रात्र - फसवी रात्र आणि कळंबोली नाका
मिलिन्द
रात्र कापीत बाहेर पडलो नव्या पहाटेकडे
कळंबोली नाक्यापाशी ट्रक आमचा अडे
वडा पाव, अंडा बुर्जी आधी खाऊन टाका
आणि मग भागवू चला बाकीच्याही भुका!
रात्र - फसवी रात्र आणि कळंबोली नाका
कळंबोली नाक्यावरती रात्र मारे हाका!
शादीसाठी केंव्हापन आपन तयार हुतो
टरक डायव्हरला पन पोरगी कोण देतो ?
बाप म्हणे तिचा " साला बाईकडे जातो!
आणि मग भxविच्यांना एड्स सुद्धा होतो"
आमची साली जिंदगी रस्ता घाटामधला
जालीम रात्र सरत नाही, ट्रक पुढे ढकला
आमची पण एक दिवस उपरवाला मारेल
एका रात्री मादरxद एड्स आम्हा गाठेल!
नवे युग, नवा यज्ञ, आहुती देऊन टाका
उद्या असेल एड्स पण आज टाळू फाका
रात्र - फसवी रात्र आणि कळंबोली नाका
कळंबोली नाक्यावरती रात्र मारे हाका!
---
सॅड
पण शेवटी 'जावे त्याच्या वंशा, तेंव्हा कळे' हेच खरं! :(
कविता आवडली...