शाळेत धर्माधारित शिक्षण, धर्मशिक्षण, इ.
सरस्वति शिशू विद्यालय या
सरस्वति शिशू विद्यालय या नावाने संघ चालवतो शाळा. आसाममध्ये दोन महिन्यापूर्वी या शाळेत शिकणार्या एका मुस्लिम मुलाने बोर्डात पहिला नंबर मिळवला अशी बातमी वाचली होती.
हे सोडून एकल विद्यालय या नावाने दुर्गम भागात शाळा चालवल्या जातात. हे चालवणारे देखील संघ परिवारातले आहेत. एक-शाळा, एक शिक्षक असं याचं मॉडेल असतं.
अधिक माहिती: https://en.wikipedia.org/wiki/Ekal_Vidyalaya
माझे या चर्चेशी समांतर मत
माझे या चर्चेशी समांतर मत (मूड आला म्हणून) देतोयः
शाळांचा कारभार धर्मनिरपेक्ष असावा, मात्र शाळा निधर्मी असू नये.
विद्यार्थ्यांना धर्मापासून तोडून अलिप्त वाढवता येणार नाही, धर्म हे सत्य आहे ते मुलांना शाळेबाहेर सर्वत्र दिसते-भिडते आहे. फक्त शाळेत मुद्दाम त्याचे अस्तित्त्व निधर्मांधतेने पुसल्याने उलट धर्माबद्द्लचे कुतूहल वाढेल - व मग अनेक सांगोवागीतून धार्मिक अस्मिता घडतील अशी शक्यता प्रबळ वाटते.
लैंगिक व्यवहाराची ओळख असो वा धर्माची ओळख असो योग्य जाणकार व्यक्तीने समष्टीचे भान ठेवत समजावणे हे लपवून ठेवण्यापेक्षा किंवा टाळण्यापेक्षा कधिही श्रेयस्कर!
>>धर्माची ओळख असो योग्य
>>धर्माची ओळख असो योग्य जाणकार व्यक्तीने समष्टीचे भान ठेवत समजावणे हे लपवून ठेवण्यापेक्षा किंवा टाळण्यापेक्षा कधिही श्रेयस्कर!
धर्माची ओळख करून देणे म्हणजे काय?
माझे असे निरीक्षण आहे की शाळेतील हुशार मुले आज इतिहास/नागरिकशास्त्र या विषयांचा अभ्यास (शाळेत असेपर्यंत) नाइलाज म्हणून करतात. मोस्टली कशाला ही कटकट? आम्हाला तर डॉक्टर इंजिनिअर व्हायचंय !! असा अॅटिट्यूड असतो (माझाही होता. मी हुशार असल्याचा कोणताही दावा इथे केलेला नाही ;) ).
धर्मशिक्षणाचेही तसेच होईल. तसेही शाळांमधून धार्मिक म्हणावे असे शिक्षण पूर्वीही दिले जात होते आजही दिले जाते. अर्थात ते अभ्यासक्रमाचा भाग नसते. पण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते दिले जातेच. उदा. श्रावणी शुक्रवार साजरा करणे, रामरक्षा पाठांतराच्या स्पर्धा भरवणे वगैरे.
धार्मिक शिक्षण म्हणजे काय द्यायचे हा प्रश्न पडला आहे
धार्मिक शिक्षण म्हणजे काय द्यायचे हा प्रश्न मलाही पडला आहे. आता करमणुकीची इतर निरुपद्रवी साधने उपलब्ध झाली आहेत. इंटरनेटवर पॉर्न उपलब्ध आहे. (ऐसीचाही पॉर्न विशेषांक आलाय). मग धार्मिक शिक्षण देण्याचा विशेष फायदा दिसत नाही. हिंदू धर्माच्या बाबतीत बायकोला सोडून देणारा राम हा आदर्श पुरुष की खलनायक हे कसं स्पष्ट करणार? शालेय मुलांना नारदमुनींच्या किंवा दत्तजन्माची हकीकत विस्ताराने सांगणार का? ख्रिश्चन धर्मात व्हर्जिन मेरीला बाळ कसं झालं हे सांगताना जीवशास्त्रीय संकल्पनांचा गोंधळ उडणार नाही का? मुसलमानांमध्ये तर अनेक मागास गोष्टी निव्वळ धार्मिक म्हणून चालवून घेत आहेत.
धार्मिक शिक्षण म्हणजे एखाद्या
धार्मिक शिक्षण म्हणजे एखाद्या धर्माचे शिक्षण नव्हे. तटस्थेतेने धर्माबद्दलचे शिक्षण असे मला म्हणायचे आहे.
शाळेत गीता किंवा बायबल किंवा कुराण शिकवू नये पण या व इतरही धर्मांचा इतिहास, त्याचा समजमनावर व एकुणच सामाजिक चालीरितींवर असलेला पगडा, त्यातून सामाजिक शास्त्रांच्या वेगवेगळ्या शाखांवर होणारे परिणाम, त्या त्या धर्मात काही बंद पडलेल्या तर काही नव्या सुरू झालेल्या चालीरीती यांची तटस्थपणे परंतू सत्याधारित माहिती मुलांना मिळावी असे वाटते.
यासाठी धर्मशिक्षणाचा तास नसावा किंवा त्याचा ठोस अभ्यासक्रम शालेय पातळीवर नसावा. मात्र शिक्षकांबरोबर ऑफ पिरीएडच्या गप्पांतून, (किंव काहि शाळांमध्ये गप्पांचीच तासिका असते त्यात) या व अशासारख्या विषयावर मुलांशी खुलेपणाने संवाद हवा.
सण साजरे करणे हा ही धर्मांबद्दल माहिती देण्याचा चांगला मार्ग आहे. गॅदरिंगला बसवण्यात येणार्या नाटिकांतूनही याबद्दल भाष्य केले जाऊ शकते.
मात्र शाळा म्हटली की तिथे धर्माचे काय काम? असा जो निधर्मांध अॅटिट्युड दिसू लागला आहे तो मला गैर वाटतो.
>>या व इतरही धर्मांचा इतिहास,
>>या व इतरही धर्मांचा इतिहास, त्याचा समजमनावर व एकुणच सामाजिक चालीरितींवर असलेला पगडा, त्यातून सामाजिक शास्त्रांच्या वेगवेगळ्या शाखांवर होणारे परिणाम, त्या त्या धर्मात काही बंद पडलेल्या तर काही नव्या सुरू झालेल्या चालीरीती यांची तटस्थपणे परंतू सत्याधारित माहिती मुलांना मिळावी असे वाटते.
हे सर्व शिकवण्याचे/सांगण्याचे कॅलिबर असणारे शिक्षक (आणि हे जाणण्याची इच्छा असलेले विध्यार्थी) उपलब्ध असतील असे वाटत नाही. शिवाय शालेय मुलांसाठी ते काहीसे जड होईल. शिवाय 'सत्याधारित' हा फारच लोडेड प्रकार असेल.
>>मात्र शाळा म्हटली की तिथे धर्माचे काय काम? असा जो निधर्मांध अॅटिट्युड दिसू लागला आहे तो मला गैर वाटतो.
अशी माझ्यासारख्यांची इच्छा असू शकेल पण ते प्रत्यक्षात कुठे येत आहे असे वाटत नाही.
शिवाय 'सत्याधारित' हा फारच
शिवाय 'सत्याधारित' हा फारच लोडेड प्रकार असेल
:) खरे आहे. पण बाहेर मुलांना (आम्ही लहान असताना आम्हालाही ) इतकी उलटसुलट माहिती समजायची की एखाद्या धर्माबद्दल 'घाउक' अढि/राग वगैरे बसणे सहज शक्य होते.
अर्थात तुम्ही म्हणता तसे कॅलिबर असणारे शिक्षक मिळणे वगैरे चॅलेंजेस असतील हे मान्यच. पण म्हणून निधर्मी पोकळीत मुलांना वाढवावे असे वाटत नाही. असो थांबतो कारण हे एक सहज असलेले मत होते. याबद्दल फार सांगण्यासारखे माझ्याकडे नाही नि ही मते तितकी क्रिस्टलाईज्डही नाहित.
नुसता श्रावणी शुक्रवारच नाही
नुसता श्रावणी शुक्रवारच नाही तर कित्येक शाळांत (नागपंचमीची किंवा इतरही कार्य असता काढलेली) मेंदी नको, हातात बांगड्या नकोत, टिकली नको असे प्रकार ऐकण्यात वाढ झाली आहे. मला ते अतिरेकी वाटते.
एका परिचितांछ्या शाळेत नाचाच्या वेळी डान्स स्टेपमध्ये नमस्कार होता, त्यावर एका पालकांनी ऑब्जेक्शन घेतले म्हणे! हद्द आहे!
सर्वसाधारण शाळा
सर्वसाधारण शाळांमध्येसुद्धा हे नियम बर्याच काळापासून आहेत. केस कसे असावे, बांधावे याचेसुद्धा नियम आहेत. लांब असतील तर दोन वेण्या आणि वेण्यांची टोके वर बांधलेली. नाहीतर सरळ तोकडे केस. तेही व्यवस्थित पिन केलेले. मुलांमुलींनी नट्टापट्टा करू नये असा या मागचा उद्देश. नखेसुद्धा रंगवायची नसतात. पैंजण बांगड्या ही काही लहान मुलांसाठी धार्मिक चिह्ने नाहीत. ते दागिने या प्रकारात मोडतात. कॉलेजमध्येसुद्धा मोकळीक असूनही फारशा कुणी मुली बांगड्या घालीत नाहीत. एखादे नाजुकसे ब्रेसलेट किंवा कडे असते स्टाइल म्हणून आणि नटण्यासजण्याचा प्रकार म्हणून. त्यात धार्मिक भावना मुळीच नसते. मेंदी निदान महाराष्ट्रात तरी धार्मिक नाही. वाढदिवस, बारसे, गेट-टुगेदर, डोहाळजेवण यासारख्या कोणत्याही प्रसंगी हौस म्हणून मेंदी लावतात. तोही नटण्यामुरडण्याचाच प्रकार आहे. विद्यार्थ्याची राहाणी साधी, पण स्वच्छ आणि शिस्तीची असावी हा मूळ हेतू या नियमांमागे असणार.
मुलांनी नटू नये हे ही पटत
मुलांनी नटू नये हे ही पटत नाही. पण असो. समाजवादी काळात याला काहितरी शासकीय विचार तरी असावा असे मानण्यास जागा आहे.
आता भारत सर्वात "खुला" भांडवलशाही देश झाल्यावर मनाजोगते नटणे हा दुर्गूण/टाळाअवा असा गुण ठरू नये असे वाटते.
जबरदस्तीने नटले नाही की रहाणी साधी होईल हा आशावाद फारच .. असो.
होय असा तर्क असावा पुर्वी.
होय असा तर्क असावा पुर्वी. आता तसंही जवळजवळ प्रत्येक शाळेत फक्त काही वारच गणवेशाचे ठरलेले असतात.
आता अशाही शाळा आहेत ज्या हजारो रुपयांचे बुट (अमुक तमुक ब्रँडसकट - पुण्यातील दोन शाळांमध्ये आदिदासचेच शुज अनिवार्य आहेत) अनिवार्य करतात मात्र दुसरीकडे ही अशी बंधने आणतात तेव्हा या मागे साधी रहाणी आहे किंवा तुम्ही म्हणता तशी कारणे आहेत हे पटणे जड जाते.
निधर्मी शिक्षणव्यवस्था
>> धार्मिक शिक्षण म्हणजे एखाद्या धर्माचे शिक्षण नव्हे. तटस्थेतेने धर्माबद्दलचे शिक्षण असे मला म्हणायचे आहे.
शाळेत गीता किंवा बायबल किंवा कुराण शिकवू नये पण या व इतरही धर्मांचा इतिहास, त्याचा समजमनावर व एकुणच सामाजिक चालीरितींवर असलेला पगडा, त्यातून सामाजिक शास्त्रांच्या वेगवेगळ्या शाखांवर होणारे परिणाम, त्या त्या धर्मात काही बंद पडलेल्या तर काही नव्या सुरू झालेल्या चालीरीती यांची तटस्थपणे परंतू सत्याधारित माहिती मुलांना मिळावी असे वाटते.यासाठी धर्मशिक्षणाचा तास नसावा किंवा त्याचा ठोस अभ्यासक्रम शालेय पातळीवर नसावा. मात्र शिक्षकांबरोबर ऑफ पिरीएडच्या गप्पांतून, (किंव काहि शाळांमध्ये गप्पांचीच तासिका असते त्यात) या व अशासारख्या विषयावर मुलांशी खुलेपणाने संवाद हवा.
[...]मात्र शाळा म्हटली की तिथे धर्माचे काय काम? असा जो निधर्मांध अॅटिट्युड दिसू लागला आहे तो मला गैर वाटतो.
ही चर्चा ताजी असतानाच त्या संदर्भात पुन्हा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. तुम्ही म्हणता तशी 'तथ्याधारित' धर्मांविषयीची शिकवणी टोकाच्या निधर्मी फ्रान्समध्येसुद्धा असते. इतिहास, तत्त्वज्ञान आणि साहित्यादि मानव्यशाखांमध्ये पार इजिप्त वगैरे काळांपासूनच्या विविध धर्मांविषयीची माहिती सरकारी अभ्यासक्रमात अंतर्भूत आहे. इथल्या निधर्मींनाही त्याविषयी अडचण नसावी. कोणत्याही एका धर्माच्या बाजूनं मात्र शिक्षकानं बोलू नये असा नियम असतो.
ही माहिती सध्या मिळत असावी
निदान आम्हाला तरी अभ्यासक्रमात मुस्लीम, ख्रिश्चन, हिंदू धर्मातील विविध पंथ व त्यांचे संस्थापक (गुरुनानक, महावीर, बसवेश्वर) इ. चा इतिहास, वेगवेगळ्या धर्मांतील प्रथांची माफक ओळख (उदा. शीख व्यक्तीने क नावाच्या पाच वस्तू बाळगाव्यात किंवा गुरुनानक ते गुरु गोविंदसिंग यांच्या पर्यंत शीख धर्माचा कसा प्रसार झाला), ही सगळं होतंच की. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास यांच्या कविता होत्या, ख्रिस्तपुराण नावाचंही काहीतरी होतं. हे सगळं महाराष्ट्र सरकारच्या बालभारती अभ्यासक्रमात होतं. बाळ सप्रे यांनी हे आधीच लिहिलंय.
आता यापेक्षा वेगळं काही सांगायचं म्हटलं तर निधर्मांधांपेक्षा धर्मांधांचाच जास्त अडसर आहे. प्रत्येकाची धर्माची व्याख्या ही ओपन टू इंटरप्रिटेशन आहे. त्यामुळं सत्याधारित काय यावरच वेगवेगळ्या धर्मांधांच्या भावना दुखावण्याची साथ येणार. उदा. एखाद्या शिक्षकाने (सद्यपरिस्थितीत स्वतःच्या जिवाची पर्वा न बाळगता) समजा खुलेपणाने शंबूकाची कथा सांगितली तर कुणाच्या शेंड्या जळणार? तिथं शाळेला निधर्मांधांचा त्रास होईल की धर्मांधांचा?
निव्वळ शाळेबाहेर सर्वत्र दिसते म्हणून ती गोष्ट शाळेत शिकवण्याइतकी महत्त्वाची आहे असे नाही. आता चौकाचौकात शिवीगाळ करणारे तरुण दिसतात, मग मराठी भाषेतील असभ्य म्हणी व वाक्प्रचार हेही अभ्यासक्रमात लावावे का? तर नाही. धर्माची जितपत ओळख आवश्यक आहे ती बहुतेक ठिकाणी होतेच आहे. जिथंजिथं धर्माची ओळख महत्त्वाची मानून धार्मिक शाळा काढल्यात तिथं धर्मानं काय उच्छाद मांडलाय हे रोज पेपरात कळतेच. मुळात धर्माची उपयुक्तता संपत चालली आहे. पूर्वीच्या काळी करमणुकीचे महत्त्वाचे साधन असलेला धर्म आता उपद्रवकारक झाल्याने त्याचे अस्तित्व नाममात्र होणे अतिशय महत्त्वाचे आहे.
हम्म
आता यापेक्षा वेगळं काही सांगायचं म्हटलं तर निधर्मांधांपेक्षा धर्मांधांचाच जास्त अडसर आहे. प्रत्येकाची धर्माची व्याख्या ही ओपन टू इंटरप्रिटेशन आहे. त्यामुळं सत्याधारित काय यावरच वेगवेगळ्या धर्मांधांच्या भावना दुखावण्याची साथ येणार. उदा. एखाद्या शिक्षकाने (सद्यपरिस्थितीत स्वतःच्या जिवाची पर्वा न बाळगता) समजा खुलेपणाने शंबूकाची कथा सांगितली तर कुणाच्या शेंड्या जळणार? तिथं शाळेला निधर्मांधांचा त्रास होईल की धर्मांधांचा?
शंबूकाची प्रक्षिप्त कथाच सापडते वाट्टं रामायणात सांगायला. चान चान.
(आता उगा पांघरूण घालायला म्हणून प्रक्षिप्त म्हणतो इ.इ. आक्षेपांना उत्तर इतकेच की रामायण जाऊन वाचा. राम राज्यावर बसल्यानंतर सरळ फलश्रुती येते पुढे. फलश्रुती झाल्यावर पुढे उत्तरकांड जोडायचा संबंधच नव्हता काही. नंतर काही चोरांनी ते जोडलेय.)
एक उदाहरण दिले.
शंबूकाचीच कथा सांगा असं नाही काही. एक उदाहरण दिले. आता वामनाची आणि बळीराजाची कथा सांगायची म्हटली तर ती कथाही कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे आणि तो इतिहास/धर्म अामचा नाही असं ब्रिगेडींचं म्हणणं आहे. त्यांना न्यायप्रिय बळीराजावर विष्णूने अन्याय केले असं वाटतं. मग कोणती कथा सांगणार ब्वॉ? का गणपतीचं नाव हे प्रथमेश नसून प्रमथेश आहे, तो विघ्नकर्ता आहे आणि टपोरी गणांची ग्यांग करुन इतरांना छळत होता. (थोडक्यात आताची गणपती मंडळे जो वारसा चालवतात तोच). हे विस्ताराने सांगितलं तर चालेल का? थोडक्यात सत्याधारित धर्म म्हणजे आमचाच धर्म असं प्रत्येकाला वाटतंय आणि त्यामुळंच आता सर्वत्र उलथापालथ सुरु आहे.
अामचं सोडा. धार्मिक शिक्षण म्हणजे वेगळं काय द्यायचं हे सांगा. वेगवेगळ्या धर्मांचे संस्थापक, त्यांचा माफक इतिहास, सर्व धर्मांनी शांततेचा संदेश दिलाय वगैरे पुड्या आजकाल ऑलरेडी सोडल्या जातातच. त्यापेक्षा आणखी विस्ताराने सांगितलेलं धर्मांधांना पटेल का?
आता वामनाची आणि बळीराजाची कथा
आता वामनाची आणि बळीराजाची कथा सांगायची म्हटली तर ती कथाही कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे आणि तो इतिहास/धर्म अामचा नाही असं ब्रिगेडींचं म्हणणं आहे. त्यांना न्यायप्रिय बळीराजावर विष्णूने अन्याय केले असं वाटतं. मग कोणती कथा सांगणार ब्वॉ?
हॅ हॅ हॅ. ब्राह्मण पुरुषांना ठार मारून त्यांच्या स्त्रिया बहुजनांनी आपसांत वाटून घ्यावा वगैरे म्हणणारे ब्रिगेडी ते. त्यांना भाव देणे हे उदाहरणार्थ रोचक वगैरे वाटले.
बाकी ब्रिगेडी आणि संघी सोडूनही जग असते. केरळात ओणम हा सण म्हणजे बळीराजाचाच इंतजार केला जातो. सो अल्टरनेट व्हर्जन आलरेडी अस्तित्वात आहे आणि अलाईव्ह आणि किकिंग आहे.
अामचं सोडा. धार्मिक शिक्षण म्हणजे वेगळं काय द्यायचं हे सांगा. वेगवेगळ्या धर्मांचे संस्थापक, त्यांचा माफक इतिहास, सर्व धर्मांनी शांततेचा संदेश दिलाय वगैरे पुड्या आजकाल ऑलरेडी सोडल्या जातातच.
धार्मिक शिक्षण खूप वेगळेपणी द्यावे वगैरे म्हणणे नाही. पण पुड्या म्हणजे काय हो नक्की? धर्म ही अफूची गोळी आहे म्हणणार्या दाढीवाल्याच्या अनुयायांनी त्याचा वारसा चालवताना जे धंदे केलेत ते पहायचे होतेत जरा.
त्यापेक्षा आणखी विस्ताराने सांगितलेलं धर्मांधांना पटेल का?
जातीव्यवस्था सतीप्रथा वगैरे आलरेडी असतेच सिल्याबसात. पण गोवा इन्क्विझिशन आणि तत्सम शांततामय बाबी नसतात. त्यामुळे "आणखी विस्ताराने" म्हणजे मुद्दाम हिंदूधर्मप्रेमी लोक चिडतील असे, कुणाच्या खिजगणतीतही नसलेले उल्लेख उकरून काढून "हा बघा तुमचा धर्म" छाप सांगायचे आहे की अजून कसे?
हात्तिच्या हाच मुद्दा होता
हात्तिच्या हाच मुद्दा होता होय!
मग आधीच म्हटलंय की वर
यासाठी धर्मशिक्षणाचा तास नसावा किंवा त्याचा ठोस अभ्यासक्रम शालेय पातळीवर नसावा. मात्र शिक्षकांबरोबर ऑफ पिरीएडच्या गप्पांतून, (किंव काहि शाळांमध्ये गप्पांचीच तासिका असते त्यात) या व अशासारख्या विषयावर मुलांशी खुलेपणाने संवाद हवा.
धर्म ही गोष्ट मुद्दाम लपवण्यासारखी नाही किंवा टाळण्यासारखी नाही इतकेच म्हणणे आहे. त्यावर तास तास प्रवचन झोडावे असे नाही!
Religion and Economic Growth
Robert J. Barro & Rachel M. McCleary (May 2003)
Abstract:
Empirical research on the determinants of economic growth has typically neglected the influence of religion. To fill this gap, we use international survey data on religiosity for a broad panel of countries to investigate the effects of church attendance and religious beliefs on economic growth. To isolate the direction of causation from religiosity to economic performance, we use instrumental variables suggested by our analysis of systems in which church attendance and beliefs are the dependent variables. The instruments are dummy variables for the presence of state religion and for regulation of the religion market, an indicator of religious pluralism, and the composition of religions. We find that economic growth responds positively to the extent of religious beliefs, notably those in hell and heaven, but negatively to church attendance. That is, growth depends on the extent of believing relative to belonging. These results accord with a perspective in which religious beliefs influence individual traits that enhance economic performance. The beliefs are, in turn, the principal output of the religion sector, and church attendance measures the inputs to this sector. Hence, for given beliefs, more church attendance signifies more resources used up by the religion sector.
यावरून मी निष्कर्ष असा काढतो की - (व्यवस्थेसाठी व व्यवस्थेतील लोकांसाठी) धर्माची युटिलिटी शून्य नसते. पॉझिटिव्ह असते.
पण मग त्या शांतताप्रिय
पण मग त्या शांतताप्रिय धर्माबद्दलही असेच म्हणता यावे काय?
अर्थातच. तो शांतताप्रिय धर्म हा परफेक्ट च असल्यामुळे त्या धर्माच्या प्रभावाखालील क्षेत्रांमधे आर्थिक ग्रोथ ही प्रतिवर्षी २५% असते.
काय राव ?? तुमच्यासारख्या जंटल्मन लोकान्ला यवडं शिंपल म्हायती नाय ??
आई ग्गं हसवुन ठार मारु नकोस
आई ग्गं हसवुन ठार मारु नकोस रे बॅट्या :) =))
वटवृक्षाच्या????? - इतकी जाडी नाहीये मी बॅट्या :( त्यादिवशी पुण्यात आडव्या रेघांचा टी-शर्ट घालायला नको होता = अन्य कोणतातरी घालायला हवा होता :)
हो अनर्थ नको. =))
असो तर मी जाडी नाही :( :(
____
संभाव्य आक्षेप - गप्पांसाठी मालकांनी दमड्या खर्चून उपलब्ध करुन दिलेल्या खरडफळ्याच्या सुविधेचा उपयोग करावा ;)
Religion and Economic Growth- Robert J. Barro & Rachel M. McClea
Religion and Economic Growth- Robert J. Barro & Rachel M. McCleary (May 2003)
कोणी रोचक दिलीये श्रेणी काय माहीत. का लोक बाय डिफॉल्ट लेख न वाचता श्रेणी देतात? देवच जाणे.
____
डोकं तासूनही गब्बर सिंग यांनी काढलेल्या निष्कर्षाचे त्या लेखाबरोबरचे को-रिलेशन समजले नाही. लेखाप्रमाणे - धर्मस्थळातमध्ये लोक जास्त गेले = इकॉनॉमिक ग्रोथ वाढली असे असेलच असे नाही.
परंतु स्वर्ग/नरक यावर जितकी श्रद्धा त्या प्रमाणात इकॉनॉमिक ग्रोथ वाढते हे मात्र खरे आहे.
.
मग त्या प्रकाशात, "(व्यवस्थेसाठी व व्यवस्थेतील लोकांसाठी) धर्माची युटिलिटी शून्य नसते. पॉझिटिव्ह असते." हे वाक्य काय आहे हेच समजले नाही. स्पष्टीकरण तर द्यायची सवयच नाही आपल्याला ;) मग लोकांना कळणार कसे. मग आहेच बाय डिफॉल्ट काही लोक सकारात्मक श्रेण्या देत सुटलेत बाकीचे दुर्लक्ष करतायत.
______
बरं खालती बॅटमन म्हणतायत की मुस्लिम धर्मामध्ये श्रद्धेचे प्रमाण अधिक आहे = त्या त्या देशाचा इकॉनॉमिक वाढीचा आलेख वाढता आहे - असे कुठे दिसते?
जे की लॉजिकल आहे.
पण त्यावर खंडन तर नाहीच उलट तबला-मांड्या खाजवणे आदि विनोद. अन बॅट्याही , प्रतिवादाची अपेक्षा सोडून, ते विनोद एन्जॉय करतायत.
.
का मलाच कळत नाहीये काय चाललय ते?
गतघटनांची ओळख
मला वाटते गोवा इन्क्विज़िशन विषयी धावती (त्रोटक) माहिती (महाराष्ट्र आणि गोव्याच्या) इतिहासाच्या शालेय पुस्तकांत असते. असली पाहिजे. (अर्थात अलीकडची इतिहासाची पुस्तके वाचलेली नाहीत.) निदान युरोपातल्या धर्मसंस्थेच्या इतिहासाची काळी बाजू शालेय अभ्यासक्रमातच प्रथम कळली हे नक्की आठवतेय. पण शालेय अभ्यासक्रमात लेण्याद्री हा बुद्धविहार आहे किंवा आज अनेक ठिकाणी बौद्ध स्तूप/ विहार हे शिवलिंग आणि शिवमंदिरे म्हणून पुजले जातात हे नव्हते. जशी हिंदूंच्या देवदेवळांची मुसलमान आणि क्रिस्टियनांकडून झालेली तोडफोडही नव्हती. पण ह्या गोष्टी उघड आहेत. त्यावर विस्तृत टिप्पण्या शालेय अभ्यासक्रमात आवश्यक नाहीत असे माझे मत आहे. जगाच्या उद्या लिहिल्या जाणार्या प्राचीन इतिहासात बामियाँ बुद्धमूर्तींची तोडफोड येणारच. त्याशिवाय इतिहास पुढे सरकू शकत नाही. पण मुद्दाम, आणि इस्लामी दहशतवादाचा संदर्भ नसताना मध्येच अशी प्रकरणे घुसवणे हे योग्य नाही. योग्य त्या कॉन्टेक्स्टमध्ये हे उल्लेख येतच असतात. मध्ययुगीन भारताच्या आर्ट आणि आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमातून समजा इस्लामी आर्ट आणि आर्किटेक्चर हे फार मोठे वास्तव वगळले गेले तर ते हेतुपुरःसर केल्यासारखे होईल. अशी हेतुपु:सरता सगळीकडेच टाळावी. किंवा कुषाण कनिष्काचा काळ हे गुप्तांच्या आधीचे एक जवळजवळ सुवर्णयुग होते हे वगळून कुषाण काळाची थोडक्यात बोळवण केल्यास ती हेतुपुरःसर ठरेल. योग्य ती जागा आणि योग्य ते वजन सगळ्या महत्त्वाच्या घटनांना मिळेल तर ती खरी तटस्थता ठरेल.
शालेय अभ्यासक्रमात लेण्याद्री
शालेय अभ्यासक्रमात लेण्याद्री हा बुद्धविहार आहे किंवा आज अनेक ठिकाणी बौद्ध स्तूप/ विहार हे शिवलिंग आणि शिवमंदिरे म्हणून पुजले जातात हे नव्हते. जशी हिंदूंच्या देवदेवळांची मुसलमान आणि क्रिस्टियनांकडून झालेली तोडफोडही नव्हती. पण ह्या गोष्टी उघड आहेत. त्यावर विस्तृत टिप्पण्या शालेय अभ्यासक्रमात आवश्यक नाहीत असे माझे मत आहे.
युरोपातल्या धर्मसंस्थेच्या काळ्या बाजूवर टिप्पणी चालते तर यावर का नाही? आयमीन, टिप्पणी अनावश्यक आहे असे तुम्हांला वाटते. पण तुमच्यासारखे किती लोक आहेत? बहुतेकांना शष्प काही माहिती नसते. त्यांच्यासाठी ते आवश्यकच आहे. धर्मसंस्थेची काळी बाजू सुदूर युरोपमध्ये काहीतरी एग्झॉटिक असल्यागत शिकवायची आणि घरचे मात्र इग्नोरायचे यामुळे घरचीच ओळख नीट होत नाही.
हेतुपुरःसरता टाळावी पण मग ते सगळीकडे असावे. मध्ययुगीन काळातला धार्मिक नंगानाच ग्लॉस ओव्हर न केला तर लोकांची माथी भडकतील असे उगीचच वाटत असावे. त्याला कै अर्थ नाही.
युरोपमध्ये एग्झॉटिक?
नाही नाही. युरोपमधले एक्झॉटिक म्हणून नव्हे तर या इन्क्विज़िशनमधून रनाय्सान्स अवतरले ही एक युरोपच्या आणि जगाच्या इतिहासात फार मोठी घटना घडली, इतिहासाचा प्रवाह बदलून टाकणारी घटना घडली. या मागची पार्श्वभूमी तपासताना इन्क्व्विज़िशन शिकणे अपरिहार्य आहे. रोमन चर्च वाइट्ट होते, ते जगाला कळू दे म्हणून काही हे शिकवले जात नाही. ब्रेख्टच्या 'गॅलिलिओ'मध्ये चर्चकडून झालेल्या छळाची आणि सर्वंकष सत्तेच्या विद्ध्वंसकतेची पार्श्वभूमी संपूर्ण नाटकभर आहे. पण मूळ संघर्ष मात्र वेगळाच आहे. (अर्थात ही साहित्यकृती आहे, इतिहास नव्हे,) आणि कुणालाही ठार काळ्या-पांढर्यात रंगवणे हा उत्तम साहित्याचा किंवा/किंबहुना इतिहासाचा हेतु नसतो. (किंवा तसे दाखवणारी कलाकृती ढोबळ समजली जाते, सूक्ष्मपणा हरवून बसते.) असे असे घडले असे तटस्थतापूर्वक सांगणे हा इतिहास. आपल्याकडेही सोमनाथाचे मंदिर महमद घोरीने सतरा वेळा लुटले, छत्रपतींच्या काळात तुळजापुरचे मंदिर लुटले वगैरे हकीगती इतिहासात येतातच. सिकंदराकडून पराभूत होताना पुरुचे शौर्यही शिकवले जातेच. पानिपताच्या तिसर्या लढाईत म्लेच्छयवनादि शत्रूकडून केल्या गेलेल्या हानीचे विदारक वर्णन आपण शिकतोच.
आणि अधिक ब्रॉड विचार केला तर असंस्कृत रानटी टोळीवाल्यांकडून सुस्थापित, सुसंस्कृत, साहित्य-शिल्प-कला-तत्त्वज्ञान यांनी समृद्ध असे समाज (त्यांनी त्यांचे रानटीपणा सुसंस्कृत होतानाच्या प्रवासात गमावल्यामुळे) पराभूत होतात हे वारंवार दिसून आलेले वास्तव आहे. तेच टोळीवाले पुढे स्थिरावतात, सुसंस्कृत सभ्य बनतात, तेव्हा आधीचे सुसंस्कृत पराभूत होऊन वणवण करीत रानटी अवस्थेत पोचलेले असतात.
इतिहासाकडे अभिनिवेशहीन दृष्टीने पाहाण्यातून नवा इतिहास (आजपर्यंत कुणाला न दिसलेले बारकावे) दिसू शकतो.
इतिहासाकडे अभिनिवेशहीन
इतिहासाकडे अभिनिवेशहीन दृष्टीने पाहाण्यातून नवा इतिहास (आजपर्यंत कुणाला न दिसलेले बारकावे) दिसू शकतो.
तो मूठचिमूटभर लोकांना. बाकीच्यांना नव्हे. त्याकरिता शक्यतोवर सर्वंकष कव्हरेज असला तर बरे असते.
नाही नाही. युरोपमधले एक्झॉटिक म्हणून नव्हे तर या इन्क्विज़िशनमधून रनाय्सान्स अवतरले ही एक युरोपच्या आणि जगाच्या इतिहासात फार मोठी घटना घडली, इतिहासाचा प्रवाह बदलून टाकणारी घटना घडली. या मागची पार्श्वभूमी तपासताना इन्क्व्विज़िशन शिकणे अपरिहार्य आहे. रोमन चर्च वाइट्ट होते, ते जगाला कळू दे म्हणून काही हे शिकवले जात नाही.
तेच तर, सोबत इन्क्विझिशन शिकल्याचे तरी काही आठवत नाहीये. ते असते तर ठीक, नायतर गोव्याला जाताना फक्त नारळीपोफळी, समुद्र आणि चर्चेस इतकंच लक्षात असतं. सुदैवाने अ का प्रियोळकरांचे पुस्तक वाचल्यामुळे यांची दुसरी बाजू लक्षात आली.
इन्क्विझिशन्स वाचल्याचे मलाही
इन्क्विझिशन्स वाचल्याचे मलाही आठवत नाही. धर्मांतरे केली गेली हे वाचल्याचे आठवते.
युरोपातली क्रुसेड्स (ख्रिश्चन-मुस्लिम युद्धे) सुद्धा शाळेत वाचल्याचे आठवत नाही. ते मी प्रथम ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी मध्ये वाचले. अरबांचे राज्य युरोपात पसरले होते हेही तिथेच प्रथम वाचले.
----------------------
युरोपियनांच्या आशियातील साम्राज्यस्थापनेचा इतिहास '१४५३ मध्ये तुर्कांनी इस्तंबूल जिंकल्याने खुष्कीचा मार्ग बंद झाला' असा सुरू होई. त्यावेळी १४५३ च्या आधीचे राजकारण काहीच सांगितलेले नसे. त्यामुळे ग्लिम्प्सेसमध्ये वाचलेले उल्लेख नव्यानेच कळले.
ऑटोमन एम्पायर वगैरे होतो ब्वॉ
ऑटोमन एम्पायर अभ्यासक्रमात होते असे आठवते. मात्र या चर्चेत नव्याने आलेले सर्व मुद्दे हे धार्मिक शिक्षणाबाबतचे नसून जगाच्या इतिहासाबाबत आहेत.
मूळ मुद्द्याबाबत माझा समज धार्मिक शिक्षण म्हणजे सणांची माहिती, गणपती, मारुती, श्रावण्या, नवरात्र वगैरे आचरटपणाबाबत चर्चा असा होता. धर्मामुळे काय युद्धे झाली आहेत हे सांगणे आवश्यक आहे हे मान्य! तीच बाब कम्युनिझमबाबतही!
शाळेत होतं की.
श्री थत्ते आणि बॅट्मन यांच्या प्रतिसादास अनुसरून :
युरोपातलं इन्क्विज़िशन नक्कीच शालेय अभ्यासक्रमात होतं. मार्टिन ल्युथर किंग (पहिले), प्रॉटेस्टन्ट चळवळ, विद्येचं पुनरुज्जीवन, ब्रूनोचं दहन हे सर्व होतं. म्हणजे कारणं आणि परिणाम अशा स्वरूपात होतं. (यातले मार्टिन ल्युथर किंग हे नाव जसं लिहिलं आहे तसं नसून मार्टिन ल्युथर असं हवं हे श्री धनंजय यांनी निदर्शनास आणून दिलं म्हणून स्वसंपादनात चूक दुरुस्त करता आली. त्यांचे खास आभार. मार्टिन ल्युथर किंग(जुनिअर) हे अलीकडचे म्हणजे विसाव्या शतकातले सुप्रसिद्ध ब्लॅक-आता आफ्रिकन अमेरिकन-, नागरी-हक्क चळवळीचे नेते. अलीकडच्या काळातले म्हणून त्यांचं नाव आठवणीत जास्त रुळलेलं. म्हणून ही चूक झाली.)
गोव्यातल्या इन्क्विज़िशनचे उल्लेख महाराष्ट्रातल्या क्रमिक पुस्तकात विगतवार नसणार. कारण गोवा इवलासा प्रदेश, त्यातही इतिहासाची पुस्तकं लिहिली गेल्यानंतर भारतात सामील झालेला. तिथलं इन्क्विज़िशन ही अखिल भारताच्या इतिहासात तुलनेने तशी कमी महत्त्वाची घटना. महाराष्ट्रात प्राथमिक पातळीवर स्थानिक इतिहास, उदा. माझी महामुंबई किंवा माझा नाशिक जिल्हा वगैरे, नंतर महाराष्ट्राचा इतिहास आणि मग भारताचा आणि जगाचा इतिहास अशी मांडणी असते. त्यात गोव्यातल्या घटनांना तुलनेने अत्यल्प महत्त्व मिळणं साहजिक आहे. वसई आणि तेव्हाच्या साष्टीतही धर्मांतरं झाली. पण ती घटनासुद्धा राज्याच्या इतिहासात फार दखल घेण्याजोगी वाटत नाही. (पण पेशवाईवरच्या धड्यात वसईची लढाई आणि त्याची पार्श्वभूमी असतेच असते.) उलट मुसलमानांनी व्यापलेला प्रदेश खूपच मोठा होता आणि त्यांचा अंमल भारताच्या इतिहासावर खोल परिणाम करणारा ठरला. त्यामुळे त्यांनी केलेल्या विध्वंसाची आणि कारभाराची दखल नक्कीच अधिक प्रमाणात घेतलेली असते. जाचक जिझिया कराबद्दल उल्लेख असतात. सोमनाथ लुटीचे असतात, मूर्तिभंजनाचे असतात, रयत कशी त्रासली होती त्याचेही असतात.
एक उदाहरण देता येईल. महाराष्ट्रातल्या शालेय इतिहास पुस्तकांत दक्षिण हिंदुस्तानाच्या इतिहासात सातवाहन, राष्ट्रकूट, चोल, चालुक्य, विजयनगर, बहामनी राज्ये, पाच शाह्या (यातल्या काही महाराष्ट्राच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या)यांचा धावता आढावा असतो. किंवा स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ठळक असे सत्याग्रह, ठळक आंदोलनं आणि काही ठळक क्रांतिकारक इतकाच त्रोटक उल्लेख असतो. किंवा ब्रिटिश कारकीर्दीच्या इतिहासात प्रत्येक गवर्नर-जनरल आणि वॉइसरॉय यांना फारच कमी स्पेस मिळते तसंच हे.
ब्याटोबा,
या प्रतिसादात, मुद्दाम लावलेला राईटिस्ट हिंदुत्ववादी चष्मा ठळक दिसतो. मुद्दाम असा चष्मा लावणे तुमच्यासारख्या अभ्यासू व व्यासंगी व्यक्तीस शोभत नाही. व तसा तो लावला जातो, हे माझ्यासारख्याला धोकादायक वाटते.
बळी कथेची अल्टरनेट व्हर्जन उपलब्ध आहे, पण ती तुम्हाला (तुमच्या अभ्यासानंतर) दिसली. तुमच्या आजूबाजूच्या किती लोकांना ती अशी आपोआप दिसते? किंवा मुद्दाम दाखवली जाते? किंवा त्यांनी कोर्या पाटीने अभ्यास करावा अशी परिस्थिती असते? किती लोकांची डोकी भडकवून स्त्रिया वाटून घेण्यासारखी गरळ निघेल असे, किंवा परशू पाजळणार्या आद्य वंशविच्छेदकाबद्दल डोक्यात भरवले जाते?
कम ऑन. युअर इंटेलेक्ट इज बेटर दॅन दॅट...
ब्याटोबा,
या प्रतिसादात, मुद्दाम लावलेला राईटिस्ट हिंदुत्ववादी चष्मा ठळक दिसतो. मुद्दाम असा चष्मा लावणे तुमच्यासारख्या अभ्यासू व व्यासंगी व्यक्तीस शोभत नाही. व तसा तो लावला जातो, हे माझ्यासारख्याला धोकादायक वाटते.
बळी कथेची अल्टरनेट व्हर्जन उपलब्ध आहे, पण ती तुम्हाला (तुमच्या अभ्यासानंतर) दिसली. तुमच्या आजूबाजूच्या किती लोकांना ती अशी आपोआप दिसते? किंवा मुद्दाम दाखवली जाते? किंवा त्यांनी कोर्या पाटीने अभ्यास करावा अशी परिस्थिती असते? किती लोकांची डोकी भडकवून स्त्रिया वाटून घेण्यासारखी गरळ निघेल असे, किंवा परशू पाजळणार्या आद्य वंशविच्छेदकाबद्दल डोक्यात भरवले जाते?
कम ऑन. युअर इंटेलेक्ट इज बेटर दॅन दॅट...
बिकाऊ संघी विचारवंत वगैरे
बळी कथेची अल्टरनेट व्हर्जन उपलब्ध आहे, पण ती तुम्हाला (तुमच्या अभ्यासानंतर) दिसली. तुमच्या आजूबाजूच्या किती लोकांना ती अशी आपोआप दिसते? किंवा मुद्दाम दाखवली जाते?
केरळाची लोकसंख्या ३-४ कोटी आहे. पैकी साधारणपणे ६०% हिंदू आहेत. फक्त हिंदूंनाच याची माहिती असेल असे गृहीत धरले तरी संख्या कमीतकमी १.८ कोटी होईल. तसे तर अनेक गोष्टी भारतभर माहिती नसतात, उदा. हनुमानाची सपत्नीक पूजा फक्त आंध्रात एके ठिकाणीच केली जाते. वगैरे. मुद्दा हा आहे की अशा असंख्य अल्टरनेट व्हर्जन्स अस्तित्वात आहेत. तथाकथित मूलनिवासी-युरेशियन वगैरे बकवास गोष्टींना ग्लोरिफाय करायला म्हणून या व्हर्जन्स वापरल्या जातात त्याला आक्षेप आहे. निव्वळ व्हर्जन्सना नाही.
किती लोकांची डोकी भडकवून स्त्रिया वाटून घेण्यासारखी गरळ निघेल असे, किंवा परशू पाजळणार्या आद्य वंशविच्छेदकाबद्दल डोक्यात भरवले जाते?
मूलनिवासी, संभाजी ब्रिगेड, इ. चे फेबु ग्रूप्स, त्यांची पुस्तके, त्यांना मिळणारा प्रतिसाद वगैरे पहा म्हणजे लक्षात यावे. ते मला धोकादायक वाटते. हे बर्याच मोठ्या स्केलवर चाललेले आहे.
संभाव्य आक्षेपः ते ऑनलाईनचं ऑफलाईन झाल्याखेरीज बोलण्यात अर्थ नाही. इम्याजिनरी मॉन्स्टर्स वगैरे.
उत्तरः प्रिव्हेन्शन इज़ बेटर दॅन क्युअर. भांडारकर तो झाकी है.
मुद्दाम लावलेला राईटिस्ट हिंदुत्ववादी चष्मा
वरील गोष्टी पॉइंट आउट करणे म्हणजे जर राईटिस्ट हिंदुत्ववादी होणे असेल तर सो बी इट. तसेही माझ्या स्वाक्षरीत ते अगोदरच कबूल केलेले आहे. तेव्हा यात निव्वळ हेत्वारोप सोडून दुसरे काही दिसत नाही.
बॅटोबा,
केरळातील कोट्यावधिंबद्दल नव्हे, तर महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल बोलतो आहे. केरळात काय चालतं, कोणत्या लोककथा आहेत, ते तुम्हाला समजलं. यांना समजलंय का? जनरली लोकांचा अॅव्हरेज आयक्यू, त्यांचं वाचन, बायस इंडेक्स किती असतो, याबद्दल काही विचार केलाय का?
यांनात्यांना मारून बायका/संपत्ती वाटून घेणे हे सर्वच समाज/धर्म्/प्रदेश्/देशांनी इतिहासात केलेले आहे, हे तुम्हाआम्हाला ठाऊक आहे. हे आजच्या काळात करणे चूक आहे, (नुसते चूकच नव्हे, तर बेअक्कलपणाचे, अत्यंत समाजविघातकही आहे,) हे समजण्याकरता समाजप्रबोधन, शिक्षण करणे गरजेचे असते. ते करण्याऐवजी/करण्याला हातभार लावण्याऐवजी, काँटेक्स्ट्स व इंप्लिकेशन्स उमजणार्या तुमच्यासारख्यांनी असे प्रतिसाद द्यावेत हे खंतावून जाते इतकेच. अशा निर्बुद्ध विखारी ब्रिगेडी स्टेटमेंट्सबरोबरच उलट बाजूचे विचार तितक्याच विखारी भाषेत बोलणारे व्हॉअॅ-फेसबुकावरील परशुरामी ग्रूप्स तुम्हाला ठाऊक नाहीतच काय? आपली बुद्धीमत्ता इतिहासातील घाण शोधून विखार ओकण्यासाठी वापरणारे ब्रिगेडी व हे, इक्वली डिस्गस्टिंग वाटतात मला तरी.
भांडारकर प्रकरण किती दिवस धोपटणार आहोत आपण? अभ्यासाचं, आपल्याच इतिहासाचं अक्षम्य नुकसान तिथे झालं याबद्दल दुमत नाहीच. याची बाजूच दुसरीकडून मांडायची म्हणजे, शिवाजीच्या जन्माच्या तिथ्या वेग-वेगळ्या का आहेत, याबद्दलचे प्रवाद, व ते कुणी कधी उत्पन्न केलेत, याबद्दल तुम्हाला काहीच ठाऊकच नाही का? तुम्ही नक्की कोणती जन्मतिथी साजरी/मान्य करता? धूर निघतो, तिथे आग असावी, असा संशय कमी अभ्यास असलेल्या लोकांना येतोच.
पॉइंट ऑट करायला अनेक गोष्टी सगळ्याच बाजूंकडे असतात. दृष्टीकोणाचे चष्मे आजकाल फार स्वस्त झालेत. अन पक्केही.
बाकी तुमच्यावर हेत्वारोप करून मला काय मिळणारे? अधिकाधिक अभ्यासानंतर संतुलित व निष्पक्ष होण्याऐवजी, व एकंदर समाजाचे एकीकरण व उत्थान होईल असा प्रयत्न करण्याऐवजी, तुम्ही (व गब्बरसिंगही) एका जातीचे, एका धर्माचे, एकाच परिप्रेक्ष्याचे चष्मे डोळ्यांवर मुद्दाम चिकटवून घेताहात हे पाहून खरेच वाईट वाटते.. भावना भडकावणे, त्यावरून युद्धही घडवून आणणे तुलनेने सोपे असते. शांतता, स्थैर्य मिळवणे?
असो.
अन हो, सुवर्चलेची स्टोरी फार पूर्वीपासून ठाऊक आहे ;)
मात्र ब्रिगेडींचे गुढीपाडवा,
मात्र ब्रिगेडींचे गुढीपाडवा, दिवाळी वगैरे हिंदूंच्या सणाबाबतचे आक्षेप चुकीचे कसे हे बॅटमॅन यांच्या प्रतिसादातून समजले नाही.
हे अगोदर विचारले असते तर सांगितलेही असते. डिरेक्ट प्रश्न विचारले तर बरे होईल.
गुढीपाडव्याच्या सणाचे शिवकालीन आणि प्री-संभाजी-मर्डर उल्लेख आहेत. त्यामुळे ती वायझेड थेरी आपोआपच रद्दबातल ठरते. ब्राह्मणांनी संभाजीराजांचा खून करून त्यांचे मुंडके भाल्याच्या टोकावर मिरवले आणि तोच पाडव्याच्या सणाचा आरंभ वगैरे गलिच्छ थेर्यांना प्रमाण मानता, "ते चुकीचे कसे" वगैरे प्रश्न विचारता हे पाहून काय बोलावे हेच समजत नाही. विचार न करता असले काहीतरी प्रमाण मानायचे आणि वर इतरांना लेक्चर द्यायचे हा खासा न्याय आहे बाकी.
दिवाळीचा काय आक्षेप आहे बायदवे?
यांनात्यांना मारून
यांनात्यांना मारून बायका/संपत्ती वाटून घेणे हे सर्वच समाज/धर्म्/प्रदेश्/देशांनी इतिहासात केलेले आहे, हे तुम्हाआम्हाला ठाऊक आहे. हे आजच्या काळात करणे चूक आहे, (नुसते चूकच नव्हे, तर बेअक्कलपणाचे, अत्यंत समाजविघातकही आहे,) हे समजण्याकरता समाजप्रबोधन, शिक्षण करणे गरजेचे असते. ते करण्याऐवजी/करण्याला हातभार लावण्याऐवजी, काँटेक्स्ट्स व इंप्लिकेशन्स उमजणार्या तुमच्यासारख्यांनी असे प्रतिसाद द्यावेत हे खंतावून जाते इतकेच.
मग काय करायचं म्हणता? हे चूक आहे असं म्हणायचंदेखील नाही? हाईट आहे राव.
अशा निर्बुद्ध विखारी ब्रिगेडी स्टेटमेंट्सबरोबरच उलट बाजूचे विचार तितक्याच विखारी भाषेत बोलणारे व्हॉअॅ-फेसबुकावरील परशुरामी ग्रूप्स तुम्हाला ठाऊक नाहीतच काय? आपली बुद्धीमत्ता इतिहासातील घाण शोधून विखार ओकण्यासाठी वापरणारे ब्रिगेडी व हे, इक्वली डिस्गस्टिंग वाटतात मला तरी.
होय की, आहेतच ते दोघेही डिस्गस्टिंग. परशुरामी ग्रूपांनी बहुजन स्टडी सेंटर उध्वस्त केल्याची बातमी आली म्हणजे त्यांचाही निषेध तीव्र शब्दांतच करेन. तूर्तास ब्रिगेड्यांचे उपद्रवमूल्य जास्त आहे म्हणून त्यांना झोडणारच. ब्रिगेडविरोधक म्हणजे आटोम्याटिक संघीछाप असे समीकरण बाळगलेले दिसते ते पाहून कीवही येत नाही आजकाल.
भांडारकर प्रकरण किती दिवस धोपटणार आहोत आपण? अभ्यासाचं, आपल्याच इतिहासाचं अक्षम्य नुकसान तिथे झालं याबद्दल दुमत नाहीच. याची बाजूच दुसरीकडून मांडायची म्हणजे, शिवाजीच्या जन्माच्या तिथ्या वेग-वेगळ्या का आहेत, याबद्दलचे प्रवाद, व ते कुणी कधी उत्पन्न केलेत, याबद्दल तुम्हाला काहीच ठाऊकच नाही का? तुम्ही नक्की कोणती जन्मतिथी साजरी/मान्य करता? धूर निघतो, तिथे आग असावी, असा संशय कमी अभ्यास असलेल्या लोकांना येतोच.
किती दिवस म्हणजे? इतकी इन्सेन्सिटिव्ह कमेंट आजवर पाहिली नाही. एखादे प्रकरण धोपटायचा काळ कधी, याचा थ्रेशोल्ड आता तुमच्याकडून प्रमाणित करून घेऊ काय?
आणि याची दुसरी बाजूच का, न'वी बाजू मांडा. आमची काही तक्रार नाही. पण ते तथ्याधारित असावे. कमी अभ्यास असलेल्यांचं कौतुक काय सांगताय राव, गजानन मेहेंदळ्यांच्या शिवचरित्र खंड २ मध्ये शिवजन्मतिथीच्या निश्चितीकरिता शंभर पाने खर्च केलेली आहेत आणि त्याआधारे योग्य ती तिथी सांगितलेली आहे ते बघायचे कष्ट घ्या. धूर आणि आगीचा खेळ करून ज्यांना फायदा आहे ते करतच बसतील. इतरांनी याचे ब्याकग्रौंड समजून घ्यावे इतकीच अपेक्षा आहे. तो जेम्स लेन डोक्यावर पडल्यागत काहीही बोलतो आणि लोक तेच प्रमाण मानतात हे पाहून काय म्हणावे हे अजूनही कळत नाही.
अधिकाधिक अभ्यासानंतर संतुलित व निष्पक्ष होण्याऐवजी, व एकंदर समाजाचे एकीकरण व उत्थान होईल असा प्रयत्न करण्याऐवजी, तुम्ही (व गब्बरसिंगही) एका जातीचे, एका धर्माचे, एकाच परिप्रेक्ष्याचे चष्मे डोळ्यांवर मुद्दाम चिकटवून घेताहात हे पाहून खरेच वाईट वाटते.. भावना भडकावणे, त्यावरून युद्धही घडवून आणणे तुलनेने सोपे असते. शांतता, स्थैर्य मिळवणे?
ऐसीवर इतिहासविषयक लेख लिहिले काय अन कुठल्याशा जर्नलमध्ये पेपर लिहिले काय, निव्वळ त्याने समाजाचे एकीकरण व उत्थान (भोंगळपणे या संज्ञा उगा फेकून मारल्या की काहीतरी भारी बोलल्यागत वाटते म्हणा.) वगैरे होईल ही अपेक्षाच मुळात भाबडी आहे पण ते एक. तुम्ही तथ्यात्मक व अन्य चुका काढा मग बोलू. उगीच "एक चष्मा लावताय", "समाजाचे एकीकरण करा" छाप भोंगळ आणि बेशिस्त आरोपांना काहीच अर्थ नाही.
बाकी तुमच्यावर हेत्वारोप करून
बाकी तुमच्यावर हेत्वारोप करून मला काय मिळणारे? अधिकाधिक अभ्यासानंतर संतुलित व निष्पक्ष होण्याऐवजी, व एकंदर समाजाचे एकीकरण व उत्थान होईल असा प्रयत्न करण्याऐवजी, तुम्ही (व गब्बरसिंगही) एका जातीचे, एका धर्माचे, एकाच परिप्रेक्ष्याचे चष्मे डोळ्यांवर मुद्दाम चिकटवून घेताहात हे पाहून खरेच वाईट वाटते.. भावना भडकावणे, त्यावरून युद्धही घडवून आणणे तुलनेने सोपे असते. शांतता, स्थैर्य मिळवणे?
बघा हं प्रश्न विचारतो ...
अभ्यासा करण्याआधी असे लक्ष ठेवणार का की अभ्यास करून झाल्यावर त्या अभ्यासाचा परिपाक म्हणून संतुलित व निष्पक्ष व्हायचं ?
मग अभ्यास करायचाच कशाला ? अभ्यासाला बायपास करून थेट निष्पक्ष व संतुलित व्हायचं नैका ??
मुद्दाम नव्हे
अभ्यासाचा परिपाक म्हणून संतुलित व निष्पक्ष व्हायचं असं नव्हे. ही प्रक्रिया आपोआपच होत असते. ज्ञानभाराने मनुष्य वाकतो, नम्र होतो. घटनांमागचे अंतःप्रवाह कळू लागतात. काळाचा रोल कळतो. तटस्थपणे एखादी घटना पाहाता येते. सूड, क्रोध आणि अभिनिवेशहीन भूमिकेने निष्कर्ष मांडता येतात. जे झालं ते मागे टाकून पुढे जाता येतं. आणि मुख्य म्हणजे दुसर्याच्या अज्ञानाचं हसू येत नाही.
संघाच्या शाळांमध्ये कुठल्याही
संघाच्या शाळांमध्ये कुठल्याही धर्माचे गौरव गान केले जात नाही. फक्त राष्ट्रीयतेच भावना मुलांमध्ये रुजवली जाते. कमी पैश्यात चांगले शिक्षण मिळते म्हणून सर्व धर्मीय मुले या शाळांत जातात. कुणाशीही भेदभाव केला जात नाही. कुणाला हि हिंदू धर्म स्वीकारावा लागत नाही. दुसर्या ठिकाणी अर्थात, क्रिशन शाळांमध्ये धर्माधारित शिक्षण असतेच, कुणीही नावे ठेवीत नाही. श्रीमंत मुलांच्या पालकांकडून भरघोस फीस घेतली जाते. गरीब मुलांना हि तिथे शिक्षण मिळते, पण एक अट असतेच. मदरसे मध्ये तर धार्मिक शिक्षणच असते.
भटके व्हर्सेस नागर -- राही तैंचा प्रतिसाद
राही म्हणतात --
(त्यांनी त्यांचे रानटीपणा सुसंस्कृत होतानाच्या प्रवासात गमावल्यामुळे) पराभूत होतात हे वारंवार दिसून आलेले वास्तव आहे. तेच टोळीवाले पुढे स्थिरावतात, सुसंस्कृत सभ्य बनतात, तेव्हा आधीचे सुसंस्कृत पराभूत होऊन वणवण करीत रानटी अवस्थेत पोचलेले असतात.
इतिहासाकडे अभिनिवेशहीन दृष्टीने पाहाण्यातून नवा इतिहास (आजपर्यंत कुणाला न दिसलेले बारकावे) दिसू शकतो.
मला हे पुरेसं अचूक, व्यापक वाटत नाही. वास्तव ह्याहून फार वेगळं असू शकतं. वेगळं नसलं तरी विस्तृत असू शकतं. फक्त नजर मोठी व मोकळी हवी.
भटक्यांनी हल्ले करुन नागर समाजाची वाट लावली असे उल्लेख अधून मधून येतात. आणी आपला ग्रह होतो की भटके बघा कसे शूर असतात, क्रूरही असतात. नागर म्हंजे फट्टू,अशक्त ,कृश्,लढण्यास असमर्थ.अॅक्चुअली हे उलट आहे.
नागर समाजाच्या सीमा कायम विस्तारत असतात. ते संघटित व वेल ऑर्गनाझ्ड असतात भटक्यांहून. समाजरचना गुंतागुंतीची असली तरी त्यात एक संघटन असतं, ऑर्गनाइझ्डपणा असतो. त्यांच्या सप्लाय लाइन्स तगड्या असतात. आणि एक इन्स्टिट्युशनलायझेशन झालेलं असतं विविध जॉब्जचं. ते सीमेवरच्या भटक्यांना सतत हाकलून लावत भूभाग काबीज करत जातात.भटके मुके असतात. ते बाहेर बाहेर पडत जातात. एखादेच वेळेस त्यांचा असा उलट बॅकलॅश येतो आणि यशस्वी होतो. इतिहासात नेमकी त्याचीच नोंद होते. कारण भटक्यांचा लिखित इतिहासच नसतो. इतिहास अस्तो फक्त नागर लोकांचा! आठवणी नागर चश्म्यातूनच लिहिल्या जातात. नागर लोकांनी भटक्या किंवा अ-नागर लोकांना काय आणी कसं उध्वस्त केलय ह्याचे तपशील फारसे मेन्टेन होत नाहितच. जेव्हा ते उलट नजरेनं होइल तेव्हा समजेल खरं काय ते. आपल्याकडची माहिती पुरेशी नसते.
अर्थात कधी हूण, कधी मंगोल, कधी व्हायकिंग कधी अरब कधी गॉथ कधी व्हँडाल्स अशा भटक्यांनीच तर इतिहास घडवल्याचं वाटतं आपल्याला. प्रत्यक्षात जेव्हा केद्रिय नागर कमजोर झाले तेव्हा हे साले बळजोर झाले. मुळात हे पैदा झाले कुठून?
ह्यांच्या पूर्वजांना नागर समाजानं दाबून ठेवलं होतं. रेटत मागे नेलं होतं. (रोमनांनी तर कित्येक टोळ्या/राष्ट्रे अशीच कुचलून टाकली होती.) आणि हे शक्य होत होतं कारण नागर समाजातला हिस्सा शेती करी. भरपेट खाइ. दाणागोटा तयार असे. सप्लाय लाइन्स व्यवस्थित असत. आणि शस्त्र वगैरेंचे विशेष कौशल्य असे. अधिक गुंतागुंतीची पण प्रभावी शस्त्रे ते तयार करत. ह्या जोरावर थोडका नागर समाजही कित्येक भटक्यांना भारी पडे. इ.स. साडे सहाशे नंतर भटक्या अरबांनी पार वाट लावली पर्शियाची हे खरय. पुढची एक दोन शतके ते त्याम्च्या छाताडावर चढूनच बसले. पण त्यापूर्वीची हजार दीड हजार वर्षे पर्शिया अरबांना बडवत होता. आपसात झुंजवत होता. त्यांच्यातल्या काहिंना काहीकाळ मर्सिनरी म्हणून वापरत होता. पण एकूणात झोडून काढत होता. मंगोलांचेही तेच. चीन सतत त्यांना पिटाळत पिटाळत आउटर मंगोलिया पर्यंत घेउन गेला. (म्हणजे आजच्या मंगोलिया देशापर्यंत.) हे दीड दोन हजार वर्षं चाललं. अर्थात मंगोलांचा बॅक लॅश आला तो पार सगळ्यांची फाडून गेला तो भाग वेगळा.
व्हंडल्सचे पूर्वज रोमनांशी जिथे जिथे सामना झाला तिथे तिथे तुडवले गेले असले पाहिजेत (अंदाज. गॉल, गॉथ, केल्ट्स वगैरेंना ह्यांनी लैच वाईट तुडवला. झालच तर इतर काही जर्मेनिक ट्राइब्ज कायमच्यानष्ट केल्या. त्यांचा जीन पूल; संपवला. हे सगळं करताना ज्युलियसची आर्मी अ-नागर लोकांहून एक तृतीयांश वगैरे असे. पण तो आणि त्याची आर्मी स्किल्ड होती. ऑर्गनाइझ्ड होती. त्यांनी आख्खे गॅलिक राष्ट्र तुडवले. आणि नंतर रोमन रिपब्लिकचे रोमन एम्पायर झाल्यावर तर आर्मी साइझही वाढला. विचारायलाच नको.)
सिकंदरानेही हरेक मोहिमेत इतके सारे जीनपूल मरणप्राय अवस्थेत नेले की विचारायलाच नको. तुर्की पासून ते इजिप्त-लिबियापर्यंत त्याचं सैन्य गेलं. तिकडून पुन्हा उलट फिरुन भिडू इराण अफगाण सिंध पंजाबात घुसला. ह्या दरम्यान स्थिर राज्ये कशीबशी तग धरुन राहिली मार खाउन का असेना. पण कबायली इतके संपवले गेले की विचारुच नका.)
शिवाय हे साले हूण आले कुठून ? त्याची कथा अशी आहे की हे चीनने हाकललेले लोक होते. त्यांनी नंतर काय विध्वंस केला हे दिसतेच आहे. पण त्यांना मुळात हाकलणारा चीनही काही कमी क्रूर नसावा(नागर आहे म्हणून कमी क्रूर असे काही नाही; हाही एक मुद्दा सांगू इच्छितो)
इन फ्याक्ट भटके, वनवसी ह्यांचा भाबडेपणा आणि कित्येक प्रथा परंपरा ह्या शिकण्यासारख्या आहेत. माणुसकी त्यांच्यात जास्त असते. चलाख नसेल नागरांइतकी, रासवट असतील; पण एक कम्युनिटी नेटवर्क, सामूहिक इथिक्सचं, बृहत् कुटुंब म्हणून मला ते आवडतात. फ्रॅटरनिटी त्यांच्यात जास्त असते.शिवाय तुलनेने कित्येक वनवसींत स्त्रीचा दर्जा बराच चांगला असतो नागरांपेक्षा म्हणे.
उदाहरणे दे करण्याचा प्रयत्न करतो. रोमनांनी अनेक युरोपीय वनवासी दाबले. इराण्यांनी ट्रान्सनोक्शिया, अरब वगैरेंना हाणले. चीनने तर लैच विस्थापनं घडवली. त्यांच्या विस्थापनांनी आख्ख्या जगाला त्रस्त करुन सोडले . (शक कुशाण हूण वगैरे.) मंगोलांचंही तेच.
.
.
मुळात इतिहास नागर लोक्लिहितात. ते तयंच्या चश्म्यातून/पर्स्पेक्टिव्हमधून लिहितात. भटके इतिहास लेखन मेन्टेन नाहित करत. ते मूक असतात. जर त्यांचा इतिहास बोअल्ता झाला तर पार वेगलीच बाजू समोर येउ शकते. शोषित कोण आणि दांडगाई, विध्वंस करणारे कोण ह्याबद्दलच्या संकल्पना बदलू शकतात.
वेगळा मुद्दा
मन १,
तुमचा मुद्दा अगदी वेगळा दिसतोय. मला शोषक-शोषित असे काही म्हणायचे नव्हते.
जगातल्या सर्व आदिम जमातींचे, टोळीवाल्यांचे कधी ना कधी नागरीकरण होणे अटळ आहे. या प्रक्रियेत काही जीन-पूल नष्ट होणे हेही अटळ आहे. जसे अंदमानांतील आदिवासींचे होतेय. किंवा काही बोली भाषा मृत होत आहेत. संपर्काच्या लाटेमध्ये अनेक नवीन प्रथा-संकल्पना अंगावर कोसळताहेत आणि सगळे नागरी जीवनही घुसळले जातेय. जुनी संस्कृती झपाट्याने बदलतेय. पण आता या संस्कृतीबदलासाठी दरवेळी युद्ध आवश्यकच आहे असे नाही. मध्ययुगापर्यंत हे थेट लढाई झगडे झाले. जशी इराण्यांची कत्तल मंगोल चंगीज़खानने केली.
जसजशी प्रगत अवस्था येते तसतसे काही आदिम प्रेरणांचे आवेग कमी कमी होत जातात. अन्नासाठी झगडावे लागत नाही. दुसर्या टोळीवर पशुधनासाठी हल्ला करावा लागत नाही. (जसा विराटाच्या गायींसाठी झाला.) बायकापोरींना पळवून न्यावे लागत नाही. धनाची संकल्पना बदलते आणि झगड्याचीही. खनिज तेल या धनासाठी क्षेपणास्त्रांचा मारा करून या धनाचा ताबा घेतला जाऊ शकतो. हे आदिम हाणामारीचे सॉफिस्टिकेशन झाले. सध्या आत्यंतिक राष्ट्रवाद, वसाहतवाद, धर्मवाद, या जुन्यातूनच बदललेल्या प्रेरणा आहेत.
शिवाय जी संस्कृती किंवा समाज समृद्धीच्या सुसंस्कृततेच्या शिखरावर पोचतो त्याचे निसर्गनियमानुसार पतन अटळ असते. आधी र्हास आणि मग पाडाव हे चक्र चालूच असते. कदाचित थोडी आत्मसंतुष्टता येत असेल, थोडे शैथिल्य/ आळस शिरत असेल, प्रगतीचा वेग मंदावत असेल, इतर समाज वेगाने घोडदौड करू लागले असतील. पण कधी ना कधीतरी कुंठितावस्था येतेच. काळाच्या एखाद्या टप्प्यावर एखाद्या समाजात कधी कधी चैतन्य संचारते आणि कधी कधी एखादा समाज एकदम मरगळीला येतो. ही सर्व प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची असते. यावर अनेक इतिहासकारांनी खल केलेला आहे. रोमन लोकसुद्धा प्रगत होते पण त्यांच्यात गुलामीची प्रथा होती. हिंस्र प्राण्यांशी गुलामांना लढायला लावण्यासारख्या क्रूर प्रथा होत्या. तेव्हा काही विधाने करताना सरासरीचा निष्कर्ष आणि तरतमतेचा निकष लावावा लागतो. त्या काळच्या मानाने रोमन प्रगत होते तर त्याकाळच्या रोमनांच्या मानाने काही टोळ्या अप्रगत आणि रानटी होत्या. आणि ही विषमता कोणत्याही काळात राहाणारच.
आदिम आवेगांना वेसण घालता न येणे ही थोडीफार अप्रगत किंवा असंस्कृत अवस्था मानता येईल. त्या त्या काळातले नागर हे त्या काळापूर्वी भटके टोळीवाले होतेच असतील. त्यांनाही असेच कोपर्यात ढकलले गेले असेल. आजही आपल्याकडे अनेक लोक मानतात की आपले वनवासी हे असेच कुणामुळेतरी रानात ढकलले गेलेले आहेत. मिपावरच्या एका प्रतिसादात सोन्याबापू या आयडीने लिहिलेय की मध्ययुगात राजपूत, जाट हे मर्सिनरीज़ होते. मला हे मत लक्षणीय वाटते.
असो. आपल्या म्हणण्याप्रमाणे हाही प्रतिसाद पुरेसा व्यापक आणि अचूक आहे असे नाही.
मिपावरच्या एका प्रतिसादात
मिपावरच्या एका प्रतिसादात सोन्याबापू या आयडीने लिहिलेय की मध्ययुगात राजपूत, जाट हे मर्सिनरीज़ होते.
थोडा फरक आहे. राजपूत म्हणजे अनेक टोळ्यांचे क्षत्रियीकरण करून झालेली "जात" आहे. शिवकाळात एखाद्या जनरल, नॉन-राजस्थान-बेस्ड हिंदू सरदारासही राजपूत म्हणत असत. क्षत्रियाचा आदर्श काय तर राजपूत. त्याचमुळे शहाजीराजे "आम्ही राजपूत लोक आहो" असे एका पत्रात म्हणतात. त्याचा अर्थ आमचे पूर्वज राजस्थानी होते असा नाही तर आम्ही हायक्लास क्षत्रिय आहो असा आहे.
जाटांची केस मराठ्यांसारखी आहे. शेतकरी + सैनिक + जनरली लोअरकास्ट + लेटर उन्नयन असे ते काँबो आहे.
अवांतर
बरंच अवांतर झालेलंच आहे, तर आणखी थोडं.
काही प्रतिसादांतून असा सूर दिसला की युरोपातलं इन्क्विज़िशन वगैरे दूरच्या भूमीवरचं शिकवणं इथल्या तथाकथित धर्मनिरपेक्षतेला बाधा आणीत नाही. इथल्या घटनांवर बोला. आपल्या भूमीतल्या इतर धर्मीयांच्या अत्याचारांवर बोलून दाखवा. (इम्प्लाइड- तरच तुम्ही खरे धर्मनिरपेक्ष.) पण मला उलट म्हणायचं आहे की त्यांनी त्यांच्या धर्मसत्तेने केलेले अत्याचार तपशीलवारपणे शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केले. आपण आपल्या धर्मसत्तेविषयी इतक्या खुलेपणाने शिकवू शकू का? 'शिव्या देति, म्हणति महारें देव बाटवीला' या मागची पार्श्वभूमी तितक्याच तपशिलाने शाळांमध्ये शिकवली जाते का? की भारतात 'वर्णव्यवस्था माजली आणि वैदिक कर्मकांडाविरुद्ध बंड करणारे अवैदिक धर्म निर्माण झाले' अशासारख्या स्पष्टीकरणांवर धर्माचा पुढचा दोन हजार वर्षांचा इतिहास गुंडाळला जातो?
आपण आपल्या धर्मसत्तेविषयी
आपण आपल्या धर्मसत्तेविषयी इतक्या खुलेपणाने शिकवू शकू का? 'शिव्या देति, म्हणति महारें देव बाटवीला' या मागची पार्श्वभूमी तितक्याच तपशिलाने शाळांमध्ये शिकवली जाते का? की भारतात 'वर्णव्यवस्था माजली आणि वैदिक कर्मकांडाविरुद्ध बंड करणारे अवैदिक धर्म निर्माण झाले' अशासारख्या स्पष्टीकरणांवर धर्माचा पुढचा दोन हजार वर्षांचा इतिहास गुंडाळला जातो?
शाळेत धड शिकवत नाहीत आणि त्याची जागा पुढे शाखा-शिबिरे, स्टडी सर्कल्स घेतात. त्या ठिकाणी बर्याचदा खूप विखारभरली शिकवण असते. ते टाळायचं असेल तर हे सगळं इन्क्लूड केलंच पाहिजे.
आणि वर्णव्यवस्था, बुद्ध, बसवेश्वर, एकनाथ, तुकाराम, फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार वगैरेंचा सिलॅबस असतोच की. त्या तुलनेत इतर डीटेल्स सांगितले जात नाहीत.
आणि ही सगळी पार्श्वभूमी डीटेल सांगितली गेली पाहिजे ती जात नाही कारण शिकवणारे वरीलपैकी एकाचे किंवा दूष्ष्ट वैट्ट हिंदुधर्माचे अनुयायी असतात. त्यांना आपल्याकरता कन्व्हीनियंट तेवढंच सांगायचं असतं.
माझं मत हे आहे की पालकांना
माझं मत हे आहे की पालकांना फायनल "से" असावा की त्यांच्या पाल्याने कोणत्या धर्माचे किती तास शिक्षण घ्यावे त्याबाबत.
( धर्म हा नैतिक दृष्ट्या काहीतरी खालचा आहे व सरकार धर्माचे अथ पासून इति पर्यंत रेग्युलेशन करणार - ह्या संकल्पनेवर माझा प्रचंड आक्षेप आहे. सेपरेशन ऑफ स्टेट अँड रिलिजन हे मला मान्य आहे पण त्याचा अर्थ असा अजिबात नाही की सरकारने धर्माच्या बाबतीत मनमानी हस्तक्षेप करायचा. तसं जर सरकारला हवं असेल तर धर्माला सरकार मधे हस्तक्षेपाचे अधिकार त्यायला हवेत. धर्म ही काहीतरी एक "सब्जेक्ट टू गव्हर्नमेंट अप्प्रूव्हल" बाब आहे हे अमान्य आहे मला. )
धर्म शिकून फायदा काय? मी
धर्म शिकून फायदा काय? मी शिवण्/चित्रकला/गायन वगैरे सोडून धर्म का शिकावा? नाही जेन्युइन प्रश्न आहे. इतिहास्/भूगोल्/गणित्/शास्त्र/भाषा हे तर आपण शिकतोच. पण पर्यायी विषयांत मी धर्म का घ्यावा? तुम्ही का घ्याल? धर्म आहे तर ज्योतिष का नको?
ब्रह्मदेव-विष्णू होते याला जसा पुरावा नाही तसेच आमच्या शनि-मंगळ-प्लूटो मुळे अमके टमके होतेलाही पुरावा नाही.
मग धर्माचं स्तोम का?
प्रत्येक गोष्ट - विषय कोणते व
प्रत्येक गोष्ट - विषय कोणते व त्यांचा बेसिस काय, त्यातले उपविषय कोणते, उपविषयांचा बेसिस काय ? शिकवणे म्हंजे लगेच स्तोम माजवणे असते का ? धर्माची युटिलिटी प्रजातंत्राच्या पूर्वी काय होती व आज ती कशी बदललिये, बहुतेक धर्म हे खूप जुने आहेत व त्यांच्या परंपरा, नियम, पद्धती शेकडो वर्षांच्या आहेत. प्रत्येकाचे फायदे तोटे.... लाभ हानी... स्थलकालसापेक्ष व निरपेक्षता काय ????
... ही सगळी माहीती लोकांनी तुम्हाला रेडिमेड आणून द्यावी आणि तुम्ही ..... वा वा छान छान असं म्हणावं आणि घरी जावं ? का बरं ?
--
उदाहरण द्यायचं तर - विकीपिडिया उपलब्ध आहे. मोफत आहे. (इंटरनेट कनेशन चे पैसे द्यावे लागतात. पण अदरवाईज मोफत आहे.) विकीपिडियात प्रचंड ज्ञान आहे. विषय, उपविषय दोन्ही. तथाकथित फायदेशीर व तथाकथित तोटेशीर.
मग विकीपिडियाचं स्तोम कशासाठी - असा प्रश्न तुम्ही विचारता का ? कितीवेळा विचारता ? का नाही विचारत ?? विचारत असाल तर का विचारता ?
--
(विचार करण्याचे सोंग करून संपले असेल व) मुद्दा समजला नाही हे रियलाईझ झालेले असेल तर अतिसुलभ करून सांगतो - काय शिकायचं व त्याचे काय फायदेतोटे हे त्यांचं त्यांना (पालकांना) ठरवू द्या.
धर्माचं सामाजिक महत्त्व
लेख थोडा लांबट आहे, पण 'धर्माचं स्तोम का माजवावं' असं न-उजव्या विचारांच्या नियतकालिकालाही का छापावं वाटतं, ह्याची उत्तरं मिळतील.
The Other France
... ज्योतिष का नको?
ज्योतिष अ-शास्त्र आहे; आणि 'अ-सामाजिक'ही आहे. म्हणजे समाजावर ज्योतिषाचा दूरगामी परिणाम होत नाही.
आं? पत्रिकेत तमुक बुलशिट अमुक
आं? पत्रिकेत तमुक बुलशिट अमुक हॉर्सशिटशी निगडित आहे म्हणून लग्ने मोडणारे, बिनकामी बुवा लोकांची तुंबडी भरणारे लोक पाहूनही समाजावर त्याचा दूरगामी परिणाम होत नाही?
एकदम सहमत.
ज्योतिषी अस्तित्वातच नसतात व लोक ज्योतिषांकडे जात नाहीत व ज्योतिषांचे म्हणणे काहीकेल्या ऐकत नाहीत असं जर सिद्ध झालं तर "ज्योतिषाचा समाजावर काहीही दूरगामी परिणाम होत नाही" हे वाक्य बरोबर मानता येईल. बिजन दारूवाला नावाची व्यक्ती कधी अस्तित्वातच नव्हती व न कधी असेल असं मानूया आजपासून.
महत्त्वाचा शब्द - दूरगामी
दूरगामी ह्या शब्दाच्या अर्थाबद्दल आपल्यात मतभेद आहेत.
ज्योतिषाला नावं ठेवल्यामुळे; ज्योतिष हे प्रकरण बकवास असतं, अंधश्रद्धा असते असं म्हटल्यामुळे किंवा पत्रिका बघितल्यामुळे; पत्रिका बघण्याची सक्ती केल्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष माजत नाही. ज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्या आणि ते भंपक मानणाऱ्या दोन गटांमध्ये आजही मनुष्यांच्या जीवावर बेततील अशी भांडणं नाहीत, कधीही नव्हती. ह्या दोन गटांपैकी एका गटाला वाळीत टाकणं, कमअस्सल (मानव/नागरिक) मानणं असेल प्रकार कोणत्याही गटाने केलेले नाहीत. ज्योतिष मानणं किंवा ते टाकाऊ मानणं ह्यात कोणताही समाज स्वतःचं सांस्कृतिक वा अन्य प्रकारचं अस्तित्व शोधत नाही, वा त्यात स्वतःची मुळं आहे असं मानत नाही. ज्योतिष मानणं किंवा न मानण्यात लोकांच्या अस्मिता दडलेल्या नसतात. "गर्व से कहो हम ज्योतिषी (नही) है" असे नारे लावले जात नाहीत. ह्यामुळे ज्योतिष मानण्याचे समाजावर दूरगामी परिणाम झालेले नाहीत असं मी म्हणते.
तरीही बारीकसारीक गोष्टींचा समाजावर दूरगामी परिणाम होतो असं म्हणण्याचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य ऐसीवर निश्चितच आहे. फक्त अशा (फडतूस!) विधानांचा गांभीर्याने विचार करायला सांगू नका ब्वॉ!
ज्योतिषाला नावं ठेवल्यामुळे;
ज्योतिषाला नावं ठेवल्यामुळे; ज्योतिष हे प्रकरण बकवास असतं, अंधश्रद्धा असते असं म्हटल्यामुळे किंवा पत्रिका बघितल्यामुळे; पत्रिका बघण्याची सक्ती केल्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष माजत नाही. ज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्या आणि ते भंपक मानणाऱ्या दोन गटांमध्ये आजही मनुष्यांच्या जीवावर बेततील अशी भांडणं नाहीत, कधीही नव्हती. ह्या दोन गटांपैकी एका गटाला वाळीत टाकणं, कमअस्सल (मानव/नागरिक) मानणं असेल प्रकार कोणत्याही गटाने केलेले नाहीत. ज्योतिष मानणं किंवा ते टाकाऊ मानणं ह्यात कोणताही समाज स्वतःचं सांस्कृतिक वा अन्य प्रकारचं अस्तित्व शोधत नाही, वा त्यात स्वतःची मुळं आहे असं मानत नाही. ज्योतिष मानणं किंवा न मानण्यात लोकांच्या अस्मिता दडलेल्या नसतात. "गर्व से कहो हम ज्योतिषी (नही) है" असे नारे लावले जात नाहीत. ह्यामुळे ज्योतिष मानण्याचे समाजावर दूरगामी परिणाम झालेले नाहीत असं मी म्हणते.
तुमच्या म्हणण्याचा सारांश - ज्योतिषामुळे असंतोष माजत नाही, ज्योतिष्य या विषयात भांडणं, मारामार्या नाहीत. वाळीत टाकणं वगैरे होत नाही , ज्योतिषात अस्मिता दडलेल्या नसतात. म्हंजे ज्योतिष हे शांततामय मार्गाने चर्चिले, आचरले जाते.
माझा मुद्दा हा आहे की - अनेक लोक ज्योतिष्याचा सल्ला किमान मर्यादित प्रमाणावर तरी का होईना - गांभीर्याने घेतात.
तुम्हाला प्रश्न --
(१) तुम्ही म्हणालात की ज्योतिष हे अ-सामाजिक आहे. ते कसे ?
(२) अ-सामाजिक म्हंजे सामाजिक विषयांच्या बाहेरचे की सामाजिकतेच्या विरोधी ? ( अ-सामाजिक - म्हंजे - Is it extra-social or anti-social ? )
@गब्बर
ज्योतिष्य या विषयात भांडणं, मारामार्या नाहीत. वाळीत टाकणं वगैरे होत नाही , ज्योतिषात अस्मिता दडलेल्या नसतात. म्हंजे ज्योतिष हे शांततामय मार्गाने चर्चिले, आचरले जाते.
होय! तोच मुद्दा आहे. दाखवा ना भांडणे. जी काही प्रेमलग्नात रोडे घालण्याची उदाहरणे आहेत त्यात ज्योतिष कलप्रिट नसून तारतम्याचा अभाव हे कलप्रिट आहे.
मंगळाचे म्हणाल तर, एकाला मंगळ असेल तर तसा मंगळ असणारे लाखो असतात मग त्यांना पाहून लग्न करावे की.
बाकी खडे वगैरे भोंदूपण आ तर आहेच पण प्रेमिकांचे विवाह मंगळादि कारणांमुळे मोडणे तर अत्याचारच आहे.
____
आणि तुम्ही म्हणता ना धर्म - परंपरा, पूर्वज वगैरे. मग हे ज्योतिष शास्त सुद्धा त्याचाच भाग आहे. सामाजिक स्वास्थ्याकरता आचरणात आणले जाणारे एक फीबल का होईना टूल.
___
मंगळाच्या लोकांना कोणी वाळीत टाकत नाही बरं का. अरे हां पण मंगळवाल्या मुलीचा नवरा दगावला की खापर मात्र फोडतात. शूट तुमच्या बाजूचे तर्क मीच करायचे, त्याला विरोधही मीच करणार आणि तुम्ही म्हणणार "सोंग करते" हे निश्चित!! :(
____
असो अदितीचा मुद्दा बरोबर आहे - धर्माने जसा घाऊक्/होलसेल द्वेष रुजतो तसा ज्योतिषाने रुजत नाही.
@बॅट्या
पत्रिकेत तमुक बुलशिट अमुक हॉर्सशिटशी निगडित आहे म्हणून लग्ने मोडणारे,
कोणत्याही विषयात काही तारतम्य बाळगायला नको का?
(१) आता २ प्रेमिक लग्नाळू आहेत तेव्हा मूर्खासारखे पत्रिका पाहून विवाहात रोडे घालणे हे अचरटपणाचे लक्षण आहे.
(२) पण जिथे सगळाच जुगाराचा मामला आहे उदा- अरेंज्ड मॅरेज, तिथे काही एका टूलचा आसरा घेतल्याने काय मोठे बिघडते? बरं असे टूल की जे बर्याच बर्याच लोकांना अनुभवांती विश्वासार्ह वाटत आहे.
सेपरेशन ऑफ स्टेट अँड रिलिजन
सेपरेशन ऑफ स्टेट अँड रिलिजन हे मला मान्य आहे पण त्याचा अर्थ असा अजिबात नाही की सरकारने धर्माच्या बाबतीत मनमानी हस्तक्षेप करायचा.
प्रत्येक धर्म जीवनाच्या प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करू पहातो. त्यामुळे प्रत्येक ठीकाणी तसे करू दिल्यास 'स्टेट' ला काही अर्थच रहात नाही. व वेगवेगळ्या धर्मांची भांडणेच होत रहाणार. व प्रत्येक धर्म आपल्या अंगाशी आल्यावर धर्मात हस्तक्षेप अशीच मखलाशी करतो. त्यामुळे स्टेटलाच अंतिम अधिकार हवेत. धर्म टोटली सब्जेक्ट टू स्टेट नसला तरी.. कॉन्फ्लिक्ट उद्भवल्यावर इट शूड बी सब्जेक्ट टू स्टेट..
बादवे प्रतिसाद रँडमली थोडा काळ्या थोडा पांढर्या अक्षरात का लिहीता कोण जाणे!!
पुरेसे आहे.
मला वाटते शाळेत जेव्हढे शिकवले जाते तेव्हढे पुरेसे आहे. हिंदू, मुसलमान, क्रिस्टियन, सर्वच धर्मांच्या बाबतीत. ही तोंडओळख असते. एखाद्याला आणखी जाणून घ्यायचे असेल तर त्याने स्वतःहून शाळाबाह्य रीतीने ते जाणून घ्यायचे असते. मग कलाशाखेत फिलॉसॉफी घ्यावी, भारताचा किंवा जगाचा प्राचीन इतिहास घ्यावा, मुस्लिम, बौद्ध आर्किटेक्चर शिकावे वगैरे.
सध्याचे शालेय शिक्षण त्यातल्या त्यात संतुलित आणि त्यातल्या त्यात सर्वसमावेशक आहे असे मला वाटते.
संघाच्या शाखा माहित होत्या..
संघाच्या शाखा माहित होत्या.. शाळासुद्धा आहेत त्यापण इतक्या मोठ्या प्रमाणावर (१२०० तेही फक्त युपीत) हे माहित नव्हते..