दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२९ मे
जन्मदिवस : 'हिस्टेरिया'वर संशोधन करणारा मानसशास्त्रज्ञ पिएर जेनेट (१८५९), पियानोवादक व संगीतकार इसाक आल्बेनित्झ (१८६०), लेखक जी. के. चेस्टरटन (१८७४), सिनेदिग्दर्शक जोसेफ व्हॉन स्टर्नबर्ग (१८९४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९०५), लेखक अशोक टिळक (१९२१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज (१९२९), वाढत्या लोकसंख्येशी निगडित समस्यांवर मूलभूत संशोधन करणारे पॉल एरलिच (१९३२), नेमबाज भुवनेश्वरी कुमारी (१९४५), अभिनेता पंकज कपूर (१९५४)
मृत्युदिवस : शोधक बार्थलोम्यू डायस (१५००), अनेक मूलद्रव्ये शोधणारा रसायनशास्त्रज्ञ हंफ्रे डेव्ही (१८२९), अभिनेता पृथ्विराज कपूर (१९७२), माजी पंतप्रधान चरणसिंग (१९८७), साम्यवादी विचारांचे लेखक केशव गोखले (१९५२), संगीतकार स्नेहल भाटकर (२००७), विचारवंत, राजकारणी व लेखक ग. प्र. प्रधान (२०१०), अभिनेता डेनिस हॉपर (२०१०), सिनेदिग्दर्शक कानेटो शिंदो (२०१२)
---
आंतरराष्ट्रीय यू.एन. शांतीरक्षक दिवस
लोकशाही दिन : नायजेरिया.
१६५८ : चंबळ खोऱ्यातील सामूगडच्या लढाईत औरंगजेब आणि मुरादने भाऊ दारा शुकोहचा पराभव केला; पुढे औरंगजेब मुघल बादशाह बनला.
१९१३ : इगॉर स्ट्राव्हिन्स्कीचे संगीत आणि निजिन्स्कीचे नृत्यदिग्दर्शन लाभलेला बॅले 'Sacre du Printemps' (The Rite of Spring) प्रथम सादर झाला. आधुनिक कलेतला हा एक मैलाचा दगड मानला जातो.
१९१९ : आईनस्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताचा पुरावा शोधण्यासाठी आर्थर एडिंग्टन आणि अँड्र्यू क्लॉड यांनी प्रथम निरीक्षणे केली.
१९५३ : जगातले सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पहिले मानवी पाऊल पडले; एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी शिखर सर केले.
१९५८ : भूदान पदयात्रेच्या निमित्ताने आचार्य विनोबा भावे पंढरपूरच्या मंदिरात प्रथमच गेले.
१९६४ : पॅलेस्तिनी प्रश्नाबद्दल पूर्व जेरुसलेम येथे अरब लीगची बैठक; यातून पुढे पॅलेस्तिनी मुक्ती संघटनेची स्थापना.
१९८५ : पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चौदा महिने लागले.
१९८५ : ब्रसेल्समध्ये युरोपियन कपच्या अंतिम फुटबॉल सामन्यात लिव्हरपूलच्या चाहत्या प्रेक्षकांनी दंगा केला; त्यात भिंत कोसळली; परिणामी ४१ प्रेक्षक मृत्युमुखी पडले व शेकडो जखमी झाले.
१९९९ : 'डिस्कव्हरी' या यानाने प्रथम आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर डॉकिंग केले.
१९९९ : भारताचा कर्णधार महंमद अझरुद्दीन याने एकदिवसीय सामन्यात ९,००० धावांचा पल्ला पार करून विक्रमाची नोंद केली.
२०१३ : फ्रान्समध्ये पहिला समलैंगिक विवाह सोहळा संपन्न.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
तुम्ही फक्त तुमच्या फुटकळ
तुम्ही फक्त तुमच्या फुटकळ विचारांचा * टाकण्याकरतच इथे येता का हो? गेल्या देवळाच्या धाग्यात विचारलं होतं तो तीसरा देव कोणता .... उत्तर काही नाही.
चार ओळींनी धागा बनतो का? इतके दिवस इथे असूनही हे माहीत नाही तुम्हाला?
एवढे चिडू नका!! कोणता प्रश्न तुम्ही विचारला होता? माफी असावी!!
मी या ऐसी अक्षरे चा नियम तोडला असेल तर माफी मागतो...
माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/
सोनार साहेब , तुमच्या सारख्या
सोनार साहेब , तुमच्या सारख्या "Retaliative" ( हे तुमचेच स्वताबद्दल चे मत आहे )माणसानी एकदम सपशेल माघार घेणे समजत नाही.
तसेच तुमचे कुठलेच लिहाण, तुम्ही स्वताला "Sensual" म्हणता त्याला शोभत नाही.
तुम्हाला माझे जे लेख फुटकळ वाटतात,संपादकाना विनंती करून ...
कृपया डिलीट करायला सांगा. अजून कुणी वाचक माझे लेख पाहून दुखावले असेल तर क्षमस्व!
माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/
आधी आपण काय दिवे लावले आहेत
आधी आपण काय दिवे लावले आहेत ते सांगा मग दुसऱ्यांच्या धाग्याला फुटकळ म्हणा. आम्ही आपल्या वैचारीक, बौद्धिक, अध्यात्मिक दिवाळखोरीला कधीच फाट्यावर मारले आहे हे लक्षात ठेवा. आपणाला सो कॉलड आवडणारं लेखन ईथे भरपूर झालेय, ते वाचायचं जरा कष्ट घ्याल काय? ऊठसूठ एखाद्या धाग्याला फुटकळ म्हणणं हा अन्याय आहे. त्यांना आपापल्या आवडीचं लिहिण्याचा पुर्ण अधिकार आहे. जागे व्हा.
वयक्तिक कशाला होताय? मी
वयक्तिक कशाला होताय? मी त्यांच्या धाग्याला फुटकळ म्हटले आहे त्यांच्या बौद्धिक क्षमतेबाबतीत काहीच बोलले नाहीये. बाकी आपल्या धक्का, कडका आणि झुळुक या कविता आपल्या कवित्वाची साक्ष द्यायला समर्थ आहेत्च. त्यांच्या मनोरंजनाअत्मक मूल्यांबाबत मी पामराने काय बोलावे.
_____
आणि माझ्या बौद्धिक दिवाळखोरीबद्दल म्हणायचं तर - माझ्या सामान्य कुवतीची मला पूर्ण कल्पना आहे.तरी उबळ आली की मी देखील लेकाचे पो टाकत बसते हे मला पूर्ण माहीत आहे. पण त्याचबरोबर हेदेखील खरे आहे की माझ्या अनेक अंधश्रद्धा या संस्थळावर दूर झाल्या आहेत. स्त्रीमुक्तीवादी विचारांच बाळ्कडू नाही म्हणता येणार पण एक टॉनिक इथेच मिळालेलं आहे.
_____
माणसाला सर्वात जास्स्त दु:ख तेव्हा होतं जेव्हा त्याच्या दुखर्या नसेवर कोणी बोट ठेवतं आणि अॅव्हरेज कदाचित बिलो अॅव्हरेज आय क्यु असणं ही माझी दुखरी नस आहे. बरोबर आहे तुमचं माझी बौद्धिक दिवाळखोरी इथे लोकांनी सांभाळूनच घेतलेली आहे. असो आता मात्र घ्यावी लागणार नाही. मला शुचि काय कोणत्याच आय डी ने परत यायचं नाही. आरसा दाखवल्याबद्दल धन्वाद.
______
अजुन एक लेख उडविले आहेत ते कृतघ्नप्[अणातून नाही तर परत लो आय क्यु तून, तीरमीरीने........ हो असच भावनाव्याकुळतेतून, उन्मादातून मी लाइफ हँडल करते. लो-आय-क्यु!!!!!!!!!!!!! तरी ऐसी ने हे व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं म्हणून खूप आभारी आहे.
व्यनी पाहा
व्यनी पाहा
शुचे, कोणाचं आणि काय म्हणणं
शुचे, कोणाचं आणि काय म्हणणं मनावर घेतेस! चिल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
कशाला उगाचच लक्ष देतीयस शुचि.
कशाला उगाचच लक्ष देतीयस शुचि. तुला कोण लो आयक्यु म्हणेल?
लेख वगैरे उडवु नकोस आणि खव चालू कर आधी.
धन्यवाद
धन्यवाद अनु.
.
पिटी-पार्टीमध्ये अतिशय वेडपटासारखे लेख बिख उडवुन टाकले आहेत. अदितीला विनंती केलेली आहे की जर बॅकप असेल तर , रिस्टोअर करता येतील का याची. समंना ते एकच काम नाही हे माहीत आहे. अजुन एक - माझी स्वसंपादनाची सोय काढून घेण्यात यावी. असा बेअक्कल्पणा मी परत करणार नाही याची गॅरंटी मीच देऊ शकत नाहीये. इच्छा आहे पण स्वतःचाच भरोसा नाही.
- ऐसीची एक dysfunctional सदस्य - शुचि
सोनार जी तुम्हाला एक प्रश्न
सोनार जी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता गेल्या देवळाच्या धाग्यात. त्या उत्तराची अपेक्षेने वाट पाहीली होती. तरी उत्तर आले नाही तेव्हा कदाचित व्यनि करायला हवा होता की काय असे वाटते. पण एकदम ऊठून व्यनि करण्याचे धाडस नाही.
.
आशेने धागा उघडावा आणि ४ ओळीच सापडाव्या हा अपेक्षाभंगच आहे.
.
माफी मागण्याऐवजी त्या प्रश्नाचे उत्तर दिले असते तरी पुरले असते. असो श्टाइल एकेकाची. बाकी तुमच्या खूप धाग्यांवर मी सकारात्मक कमेंटस लिहील्या आहेत.
व्यनी करा की! त्यात काय एव्हढे? आधी गैरसमज दूर फेका बरं!!
<<<सोनार जी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता गेल्या देवळाच्या धाग्यात. त्या उत्तराची अपेक्षेने वाट पाहीली होती. तरी उत्तर आले नाही तेव्हा कदाचित व्यनि करायला हवा होता की काय असे वाटते. पण एकदम ऊठून व्यनि करण्याचे धाडस नाही.>>>
<<<आशेने धागा उघडावा आणि ४ ओळीच सापडाव्या हा अपेक्षाभंगच आहे.>>>
अहो शुची वैयक्तिक घेऊ नका!! पण देवळा बद्दल कोणता प्रश्न तुम्ही विचारला होता ते सांगा तर खरं. मग मी उत्तर देतो!
तुम्ही कोणता प्रश्न म्हणत आहात तेच मला समजत आणि सापडत आणि आठवत नाहीये.
नक्की काहीतरी मोठा गैरसमज झाला आहे. तुमचा किंवा माझा!! सर्वात आधी आणि आताच जो काही असेल नसेल तो गैरसमज दूर करा बरे!
नाहीतर ज्या "गैरसमजावर" चारोळी लिहिली तोच गैरसमज आपल्यात झाला तर चारोळीचा उपयोग काय?
आणि "चारोळी" असे शीर्षकात लिहिलेले असून सुद्धा तुम्ही मोठ्या धाग्याची अपेक्षा कशा करत होत्या?
चारोळी म्हणजे "चार ओळींची कविता" हे बरोबर आहे की चूक, सांगा बरे मला!!
माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/
पण देवळा बद्दल कोणता प्रश्न
http://aisiakshare.com/node/4784#comment-119518
.
.
सॉरी
ती मूर्ती खंडेराव ची आहे.
ती मूर्ती खंडेराव ची आहे.
माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/
आता माझ्या बद्दल कोणताच गैर समज नसावा ही विनंती..
अर्थात माझ्याही मनात कसलाच गैर समज नाही.
माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/
शुचि, तुमच्या सकारात्मक कमेंटस बद्दला ऋणी आहे!!
<<शुची: बाकी तुमच्या खूप धाग्यांवर मी सकारात्मक कमेंटस लिहील्या आहेत.>>
त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे...
अशा सकारात्मक कमेंटस मुळेच अधिकाधिक चांगले लिहिण्याची मला प्रेरणा मिळते...
माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/
ओके.
ओके.