Skip to main content

साठेचं काय करायचं?

पूर्णविराम
इथे काहीच नाहीये!

.शुचि. Fri, 18/12/2015 - 01:21

पर्याय १ व २- नको -लष्कराच्या भाकरी भाजु नयेत.
पर्याय ४ - मित्रमैत्रिणींना बिनधास्त सांगा..... पण फुकटात नको काय्ये ना फुकटात मिळालेल्याची किंमत शून्य असते.
पर्याय ३ - मी हेच केलं असतं.

मिसळपाव Fri, 18/12/2015 - 04:44

In reply to by .शुचि.

तू गंमतीत म्हणत्येस, राईट? If you were serious....:-(. कोणाच्या गाडीचा लाईट चालू राहिला, तुमच्या शेजार्‍याच्या बागेतला नळ चालू राहिला, कॉन्फरंन्स रूममधे कोणी पॅड विसरलेलं दिसलं, स्टोअरमधनं वस्तू घेताना अर्धीच कींमत चार्ज झाली की तू काहीच करत नाहीस?

.शुचि. Fri, 18/12/2015 - 20:24

In reply to by मिसळपाव

मिसळपाव मला २-३ वेळा $२० तर कधी $१५ जास्त मिळाले आहेत म्हणजे दुकानातील कॅशियरने चुकून दिलेले आहेत . ते मी पहील्यांदा ताबडतोब परत केले. परत परत व्हायला लागलं अर्थात २ र्‍या की ३ र्‍या वेळी (अर्थातच दर वेळी वेगळ्या कॅशिअरकडून) तेव्हा मलाच कंटाळा आला परत परत काय आपणच दुप्पट काळजी घेत बसायच? :( मग एकदा $२० ठेवले व नवर्‍याला फोन केला. तो म्हणाला "नाही. परतच कर. उगाच मनात राहील" व परत केले.
.
एकदा घाटकोपरात लॉटरीचे तिकीट घ्यायला गेले होते तर पायाशी १०० रुपयाची नोट सापडली. तिची ग्लुकोज बिस्किटे घेतली व एका बाळाला स्तनपान करणार्‍या कामगार मातेला दिली. की घे बाई तुला कॅल्शिअम मिळो.
.
सांगायचा मुद्दा हा की लोभीपणा माझ्यात नाही, सचोटीही आहे. पण जर ऑनलाइन असे काही सापडले तर मी तर ब्वॉ डाऊनलोड करेन :( आणि त्यामागची कारणमीमांसा मला कळत नाही. उदा मला एक गाणी बेकायदेशीर अर्थात, डाऊनलोड करण्याची साइट पूर्वी माहीत होती. आणि तशा बर्‍याच सी डी मी बनवल्याही होत्या :(

मिसळपाव Fri, 18/12/2015 - 04:38

पर्याय १. आणि खरं म्हणजे हे चुपचाप न करून टाकता ईथे त्याबद्दल लिहितोयस आश्चर्य वाटलं. पर्याय ४ न वापरल्याबद्दल कौतुक. आणि आय होप की त्याना सांगशील तेव्हा "तुम्हाला बरं नेमकं कळलं?", "तुम्ही मुळात तिकडे नाक खुपसलंतच कशाला?", "तुम्ही नक्की लोकाना सांगितलं असेल त्याबद्दल तुमच्यावर दावा ठोकावा का विचार चालू आहे" असलं सांगणाता आचरट नको भेटूंदे !! शेवटच्या पॉईंटचा सिरीअसली विचार कर.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 18/12/2015 - 05:17

हे बुकगंगाबद्दल असावं.

काय भगदाड आहे हे मी काही शोधायला जाणार नाहीये, (म्हणजे तेवढी माझी कंप्यूटिंग पत नाही.) पण त्या लोकांना सभ्यपणे एकदा इमेल टाकावं असं वाटतं. त्यापुढे त्यांनी ठराविक काळात उत्तर दिलं नाही (जे होण्याची शक्यता मला मराठी लोकांच्या बाबतीत फार वाटते) तर मग पुन्हा या प्रश्नाचा विचार करावा. पहिल्या इमेलमध्ये पुरावा जोडता आला तर उत्तमच.