दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२९ एप्रिल
जन्मदिवस : गणितज्ञ, डॉक्टर व विनोदी लेखक जॉन आरबथनॉट (१६६७), चित्रकार राजा रविवर्मा (१८४८), गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता आँरी प्वॉंकारे (१८५४), ग्रीक कवी कॅव्हाफी (१८६३), ४० पेटंटे घेणारे आणि २०० शोध नावावर असणारे वैज्ञानिक शंकर आबाजी भिसे (१८६७), समस्थानिकांबद्दल संशोधन करण्यासाठी नोबेल मिळवणारा हॅरल्ड उरे (१८९३), जाझ पियानोवादक व संगीतकार ड्यूक एलिंग्टन (१८९९), सिनेदिग्दर्शक, कवी व छायाचित्रकार माया दरेन (१९१७), तबलावादक अल्लारखा (१९१९), पाश्चात्य संगीतसंचालक झुबिन मेहता (१९३६), अभिनेत्री, गायिका, बालसाहित्यिक व भाषांतरकार माधुरी पुरंदरे (१९५२), अभिनेता डॅनिएल डे ल्यूईस (१९५७), अभिनेत्री मिशेल फीफर (१९५८), टेनिसपटू आंद्रे आगासी (१९७०), अभिनेत्री उमा थर्मन (१९७०), गायक आनंद भाटे (१९७१), क्रिकेटपटू आशिष नेहरा (१९७९)
मृत्युदिवस : ग्रीक कवी कॅव्हाफी (१९३३), तत्त्वज्ञ लुडविग विटगेनश्टाईन (१९५१), समीक्षक श्री. के. क्षीरसागर उर्फ श्रीकेक्षी (१९८०), सिनेदिग्दर्शक अल्फ्रेड हिचकॉक (१९८०), अभिनेता मोहन गोखले (१९९९), सिनेदिग्दर्शक, गीतकार व लेखक केदार शर्मा (१९९९), अर्थतज्ज्ञ जॉन केनेथ गॅलब्रेथ (२००६), LSDचा शोध लावणारा रसायनशास्त्रज्ञ अल्बर्ट हॉफमन (२००८), अभिनेता इरफान खान (२०२०)
--
आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस (आधुनिक बॅलेचा जनक जाँ-जॉर्ज नोव्हेरच्या जन्मदिनानिमित्त)
जपानी 'गोल्डन वीक'ला प्रारंभ
वर्धापनदिन : वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड
१९३७ : फिलिपिनो स्त्रियांना मताधिकार मिळण्यासाठी मतदान; ९०% जास्त मते मिळून स्त्रियांना मताधिकार मिळाला.
१९४५ : डाखाऊ छळछावणी मुक्त; जर्मनीची दुसऱ्या महायुद्धात बिनशर्त शरणागती, युद्ध सुरूच.
१९४६ : जपानी सम्राट तोजो आणि २८ इतर जपानी नेत्यांवर युद्धगुन्ह्यांबद्दल खटला सुरू.
१९५३ : जगातल्या प्रथम 3-D दूरचित्रवाणीचा कॅलिफोर्नियात प्रयोग.
१९६१ : लुशियानो पाव्हारोत्तीच्या ऑपेरा कारकीर्दीला सुरुवात.
१९६८ : 'हेअर' संगीतिकेचा ब्रॉडवेवर पहिला प्रयोग.
१९८२ : चीनच्या लोकसंख्येने १०० कोटींचा आकडा गाठला.
१९९१ : बांगलादेशात भीषण चक्रीवादळ; १,३८,००० मृत.
१९९२ : लॉस अँजेलेस येथे कृष्णवर्णीय रॉडनी किंगला मरहाण करताना सापडलेल्या चार श्वेतवर्णीय पोलिसांची खटल्याअंती निर्दोष सुटका; शहरात वांशिक दंगली सुरू; पुढे सहा दिवस दंगली चालू; सुमारे ५५ मृत व २,३०० जखमी.
१९९३ : 'सर्न'ने वर्ल्ड वाईड वेब हा प्रोटोकॉल विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.
१९९७ : रासायनिक शस्त्रास्त्रांवर बंदी घालण्याचा जागतिक करार लागू झाला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
लोल. लय भारी. त्या ५
लोल. लय भारी.
त्या ५ वर्षांच्या प्रश्नाला माझ्या डोक्यात वाजणारं उत्तर : "पाच वर्षांपूर्वी तू कुठे होतास रे हांडग्या?"
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
खरच. ५ वर्षं हे कंपनीत किंवा
खरच. ५ वर्षं हे कंपनीत किंवा कुठेही जगात आपल्याला परत भेटणार याची शक्यता किती विशेषतः सध्या आय टी कंपन्यांमधील कर्मचार्यांची उलाढाल पहाता
पण नाही उगाच काहेतरी प्रश्न काढून जोखायला बघायचं
५ वर्षांनंतरच उत्तर मी ..तू
:bigsmile: :bigsmile: ५ वर्षांनंतरच उत्तर मी ..तू घेतोय तसा इन्टर्व्ह्यु घेत असेन अस उत्तर दिलं होत.
:)मला तर वाटतं कधीतरी बोलावं
:)मला तर वाटतं कधीतरी बोलावं तू जशी आता खुर्ची उबवतोयस तशी मी ही खुर्ची उबवत असेन
एका कंपनीत माझा इंटरव्हिव
एका कंपनीत माझा इंटरव्हिव चक्क सी ई ओ घेतला होता.
त्याच्या टेक्नीकल प्रश्नांना स्वतः च उत्तरे देत होता.
वर त्याच्या कंपनीत माणसं किती वाइट काम करत आहेत हे ही सुनावत होता.
कहर म्हणजे एकाही प्रश्नाचे उत्तर आले नसतानाही मला सिलेक्ट केले.
ज्वाइन झाल्यावर याची किर्ती सगळ्यांना सांगण्याचे पुण्य कर्म आम्हीच केले होते.
(No subject)
हां सापडला हरवलेला लेख
हां सापडला हरवलेला लेख -
परवाचीच गोष्ट सांगते. एक इन्टर्व्ह्यु देण्याकरता पायपीट करत , जागा शोधत, घामाघूम अशी ठरलेल्या स्थळी पोचले. कितीही इन्टर्व्ह्यु आजतागायत दिले असले तरी प्रत्येक इन्टर्व्ह्युला अस्मादिकांना घाम हा फुटतोच. तरी बरं बेंचवर वगैरे नव्हते नाहीतर घाम फुटण्याबरोबर पोटही बिघडतं ; ) तर ते एक असोच.
.
मोठ्या, ऑफिसात आत गेले तर प्लश खुर्च्या अन ए सी ने स्वागत केले. काऊंटरवरती एक सुहास्यवदना होती. जिने माहीती घेऊन , आतमध्ये माझ्या येण्याची वर्दी दिली. आता वाट पहाण्याचा अवघड काळ समोर होता. परत एकदा स्वतःच्याच रेझ्युमे ची उजळणी करुन, जो की आता आठवेनासा झाला होता, मी कूल डाऊन होण्याचा प्रयत्न केला. पण जितका प्रयत्न अधिक, तितकी चलबिचल अधिकच वाढली.
.
शेवटी १५ मिनिटांनी एकदाचं आतून बोलावणं आलं. ही १५ मिनीटे मला युगांसारखी भासली होती तो भाग अलहिदा. दारावर टकटक करुन आत गेले तो ३ जणांचा पॅनल आसनस्थ होऊन माझ्याकडे पहाताना दिसला. जणू माझी प्रत्येक हालचाल अन अवघडलेपण टिपून त्यावरुन ते काही निष्कर्षच काढणार होते. पैकी एक जण बद्ध्कोष्ठ्पिडीत दिसत होता तर दुसरी बाई खुनशी दिसत होती व तीसरा नॉर्मल अन होयबा वाटत होता.
.
या मिस देखणे म्हणून त्यांनी मला आत बोलावून स्थानापन्न होण्याचा इशारा केला. औपचारीक ओळख झालयावरती बद्धकोष्ठ्पिडीताकडून नेहमीचा प्रश्न आला - हां तर थोडं तुमच्याबद्दल सांगा.
इतका रेझ्युमे समोर आहे तो काय पूजा करायला दिला का रे? वाचायला वेळ नाही मिळाला साल्या.
पण उघडपणे पोपटासारखा एक्स्पिरीअन्स व स्पेशली त्यांना हव्या असलेल्या डोमेनचा एक्स्पिरीअन्स घडाघड बोलून दाखवला.
.
आता खुनशी मॅडमना जोर चढल्याचे दिसले - Where do you see yourself after 5 yrs?
काय ऑबसेशन असतं ५ आकड्याचं या लोकांना काय माहीत? फुगलेला बँक बॅलन्स आणि फुगलेले रिटायरमेन्ट पॅकेज मला दिसतय असे बाणेदार उत्तर द्यायचा मोह झाला
पण वेळीच सावरुन म्हटलं - मी टेक्निकल लीड होऊ इच्छिते. यावर अपेक्षित प्रश्न आलाच की मॅनेजमेन्ट का नाही.
मी मॅनेजमेन्ट म्हटलं असतं तर टेक्निकल लीड का नाही हे विचारलच असतंं ना चिवड्यांनो? अरे या लहानपणीच्या शिव्या का आठवताहेत अचानक? असो,)
काहीतरी थातूर्मातूर कारण देऊन तो प्रश्नही टाळला.
.
पुढे सॉफ्टस्किलचे काही प्रश्न आले जसे- कंपनीचा फायदा होणार आहे पण थोडा अवैध किंव आनैतिक मार्ग स्वीकारावा लागतोय तर तुम्ही काय कराल?
कंपनीच्या फायद्याशी मला काय देणं घेणं ... च्यायला माझी कातडी बचावली की ऐष. मला पगार-बोनस-उन्नती मिळाल्याशी कारण.
पण उघडपणे - कंपनीच्या तत्कालीन तात्पुरत्या फायद्यासाठी मी कंपनीचे रेप्युटिशन लाँग टर्म धोक्यात घालणार नाही. यावर होयबा खूष झालेला दिसला तर खुनशी वार फुकट गेल्याने निराश झालेली वाटली.
.
होयबा गरीब वाटला. त्याने विचारले - "मिस जर तुमचा प्रकल्प वेळेआधी पूर्ण झाला तर रिकाम्या वेळेचा सदुपयोग तुम्ही कसा कराल?"
मला १००% खात्री आहे रे तू मग्गू असणार आणि मरुन मरुन प्रकल्प लवकरत लवकर पूर्ण करत असणार. पण मी तुझ्याइतकी सरळ नाय रे बाबा. उगा अपेक्षा फुगवु कशाला अन परत जर कामात चूका निघाल्या तर वरचा म्हणणार घिसाडघाई केलीत. पण थांब तुझ्या प्रकृतीला साजेसं उत्तर देते.
सर तसं झालं ना तर उत्तमच की. उरलेला वेळ सेल्फ-ग्रोथ्/अन्य प्रकल्पांना मदत आदि विधायक कार्यात रिसोर्सेस लावता येतील. : )
.
बरं एका प्रकल्पाला रिसोर्सेस ची गरज आहे कारण त्यांची डेड लाइन आलेली आहे व तुम्हालाही तुमचे रिसोर्सेस वापरुन स्वतःचा प्रकल्प पूर्ण करायचा आहे तेव्हा जर दुसर्या टीमलीडने तुमचे रिसोर्सेस उधार मागीतले तर काय कराल? ती रिक्वेस्ट कशी हँडल कराल? हा प्रश्न समजायला थोडा वेळ लागला. समजल्यावर मनात म्हटलं
फाट्यावर मारु ती रिक्वेस्ट
पण उघड तर असले भाव व्यक्त करता येत नाहीत म्हणून म्हटलं - माझ्याकडचे नवशिके रिसोर्स उधार देइन ज्यायोगे त्यांना अनुभव तर मिळेलच पण दुसर्या प्रकल्पाचे काम मार्गी लागेल अन रेनचेकच्या रुपाने, माझा वरचष्मा राहील.
.
पुढे बराच वेळ टेक्निकल डिस्कशन होऊन, नंतर वाटाघाटी होऊन इन्टर्व्ह्यु संपला.
.
आता फक्त वाट पहात आहे काय उत्तर येते याची. पण दर वेळेस इन्टर्व्ह्यु च्या स्ट्रेस मधून गेले की वाटते नको तो ताप परत परत. अन परत काही दिवसांनी परत इन्टर्व्ह्यु द्यायची उबळ येतेच. इन्टर्व्ह्यु-अॅडिक्ट झाले आहे दुसरं काय.
इति इन्टर्व्ह्यु पुराण