वाढदिवस झाडाचा
वाढदिवस हत्तीचा
केक बनवला केळीचा
सोंडेने मेणबत्त्या फुंकू
हत्ती लागला केक कापू
जंगलातले
प्राणी पक्षी
गीत लागले गाऊ
हॅप्पी बर्थ डे टू यू
वाढदिवस मिठ्ठूचा
केक बनवला पेरूचा
शिट्टीने मेणबत्त्या फुंकू
मिठ्ठू लागला केक कापू
जंगलातले
प्राणी पक्षी
गीत लागले गाऊ
हॅप्पी बर्थ डे टू यू
वाढदिवस झाडाचा
केक बनवला बर्फाचा
मेणबत्त्या लागल्या पेटू
केक लागला सारा वितळू
जंगलातले
प्राणी पक्षी
गीत लागले गाऊ
हॅप्पी बर्थ डे टू यू
- ग्लोरी
प्रतिक्रिया
वा! मस्तच!
वा! मस्तच!
बिपिन कार्यकर्ते
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
सर्वश्री हत्ती, मिठ्ठू आणि झाड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
@ नबा _/\_
@ नबा
_/\_
.
सर्वांचे शुभेछांबद्दल
सर्वांचे शुभेछांबद्दल धन्यवाद.
मस्त!
मस्त!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
वा! छान आहे. खूप आवड्ली.
वा! छान आहे. खूप आवड्ली.
शरद वर्दे