आधुनिकतेला पारखी आपली मराठी

आधुनिकतेला पारखी आपली मराठी
.

गुगलने हिंदीमध्ये व्हॉइस सर्चची सोय करून देऊन भारतीय भाषांसाठी एक मोठी क्रांतीच केलेली आहे. त्याचा अचूकपणा मी तपासून पाहिला. अगदी छान आहे. मराठीतले शब्द बोलले तरी त्याला जवळपासचे हिंदी शब्द पकडले जातात.

दक्षिण भारतीय किंवा बांग्ला भाषेसाठी अशी सोय आधीच करून दिलेली आहे की नाही याची मला कल्पना नाही.

गुगलने टचस्क्रीनवर मराठीत लिहिलेले टेक्स्टमध्ये रूपांतरीत करण्याची सोय आधीच उपलब्ध करून दिलेली आहे. तीदेखील फार प्रभावीपणे काम करते.

असे प्रकल्प खरे तर फार महाग नाहीत. तरीही टेक्स्ट रेकग्निशन (text recognition), व्हॉइस रेकग्निशन (voice recognition) व स्पेलचेक (spellcheck) यासारख्या गरजेच्या गोष्टींकडे आपले स्वत:चे लक्ष जात नाही ही भारतीय भाषांची शोकांतिका आहे. आणखीही काही गरजा असू शकतात.

मराठीतून टायपिंग करण्यासाठीची निर्दोष साधनेही जवळजवळ नाहीतच किंवा असली तरी बोटावर मोजण्याइतकीही नाहीत हे वास्तव आहे. शिवाय लिपी देवनागरी असली तरी मराठी व हिन्दीच्या काही गरजा वेगळ्या आहेत हे लक्षात घेतले जात नाही.

आपल्या शासनाचे सांस्कृतिक खाते, शिक्षण खाते यांचे या आधुनिक गरजांकडे लक्षच जात नाही का? यथावकाश गुगल मराठीसाठीही हे करेल, पण स्वत:हून स्वभाषेचा विविध मार्गांनी विकास करण्यातला अभिमान आपल्याकडे नाहीच का? हे प्रकल्प करण्यामध्ये गुगल व आपले सरकार यांची भागिदारी आहे असेही ऐकण्यात येत नाही.

सध्या अनेक जण सोशल मेडियावर रोमनमधून मराठी लिहितात. त्यांनी तसे लिहिले तरी वाचणा-यांनी ते समजून घ्यावे अशी त्यांची अपेक्षा असते. ते सोशल मेडियामध्ये पुढचा बहुतेक काळ असणारच आहेत, तेव्हा देवनागरी टायपिंगची पद्धत शिकून घ्यावी, आत्मसात करून घ्यावी हे त्यांच्या लक्षातच येत नाही. इतका आळशीपणा चालूच राहिला, तर भविष्यात रोमन हीच मराठीची लिपी राहील व याबाबतीत आपण मलेशिया-इंडोनेशियाची मलय भाषा, फिलिपीन्सची टॅगॅलॉग भाषा यांच्या यादीत जाऊन बसू.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

उत्तम विषय. मांडणी आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीतून टायपिंग करण्यासाठीची निर्दोष साधनेही जवळजवळ नाहीतच किंवा असली तरी बोटावर मोजण्याइतकीही नाहीत हे वास्तव आहे.

सहा सात वर्षांपूर्वी 'गमभन' ही पब्लिक डोमेनमध्ये असलेली प्रणाली हाती लागली.
शिकायला सुमारे ३० मिनिटं लागली.
तेंव्हापासून अचूक मराठी टायपिंग करण्यात कसलाही अडथळा आलेला नाही.
तेंव्हा तुम्ही जे वास्तव म्हंटलंय तो प्रत्यक्षात एक कल्पनाविलास आहे!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही म्हणता तसे तुम्ही मराठी टायपिंगमध्ये पारंगत आहात ही चांगलीच गोष्ट आहे. येथे किंवा अशा पोर्टलवरही सारे देवनागरीतच लिहितात. परंतु अजूनही सर्वमान्य अशी प्रणाली आहे असे वाटते का? आता कोठे युनिकोडपर्यंतची प्रगती आहे. पूर्वी वापरात असलेले कितीतरी फॉंट आता दिसेनासे झालेले आहेत. मराठीला याबाबतीत आधुनिक करण्याचे टरवून प्रयत्न झाले असते तर आज ही परिस्थिती नसती. शिवाय आपन फक्त टायपिंगबद्दलबोलत आहोत. मी उल्लेख केल्याप्रमाणे पुढची कितीतरी आव्हाने आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अंड्राइडच्या नव्या आव्रुत्तीवर उपलब्ध असलेल्या बहुसंख्य ब्राउझरांत (गूगलक्रोमासहित,आणि विशेषेकरून गूगलक्रोमात) गमभन चालत नाही. आणि मग टचपाल-(! पुन्हा एकदा पाल! पालींची बदनामी, इ.इ.)-सारख्या तद्दन भिकार प्रणालीवर (जीत रुग्वेदातला रु, अपल किंवा आरेंजमधल्या चंद्रबिंद्या, झालेच तर सुर्यां-(यानी कि नाइव्ज़-)मधील र्या वगैरे टंकता येत नाहीत) अवलंबून राहावे लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुकाटाआ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खास मराठी भाषेत लिहायला माझ्या मते गमभन ही प्रणाली उत्तम आहे. मी बरेच वर्षे वापरली. तिच्या एक दोन नव्या आवॄत्या निघाल्यावर त्याही वापरल्या. पण सध्या त्याची जी नवी आवृत्ती निघाली आहे ती वापरू शकलो नाही. त्यासम्भधात ओंकार जोशी याच्याबरोबर इमेल द्वारा पत्रव्यवहार केला. पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे तिच्या जुन्या (आधिच्या) आवृत्तिचा घागा हवा आहे. त्याबाबत मला कोणी कृपया मदत करू शकेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गावरान

मी बराहा प्रणाली वापरतो. त्याचे ३.१ व्हर्जन इन्स्टॉल न करता वापरतो. Wink
मराठी साइटवर आणि बराहात काही अक्षरे वेगळ्या प्रकारे टाइप करावी लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मोबाइलवर देवनागरी लिहायला गूगल हिंदी इनपुट बरच चांगलं आहे. कीबोर्ड इथे ऐसीवर जो आहे ऑल्मोस्ट तसाच आहे. पण वर न.बा म्हणाल्याप्रमाणे तिथेही अ‍ॅ आणि र्‍या साठी थोडा त्रास होतो. पण बहुतांश टंकन अगदी व्यवस्थीत होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !