Skip to main content

एक्स्पर्ट केसाळ मनगट!

तो जेंव्हा कांदा बारीक चिरतो ,
योग्य आकाराची कढई निवडतो,
कांदा मोतिया रंगाचा होईपर्यंत परततो
एक्स्पर्ट,कामोत्तेजक मनगट!
वेगाने हलणारा कर्तबगार झारा

चिरलेली भाजी तो कढईत हलकेच टाकतो,
त्याच्या अंगातून झिरपत असतात
मोहक मायेचे कण .
ती मोहित होऊन पहात
राहते त्याच्याकडे , आणि मीठ
जास्त पडलेली भाजी
कविता म्हणून खाते .

----

रुची Thu, 26/05/2016 - 22:56

येऊ घातलेल्या विशेषांकाला साजेलशी कविता आहे! फक्त

त्याच्या अंगातून झिरपत असतात
पुरुषत्वाचे कण

असे लिहिले असते तर जास्त आवडले असते.

स्वयंपाकात प्रविण केसाळ मनगटे फारच जिव्हाळ्याची आहेत :p

आदूबाळ Fri, 27/05/2016 - 00:26

स्वयंपाकात प्रविण केसाळ मनगटांना केस स्वयंपाकात पडू नये म्हणून लै काळजी घ्यावी लागते. प० ल० को० घे०?

बॅटमॅन Fri, 27/05/2016 - 11:52

केसाळ मनगट जर फक्त स्वयंपाकघरातच अ‍ॅक्टिव्ह असेल तर चालणार नै अर्थातच. मग ना रहेगी कविता ना रहेगी भाजी.

तिरशिंगराव Fri, 27/05/2016 - 13:39

घाम खारट असतो, मग भाजी खारटणारच.

बॅटमॅन Fri, 27/05/2016 - 14:17

In reply to by तिरशिंगराव

चांगलंय की मग, मीठ कमी पडायचा सवालच येत नाही. "अहो ऐकलंत का मीठ कमी आहे" म्हणायचा अवकाश, भाळीचा किंवा हातीचा घाम पुसून टाकायचा. "अमुकतमुकच्या हातची" भाजी खाणे या वाक्प्रचाराला नव्याने आयाम मिळेल मग तर.

नितिन थत्ते Fri, 27/05/2016 - 17:47

In reply to by बॅटमॅन

हल्ली 'चांगली' भेळ, पाणीपुरी मिळणे दुरापास्त झाले आहे. भय्याकडची भांडी स्वच्छ वगैरे असतात आणि तो हातमोजेही घालतो.
(शिवाय बिस्लेरीचे पाणी वापरतो ते वेगळेच). कॉनष्टिपेशन झाल्यावर काय करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

अनु राव Fri, 27/05/2016 - 17:52

In reply to by मिलिन्द

पोद्दार गुजराथी का मारवाडी असतात पण पोतदार मराठी असतात ( आडनावात फक्त द आणि त चा फरक ). ह्या लॉजिक नी तुम्ही पद्की गुजराथी किंवा मारवाडी आहात का?

बॅटमॅन Fri, 27/05/2016 - 18:23

In reply to by अनु राव

काही पोद्देर नामक लोक बंगालीही असतात. मुजुमदार लोक मराठी आणि बंगाली दोघेही असतात. एका बंगाली मुजुमदारने शेकडो वर्षांपूर्वी त्याचे पूर्वज महाराष्ट्रातून बंगालात गेले असे मला सांगितलेले.

धनंजय Fri, 27/05/2016 - 19:38

In reply to by बॅटमॅन

थोड्या-थोड्या ध्वनिबदलाच्या कानगोष्टीच्या खेळात पुढे :
कोंकणीत पोदेर म्हणजे बेकरीवाला.

चिडवाचिडवीचा एक मंत्र मला आठवतो तो असा :
पोदेर, पोदेर पांव
हुंद्रांफाटीं धांव

(बेकरीवाल्या, बेकरीवाल्या, ब्रेडपाव \ उंदरांपाठीमागे धाव)

मिलिन्द Fri, 27/05/2016 - 22:11

In reply to by अनु राव

पदकी हे कारवार कडचे सारस्वत ("शेणवीपैकी" ). पत्की हे देशस्थ.
पदकी हे पूर्वी पथकाचे प्रमुख म्हणून "पथकी" होते अशी वदंता आहे .

धनंजय Fri, 27/05/2016 - 19:41

तिरपा ठसा नीटसा समजला नाही. तिरपे शब्द द्व्यर्थाचा भार अधिक वाहातात, किंवा असे काही आहे काय?

धनंजय Fri, 27/05/2016 - 23:04

In reply to by मिलिन्द

साधारणपणे अशा बाबतीत "लेस इझ मोर".

कधीकधी अधिकपणा परिणाम उलट कमीच करतो. "दॅट्स् फॅऽऽब्युलस!!!" किंवा "दॅट्स् फॅब्युलस" म्हणजे साधारणपणे "ते जे काय आहे, सुमार-ठीकठाक आहे, पण बोलणारा नेहमीच एखाद्या अतिशयोक्त शब्दावर फार जोर देतो" असा परिणाम होऊ होतो.

"थँक यू" किंवा "यू आर वेल्कम" म्हणजे कित्येकदा "मला खरे आभार मानण्याऐवजी काही रागाचे शब्द बोलायचे आहेत, पण तरी मी हे औपचारिक शब्द बोलत आहे", असा उलटा अर्थही निघू शकतो.

अर्थात नियम वगैरे काही नाही, तुम्ही ठशाची जी काय विचारपूर्वकच निवड केली असणार. मला स्पष्टीकरणाची मदत लागली, आणि तुम्ही ते मोठ्या मनाने समजावून दिले.

मिलिन्द Fri, 27/05/2016 - 22:05

थोर्थोर गुर्जी लोक हो , ज्या वेगाने तुम्ही केस आणि घाम भाजीत टाकलात ते पाहून थक्क झालो आहे. "("मराठी खवचटपणाला मोदीही डरतात" - जंगलातली एक जुनी म्हण ). कवितेचे लगेच संपादन करीत आहे.