Skip to main content

सावरकरांनी मराठीला दिलेल्या शब्दांबाबत

सावरकरांनी अनेक नवे शब्द मराठीला दिले.
त्या सर्वांची "अधिकृत" यादी आणि ते सर्व शब्द सावरकरांनी कोणत्या लिखाणातुन ( वर्तमानपत्र / पुस्तक ई.) जगासमोर मांडले त्यांचे अधिकृत स्त्रोत / संदर्भ मिळु शकतील काय?
मोघम संदर्भ नको. एखादे छापील पुस्तक / लेख / वर्तमानपत्र ई. प्रकारचे काही असेल तर चांगले.
आगाऊ धन्यवाद.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

ग्रेटथिंकर Thu, 24/03/2016 - 20:46

सावरकरांचा उद्देश मराठी समृद्ध करण्याचा न्हवता, मराठी भाषेवरचा फार्सी प्रभाव नष्ट करुण मराठीचे संस्कृतकरण त्यांना करायचे होते.

Thu, 24/03/2016 - 20:48

In reply to by ग्रेटथिंकर

ठिक आहे.
पण मी वेगळाच प्रश्न विचारला आहे. आपण चर्चेला देत असलेले वळन या लेखात खरचे अनुरुप आहे का त्याचा पुर्नविचार करावा.

बॅटमॅन Thu, 24/03/2016 - 21:06

In reply to by ग्रेटथिंकर

सावरकरांचा उद्देश मराठी समृद्ध करण्याचा न्हवता, मराठी भाषेवरचा फार्सी प्रभाव नष्ट करुण मराठीचे संस्कृतकरण त्यांना करायचे होते.

काय योगायोग आहे नै! तीनेकशे वर्षांपूर्वी एका मराठी राजालाही असेच वाटले होते म्हणून त्याने राज्यव्यवहारकोश तयार करवून घेतला. :)

गब्बर सिंग Fri, 25/03/2016 - 20:57

In reply to by ग्रेटथिंकर

सावरकरांचा उद्देश मराठी समृद्ध करण्याचा न्हवता, मराठी भाषेवरचा फार्सी प्रभाव नष्ट करुण मराठीचे संस्कृतकरण त्यांना करायचे होते.

(१) भाषेमधे इतर भाषेतले शब्द येऊन ती समृद्ध होते का ? ती अशा पद्धतीने समृद्ध व्हावी ही अपेक्षा सुयोग्य आहे का ?
(२) की इतर भाषेतले शब्द न येता तिची मूल-शब्दावली अबाधित राहील हे पाहणे हे सुयोग्य आहे ?
_________(२.१) भाषेची मूल शब्दावली अबाधित राहील हे पाहणे जर सुयोग्य असेल तर इतर भाषांमधील शब्द (जे मराठीमधे आलेले आहेत) ते शोधून त्यांचे भाषांतर करून किंवा त्यांना
_____________निर्मूलित/वगळून्/निष्कासित करून भाषेची मूल शब्दावली राखून ठेवणे हे सुयोग्य ठरते का ?
(३) इतर भाषांचा प्रभाव कमी करणे हे सुयोग्य असेल तर फारसी चा प्रभाव कमी करणे हे अयोग्य का ?
(४) इतर भाषांचा प्रभाव कमी करणे हे अयोग्य असेल तर त्याचा अर्थ इतर भाषांचा प्रभाव वाढू देणे हे बर्‍यापैकी योग्य मानायला हरकत नाही. मग संस्कृत चा प्रभाव वाढवणे हे अयोग्य आहे का ? असल्यास का ?
(५) संस्कृत ही मराठीची जननी आहे असं मी ऐकलं होतं. पण ते खोटं आहे असं गृहित धरूया. संस्कृत ही मराठीची जननी नाही असं मानू. मग संस्कृत मधून शब्द उचलले तर ते अयोग्य व फारसीमधून शब्द उचलले तर ते योग्य असं म्हणायचंय का ?
(६) Contrary to (२.१) above - सावरकरांनी जे शब्द सुचवलेले आहेत ते फारसी शब्दांना पर्याय/विकल्प म्हणून आहेत ना ? फारसी शब्द वापरण्यास प्रतिबंध केलाय का ?

अरविंद कोल्हटकर Fri, 25/03/2016 - 00:09

'सावरकर-शब्दांची अधिकृत यादी' अशी काही करता येणार नाही, मराठीच्या कोणा चांगल्या अभ्यासकाने जुनी वृत्तपत्रे, भाषणे, अन्य लेखन असे धुंडाळून स्रोतांसह काही यादी केली तर ती विश्वसनीय यादी म्हणता येईल.

तसे काही कोणी करेपर्यंय तूर्तास सावरकरांशी संबंधित ह्या संस्थळामधील पुढे दिलेली यादी उपलब्ध आहे. हे संस्थळ चालवणारे चालक कोण आहेत, त्यांच्या शब्दांवर आपण कितपत अवलंबून राहायचे असे अनुत्तरित प्रश्नहि आहेत. पण यादीवर दृष्टि टाकल्यास इतपत मान्य व्हायला प्रत्यवाय नसावा की हे शब्द अलीकडच्या काळात मराठीला आधुनिक रूप मिळाल्यानंतरचे दिसतात. ह्याचे कारण म्हणजे त्या शब्दांमागच्या संकल्पना आधुनिक काळाच्या आहेत, प्राचीन भारताशी संबंधित दिसत नाहीत आणि ते शब्दहि जुन्या संस्कृत साहित्यामध्ये भेटत नाहीत. यादी अशी:

क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधि, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनि, दूरदर्शन, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्त वेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित.

(ह्यांपैकी नेपथ्य आणि वेतन हे जुनेच शब्द असून ते अनुक्रमे मोवि/मोल्सवर्थ कोशांमध्ये भेटतात.)

असे शतावधि अन्य शब्द असल्याचेहि तेथेच म्हटले आहे पण ते काय असावेत ह्याविषयी काही मार्गदर्शन दिलेले नाही. 'शतावधि' ह्या विशेषणाचा वापर सावरकर-अभिमानाचा आणि सावरकर-भक्तीचा भाग असावा असे सध्यातरी म्हणावे लागते.

(ह्या संदर्भामध्ये 'उपक्रम' ह्या आता सुप्तावस्थेतील संस्थळावरील हा लेख अवश्य दृष्टीखालून जावा असे वाटते. सावरकरी शब्द आणि अन्य अनेक समान्तर मुद्द्यांना तेथे अभिनिवेशविरहित स्पर्श केला गेला आहे.)

बॅटमॅन Fri, 25/03/2016 - 12:06

In reply to by नितिन थत्ते

येस्स, तोच संदर्भ डोक्यात आला होता पण अर्थ बघायचा आळस केला.

http://spokensanskrit.de/index.php?beginning=0+&tinput=+keelaka&trans=T…

साधारण तसाच अर्थ आहे- खिळा, मोळा, पाचर, काडी, वगैरे. किल्ली हा अर्थ जास्ती चपखल आहे.

ऋषिकेश Fri, 25/03/2016 - 15:03

In reply to by नितिन थत्ते

हॅ तसं नैये कै.. ते श्रीयुत हनुमान यांच्या (की) लकमुळे (लकं) हे स्त्रोत्रेअ श्री रामाला ऐकवायला मिळातेय असा आहे ;)

अभ्या.. Fri, 25/03/2016 - 20:03

In reply to by बॅटमॅन

किलक राष्ट्र म्हणजे पाचर मारल्यासारखे दोन शत्रुराश्ट्रातले छोटे राश्ट्र (सावरकरांनी हा शब्द बहुधा तिबेटला बफरस्टेट असे उद्देशून समानार्थी वापरला होता)

चार्वी Fri, 25/03/2016 - 00:04

सावरकरांनी भाषाशुद्धीविषयीची लेखमाला १९२५च्या आसपास 'केसरी'त लिहिली असा उल्लेख वाचल्याचे आठवते. बर्‍याच संस्थांनी सावरकर समग्र वाङ्मयाचे खंड प्रकाशित केले आहेत. या खंडांत भाषाशुद्धी लेखमालेच्या शेवटी अशा शब्दांची यादी सापडेल असे वाटते.

अरविंद कोल्हटकर Fri, 25/03/2016 - 00:32

दिनांक, रंगपट, रंगावृत्ती, स्थायी समिती, स्वाक्षरी, स्थानक, आयुक्त, कोषाध्यक्ष, प्रेक्षागृह, दिनदर्शिका, धनादेश हे शब्दहि सावरकरांचीच निर्मिति असल्याचे वर उल्लेखिलेल्या 'उपक्रम'मधील लेखांवरील चर्चेत येऊन गेले आहे.

ग्रेटथिंकर Fri, 25/03/2016 - 14:23

तहसीलदार= प्रांताधिकारी
तारिख= दिनांक
मी वर म्हणाल्या प्रमाणे फक्त फारसी शब्द हुडकून त्याचे संस्कृतप्रचूर भाषांतर केले गेले आहे,त्यामुळे भाषाशुद्धी हा खरच हेतू होता का याविषयी शंका वाटते.

ग्रेटथिंकर Fri, 25/03/2016 - 14:23

तहसीलदार= प्रांताधिकारी
तारिख= दिनांक
मी वर म्हणाल्या प्रमाणे फक्त फारसी शब्द हुडकून त्याचे संस्कृतप्रचूर भाषांतर केले गेले आहे,त्यामुळे भाषाशुद्धी हा खरच हेतू होता का याविषयी शंका वाटते.

बॅटमॅन Fri, 25/03/2016 - 14:57

In reply to by नितिन थत्ते

शिवचरित्रप्रदीप नामक पुस्तक भारत इतिहास संशोधन मंडळाने पब्लिश केलेले आहे-रादर पुनर्मुद्रित- त्यात हा कोश बघावयास मिळेल. माझ्याकडे कॉपी आहे, जमल्यास उद्यापरवा त्यातले काही श्लोक इथे पेस्टवतो.

पीडीएफ असल्यास माहिती नाही, शोधून पाहतो.

बॅटमॅन Fri, 25/03/2016 - 15:03

सध्या नमुन्यादाखल हे आर्टिकल पहा.

https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A…

त्यातले श्लोक खालीलप्रमाणे:

अमात्यः स्यात् मजुमदारः सेनाकर्ता हुकूमतः ||
वाकनीसोऽपि मंत्री स्यात् न्यायाधीशोऽप्यदालतः |
कारमुल्की तु सुमंत्रः स्यात् सभासद् स्यात् मजालसी ||
शाहजादा राजपुत्रः प्रधानः पेशवा तथा |
सामंतोऽस्तु वजीरः स्यात् सैन्यं लष्करमीरितम् ||
सरनोबतस्तु सेनानी जुमलेदारः शताधिपः |
पदातिसैन्यं हशमं प्यादा पत्तिः प्रकीर्तितः ||
तत्र सरनोबतो यस्तु दलवायी स ईरितः |

वगैरे. एकूण अमरकोशाप्रमाणेच याची रचना आहे. धुण्डिराज व्यास नामक पंडिताने याची रचना केली.

मेघना भुस्कुटे Fri, 25/03/2016 - 15:22

मूळ धाग्याशी फारकत घेणारा प्रतिसाद आहे, त्याबद्दल आधी माफी मागते...

शिवाजीने राजव्यवहारकोश आणला, त्यावरून त्याचं कौतुक होतं आणि सावरकरांनी भाषाशुद्धीचा प्रयत्न केला तर त्यांना बोल लावला जातो, याकडे बहुधा बट्टमण्णराय लक्ष्य वेधून राहिले आहेत. त्यांना उद्देशून प्रश्न. तेव्हा शिवाजीसाठी एतद्देशीयांची अस्मिता जागृत करणं हा महत्त्वाचा भाग होता. एरवी त्याच्यासारखा प्रॅक्टिकल माणूस राज्याभिषेकासारखं सव्यापसव्य, त्यासाठी पेश्शल काशीहून विद्वान आणवून, करता ना. त्यात भाषा हे अतिमहत्त्वाचं साधन हे त्या हुशार माणसानं हेरलं आणि राजव्यवहारकोश बनवला. हे छानच आहे.

पण आपण इतकी वर्षं मुस्लीम (आणि तेव्हा परकीय असलेले) शासक पचवून झाल्यानंतर आणि मराठीनंही त्यांतले अनेक शब्द आपल्या अंगी सहजी मुरवून घेतल्यानंतर 'भाषाशुद्धी' नामक प्रकारे पुन्हा संस्कृतच्या पडद्याआड जाण्याचं कारण काय? बरं, सावरकरांना त्यांच्या निष्ठांनुसार तसं करावंसं वाटलं, त्यांनी केलं, त्यांतून काही सुरेख-चोख शब्द तयार झाले. ते आपण वापरून रुळवलेही.

पण आज आपली भूमिका काय आहे भाषेबद्दल? आपण भाषा 'शुद्ध' असणं म्हणजे काय मानतो? तिच्यात परकीय शब्द स्वीकारणं (फक्त फारसी, उर्दू, अरबीच नाही; तर इंग्रजीही) आणि ते घासून-मोडून मराठी करून घेणं - या सहजी घडणार्‍या प्रक्रियेबद्दल आपलं काय मत आहे? अजुनी आपण संस्कृत शब्द म्हणजेच शुद्ध आणि / किंवा एतद्देशीय आणि / किंवा मराठी असं मानतो का? का?

बॅटमॅन Fri, 25/03/2016 - 15:34

In reply to by मेघना भुस्कुटे

पण आज आपली भूमिका काय आहे भाषेबद्दल? आपण भाषा 'शुद्ध' असणं म्हणजे काय मानतो? तिच्यात परकीय शब्द स्वीकारणं (फक्त फारसी, उर्दू, अरबीच नाही; तर इंग्रजीही) आणि ते घासून-मोडून मराठी करून घेणं - या सहजी घडणार्‍या प्रक्रियेबद्दल आपलं काय मत आहे? अजुनी आपण संस्कृत शब्द म्हणजेच शुद्ध आणि / किंवा एतद्देशीय आणि / किंवा मराठी असं मानतो का? का?

याला अनेक पदर आहेत.

अगदी रफली, ऑन अ‍ॅन अ‍ॅव्हरेज वगैरे सांगायचं झालं तर माझ्या मते भाषा = व्याकरण + फोनॉलॉजी + शब्दसमुच्चय. यांपैकी कुठलाही घटक बदलला की भाषेचे स्वरूप त्या त्या प्रमाणात बदलते. नवनवीन शब्दसमुच्चय सामावून घेण्यासाठी मी तयार आहे, त्याकरिता आडमुठी भूमिका घेण्याची गरज मला दिसत नाही-यद्यपि शक्यतोवर होतील तितके 'देशी' अर्थवाही शब्द, मग ते जुने असले तरी ते प्रचारात यावेत असे वाटते.. तुलनेने फोनॉलॉजी आणि व्याकरणाबद्दल जरा जास्ती आग्रह आहे.

(आता इथे फोनॉलॉजी आणि व्याकरण या संज्ञा अंमळ व्यापक अर्थाने अभिप्रेत आहेत त्या तशाच घ्याव्यात. नक्की कुठल्या बोलीचे व्याकरण आणि फोनॉलॉजी हा प्रश्न इथे गैरलागू आहे. तरी थोडक्यात सांगायचे तर अनेक बोलींमध्ये काही फीचर्स सामायिक दिसतात, आणि काही प्रमाणभाषेची फीचर्स आहेत त्यांचा वेटेड अ‍ॅव्हरेज घ्यावा अशा थाटाचे माझे मत आहे.)

बाकी ग्रेटथिंकर हे आपले जालीय raison d'etre सिद्ध करण्याच्या नादात जातीय अँगलवर कायम घसरतात असे निरीक्षण आहे त्यामुळे फक्त शिवाजी आणि सावरकर या दोहोंच्या कृतींमधील सामंतर्य आधोरेखित केले इतकेच. बाकी अस्मिता म्हणजे काय, ती जागृत करण्याची खरी वेळ कुठली, वगैरे मुद्दे नंतर कधीतरी चर्चेस घेऊ.

जाहीर सी बात है, संस्कृत-प्राकृत मुळाचे शब्द हेच देशीमध्ये खासकरून येतील. अरबीफारसीपैकीही येतीलच, परंतु परस्पर प्रमाणाबद्दल नक्की विधान करता येणार नाही.

ऋषिकेश Fri, 25/03/2016 - 15:59

In reply to by बॅटमॅन

नवनवीन शब्दसमुच्चय सामावून घेण्यासाठी मी तयार आहे, त्याकरिता आडमुठी भूमिका घेण्याची गरज मला दिसत नाही-यद्यपि शक्यतोवर होतील तितके 'देशी'१ अर्थवाही शब्द, मग ते जुने असले तरी ते प्रचारात यावेत असे वाटते.

शतप्रतिशत सहमती!

इंग्रजी वा इतरही युरोपियन शब्दांशी पर से परखंडीय शब्दांशी वावडे नाहीच फक्त थेट तिथे पोचू नये.. आस्ते कदम मराठी--> नैच तर सहज आपलेसे करतायेतील असे कानडी/तेलुगु/तमिळ/हिंदी इत्यादी --> नैच तर सहज बोलता येण्याजोगते संस्कृत --> नैच तर रुळतील असे फारसी/अरबी/प्राकृत/जपानी/चीनी वगैरे आशियायी आणि त्यातही हवा तसा शब्द नाहीच मिळाला तर आंतरखंडीय भाषा आहेतच.

'न'वी बाजू Fri, 25/03/2016 - 16:41

In reply to by ऋषिकेश

इंग्रजी वा इतरही युरोपियन शब्दांशी पर से परखंडीय शब्दांशी वावडे नाहीच फक्त थेट तिथे पोचू नये..

'पर से'करिता मराठी प्रतिशब्द काय?

आस्ते कदम मराठी--> नैच तर सहज आपलेसे करतायेतील असे कानडी/तेलुगु/तमिळ/हिंदी इत्यादी --> नैच तर सहज बोलता येण्याजोगते संस्कृत --> नैच तर रुळतील असे फारसी/अरबी/प्राकृत/जपानी/चीनी वगैरे आशियायी आणि त्यातही हवा तसा शब्द नाहीच मिळाला तर आंतरखंडीय भाषा आहेतच.

(आता 'आस्ते कदम'करिता मराठी प्रतिशब्द विचारणार नाही, परंतु) आपली 'आस्ते कदम' मेथडॉलॉजीच जर वापरायची झाली, तर (पहिला टप्पा म्हणून) आता 'पर से'करिता फारसी/अरबी/प्राकृत/जपानी/चिनी वगैरे आशियायी भाषांमधील प्रतिशब्द कोठून हुडकून आणावा बरे?

(आणि काय म्हणून?)
..........

'मेथडॉलॉजी'करिता मराठीत 'पद्धत' वा 'पद्धती' असा शब्द ढोबळमानाने योजता येईल, याची कल्पना आहे, परंतु वापरणार नाही. तसाही तो मुद्दा नाहीच.

ग्रेटथिंकर Fri, 25/03/2016 - 17:36

In reply to by बॅटमॅन

बाकी ग्रेटथिंकर हे आपले जालीय raison d'etre सिद्ध
करण्याच्या नादात जातीय अँगलवर कायम घसरतात असे
निरीक्षण आहे त्यामुळे फक्त शिवाजी आणि सावरकर या
दोहोंच्या कृतींमधील सामंतर्य आधोरेखित केले इतकेच. बाकी
अस्मिता म्हणजे काय, ती जागृत करण्याची खरी वेळ कुठली,
वगैरे मुद्दे नंतर कधीतरी चर्चेस घेऊ.

राज्यव्यवहारकोष आणि 'बोलीभाषेत शब्द घुसडने 'यातला फरक न सम्जणारे लोक अस्मितेच्या आणि भाषा शुद्धीच्या व्याख्या करत बसले आहेत.आजही कायदा,वैद्यकीय क्षेत्र यातले शब्द आणि परीभाषा सामान्य बोलिभाषेत नसतात .उदा,heart attack हा बोलिभाषेतला शब्द आहे तर myocardial infarction हा वैद्यकीय परिभाषेतला शब्द आहे.शिवाजिने केलेल्या राज्यव्यवहारकोषाचा बोलीभाषेवर प्रभाव टाकण्याचा कोणताही उद्देश न्हवता ,या उलट सावरकरांचा उद्देष स्पष्टपणे मराठीचे संस्कृतकरण करणे व भाषेवरही अभिजनांचाच कसा वरचष्मा राहील हा होता.

बॅटमॅन Fri, 25/03/2016 - 17:45

In reply to by ग्रेटथिंकर

राज्यव्यवहारकोष आणि 'बोलीभाषेत शब्द घुसडने 'यातला फरक न सम्जणारे लोक अस्मितेच्या आणि भाषा शुद्धीच्या व्याख्या करत बसले आहेत.

ण आणि न मधील फरक न कळणारे लोक भाषाशुद्धीबद्दल बोलताना अंमळ मौज वगैरे वाटली.

आजही कायदा,वैद्यकीय क्षेत्र यातले शब्द आणि परीभाषा सामान्य बोलिभाषेत नसतात .उदा,heart attack हा बोलिभाषेतला शब्द आहे तर myocardial infarction हा वैद्यकीय परिभाषेतला शब्द आहे.शिवाजिने केलेल्या राज्यव्यवहारकोषाचा बोलीभाषेवर प्रभाव टाकण्याचा कोणताही उद्देश न्हवता ,या उलट सावरकरांचा उद्देष स्पष्टपणे मराठीचे संस्कृतकरण करणे व भाषेवरही अभिजनांचाच कसा वरचष्मा राहील हा होता.

जर सावरकर इतके दुष्ट वैट्ट वगैरे असतील तर इतर लोकांनी त्यांचं ऐकून तरी कसं घेतलं म्हणतो मी. बाबासाहेब आंबेडकर तेव्हा जिवंत होते, त्यांना कसा काय खुपला नाही हा मुद्दा?

ग्रेटथिंकर Fri, 25/03/2016 - 19:05

In reply to by बॅटमॅन

ण आणि न मधील फरक न कळणारे लोक भाषाशुद्धीबद्दल
बोलताना अंमळ मौज वगैरे वाटली.
>>>>>>>>>> हीच ती माजोरी अभिजन वृत्ती जी मराठीचे संस्कृतकरण करण्यामागे होती,आज टनाटन प्रभात मधले भाषाशुद्धीचे प्रयत्न व सावरकरी प्रयत्न यात मलातरी अर्था अर्थी काहीच फरक जाणवत नाही.

जर सावरकर इतके दुष्ट वैट्ट वगैरे असतील तर इतर लोकांनी त्यांचं
ऐकून तरी कसं घेतलं म्हणतो मी. बाबासाहेब आंबेडकर तेव्हा
जिवंत होते, त्यांना कसा काय खुपला नाही हा मुद्दा?>
>>>>>>भाषाशुद्धी हा शेणात पडलेला शेंगदाणा आहे ,ज्याला तो खायचा आहे त्याने खुशाल खावा असे बाबासाहेब म्हणाले होते ,माझ्या माहीतीप्रमाणे १९५४ सालच्या पुण्यातल्या भाषणात.

बॅटमॅन Fri, 25/03/2016 - 19:21

In reply to by ग्रेटथिंकर

हीच ती माजोरी अभिजन वृत्ती जी मराठीचे संस्कृतकरण करण्यामागे होती,आज टनाटन प्रभात मधले भाषाशुद्धीचे प्रयत्न व सावरकरी प्रयत्न यात मलातरी अर्था अर्थी काहीच फरक जाणवत नाही.

हॅ हॅ हॅ. टनाटन प्रभातचा वाचकवर्ग तो किती आणि त्यांची व्याप्ती ती किती? ते एक असोच. ऊठसूट विनाकारण अभिजनांना शिव्या देण्याशिवाय स्वतः काहीतरी करून का दाखवत नाही?

भाषाशुद्धी हा शेणात पडलेला शेंगदाणा आहे ,ज्याला तो खायचा आहे त्याने खुशाल खावा असे बाबासाहेब म्हणाले होते ,माझ्या माहीतीप्रमाणे १९५४ सालच्या पुण्यातल्या भाषणात.

जर असं असेल तर तो शेंगदाणा तुमच्या पोह्यात न वापरण्याचे स्वातंत्र्य तुम्हांला आहेच की. पण निव्वळ चिखलफेकीशिवाय ज्यांना कै झेपत नै त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा करणार? :)

ग्रेटथिंकर Fri, 25/03/2016 - 19:55

In reply to by बॅटमॅन

जर असं असेल तर तो शेंगदाणा तुमच्या पोह्यात न वापरण्याचे
स्वातंत्र्य तुम्हांला आहेच की. पण निव्वळ चिखलफेकीशिवाय
ज्यांना कै झेपत नै त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा करणार?
>>>>>>>>>>>>> असली घांण आम्ही लांबच ठेवतो, ज्यांना हा शेणातला शेंगदाणा दडप्या पोह्यात टाकून खाय्ची सवय आहे त्यांनी शुद्धीच्या व्याख्या करु नयेत,आमच्या प्रचलीत बोलीभाषेच्या प्रांगणात कुणी जर भाषाशुद्धिचे टमरेलं घेऊन हागायला आला तर त्याला दगड मारायचे स्वांतंत्र्यही आम्हाला आहेच.

बॅटमॅन Fri, 25/03/2016 - 21:45

In reply to by ग्रेटथिंकर

असली घांण आम्ही लांबच ठेवतो, ज्यांना हा शेणातला शेंगदाणा दडप्या पोह्यात टाकून खाय्ची सवय आहे त्यांनी शुद्धीच्या व्याख्या करु नयेत,आमच्या प्रचलीत बोलीभाषेच्या प्रांगणात कुणी जर भाषाशुद्धिचे टमरेलं घेऊन हागायला आला तर त्याला दगड मारायचे स्वांतंत्र्यही आम्हाला आहेच.

तुमच्या बोलीभाषेत शेकडा ५० पेक्षा जास्त शब्द संस्कृत-प्राकृताशी निगडित आहेत. =))

ग्रेटथिंकर Fri, 25/03/2016 - 22:55

In reply to by बॅटमॅन

तुमचे सदस्यनामच ईंग्रजीत आहे , ते आधी संस्कृतात कन्वर्ट करुन घ्या, मगच भाषाशुद्धीचं टमरेलं हातात घ्या, आम्ही आहोतच दगडं मारायला =)) =)) =))

बॅटमॅन Fri, 25/03/2016 - 23:51

In reply to by ग्रेटथिंकर

तुमचेही सदस्यनाम इंग्रजीतच आहे. स्वतःची वैचारिक क्षमता अधोरेखित करण्यासाठी परभाषेच्या कुबड्या हाती घेणार्‍या ग्रेटथुंकर साहेबांना 'आपलं ठेवायचं झाकून, दुसर्‍याचं बघायचं वाकून' या म्हणीची फार लागण झालेली दिसतेय. ते टमरेल वगैरेंवरून तुमचा एकूण वकूब लक्षात आला त्याबद्दलही अनेक धन्यवाद.

ग्रेटथिंकर Sat, 26/03/2016 - 00:07

In reply to by बॅटमॅन

तुमचेही सदस्यनाम इंग्रजीतच आहे. स्वतःची वैचारिक क्षमता
अधोरेखित करण्यासाठी परभाषेच्या कुबड्या हाती घेणार्या
ग्रेटथुंकर साहेबांना 'आपलं ठेवायचं झाकून, दुसर्याचं बघायचं
वाकून' या म्हणीची फार लागण झालेली दिसतेय. ते टमरेल
वगैरेंवरून तुमचा एकूण वकूब लक्षात आला त्याबद्दलही अनेक
धन्यवाद.>>>>>>>>>>> आम्हाला आमच्या बोलीभाषेत इतर भाषेतले शब्द चालतात,त्यामुळे आमचे सदस्यनाम इंग्रजीत ठेवायला आम्हाला काहीच वाटत नाही.बोलीभाषेत परकीय शब्द बघून ज्यांच्या बुडाला खाज सुटते त्यांनी खुशाल खाजवत बसावे व या खरजेला भाषाशुद्धी नाव द्यायलाही आमची काहीच हरकत नाही =))

बॅटमॅन Sat, 26/03/2016 - 00:11

In reply to by ग्रेटथिंकर

आम्हाला आमच्या बोलीभाषेत इतर भाषेतले शब्द चालतात,त्यामुळे आमचे सदस्यनाम इंग्रजीत ठेवायला आम्हाला काहीच वाटत नाही.बोलीभाषेत परकीय शब्द बघून ज्यांच्या बुडाला खाज सुटते त्यांनी खुशाल खाजवत बसावे व या खरजेला भाषाशुद्धी नाव द्यायलाही आमची काहीच हरकत नाही

इतर भाषेतले शब्द चालतात पण मराठीची जननी असलेल्या संस्कृताचे मात्र वावडे. =)) छान गळू पिकलेय हो अस्मितेचे.

ग्रेटथिंकर Sat, 26/03/2016 - 00:40

In reply to by बॅटमॅन

इतर भाषेतले शब्द चालतात पण मराठीची जननी असलेल्या
संस्कृताचे मात्र वावडे. छान गळू पिकलेय हो अस्मितेचे.
>>>>>>>>> संस्कृत ही इंडो युरोपियन भाषासमुहातली एक भाषा ,काही खुळचट तिला देववाणी म्हणतात .संस्कृत आभाळातून पडलेली भाषा नव्हे.तिची प्रीकर्सर भाषा असेलच ,त्यामुळे संस्कृत हा काही dead end नाही .त्यामुळे देववाणी ,जननी वगैरे सम्जून ज्यांना अस्मितेचे गळू चोखत बसायचे आहेत त्यांनी जरुर चोखत बसावे =))

बॅटमॅन Sat, 26/03/2016 - 12:55

In reply to by ग्रेटथिंकर

संस्कृत ही इंडो युरोपियन भाषासमुहातली एक भाषा ,काही खुळचट तिला देववाणी म्हणतात .संस्कृत आभाळातून पडलेली भाषा नव्हे.तिची प्रीकर्सर भाषा असेलच ,त्यामुळे संस्कृत हा काही dead end नाही .त्यामुळे देववाणी ,जननी वगैरे सम्जून ज्यांना अस्मितेचे गळू चोखत बसायचे आहेत त्यांनी जरुर चोखत बसावे

तिची प्रीकर्सर जी कै असेल ती शोधा ना मग. मेन मुद्दा इतकाच की मराठीची जननी संस्कृत आहे. हे नाकारणे म्हणजे स्वतःच्या आईला नाकारणे आहे. =))

नितिन थत्ते Sat, 26/03/2016 - 13:24

In reply to by बॅटमॅन

मुकुंदराज यांच्या काव्यात किती शब्द संस्कृत होते आणि किती प्राकृत होते?

संस्कृत ही मूळ भाषा आहे की "संस्कारित" भाषा?

बॅटमॅन Sat, 26/03/2016 - 13:41

In reply to by नितिन थत्ते

१.मुळात संस्कृत आणि प्राकृत हे बायनरी नसून एक कंटिन्युअम आहे. ते एक असो.

२. संस्कृताची व्याख्या 'पाणिनी, कात्यायन आणि पतंजली' या तिघांनी डिफाईन केलेली भाषा अशी साधारणपणे सांगता येईल. प्रमाण मराठीच्या व्याख्येप्रमाणेच संस्कृताचीही व्याख्या केली तर बह्वंशी काही ग्रूपची मूळ भाषा असे नक्की सांगता यावे.

कंटिन्युअम व्याख्येप्रमाणे सर्वच शब्द त्यातलेच आहेत (एक्सेप्ट फॉर सम द्राविडी शब्द).

काटेकोर व्याख्येप्रमाणे पाहिले तरी ५०% असावेत असा एक अंदाज नक्की सांगता येईल.

ग्रेटथिंकर Sat, 26/03/2016 - 13:51

In reply to by बॅटमॅन

तिची प्रीकर्सर जी कै असेल ती शोधा ना मग. मेन मुद्दा
इतकाच की मराठीची जननी संस्कृत आहे. हे नाकारणे म्हणजे
स्वतःच्या आईला नाकारणे आहे.>>>>>>>>>>>> हॅ हॅ हॅ ,स्वघोषीत भाषातज्ञ संस्कृत देववाणी आहे व ती आभाळातून पडली आहे असे मानतात हे पाहून गंमत् वाटली.कुठलाच भाषातज्ञ एखाद्या भाषेला dead end मानत नाही ,पण इथे असले अकले दिवाळे वाजलेले लोकही आहेत तर!
भाषा ,प्रांत ईत्यादीला माता आई वगैरे संबोधने हे बालिशपणाचे आहे ,
संस्कृत जर तुमची आई आहे तर बाप कोण आहे हे ही सांगुन टाका =))

बॅटमॅन Sat, 26/03/2016 - 13:56

In reply to by ग्रेटथिंकर

हॅ हॅ हॅ ,स्वघोषीत भाषातज्ञ संस्कृत देववाणी आहे व ती आभाळातून पडली आहे असे मानतात हे पाहून गंमत् वाटली.कुठलाच भाषातज्ञ एखाद्या भाषेला dead end मानत नाही ,पण इथे असले अकले दिवाळे वाजलेले लोकही आहेत तर!
भाषा ,प्रांत ईत्यादीला माता आई वगैरे संबोधने हे बालिशपणाचे आहे ,
संस्कृत जर तुमची आई आहे तर बाप कोण आहे हे ही सांगुन टाका

डेड एंडचा संबंधच नाही. संस्कृतच्या अगोदरची जी काही व्हर्जन असेल ती, तिथून संस्कृत, प्राकृत आणि मग मराठी हा साधा प्रवास आहे. मराठीच्या आधी संस्कृत आहे म्हणून ती मराठीची जननी आहे, माझी नव्हे. डोक्याचा भाग नसेल तर अशी गफलत होते.

बाकी इतरांच्या बापाचा पत्ता विचारण्याअगोदर स्वतःबद्दल खातरजमा करावी.
ब्रिगेडी अवलादी एकूण कशा असतात हे स्वतःच्या उदाहरणाने छान दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. कसलाच आगापिछा नसलेल्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार =))

ग्रेटथिंकर Sat, 26/03/2016 - 14:20

In reply to by बॅटमॅन

पुरषोत्तम खेडेकर लिखित शिवाजीच्या बदनामीची केंद्रे हे पुस्तक वाचा, मग ब्याटम्यान तुम्हाला तुमचा खरा उगम कळेल =))

बॅटमॅन Sat, 26/03/2016 - 14:24

In reply to by ग्रेटथिंकर

पुरषोत्तम खेडेकर लिखित शिवाजीच्या बदनामीची केंद्रे हे पुस्तक वाचा, मग ब्याटम्यान तुम्हाला तुमचा खरा उगम कळेल

तुमच्या बापाचे नाव कळाले बरंका हेटथुंकर. ब्रिगेडची अवलाद दुसरे काय बोलणार. त्या पुस्तकाबद्दल तुमच्या बापावर केस झाली आणि त्याने माफीही मागितली हे माहितीये ना?

बाकी ते शनिवारवाडा पाडणार होतात त्याचे काय झाले?

बॅटमॅन Sat, 26/03/2016 - 14:53

In reply to by ग्रेटथिंकर

ब्रिगेडी लोकांची पिलावळ कशी असते ते बघा हं सर्वजण. विशिष्ट जातीवर किती थराला जाऊन चिखलफेक करायची याची कुठलीही भीडभाड ते बाळगत नाहीत. ब्राह्मणांवर जळणे हे एकमेव काम असते कारण स्वतःच्या आयुष्यात न काही केलेले असते न काही करण्याची शक्यता. मग जे पुढे गेलेले लोक दिसतात त्यांच्यावर अशी खालच्या थराला जाऊन टीका करणे हा एकमेव उद्योग यांना उरतो. डोक्याचा भागही नसतो आणि लोक जे भडकावतात त्याला हे बळी पडतात. हे बलहीन लोक ब्राह्मणांचे शष्पही वाकडे करू शकत नाहीत, शकणारही नाहीत. अशी हजारो ब्रिगेडे येतील आणि विरून जातील.

बाकी ब्राह्मण स्त्रियांबद्दल बोलताना तुझ्यासारख्यांची जीभ स्वैर सुटते कारण तुमच्या लेखी स्त्री, त्यातही ब्राह्मण स्त्री ही निव्वळ एक ट्रॉफी आहे. तिचे आकर्षण तर खूपच आहे पण प्रत्यक्षात काही होण्याची शक्यताही शून्यवत आहे, मग ईगो कसा सुखावायचा? त्याकरिता ब्राह्मण स्त्रियांच्या चारित्र्याबद्दल वाटेल ते बरळावे म्हणजे परिणाम साधला जातो. पण आयाबहिणींना अशा डिबेटमध्ये आणणे हा ब्रिगेडी अशक्तांचा धर्म आहे. आम्ही तो पाळत नाही. फक्त तुला या जगात आणून तुझ्या आईवडिलांनी एक छोटीशी चूक केली इतकेच फारतर म्हणेन.

ग्रेटथिंकर Sat, 26/03/2016 - 15:09

In reply to by बॅटमॅन

बाकी ब्राह्मण स्त्रियांबद्दल बोलताना तुझ्यासारख्यांची
जीभ स्वैर सुटते कारण तुमच्या लेखी स्त्री, त्यातही ब्राह्मण
स्त्री ही निव्वळ एक ट्रॉफी आहे. तिचे आकर्षण तर खूपच आहे
पण प्रत्यक्षात काही होण्याची शक्यताही शून्यवत आहे, मग
ईगो कसा सुखावायचा? त्याकरिता ब्राह्मण स्त्रियांच्या
चारित्र्याबद्दल वाटेल ते बरळावे म्हणजे परिणाम साधला
जातो.

लै हसलो राव या वाक्यांना !ममता कुलकर्णी, सई ताम्हणकर,मधू सप्रे,उर्मिला मातोंडकर,पुनम पांडे या चारित्र्यसंपन्न स्त्रीयांची आठवण झाली =))

बॅटमॅन Sat, 26/03/2016 - 15:13

In reply to by ग्रेटथिंकर

कायकाय करावं लागतं नै ईगो सुखावायला? इतरांना आयाबहिणीवरून शिव्या देणे, जातीवाचक शिवीगाळ करणे वगैरे केल्याशिवाय मनाला शांती मिळत नाही.

ऋषिकेश Sat, 26/03/2016 - 17:31

In reply to by ग्रेटथिंकर

ग्रेटथिंकर,
व्यक्तिगत टिपणीसाठी कृपया खरडवहीचा वापर करावा.
(व्यवस्थापक) ऋ

स्वत:च्या धाग्याला इथे सदस्यांनी विधायक वळण लावल्याने तिथे करता आला नाही म्हणून इथे दंगा करताय का?
(सदस्य) ऋ

ग्रेटथिंकर Sat, 26/03/2016 - 17:36

In reply to by ऋषिकेश

माझा चित्पावनांवरचा धागा जेन्युन होता,या धाग्यावरही मी फक्त सावरकरांविषयी मत व्यक्त केले तर मला वर्बल एब्युजला सामोरे जावे लागले,त्या प्रतीसादाच्या लढाईत वाहत गेलो एवढेच.पुढच्यावेळी भाषेवर ताबा ठेवीन.

अनु राव Fri, 25/03/2016 - 16:01

In reply to by मेघना भुस्कुटे

पण आज आपली भूमिका काय आहे भाषेबद्दल? आपण भाषा 'शुद्ध' असणं म्हणजे काय मानतो? तिच्यात परकीय शब्द स्वीकारणं (फक्त फारसी, उर्दू, अरबीच नाही; तर इंग्रजीही) आणि ते घासून-मोडून मराठी करून घेणं - या सहजी घडणार्‍या प्रक्रियेबद्दल आपलं काय मत आहे? अजुनी आपण संस्कृत शब्द म्हणजेच शुद्ध आणि / किंवा एतद्देशीय आणि / किंवा मराठी असं मानतो का? का?

मुळात सावरकर कोणी मुख्यमंत्री नव्हते की त्यांनी जीआर काढुन हे शब्द प्रचलित करवले. ते शब्द प्रचलित झाले ह्याचा अर्थ समाजानी ते स्वीकारले, फक्त समाजानी नाही तर सावरकरांच्या पूर्ण उलट्या विचारधारेच्या काँग्रेस सरकारांनी नी ते स्वीकारले आणि राबवले. ह्याचा अर्थ शिकला सवरलेला मराठी समाज हा संस्कृत प्राकृताशी नाळ जोडुन होता/आहे. जिथे संधी मिळाली तिथे पुन्हा संस्कृत-प्राकृत शब्दांचा स्वीकार केला गेला ( कमीत कमी लिखीत स्वरुपात ). ह्या सर्व भाषाव्यवहारात कोण "आपले" आणि कोण "परके " हा हिशोब पण दिसतोच आहे आणि तो बर्‍यापैकी मान्यताप्राप्त पण असावा.

ब्रिटीश राजवट जशी काही अभिजनांनी आपलीशी केली आणि तिच्या भाषेच्या आणि एकुणच व्यवहाराच्या प्रेमात पडले तसे काही मुसलमान राजवटी बद्दल झालेले नसावे. त्यांचे शब्द ही वापरात आले असतील तर ते सत्तेच्या भितीनेच. ती जबरदस्तीच होती ही जाणिव कुठेतरी समाजमनात आत असावी. त्यामुळे संधी मिळताच सावरकरांनी सुचवलेला बदल सहज रित्या स्वीकारला गेला.

अनु राव Fri, 25/03/2016 - 16:07

In reply to by मेघना भुस्कुटे

इतकेच काय, १९४७ नंतर हिंदी भाषेनी पुनर्जन्म घेतला. मराठीत काहीच नाही इतकी घुसखोरी अरबी / फारसी भाषांनी हिंदीत केली होती. उर्दु हीच जवळजवळ उत्तर हिंदुस्तान ची भाषा झाली होती.
पण गेल्या ६०-७० वर्षात काँग्रेस शासन असुन सुद्धा हिंदी नी जुने संस्कृत्/प्राकृत शब्द पुन्हा वापरायला सुरुवात केली. हा बदल तर सावरकरांच्या बदला पेक्षा ५०-१०० पट मोठा आहे.

फक्त सिनेमाच्या गाण्यांचा दस्तऐवज म्हणुन उपयोग केला तरी हा बदल प्रकर्षाने जाणवतो. कारण काय एत्तदेशिय आणि आणि काय बाहेरचे हे लोकांना आतुन माहीती होतेच.

दुर्दैवाने, मला हा उर्दुचा झालेला र्‍हास अजिबात पसंत नाही. सध्या जी संस्कृत प्रचुर हिंदी बोलली जाते ती ऐकुन ओकारी येते

बॅटमॅन Fri, 25/03/2016 - 16:10

In reply to by अनु राव

सध्याची संस्कृतप्रचुर हिंदी जास्तीच कृत्रिम वाटते याच्याशी सहमत, परंतु वाजपेयींसारख्यांचे हिंदी ऐकताना असे आजिबात वाटत नाही. शिवाय भूषणासारखी काव्ये वाचून जुन्या हिंदीतही कसा जोम होता त्याची मस्त प्रचीती येते.

ऋषिकेश Fri, 25/03/2016 - 16:22

In reply to by अनु राव

जर तुमच्या परिचयात काही मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील मंडळी असतील तर त्यांचे हिंदी अतिशय मधूर वाटते. अन्यथा... असो! :)

अनु राव Fri, 25/03/2016 - 16:15

In reply to by मेघना भुस्कुटे

हा बदल लोकशाही पण दाखवतो ( म्हणजे ज्यांची मते जास्त त्यांच्या भाषा इतकाच ).

इव्हन ३०-४० वर्षापूर्वी, बिहार चा कोणीही मुख्यमंत्री लहानपणी घरी ब्रज किंवा तत्सम भाषेत बोलत असेल पण समाजात वावरताना शुद्ध हिंदितच बोलायचा.
पण नव्वदिच्या दशकापासुन लालु नी त्याच्या मतदारांची भाषा भिडभाड न ठेवता बोलायला सुरुवात केली, त्याच्या विजयात ह्या बदलाचा ही काही वाटा नक्की असणार आहे.

तसेच मराठी मुल्कात, ब्रिटिशांना लोकशाही आणल्यामुळे मुसलमान राज्यकर्त्यांची भाषा त्यजणे सहजशक्य झाले आणि आपली भाषा वापरायला बाटणारी भिती आणि लाज दिन्ही गेल्या.

बॅटमॅन Fri, 25/03/2016 - 16:21

In reply to by अनु राव

तसेच मराठी मुल्कात, ब्रिटिशांना लोकशाही आणल्यामुळे मुसलमान राज्यकर्त्यांची भाषा त्यजणे सहजशक्य झाले आणि आपली भाषा वापरायला बाटणारी भिती आणि लाज दिन्ही गेल्या.

किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी मुसलमान राज्यकर्ते हा गेल्या तीनेकशे वर्षांपासून भूतकाळवाचक वाक्प्रचार आहे. पण इतक्या वर्षांचे इन्फ्लुअन्सेस लगेच जात नसतात. ब्रिटिश काळात सर्व प्रकारच्या जाणिवा तीव्र झाल्या, त्यात अरबीफारसी शब्दांना विरोधही हळू हळू सुरू झाला. त्यात भीती/लाज इ. चा काही संबंध आहे असे वाटत नाही.

'न'वी बाजू Fri, 25/03/2016 - 20:59

In reply to by मेघना भुस्कुटे

पण आपण इतकी वर्षं मुस्लीम (आणि तेव्हा परकीय असलेले) शासक पचवून झाल्यानंतर...

बाप रे! तत्कालीन एतद्देशीयांत नरभक्षक वृत्तीसुद्धा होत्या, याची कल्पना नव्हती.

'या रानटी नेटिवांना माणसाळवून सुसंस्कृत करणे हे एक पुढारलेली जमात म्हणून आपले परमकर्तव्य अाहे; नव्हे, आपल्या खांद्यांवरील ते देवदत्त ओझे आहे', या तत्कालीन युरोपीय राज्यकर्ते, मिशनरी तथा संकीर्ण गौरवर्णीयांमधील 'व्हैट-म्यान्स-बर्डन'-छाप प्रवृत्तीचा उगम आज कळला.

मराठीनंही त्यांतले अनेक शब्द आपल्या अंगी सहजी मुरवून घेतल्यानंतर...

थोडक्यात, तत्कालीन मराठी हे एका प्रकारचे लोणचे होते, म्हणा ना!
..........

आपल्या सांस्कृतिक मुळांकडेच जर परतायचे असेल, तर वस्तुत: त्याकरिता बीफबंदी नव्हे, तर उलट नरमांसभक्षण कायद्याने अनिवार्य करणे हाच तरणोपाय आहे. पण लक्षात कोण घेतो?

इंग्रजी मंडळी एतद्देशीयांना संस्कृत कसे (आणि काय म्हणून) शिकवतील, हा प्रश्न येथे फिजूल आहे. किंबहुना, भटांना संस्कृत शिकविण्याकरिताच पुण्यातील 'डेक्कन कॉलेज' नामक संस्थेच्या आद्यावृत्तीची स्थापना खास मुंबईच्या गौरनराच्या पुढाकाराने झाली होती, असे कायसेसे ऐकण्यात आलेले आहे.२अ (चूभूद्याघ्या.)

२अ 'टेकिंग कोल्स टू न्यूक्यासल' अशा प्रकारचा काही वाक्प्रचार तत्कालीन इंग्रजीत उपस्थित होता, की त्याचा उगम बऱ्याच नंतरचा आहे, याचा वेध घेणे या निमित्ताने रोचक ठरावे. तज्ज्ञांनी यावर प्रकाश पाडावा.

नितिन थत्ते Fri, 25/03/2016 - 16:59

अवांतर:
फौलाद हा शब्द वगळून इस्पात हा शब्द सरकारी (सॉरी- शासकीय) पातळीवर रुजला आहे. परंतु परिवारात इस्पाती पुरुष न म्हणता लोहपुरुष म्हणण्याची पद्धत आहे. खरे तर लोह (आयर्न-लोखंड) हा धातू शुद्ध स्वरूपात खूपच नरम (सॉरी-मृदू) आणि कुचकामी असतो. त्या लोहपुरुष या शब्दाने त्या व्यक्तीचा वास्तविक गुणधर्म दर्शवला जातो असे म्हणता येईल काय?
-----------------------------------------------------

जयदीप चिपलकट्टी Fri, 25/03/2016 - 21:25

In reply to by नितिन थत्ते

> त्या लोहपुरुष या शब्दाने त्या व्यक्तीचा वास्तविक गुणधर्म दर्शवला जातो असे म्हणता येईल काय?

हो, म्हणता येईल. पुरुषच नव्हे तर माणूसच (बव्हंशी) कार्बनचा बनलेला असतो हे घासकडवींचे लेख वाचून आम्हाला नुकतंच समजलं. आता लोह + कार्बन = स्टील असं समीकरण आहेच. तेव्हा लोहपुरुष हा स्टीलसारखा मजबूत असणार हे अोघानेच आलं.

नितिन थत्ते Sat, 26/03/2016 - 10:16

In reply to by जयदीप चिपलकट्टी

ष्टील हे शुद्ध लोह आणि म्लेच्छ कार्बन यांच्या संयोगाने बनलेले असते. शरीरातला म्लेच्छ कार्बन काढून टाकला की मगच लोहपुरुष बनतो. तोवर तो पोलादी पुरुष असतो.

अमुक Fri, 25/03/2016 - 18:37

सावरकरांचे 'भाषाशुद्धि' हे पुस्तक येथे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे.
दुवा - http://www.savarkar.org/files/u1/Bhasha_Shuddhi.pdf

पान क्र. ९७ पासून स्वकीय शब्दांची समग्र सूची आहे.

मिहिर Sat, 26/03/2016 - 02:50

In reply to by अमुक

पुस्तकात काही ठिकाणी सऱ्व, निऱ्मित्यां, अुऱ्दू, कऱ्तव्य अशा प्रकारे लिहिलेले काही शब्द दिसले. रफार न वापरता आडवा अर्धा र वापरावा अशी सावरकरांची भूमिका होती का? आर्या आणि आऱ्या अशा शब्दांमध्ये फरक दाखविण्याची गरज नाही असे मत होते का?

'न'वी बाजू Sat, 26/03/2016 - 19:43

In reply to by मिहिर

...वगैरे वगैरे (चुकलो, अित्यादि अित्यादि) म्हणतात खरे, परंतु तो अितक्या भीषण अथवा दारुण रीतीने झालेला पाहून सावरकरांचा आत्मा तूर्तास जेथे कोठे असेल तेथून बाहेर येऊन त्यांच्या लाडक्या विद्युद्दाहिनीत पुन्हा जाऊन रोटिसेरी चिकनसारखा गरागरा फिरू लागेल.,

बोले तो, असा भेद करण्याची आवश्यकता नाही अथवा तो करू नये, अशी सावरकरांची भूमिका अथवा मत मुळीच नसावे. किंबहुना, (छपाअीच्या सोयीसाठी? हे कसे ते कळले नाही, तस्मात्, चूभूद्याघ्या.) पूर्ण र-करिता अेक पर्यायी टंक पुरविण्यापलीकडे त्यांच्या अुद्दिष्टाची व्याप्ती नसावी, असे वाटते. (पुन: चूभूद्याघ्या.) परंतु त्याचबरोबर, त्यांना नेमके काय म्हणावयाचे आहे, ते अचूकत: समजण्याअितकी त्यांचे अनुयायी म्हणविणाऱ्यांच्या आकलनशक्तीचीही व्याप्ती नसावी, तस्मात्, सावरकरी टंक जळीस्थळीकाष्ठीपाषाणी वापरण्याचे व्रत अंधतेने घेतलेल्या त्यांच्या अशाच अेखाद्या अनुयायाकडून अुत्साहाचे भरात तो सावरकरी र अात्यंतिक मस्तकविहीनत्वेकरून अनुचित ठिकाणीसुद्धा योजिण्याचा प्रमाद घडला असावा (पक्षी: हे अनौचित्य बुद्ध्याचि नसावे), असा आम्हांस संशय आहे.

असो.

..........

सावरकर हे हिंदू (अर्थात पितृ-, पुण्य- अि. भू असलेले पूर्णरक्त हिंदू) असल्याकारणाने थडग्यात गरागरा फिरू शकत नाहीत, याची आम्हांस नम्र अि. जाणीव आहे, यास्तव हा पर्याय.

या वाक्यावरून विक्रम-वेताळाच्या गोष्टीच्या पंचलाअिन२अची आठवण होत असल्यास आमचा नाअिलाज (चुकलो, निरुपाय) आहे.

२अ सावरकरकाका, मला वाचवा!!!!!!

बाकी, 'गाय हा अुपयुक्त पशू अाहे' म्हणणाऱ्या आणि अेकसमयावच्छेदेकरून विद्युद्दाहिनीचा पुरस्कार करणाऱ्या सावरकरांच्या कल्पनाशक्तीची झेप या दोन संकल्पनांचा सुमधुर संगम करून रोटिसेरी ग्रिलची कल्पना सुचण्यापर्यंत जाअू नये ना! (योजकस्तत्र दुर्लभ:|) विद्वत्ता आणि विज्ञाननिष्ठा प्रचुर असेल, त्याबरोबर अत्याधुनिकाची, 'जे जे अुत्तम, अुदात्त, अुन्नत' त्याची आससुद्धा असेल, परंतु त्याच्या नवनिर्माणाकरिता लागणाऱ्या प्रज्ञेची जर जोड नसेल, तर अुपयोग काय? मग ते सर्व अत्याधुनिक, 'जे जे अुत्तम, अुदात्त, अुन्नत' अित्यादि अित्यादि ते ते मिळविण्याकरिता सदा परकीयांचेच तोंड पहावे लागणार ना! घिश्यापिट्या परकीय शब्दांस प्रतिशब्द योजीत बसण्यापेक्षा अशा नवनव्या संकल्पनांच्या योजकत्वाची (आणि मग हवे तर त्या नवनिर्मितीस आपणास हवी तशी नावे देण्याची) आवश्यकता तथा अुपयुक्तता अभिनव भारतास अधिक होती नि आहे. पण लक्षात कोण घेतो?

याची थोडीबहुत कल्पना सावरकरांससुद्धा असावी, असा संशय येतो. किंबहुना, 'तात्यावाक्यं प्रमाणम्' असे मानणाऱ्या त्यांच्या अंधानुयायांची फिरकी घेण्याच्या अुद्दिष्टानेच की काय, कोण जाणे, परंतु 'ग्वाटेमाला म्हणजे गौतमालय' अशी अेक फुसकुली अत्यंत कपोलस्थितजिह्वत्वे४अ स्वये सावरकरांनी अेके ठिकाणी सोडून ठेवलेली आहे.

४अ किंवा, ग़ालिबच्या शब्दांत, "मैं भी मुँह में ज़बान रखता हूँ, काश पूछो कि मुद्द'आ क्या है|"

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 27/03/2016 - 05:47

In reply to by 'न'वी बाजू

या प्रतिसादाच्या निमित्ताने अि, अी अशी चित्रं वाचताना ठेचा लागतात हे लक्षात आलं. त्यापेक्षा हिंदी वाचताना कमी अडखळायला होतं.

धर्मराजमुटके Fri, 25/03/2016 - 18:45

सामान्य माणसाला कोणता शब्द वापरायला आवडतो / सोईचा पडतो त्यावरुन त्या शब्दांचे मोजमाप होते.
मग तो सावरकरांनी दिलेला असो की बिस्मील अझीमाबादी यांनी दिलेला असो.

अर्थात आता सर्वसामान्य माणसाला सावरकर, गालीब सोडून द्या, सर्वसाधारण व्याकरणाचे नियम पण झेपत नाहीत हे वास्तव आहे. समोरच्याला बोलण्याचा अर्थ कळतोय ना एवढेच त्याच्या लेखी महत्त्वाचे.

अरविंद कोल्हटकर Sat, 26/03/2016 - 02:26

राज्यव्यवहारकोषाचे प्रास्ताविक असे आहे:

कृते म्लेच्छोच्छेदे भुवि निरवशेषं रविकुला-
वतंसेनात्यर्थंयवनवचनैर्लुप्तसरणीम्।
नृपव्याहारार्थं स तु विबुधभाषां वितनितुम्।
नियुक्तोऽभूद्विद्वान्नृपवर शिवच्छत्रपतिना ॥१॥
सोऽयं शिवच्छत्रपतेरनुज्ञां मूर्धाभिषिक्तस्य निधाय मूर्ध्नि।
अमात्यवर्यो रघुनाथनामा करोति राजव्यवहारकोषम् ॥२॥

अर्थः सूर्यवंशाचा जणू तुराच अशा राजश्रेष्ठ शिवछत्रपतीने पृथ्वीवर म्लेच्छांचा समूळ उच्छेद केल्यानंतर यवनोक्तींनी झाकोळलेल्या देवभाषेला राज्यव्यवहारासाठी वाढविण्याच्या हेतूने एका विद्वानाला नियुक्त केले. १.
तो मी अमात्य रघुनाथ शिवछत्रपतीची आज्ञा मस्तकी धारण करून राज्यव्यवहारकोष करीत आहे. २.

(ह्यातील सर्व विधाने शिवछत्रपतीला मान्य असावीत कारण अमात्य रघुनाथाला आज्ञेचा विपर्यास केल्याबद्दल कडेलोटाचा दंड मिळाल्याचे ऐकीवात नाही.
तरीहि आपल्या उपक्रमाची कुचेष्टा होऊ शकते ह्याचा अंदाज रघुनाथाला असावा म्हणून त्याने पुढील caveat नोंदविलेला आहे.)

विपश्चित्संमतस्यास्य किं स्यादज्ञविडम्बनै:।
रोचते किं क्रमेलाय मधुरं कदलीफलम् ॥३॥

विद्वन्मान्य अशा ह्या कार्याची अडाण्यांनी कुचेष्टा केली म्हणून काय बिघडते? उंटाला गोड केळ्याची चव कोठे कळते? ३.

ब्रह्मास्त्र Sat, 26/03/2016 - 16:22

दांडगीच कुस्ती झाली म्हणायची इथे.
भाषा हे संवाद साधण्याचे माध्यम आहे.कधीकधी भाषेविनाही संवाद साधता येतो.
मुळात भाषेमध्ये शुद्ध आणि अशुद्ध हा भेदच चुकीचा आहे,अमुक अमुक बोली शुद्ध आणि तमुक तमुक बोली अशुद्ध हे कोण ठरवतं म्हणे.
पुण्याच्या आसपास बोलली जाणारी ही प्रमाण भाषा,शुद्ध भाषा म्हणे!नेमकं हे ठरवतं कोण?
त्यामुळे भाषेचे शुद्धीकरण वगैरे करणे हे निरर्थक श्रम आहेत असे वाटते.
आणि शिवाजीमहाराजांना तर या चर्चेत मध्ये आणण्याचा काहीच संबंध नव्हता.

ब्रह्मास्त्र Sat, 26/03/2016 - 19:53

In reply to by ब्रह्मास्त्र

आणखी एक राहिलचं
ग्रेटथिंकर उर्फ मिपावरचा गरिब चिमणा हा आयडी ब्रिगेडी नसून परशुरामी/वामनी आहे,उगाच ब्रिगेडी असल्याचं भासवतोय.

नगरीनिरंजन Sun, 27/03/2016 - 08:32

ह्यापेक्षा उत्तरभारतीय संस्कृतीने मराठीतल्या शब्दांना जे नवे अ(न)र्थ दिलेत त्यावर चर्चा केली तर ती जास्त रंजक होईल. उदा. गर्व करणे, पेलणे, मूठ मारणे इ.इ.

आदूबाळ Sun, 27/03/2016 - 11:46

In reply to by गब्बर सिंग

बकचोद म्हटलं की बगळ्यासोबत तो शिवीचा ग्राहक ते गर्ह्य कृत्य करताना दिसतो आणि हसू फुटतं.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 28/03/2016 - 21:38

In reply to by 'न'वी बाजू

गर्ह्य का बरे?

बगळ्यांना आपल्या भाषा समजत नाहीत आणि त्यांनी दिलेला होकार आपल्याला समजत नाही म्हणून.

आबांच्या कल्पनाशक्तीबद्दल नबांशी सहमती.

'न'वी बाजू Sun, 27/03/2016 - 21:06

In reply to by गब्बर सिंग

बक*द

(वरील श्री. आदूबाळ यांच्या प्रतिसादाच्या प्रकाशात) यातील काही अक्षरे तारांकित करावी लागू नयेत याकरिता दर्शनी अश्लीलतेच्या निवारणार्थ (तथा अनायासे सावरकरांच्या भाषाशुद्धीवरचाच धागा आहे तर फारसीच्या उच्चाटनार्थ) या अपशब्दाचे मराठीकरण 'बकलावा' असे करावे काय?