"अमेरिकन पार्टी मध्ये भारतीय बाला"
अमेरिकन पार्टी मध्ये भारतीय बाला
वाइन थोडी चढली , चंद्र धुंद झाला
पलीकडच्या कोपऱ्यामधला रुंद छातीवाला
सूट बूट दाढीदिक्षित गोरा नजरी आला!
"कोण ग तो?" विचारे ती प्रिय मैत्रिणीला ,
"मार्केटिंग चा नवा व्हीपी , कालच रुजू झाला,
"येल" मधला एमबीए, गोल्ड मेडल वाला
"मार्क" असे नाव त्याचे , बॉस्टनवरून आला.
लाल लाल असे त्याची नवी लोम्बार्घिनी,
हातामधले घड्याळ जणू आय-पॅड मिनी ,
भले थोरले "डील" दिले, पर्क्स आणि मनी ,
आणि नसे गर्लफ्रेंड , गोरी किंवा चिनी"
अमेरिकन पार्टी मध्ये भारतीय बाला
बायोडेटा ऐकून चंद्र महा धुंद झाला,
"आता कमाल बघ माझी" म्हणे मैत्रिणीला
वरची दोन बटणे सोडी, शर्ट ढीला झाला.
हळू हळू सरकू लागे ती त्याच्या दिशेला,
दोन तीन पाय, अंगठे शिव्या देती तिला,
तीन-चार वाइन पेले धक्का खाऊन पडले,
सगळे मेले दारुवाले वाटे मध्ये नडले!
अखेर जेंव्हा पोचली ती आपल्या "मार्क" वरती,
धुंद होता चंद्र तिचा , धुंद होती धरती,
"हाय मार्क, आय एम लीना !" हात पुढे केला,
"ओ हलो !" मार्क म्हणे " "मार्क" म्हणती मला!"
"काय करता तुम्ही, कुठे आहे तुमचे गाव,
हा माझा जोडीदार, क्लार्क त्याचे नाव,
नुकतेच केले लग्न आम्ही, नव्या कायद्याखाली.
कमाल आहे, अचानक ही निघूनच का गेली?"
नव्या नव्या स्वर्गांमध्ये नव्या शोकांतिका,
तळ्यामधून "बदक" म्हणे "दूर राहून बघा"!
---
कल्पना लगेचच आली होती. पण छान
कल्पना लगेचच आली होती. पण छान आहे. आवडली.