छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १ : माझे शहर/गाव

ऐसीअक्षरेवर अनेक हौशी छायाचित्रकार आहेत. काही मंडळी वेगवेगळे प्रयोग करत असतात. खास छायाचित्रणासाठी विविध ठिकाणी जाणे, काही विशिष्ट दिवशी - वेळी हव्या त्या छायाचित्रासाठी प्रयत्न करणे वगैरे सव्यापसव्ये अनेक जण करताना दिसतात. मला बहुतांश चित्रे छान वाटतात. इथे प्रसिद्ध होणारी सर्व चित्रे ही सहेतूक असली तरी एकाच विषयाला धरून असतातच असे नाही.

मात्र, नुकत्याच झालेल्या दोन खगोलीय घटनांच्या वेळी - कंकाणाकृती ग्रहण आणि शुक्राचे अधिक्रमण - एकाच विषयावर अनेक चित्रे बघायला मिळाली व तुलना करायला मजा आली व बरेच काही शिकायला मिळाले

या धाग्याचा (मालिकेचा) मुख्य उद्देश असा एका विषयाला वाहिलेल्या छायाचित्रांची एकाअर्थी स्पर्धा भरविणे. मात्र स्पर्धेसारखे स्वरूप नसून विजेत्याने आव्हान द्यावे असे स्वरूप आहे. स्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे आहेत, त्यातून चित्र स्पष्ट व्हावे:
१. स्पर्धेच्या काळात स्वतःने काढलेले छायाचित्रच प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधीत इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही
२. एका सदस्याकडून जास्तीत जास्त ३ चित्रे प्रकाशित करता येतील.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरिक्षक असे चालुच राहिल)
४. एक स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १ जुलै रोजी भा.प्र.वे. नूसार रात्री १२:०० वाजता होईल व २ जुलैच्या सोमवारी विजेता घोषित होईल व तो पुढील विषय देण्यात येईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचाराव्यात, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी उगाच एखाद्याला टिकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्याचे असतील. त्यासाठी त्याने ठरविकच निष्कर्ष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहिर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल).आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानाचा पंधरवडा संपेपर्यंत चित्रे इतर संवादस्थळांवर (सोशल नेटवर्किंग साईट) प्रकाशित करू नयेत अशी विनंती कारण त्यामुळे प्रताधिकाराबद्दल प्रश्नचिन्ह लागु शकते.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व लेन्सची माहिती देणे बंधनकाराक. शक्य असल्यास एफ्झिफ डेटा द्यावा

आता ही पहिलीच स्पर्धा असल्याने मीच विषय देतो (वाटत नाही पुन्हा कधी संधी मिळेल Wink )अर्थात या पाक्षिकासाठी मी आव्हानदाता आणि परिक्षक देखील.

या पाक्षिकाच्या छायाचित्रांचा विषय आहे "माझे शहर/गाव"

चला तर मग! "माझे शहर/गाव" या विषयाला वाहिलेली छायाचित्रे येऊदेत!

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

छायाचित्रणातल ओ का ठो कळत नाही पण हल्ली डिजिटल कॅमेर्‍यांमुळे फोटो धुण्याचा खर्च येत नसल्याने मनाला येईल तसे फोटो काढत असतो. Wink
हे त्यापैकीच काही आमच्या गावचे.
स्थळ : डहाणु.
कॅमेरा : निकॉन-p500.

१) वेळ : नारायणाची ड्युटिला निघतानाची. Wink

२) वेळ : मध्यान्ह.

३) वेळ : कातरवेळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

कॅमेरा आणि लेन्स व (शक्य असल्यास) एक्झिफ डेटा पण देणे बंधनकारक करावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली कल्पना आहे. कॅमेरा व (एसएलार असल्यास लेन्स) बंधनकारक करता यावे. नियमात वाढ करतो.
एफ्झिफ डेटा ऑप्शनल ठेवावा असे माझे मत आहे (कारण प्रत्येकाला तो कसा काढावा हे माहित असेलच असे नाही. जर त्यावर एखादा मराठीतुन धागा दिलात तर पुढील पाक्षिकापासून तेही बंधनकारक करता येईल)

गणपा, नियमात बदल करत आहे. तु क्यामेराचे नाव दिले आहेसच लेन्सची माहिती (व शक्य असल्यास एफ्झिफ डेटा) द्यावी अशी विनंती. आधी नियम न टाकल्याबद्दल क्षमस्व!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्वत:च सारखे छायाचित्राकरता धागे काढणे नको असे वाटू लागले होते. या निमित्ताने फोटो टाकायला कारण मिळेल. गणपाचे फोटो आवडले. मी टाकतो लवकरच.

नियमांबाबत एक शंका: पोस्ट प्रोसेस्ड चित्रांना हरकत नसेल असे गृहित धरून प्रोसेसिंगबद्दलही किमान माहिती द्यावी अशी एक पुस्ती जोडतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

गणपाचे फोटो आवडले. "माझे" गाव/शहर यामधे थोडी अडचण आहे, पण सध्या रहात असलेल्या शहराचे फोटो "माझे" गाव्/शहर या नावाखाली काही वेळात देते.

धाग्याची कल्पना आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'माझे' म्हणजे छायाचित्रविषयातले- छायाचित्राच्या कथानायकाचे गाव. ते छायाचित्रकाराच्या कुटुंबाचे पारंपरिक / परमनंट वास्तव्याचे असलेच पाहिजे असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मोठ्या फोटोंसाठी फोटोवर क्लिक करा.


या फोटोचा ब्राईटनेस वाढवला आहे, थोडा कातरला आहे. एक्झिफ लवकरच देते.


हा फोटो फक्त कातरला आहे.


फोटोचा ब्राईटनेस कमी केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्याकडे इतके छायाचित्रकार व इतका सोपा विषय असूनही केवळ दोन एन्ट्र्या?
<अती मोड सुरू> लोकहो जर तुमच्या शहराचे/गावाचे फटु तुमच्याकडे नसतील तर काय अर्थ आहे तुमच्या फटुग्राफीला <अती मोड संपला>
उठा! स्वीकारा हे आव्हान! काढा कपाटातून क्यामेरा.. भटका विकांताला शहरात/गावात , काढा फटु आणि डकवा इथे! Smile

आता पुरे! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चला निदान दुसरा नंबर तरी कुठे नाही गेला. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

मला विचारशील तर पहिला नंबर तुझ्या दुसर्‍या फोटोला. पण थांब, तो निळ्या येईल बहुतेक विकेण्डला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एका धुकट-पावसाळी दिवशी बॉल्टिमोर बंदर
----------------------------------------

----------------------------------------
कॅमेरा : ऑलिंपस ई-५००
फोकल लेंग्थ : ४१ मिमि
एफ-# : एफ/५.६
एक्स्पोझर : १/१०० सेकंद
आय एस ओ : १००

फोटो पॅनोरामिक आकारात कातरला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नमस्कार मन्डळी,
मराठी आंतर्जालावर तसे बरेच हौशी आणि मातब्बर फोटोग्राफर आहेतच, माझ्यासारखे वाचनमात्र फक्त दुरुनच मजा घेत असतात. या धाग्याच्या निमित्तान म्हन्टल आपन करावा श्रीगणेशा.
तर अभ्यासच्या निमित्तन काही काळापसून स्विट्झरलँड मधील लुसान(lausanne) इथ वास्तव्य आहे.

तर नियमाविशयी थोडी शन्का व टिप्पनी, सर्व नियमात माझे फोतो बसतात की नाही
>>१. स्पर्धेच्या काळात स्वतःने काढलेले छायाचित्रच प्रकाशित करावे.
हे स्वतःने काढलेले आहे, पन स्पर्धेच्या काळात नाही तर बरच आधी काढलेली छायाचित्र आहेत.

>> ८. आव्हानाचा पंधरवडा संपेपर्यंत चित्रे इतर संवादस्थळांवर (सोशल नेटवर्किंग साईट) प्रकाशित करू नयेत अशी विनंती कारण त्यामुळे प्रताधिकाराबद्दल प्रश्नचिन्ह लागु शकते.
ही चित्रे आधिच मी इतर सोशल नेटवर्किंग साईट वर प्रकाशित केलेली आहेत(आणि तिथुनच लिन्क देतो आहे)

>>१०. कॅमेरा व लेन्सची माहिती देणे बंधनकाराक. शक्य असल्यास एफ्झिफ डेटा द्यावा.
अर्थातच DSLR कॅमेरा असेल तरच लेन्सची माहिती महत्वाची.
जर नियमांत बसत नसेल तर फोटो स्पर्धेसाठी ग्राह्य धरु नयेत, माझा काही आश्रेप नाही.

तर आता महत्वाचा मुद्दा, लुसान आहे तस छोटस शहर आणि स्विट्झरलँडच बाय डिफॉल्ट सौंदर्य तर अंगी बाळगुन आहेच पन महत्वाच म्हनजे एका बाजुन लाभलेला लाम्ब तळ्यचा किनारा. लुसान सारखी आनखिही शहर हे तळ (lake geneva) किनार्‍याशी बाळगुन आहे खर तर. तर माझे फोटो या तळ्याभोवतिच घुटमळनारे आहेत.

१) सुर्यास्त

तर या तळ्याकाठी सुर्यास्ताचा शो पहायला लख्ख प्रकाश असेल तर काही प्रेक्षक लाभतात सुर्यदेवांना.अशाच एक दिवशी घेतलेला हा फोटो. धोड्याच क्षणांत सुर्यदेव डोंगरच्या आड दडी मारनार तेवढ्यात मी ही click साधली.पान्यावरच प्रतिबिंब आणि दोन चुकार होड्यांमुळे फोटो अधिकच खुलुन आलाय. मुळ फोटो तसा मोठा पन कॅमेरात जास्त झुम नसल्यामुळ फोटो नंतर कातरला आहे.

२) पुन्हा एकदा संध्याकाळ

पुन्हा त्याच तळ्याकाठी आणि त्याच ठिकाणी पन जरा दुसर्‍या बजुला पाहतान. थोडस खोल पाण्यात भर टाकून होड्या नांगरायला केलेल्या या जगेच्या बांधावर मोठ्या आकरचा C बनवुन ठेवलाय, बहुतेक जागेच्या नावासाठी (ouChy) प्रतिक म्हनुन. तर या बांधावर समुद्रपक्षांची संध्याकाळी गर्दी असते. आनि तो C आपल्या उभ्या अक्षाभोवती वार्‍याच्या मदतिन फिरत असतो तर कधी मंदासारखा धिम्म असतो.
आणि बहुतेक त्या दिवशी जर ढगाळ वातावरनामुळ पार्श्वभुमिला धुसरपना आलाय. त्यात मावळतिचा लालसर रंग आणि आकशचा निळा रंग आपापल अस्तित्व दाखवतायेत. यात नंतर केलेले बदल म्हनजे contrast थोडा बदललाय आनि Gimp च्या मदतिन त्या C भोवति इतर अक्षर ठेवुन ouChy नाव पुर्ण केलय.

३) निळ्या तळ्यकाठी

पुन्ह तेच सुन्दर तळ पन जरा दुसर्‍या ठिकानावरुन. इथ सुर्यनारायण अजुन आकाशात बरेच वर आहेत त्यामुळ पानी आणि आकश दोघही मस्त निळे दिसतायेत. उलट दोघांमधली सिमारेषा शोधावी लागतेय.
निळ्या रंगाला टस्सल द्यायला पुष्टभुमिला गवताचा आणि डेरेदार झाडाचा हिरवा रंग सक्षम आहे. थोडस minimalist शैलीकड झुकनार हे चित्र डोळ्याला आनि मनाला शांततेचा अनुभव मिळवुन देत.
नंतर केलेले बदल म्हनजे कातरुन कडेचा थोडा भाग काढुन टाकला आहे आणि थोडा rotate केला आहे बहुतेक.

तर हे सगळे फोटो घ्यायला मला मदत केलेल्या कॅमेर्‍याच नाव आहे sony cybershot dsc w80. छोटासा point and shoot कॅमेरा आहे हा.
एक्झिफ डेटा हव तर देउ शकतो, पन point and shoot असल्यामुळे त्या घटकांवर प्रत्यक्ष नियंत्रन नाहिचे त्यामुळ ते देण्यात काही अर्थ नाही.

-रवि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-रवी

>>१. स्पर्धेच्या काळात स्वतःने काढलेले छायाचित्रच प्रकाशित करावे.
हे स्वतःने काढलेले आहे, पन स्पर्धेच्या काळात नाही तर बरच आधी काढलेली छायाचित्र आहेत.

डोन्ट वरी. मला असं म्हणायचं होतं की या काळात (या १५ दिवसांत) जी चित्रे डकवाल ती स्वतःने काढलेली हवीत. याच विषयावरची इतरांची, मित्रांची, प्रसिद्ध वगैरे चित्रे १५ दिवस झाल्यावर (योग्य परवानगी घेऊन) डकवल्यास काहीच हरकत नाही. चित्रे या काळात काढले पाहिजे असे बंधन नाही.

बाकी, चित्रे सोशल नेटवर्कीग वरची असतील तर प्रताधिकाराचा प्रश्न येऊ शकतो (म्हणजे फेसबुक वरचा रवि आणि इथला रवि हे सारखेच आहेत हे समजायचे कसे?) म्हणून ती अट घातली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नुसतेच 'सी' अक्षर असलेला दुसरा मूळ फोटो कदाचित जास्त आवडला असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत आहे. आता मुळ फोटोही इथे डकवावा अशी विनंती करतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा प्रतिसाद दिसलाच नव्हता प्रथम, हे घ्या मुळ फोटो.
Ouchy
-रवि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-रवी

१>

२>

३>

Exif Data:
1>
Camera EASTMAN KODAK COMPANY
Model KODAK Z712 IS ZOOM DIGITAL CAMERA
ISO 400
Exposure 1/10 sec
Aperture 2.8
Focal Length 8mm
Flash Used false
White Balance 0
Metering Mode 5
Exposure Programme 0
Exposure Bias 0.0

2>
Camera EASTMAN KODAK COMPANY
Model KODAK Z712 IS ZOOM DIGITAL CAMERA
ISO 160
Exposure 1/30 sec
Aperture 2.8
Focal Length 6mm
Flash Used false
White Balance 0
Metering Mode 5
Exposure Programme 0
Exposure Bias 0.0

3>
Camera EASTMAN KODAK COMPANY
Model KODAK Z712 IS ZOOM DIGITAL CAMERA
ISO 64
Exposure 1/400 sec
Aperture 3.2
Focal Length 12mm
Flash Used false
White Balance 0
Metering Mode 5
Exposure Programme 0
Exposure Bias 0.0

Slightly cut to reduce the sky

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळीच आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

सध्या फक्त पाच जणांनी मिळून १३ चित्रे पाठवली आहेत.
बाकीचे कुठे आहेत? उठा!!!
दुसरा आठवडा सुरू झाला सुद्धा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बोलोनिया हे इटली मधलं एक ऐतिहासिक मह्त्त्व असलेलं शहर. इथे सुमारे दोनशे चर्च आहेत. त्यामुळे कोणत्याही दिशेला पाहिलत की एखादा क्रूस नक्कीच दिसेल. चंद्र्कोर अशी दिसण्याचा योग २३ जूनला (२०१२) आला.

Exposure 1/6 sec,ISO 800,Aperture 5.3,Focal Length 42mm
बोलोनियाचे टऑवर्स -- या शहराची चिन्ह म्हणून ओळखले जातात. हा फोटो जुलै २००८ मधे काढलेला आहे.

Exposure 0.001 sec (1/1000),ISO Speed 200,Aperture f/3.5,Focal Length 18 mm
गेल्या ख्रिसमस ईव ला आचानक बर्फवृष्टी झाली..ऑटमचे रंग धरून असलेलं एक झाड आणि पडणार्या बर्फाचं हे दृश्य माझ्या नेहमीच लक्षात राहील.

Exposure 1/20 sec, ISO 400,Aperture 4.0,Focal Length 18mm

फोटो Nikon D40X या काअ‍ॅमेर्याने, 18-55 mm lens वापरून काढले आहेत. फोटो कातर्ले नाहीयेत. exposure दुसर्या आणि तिसर्या फोटो मधे किंचित बदललं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला यातील पहिल्या फोटोमागची कल्पना विशेषत्त्वाने आवडली. क्रुस, अँटेना, चंद्र, क्रेन आदी एकमेकांशी संबंधीत नसणार्‍या काही प्रकाशमान तर काहींच्या आकृत्या अशी मांडणी अत्यंत रोचक आहे. ही मांडणी दिसणं, ती बघणं, त्यातली कथा जाणवणं यातच बरंच काही आलं. मात्र प्रत्यक्ष फोटो काढताना अधिक जवळून, खालचा अनावश्यक भाग टाळून काढला असता तर अधिक आवडला असते असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझं सध्याचं शहर इतिहास आणि वर्तमान या दोन्ही डगरीवर पाय ठेवून उभं आहे असं मला सतत जाणवतं.
हे आहे 'फिरोजशाह कोटला'च्या आतल्या भागातलं एक दृष्य.

पण हे काही फक्त इतिहासात रमणारं शहर नाही. त्याची वर्तमानाशी घट्ट नाळ आहे जुळलेली.

आणि या शहरात जगण्याची धडपड करणारे असे असंख्य लोक आहेत.

फोटोची माहिती:
१.
Camera: KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA
Exposure: 0.003 sec (1/335)
Aperture: f/4.2
Focal Length: 12.8 mm
ISO Speed: 80
Exposure Bias: -
Flash Used: No
२.
Camera: KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA
Exposure: 0.002 sec (1/467)
Aperture: f/5.2
Focal Length: 18.6 mm
ISO Speed: 80
Exposure Bias: -
Flash Used: No
३.
Camera: KODAK EASYSHARE M853 ZOOM DIGITAL CAMERA
Exposure: 0.002 sec (1/597)
Aperture: f/5.6
Focal Length: 6.2 mm
ISO Speed: 80
Exposure Bias: -
Flash Used: No

तिन्ही फोटो अपलोड करताना 800 x 600 pixels मध्ये आणले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. सुर्यास्ताचे गाव

कॅमेरा- निकॉन डी५१००
f/11, 1/500 sec., ISO-100, 55 mm.

गिम्प मध्ये संस्करण आणि कात्रण. (संस्करणः कलर लेव्हल्स वापरून रंग उठावदार केले, डोंगररांगांना इ. ना सिल्युएट-ईश केले.)

२.

कॅमेरा- निकॉन डी५१००
f/11, 1/100 sec., ISO-100, 18 mm.
फोटो फक्त कातरला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

फोटोग्राफीतले मास्टर दिसताय नाईले (मराठी उच्चार काय आहे हो? Wink )

आकाशातले फोटो घेण्यातला हातखंडा माहिती होता. पण निसर्गाचे हे चित्रण अप्रतिमच.
कृष्णधवल फोटो अतिशय सुंदर

ऋ ला शतशः धन्यवाद की त्याने त्याच्या सुपीक मेंदूतून फोटो स्पर्धेची ही सुपीक कल्पना बाहेर काढली आणि नाईल महोदयांचे हे अफलातून चित्रण नजरेस पडले.

बाकीच्यांचे फोटो पण खूप छान आहेत. पण हे दोन्ही फोटो (कदाचित रंगांतील विरोधाभास असल्यामुळे असेल) पण जबरदस्त नजर खेचून घेत आहेत एवढे नक्की... Smile

नाईल अभिनंदन... एकदम जबरदस्त फोटो आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीत नाईलचे न्हाईल केले तरी चालेल. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आज भा.प्र.वे. नूसार रात्री १२:०० वाजता ही पहिली स्पर्धा संपेल. त्यानंतर आलेली चित्रे स्वीकारता येणार नाहीत.
मात्र याच विषयावरची तुम्ही पाहिलेली इतरांची प्रताधिकारमुक्त / योग्य त्या परवानगीने चित्रे इथे डकवू शकता.
सर्व सहभागी सदस्यांचे अनेक आभार मानतो.

उद्या सकाळी या पहिल्या आव्हानाचा विजेता घोषित करणार आहे व बॅटन त्या व्यक्तीच्या हाती पुढील पाक्षिकाचे च्यालेंज द्यायला सोपवणार आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अनेकांनी आपल्या गावाचे -शहरांचे छान फटु इथे डकवले आहेत. इथे मी दिलेल्या आव्हानावर मी जो निकाल देतो आहे त्याला अर्थात माझी समज, दृष्टीकोन आणि मुख्यतः माझी आवड याची चौकट आहे (आणि बहुदा प्रत्य्के पाक्षिकात ती असेलच) तेव्हा एखादे चित्र जिंकले किंवा ते सर्वोत्कृष्ट आहे/नाही यापेक्षा ते आव्हानदात्याला सर्वाधिक 'आवडले' इतका अर्थ लावणे सर्वात योग्य ठरावे.
आता माझ्या मतांकडे वळतो

तृतीय क्रमांक: (विभागून)
रवि यांचे "निळ्या तळ्याकाठी" आणि नाईल चे सूर्यास्ताचे गाव. ही दोन्ही चित्रे अगदी मासिकांत असतात इतकी नेटकी आणि नेमकी आहेत. योग्य रंगसंगती, नेमकी साधलेली वेळ, प्रकाशाचे 'जमून' आलेले गणित या सार्‍या जमेच्या बाजू. मात्र मला दोन्ही चित्रांत काही मिसिंग वाटलं असेल तर कथावस्तू. दोन्ही चित्रे बघत रहाविशी जरूर वाटतात, मात्र मला सहज सांगतील अशी कथा ती चित्रे सांगत नाहीत

द्वितीय क्रमांकः
धनंजय यांचे धुकट-पावसाळी दिवशी बाल्टीमोर बंदर. मुळात संस्कृतमधे ढ्गाळ वातावरणाला - दुर्दिन म्हणतात (संदर्भ जावे त्यांच्या देशा हंगेरी), तर अश्या दुर्दिनी छायाचित्रण करायला जाणे या उत्साहाचे कौतूक आहेच पण इतक्या कमी प्रकाशातही तुलनेने इतक्या सुस्पष्टपणे करण्यात मला छायाचित्रकाराची कमाल वाटते. खरंतर एखाद्या सूर्योदयाच्यावेळी, मागून सूर्य उगवत असताना बंदराने कातरलेले आकाश दाख्क्वणे छायाचित्रकारासाठी खरे 'फोटोजेनिक' आहे, मात्र इतक्या कमी प्रकाशातही जवळजवळ डोळ्यांना दिसतील इतके तपशील अचुक उतरवणारे हे चित्र मला आवडले.

प्रथम क्रमांक:
दिलेला विषय होता माझं शहर/गाव. यात त्या शहराचे व्यक्तीमत्त्व उभे करणारे चित्र मला सर्वाधिक आवडले. ते चित्र म्हणजे विसुनाना यांचे तिसरे चित्र. दुभंग व्यक्तीमत्त्वाचे शहर असे त्यांनी म्हटले आहे. मात्र ते लिहिले नसते तरी त्यांना जे म्हणायचे आहे ते या चित्रात दिसते. पडझड झालेली आणि तरीही गजबजलेली जुनी वास्तु आणि डोळे पोहोचे पर्यंत पसरलेले, नव्याने उभे राहिलेले शहर नेमके पकडले आहे. आपल्या शहराविषयी बरेच काही सांगु पाहणारे हे चित्र मला सर्वाधिक आवडले!!

विसुनाना! अभिनंदन!

ओव्हर टु यु! नवा धागा काढून नवा विषय द्यावा ही विनंती!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धागाकर्त्याने पहिल्या पंधरवड्याच्या स्पर्धेत मी काढलेले एक छायाचित्र सर्वोत्कृष्ट म्हणून निवडले याचा आनंद वाटला. ते छायाचित्र सुखावह नाही. त्यात एक अस्वस्थता आहे.
त्यामानाने इतरांनी काढलेली अनेक छायाचित्रे नयनरम्य आणि मनाला शांती देणारी आहेत. तरीही त्या छायाचित्राची निवड झाली हे पाहून थोडे आश्चर्य वाटले.

तर, येत्या पंधरवड्याच्या स्पर्धेचा विषय आहे - "घर"

या विषयाला कोणतेही बंधन नाही. ते घर कोणाही प्राण्याचे असू शकेल. माणसाचेच हवे असे नाही. उदा. ते एक घरटे असू शकेल, एक शिंपले असू शकेल, एक झोपडी असू शकेल...इ. किंवा या विषयाला अनुसरून एखादे काव्यात्म छायाचित्र असू शकेल.

संपादकांनी तसा धागा जरूर निर्माण करावा.

अवांतर :
याचा विचार झाला तर बरे होईल :
हौशी छायाचित्रकारांनी काढलेली एकाच विषयावरील विविध प्रकाशचित्रे/छायाचित्रे यांना प्रसिद्धी मिळावी म्हणून ही मालिका सुरू केलेली आहे. अशी स्पर्धाच असू नये असे मी म्हणणार नाही. पण हे विजेते वगैरे जुणी एकानेच निवडावे असे मला वाटत नाही. इथे बरेच छायाचित्रकार हौशीपणाच्या पार पोचलेले आहेत. छायाचित्रांच्या अंगभूत गुणदोषांवर (तांत्रिक आणि कलात्मक) अशा काही अनुभवी लोकांनी मते व्यक्त करावीत/माहिती द्यावी असे वाटते. त्याचा इतर सर्वांनाच फायदा होईल आणि अशा चर्चां सार्थ ठरतील. तसेच 'थम्ब्स' (अ‍ॅन्ड्रॉईड) अ‍ॅप्लिकेशनप्रमाणे सर्वच वाचकांकडून छायाचित्र आवडले/नावडले/दोन्ही नाही (कदाचित रोचक/निरर्थक/सर्वसाधारण) अशी श्रेणी देण्यात यावी आणि त्यानुसार निर्णय व्हावा. विजेत्याने फक्त पुढील पंधरवड्याचा विषय द्यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळा धागा निर्माण केला आहे.

पण हे विजेते वगैरे जुणी एकानेच निवडावे असे मला वाटत नाही. इथे बरेच छायाचित्रकार हौशीपणाच्या पार पोचलेले आहेत. छायाचित्रांच्या अंगभूत गुणदोषांवर (तांत्रिक आणि कलात्मक) अशा काही अनुभवी लोकांनी मते व्यक्त करावीत/माहिती द्यावी असे वाटते.

अनेक हौशीपणाच्या पार पोचले आहेत हे मान्य! Smile एकच परिक्षक ठेवण्यामागे माझ्या डोक्यात एक कारण आहे. परिक्षक हा स्वतः स्पर्धक असु शकत नाही. याऐवजी इथे प्रत्येकाला स्पर्धक होण्याचा चान्स मिळातो Smile अर्थात यावरही उपाय करता यावा.

छायाचित्रांच्या अंगभूत गुणदोषांवर (तांत्रिक आणि कलात्मक) अशा काही अनुभवी लोकांनी मते व्यक्त करावीत/माहिती द्यावी असे वाटते. त्याचा इतर सर्वांनाच फायदा होईल आणि अशा चर्चां सार्थ ठरतील.

अशी मते व्यक्त करण्यास मंजूरी आहेच. स्पर्धाकाळात व्यक्त करताना कदाचित बंधने येतील म्हणून स्पर्धा संपल्यावर प्रत्येक चित्रावर याच धाग्यावर सांगोपांग चर्चा करता येईलच! किंबहुना ती तशी व्हावी ही अपेक्षा आहे.

इतरांना विजेत्यापेक्षा दुसरे चित्रे आवडले असेल तर ते का आवडले वगैरे चर्चाही आवडेल (अर्थात विजेत्या किंवा परिक्षकावर वैयक्तीक टिपण्या टाळून हेवेसांन). त्यानिमित्ताने वेगवेगळ्या चित्रांची सौदर्यस्थळे उलगडली जातील.

सर्वच वाचकांकडून छायाचित्र आवडले/नावडले/दोन्ही नाही (कदाचित रोचक/निरर्थक/सर्वसाधारण) अशी श्रेणी देण्यात यावी आणि त्यानुसार निर्णय व्हावा.

कल्पना छान असली तरी आव्हान देण्यार्‍याचा दृष्टीकोन आणि बहुमत यात अंतर असु शकते. अशावेळी आव्हान देणार्‍याला देते वेळी जे अपेक्षित होते तेच विजेता ठरेल असे नाही. म्हणून हा पर्याय टाळला होता. शिवाय प्रत्येक सदस्यास प्रतिसादाला श्रेणी द्यायची सुविधा देखील नाही. बहुदा असे करण्याआधी तांत्रिक बदल करावे लागतील. तेव्हा आहे त्याच प्रकारे स्पर्धा चालवून स्पर्धा संपल्यावर हव्या त्याच चित्रावर सखोल चर्चा करावी असे वाटते.

इतर ऐसीच्या सदस्यांना काय वाटते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्व विजेत्यांच अभिनंदन. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

या स्पर्धेमुळे काही रोचक छायाचित्रं पाहायला मिळाली. शहर म्हटल्यावर फक्त छान दिसणारी चित्रं द्यायची असतात या समजाला छेद देणारी छायाचित्रं विसुनाना आणि आतिवास यांनी दिली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. शिवाय शहरं म्हणजे त्यात माणसं आणि त्यांचं दैनंदिन जीवनसुद्धा येतं ही महत्त्वाची जाणीव त्यांत दिसते. औद्योगिक क्रांती आणि नंतर जागतिकीकरणासारख्या घटकांमुळे शहरांचे चेहेरेमोहरे बदलले त्याचं प्रतिबिंब धनंजयच्या बंदरातल्या छायाचित्रात उमटलं हीदेखील मला आवडलेली एक गोष्ट होती. या निमित्तानं 'शहर' या संकल्पनेविषयीची मला आवडलेली काही छायाचित्रं :

'पुणे - क्वीन ऑफ द डेक्कन' या पुस्तकात संदेश भंडारे यांच्या पुण्याविषयीच्या छायाचित्रांचा समावेश आहे. त्यातली काही इथे पाहता येतील. पुण्यातले पेन्शनर, पडणारे वाडे अशी वैशिष्ट्यं त्यात टिपलेली दिसतात. त्यांच्याच ब्राह्मण या मालिकेतले क्रिकेट खेळणारे बटू, मोटारसायकलला किक मारणारा किंवा बसमध्ये चढणारा ब्राह्मण अशी छायाचित्रं माणसांची वेगळी रूपं दाखवतात आणि म्हणून शहराचंही वेगळं दर्शन घडवतात. 'देवडी', किंवा 'बहुरुपी' अशा त्यांच्या मालिकांतसुद्धा शहराचं दर्शन घडतं.

रॉबर्ट द्वानो या फ्रेंच छायाचित्रकारानं काढलेलं हे रस्ता क्रॉस करणार्‍या मुलांचं छायाचित्र पाहा :

किंवा त्याचंच हे गमतीशीर छायाचित्र पाहा :

अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला, आपल्या शहरात घडत असतात. त्या पकडण्याचा प्रयत्न करणं हादेखील माझ्या मते आपल्या शहराचं प्रतिबिंब दाखवणं आहे.

एखाद्या अवचित पडलेल्या पावसात आपलं शहर वेगळं दिसू लागतं (कार्तिए-ब्रसाँ) :

किंवा ब्रसाँनीच टिपलेलं शांघाय शहरातलं एक बोलकं दृश्य :

पॉल स्ट्रँड या अमेरिकन छायाचित्रकाराला दिसलेला वॉल स्ट्रीट माणसांना कसा खुजा करतो आहे ते पाहा :

यासाठी केवळ न्यू यॉर्क आणि पॅरिसमध्येच तुम्ही राहात असावं असं नाही. कोणत्याही शहरात त्या त्या शहराच्या अशा विशिष्ट गोष्टी, किंवा कोणत्याही शहरात घडू शकतील अशा पण नेहमी दिसणार्‍यापेक्षा वेगळ्या गोष्टी दिसू शकतात. ते ठळक व्हावं म्हणून ही काही उदाहरणं. इतरही पुष्कळ जालावर मिळतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

फोटोंद्वारे आलेल्या कल्पना रोचक आहेत. मला रवि यांचे दुसरे चित्र विशेष आवडले. त्यात त्यांनी शिताफिने बनविलेला "Ouchy" छानच जमला आहे.

स्पर्धेच्या निमित्ताने ताजे फोटो काढावेत असं ठरविल्याने थोडी भटकंती करायला अनायासे कारण मिळाले. सुर्यास्ताचा फोटो काढण्याकरता वाढलेल्या आद्रतेचा मान्सूनचा ढगाळ दिवस मी निवडला होता. पण सुर्यास्त होईतो वातावरण बदलले. मान्सूनच तो, इथून तिथून सारखाच. सुर्यही त्या दिवशी अपेक्षपेक्षा जास्त तळपत होता, त्यामुळे चित्राची मजा कमी झाली असे माझे मत आहे. पण जमेची बाजू अशी की त्या निमित्ताने फोटो काढायला आलेल्या फ्री लान्स प्रोफेशनल छायाचित्रकारांच्या ओळखी झाल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मला विसुनानांनी दिलेला पहिला फोटो आवडला. ऐतिहासिक, भव्य-दिव्य वास्तू जी मोडकळीला आलेली नाही, पण रया जाते आहे, एका बाजूला दिव्यांचा भगभगीत प्रकाश आहे, खालच्या बाजूला भव्य-दिव्य वास्तूच्या विपरीत टपर्‍या टाईपची दुकानं आहेत. एक प्रकारचा भकासपणा या चित्रातून जाणवला, तो शहराचा एक गुणधर्म वाटतो.

आतिवासचा दुसरा फोटोही आवडला. कंपोझिशन म्हणून. पण फोटोमधे यूव्ही फिल्टरची आवश्यकता होती आणि/किंवा त्या दिवशी व्हिजिबिलीटी फार नसावी त्यामुळे धूसरपणा आहे. त्याला इतर काही इलाज असतो का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण फोटोमधे यूव्ही फिल्टरची आवश्यकता होती आणि/किंवा त्या दिवशी व्हिजिबिलीटी फार नसावी त्यामुळे धूसरपणा आहे. त्याला इतर काही इलाज असतो का?

बहुतेक त्या दिवशी प्रकाश जास्त असावा. जास्त उन्हामुळे असा धुसरपणा अनेकदा दिसतो. त्याचा परिणाम कमी करण्यासाठी नॅचरल डेन्सीटी फिल्टर वापरला जातो. दुवा

अधिक वाचन. १. २.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

+१ मलाही पहिला फोटो आवडला (३ रा बराच अधिक आवडला तरी पहिला आवडलाच). उत्तम कथा सांगत होता. एकूणच विजेचा प्रचंड वापर, तरीही काहीसा भकासपणा, वास्तुपेक्षा बाहेरच्या ठेल्यांवरच असलेली अधिक गर्दी वगैरे छान टिपले आहे.

अतिवासतैंचे फोटोचे विषय छान होते पण प्रकाश आणि चौकट ठरवताना अधिक सावधानता हवी होती असे वाटले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अदिती, Nile, ऋषिकेश, आभार.
फोटो ८ एप्रिल रोजी सकाळी अकराच्या सुमारास काढला आहे - दिल्लीच्या उन्हात.
फिल्टर म्हणजे काय, तो कसा वापरायचा असतो याबाबत माहिती नाही. Nile यांनी दिलेले दुवे वाचेन.
ऋषिकेश, प्रकाश आणि चौकट याबाबत जाणून घेण्यासाठी मेल करते आहे तुम्हाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विसुनाना यांच्या कॅमेर्‍यात सोय असेल का माहित नाही. पण तिसर्‍या फोटोत अ‍ॅपरचर कमी करून (फ/२.८ च्या ऐवजी फ/११+) केल्यास पार्श्वभुमीचे शहर जास्त सुस्पष्ट झाले असते. (दुवा)

अतिवास यांच्या पहिल्या फोटोत पुढच्या कमानीच्या जवळ जाऊन त्यातून पुढील कमानीचा फोटो घेतला असता तर कदाचीत फोटो अधिक प्रभावी झाला असता असे वाटते. शिवाय समोरचे दगड क्रॉप करून काढल्यास चित्र अधिक प्रभावी होईल. दगडांमुळे चित्रात डिस्ट्रॅक्शन वाढते आहे. (दुवा)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

उत्तम उपयुक्त दुवे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे खरे की कॅमेर्‍यात मॅन्युअल अ‍ॅड्जस्टमेंटची सोय आहे. पण त्या सोयी कशा वापराव्यात ते माहित नाही. तुम्ही दिलेले दुवे उपयुक्त आहेत. पण बर्‍याच वेळा (जेव्हा फोटोग्राफी हा मुख्य उद्देश नसतो आणि वेळही कमी असतो तेव्हा) कॅमेरा पॉईंट आणि शूट असा वापरावा लागतो. केवळ हौस म्हणून मॅन्युअल मोडमध्ये प्रयत्न केला आहे. (उदा. चंद्राचे फोटो किंवा फुलांचे फोटो काढताना.) पण तो हमखास यशस्वी होईलच याची खात्री नाही.
मॅन्युअल मोडमध्ये लागणारे स्थिरतेचे कसब कसे बाणवावे तेही सविस्तर लिहावे. ( उदा. श्वास रोखणे वगैरे...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे आहे. मॅन्युअल मोड मध्ये वेळ बराच जातो. काही ठिकाणी हा वेळ वाचवण्याच्या माझ्या स्वतःच्या क्लृप्त्या आहेत त्या इथे सांगतो.

कॅमेर्‍यात असणार्‍या मोड डायलचा आणि डिफॉल्ट मोडचा उपयोग करून बर्‍याचदा वेळ वाचतो. http://en.wikipedia.org/wiki/Mode_dial (वेगवेगळ्या कॅमेर्‍यांत अशा प्रकारची सेटिंग्ज वेगवेगळ्या ठिकाणी (डायलवरच असेल असे नाही) असू शकते.)

उदाहरणार्थ, तुमच्या तिसर्‍या फोटोत मागचे शहर फोकस मध्ये येण्याकरता तुम्हाला अ‍ॅपरचर लहान करायचे आहे (डेप्थ ओफ फोकस वाढवायची आहे) पण त्याच वेळेला तुम्हाला एक्सोजर, आयएसओ इत्यादी गोष्टी मात्र कॅमेर्‍याने निवडाव्या असे सेटिंग्ज निवडल्यास 'ट्रायल अ‍ॅन्ड एरर' चा वेळ बराच वाचतो. डायलवरील A / Av मोड मध्ये अशी सोय करता येते. त्या उलट शटर स्पीड, आयएसओ वगैरे ठरविण्याचे 'मोड'ही उपलब्ध असतात.

इतर मोड जसे की सनसेट वगैरे वापरण्याचाही फायदा असतो. सर्वच एसएलआर कॅमेरे(आणि बरेचसे पाँईट अ‍ॅन्ड शूट) फोटोवर संस्करण करतात. म्हणजे की फोटो घेतल्यानंतर एक ठराविक प्रकारचं स्मूदिंग कॅमेर्‍यातच केलं जातं. वेगवेगळे मोड ठरविल्याने तुम्ही एक प्रकारे कॅमेर्‍याला संस्करण कसे करावे याचा प्रेफरंस देत असता.

श्वास रोखण्याचे कसब सवयीने जमेल असे वाटते. मी सहसा श्वास आत घेतल्यावर श्वास रोखतो आणि मग सोडतो. पण फोटो घेण्याचा पहिला नियम म्हणजे नेहमी ट्रायपॉड जवळ बाळगा. अगदी ट्रायपॉड घेणं जमणार नसेल तर किमान मोनोपॉड जवळ ठेवा. (दुवा) ट्रायपॉडसुद्धा दोन तीन प्रकारचे असलेले बरे. जर जड लेन्स वापरत असाल तर चांगला स्टर्डी ट्रायपॉड हवा, हलक्या कॅमेर्‍या करता, मॉडरेट शटरस्पीडकरता साधा ट्रायपॉड चालून जातो. कितीही प्रयत्न केलात तरी पॉडशिवाय लो शटर स्पीड असल्यास फोटो हलतोच.

कॅमेर्‍यातील डिजिटील एक्पोजर, व्हाईटबॅलंस इत्यादी गोष्टीही बदलून अनेकदा चांगले परिणाम दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

माझ्यासारख्या हौशी छायाचित्रकारांना ही माहिती उपयुक्त आहे. ट्रायपॉड गरजेचा आहे खरा पण प्रत्येकवेळी तो बरोबर घेऊन फिरणे थोडे दुरापास्त वाटते.
शिवाय माझ्या क्यॅमेर्‍यात रिमोट शटरची सोय नाही. Sad
(अशावेळी बर्‍याच वेळा मी टाईम डीले लावून क्यॅमेरा स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्रत्यक्ष एक्स्पोजरच्यावेळी क्यॅमेर्‍याला हात लावायची गरज पडत नाही. ;))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रथम मी आयोजक ऋषिकेश यांचे आभार मानतो की या नविन उपक्रमामुळे मलाही ऐसीअक्ष्ररे वर सक्रिय सहभाग घेता आला.
ईथुन पुढच्याही आव्हांनामधे जस शक्य होइल तसा सहभाग घेइलच.

इथे सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या वेगवेगळ्या दृष्टीतून साकारलेली चित्र पहायला मजा आली.

इथे माझी आणखी एक कलाकृती देन्याचा मोह आवरत नाहिये, खरतर ह एक video आहे पण जस flickr वाले म्हनतात की its like a picture but it moves.
http://youtu.be/mJcBS8ZvS3M
Time lapse या पद्ध्तिने बनवलेला हा विडिओ दर ५ सेकंदाला एक फोटो अशा अडिच तासांच्या फोटोंचा बनविलेला आहे.

-रवि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-रवी

क्या बात है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद.

-रवि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-रवी

लय भारी आहे हे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एकूणच ह्या धाग्याची कल्पना आणि आता सुरु झालेली चर्चा अतिशय रोचक होत आहे. विजेत्यांचं अभिनंदन !
आणि पुढ्च्या आव्हानासाठी शुभेछा !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे एक असंच हौस म्हणून.

सुपरट्रीज

Camera:NIKON D90
Lens: 18-105mm
F-Stop:f/5
Exposure:1/100
ISO:200
Focal Length: 22mm
Max Aperture: 3.8
No flash

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0