ही बातमी समजली का - ११६
सरकारचा दणकट निर्णय. संरक्षण क्षेत्रात १००% थेट परकीय गुंतवणूकीस परवानगी.
जबरदस्त. भाजपा ने संरक्षण क्षेत्रात १००% थेट परकीय गुंतवणूकीस वाव दिलेला आहे हा मोठ्ठाच निर्णय म्हणायचा.
The message was quite clear that India is open for business and the government will soon put in place a small negative list of sectors that require approval before investment by foreign players, DIPP secretary Ramesh Abhishek said.
* Upto 100% FDI in defence sector
* Upto 74% FDI in brownfield pharmaceuticals under automatic route
* 100% FDI in brownfield airport projects under automatic route
* 100% FDI in civil aviation
* FDI upto 49% in civil aviation under automatic route, beyond 49% through govt approval
* Local sourcing norms for FDI in single brand retail for products having "state of art" and "cutting edge" technologies
* 100% FDI under automatic route for cable networks, DTH and mobile tv
.
.
.
The senior Bharatiya Janata
The senior Bharatiya Janata Party (BJP) leader argued that under FDI, 60-70 percent of the business will go into the hands of just two or three companies which will be harmful for the farmers.
जेटली हा चावट माणूस आहे.
रिटेल मधे थेट परकीय गुंतवणूक आल्यावर ६०%-७०% बिझनेस हा दोन किंवा तिन कंपन्यांच्या हातात जाईल ??
रिटेल मधे थेट परकीय गुंतवणूकीच्या विरोधात असलेली स्टँडर्ड ३ किंवा ४ (फोल) आर्ग्युमेंट्स आहेत त्यातले हे एक. मोनोपोलायझेशन. पण हे खरं आहे हे कशावरून ? रिटेल मधे फक्त दोन तिन कंपन्या येतील ?? कॉस्टको, कारेफोर, व्होलफूड्स, मेट्रो (जर्मनी), वॉल्मार्ट, टेस्को, क्रोगर, वॉल्ग्रीन्स, अॅमेझॉन ... अशा अक्षरशः डझनभर कंपन्या आहेत. त्या सगळ्या कंपन्या खरंच स्पर्धा न करता हातावर हात धरून गप्प पणे टॉप च्या दोन कंपन्यांना ६०% ते ७०% मार्केट शेअर (अगदी परचेस प्रक्रिये मधला का होईना) घेऊन देतील ??? त्या कंपन्या आपापल्या (पर्चेस प्रक्रियेतल्या) मार्केटशेअर ची फिकीर करणार नाहीत ??? का बरं ?
दोन / तीन हे प्लेसहोल्डर
दोन / तीन हे प्लेसहोल्डर आहेत. त्याजागी वीस / तीसही असू शकतील. हा रिलेटिव्ह बार्गेनिंग पोझिशनचा बागुलबुवा दाखवणं आहे. या दोन/तीन/वीस/तीस कंपन्या तगडी बार्गेनिंग पॉवर घेऊन येतील आणि शेतीच्या कमोडिटी मार्केटला चेचून टाकतील अशी भीती आहे.
पण मार्केटशेअरचा मुद्दा एकदम योग्य आहे. पण तो मार्केटशेअर कमोडिटी मार्केटच्या (पक्षी: कृउबासंच्या) पातळीवर न देता एक पातळी वर दिला पाहिजे. म्हणजे, शेतीसाठी उबरसारखं काहीतरी करून त्या दोन/तीन/वीस/तीस कंपन्याना दोन/तीन/वीस/तीस लाख शेतकर्यांशी डायरेक बोलायला लावलं पाहिजे. मग ते मार्केटशेअर बाबत एकदम सुतासारखे सरळ येतील.
दोन / तीन हे प्लेसहोल्डर
दोन / तीन हे प्लेसहोल्डर आहेत. त्याजागी वीस / तीसही असू शकतील.
जर वीस / तीस कंपन्या असल्या तर शेतकर्याला वीस / तीस ऑप्शन्स निर्माण होतील. त्याचा माल विकण्यासाठी. वीस ऑप्शन्स म्हंजे केवढी बार्गेनिंग पॉवर शेतकर्याकडे आली पहा. जेवढे ऑप्शन्स जास्त तेवढी बार्गेनिंग पॉवर जास्त. अर्थात कंपन्यांना ऑप्शन्स प्रचंड आहेत. कारण शेतकर्यांची संख्या काही कोटी आहे. त्यामुळे वीस / तीस कंपन्या असल्या तरी रिलेटिव्ह बार्गेनिंग पॉवर ही कंपन्यांकडेच जास्त असणार आहे.
वीस / तीस कंपन्या असतील तर जेटलींचा मुद्दा एकदम फोल ठरतो.
------
पण तो मार्केटशेअर कमोडिटी मार्केटच्या (पक्षी: कृउबासंच्या) पातळीवर न देता एक पातळी वर दिला पाहिजे. म्हणजे, शेतीसाठी उबरसारखं काहीतरी करून त्या दोन/तीन/वीस/तीस कंपन्याना दोन/तीन/वीस/तीस लाख शेतकर्यांशी डायरेक बोलायला लावलं पाहिजे. मग ते मार्केटशेअर बाबत एकदम सुतासारखे सरळ येतील.
तिस कंपन्या तिस लाख शेतकर्यांशी बोलत असतील तरी रिलेटिव्ह बार्गेनिंग पॉवर कंपन्यांकडेच असेल नैका ?
आणि उबर सारखं काही केलं तरी डेटा वरती अॅनॅलिटिक्स कोण रन करेल ? कंपन्या. संपलं.
मागे म्हटले होते तसे. सत्तेत
मागे म्हटले होते तसे. सत्तेत आल्याने लोकांकडे कितीतरी अधिक विदा असतो. त्याकडे बघुन जर आपली आधीची मते देशहितासाठी बदलली असतील तर त्याचे स्वागत करायला हवे.
तुम्ही हे आधी का बोलला होतात? हे आर्ग्युमेंट एका मर्यादेपलिकडे कुचकामी ठरते. (तसेच सद्य सत्ताधार्यांनी "मग आम्ही केलं तर काय झालं तुम्हीही हेच करायचात" हे आर्ग्युमेंट फोल आहे)
आता उपरती झाल्यावर आपल्या आधीच्या विधानाच्या उलट कृती करण्याचे दाखवलेले धाडस वाखाणण्याजोगे आहे. - तेही तेव्हा जेव्हा फेसबुक-ट्वीटर वगैरेच्या माध्यमांतून त्याचा पुरावा कायम रहातो.
मान्य. व्हॉट अबाउटरी चूक
मान्य. व्हॉट अबाउटरी चूक असते.
ही ट्वीट्स पाहणे हा आपल्याला स्वतःला आरसा दाखवणे असते. ही ट्वीट्स करणार्यांच्या आणि ज्यांच्या विरोधात ही ट्वीट्स केली गेली त्यांच्या 'ज्ञान, बुद्धी* आणि विशेषतः मोटिव्ह'बाबतचे आपले जजमेंट चुकले तर नाही ना? असा प्रश्न स्वतःला विचारण्यासाठी......
*याला हा सुद्धा संदर्भ आहे.
सहमत आहे. मोदी हे भगवे
सहमत आहे.
मोदी हे भगवे काँग्रेसी आहेत (ते काँग्रेसचाच वेगळा कार्यक्षम दिसणारा फ्लेवर देतात, मुळातून वेगळा पर्याय नाही) हे मी निवडणुकीच्याही आधी (आक्षेपाच्या लेखात) म्हटले होते. त्यामुळे यात धक्कादायक काही नाही. असलेच तर ते भक्तांसाठी असावे.
मात्र अश्या आरश्यांमुळे भक्त दुरावताहेत हे भगव्या वॉट्सअॅप ग्रुप्समधून लक्षात येते आहे. उत्तरप्रदेश निवडणुक येऊ घातली असतानाही हा निर्णय घेणे खरोखर धाडसी आहे.
भक्तमंडळी
राजन यांच्या निर्णयानंतर, या विषयाबाबत फारशी रुची-ज्ञान नसणाऱ्या सामान्य जनांना राजन यांच्यामुळे काहीतरी बरं होत होतं आणि त्यांना थांबवायला हवं होतं असं वाटतंय असा एक सूर दिसला. मात्र त्याचबरोबर भक्तमंडळींनी राजन यांना डिसक्रेडिट करण्यासाठी जोरदार मोहीम व्हॉट्सॅप सुरु केली आहे असं एक चित्र दिसतंय. या मोहिमेतले मुद्दे ठराविक स्वामीछाप आहेत
१. राजन हे 'परदेशी' अाहेत, भारतीय नाहीत त्यामुळे देशद्रोही. (भारतीय पासपोर्ट होल्डर हा 'परदेशी' कसाकाय बॉ?)
२. २००८ च्या मंदीनंतर अमेरिकी अर्थव्यवस्था गाळात गेल्याने भारताला मोठा फायदा झाला(!). तो फायदा कमी करुन भारताला गाळात घालण्यासाठी अमेरिकेने राजन यांना भारतात पाठवले. (लोल)
याचं उदाहरण म्हणजे राजन हे सप्टेंबर २०१६ ला जाणार असूनही त्यांनी डिसेंबर २०१६ च्या म्याचुरिटीचे २८ बिलियन डॉलरचे यूएस बॉँड्स खरेदी करुन ठेवलेत. म्हणजे नव्या गवर्नवर ते प्रकरण शेकेल. (हाहाहा)
३. मोदी निवडून येणार याची चाहूल लागल्याने काँग्रेसने 'आपला माणूस' त्या पोस्टवर आधीच आणून ठेवला होता. राजन यांनी मोदींना जमेल तितका खोडा घालण्याचा प्रयत्न केला
४. राजन यांच्या गच्छंतीवर सरकारने सुरक्षिततेच्या कारणास्तव काहीही टिप्पणी केली नाही. मात्र स्वतः राजन हे अनेक गैरसमजांना जन्म देत आहेत.
५. राजन यांची या पदावर राहण्याची काडीची इच्छा नव्हती मात्र सरकारमुळे त्यांना जावं लागतंय असं चित्र उभं करण्यात ते यशस्वी झालेत.
राजन हे 'परदेशी' अाहेत,
राजन हे 'परदेशी' अाहेत, भारतीय नाहीत त्यामुळे देशद्रोही.
मग अरविंद सुब्रमण्यम व अरविंद पनगारिया या दोघांच्याही भारतीयत्वावर प्रश्नचिन्ह लावणार काय ?
--
सुब्रमण्यम स्वामी हे किमान दोन दशके "जनता पार्टी" मधे होते. जनता पार्टी च्या "आघाडी" मधे पूर्वी जनसंघ होता वगैरे ऐकून आहे पण जनता पार्टी ही "हिंदु" वादी पार्टी नव्हती. ते जनसंघातर्फे संसद सदस्य होते काही काल. पण सुब्रमण्यम स्वामी हे "भारतीय जनता पार्टी" मधे २०१३ साली आले. मग सुब्रमण्यम स्वामी हे पुरेसे हिंदु नाहीत असं म्हणावं काय ?
किंवा हे असं
हा हा. किंवा हे असं
तसेच राजन यांनी चौकशी सुरू असल्याचा गौप्यस्फोट चिडुकडे केला. अशा पद्धतीने चिडुच्या कार्ट्याला सहाय्य करणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान ठरू शकतो अशी चेतावणी स्वामींनी राजनना दिली. एकंदरीत झाली तेव्हढी शोभा पुरे झाली म्हणून आता राजननी आपणहून गाशा गुंडाळायचं ठरवलेलं दिसतंय. कशाला उगीच कोर्टाच्या लफड्यात पडा !
हिंदु एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप्स
हिंदु एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप्स हे भारत पाक संबंध सुधारण्याच्या मार्गामधे एकमेव अडसर. . मुस्लिम एक्स्ट्रिमिस्ट ग्रुप्स हे अस्तित्वातच नव्हते कधी मुळी. अल काएदा, लष्कर, हरकत, हिज्बुल, जैश यासारख्या संघटना ह्या भारतीय व पाकिस्तानी जनतेदरम्यान गोट्या खेळण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी जन्माला आलेल्या आहेत.
माझ्या मते हे संबंध
माझ्या मते हे संबंध सुधारण्यातील सर्वात मोठे अडसर दोन्ही देशांतील लष्कर आहे. पाकिस्तानी लष्कराची तर रोजीरोटीच यावर असल्याने ते तुलनेने मोठा अडसर आहेत.
पलिकडच्या वाईल्डलिंग्जसोबत वर्षानुवर्ष युद्ध केल्याने लष्कराचा त्यांच्यावर राग-द्वेष समजू शकतो. पण त्याच पराकोटीचा द्वेष 'वॉल'पासून लांब रहाणार्यांना असेलच असे नाही. आणि असलाच तरी अधिक मोठ्या संकटाकडे पाहून वाईल्डलिंग्ज बरोबर संबंध सुधारण्यासाठी एखाद्या जॉन स्नोलाच पुढाकार घ्यावा लागतो. असा मुत्सद्दी निर्णय घेण्याची कुवत असणारे (वाजपेयींव्यतिरिक्त) स्वतंत्र भारत किंवा पाकिस्तानात मला तरी कोणी दिसत नाही. एखाद्या पाकिस्तानी लष्करी अधिकार्यानेच पुढाकार घेतला तर हे होउ शकते.
राजन यांच्या गच्छंतीबद्दलच्या
राजन यांच्या गच्छंतीबद्दलच्या वादाला केवळ सरकार जबाबदार नाही हे मांडणारा वाचनीय लेख.
http://indianexpress.com/article/opinion/columns/raghuram-rajan-rbi-rex…
रच्याकने, एक रोचक फॅक्ट. राजीव गांधींनी मनमोहन सिंगांना एकच टर्म दिली होती.
अगदी अगदी. कालपरवा त्यांनी
अगदी अगदी.
कालपरवा त्यांनी असंच एक विधान केलं की "व्यक्ती ही पदापेक्षा मोठी नसते". ही अशी विधानं नेमकं विरुद्ध मत मांडण्यासाठी असतात की काय कोणजाणे.
( आमच्या इकडे एक डायलॉग फार फेमस आहे "इट इज नॉट अबाऊट यू, इट इज अबाऊट द टीम्/प्रोजेक्ट्/कंपनी". याचा अर्थ हा असतो की "आय एम मोअर इम्पॉर्टंट दॅन यू". )
राजन यांनी अशी भाषणे देत फिरणे अयोग्य आहे
I completely agree...also see http://www.thehindubusinessline.com/money-and-banking/done-in-by-his-co…
"Rajan had, while delivering his speech at the DD Kosambi Ideas festival, said: “Strong governments may not, however, move in the right direction. Hitler provided Germany with extremely effective administration: the trains ran on time, as did the trains during our own Emergency in 1975-77. His was a strong government, but Hitler took Germany efficiently and determinedly on a path to ruin, overriding the rule of law and dispensing with elections.”.."
"...It also did not help the RBI Governor’s case that he had the support of former Finance Minister P Chidambaram and big industrial groups.
“He was beholden to the former regime. And we have never seen the kind of campaign one has seen from the industry to back him,” said a senior Minister..."
अन(/ना)दर रिपब्लिकन, अनदर रिसेशन?
ट्रम्पच्या आर्थिक धोरणांचे संभाव्य परिणामः
http://blogs.wsj.com/economics/2016/06/20/u-s-economy-would-be-diminish…
Mr. Modi, Don't Patent Cow Urine
Mr. Modi, Don't Patent Cow Urine
बातमीतून उद्धृत -
over the last decade the Council of Scientific and Industrial Research has spent around $50 million on patent applications, including for using cow urine in health tonics, energy drinks and chocolate.
WTF.
योगसाधना ही धार्मिक कृति नाही
गरीब आदिवासीला नक्षलवादी बनवून बेदम मारहाण करून .....
------------
योगसाधना ही धार्मिक कृति नाही -
कशावरून ?
धर्म व योग याची सीमारेषा कोणती ?
तुम्हाला योगातून काय मिळाते यापेक्षा तुम्ही योगाला काय देता हे महत्वाचे आहे.
म्हंजे काय ? आम्ही योगाला काय देणार ? काय द्यावे ? आत्तापर्यम्त कोणी योगाला काय दिलेले आहे ?
---------
Isro आज २० उपग्रह अवकाशात सोडणार
---------
NCW seeks an Apology from Salman
---------
राजन यांच्या कार्किर्दीचा
राजन यांच्या कार्किर्दीचा आढावा घेणारा आणि त्यांची २००३-०८मध्ये गवर्नर असणार्या रेड्डींशी तुलना करणारा लेख. छान आहे!
http://linkis.com/newindianexpress.com/4AnuK
अभिव्यक्तिस्वातंत्र्य खतरे मे
Free speech: The muzzle grows tighter
लेखातून उद्धृत :
Consider for a moment: the most senior officer of the mightiest armed forces the world has ever seen feels it necessary to contact some backwoods Florida pastor to beg him not to promote a 13-minute D-movie YouTube upload. Such are the power asymmetries in this connected world
Freedom House, an American think-tank, compiles an annual index of freedom of expression. This “declined to its lowest point in 12 years in 2015, as political, criminal and terrorist forces sought to co-opt or silence the media in their broader struggle for power”. The share of the world’s populace living in countries with a free press fell from 38% in 2005 to 31% in 2015; the share who had to make do with only “partly free” media rose from 28% to 36%. Other watchdogs are similarly glum. Reporters Without Borders’ global index of press freedom has declined by 14% since 2013.
A better way - Paul Ryan
https://www.washingtonpost.com/news/powerpost/wp/2016/06/22/republicans…
ओबामाकेअरच्या ऐवजी दुसरा प्लॅन आणण्याचा Paul Ryan यांचा मनसुबा आहे. हे बिल नाही फक्त प्लॅन आहे, शिवाय अजुन सर्व रिपब्लिकन्स नी हा प्लॅन एन्डॉर्स केलेला नाही. This will be interesting to watch.
Obamacare’s mandates are meant to drive broad participation in the insurance market, so the premiums paid by a broad number of relatively healthy subscribers essentially subsidize care for the sickest. Without the mandates, many healthy Americans won’t buy insurance, forcing insurance companies to either deny coverage to sick customers or hike premiums to unsustainable levels. The GOP plan would solve that problem by establishing state-based “high-risk pools” for the sickest and directing $25 billion in federal support to them over 10 years.
हा मुद्दा रोचक वाटतो आहे.
.
But Ryan's proposal would keep some popular aspects of the law, including not allowing people with pre-existing conditions to be denied coverage and permitting children to stay on their parents' coverage until age 26.
It proposes putting $25 billion behind high-risk pools for people with pre-existing conditions and for others, and transforming the federal-state Medicaid program for the poor by turning it into state block grants or individual per-capita allotments to hold down spending.
Phew!!! नशीब. हे ओबामाकेअरमध्ये होते तसेच आहे. यात बदल नाहीये.
.
For people who do not get insurance through their jobs, the Republican plan would establish a refundable tax credit. Obamacare, by contrast, provides subsidies to some lower-income people to buy insurance if they do not qualify for Medicaid. Medicaid: The plan would give states the option to take their Medicaid dollars in a block grant, in which states would be given a lump sum each year with which to manage their Medicaid programs as they choose.
रोचक!
.
The Republican proposal would gradually increase the Medicare eligibility age, which currently is 65, to match that of the Social Security pension plan, which is 67 for people born in 1960 or later.
That sucks!
.
Under Obamacare, many states expanded the number of people eligible for Medicaid. The Republican plan would allow states that decided to expand Medicaid before this year to keep the expansion, while preventing any new states from doing so.
ठीकठाक वाटतय. सुवर्णमध्य सॉर्ट ऑफ.
______________________
https://www.washingtonpost.com/blogs/right-turn/wp/2016/06/21/the-only-…
If the GOP dumps Trump, Sasse will be seen in heroic terms as the man who stood on conscience. Moreover, few, if any, Republicans would dream of blaming Trump’s defeat on Sasse. Trump is killing his chances in dramatic fashion each and every day. हाहाहा अगदी अगदी. आणि तरीही काही लोक ट्रंपची ट्रंपेट वाजविण्यात धन्यता मानतायत. Afterall not everyone is gifted with clear & impeccable conscience ;)
पण त्यांनी अरविंद सुब्रमणीयन
पण त्यांनी अरविंद सुब्रमणीयन यांच्यावर केलेला आरोप खरेतर गंभीर होता.
प्रश्न कॉन्फिडन्सचा नसून त्यांनी खरोखर अमेरिकाधार्जिणे निर्णय भारताचा तोटा सहन करून घेतले का? आणि घेतले असल्यास का? हे ही सरकारने हा कॉन्फिडन्स व्यक्त करताना सांगायला हवे होते.
२जी प्रमाणे याचाही पाठपुरावा स्वामी करणार असतील तर चांगले होईल. अमेरिकन फार्मा कंपन्या किती दिवस भारताकडे नजर लाऊन आहे (रादर डोळॅ वटारून आहेत) तेव्हा यात काही गैरप्रकार झाला नसेल हे इतक्या कॉन्फीडन्सने म्हणणे कठीण आहे!
आरोप गंभीर आहेत हे मान्य
आरोप गंभीर आहेत हे मान्य पण ते कोणी केले आहेत हे पाहता ते फारसे गांभीर्याने घेण्याची गरज वाटत नाही. (जेटलींनी ऑलरेडी फेटाळलेच आहेत). शिवाय राजन ही काँग्रेसची अपॉईंटमेंट होती, अरविंद सुब्रम्हण्यन हे मोदींनी आणलेले आहेत त्यामुळे हे होणारच होते.
आता पुढील भागात स्वामी सरकार/प्रशासनामधील काँग्रेसच्या/सोनियाच्या पित्तूंची नावे जाहीर करणार आहेत म्हणे! त्या यादीवर मोदी-जेटली मौन धरतील असा एक अंदाज आहे.
पण ते कोणी केले आहेत हे पाहता
पण ते कोणी केले आहेत हे पाहता ते फारसे गांभीर्याने घेण्याची गरज वाटत नाही.
ऑ??
जयललिता, २जी, नॅशनल हेराल्ड हे बाहेर काढणारे आणि शेवटापर्यंत नेणारे स्वामी त्यांच्याबद्दलच बोलताय ना? सोनिया गांधींची निवडणुक रद्द होऊ शकली असती असाही पुरावा त्यांनी दिला होता. पण एक आख्खं वाक्य टायपिंग मिस्टेक होतं या बोगस क्लेमखाली वाचल्या त्या.
+१म्हणूनच म्हटलं हा बावा
+१
म्हणूनच म्हटलं हा बावा पक्ष नाहि तरी वैयक्तिक कपॅसिटीतही काही करू शकतो हे त्याने आधीच दाखवलं आहे. हा निखारा विरोधात असण्यापेक्षा अस्तनीत असलेला बरा या विचाराने भाजपाने आत ओढला असावा. आता तो जाळतो किंवा विरोधकांना जाळतो किंवा कसे ते दिसेलच काही वर्षांत.
केवळ स्वामी सारख्या वाचाळवीराने आरोप केलेत म्हणून ते थेट खोटे ठरवण्यासारखी परिस्थिती पेटंट - त्यातही फार्मा पेटंट व्यवहारात - दिसत नाही. ज्या अमेरिकन फार्मा कंपन्यांसाठी स्वतः ओबामा थेट मोदींशी चर्चा करतो त्या कंपन्यांसाठी या अधिकार्यांनी काही केले असा आरोप जर कोणीही करत असेल तर शहानीशा व्हायला हवी!
राजन देशभक्त नाहीत वगैरे वाचाळ गफ्फा हसण्यावारी नेता येतात.
>>जयललिता, २जी, नॅशनल हेराल्ड
>>जयललिता, २जी, नॅशनल हेराल्ड हे बाहेर काढणारे आणि शेवटापर्यंत नेणारे स्वामी
याबद्दल शंका आहे. २जी मध्ये त्यांनी चिदंबरम यांना आरोपी बनवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यात ते अपयशी ठरले. कोर्टाने त्यांची आरोपी करण्याची पिटिशन फेटाळून लावली. नॅशनल हेराल्ड प्रकरण अजून चालू आहे शेवटापर्यंत गेलेले नाही.
धुरळा उडवू शकतात. आणि लोकांना ते खरं वाटतं हे खरं.
भारतीय कोर्टानं मोदींना
भारतीय कोर्टानं मोदींना विश्वातला सर्वात मोठा खलपुरुष संबोधलेले असल्यामुळे आज अनेक लोक (उदा. माझा एक कलीग) मोदींना "सर्वोच्च" पदावर बसवायला उत्सुक आहेत. Wannabe Hitler असं संबोधतात मोदींना.
अगदी विजय तेंडूलकर सुद्धा .... भारतातल्या अतिकडक "स्वयंचलित पुष्पवर्षाव यंत्र" प्रतिबंधक कायद्यांचा विचारही न करता मोदींना प्रगाढ प्रेमालिंगन द्यायला उत्सुक होते.
फरक एवढाच की की गोबेल्स नीती मधून निर्माण झालेल्या "शंखनादातून प्रतीतीकरण" याच वैश्विक मूल्यास धर्म मानून सुब्बु स्वामी ते मूल्य उर्वरितांना लावण्याचा यत्न करीत आहेत. (इन्क्लुझिव्ह पॉलीसीज).
( ओह बाय द वे ... माझा तो कलीग त्याच त्या विशिष्ठ "शाश्वत व वैश्विक शांतिधर्मा" चा निष्ठावान पाईक आहे. )
२जीच्या झोल विरुद्ध
२जीच्या झोल विरुद्ध पहिल्यांदा आवाज उठवणार्यांपैकी ते होते. मग CAG रिपोर्ट आला. राजांना प्रॉसिक्युट करायला हवं हे ममोंना पहिल्यांदा त्यांनीच सांगितलं. मग कोर्टा-थ्रू ते करवलं. कार्ती चिदंबरम- एअरसेल-मॅक्सिस डील याचा अजूनही ED तपास करत आहे.
समहाऊ २जी मध्ये भ्रष्टाचार झालाच नाही असं तुम्ही मानता असं मला वाटतय थत्तेचाचा.
नॅशनल हेराल्ड प्रकरण अजून चालू आहे शेवटापर्यंत गेलेले नाही.
बरोबर. पण सोनिया गांधी, राहुल गांधी जामिनावर आहेत बाहेर. प्रायमा फेसी गुन्हा घडला असं कोडतानेच म्हटलं आहे.
>>समहाऊ २जी मध्ये भ्रष्टाचार
>>समहाऊ २जी मध्ये भ्रष्टाचार झालाच नाही असं तुम्ही मानता असं मला वाटतय थत्तेचाचा.
नाही नाही..
भ्रष्टाचार झाला आहे. ठराविक लोकच बिड करू शकतील अशा रीतीने सर्क्युलर काढणे वगैरे प्रायमा फेसी भ्रष्टाचार झाला आहे. त्यावर कारवाईही सुरू आहे.
मी फक्त २जी मध्ये ऑक्शन न केल्यामुळे १.७६ लाख कोटींचा रेव्हेन्यू लॉस झाला आणि तो 'भ्रष्टाचारामुळे' झाला हे मी मानत नाही.
कोर्टाने कंपल्सरी लिलाव केला
कोर्टाने कंपल्सरी लिलाव केला पाहिजे हा निर्णय देणं चूक वाटतच.
ढेरेशास्त्री, ठीक आहे कंपल्सरी लिलाव करणे प्रत्येक वेळी चुक पण असेल. पण तुमच्या कडे दुसरा काही ऑप्शन आहे का?
बरेच निर्णय हे व्यावहारीक पातळीवर टीना फॅक्टर वापरुन च घ्यावे लागतात.
समजा लिलावांना असे कंपल्शन केले नाहीतर मग सर्वच गोंधळाचे होईल. भ्रष्टाचाराला राजमार्गच मिळेल. तो गोंधळ, अनिशिचितता आणि क्रोनी भांडवलशाही वाढण्यापेक्षा न्यायालयाचा निकाल जास्त योग्य वाटतो.
फश्ट-कम-फश्ट-सर्व असच दिलं
फश्ट-कम-फश्ट-सर्व असच दिलं होतं बहुधा. पण भ्रष्टाचारदेखील झालेला नव्हता.
कैच्या कै. काही महानजनांनी तुफान मजा मारली होती तेंव्हा. आरोप पण झाले होते. एस्सार वगैरे लोक जोरात असण्याचा काळ होता तो. युपीए च्या लोकांनी त्या महानजनांकडुनच शिकुन घेतले होते स्पेक्ट्रम चा वापर कसा करायचा ते.
तुमच्या अंतर्मनाला काय वाटते
तुमच्या अंतर्मनाला काय वाटते ढेरेशास्त्री की अश्या अॅडहॉक फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हड ( हे फर्स्ट कम कोण वगैरे सरकारच ठरवणार ) गोष्टीत जिथे हजारो कोटी गुंतलेले आहेत आणि महानजनांसारखा माणुस त्या खात्याचा मंत्री आहे, तिथे प्रचंड प्रमाणावर भ्रस्।टाचार झाला नसेल?
त्यावेळी विदेश संचार निगम
त्यावेळी विदेश संचार निगम लिमिटेड ही कंपनी टाटांना १२०० कोटीमध्ये कशी विकली म्हणून ठाकर्यांनी आवाज केला असे आठवते.
अर्थात "टाटां"शी व्यवहार केला म्हणजे तो बाय डिफॉल्ट पारदर्शक आणि प्रामाणिक असणारच.
--------------------------
शिवाय तेव्हाचे प्रायवेट टेलिकॉमवाले तगून रहावेत म्हणून एमटीएनएल आणि बीएसएनएलचे कॉलदर वाढवले होते तीन मिनिटांना एक रुपया या दरावरून एक मिनिटाला १ रु २० पैसे एवढे दर वाढवण्यात आले. त्यावेळी सरकारी टेलिकॉम कंपन्यांची सर्व्हिस अत्यंत गचाळ असती तरी हा प्राइस डिफरन्शिअल खाजगी टेलिकॉम कंपन्यांना मारक झाला असता म्हणून सरकारी कंपन्यांचे दर खाजगी कंपन्यांशी अॅट पार आणले गेले.
VSNL बद्दल शौरींवर अनेक आरोप
VSNL बद्दल शौरींवर अनेक आरोप झाले. काहीही बेसिस निघाला नाही.
शिवाय तेव्हाचे प्रायवेट टेलिकॉमवाले तगून रहावेत म्हणून एमटीएनएल आणि बीएसएनएलचे कॉलदर वाढवले होते तीन मिनिटांना एक रुपया या दरावरून एक मिनिटाला १ रु २० पैसे एवढे दर वाढवण्यात आले. त्यावेळी सरकारी टेलिकॉम कंपन्यांची सर्व्हिस अत्यंत गचाळ असती तरी हा प्राइस डिफरन्शिअल खाजगी टेलिकॉम कंपन्यांना मारक झाला असता म्हणून सरकारी कंपन्यांचे दर खाजगी कंपन्यांशी अॅट पार आणले गेले.
सरकारी कंपन्यांची लॉस बेअरिंग कपॅसिटी खूप असते. ( BSNL २००४ मध्ये ८०० कोट प्रॉफिटमध्ये होता. २०१४मध्ये ८००० कोटी लॉसमध्ये!) प्रायवेट कंपन्यांना त्यांच्याशी स्पर्धा करायला लावणं अन्यायकारक आहे. एअर इंडियाला ढिसाळ कारभाराबद्दल ३०००० कोटी रुपये मिळाले सरकारकडून २०११ला.
फायदा कमवायचा असेल तर ठीके.
फायदा कमवायचा असेल तर ठीके. पण फायदा कमावणं हा उद्देश नसलेल्याशी स्पर्धा करणं अवघड नसेल?
दुसरे उदाहरण म्हंजे एका बाजूला सावकारी विळखा म्हणून बोंबलायचं आणि दुसर्या बाजूला हजारो सावकारांना स्पर्धेतून व्यवसायातून बाहेर (इन्क्लुझिव्ह ग्रोथ च्या नावाखाली) ढकलले जाईल याची तजवीज करायची. मुद्दा एकच आहे - एकाला इन्क्लुड करण्यासाठी दुसर्याला एक्सक्लुड करायचं. आणि मग इन्क्लुझिव्ह पॉलिसी म्हणून स्वतःची च पाठ थोपटून घ्यायची.
जुळ्याचं दुखणं
http://timesofindia.indiatimes.com/india/US-support-for-Indias-NSG-bid-…
Talking about the implications of these developments, Janjua cautioned that American policies would ultimately bring Pakistan even closer to China.
वा! ही पाकिस्तानची (Pakistan's National Security Adviser Nasser Janjua) अमेरीकेस धमकी, म्हणायची का?
In an unusual move, China's state media on Tuesday defended Pakistan's nuclear record, saying it was A Q Khan who was responsible for atomic proliferation which was not backed by the government and argued that any exemption to India for NSG entry should also be given to Pakistan.
चायना तर दळभद्री आहेच तेजायला.
.
The campaign for India's membership into the group is seen as carrying the risk of antagonising Pakistan as well as China, which could veto any India's application, the paper said.
आमची फाटलीये म्हणा ना, चायनाच्या नथीतून तीर कशाला? दळभद्री आहे पाकिस्तान.
India seeks to purchase
India seeks to purchase maritime patrol drones from US - Unit cost (२०१३ च्या आकडेवारी नुसार) US$16.9 million
हाहाहा या लेखा खालची कमेंट
हाहाहा या लेखा खालची कमेंट -
Pak will warn US: "give us some drones for free, or I will sleep with China for free"
=)) मेले हसून मेले.
____
मोदी डायनॅमिक आहेत, त्यांच्या प्रायॉरिटीज क्लिअर आहेत. त्यांना एक सॅल्युट.
___
तरी बरं एक डेमोक्रॅटिक राष्ट्राध्यक्ष च भारताला झुकतं माप देतोय. मग हवेत कशाला हे रिपब्लिकन्स ;)
गब्बर सिंग तुम्ही हिलरीलाच मत द्या :)
सोशल मिडिया वरची मज्जा
------------------------
Maharashtra State Commission for Women summons Salman Khan over 'raped woman' remark/a>
NCW कडे समन्स च्या पॉवर्स आहेत. - पण एका वक्तव्यासाठी समन्स बजावणे हे अधिकारांची मर्यादा उल्लंघणे नाही का ?
स्वामींचा विषय निघालाच असताना
स्वामींचा विषय निघालाच असताना हे वाचनात आलं. स्वामींच्या अॅकेडमिक/राजकीय कार्किर्दीचा आढावा.
http://topyaps.com/subramanian-swamy-21-things-indians-dont-know-tough-…
इकोनोमेट्रिका हे जर्नल फार प्रतिष्ठेचं आहे काय?
हो. टॉप चे जर्नल आहे
हो. टॉप चे जर्नल आहे - टॉप ५ मधे आहे असे दिसते.
--
As an advocate of free markets economy, much before Manmohan Singh’s 1991 budget made it fashionable, Swamy’s market friendly views after moving from Harvard to Delhi School of Economics in 1968 were simply too radical and not palatable with Indira Gandhi’s socialist ‘Garibi Hatao’ India slogans.
हे आश्चर्य आहे माझ्यासाठी. मी सुब्बु स्वामीबद्दल हे वाचले नव्हते.
स्वामी प्लॅनिंग कमिशनच्या
स्वामी प्लॅनिंग कमिशनच्या विरोधात होता हे देखील वाचल होतं कुठेतरी.
ह्म्म्म.
बहुतेक फ्री मार्केट वाले प्लॅनिंग कमिशन च्या विरुद्ध असतातच. पण त्या कालात विरोध करणं अत्यंत कठिण होतं. अनेकांना असं निष्कासित केलं गेलं. उदा. बेलिकोथ रघुनाथ शेणॉय.
जगदीश भगवती सुद्धा प्लॅनिंग कमिशन मधे होते. काही काला नंतर वैतागले व अमेरिकेचा रस्ता धरला.
प्रतिक्रिया समाजाचा विरोध
नागपूरः समाजाचा विरोध झुगारून समलैंगिक मुलींचा विवाह
बातमी चांगलीच आहे पण खालील भाग सेक्सिस्ट आहे
परंतु पतीला पार पाडावयाच्या सर्व भूमिका अंकिताने स्वीकारल्या आहेत. ती कामावर जाते आणि मधुराचे भरणपोषण करते.
स्वामींचा विषय निघालाच असताना
स्वामींचा विषय निघाला आहे म्हणून हेसुद्धा आठवलं -
Muslims, Congress and now gays: Subramanian Swamy expands his hit-list
Responding to a tweet by @Skulltalk saying “I have decided to turn gay so that TWO men from my family can serve Bharat Mata”, Mr. Swamy tweeted “You need to go to a hospital. Being gay is a mental disorder.”
5 most controversial statements of BJP leader Subramanian Swamy
“Implement the uniform civil code, make learning of Sanskrit and singing of Vande Mataram mandatory, and declare India a Hindu Rashtra in which non-Hindus can vote only if they proudly acknowledge that their ancestors were Hindus. Rename India Hindustan as a nation of Hindus and those whose ancestors were Hindus.”
Top Ten tweets from Subramanian Swamy that saved India!
Brahmins like Drona taught Arjuna to engage in warfare. I can form a Brahmin force in TN to finish off porkis
—
Subramanian Swamy (@Swamy39) March 24, 2013
हेच बोल्तो. एरवी स्वामींची
हेच बोल्तो. एरवी स्वामींची मतं 'बिगट्री' क्याटेगरीत येतात हे कोणीच नाकारत नाहिये. पण भ्रष्टाचार उघड करण्यात त्यांच्या तोडीचे फार नाहीत. याशिवाय अर्थशास्त्रातला त्यांचा रेस्युमे अत्युच्च दर्जाचा दिसतो आहे. त्यांच्या इतर मतांबरोबर भ्रष्टाचाराची मत/आरोप एकत्र करून बरेच काँग्रेसी त्यांना पूर्णपणे रिडिक्यूल करायचा प्रयत्न करतात. २जीमध्ये एकदा आपटले आहेत. नॅशनल हेराल्डमध्ये देखील आपटायचे चान्सेस आहेत.
रिडिक्युलस?
>> त्यांच्या इतर मतांबरोबर भ्रष्टाचाराची मत/आरोप एकत्र करून बरेच काँग्रेसी त्यांना पूर्णपणे रिडिक्यूल करायचा प्रयत्न करतात. २जीमध्ये एकदा आपटले आहेत. नॅशनल हेराल्डमध्ये देखील आपटायचे चान्सेस आहेत.
काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यावर भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाला तर मला आनंदच होईल हे ह्या निमित्तानं ह्या ठिकाणी जाहीर करतो.
बाकी, स्वामींची जी मतं पटत नाहीत ती निव्वळ रिडिक्युलस आहेत म्हणून दुर्लक्षावी असं आताच्या परिस्थितीमध्ये म्हणायला मी तरी धजत नाही. रघुराम राजनचा काटा काढून झाल्यावर आता त्यांचा रोख जेटलींवर आहे असं म्हटलं जातंय.
तो मुद्दाच नाही
>> अनेकदा एखाद्या गोष्टीतून शांतपणे मागे होणे आत्मसन्मासाठी महत्त्वाचे असते.
ही रघुराम राजन यांची बाजू झाली आणि ती रास्तच म्हणायला हवी. मात्र, इथे मी स्वामींची बाजू पाहतो आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरासारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या व्यक्तीविषयी स्वामी यांच्यासारख्या वाचाळ गृहस्थांना जाहीरपणे व्यक्तिगत गरळ ओकू देणं आणि तरीही त्याबाबत काहीही कृती न करणं ह्या सरकारच्या कृतीचा अर्थच मी असा घेतो : अश्या पद्धतीची गरळ ओकून राजनसारख्या सभ्य आणि आत्मसन्मानी माणसाला मागे व्हायला भाग पाडण्याच्या खेळीतला तो एक भाग होता आणि ही स्ट्रॅटेजी इतर बाबतींतही चालूच राहणार.
वाचाळ पणात राजन पण काही कमी
वाचाळ पणात राजन पण काही कमी नाहीत असे त्यांनी दाखवुन दिले होते गेल्या वर्षात. असहिष्णुता वगैरे मुद्दे काढणे काय किंवा हिटलर वगैरेचे दाखले देणे.
राजन आणि चिदु+ चिरंजीव कार्ती ह्यांच्या बाबतीतले आरोप खरे असण्याची शक्यता कमी नाहीये. रादर चिदु नी लुंगीत काय काय लपवले असेल काहीच सांगता येणार नाही.
तसेही सरकार बदलले की "राष्ट्रीय महत्वाच्या" लोकांनी राजीनामे देऊन नविन सरकारला त्यांची माणसे नेमायला मोकळीक द्यावी असे माझे पूर्वीपासुनचेच म्हणणे आहे.
राष्ट्रीय महत्वाचे म्हणजे माझ्या दृष्टीने सरकारनी थेट आकाशातुन नेमलेले. जसे आरबीआय गव्हर्नर, सेंसॉर बोर्ड वाला, राज्यपाल, एफटीआय वगैरेचे लोक.
+१ स्वामी वाचाळ आहेच पण
+१
स्वामी वाचाळ आहेच पण म्हणून त्याच्या अशा सिरीयस आरोपांकडे डोळेझाक होऊ नये. त्याच्या इतर बाष्कळ बडबडीला खुशाल लाथाडावे.
आता प्रश्न येतो की नक्की काय ऐकायचे आणि काय नाही.
तर माझ्या मते आर्थिक किंवा प्रशासनिक भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बाकी वर दिलेली उघड हास्यास्पद बडबड दुर्लक्षता येते
आशिष नंदी आणि प्रश्न
आशिष नंदी ह्यांची ही मुलाखत वाचली. Smriti Irani would've justified jailing Tagore for his nationalism
ह्यातला टागोरांचा संदर्भ समजला नाही.
शेवटी ते फासिझम आणि विचारधारा मुरलेली नसणं ह्याबद्दल बोलतात. त्यातलं काहीच मला नीटसं समजलं नाही. सुरुवातीला मध्यमवर्ग हा आर्थिक मध्यमवर्ग आहे, तो मूल्याधारित नाही असं म्हणतात (हे विधान समजलं). पण पुढे फासिझम फोफावण्यासाठी मानसिकदृष्ट्या मूलाधार नसलेला मध्यमवर्ग हवा असं म्हणतात. ह्यात विरोधाभास जाणवतो; पण नंदी उगाच काहीही बोलणाऱ्यातले नाहीत. मग मला समजलेलं नाही ते नक्की काय आहे, किंवा गाळलेल्या जागा भरा.
मध्यम वर्ग हा मूल्याधारित
मध्यम वर्ग हा मूल्याधारित नाही
फासिझमच्या प्रसारासाठी मानसिक मूलाधार नसलेला मध्यमवर्ग हवा.
विरोधाभास नाही..... मध्यमवर्ग मूल्याधारित नाही म्हणाजेच फासिझमच्या प्रसारासाठी जसा हवा तसाच आहे.
---------------------------
लेख वाचल्यावरची प्रतिक्रिया..... पुन्हा भारतीत मानस फासिझमच्या प्रसारासाठी अनुकूल नाही असंही ते म्हणतात.
टागोर, भारतीय मध्यमवर्ग आणि फाशिझम
टागोरांचे राष्ट्रवादाबद्दलचे विचार भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या कित्येकांना न पटणारे होते. गांधी-टागोर ह्यांच्यात त्याविषयी मतभेदही झाले होते. थोडक्यात सांगायचं तर गांधींचा मानवतावाद भारतीय (किंवा हिंदू) विचारांच्या मुशीत घडला होता, तर टागोर आधुनिकतावादी मानवतावादी होते. उदा. रामचंद्र गुहांचा हा लेख पाहा. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत अशा पद्धतीचे विचार रुजवले जातात म्हणून टागोरांच्या मते राष्ट्रवाद घातक असतो. उदा. -
“But now, where the spirit of the Western nationalism prevails, the whole people is being taught from boyhood to foster hatreds and ambitions by all kinds of means — by the manufacture of half-truths and untruths in history, by persistent misrepresentation of other races and the culture of unfavourable sentiments towards them, by setting up memorials of events, very often false, which for the sake of humanity should be speedily forgotten, thus continually brewing evil menace towards neighbours and nations other than their own. This is poisoning the very fountainhead of humanity. It is discrediting the ideals, which were born of the lives of men who were our greatest and best. It is holding up gigantic selfishness as the one universal religion for all nations of the world.”
स्वातंत्र्यलढा ज्या पद्धतीनं लढला जात होता त्यालाही टागोरांचा विरोध होता. 'घरे बायरे'सारख्या कादंबऱ्यांमध्येही हे दिसतं. (जो तिला स्वातंत्र्य देऊ इच्छितो असा) सुशिक्षित, उदारमतवादी, समंजस पण बोअर वाटू शकेल असा नवरा की क्रांतिकारी विचारांचा आकर्षक (सेक्सी!) देशभक्त प्रियकर ह्या प्रश्नात अडकलेली त्याची नायिका टागोरांच्या मनातल्या राष्ट्रवादाबद्दलच्या शंकाच दृग्गोचर करते.
>> शेवटी ते फासिझम आणि विचारधारा मुरलेली नसणं ह्याबद्दल बोलतात. त्यातलं काहीच मला नीटसं समजलं नाही. सुरुवातीला मध्यमवर्ग हा आर्थिक मध्यमवर्ग आहे, तो मूल्याधारित नाही असं म्हणतात (हे विधान समजलं). पण पुढे फासिझम फोफावण्यासाठी मानसिकदृष्ट्या मूलाधार नसलेला मध्यमवर्ग हवा असं म्हणतात. ह्यात विरोधाभास जाणवतो; पण नंदी उगाच काहीही बोलणाऱ्यातले नाहीत. मग मला समजलेलं नाही ते नक्की काय आहे, किंवा गाळलेल्या जागा भरा.
ह्यात दोन मुद्दे आहेत :
- कोणत्या विचारधारेला धरून ठेवावं ह्याविषयी गोंधळात असलेला, मुळं घट्ट नसलेला मध्यमवर्ग एका वैचारिक पोकळीत जगत असतो आणि म्हणून त्याला असुरक्षित वाटत असतं. फाशिस्ट विचार ती पोकळी भरून काढू शकतो (निदान तो असा दावा करतो). त्यामुळे आपल्याला जगण्याची दिशा मिळणार आहे असं ह्या मध्यमवर्गाला भासू लागतं आणि तो मोठ्या प्रमाणात ती विचारधारा अंगिकारतो.
- जगण्यासाठी कोणतीही विचारधारा पूर्णपणे अंगिकारायचा धोकाच आपला (भारतीय) मध्यमवर्ग पत्करत नाही. त्याला विचारधारा वरवरची नावापुरतीच हवी असते (मग ती डावी असो की उजवी की आणखी कोणती तरी).
म्हणून आपला मध्यमवर्ग फाशिस्ट विचार नीट रुजण्याला पोषकच नाही.
तांदळाबद्दलचा नवीन इतिहास.
--------
इथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेष्ट
इथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेष्ट आहे हे मला मान्य आहे. फार्मा कंपन्यांच्याकडून लाभाची अपेक्षा असलेला डॉक्टर चुकीची, अनावश्यक औषधे प्रिस्क्राईब करू शकतो. व त्याचे भयानक परिणाम पेशंट च्या आरोग्यावर होऊ शकतात. असे परिणाम की जे पेशंट ला कायमचे जायबंदी करू शकतात.
This is a classic case of demand for governance rising with growing economy.
----
डॉक्टरांना हा चॉईस असायलाच हवा - गब्बर सिंग
हो. हा चॉईस डॉक्टरांना असायला हवा.
खालील प्यारा पहा -
"Physicians should take safety, efficacy of drugs and patients interests first and foremost in their minds while prescribing any drug," says Dr Anoop Misra, Chairman, Fortis C-DOC. According to Dr Misra, though things have improved in past few years because of increasing awareness about the issue, it requires more checks and balances to ensure patient's interest.
डॉक्टर चिरकुटकुमार यांनी झकासफार्माकॉर्प कडून मस्त पैकी जेवण चापले आणि नंतर त्यांच्या अनेक पेशंट ना झकासफार्माकॉर्प ची औषधे प्रिस्क्राईब केली तर तुम्ही त्याला विचारणार की - काय ओ चिरकुटकुमार, औषधे प्रिस्क्राईब करताना तुम्ही पेशंट्स ची सुरक्षितता, औषधांची परिणामकारकता, आणि पेशंट्स चे इंट्रेष्ट्स (उदा. स्वस्तात मस्त औषधे) ही डोळ्यासमोर ठेवली होती का ?
डॉ. चिरकुटकुमार म्हणाले की "हो, ठेवली होती".
आता पेशंट ला फार्मासिस्ट कडे जाऊन त्याच फॉर्म्युल्याचे नॉन ब्रँडेड औषध मागायचा चॉईस आहे ना ?
आता फार्मासिस्ट ला झकासफार्माकॉर्प ची औषधे देण्याचे बंधन नाही. पोपटलालफार्माकॉर्प या कंपनीने त्या फार्मासिस्ट ला जेवण दिले असेल तर तो झकासफार्माकॉर्प ची औषधे न देता त्या ऐवजी पोपटलालफार्माकॉर्प ची परंतु त्याच फॉर्म्युल्याची औषधे देऊ शकतो की नाही ? किंवा जनरिक औषधे (जी स्वस्त आहेत) ती सुद्धा देऊ शकतो. If he (फार्मासिस्ट) wants to retain this new customer-cum-patient then he has every incentive to inform the patient about the availability of substitute/जनरिक drugs which may be cheaper. This will help the patient save some money. Or at least - give the patient multiple options to choose from.
आता तुम्ही म्हणाल की - पेशंट टेन्शन मधे असतो कारण तो आजारी असतो व त्यामुळे त्याच्याकडे अनेक चॉइसेस मधे निर्णय घेण्याइतका समय नसतो वगैरे......
१. डॉक्टरला झकासफार्माकॉर्प
१. डॉक्टरला झकासफार्माकॉर्प प्रमाणे पोपटफार्माकॉर्प सुद्धा पिझ्झा देत असते. आणि तसेच जेवण दोन्ही फार्माकॉर्प फार्मासिस्टला सुद्धा देत असतात. सो कोण लार्ज पिझ्झा देतो आणि स्मॉल देतो यावर पेशंटचे भवितव्य ठरेल.
२. झकास फार्माकॉर्प नेहमी (उदाहरणार्थ) नुसती पॅरॅसिटॅमॉलची गोळी महाग विकत नाही. पॅरॅसिटॅमॉल + क्ष अशी गोळी झकास फार्माकॉर्प विकतो आणि पॅरॅसिटॅमॉल + य अशी गोळी पोपट फार्माकॉर्प विकतो. हे क्ष किंवा य ही फालतूगिरी आहे असं (त्याच झकास आणि पोपट यांनी जेवू घातले नसले तरी) फार्मासिस्ट छातीठोकपणे म्हणू शकेल का?
१. डॉक्टरला झकासफार्माकॉर्प
१. डॉक्टरला झकासफार्माकॉर्प प्रमाणे पोपटफार्माकॉर्प सुद्धा पिझ्झा देत असते. आणि तसेच जेवण दोन्ही फार्माकॉर्प फार्मासिस्टला सुद्धा देत असतात. सो कोण लार्ज पिझ्झा देतो आणि स्मॉल देतो यावर पेशंटचे भवितव्य ठरेल.
बरोबर.
फक्त गृहितक हे की डॉक्टर हा आपल्या रेप्युटेशन चा विचार न करता, स्वतःच्या सदसदविवेकबुद्धीला गहाण ठेवून निर्णय घेईल व पेशंट ही सेकंड ओपिनियन घेणार नाही व फार्मासिस्ट सुद्धा पेशंट्/कस्टमर रिटेन करायचे सोडून, स्वतःच्या सदसदविवेकबुद्धीला गहाण ठेवून निर्णाय घेईल. गृहितकाचा आधार - तो सर्व्हे.
--
२. झकास फार्माकॉर्प नेहमी (उदाहरणार्थ) नुसती पॅरॅसिटॅमॉलची गोळी महाग विकत नाही. पॅरॅसिटॅमॉल + क्ष अशी गोळी झकास फार्माकॉर्प विकतो आणि पॅरॅसिटॅमॉल + य अशी गोळी पोपट फार्माकॉर्प विकतो. हे क्ष किंवा य ही फालतूगिरी आहे असं (त्याच झकास आणि पोपट यांनी जेवू घातले नसले तरी) फार्मासिस्ट छातीठोकपणे म्हणू शकेल का?
प्रश्न - मग कोण छातीठोकपणे म्हणू शकेल ?
उत्तरे - एक निवडा - (१) पेशंट (स्वतःचा निर्णय स्वतः घेणार ?), (२) प्रिस्क्त्राईब करणारा डॉक्टर, (३) सेकंड ओपिनियन देणारा डॉक्टर, (४) पेशंट ने निवडलेला पर्यायी फार्मासिस्ट, (५) सरकार
पेशंट समोर रियलिस्टिक पर्याय काय आहेत ??
हे क्ष किंवा य ही फालतूगिरी आहे असं फार्मासिस्ट छातीठोकपणे ?
पुरेसा अभ्यास केलेला आणि करणारा फार्मासिस्ट हे सहज म्हणू शकेल . क्ष किंवा य हे ऍक्टिव्ह ड्रग असेल तर ते कॉम्बिनेशन रॅशनल आहे की नाही हे सांगता येते . इन-ऍक्टिव्ह मटेरिअल्स घालून त्याने आपल्या औषधाची गुणवत्ता सुधारते असे क्लेम्सही शास्त्रीय पातळीवर तपासून पाहता येतात.
आता फार्मासिस्ट ला
आता फार्मासिस्ट ला झकासफार्माकॉर्प ची औषधे देण्याचे बंधन नाही.
इतके सोप्पे नाही गब्बु. डॉक्टर नी जर झकासफार्माकॉर्प चेच औषध लिहुन दिले असेल तर डॉक्टरच्या परवानगी शिवाय फार्मासिस्ट दुसर्या कंपनीचे औषध देऊ शकत नाही. जर दिले तर डॉक्टर वर जबाबदारी रहात नाही.
आता पेशंट ला फार्मासिस्ट कडे जाऊन त्याच फॉर्म्युल्याचे नॉन ब्रँडेड औषध मागायचा चॉईस आहे ना ?
पेशंट ला चॉइस तर औषध ने घेण्याचा पण आहे. तू तर डॉक्टर काहीही लिहुन देइल, पेशंट नी औषध घेतलेच का असे विचारतो आहेस.
इतके सोप्पे नाही गब्बु.
इतके सोप्पे नाही गब्बु.
माझे ही तेच म्हणणे आहे. इतके सोप्पे नाही ते. क्लिष्ट आहे. अनेक प्लेयर्स आहेत. प्र्त्येकाची साईझ, प्रॉडक्टीव्हिटी, ईर्षा/ग्रीड्/लोभ, बार्गेनिंग पॉवर हे सगळे असल्याने मामला क्लिष्ट होतो.
---
डॉक्टर नी जर झकासफार्माकॉर्प चेच औषध लिहुन दिले असेल तर डॉक्टरच्या परवानगी शिवाय फार्मासिस्ट दुसर्या कंपनीचे औषध देऊ शकत नाही. जर दिले तर डॉक्टर वर जबाबदारी रहात नाही.
मी नुकतेच हे भारतात केलेले आहे. डॉक्टर ने एक लिहून दिले होते. फार्मासिस्ट कडे ते नव्हते. त्याने विचारले दुसर्या कंपनीचे देऊ का ? मी म्हणालो "हो". त्याने दिले.
--
पेशंट ला चॉइस तर औषध ने घेण्याचा पण आहे. तू तर डॉक्टर काहीही लिहुन देइल, पेशंट नी औषध घेतलेच का असे विचारतो आहेस.
नेहमीप्रमाणे अनेक विकल्प असताना "गब्बर हे गृहित धरतोय की एक्स्ट्रीम विकल्पच निवडला जाईल" हा प्रतिवाद.
खरंतर डॉक्टर ला जेवण खिलवणारी एक कंपनी असली तरी ती प्रत्येक डॉक्टर ला खिलवू शकेल असे नाही. तिच्याकडे तेवढे पैसे नसतीलही. तसे असले/नसले तरी - पेशंट अनेकदा सेकंड ओपिनियन घेतोच. त्या सेकंड ओपिनियन वाल्या डॉक्टर ला दुसर्याच कंपनीने जेवण खिलवलेले असू शकते. फार्मासिस्ट चे तेच. पेशंट समोर एकच फार्मासिस्ट असतो का ? की अनेक असतात ? त्यातल्या प्रत्येक फार्मासिस्ट ला तीच कंपनी खिलवत बसली तर कंपनी डब्यात जाईल.
खरंतर यात अनेक (१) फार्मा कंपन्या, (२) अनेक फार्मासिस्ट्स, (३) अनेक डॉक्टर्स असल्यामुळे अनेकांना अनेक विकल्प आहेत. पण फक्त worst-case वर फोकस का ??
मी नुकतेच हे भारतात केलेले
मी नुकतेच हे भारतात केलेले आहे. डॉक्टर ने एक लिहून दिले होते. फार्मासिस्ट कडे ते नव्हते. त्याने विचारले दुसर्या कंपनीचे देऊ का ? मी म्हणालो "हो". त्याने दिले.
म्हणजे जबाबदारी तुझ्यावर आली पूर्णपणे कारण त्यानी तुला विचारले होते आणि तू हो म्हणालास. डॉक्टर पण पूर्ण पणे जबाबदारी मुक्त झाला.
----------------
गब्बु - तुझा हा प्रतिसाद वाचल्यावर तू तुझ्याच आधीच्या प्रतिसादाच्या इनलाइन बोलतो आहेस की नाही हे ही कळेनासे झालय.
म्हणजे जबाबदारी तुझ्यावर आली
म्हणजे जबाबदारी तुझ्यावर आली पूर्णपणे कारण त्यानी तुला विचारले होते आणि तू हो म्हणालास. डॉक्टर पण पूर्ण पणे जबाबदारी मुक्त झाला.
हो.
पण मला असं म्हणायचंय की फार्मासिस्टला असं करता येतं. तो वेगळा ब्रँड ऑफर करू शकतो. Which actually serves the interest of the patient.
-
गब्बु - तुझा हा प्रतिसाद वाचल्यावर तू तुझ्याच आधीच्या प्रतिसादाच्या इनलाइन बोलतो आहेस की नाही हे ही कळेनासे झालय.
माझा वरील प्रतिसाद हा पहिल्या प्रतिसादाचे एक्सपान्शन आहे.
कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेष्ट आहे म्हंजे लगेच सरकारने गव्हरनन्स मधे घुसावे व हस्तक्षेप करावा असं नाही - हा माझा अंडरटोन आहे. In other words - competition between multiple players acts as an excellent governance mechanism. (We just do not want to acknowledge that. Because we frown upon competition. We think competition is exploitative and immoral.). Besides government intervention could be expensive too.



चांगला निर्णय
राजन यांच्या गच्छंतीनंतर सारवासारव करण्यासाठी घेतलेला वाटतोय पण निर्णय आवडला.
अवांतरः राजन यांच्या निर्णयामागची पार्श्वभूमी सांगणारी ही बातमी.
http://indianexpress.com/article/business/economy/raghuram-rajan-felt-u…