मनातले छोटे मोठे प्रश्न किंवा विचार - भाग ६४
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
===========================================================================================================
अनेक प्रकारची चीज़ेस अस्तित्वात आहेत. फ्रेश, एज्ड, ब्ल्यू, व्हाईट, इ.इ. चवी, टेक्श्चर, वास, इ. चे देखील अनेक ऑप्शन्स आहेत. त्यांपैकी गोडसर चवीचे चीज़ कुणी कधी पाहिले आहे काय? थोडके गूगल केले असता जास्त कै दिसले नाही म्हणून हा प्रश्न.
कॉटेज चीज एकदम मस्त असतं.
कॉटेज चीज एकदम मस्त असतं. फेंटली गोडसर असतं, असं मला वाटतं.
____
हां हे बघ विकीवरुन -
The curd is usually washed to remove acidity, giving sweet curd cheese.
कॉटेज चीज़ म्हणजेच पनीर ना?
कॉटेज चीज़ म्हणजेच पनीर ना? की पनीर हे एका प्रकारचे कॉटेज चीज़ असते?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पनीर? माहीत नाही. दोन्हींची
पनीर? माहीत नाही. दोन्हींची पद्धत्सेम आहे का? पण हे शुभ्र गठुळ्यावालं चीज लईच ब्येष्ट लागतं. लोक बरेचदा कॉटेज चीझ डायेट करतात असं ऐकलय.

धन्यवाद. कधी जमले तर ट्राय
धन्यवाद. कधी जमले तर ट्राय केले जाईल.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
गोडसर चीज
अनेक प्रकारची स्टिल्टन्स गोडसर असतात. आंबा आणि आल्याच्या स्वादाचे स्टिल्टन, क्रॅनबेरी किंवा एप्रिकॉट फ्लेवर्ड वेन्सिडेल्स बरीच गोडसर असतात.
त्याशिवाय बर्याच प्रकारांचे चीज (मच्युअर्ड चेड्डर), अॅपलवूड वगैरे गोडसर चटण्या, फळे किंवा जॅम वगैरे बरोबर चांगले लागतात. अगदी रॉकफोर्ट, गोर्गोंझोला सारखे ब्लूचीज आवडत असेल तर तेही पेअर, सफरचंदाच्या फोडींबरोबर चांगले लागते.
माहितीकरिता
धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
फीलिंग ब्लू
मला तर ब्लू चीज आणि फळ हे कॉम्बिनेशन आवडतंच, पण मग भारतीय गोडाची चव डोक्यात असलेल्या माणसाला हे सुचवावं का, ह्या संभ्रमात होतो मी
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
गोडसर का असावे बॅट्या? म्हणजे
गोडसर का असावे बॅट्या?
म्हणजे मुद्दाम साखर घातली तर होइल, पण गोडसर चीज का होइल?
ऊलट ते बॅक्टेरीया असेल ती साखर संपवुन टाकतील
चीज़चे इतके सारे विविध फ्लेवर
चीज़चे इतके सारे विविध फ्लेवर असतात म्हणतात, त्यात गोडसर फ्लेवरवाले कुठले आहे किंवा नाही इतकाच प्रश्न. बाकी मला माहिती नाही. मी डच गौडा (उच्चार खाउडा) चीज़ आणि भारतातले अमूलचे चीज खाऊन पाहिलेले आहे. दोन्हींची चव खारटच होती. खारट चव नसलेले, थोडी हलकीशी गोडसर चव असलेले कुठले चीज़ असेल तर बरे वाटेल ट्राय करायला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
क्रीम चीज हे गोड नसले तरी गोड
क्रीम चीज हे गोड नसले तरी गोड पदार्थांसाठी वापरले जाते.. चीजकेक वगैरे..
बाकी चीजचा आणि गोडाचा फारसा संबंध नसावा..
नाही गोड तरी
गोडाची व्याख्या काय ह्यावर हे बरंचसं अवलंबून आहे. फ्रान्समध्ये जेवणानंतरच्या गोड कोर्सऐवजी (किंवा त्यासह किंवा त्याआधी) विशिष्ट प्रकारच्या चीजची प्लेट देण्याची पद्धत आहे. त्यातले comté, gruyère किंवा camembert गोड आहेत असं म्हणता येत नाही, पण चालून जावीत. कधी त्याबरोबर किंचित जॅम किंवा फळं किंवा सुका मेवा वगैरे देतात. उदा. हे (गूगल ट्रान्सलेट वापरून) पाहा.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
धन्यवाद!
धन्यवाद!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
>>गोडाची व्याख्या काय ह्यावर
>>गोडाची व्याख्या काय ह्यावर हे बरंचसं अवलंबून आहे.
श्री. बॅटमॅन हे गोडाच्या भारतीय व्याख्येनुसार बोलत असावेत. (फ्रान्समधल्या नाही).
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
+१
श्री. थत्ते यांच्याशी सहमत आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
विषय
भारतीय गोडाची व्याख्या वापरायची तर मग चीज गोड नसतं. विषय संपला.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुका म्हणे त्यातल्या त्यात
नॉनखारट, नॉनकडवट असलेले अन्य माईल्ड फ्लेवर्ड चीज़ टाईप्स कुठले असतात?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
त्याचसाठी
त्यासाठीच वरचा प्रतिसाद होता. शिवाय, फुल क्रीम असलेली अनेक चीजं तशी असतात.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
धन्यवाद.
धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
त्या कॉफीच्या कपमधील कॉफी
त्या कॉफीच्या कपमधील कॉफी मलाच नग्न बाईसारखी दिसतेय की सर्वांना?

का डोळे बाहेर आलेल्या माणसाचा चेहरा आहे?
मला पाणघोडा ( सी हॉर्स )
मला पाणघोडा ( सी हॉर्स ) दिसतोय.
अनु उजवीकडे वरती पाहीलास का
अनु उजवीकडे वरती पाहीलास का सर्व्हे
तुला पाणघोडा बरा दिसला 
मला जे दिसलं त्यावर "लब्बाड. यातही नागडी बाई पाहिलीत ना!!" असं लिहून येतय. आता नग्न किंवा अनावृत्त शब्द तरी वापरायचा की नाही! शी बाई लाजच काढतात.
___
पाणघोडा म्हणजे सी-हॉर्स नाही ना गं? पाणघोडा तो जाडा गेंडासम प्राणी असतो ना जो पाण्यात पोहतो. मला मग त्यातल्या त्यात सी-हॉर्स वाटला.
____
आठवलं पाणघोडा = हिप्पोपोटॅमस.
कापुच्चिनो
तुला माझ्या हातची एक कापुच्चिनो लागू! डिकॅफ हवी असल्यास तशी बनवून देईन.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
टेक्सासला आले की मोका
टेक्सासला आले की मोका पिण्याचा मोका दे.
बाथरुमसंबंधी कायदा
अमेरिकेतील एका राज्यात 'तुमच्या जन्मदाखल्यावर लिहिलेल्या लिंगाचेच बाथरुम वापरावे' सदृश कायदा संमत झाल्यानंतर बराच गोंधळ झालाय असं दिसतंय. वरकरणी सुयोग्य कायदा वाटतोय. पब्लिक रेस्टरुम पाचदहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ वापरावे लागत नाही. पुरोगामी लोक नक्की काय आक्षेप घेत आहेत? अगदी केंद्र सरकारने त्या राज्याविरुद्ध कोर्ट केस वगैरे करण्याची धमकी देणे हा तर अतिरेक वाटतोय.
लिंगबदल झाल्यावर
लिंगबदल झाल्यावर जन्मदाखल्यावरचे लिंग बदलते का? नसेल तर अडचण आहे. अर्थात चेक कसे करणार कायदा करणाराच जाणे.
Hope is NOT a plan!
'तुमच्या जन्मदाखल्यावर
इतका हास्यास्पद कायदा नसेल! मोठा तार्कीक दोष आहे. जन्मदाखल्यावर लिहिलेले लिंग प्रत्येक व्यक्तीचे आयुष्यभर तसेच रहाते हा गैरसमज किमान अमेरिकेतल्या लोकांचा तरी नसेल वाटले होते. (तिथे तर लिंगबबदल शस्त्रक्रिया अधिकृत आहेत ना?). केवळा जन्मावेळी पुरुष असे दाखल्यावर लिहून, सज्ञान झाल्यावर लिंग शस्त्रक्रियेने काढून टाकलेल्या व्यक्तीने मुतार्यांमध्ये जाऊन कार्यभाग कसा उरकावा? (का कायद्यात याला एक्सेप्शन आहे?)
दुसरे म्हणजे दरवेळी बाथरूममध्ये जाताना हे आता जन्मदाखले मागणार की काय?
ऑन अ लायटर नोटः ट्रम्प करो आणि हा कायदा सार्वजनिक ठिकाणांपुरताच असो! घरात लोकांनी एक आणखी नवे बाथरूम बांधायचे म्हणजे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
का?
अधोरेखित भागाबद्दल प्रश्न, असं का वाटलं?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
रोचक
बरेच दिवस हा प्रश्न विचारीन म्हणतोय,
'रोचक' म्हणजे नेमकं काय?
आयुष्यभर स्वतःला मराठी म्हणवून घेऊनही हा शब्द इथे ऐसीवर येईपर्यंत गेला नव्हता.
तेंव्हा ऐसीवरचे जाणकार ह्या शब्दाचा अर्थ आणि जमल्यास उगम सांगतील काय?
रोचक म्हणजे आपल्या शुद्ध
रोचक म्हणजे आपल्या शुद्ध मराठीत इंटरेस्टिंग असावं
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ज्यात रुची वाटते ते रोचक..
ज्यात रुची वाटते ते रोचक.. म्हणजेच मराठीत इंट्रेस्टींग..
थत्तेचाचा आणि सप्रेसाहेब,
थत्तेचाचा आणि सप्रेसाहेब, अनेक धन्यवाद.
भूक प्रज्वलित
'रुची वाटेल असे' असा रोचकचा अर्थ मराठी जालवाल्यांनी लावलेला दिसतो. पण 'रोचक'चा संस्कृत अर्थ भूक आणि भूक लागवणारे औषध असा आहे.
ऐला हे माहिती नव्हते.
ऐला हे माहिती नव्हते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
पण 'रोचक'चा संस्कृत अर्थ भूक
असेल बुवा!
पण त्या अर्थाने रोचक तर ऐसीवरच्या पाककृतीही नसतात!
तरीपण संस्कृत अर्थ ध्यानात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
बाकी वेदान्तसूर्य बॅट्यालाही हा अर्थ माहिती नव्हता हे फारच 'रोचक' (रुची वाटेल असे) वाटलं!
मग आम्ही धोंडो भिकाजी जोशी बरे!!!
औषध!
असे आहे होय!
आम्ही तर ब्वॉ याचा अर्थ 'झुरळाचे औषध' असा लावला.
अस्तु.
(बाकी 'रोचक' नि 'रेचक' बिलकुल विरुद्धार्थी म्हणायचे...)
'रोचक' हा शब्द मराठी
(अन्नाची रुची वाटून) भूक वाढवणारे (औषध) ते रोचक हा देखिल तोच अर्थ आहे. कदाचित आपण इतर काँटेक्स्टमधे हा शब्द इतरत्र ऐकला नसेल इतकेच.. त्यामुळे हा अर्थ ऐसीवरचा अर्थ वगैरे नक्कीच नाही..
मान्य. माझे म्हणणे मागे घेतले
मान्य. माझे म्हणणे मागे घेतले
रोचक
शुद्ध मराठीतला अर्थ आणि जालावरचा अर्थ, कदाचित वेगळेही असू शकतील. काहीजणांना एखादी प्रतिक्रिया पाचक वाटत असेल तर काहींना ती रेचक ही वाटत असेल. काहींना रो(मां)चक वाटत असेल.
एकच, तो निपक्षपाती
बाकी सारेच पक्षपाती
अरेच्या! मला प्रतिसादाची
अरेच्या! मला प्रतिसादाची विंडो अशी वेगळी का दिसतेय? वरील आयकॉन्स दिसत नाहियेत
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
उजव्या बाजूला वर लब्बाडपणा
उजव्या बाजूला वर लब्बाडपणा केलात ना! भोगा आता कर्माची फळं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
झालं बघा दुरूस्त!
झालं बघा दुरूस्त!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तूच आहेस मोठ्या खोक्यांचा
तूच आहेस मोठ्या खोक्यांचा शिल्पकार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
च्चे
हे वाचलं होतं, तेव्हाच वाटलं होतं, की 'ऋ'चंच काम असणार हे!
ते असंच्चे.
पण मला वाटलं होतं तू अधिक 'चतूर' असशील!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
.
शेरलॉक मिहिरार्ती
शेरलॉक मिहिरार्ती
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
येस विंडो विचित्र
येस विंडो विचित्र आहे.
रच्याकने चक्का हे देखील एकाप्रकारचे चीज असते राईट?
Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.
चक्का म्हणजे चीज नव्हे. it's
चक्का म्हणजे चीज नव्हे. it's type of cream only.
चक्का आणि क्रीम मिळून sour cream करतात.
('विचित्र विंडो' टायटलमुळे एक क्षण चुकीच्या जागी प्रतिसाद पडल्यासारखं वाटलं)
विद्यापीठांमधील 'लिबरल' पूर्वग्रह (?)
http://www.nytimes.com/2016/05/08/opinion/sunday/a-confession-of-liberal...
हे होणं अपेक्षित आहे (विद्यापीठे 'लिबरल'च असणार) की उजव्या दृष्टीकोनास पुरेसा वाव न मिळणे चुकीचे आहे?
ये तो होना ही था. तरुण मंडळी
ये तो होना ही था. तरुण मंडळी आणि प्राध्यापक हे बहुतांश आदर्शवादीच असतात असं बर्नी सँडर्स म्हणाले होते. विद्यापीठांनी स्वतःस ते अधिकार देऊन टाकलेले आहेत (उजव्यांविरुद्ध भेदभाव करण्याचे). खरंतर विद्यापीठात सर्व चर्चा मुक्त पणे व्हायला हव्यात. अगदी सेडिशन चे चार्जेस ची भीती न बाळगता. त्यामुळे सर्व विचाराच्या मंडळींना वाव मिळावाच. त्याऐवजी आजकाल मुलांना मायक्रोअॅग्रेशन ची समस्या पडलेली असते. लिबरल या शब्दात घोळ झालेला आहे हे सुद्धा तितकेच खरे आहे. डाव्यांनी तो शब्द हायजॅक केलेला आहे असं आमचं मत आहे. Left has no business using that word to describe themselves. ज्यांना स्वत्:ची मतं इतरांवर कायद्यान्वये (म्हंजे बलपूर्वक) लादण्यात धन्यता वाटते ते लिबरल कसे ? उदा. किमान वेतन कायदा, भेदभाव विरोधी कायदे, सामाजिक सुरक्षेत योगदान करण्याची सक्ती वगैरे.
पण अशाच तुमच्या कल्पना मांडा
संस्थळावरतीही कोणी पर्फ्युम लावुन येतात कोणी आफ्टरशेव्ह लावुन, कोणी घामट्ट येतात तर कोणी प्रदुषण करतात


येस्स्स्स इथेही असं होतं.
प्रत्येकाने सांगा कोणाला कोणाचा पर्फ्युम कसा वाटतो.
___
मला अदितीचा -> रेड डोअर पर्फ्युम वाटतो -> sharp tingling पण पर्फ्युमच म्हणजे सुगंधच
.
अनु -> मला नेहमी नीट आंघोळ करुन फ्रेश आलेली आहे असे वाटते. ना ओव्हरपॉवरींग सुगंध ना बॉडी ओडर. एकदम फ्रेश नेहमी. कदाचित तिने तिची चंद्ररास मला सांगीतलेली असल्याने असेल. या कन्या जातकांना मला पार खिशात टाकता येतं राव
.
बॅट्या स्मोक करुन येतो सॉरी बॅट्या
.
प्रणव लहान वाटतात वयाने. इतरांपेक्षा लहान.
.
हां सखीही लहान वाटते.
.
गब्बरला पैशाचा, कोर्या करकरीत नोटांचा वास येतो, खिशातही नोटा बाळगुन असतो..... दिसतील अशा बर्का. बाकी सोन्याची अंगठी वगैरे काही तो घालत नाही पण नोटा दिसतीलशा ठेवतो.
.
मेघना येते तीच चष्मा सावरत हातात लठ्ठ पुस्तक सावरत. शबनम-सदृश बॅग असते तिच्याकडे पण त्यातही चिरीमिरी सामान , पुस्तके असतात.
.
प्रीतम रंजन हातात लहानसा ट्रान्सिस्टर कानाला लावुन शांत येतात, १० मिनिटात जातात. फारसे मिसळत नाहीत. पण त्यांच्या ट्रान्सिस्टरवरची सुरेल धुन मन प्रसन्न करते ब्वॉ.
.
सिद्धी - टोमॅटो च्या रोपाची कुंडी घेऊन येते.
.
पटाईतजी येताना २-४ संस्कृतप्रचुर पंडीतांना घेऊन येतात व त्यांच्याशी जास्त बोलतात, आमच्याशी कमी.
.
उसंत सखु - हसतमुख येतात, आल्या की इतरांना खुदुखुदु हसवतात
.
ढेरेशास्त्री प्रँक्स्टर वाटतात. खोडील (खोडकर) हसू असतं डोळ्यात.
.
मनोबा, अचरट, तिमा, थत्त्ते उम्म्म्म नाही सांगता येते. सॉरी.
.
पण अशाच तुमच्या कल्पना मांडा.
नि-षे-ध
मी परफ्यूम वापरण्याचे कष्ट घेते असं सुचवणाऱ्या शुचिचा नि-षे-ध. डोकं तापल्यामुळे घामाघूम होऊन चिकट्ट, कळकट्ट असते असं म्हणालीस तरी चालेल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
Hey I am talking abt the user
Hey I am talking abt the user (सदस्य) experience. Experience is one of the main differentiators between us & our competitors .... blah blah blah
हळूहळू देऊन क्लायंटस बेस टिकवायचा असतो.

तुला कळलं असेलच की मी मीटींगवरुन परत आलेय
.
आपण जर एक प्रॉडक्ट असू तर आपल्या बरोबर इन्टरॅक्ट करणारे युझर्स असतात आणि माझ्याहून दुसरं कोणी का प्रिफर केलंजातं हे त्या युझर-एक्स्पिरीयन्स्वरती अवलंबून असतं आणि अर्थात तुमच्याकडे ऑफर करायला काय आहे त्यावरही.
.
____
मग मला जर काही युझर्स टिकवायचे असतील तर एक तर तो युझर एक्स्पिरीअन्स तरी इम्प्रुव्ह केला पाहीजे किंवा अधिकाधिक ऑफर केलं पाहीजे. म्हणून सगळे फीचर्स एकदम देऊन टाकयचे नसतात तेजायला.
युहु!!!
____
मीटींगा ही चढायला लागल्यात
बॅट्या स्मोक करुन येतो सॉरी
रोफल
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
शुचि तुझ्यासाठी Fragrance
शुचि तुझ्यासाठी Fragrance .. Aqua di gio -अरमानी
Composition of the perfume is compared with woman who is ''strong, dignified and free spirit but in perfect harmony with nature''.
हेय खरच? थँक्स.
हेय खरच?
थँक्स.
तू एस्टी लॉडर चा - मॉडर्न म्युस - ला रुज ट्राय केलायस का ? बर्यापैकी फॉर्मल आहे. मला क्वचित आवडतो क्वचित नाही. पण एक आहे. सिंथेटिक पेक्षा , प्युअर कॉटन कपड्यांना पर्फ्युम (कोणताही) सुट होतो.
___
पण माझा क्लिनिक चा "अॅरोमॅटिक एलिक्झर" च आहे अनेक वर्षांपासून. एका स्त्रीला इतका आवडला होता. तिने विचारलं काय लावलयस काय तू? किती छान वास आहे. पण फार सिरीयस आहे. मूड बर्यापैकी डाऊन रहातो.
____
एलिझाबेथ टेलरचा "व्हायोलेट आइज" सुपर्ब्ब्ब्ब्ब्ब्ब आहे. मला टेक्सासची आठवण येत. तिथे मी वापरला होता. - it is feminine, captivating, sophisticated and intriguing. ................... अतिशय खरे. फार सुरेख आहेहा पर्फ्युम. फार!!!
_____
सखी तू लावतेस तो कसा आहे फ्लर्टेशिअस , फेमिनाइन वगैरे? अजुन एक तो फ्रुटी आहे की फ्लोरल की मस्क बेसड?
___
मी साबांना रोझ डॅब ऑन दिला काही दिवसांपूर्वी. मला स्वतःला प्युअर रोझ आवडत नाही कारण तो खाण्याचा इसेन्स वाटतो. मात्र साबांना आवडतो.
मी वापरून बघेन नक्की .
मी वापरून बघेन नक्की .
सध्याचा 5th Avenue Gold Elizabeth Arden . मस्त आहे .
हा फ्लोरल आहे . म्हणजे मलातरी तसा वाटतो.
अजून एक burberry Body .
ह्म्म्म burberry
ह्म्म्म burberry पाहील्यासारखा वाटतो.
माझ्या मते कपड्यांइतका एसेन्शिअल पर्फ्युम असतो. One must wear both.
पण लाईट असावा बस्स.
येस
येस
काही कलिग्ज जस अॅलर्जिक
काही कलिग्ज जस अॅलर्जिक असतील तर मात्र पंचाइत होते. पण डिओ ला पर्यायच नाही. मग सरळ सुगंध नसलेला डिओ वापरावा.
कॉन्फिडन्स जातोच १००%.
___
आय कॅनॉट फेस वर्ल्ड विदाऊट डिओ
थत्तेचाचा पर्रिकर आहेत.
थत्तेचाचा पर्रिकर आहेत.
Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.
ओबामा सरकारने जसा
ओबामा सरकारने जसा "अॅफोर्डेबल हेल्थकेअर" मुद्दा धरुन लावला तसा या वेळी कोणता प्रेसिडेंट कोणता मुद्दा धरुन लावतो ते पहायला मजा येइल.
एक शंका आहे - जसे EHR(Electronic Health Records) चा प्रकल्प २०२० पर्यंत चालेल असे ऐकून आहे, अशा ऑनगोइंग प्रकल्पांचे काय होते? म्हणजे नवे सरकार आल्यावर ते बारगळतात की कसे?
प्रकल्पाचे फंडिंग आधीच झालेले
प्रकल्पाचे फंडिंग आधीच झालेले असेल किंवा प्रकल्प स्वयंपूर्ण असेल तर प्रकल्प बारगळत नाही.
बाजपेयी सरकारचा सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प नंतर बदललेल्या सरकारने पूर्ण केला. कोकण रेल्वेचा प्रकल्प खर्या अर्थाने व्ही पी सिंग सरकारच्या काळात मार्गी लागला पण ते सरकार अल्पजीवी ठरूनही तो प्रकल्प नंतर पूर्ण झाला. आधीच्या युतीसरकारच्या काळातले मुंबई परिसरातील उड्डाणपुलांचे अपूर्ण प्रकल्प नंतरच्या सरकारने पूर्ण केले.
EHR सारखाच भारतातला आधार कार्डाचा प्रकल्प आहे. तोही मोदी सरकारने पुढे चालवला आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
अच्छा फंडींगवर अवलंबुन असते.
अच्छा फंडींगवर अवलंबुन असते. बरोबर. थँक्स थत्ते.
जे स्वताच्या खव बंद ठेवतात
जे स्वताच्या खव बंद ठेवतात त्यांना दुसर्यांच्या खव वाचायला परवानगी असु नये.
हाहाहा. मनोब ऐकतोयस ना?
हाहाहा. मनोबा ऐकतोयस ना?
खायची फुले
शेवग्याची फुले आणि कधीतरी केळफूल(याला फूल म्हणावं का?) सोडल्यास इतर फुले मी खाल्ली नाहीत. आपल्याकडे अजून कोणती फुले खाल्ली जातात?
कॉलीफ्लॉवर
कॉलीफ्लॉवर
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
(No subject)
वेगवेगळे फुली उमलली...
१) कुड्याची फुले - कोकणात झुडुपे असतात. आजोबा लहानपणी खात असत.
२) गुलाब - गुलकंद वगैरे रूपात.
३) बंगालमध्ये लाल भोपळ्याची फुले, दुधी भोपळा कुटुंबातील वेलींची फुले, अगस्ती/हादग्याची फुले, पांढरी कमळे (फुले - देठ नव्हे) वगैरे अनेक फुलांची भजी/वडे करतात.
शंका
कोणाच्या लहानपणी?
राजा-राणीची फुले
गुलमोहराची लाल फुले मी लहानपणी खात असे!
घरासमोरच झाड होते आणि उन्हाळ्याच्या दिवसांत लालभडक फुलांनी बहरून जात असे. आम्ही त्याला राजा-राणीची फुले म्हणत असू. किंचित आंबट-तुरट चव अद्याप जीभेवर आहे!
स्त्रिया काही सेन्सिटिव्ह
स्त्रिया काही सेन्सिटिव्ह बोलल्या तर पुरुष ते वक्तव्य हे एका व्यक्तीचे आहे असा विचार करू शकतो. (प्रत्येक वेळी करतोच असे नाही. पण करू शकतो.)
पण पुरुष काही सेन्सिटिव्ह बोलला तर स्त्रिया त्या वक्तव्याकडे हे एका व्यक्तीचे वक्तव्य आहे असं न पाहता हे एका पुरुषाचे वक्तव्य आहे असे पाहतात.
(ही वाक्ये व्यक्तीची आहेत की पुरुषाची ?)
प्लीज थिअरी कळण्यासाठी २
प्लीज थिअरी कळण्यासाठी २ उदाहरणे द्या.
एका रसिक दर्दी प्रेक्षक व्यक्तीचे म्हणुन घेत नाही.
उदा. - मधुबाला सुंदर आहे असे पुरुष म्हटले की स्त्रिया ते पुरुषाचेच्च म्हणुन घेतात
.
पण तसच आहे स्त्रीने एखादा शेर पेश केला तर त्याला दाद अज्जिबात मिळत नाही जितकी की तोच शेर पुरुषाने पेश केला असता तर जितकं डोक्यावर घेऊन नाचले असते.
.
म्हणजे पुरुषही वरील आरोपाचे गुन्हेगार आहेतच.
उदाहरण
अलिकडेच "स्त्रियांना पुरुषांची गरज केवळ अपत्यप्राप्तीसाठीच असते" असे विधान ऐसीवरच एका स्त्री आयडी ने केले होते. त्यावर फार काही गदारोळ झाला नाही. ते 'व्यक्तीचे' विधान म्हणून समजले गेले.
हेच विधान (शब्दांची अदलाबदल करून) पुरुष आयडीने केले असते तर ते व्यक्तीचे म्हणून समजले गेले असते याबाबत शंका आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
धन्यवाद थत्ते. उदाहरण मार्मिक
धन्यवाद थत्ते. उदाहरण मार्मिक आहे.
पण पुरुष काही सेन्सिटिव्ह
हे वाक्य एक पुरुष विशिष्ट स्त्रीबद्दल बोलतोय का समस्त स्त्रियांबद्दल? तसे असेल तर पहिला तर्क फोल ठरतो
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
Venezuela declares state of
Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.
Venezuelan President Nicolas
Venezuelan President Nicolas Maduro announced a sweeping crackdown Saturday under a new emergency decree, ordering the seizure of paralyzed factories, the arrest of their owners and military exercises to counter alleged foreign threats.
मजा अशी आहे की दर वेळी हे असे डावे कम सोशॅलिस्ट प्रयोग होतात तेव्हा त्यातून ज्या समस्या उद्भवतात त्यासाठी डावे कम सोशॅलिस्ट्स हे कधीच जबाबदार नसतात. त्यासाठी नेहमी उद्योजक, व्यापारी, दलाल, विरोधीपक्ष, परकीय शक्ती हेच जबाबदार असतात. आणि मग वंचितांना न्याय मिळायचा राहून जातो. वंचितांचे अध्वर्यु हे शेवटी इमर्जन्सी सारख्या उपायांवर घसरतात. वंचितांमधे फार ताकद असते असं मी ऐकलेलं आहे पण नेमक्या अशा वेळी ती निष्प्रभ कशी होते तेच मला समजत नाही. तीच ताकद अन्नपदार्थांची रेलचेल, सुबत्ता, स्थैर्य, प्रचंड प्रगति यासारख्या बाबी का निर्माण करू शकत नाही ?
वंचितांमधे फार ताकद असते असं
वा! मस्त शब्दयोजना.
येनार येनार येनार कधी येनारे?
येनार येनार येनार कधी येनारे? उत्सुकता अधिक चाळवायची असेल तर काही तोंडाळ आय डीं मध्ये नक्की काय आहे ती बित्तंबातमी पेरुन ठेवा.






मी ऑलरेडी किंचित पब्लिसिटी केलेली आहे.
_____
फक्त काकडी नको मेदुवडेही हवेत
नको तिथे दात काढायची तुझी सवय कधी जाणार शुचे?
रहस्यभेद
येनार येनार येनार
कोणीतरी धाग्यावर लिहीलेले
कोणीतरी धाग्यावर लिहीलेले होते ते मी विसरले आहे. तेव्हा परत एकदा - इंग्रजी भाषेत खरवसाला निदान खरवसाच्या दूधाला काय म्हणाल?
>>खरवसाच्या दूधाला काय
>>खरवसाच्या दूधाला काय म्हणाल?
colostrum
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
धन्यवाद थत्ते
धन्यवाद. इथे विकत मिळतय का ते पहाते. आमचं विस्कॉन्सिन तर दूध-चीज करताच प्रसिद्ध आहे.
"अंगडाई" या शब्दावर खरं तर
"अंगडाई" या शब्दावर खरं तर शारीरीक कृतीवरती इतके सुंदर सुंदर शेर उर्दूत आढळतात. इंग्रजी तर बंडलच आहे पण मराठीतही समर्पक शब्द नाही. हां - आळोखेपिळोखे म्हणता येइल पण तो स्त्री स्पेसिफिक नाही.
अंगडाइ कशी प्रेयसीच देते. आणि कातिल अदाच असते
पण मराठीतही समर्पक शब्द
कारण मराठी पोरी उगाच अंगडाई देत बसत नाहीत!!
झोपेतून उठल्यावर कंबर कसून कामाला लागतात!!!
किंवा
... कंबर कसून ती कमी करायच्या कामाला लागतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
.
ममता सुद्धा
हिन्दीत तर ममता सुद्धा अंगडाईया देते
https://www.youtube.com/watch?v=WiYscnj_L7A&t=4m12s
खारवलेली लिंबं म्हणजे नक्की
खारवलेली लिंबं म्हणजे नक्की काय?
"कमिटमेन्ट अँग्झायटी" होते का?
लग्न करण्याआधी जशी "कमिटमेन्ट अँग्झायटी" होते, आपला निर्णय बदलावासा वाटतो, तशी "कमिटमेन्ट अँग्झायटी" प्रेसिडेंट फायनलिस्टसन होतच असणार. "सावधान! वेळ आहे तोवर मागे वळ. पुढे अतिप्रचंड जबाबदारी आहे."
काँग्रेस नक्की कधी फुटेल?
काँग्रेस नक्की कधी फुटेल? पंजाब नंतर की युपी नंतर?
आणि कोणाच्या नेतृत्त्वाखाली?
तुम्हाला काय वाटते?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सामर्थ्य की दौर्बल्य
काल वॉट्सॅपवर एकाने 'लागणे' ह्या मराठी क्रियपदाचा विविध प्रकारे उपयोग केलेला एक परिच्छेद पाठवला.
त्यावर मराठी भाषा कशी सामर्थ्यशील आहे अशा आशयाची चर्चा सुरू झाली. तेव्हा माझे म्हणणे असे पडले की, जर एकच शब्द विविध अर्थाने वापरायला लागत असेल तर ते त्या भाषेचे शब्दसंपत्तीदारिद्र्य आहे. ते काही त्या मंडळींस पटले नाही.
ऐसीकरांचे यावर काय मत आहे?
नाही पटत. एकच शब्द संपूर्णतः
नाही पटत.
एकच शब्द संपूर्णतः असंबंधित अर्थांनी वापरला जाणं हे सामर्थ्याचंच लक्षण आहे. उदा० ठेला. (१) पानसिगरेटी/किरकोळ वस्तू विकणारं दुकान; (२) बांबू किंवा वेतापासून बनवलेलं जाड पोतं; (३) लडदू, फोद्या, बेढब पुरुष.
पण समजा एकाच वस्तूतले सूक्ष्म फरक / छटा दाखवायला वेगळे शब्द नसून एकच घाऊक शब्द असेल, तर ते नक्कीच दारिद्याचं लक्षण आहे.
********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson
जगातील कोणत्याही भाषेतील
जगातील कोणत्याही भाषेतील कोणताही शब्द कोणत्याही काँटेक्स्टमधे कसाही हमखास वापरता येतो यात भाषेच्या गरीबी श्रीमंतीचा संबंध नाही.
actions not reactions..!...!
कलाकृतीपेक्षा मोठे होण्याचा
कलाकृतीपेक्षा मोठे होण्याचा अट्टाहास असू नये - अमका ढमक्यापेक्षा मोठा नसतो. अमकं ढमक्यापेक्षा मोठं नसायला हवं वगैरे वाक्यांतून काय साध्य होतं ? चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार आहेत की जे दिग्गज आहेत. त्यांनी अनेक उत्तम कलाकृति केलेल्या आहेत व त्यामुळे त्यांचा एकप्रकारचा रुतबा, दबदबा असतो. मग ती व्यक्ती आपोआप कलाकृतिपेक्षा मोठी होते की नाही ??
मुक्ताबाईंची वाक्ये हे word salad नैय्ये का ?
गब्बरसिंग हे व्यक्तीकडील
गब्बरसिंग हे व्यक्तीकडील "पैसा" ही काहीतरी सॅक्रोसँक्ट गोष्ट मानतात. माणसाकडे असलेल्या पैशाचे नियंत्रण अजिबात करू नये असे मानतात. परंतु माणसाकडे असलेल्या इतर शक्तींचे नियंत्रण समाजाने दमन करावे असे मानतात असे दिसते.
म्हणजे गब्बरसिंग यांच्यापेक्षा बलवान असलेल्या माणसाने ताकदीने फडतूस असलेल्या गब्बरसिंग यांच्याकडून सर्व पैसा मालमत्ता हिसकावून घ्यावी आणि सरकारने त्या बलवान माणसाच्या विरोधात काही कृती करू नये या माझ्या सुचवणीला त्यांनी पाठिंबा दिल्याचे स्मरत नाही.
गब्बरसिंगच नव्हे तर बहुतांश लोक या सुचवणीला पाठिंबा देताना दिसत नाहीत.
पैसा ही ताकद शारिरिक ताकदीपेक्षा उच्च का समजावी?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
माणसाकडे असलेल्या पैशाचे
इतरांनी नियंत्रण करू नये.
जोपर्यंत दुसर्याला त्रास देत नाही तोपर्यंत इतर शक्तींचे सुद्धा दमन करू नये.
ज्याचे त्याने ठरवावे की त्याने कोणती ताकद उच्च समजावी ते.
>>जोपर्यंत दुसर्याला त्रास
>>जोपर्यंत दुसर्याला त्रास देत नाही तोपर्यंत इतर शक्तींचे सुद्धा दमन करू नये.
दुसर्याला त्रास कसला? बलवानाने फडतुसाला लुबाडावे, दडपावे हेच योग्य आहे ना? फडतूस म्हणणारच अन्याय-त्रास वगैरे. तिकडे कशाला लक्ष द्यायचे?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
बलवानाने फडतुसाला लुबाडावे,
फडतूस लोक एकत्र येऊन सरकारकरवी (आर्थिक दृष्ट्या) बलवानाला पिळतात (उदा. चैनीच्या वस्तूंवर अतिरिक्त विक्रीकर) त्यावेळी ते बलवान असतात की फडतूस ?
त्यापुरते ते बलवान बनून
त्यापुरते ते बलवान बनून संख्येने कमी असलेल्या फडतूस श्रीमंतांना दडपतात.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मला कळले
नाही थत्ते, मला कळले गब्बरना काय म्हणायचे आहे ते.
गब्बर म्हणतात - जोपर्यंत दुसर्याला त्रास देत नाही तोपर्यंत इतर शक्तींचे सुद्धा दमन करू नये. => जर दुसर्याला त्रास झाला तर त्या त्रास देणार्याच्या शक्तीचे दमन सहसा केले तर चालते.
मग जर बलवानांनी फडतूसांना त्रास दिला तर बलवानांच्या शक्तीचे नियंत्रण झालेले सहसा चालते.
अर्थात फडतूस मग संख्याबळाचा वापर करुन, सरकारला हाताशी धरुन, बलवानांच्या शक्तीचे दमन्/नियंत्रण करताना दिसतात.
.
आहे की लॉजिकल (कन्सिस्टंट) सगळा सिक्वेन्स.
बाय द वे, अमेरीकेत पोहताना शू
बाय द वे, अमेरीकेत पोहताना शू केली तर आजूबाजूचं पाणी निळं होतं. बर्याच जणांना हे माहीत नसतं म्हणून या माध्यमाद्वारे धोक्याची सूचना देण्यात येत आहे. मी कधी कोणाभोवती निळे झालेले पाहीले नाही पण ऐकून आहे
अमेरीकेत पोहताना शू केली तर
खरंं आहे. हल्ली नवीन जे क्लोरिनेटिंग एजन्ट्स येतात त्यात एक कंपाउंड असतं जे मूत्रातील युरियाबरोबर रिअॅक्ट होऊन निळा रंग पसरवतं.

म्हणून मी माझ्या पाहुण्यांना आधीच बाथरूमला जाऊन या असा आग्रह करतो.
जर माझ्या पूलचं पाणी निळं केलं ना तर लगेच फोटो घेऊन तो फेसबुकावर छापीन!
हां, नसते लाड नाहीत!!!!
हाहाहा
हाहाहा
आणि पवायची चडी नीळ घालून
आणि पवायची चडी नीळ घालून धुतलेली असली तर?
********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson
सॉलिड! हा नीळ प्रकार मी
सॉलिड! हा नीळ प्रकार मी विसरलेलेच.
आमी तर ऐसीवरच्या आयडीपुरत्या
आमी तर ऐसीवरच्या आयडीपुरत्या निळ्यालाही तो दोनदा आमच्याकडे आला असतांनाही 'पवायला चल' असं म्हणालेलो नाही तर नीळवाल्या चड्डीला कुठे अलाव करणार?

(No subject)
वरिजनल भेसळ नाय!
माजा रंग एकदम वरिजनल आहे अजिबात भेसळ नाय, तो असल्या क्लोरिन फिरीन ने जात नाय.
-Nile
भगवे करा
वर आकाश (बर्याचदा) निळे असते. जर पूलाच्या टाईल्सही निळ्याच (बहुधा असतात) असतील तर, निळ्यात निळे उठून दिसणार नाही.
म्हणून तो फॉर्म्युला बदलून, पाणी भगवे होईल असे करावे, असे सुचवावेसे वाटते!
गोमूत्र टाकले तर भगवे होते
गोमूत्र टाकले तर भगवे होते म्हणे.
Hope is NOT a plan!
चंद्रशेखर ह्या आय डीनी ऐसीवर
चंद्रशेखर ह्या आय डीनी ऐसीवर इतिहासविषयक काही लेख लिहिले आहेत. त्यांची लिंक मिळेल का? त्यांचे ऐसीवरचे समग्र लेखन कसे वाचता येईल? त्यांचा ब्लॉगही आहे. पण मला त्यांच्या ऐसी लेखनावरचे प्रतिसाद हवे आहेत. मला ते मिळत नाहीयेत. माझे काय चुकतेय?
इथे पहा
http://aisiakshare.com/user/385/authored
सदस्याचे खाते -> सदस्याचे लेखन इथे संकलित असते.
-Nile
आभार
खूपच आभारी आहे.
लोकसत्ता वगैरे
लोकसत्ता वगैरे वर्तमानपत्रांचे इथे (आय डी/त्यांचे लेखन) वर लक्ष आहे हे पाहून खरं तर संकोचाने हादरायला झाले आहे. आतातरी आचरटपणा, बालीशपणा थांबवला पाहीजे
ट्रॅकर
तुमच्यावर तर ट्रॅकरच लावलाय असं ब्याट्या मिहीरला सांगताना मेघनानं ऐकल्याचं अदिती घासू गुर्जींना सांगत होती असं मनोबा म्हणत होता म्हणे.
-Nile
...
असे 'लोकसत्ते'त छापून आले होते काय? नसल्यास उपयोग नाही.
कोणाला रस असल्यास. भारतीय
कोणाला रस असल्यास.
भारतीय सरकारी बँकांची अवस्था भीषण झाली आहे. काही निमीत्तानी थोडा विदा बघत होते, तर विचार केला इथे ही डकवावा.
एनपीए खुप वाढले आहेत हे आपण वाचत असतो, पण अॅब्सोल्युट आकड्यांवरुन काही अर्थ लावता येत नाही. म्हणुन ह्या काही बँकांचा ग्रॉस एनपीए जर भरुन काढायचे म्हणले तर सध्याच्या क्यु४ निकालाप्रमाणे किती तिमाही लागतील हे बघत होते.
ग्रॉस एनपीए भागिले ( नेट प्रॉफिट अधिक प्रोव्हिजन्स ), असे काढले आहे.
required to Wipe out Gross NPA
Bank
Bank
required to Wipe out Gross NPA
हे गणित सुद्धा ह्या गृहितावर
हे गणित सुद्धा ह्या गृहितावर की अजुन कर्जे एनपीए होणार नाहीत.
हे महिने नसुन तिमाही आहेत हे लक्षात घ्या. काही बँका कधीच बाहेर येणार नाहीत असे वाटते.
अनुत्पादिक कर्जे ( कारण भ्रष्टाचार ) आणि इन-एफिशियन्सी मुळे खुप कमी मार्जीन. सरकार बेल-आउट करुन मोठा फुगातर करणार नाही ना ही शंका. त्यात मुद्रा ( तारणा शिवाय कर्ज ) , जनधन वगैरे नी अजुनच कठीण स्थिती होऊ शकते.
----
एसबीआय आणि ब्यांक ऑफ इंड्या
एसबीआय आणि ब्यांक ऑफ इंड्या यांचा उल्लेख नै दिसला तो? त्या बहुधा सर्वांत मोठ्या बँका आहेत ना सर्कारीपैकी?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अजुन रीझल्ट लागायचे आहेत
अजुन रीझल्ट लागायचे आहेत बॅटोबा त्यांचे.
अच्छा धन्यवाद.
अच्छा धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
खाजगी ब्यँका कमी गाळात आहे
खाजगी ब्यँका कमी गाळात आहे यात काहीच आश्चर्य नाही. त्या जनहितार्थ काही करतच नाहीत. फक्त धंदा करायला बसल्या आहेत.
सरकार व सरकारी आस्थापनांचा उद्देश लोककल्याण आहे, प्रोफीट झाले तर चांगले पण लोककल्याणाचा बळी देऊन नाही
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जनहितार्थ हा मुखवटा आहे ऋ.
जनहितार्थ हा मुखवटा आहे ऋ. खरा प्रश्न भ्रष्टाचाराचा आहे. मल्या ला कुठल्याही तारणा शिवाय लोन कसे मिळते? आधी पैसे खाऊन लोन द्यायची, मग ती फेडता येत नाहीत म्हणुन अजुन द्यायची आणि अजुन पैसे खायचे. ह्या बँकेतले लोक, राजकारणी , उद्योगपती (?) सर्वच सामिल आहेत.
जनहितार्थ फार काही नुकसान होत नसावे बँकांचे कारण त्यातल्या बर्याच योजनांच्या मागे सरकार असते ( फक्त ह्या मुद्राचे तसे वाटत नाही ).
सरकार व सरकारी आस्थापनांचा
परमेश्वरा, सुखी रहा रे बाबा.
मला वाटतं नितिशकुमार** यांचा डॉक्टरल थिसिस मागवून घ्यावाच लागेल शिकागो विद्यापीठातून.
( हे बिहार चे मुख्यमंत्री नव्हेत. हे नितिशकुमार शिकागो विद्यापीठात अर्थशास्त्रात डॉक्टरेट करत आहेत. )
( नेट प्रॉफिट अधिक
करण्याचा हेतू कॅश प्रॉफिट काढणे हा आहे का? बँका कॅशफ्लो स्टेटमेंट प्रकाशित करत असतील तर "नेट ऑपरेटिंग कॅशफ्लो" हा जास्त चांगला इंडिकेटर आहे. (म्हणजे त्यात बेलाऊटवाला फायनान्सिंग कॅशफ्लोपण येणार नाही, आणि करंट एनपीएचा निगेटिव्ह इन्व्हेस्टिंग कॅशफ्लोपण येणार नाही.)
-----
हा रेशो एकपर्यंत जाणंच भितीदायक आहे. रेशो एक म्हणजे तीन महिन्यांत कमावलेले सगळे पैसे एन्पीएच्या बादल्या भरण्यात जाणार तर. चोपन्न वगैरेचा रेशो भयंकरच आहे.
********
"General Montgomery does not cheat – whether that is due to his innate honesty or the fact that I watch him like a cat does not matter."
- General Sir Brian Robertson
( नेट प्रॉफिट अधिक
हो, म्हणजे बँकांकडे सरप्लस कीती जमा होतोय ये बघण्यासाठी. फक्त प्रोफिट घेत नाही कारण तो पूर्ण पण प्रोव्हिजन्स कीती ठेवतायत त्यावर अवलंबुन आहे.
मी हे गेले २-३ वर्ष ट्रॅक करते आहे. सरकारी बॅ़का नॉर्मली ८-१२ तिमाहींच्या रेंज मधे असायच्या. ते सुद्धा फारच असायचे. १२ तिमाही म्हणजे, ३ वर्ष मिळवलेले सर्व पैसे वाया घालवायचे एनपीए साठी आणि ते सुद्धा नविन एनपीए तयार नाही झाले असे समजुन.
खाजगी बँकांचे एनपीए खुप कमी नसतात पण त्या ग्राहकाकडुन वेगवेगळ्या प्रकारे पैसे उकळुन मार्जिन चांगले ठेवतात.