मांजराने केला उंदराला फोन...
मांजराने केला
उंदराला फोन
उंदीर म्हणाला
"हॅल्लो कोण ?"
मांजर म्हणाले
म्याँव म्याँव म्याँव
उंदराने घेतली
बिळामधे धाव...
लावुन घेतले
बिळाचे दार
तुटली रेंज अन
कटला कॉल
कटला कॉल पण
फुटला घाम
बिळात होते नागोबा
करीत आराम
- ग्लोरी
प्रतिक्रिया
हे हे हे
हे हे हे
बडबड गीत एकदम मस्तंय..
फक्त शेवटच्या कडव्यात 'बिळात होते' एकदम पटपट म्हणावे लागते आहे त्याऐवजी
नागोबांना बघितलं
करताना आराम
किंवा
तिथे होते नागोबा
करीत आराम
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हा हा
मजा आली. आजच मुलांना वाचून दाखवतो !
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
छान
मजा वाटली वाचून
मांजर उंदीर म्हटल की टाँम अँन्ड जेरी कार्टून आठवतं
.
चांगला प्रयत्न
पहिली दोन कडवी गेय आहेत. नंतरची मात्र मीटरात बसत नाहीयेत.
पु.ले.शु.
मस्तच
मस्तच.
(ऋषिकेश यांच्या सुचवणीशी सहमत.)
सुरेख
फार सुरेख बालकविता.
:-)
क्यूट. कविता आवडली.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मस्त
मस्त.
मीटरसंबंधी सूचना पटल्या नाहीत. आहे ते बेष्ट आहे.
प्रतीसादाबद्दल सर्वांचे
प्रतीसादाबद्दल सर्वांचे आभार...
शेवटच्या दोन ओळी अशा वाचाव्यात
आत होते नागोबा
करीत आराम
आवडली
मलाही टॉम अँड जेरीची आठवण झाली.
एकदम छान. वर म्हटल्याप्रमाणे
एकदम छान. वर म्हटल्याप्रमाणे टॉम जेरी आठवले.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
कविता तर अतिशय सहज सुंदर
कविता तर अतिशय सहज सुंदर आहेच,पण सांगता अगदी पूर्णत्वाला जाणारी झालीये.
''मी तंबाखु खाणारच''
खूप खूप आवडली कविता. धन्यवाद
खूप खूप आवडली कविता. धन्यवाद !
मस्त
मस्त
राधिका
सुंदर!
'आयत्या बिळावर नागोबा' या म्हणीची प्रचीती आली.