व्यवस्था
रोज पिऊन मारे नवरा
व्यवस्थेचा नाग आहे,
वळ लपवून काम करणे
व्यवस्थेचा भाग आहे!
तुमच्या डोळ्यामधले पाणी
कोठेतरी जाग आहे,
"आज भांडी राहणार तशीच!"
विषादाची आग आहे.
दवाखाना, चांगला डॉक्टर,
तिला नेणे भाग आहे,
औषधाला पैसे देणे
हाही एक भाग आहे!
पण यावर उपाय काय?
मनामध्ये राग आहे,
लग्नसंस्था , असले नवरे,
देशावरती डाग आहे!
घ्याल तिची मुलगी दत्तक?
नाकारताना खेद आहे,
तुमची मुलगी होणार डॉक्टर
दोघींमध्ये भेद आहे!
कशी होणार तिची भांडी?
याचे उत्तर सोपे आहे,
या बाईला मुली खूप,
खाली तिचे डोके आहे!
पुसा पाणी डोळ्यामधले
आज घासा भांडी तुम्हीच
औषधाला पैसे देणे
इतकेच तुमच्या हाती आहे,
---
प्रतिक्रिया
क्या बात है. विषय आणि त्यातले
क्या बात है. विषय आणि त्यातले विचार आवडले नाहीत तरी चांगले लिहीले आहे हे मान्यच.
नक्की काय आवडले नाही?
धन्यवाद! विचारात तुम्हाला नक्की काय आवडले नाही हे समजले तर सुधारताही येइल.
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
विचारात तुम्हाला नक्की काय
अशी विचारात कधी सुधारणा करता येते का? तसे असते तर माझे विचार नसते का सुधारले ?
व्वा! खूपच छान!
व्वा! खूपच छान!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
कविता आवडली.
शेवटची ओळ दोनदा आली नसती तर कविता अजून जरा भेदक वाटली असती. (वैयक्तिक मत, काही स्पष्टीकरण नाही असे का वाटले त्याला.)
तुमची सुचना
धन्यवाद ! बदल करीत आहे!
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
मला तर कविता आवडली.
मला तर कविता आवडली.
मला तर कविता आवडली.
मला तर कविता आवडली.
मला तर कविता आवडली.
मला तर कविता आवडली.
अगदी व्यवस्थित कवीता.
actions not reactions..!...!