे मुद्दे मांडलेले मला जाणवले. त्यातला एक विशिष्ट (स्पेसिफिक) आणि दोन साधारण (जनरल) आहेत.
१. तज्ञ म्हणून समजल्या गेलेल्या व्यक्तीकडून काही मूलभूत बाबतीत सर्वमान्य ज्ञान असण्याची अपेक्षा असते. उदाहरणार्थ फिजिक्समध्ये पीएच.डी. केलेल्या व्यक्तीला जड वस्तू आणि हलक्या वस्तू निर्वात पोकळीत गुरुत्वाकर्षणाने एकाच वेगाने खाली येतात हे माहीत असणं अपेक्षित असतं. त्या विपरित विधानं आली तर 'या व्यक्तीला तज्ञ का म्हणावं? आणि तिचा सल्ला का बरं ऐकावा?' असा प्रश्न उपस्थित करावा लागतो. प्रस्तुत पुस्तकात अशी अनेक विधानं असल्यामुळे 'या लेखिकेला तज्ञ का बरं समजतात? निव्वळ काही सेलिब्रिटींनी तिचा सल्ला मानला आणि तो उपयुक्त ठरलेला दिसला म्हणून?' असा योग्य प्रश्न इथे उपस्थित केलेला आहे.
२. त्यापलिकडे जाऊन ज्या व्यक्ती अशी विधानं करूनही तज्ञ म्हणून मान्यता पावतात, त्यांना भोंदू बाबा म्हटलेलं आहे. अशा बाबांनी काहीही सल्ला दिला तरी काहींना फायदा होण्याची शक्यता असतेच. जेव्हा अशा सल्लागारांची कमतरता असते, आणि प्रश्नांनी ग्रासलेल्यांची संख्या प्रचंड असते तेव्हा पोकळ ज्ञानावरदेखील असं कल्ट फॉलोइंग निर्माण होणं सोपं असतं. हाही मुद्दा पटतो.
३. मुळात स्त्रियांनी आपलं शरीर 'आदर्श' करण्याचा अतिरेकी अट्टाहास चालवला आहे का? सिनेनट्यांकडून, मॉडेल्सकडून समोर उभे राहाणारे आकार आदर्श म्हणून स्वीकारणं योग्य आहे का? हेही रास्त प्रश्न उपस्थित होतात.
'अहो, त्यांना थोडासा ढील द्यावा. चांगली गोष्ट करण्याचा प्रयत्न करता आहेत ना...' असा स्वर काहींनी लावलेला आहे. तो पूर्णपणे पटत नाही. चुकीच्या ज्ञानावर चुकीचे सल्ले देणारांच्या भजनी लागू नये असाच लेखाचा मथितार्थ आहे.
"व्यायाम न करता वजन कमी
"व्यायाम न करता वजन कमी करायचा मार्ग मला माहित नाही. पण दूसरा एक थोतांड वाटू शकेल असा पण प्रभावी उपाय मला ठाऊक आहे. हा उपाय मला बीबीसीच्या एका डोक्युमेंटरीमूळे कळला. तो असा - व्यायाम करायचा आहे पण करायचा कंटाळा आहे अशी परिस्थिती असेल तर न कंटाळता जमेल तितका वेळ डोळे मिटून "मनातल्या मनात" रोज व्यायाम करायचा. हा व्यायाम बिछान्यावर पडून पण करता येतो. ४, ५ दिवस गेले की आपोआप आपल्याकडून प्रत्यक्ष व्यायाम व्हायला नकळत सुरुवात होते. ;)
या पद्धतीचा मी वरचेवर अवलंब करतो...
मीपण हे पुस्तक अर्धवट्च
मीपण हे पुस्तक अर्धवट्च वाचलय. पन हे जीन्स आणि दारु राहीले वाटते वाचायचे.....
पण मला यातून फक्त इतकंच कळले, की मध्ये मध्ये कधीही (म्हणजे भूक लागली की) चीज/ शेंगदाणे खाल्लेले चालतात (म्हणजे आवर्जून खावेत)! :)
बाकी गरज पडेल तेंव्हा स्प्रिंट मारता येइल आणि नंतर गुडघे दुखणार नाहीत इतकेच वजन प्रत्येकानी बाळगावे असे माझे मत आहे.
खरे तर हे मत मला स्वतःलाच फार जड जाते! ;)
पन हे जीन्स आणि दारु राहीले
पन हे जीन्स आणि दारु राहीले वाटते वाचायचे.....
म्हणजे तुम्ही मोठे विनोद ऑप्शनलाच सोडलेत. अरेरे! ;-)
होय, शेंगदाण्यांबद्दल वाचल्याचं आठवतं. चीजबद्दल आठवत नाही. तसंही मला चीज खायला आवडतंच. ऋजुताबाईंचं ऐकून मी माझा आहार बदलण्याची शक्यता नगण्यच आहे, पण त्यांनी चीज खाण्याबद्दल काय लिहीलं आहे याबद्दल उगाच कुतूहल लागून राहिलं. पुन्हा पुस्तक चाळलं पाहिजे.
दारासिंग यांच्यासारखा पहेलवानही हृदयविकाराच्या झटक्याने जातो, तर आपला काय पाड! ;-) मजेचा भाग सोडून देऊ, ऋजुताबाईंच्या मते हार्ट अटॅक हा शब्दही चूक आहे. म्हणे, शरीराला रक्तपुरवठा करणारं हृदय शरीरावर अटॅक करेल का? किती, किती शोभा करावी! म्हणूनच लोकांना यात नक्की काय आवडलं असा प्रश्न अधिक तीव्रतेने पडला.
यासंबंधात एक बातमी आजच वाचली
यासंबंधात एक बातमी आजच वाचली ती येथे उद्धृत करण्याचा मोह आवरत नाही.
(हॉलिवूड रिपोर्टर- दि. ७/१७/२०१२)
प्रख्यात जालीय माताजी XXX यांच्या 'Loose your mind, don't loose your weight' या पुस्तकाच्या खपाने नवे उच्चांक स्थापन केले आहेत व आज सतत ३१४ व्या आठवड्यातही हे पुस्तक न्यु यॉर्क टाईम्सच्या बेस्टसेलर लिस्टवर क्र. १ वर आहे. हॉलिवुडमध्येही माताजींचे बरेच भक्तगण निर्माण झाले आहेत व त्यात जेनिफर अॅनिस्टन, ब्रॅड पिट, अँजेलिना जोशी, किम कारडॅशियन प्रभृती प्रामुख्याने आहेत. 'झीरो फिगर वगैरे थोतांड आहे तिच्यायला, काय वाटेल ते खा, प्या आणि मजा करा' या मातांजीच्या संदेशाचे तंतोतंत पालन करणार्या या भक्तगणांच्या अंगावर काही दिवसांतच या 'डायेट' चे परिणाम दिसून येत आहेत. आमच्या वार्ताहराने या सेलेब्रिटींची टिपलेली काही छायाचित्रे.
मला हे पुस्तक आवडलं
सर्वप्रथम करीना कपूरने पुस्तकाच्या प्रस्तावनेतच दिवेकरबाईंना तिच्या झिरो फिगरचं श्रेय दिलंय अगदी मनमोकळे पणाने.
दुसरं म्हणजे दिवेकरबाईंनी प्रत्येकवेळी भूक आणि श्रम बघून खाण्याचा सल्ला दिलाय. त्यांचा भर काय आणि किती यावर आहे. उदा:- एखाद्या स्थूल व्यक्तीने समोसा खाताना एकच खावा असा सल्ला दिलाय कारण समोश्याने त्याची चरबी अजून वाढू शकते.
गुणसूत्राबाबत जे बोलणे झाले त्याचा सारांश एव्हढाच आहे की छोले भटूरे हे पंजाब्याला जास्त नैसर्गिकपणे पचतात कारण त्याच्या पिढ्यान-पिढ्या ते खात आले आहेत. तसंच प्रत्येक जमातीचा एक आहार ठरलेला आहे आणि म्हणूनच त्यांनी तो आहार सेवन करणं त्यांना जास्त फायदेशीर आहे. जसं दक्षिणेत खूप भातखाऊ आहेत, पण म्हणून ते जाड नाहीत. पुस्तक स्वतः नीट वाचलं तर बरेच समज दूर होतील. आहारात कुठलीही गोष्ट त्याज्ज नसते फक्त केंव्हा आणि किती प्रमाणात खावं ह्यावर मार्गदर्हन केलंय. धुम्रपान आणि मद्द्य हे वाईट आहे हे ही सांगितलंय. अत्यंत व्यावहारीक आणि योग्य माहिती देणारं पुस्तक आहे हे. क्रॅश डएट कसे अयोग्य आहेत, हे सुद्धा नीट सांगितलंय. ह्यात आपण अनेक वर्षं ऐकत आलेल्या गोष्टी आहेत उदा:- नीट चावून खा, भूक लागली असेल तेंव्हाच आणि तितकेच खा (ह्यासाठी फोन वापरू नका अथवा टी.व्ही. बघू नका कारण टेन्शन मधे खाणं सोडून उठणं अथवा कार्यक्रम बघण्याच्या नादात जास्त खाणं होतं), सर्व प्रकारचं खाणं योग्य प्रमाणात खा, फळं भरपूर खा आणि व्यायाम करा.
करीना कपूरने दिलेलं श्रेय,
करीना कपूरने दिलेलं श्रेय, योग्य प्रमाणात खा, दोनाच्या जागी चार वेळा खा, फळं खा, व्यायाम करा, क्रॅश डाएटने नुकसान होते वगैरे गोष्टींवर माझा अजिबात आक्षेप नाही.
माझा आक्षेप अवैज्ञानिक आणि स्त्रीद्वेष्ट्या लिखाणावर आहे. अगदीच काडेचिराईतपणा करायचा तर "सगळं खा" असं सांगितल्यावर मग मद्यपानावर आक्षेप का? आवश्यकतेपेक्षा अधिक खाणं होतं म्हणून खाताना टीव्ही, फोन वापरू नका असं म्हणायचं असेल तर मग खाताना प्रिय व्यक्तीची सोबत असलेली बरी असं तरी का सुचवावं? प्रिय व्यक्तीच्या सोबतीत अनावश्यक आहार टळतो का? अनावश्यक खाणं वाईट का टीव्ही, फोन वाईट? यातला नक्की कार्यकारणभाव काय?
गुणसूत्रांबाबतः अन्न पचन महत्त्वाचं नसून तिथे बीएमार महत्त्वाचा आहे. शरीरात दररोज किती कॅलर्या जाळल्या जातात याचा. न पचलेल्या गोष्टी शरीर तशाही बाहेरच टाकतं, त्याची अडचण नसतेच. छोले भटूरे, डोसे, इडल्या हे खाद्यप्रकार मूळ मराठी नसावेत, पण मराठी लोकांना ते पचत नाहीत अशी अडचण आहे का? चीनी वंशाच्या बहुतांश लोकांना दूध पचत नाही त्यासारखी ही अडचण नाही. पंजाबी आणि मराठी किंवा तमिळ आणि बंगाली लोकांच्या गुणसूत्रांमधे कितपत फरक आहे याच अभ्यास झाला आहे का? पंजाबी मनुष्य मुंबईत रहायला लागला तरीही त्याने आहेत गुणसूत्र म्हणून रोज, अगदी उन्हाळ्यातही तळलेले भटुरे खावेत का?
शास्त्रीय लेखन सोडून इतरांना काय वाट्टेल ते लिहीण्याची मुभा असते/असावी का? ऋजुताबाईंनी काय वाट्टेल थापा मारल्या तरीही लोकं त्यांचं पुस्तक मोठ्या प्रमाणावर खरेदी करत आहेत तर मग त्या माताबाजी करत आहेत असं का म्हणू नये? बाबा, माता वगैरे लोकंही त्यांच्या भगतगणाला थोडा बरा आणि थोडा कैच्याकै उपदेश करून तुंबडी भरून घेतातच ना!
तुमचा मुद्दा अधिक स्पष्ट केल्याबद्दल आभार
माझा आक्षेप अवैज्ञानिक आणि स्त्रीद्वेष्ट्या लिखाणावर आहे. वैज्ञानिक आधाराचं मला माहित नाही हे कबूल करतो. मद्यपान म्हणाल तर तसंही ते आरोग्यास अपायकारक असतं आणि सर्वसाधारणतः लोकं ते किमान २-३ पेग आणि ते ही जेवणाआधी घेतात. दिवेकरबाईंच म्हणण असं आहे की मद्यपान जेवणाचा भाग म्हणून करा. जेवणाआधी पिणे, सोबत तळकट पदार्थ खाणे ह्या गोष्टी हानीकारक आहेत. दारूसोबत कोरडे पदार्थ न घेता सॅलेड इ. खाणे उत्तम असं त्यांचं मत आहे. जर एखादा रोज १ पेग घेत असेल तर त्यांचं ऑब्जेक्शन असेल असं वाटत नाही.
जेवताना प्रिय व्यक्तीची सोबत तुमचं जेवणावरचं चित्त नक्कीच विचलीत करणार नाही. पण फोन अथवा टि.व्ही,मुळे ते भान सुटतं असं बाईंचं मत आहे, त्यात तथ्य आहे असं वाटतं कारण अनेकांच्या ओबेसिटीचं कारण टि.व्ही. बघत अनावश्यक चरणं हेच असतं. साधारणतः ह्याचा संबंध पोषक वातावरणाशी आहे असं मला वाटतं कारण अनेक जण मानतात की जेवताना शांतपणे, कटकट न करता जेवावे. पण शास्त्रीय आधाराचा पुरावा? ईल्ला..पण मद्यपानाच्या आक्षेपावर आक्षेप नसावा कारण तारतम्याने पिणारे तसेही मोजकेच असतात.
गूणसुत्रांबाबत त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ एव्हढाच आहे की प्रत्येकाचं स्वत:च नैसर्गिक असं अन्न असतं जे त्याला सहज पचत आणि पौष्टिक असतं उदा:- पंजाब्यांचं छोले भटूरे. ते ईतरांना पचतील अथवा नाही पण पंजाब्यांना नक्की पचतील कारण शरीराला त्याची सवय आहे. त्यांच्यात त्या प्रकारचं अन्न पचवायची कपॅसिटी निसर्गतःच येते. थोडक्यात ज्याला आपण पारंपारीक आहार म्हणू शकु. आणि पंजाब्यात काय फक्त छोले भटूरे हा एकच पदार्थ बनतो काय? ऋतुमानानुसार उन्हाळ्यात काय खायचं ते त्यांच्या आहारात असेलच, तेच तो खाईल.
शेवटच्या परिच्छेदाशी पूर्णतः असहमत (क्षमस्व) पण हे वाक्य त्यानेच म्हणावं ज्याने वरील शास्त्राचा तपशीलवार आणि सखोल अभ्यास केला असेल. तुमचा तो असेलही, पण मला कल्पना नाही. तुम्हाला मत नाही पटलं ठीक आहे पण म्हणून त्या थापा होत नाहीत. मी फक्त दिवेकरबाईंचं मला समजलेलं मत दिलय. माझ्या मते सगळ्यात महत्त्वचं म्हणजे त्या आपलं मत लादत नाहीत. त्यांचा एव्हढाच आग्रह आहे की खाताना शरीराला योग्य पोषण मिळतय का ते पहिलं पाहा. असो. आवरतं घेतो कारण आय अॅम ऑल्सो नॉट अ तज्ञ...
वरील प्रतिसादमालेमधून
वरील प्रतिसादमालेमधून दारूपेक्षा चखणा वाईट असा निष्कर्ष निघतो आहे असे माझ्या अल्पबुद्धीला वाटते आहे ते बरोबर आहे का?
छ्यॅ आता आमच्या असंख्य मित्रांना नीट घरी पोचवण्याची जबाबदारी आम्ही केवळ काजू, वेफर्स, फरसाण, शेंगदाणे, चकली वगैरेच्या मोबदल्यावर पार पाडत होतो त्यावरही आता गदा आली म्हणायचे. असो.
वरील प्रतिसादमालेमधून
वरील प्रतिसादमालेमधून दारूपेक्षा चखणा वाईट असा निष्कर्ष निघतो आहे असे माझ्या अल्पबुद्धीला वाटते आहे ते बरोबर आहे का? - निष्कर्ष अशंतः बरोबर आहे असे माझ्या(सुद्धा) अल्पबुद्धीला वाटते. एकंदर सार असे की मद्यपान वाईटच, पण त्याबरोबर योग्य खाद्य घेतलेत तर कमी नुकसान होईल. म्हणजे काजू, वेफर्स, फरसाण, शेंगदाणे, चकली इ.इ. गोष्टी तेलकट असतातच त्यामुळे हे अॅडिशनल नुकसान. कारण त्यातून पोषण काहीच मिळत नाही, पोट भरल्यासारखं वाटतं आणि मग जेवण नीट होतंच असं नाही, झालच तर तेही मसालेदार त्यामुळे परत पोषण कमी. मुळात हा सल्ला नियमीत पिणार्या, सोबत तळकट खणार्या आणि मग मसालेदार जेवणार्यांना आहे.
आता आमच्या असंख्य मित्रांना नीट घरी पोचवण्याची जबाबदारी आम्ही केवळ काजू, वेफर्स, फरसाण, शेंगदाणे, चकली वगैरेच्या मोबदल्यावर पार पाडत होतो फारच किरकोळ गोष्टींच्य बदल्यात तुम्ही अति-महत्त्वाचं काम पार पाडत होतात ;)
तुम्ही निराश होऊ नका. ह्या किरकोळ गोष्टींपेक्षा उत्तम सॅलेड्स खायला मिळतील की!!! अथवा तुम्ही स्वतः चीझ-चेरी-पायनॅप्पल, बॉईल्ड फ्लॉवर, इ.इ. पदार्थ खावू शकता. अर्थात तुम्ही दारू पीत नसाल असं तुमच्या प्रतिसादावरून वाटलं...तेच गॄहित धरलं आहे.
अती प्रमाणात कोणतीही गोष्ट
अती प्रमाणात कोणतीही गोष्ट वाईटच असते. शुद्ध पाणी अती प्रमाणात प्यायला आणि मेला अशी बातमी अलिकडेच ऐकली. कारण शुद्ध पाण्याने क्षारांचा तुटवडा शरीरात निर्माण झाला आणि तरूण मनुष्य नौकानयन करताना मेला. एकीकडे अती मीठ खाऊ नका आणि वेळोवेळी पाणी पित रहा असं सांगण्याची वेळ येते हे इथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
जेवताना प्रिय व्यक्तीची सोबत तुमचं जेवणावरचं चित्त नक्कीच विचलीत करणार नाही.
का बुवा? प्रिय व्यक्तींच्या सोबतीत उलट लक्ष जेवणाऐवजी त्या व्यक्तींकडे नाही जाणार?
जर एखादा रोज १ पेग घेत असेल तर त्यांचं ऑब्जेक्शन असेल असं वाटत नाही.
असं काही प्रमाण पुस्तकात दिलं आहे का? दोन मीटर उंची आणि १०० किलो वजनाच्या कॉकेशन पुरूषाने किती दारू प्यायलेली चालून जाते आणि दीड मीटर उंची, पन्नास किलो वजन असणार्या चिनी, जपानी बाईने किती दारू प्यावी याबद्दल असा सरधोपट ठोकताळा देता येतो का? एवढा फरक सोडूनच देऊ. अगदी मराठी लोकांमधेही वेगवेगळ्या लोकांचा चयापचय वेगवेगळा असतो.
त्याशिवाय हा ही आक्षेप आहेच, पुस्तकात कुठेही सांख्यिक माहिती नाहीच. थोडा व्यायाम करा, खाण्याची वारंवारिता वाढवा इ. इ. "तरूणांनी पुढे यावे" अशा टायपातली जनरल विधानं अधूनमधून प्रसिद्ध लोकं करतात त्यातलाच हा प्रकार. सगळ्यांना फुकटात मिळणार्या त्या-त्या ठिकाणच्या ड्रायव्हींग मॅन्युअलमधे यापेक्षा अधिक जास्त तपशीलात माहिती असते. किती वजनाच्या स्त्री/पुरूषांनी किती अल्कोहोल पिऊन गाडी चालवणं कायदामान्य आहे हे.
दारू पिणं वाईट आहे असं म्हणताना नक्की किती दारू वाईट आहे? किती दारू प्यायल्याचे शरीरावर काय परिणाम होतात?
त्याहीपुढे जाऊन दिवेकर बाई म्हणे, दारू प्यायल्यास शरीरातलं इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढतं. पुढे त्या म्हणतात की अल्कोहोलच्या सेवनामुळे शरीरातलं इस्ट्रोजेनचं प्रमाण वाढतं आणि म्हणून पुरूष दारू घेतल्यानंतर हळवे होतात, मोठ्याने बोलतात. आणि असं 'बायकी' आहे वागतात याचं कारण इस्ट्रोजेन. (वाक्यरचना अशीच्या अशी नाही, पण मूळ पुस्तकात असं वागणं "हे बायकी वागणं आहे" असा स्पष्ट उल्लेख आहे.)
या गोष्टीला काय वैज्ञानिक आधार आहे? दारूतल्या अल्कोहोलचे शरीरातल्या मज्जासंस्थेवर होणारे परिणाम आणि त्यामुळे मनुष्याचं बदललेलं वर्तन यांच्यावर आत्तापर्यंत पुरेसं संशोधन झालेलं नाही का?
दारूत अल्कोहोल असतो. विशेषतः रिकाम्या पोटी जठर अल्कोहोल चटकन शोषून घेतं आणि मेंदूपर्यंत अल्कोहोल चटकन, अगदी एक-दोन मिनीटांतही, पोहोचतो. त्यामुळे रिकाम्या पोटी चटकन चढते. याचा हॉर्मोन्सशी काहीही संबंध नाही. दुसरा महत्त्वाचा परिणाम यकृतावर होतो. अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे यकृत फॅटी अॅसिड्स पूर्णतः पचवू शकत नाही आणि त्यामुळे हे फॅट्स शरीरात अडकतात, मनुष्य जाडा होतो. या सगळ्याचा इस्ट्रोजेनशी काय संबंध? असा नसलेला संबंध जोडणं हा शुद्ध खोटारडेपणा नाही का?
दुसरं, बायका अशा (हळवे होणे, मोठ्याने बोलणे) वागतात आणि याचा संबंध इस्ट्रोजेनशी लावणे हे ही अवैज्ञानिक आहे, शिवाय स्त्रीद्वेष्टंही आहे. लोकांना चांगल्या सवयी लागाव्यात असं वाटत असेल तर उगाच बायकांवर कोरडे ओढण्याची आवशयकता काय? आणि असं करण्याबद्दल ऋजुताबाईंना का झोडपू नये?
छ्यॅ आता आमच्या असंख्य मित्रांना नीट घरी पोचवण्याची जबाबदारी आम्ही केवळ काजू, वेफर्स, फरसाण, शेंगदाणे, चकली वगैरेच्या मोबदल्यावर पार पाडत होतो त्यावरही आता गदा आली म्हणायचे. असो.
कशाला? ऋजुताबाईंच्या मते हार्ट अटॅक हा शब्दच चूक आहे. म्हणजे हार्ट अटॅक येतच नसावा, या सगळ्या वैज्ञानिक अंधश्रद्धा असणार. खा वाट्टेल ते, काय फरक पडतो?
प्रतिसाद
का बुवा? प्रिय व्यक्तींच्या सोबतीत उलट लक्ष जेवणाऐवजी त्या व्यक्तींकडे नाही जाणार? डरवाला शारूक असेल तरच!!! अदरवाईज आय डाऊट!!! आय रिअली डाऊट!!! खूप जास्त शंका वाटते ह्या शक्यतेबद्दल. जेवताना प्रिय व्यक्ती आहे म्हणून कोणी कमी/खूप जास्त जेवेल असं नाही. पण असे खूप लोकं आहेत ज्यांना फोन्/टि.व्ही.मुळे धड जेवता येत नाही किंवा जास्त जेवतात. बरेचदा फोनवर बडबडण्याच्या नादात्/टि.व्ही.बघण्याच्या नादात दुर्लक्ष होतं आणि अश्या भरपूर केसेस आहेत. अनेक सहकारी/मित्र हा प्रॉब्लेम फेस करतात.
जर एखादा रोज १ पेग घेत असेल तर त्यांचं ऑब्जेक्शन असेल असं वाटत नाही. हे माझं मत आहे.
असं काही प्रमाण पुस्तकात दिलं आहे का? दोन मीटर उंची आणि १०० किलो वजनाच्या कॉकेशन पुरूषाने किती दारू प्यायलेली चालून जाते आणि दीड मीटर उंची, पन्नास किलो वजन असणार्या चिनी, जपानी बाईने किती दारू प्यावी याबद्दल असा सरधोपट ठोकताळा देता येतो का? एवढा फरक सोडूनच देऊ. अगदी मराठी लोकांमधेही वेगवेगळ्या लोकांचा चयापचय वेगवेगळा असतो. असं पुस्तकात अर्थातच दिलं नाहिय्ये. सारांश एव्हढाच आहे की जपून प्या आणि पीताना योग्य पदार्थ खा...एक पेगचं मी उदाहरण दिलं कारण तो तेव्हढा अपायकारक नसावा. अर्थात हे सगळं लिखाण जनरल लेव्हलवर आहे त्यामुळे उद्या एखादा म्हणेल रोज एक पेग कसं म्हणता? एकाद्याचं लिव्हर खराब आहे तर त्यालाही ते हानिकारकच!!! तर हे लक्षात ठेवणंही आवश्यक आहे. खाताना चवीहून जास्त पोषणाला महत्त्व द्या असं लिखाणातून अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे. प्रत्येकजणं वेगळा असतो म्हणूनच तर लेखिकेने (तिच्या मते) मार्गदर्शक तत्व दिली आहेत. ती योग्यही वाटतात.
सांख्यिक माहितीचा अभाव मला खटकला नाही. विविध संस्था (विश्वासार्ह मानल्या गेलेल्या सुद्धा) जेंव्हा सांख्यिक माहिती देतात तेंव्हा आपल्याला कुठे माहित असतं की ते खरं आहे का नाही पण विश्वास ठेवतोच ना आपण? आणि तपशील दिल्यानंतरही त्याला उलट-तपासणी करणं शक्यच नाही.
या सगळ्याचा इस्ट्रोजेनशी काय संबंध? नो आयडीआ सबब पास...
दुसरं, बायका अशा (हळवे होणे, मोठ्याने बोलणे) वागतात आणि याचा संबंध इस्ट्रोजेनशी लावणे हे ही अवैज्ञानिक आहे, शिवाय स्त्रीद्वेष्टंही आहे. लोकांना चांगल्या सवयी लागाव्यात असं वाटत असेल तर उगाच बायकांवर कोरडे ओढण्याची आवशयकता काय? आणि असं करण्याबद्दल ऋजुताबाईंना का झोडपू नये? जरूर झोडपा...माझा पास. मला वाटतं की मला त्यातून जी माहिती मिळाली ती पुरेशी योग्यं आहे. बाकी मला फजूल वाटतं. अनेक गोष्टी नसत्या तरी चाललं असतं, पण ठीक आहे. १००% निर्दोष काहीच नसतं सो चलता है. मी जवळ जवळ ६ महिने फॉलो करतोय...चांगलं वाटतंय मला, पण मी व्यायाम कधी सुरू करेन हा मुख्य अडथळा आहेच.
अगदि अगदि...
"तरूणांनी पुढे यावे" अशा टायपातली जनरल विधानं अधूनमधून प्रसिद्ध लोकं करतात त्यातलाच हा प्रकार.
हे वाक्य जाम आवडले. समाजाचे भले करा, आयुष्य झोकून द्या वगैरे बडबड करत बरेच प्राणी फिरत असतात. "तरूणांनी पुढे यावे" आणि "हे चित्र आता बदललं पाहीजे"
ही सध्याची जगाला शहाणपणा शिकवायचा मक्ता घेतलेल्यांची आवडती आणि अत्यंत पकाउ वाक्ये आहेत.
हा सगळा उद्वेग तुझ्या एका वाक्यातून जाणवला, आवडला.
जे जे
जे जे लोकप्रिय ते सगळे भंकस्,अवैज्ञानिक्,बकवास म्हणण्याची सध्या चलती आहे .अशा मानसिकतेला येथेही प्रोत्साहन मिळावे ह्याचे वाईट वाटते.ऋजुता म्हणजे कोणी वैज्ञानिक नाही. तिने तसे अनुभव मांडले आहेत. तळलेले पदार्थ जास्त खाण्याने हृदयविकाराची शक्यता वाढते. असे कोणी म्हणले की लगेच पुरावे द्या म्हणून मागे लागायचे की काय?
रमाबाई
जे जे लोकप्रिय ते सगळे
जे जे लोकप्रिय ते सगळे भंकस्,अवैज्ञानिक्,बकवास म्हणण्याची सध्या चलती आहे .अशा मानसिकतेला येथेही प्रोत्साहन मिळावे ह्याचे वाईट वाटते.
तसं नाही ग मावश्ये, जो माणूस लोकांना सल्ले देतो त्याला स्वतःला ते सल्ले का उपयुक्त आहेत याची कारणं नीट माहिती असावी इतकंच. यात काही गैर आहे का? तुझा रक्तदाब तपासायला डॉक्टरकडे गेलीस आणि त्याने रक्तदाब कमी करण्यासाठी गोळ्या देण्याऐवजी 'हा नीलवर्णी खडा वापरा' असं सांगितलंत तर तूसुद्धा कारणं विचारशीलच ना? तसंच आहे हे. आणि इथे प्रोत्साहन आहे म्हणणं काही पटलं नाही हो. निम्मे या बाजूला तर निम्मे त्या बाजूला आहेत. ऋजुताच्याच बाजूने जास्त निम्म्यांनी लिहिलंय की नाही?
ऋजुता म्हणजे कोणी वैज्ञानिक नाही. तिने तसे अनुभव मांडले आहेत.
आता तिने पण कुठून तरी फारिनहून डिग्री घेतलीच आहे ना? मग आपल्या व्यवसायापुरती ती डिग्री वापरायची आणि प्रत्यक्षात ज्ञान वापरायचं नाही हे कसं चालेल?
'जास्त झाल्यावर माकडचाळे' - ???
पुस्तक आणि त्याअनुषंगाने आलेले विचार ह्याबद्दल काही म्हणणे नाही.
त्यामुळे पुरूष आणि स्त्रियाही 'जास्त झाल्यावर माकडचाळे' करतात ही गोष्ट अनेक दशकं-शतकांपूर्वी सिद्ध झाली असावी
हे विधान आक्षेपार्ह आहे असे नमूद करावेसे वाटते. हे फारच जनरायलझालं (सर्वसामान्यीकरण) झालं. आणि असे काही सिद्ध झाले असावे, असेही नसावे.
- ('जास्त किंवा कमी' कशीही झाल्यावर माकडचाळे न करणारा) सोकाजी
खा खा
आम्ही तर खाण्यासाठीच जगतो. जास्त खाल्ले तर काय होते, याचे पूर्ण वैज्ञानिक ज्ञान आम्हाला आहे. पण आयुष्य हे एकदाच मिळते, तेंव्हा शक्य तेवढे खाऊन-पिऊन घ्या, या विचारसरणीवरच आमचा विश्वास आहे. 'बायपास झाल्यानंतर शुद्धीत आल्या आल्या, डॉक्टरला, मी वडापाव कधी खाऊ शकेन', असे विचारणारा माझा मित्र मला आदरणीय आहे.
देर आये...
हा जुना धागा आत्ताच वाचला. ऋजुता दिवेकर च्या पुस्तकांच्या मराठी अनुवादाबद्दल कुठे चर्चा झालीय का हे शोधताना सापडला!
"काय वाचताय" या धाग्यावर काल म्हटल्या प्रमाणे दिवेकरांच्या पुस्तकांत बरंच काही भन्नाट वाटलं, पण मला त्यांचा मुख्य सल्ला आवडला - उगीच क्रॅश डायट वर जाऊ नका, ८-८ दिवस फक्त द्राक्षच खायची, नाहीतर एक दिवस पेज, दुसर्या दिवशी फळं, तिसर्या दिवशी धान्य असे फॅड्स करू नका, नियमित पणे, व्यवस्थित प्रमाणात सगळं काही खा..... यात काहीच चूक नाही. लो-कार्ब, इत्यादी डायट, आणि "तीन महिन्यात १५ किलो, वर ५ किलो फुकट" अशा वजन कमी करवणार्या जाहिरातींवर किंवा वेट-लॉस व्यवसायांवर त्यांचा राग आहे. अगदी २-२ तासांनी खायचे नियम तसेच्या तसे पाळले नाहीत तरी बॅलेन्स्ड आहार कसा घ्यावा, आणि तो घ्यायला उगीच एडमामे बीन्स, ऑलिव ऑइल, आवोकाडो किंवा ब्रॉकोलीच्या शोधात लांब न जाता आपल्याच परिसरात सीझन प्रमाणे जे मिळते ते खावे हा सल्ला बरोबरच वाटला. भरपूर घरकाम करून, व्यायाम करून ही ज्यांचे वजन कमी होत नाही (रादर ज्यांचे चरबी चे प्रमाण कमी होत नाही) त्यांच्या "डायट" मध्ये काय चुकते व ते कसे सुधारावे या बद्दल चांगले सल्ले आहेत.
मला ही पुस्तकं "स्त्री द्वेष्टी" वाटली नाहीत. आता विशिष्ट साइझ चे असणे हेच सौंदर्य हा विचारच मूळचा स्त्री-द्वेष्टा आहे, मग त्यात सगळंच आलं असे म्हटल्यास ठीक आहे, पण पुस्तकांत चांगल्या आहारावर, आणि खासकरून स्त्रियांनी जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहाराकडे, व्यायामाकडे कसे लक्ष द्यावे, वेळ कसा काढावा, याची चर्चा आहे. ऑफिस-घरकाम-एकत्र कुटुंब-मुलंबाळं हे सगळं सांभाळणार्या बायकांनी त्यांच्या रूटीन मध्ये स्वत:साठी पौष्टिक आहार कसा बसवता येईल - हे सगळे मला खरेतर थोडे सिम्प्लिस्टिक वाटले, पण प्रामाणिक आणि कॉमन सेन्सिकल सुद्धा वाटले. (याच गटात मी ही असल्याने मलाही त्याचा उपयोग होतोय - अर्थात तीन महिन्यांनी नेमकी आकडेवारी कळेल :-)) मला वाटतं कदाचित याचमुळे त्यांचा खप इतका जास्त असावा. पहिले पुस्तक कॉर्पोरेट जगातल्या किंवा मुंबईच्या श्रीमंत वर्तुळातल्या, २४-तास नोकर परवडत असणार्या लोकांसाठी (स्त्रिया व पुरुष) आहे, पण दुसरे तेवढे नाही.
हा झाला मुख्य सल्ला, आणि पुस्तकं मला अगदीच टाकाऊ किंवा ढोंगी का वाटली नाही या बद्दल. पण तो देण्याच्या शैली बद्दल मात्र मला बरेच काही खटकले. वजनाचा काटा तर चक्क फेकून द्या, आणि सगळे खाल्ले तरी किती प्रमाणात यावर भर आहे, पण पुस्तकाचे मार्केटिंग करीना कपूरच्या साइझ झीरो च्या चर्चे द्वारे झाले आहे. तसेच "सगळे काही खऊनही कसे बारीक व्हायचे" याबद्दल पुस्तक आहे अशी ही पब्लिसिटी आहे. "सेलेब्रिटी क्लायंट्स" चा फारच उदो उदो आहे. उगीच हे घाटी, ते गुज्जू, हे पंजू वगैरे काय काय निरर्थक. गाड्या (कार) आणि राजकारणाच्या उपमा पानोपानी आहेत त्या तर भयंकर आहेत - तर्काचा वगैरे काही पत्ताच नाही. अतिशयोक्त्ती ही पुस्तकाची शैली म्हणता येईल - अग ए, आता तरी डोस्क्यात बसलं का, का पुन्हा एकदा तेच सांगू? - अशा खेळकर आणि गप्पांच्या, पण काही ठिकाणी बालिश, आणि कंटाळवाणी शैलीचे लेखन आहे.
मी अनेक वर्षांपूर्वी पब्लिशिंग जगात होते, पण अलिकडे खूप दिवसांनी "ईन्डियन इंग्लिश" मधली अशी ही दोन पुस्तकं वाचली. आणि रँडम हाउस सारख्या नावाजलेल्या प्रकाशन गृहातून इतक्या वाइट इंग्रजीत, अर्थात हिंग्लिश मधले पुस्तक निघते हे पाहून थोडा आश्चर्य वाटला. (आता तुम्ही म्हणाल कुठे आहात तुम्ही? चेतन भगत चं नाव ऐकलंय का?) तर सांगायचा मुद्दा असा की वैज्ञानिक माहिती वगैरे लांब राहिली; "विज्ञान", "जीन्स" (म्हणजे घालायच्या नव्हे), इत्यादी शब्दांचा नेमका वापर कसा, कुठे करावा, यात अतिशयोक्ती आहे का, अशा वाक्याचा अर्थ कसा लागू शकतो, याबद्दल लेखिके ने तर नाहीच, पण संपादकीय पातळीवर ही काही विचार झालेला दिसत नाही. गप्पागोष्टींच्या शैलीत सगळं चालायचंच अशा थाटात. म्हणूनच, पुस्तकात मुद्दा आहे "आपल्या परिसरात, समाजात रूढ असलेल्या खाद्य पदार्थांना पूर्ण पणे लाथाडून एक्झॉटिक पदार्थांकडे पळू नये, हे सस्टेनेबल नाही, तुम्हाला फार दिवस टिकवता येणे कठिण आहे" असा; पण गुणसूत्रांच्या भाषेत त्याचा भलताच अर्थ लागतो. अशी अनेक उदाहरणं दोन्ही पुस्तकात आहेत. मी दोन्ही पुस्तकं इंग्रजीत - सॉरी, हिंग्लिश मध्ये - वाचली, पण मराठी अनुवादात या शैलीचं काय झालंय माहित नाही.
असो. वाचताना कितीही चिडचिड झाली तरी दिवेकरांनी आखलेला एक आहार-प्लॅन मी पाळायचा प्रयत्न करतेय, पण नुकतीच सुरुवात आहे. बाकी कोणी केला असल्यास काही फरक जाणवला का हे ऐकायला आवडेल!
" परंपरागत अन्न पचवण्याची
" परंपरागत अन्न पचवण्याची माहिती आपल्याकडे आपल्या गुणसूत्रांमधून येते. "
" दुसर्या व्यक्तीने जेवताना फोनवर भांडण केलं तर जेवण अंगी लागणार नाही."
आयला , या बाई म्हणजे रामदेवबाबा आणि श्री श्री यांचं कॉम्बिनेशन दिसतंय . वाचायला च पाहिजे पुस्तक हे . आजकाल चांगले विनोदी साहित्य दुर्मिळ झाले आहे. यांचे लिखाण ते भरून काढू शकते म्हणून तरी वाचायला पाहिजे ...
आजच या बाईंच्या नावाने मोदक खाणे हे स्वास्थ्यवर्धक कसे असा एक मेसेज व्हाट्सअप वर जोरात फिरतोय !!!
अन्न दहशतवादी दिवेकर
गेल्या वर्षी ह्याच बाईने मोदक खाल्ल्यामुळे कोणकोणते आजार होणार नाहीत, असं बीभत्स फेसबुक अपडेट टाकलं होतं. तेच आता फिरत असेल कदाचित.
रोचक लेख. काही फुटकळ
रोचक लेख. काही फुटकळ प्रतिक्रिया नोंदवतो :
१. पुस्तक अर्धंच वाचल्याची कबुली म्हणजेच हा लेख पुस्तकाबद्दल नाही याची ग्वाही मानतो. तर मग हा लेख कशाबद्दल आहे ? वजन कमी कसं करायचं या विषयावरील पुस्तकांच्या ट्रेंड बद्दल. मग ऋजुता दिवेकर यांच्याच पुस्तकाची निवड का? तर ते समोर आलं म्हणून. अन्य समोर येतं तर त्यावर लेख लिहिला असता. (किंवा त्याचं नाव घेऊन लिहिला असता. ) दिवेकर काही एकट्या नाहीत. पण त्या बिचार्या सापडल्या. असो.
२.
प्रमाणबद्ध शरीर हवं म्हणून आपण स्वतःलाच किती गुन्हेगार ठरवून खातो, पितो, वागतो, जगतो याचा विचार मला महत्त्वाचा वाटतो. >>>>
"आपल्या" - म्हणजे (बहुदा इथे पर्यायाने लोकांच्या ) मनात अपराधी भावना असते येथवरचा तर्क समजण्यासारखा आहे. परंतु ही अपराधी भावना प्रमाणबद्ध शरीराबद्दलच असते हे प्रस्तुत लेखाच्या लेखिकेने कसे ठरवले? "वजन वाढतं आहे , यातून हार्ट अटॅक , मधुमेह , ब्लड प्रेशर इत्यादि इत्यादि प्रकार उद्भवतात. शिवाय ते वाईटही दिसतंच" या विचाराला केवळ सोयीकरता एकेरी स्वरूप देऊन मग त्याचं केलेलं विवेचन कसं पटवून घ्यायचं याचा विचार करतो आहे.
३. एकतर लोकांना ठासून ठासून झिरो फिगरचं महत्त्व सांगायचं आणि वर आपणच त्यांचे तारणहार आहोत, आपण या विषयावर शिकून, अतिशय विचार करून, लिहीतो आहोत असं दाखवायचं. >>>
हे पुस्तकातल्या नक्की कुठल्या भागात आलेलं आहे? "झिरो फिगर" हे शब्द पुस्तकामधे कुठे आलेले आहेत का? किंवा नुसता उल्लेख आलेला असेल पण करीना कपूरच्या झिरो फिगरचं श्रेय लेखिकेने घेतलेलं आहे का ? आणि त्याही पलिकडे "झिरो फिगरचं" महत्त्व लेखिकेने कुठे निर्देशित केलेलं आहे का ? की ही प्रस्तुत लेखिकेची टिप्पणी आहे? तशी असल्यास हरकत नाही. पण त्या टिप्पणीला निरीक्षणांमधून/अगदी साध्या वाचनातून काढलेला निष्कर्ष म्हणता येणार नाही. "पुस्तक अर्धाधिक वाचतावाचता मला असं वाटतं" आणि "हे विशिष्ट शब्द, या दिशेने केलेलं विवेचन , अशी विविक्षित मांडणी केलेली वाचल्यामुळे माझं असं मत बनलं" या दोन गोष्टींमधला फरक आपण समजून घ्यायला हवा.
४.
"अधूनमधून शास्त्र, आयुर्वेद, जीवनशैली वगैरे शब्द पेरायचे. कोणीतरी अवतार, तारणहार येऊन आपली मदत करणार, या विचारसरणीचा किंवा वैचारिक गुलामगिरीचा फायदा घेणारे 'माता', 'बाबा' म्हणजे हे डाएटिशन असं काहीसं चित्रं समोर येतं. ऋजुता दिवेकर ही पण त्यांच्यातलीच एक "माता ऋजुता दिवेकर" वाटते. हिग्ज बोसॉनच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आलेले बाबा बालाजी तांबे असोत वा चार दिवसात झटपट इंग्लिश शिकवणारे कोकाटे, ते ही याच रांगेतले!>>>>
हां इथे प्रस्तुत लेखिका "असं असं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं" असं म्हणते. याचा अर्थ हे तिने बनवलेलं मत आहे. अशा स्वरूपाची लोकप्रिय पुस्तकं लिहिणारे सर्वच एका रांगेत कसे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. "आमचं पुस्तक वाचून अमुक दिवसांत फाडफाड इंग्रजी शिका" असं म्हणणारे आणि वजनवाढीच्या बाबत काही स्पष्टीकरण देऊ पहाणारे आणि काही उपाय सुचवणारे अशी दोन्ही पुस्तके एकाच रांगेत कशी ?
५. बरं, या सगळ्यात खाण्याकडे दुर्लक्ष होऊन आवश्यकतेपेक्षा चार घास अधिक जेवले जातील असा मुद्दा त्यांनी काढलेलाच नाही. >>>
नक्की त्यांनी असा मुद्दा काढलेलाच नाही ? की ज्या रीतीने हे पुस्तक वाचलं गेलं आणि पूर्ण व्हायच्या आत त्यावर टिप्पणी केली गेली ते पहाता विवेचनाच्या सोयीकरता हा अत्यंत ठसठशीत (ओब्व्हियस) मुद्दा सरळ डावलला गेला ? की इतक्या सरळ मुद्द्याचं, अगदी लहान मुलालाही पटेल असं स्पष्टीकरण दिलं गेलं नाही हा वकिली युक्तिवाद इथे आहे? तसा असायला हरकत नाही, पण अशा स्वरूपाची स्पष्टीकरणं दिल्यावर मग "जे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं शहाणपण आहे ते कशाला वेगळं द्यायचं " असाही युक्तिवाद आला असताच. (किंबहुना त्याच्या पुढच्या वाक्यात तो आलेला आहेच. )
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
असो. अशा "अर्ध्याधिक" वाचनातून केलेल्या चिरफाडीची आणखी चिरफाड संभवू शकतेच. परंतु त्यातून "Missing the forest for the trees" हा (प्रस्तुत लेखात मला जाणवलेला) दोष संभवू शकतो म्हणून त्या मार्गाने जात नाही.
अशा स्वरूपाची पुस्तकं गेली अनेक दशकं अमेरिकेत आणि आता अधिकाधिक प्रमाणात भारतात आणि पर्यायाने मराठीमधे लिहिली जातात/आणली जातात हे खरे आहे. त्या पुस्तकांमधे आव थोडा अधिक असतो आणि मूलभूत म्हणावं असं ज्ञान फारच कमी असतं आणि कधीकधी अभावच जाणवतो हे सामान्यपणे खरं आहे. यामध्ये वाचकाच्या बुद्धिमत्तेचा अवमान संभवू शकतो आणि प्रस्तुत लेखिकेने त्या दिशेने जे विवेचन केलेलें आहे ते चुकीचं नाहीच. मात्र असं एकच पुस्तक घेऊन त्याला झोडपायचं, मुख्य म्हणजे तसं करताना भरपूर कंठशोष करायचा आणि त्याला झोडपताना मग वस्तुनिष्ठेच्या मूल्याला रामराम ठोकायचा, निव्वळ आपला आवेश दाखवायचा असे काहीतरी प्रस्तुत लेखा संदर्भात झालेले आहे असे मला वाटले.
एरवी "न ब्रूयात् अप्रियम् सत्यम्" या न्यायाने गप्प बसतो ते या लेखासंदर्भात आणि या लेखिकेसंदर्भात बसलो नाही इतकेच.