लेक टॅपिंग
कोयना धरणात 'लेक टॅपिंग' केल्याची बातमी वाचली आणि उत्सुकतेपायी 'लेक टॅपिंग' थोडा शोध घेतला. http://www.rockmass.net/files/lake_tap_method.pdf येथे ह्याची सोपी माहिती आणि वरील चित्र मिळाले. सर्वांच्या माहितीसाठी ते येथे देत आहे.
======
ही नेटकी माहिती ऐसीअक्षरेच्या वाचकांना मराठीतून मिळावी म्हणून त्यातील महत्त्वाच्या परिच्छेदांचा अनुवाद करून देत आहे. मुळ पीडीएफ् फाईल मधे प्रताधिकाराचा उल्लेख नसल्याने माहिती प्रताधिकारमुक्त आहे असे समजतो. -- संपादक
'टॅपिंग पातळी' च्या खाली तोंडाशी एक लहान दगडी 'प्लग' सोडून बाकी तलावाखालून आणि तलावाच्या दिशेने एक बोगदा खणून ठेवणे हे 'लेक टॅपिंग' या प्रणालीच्या मुळ तत्त्वात समाविष्ट आहे (मुळ दुव्यावरील चित्र१ पहा). हा अंतिम प्लग नंतर फोडला जातो, ज्यामुळे तलावाच्या जमिनीला खालून एक भोक तयार होते. हे तंत्रज्ञान जूने आहे आणि एकट्या नॉर्वेमधेच कित्येकशे तलाव असे टॅप केले आहेत.
हे तंत्रज्ञान जलविद्युतक्षेत्रातील पाणी-पुरवठा, पिण्याचे पाठी, निस्सारणासाठी पाणी पुरवठ्या बरोबरच किनार्यापासून दूरच्या क्षेत्रातून तेल व गॅस पोहोचवण्यासठी सुद्धा पावरले जाते. यासाठी सर्वात महत्त्वाची गरज आहे जमिनिच्या योग्य स्थितीची - म्हणजे योग्य स्थैर्य आणि जेथे भोक पाडले जाणार आहे तेथील दगडांची पार्यता यांच्या स्थितीची.
(या कार्यासाठी) योजना अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते आणि तिचा सतत पाठपुरावा करावा लागतो. त्याची महत्वाची वैशिष्ट्ये पुढिलप्रमाणे:
- बांधकाम सुरू करण्यापूर्वी, भुगर्भातील पाषाणांची आणि तलावाची गाळाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवणे
- शेवटच्या स्फोटासाठी योग्य पद्धतीची संकल्पना (डिजाईन) ठरवणे (म्हणजे 'ओपन' किंवा 'क्लोज' पद्धत वापरायची ते ठरवणे)
- भोकपाडण्याच्या जागेकडे बोगदा खणताना आणि शेवटच्या दगडी प्लगची संकल्पना ठरवताना पाषाणाचे वजन आणि पार्यता यावर नियंत्रण ठेवणे
- भोक जेथे पडणार आहे त्या भागातील प्रत्येक घटाकाचे संपूर्ण डिजाईन करून, शेवटच्या स्फोटाच्या वेळी तयार होणार्या दाबाने (मूळ ढाच्याला) कोणतेही नुकसान होणार नाही याची खात्री करणे
हे तंत्रज्ञान
हे तंत्रज्ञान जलविद्युतक्षेत्रातील पाणी-पुरवठा, पिण्याचे पाठी, निस्सारणासाठी पाणी पुरवठ्या बरोबरच किनार्यापासून दूरच्या क्षेत्रातून तेल व गॅस पोहोचवण्यासठी सुद्धा पावरले जाते. यासाठी सर्वात महत्त्वाची गरज आहे जमिनिच्या योग्य स्थितीची - म्हणजे योग्य स्थैर्य आणि जेथे भोक पाडले जाणार आहे तेथील दगडांची पार्यता यांच्या स्थितीची.
हे कसं होत असेल याचा अंदाज येत नाहीये.
लेक टॅपिंगचा फायदा काय असा मुख्य प्रश्न पडला आहे.
पेपरात बातमी होती की
पेपरात बातमी होती की अंदाजपत्रकाच्या खर्चापेक्षा कमी खर्चात काम झाले अन कमी वेळात काम झाले.'
बाकीचे लोकही तेथील अभियंत्यांचे खुप अभिनंदन करत होते वैगेरे.
तुमच्यासारखाच माझाही अजून विश्वास बसत नाही.
मुख्य काम तर दोन परदेशी तरूणांनी केले आहे. म्हणजे तेथे जावून सुरूंग पेरणे आदी.
म्हणजे येथील अभियंत्यांवर अविश्वास नाही पण हे काम या आधीच व्हायला पाहीजे होते. केवळ कोयनाच नव्हे तर जेथे जेथे शक्य आहे तेथे तेथे हा प्रयोग व्हायला हवा.
अवांतर बातमी: आजच्याच पेपरात बातमी आहे की आंध्रप्रदेश महाराष्ट्राच्या सीमेवर एक धरण बांधतो आहे. त्याच्या बॅकवॉटरमध्ये नांदेड जिल्ह्यातले मोठी मंदीरे, गावे जात आहेत अन आपल्या शासनाला याची शेवटपर्यंत माहीती नाही. महाराष्ट्राचा रोष नको म्हणून त्या धरणाला डॉ. बाबासाहेबांचे नाव दिले आहे.
आता शासन म्हणजे पुढारी नव्हे. ते तर खावूगुल्ले आहेत. आता आहेत पाच वर्षांनंतर नाहीत. पण ही नोकरशाही मंडळी काय करत होते?
एक शंका आहे. समाधान
एक शंका आहे. समाधान करावे.
टनेल तर झाला. आता या टनेलमधून पाणी वाहून घेतले जावून पुढे त्यावर जनित्र चालविले जाईल, विजनिर्मीती होईल. असो.
पण ह्याच पाण्याचा पुर्नवापर होईल का? (म्हणजे हेच पाणी पुन्हा धरणाच्या पाण्यात टाकले जाईल काय?)
की विजनिर्मीतीनंतर हे पाणी पुढे नदीत म्हणजेच शेती, पिण्यासाठी वापरले जाईल?
तसे नसेल तर फक्त धरणात उन्हाळ्यात कमीपाणी उरते त्यावेळी या टनेलमधून येणार्या पाण्याचा उपयोग होईल. बरोबर की चुक?
माझे सामान्यज्ञानावर आधारित उत्तर
माझा स्थापत्यशास्त्राशी काहीच संबंध नाही. सामान्यज्ञानाच्या आधारे वरील प्रश्नांची उत्तरे अशी देता येतील.
१) टॅप केलेले पाणी परत धरणात टाकायचे तर ते उचलून टाकावे लागेल कारण ते धरणाच्या पाण्यापेक्षा खालच्या पातळीवर आहे. त्यासाठी लागणारी ऊर्जा त्या पाण्यापासून निर्माण केलेल्या ऊर्जेइतकीच असेल आणि हा केवळ zero-sum खटाटोप ठरेल!
२) ह्या पाण्याची ऊर्जा वापरून सध्याची जनित्रेच फिरवून वीज निर्माण केली जाईल आणि तदनंतर ते पाणी जुन्याच मार्गाने वीज निर्माण करणार्या केन्द्रातून बाहेर पडेल. माझ्या माहितीप्रमाणे अशा बाहेर पडलेल्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग करण्याची यंत्रणा अस्तित्वात आहेच.
टॅप केलेले पाणी परत धरणात
टॅप केलेले पाणी परत धरणात टाकायचे तर ते उचलून टाकावे लागेल कारण ते धरणाच्या पाण्यापेक्षा खालच्या पातळीवर आहे. त्यासाठी लागणारी ऊर्जा त्या पाण्यापासून निर्माण केलेल्या ऊर्जेइतकीच असेल आणि हा केवळ zero-sum खटाटोप ठरेल!
zero-sum खटाटोप ठरणार नाही, यात घर्षण, आवाज यात ऊर्जा खर्च होऊन उलट पाणी वर टाकण्यासाठी अधिक उर्जा खर्च होईल.
बाहेर पडलेल्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग करण्याची यंत्रणा अस्तित्वात आहेच.
फक्त यंत्रणा उपलब्ध असण्याचा फायदा नाही. हे पाणी जिथे पुरवलं जातं तिथल्या शेतीमधे सध्या पाण्याची आवश्यकता नसल्यास पाणी पुरवठा करण्याची यंत्रणा असूनही फायदा नाही. आदर्श परिस्थितीत १२ महिने जलविद्युत निर्मिती झाली तरीही १२ महिने शेतीला पाणी नको असतं.
अवान्तर विनोद
अशा बाहेर पडलेल्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग करण्याची यंत्रणा अस्तित्वात आहेच.>
धरणातून बहेर पडलेले पाणी शेतीकडे जाते ह्यावरून ऐकलेली एक गोष्ट माझ्या पंजाबी मित्रांनी सांगितलेली आठवते.
भाक्रा-नांगल प्रकल्पाला विरोध असणार्या काहीजणांनी भोळ्या शेतकर्यांमध्ये असा प्रचार केला की वीज 'काढून' घेतलेले नि:सत्त्व पाणीच शेतीला मिळणार आहे. अशा नि:सत्त्व पाण्यावर चांगली पिके कशी येणार?
मी चरणसिंग (तेच का नक्की) का
मी चरणसिंग (तेच का नक्की) का असंच कोणी जाट नेत्याचं नाव ऐकलं होतं.
आईच्या एक कलीग, शाळेत विज्ञान शिकवणार्या, त्यांनीही ही गोष्ट मला "सच्ची बात" म्हणून ऐकवली होती. हे अधिक दुर्दैव.
माझ्या आजोळी अशाच एका छोट्याश्या पावर हाऊसचं पाणी शेतीसाठी येतं. आईच्या लहानपणी म्हणे सिनेमांच्या आधी 'राजा नाल्या'मुळे दुबार शेती कशी शक्य होईल आणि त्यातून कशी सुबत्ता येईल याचे माहितीपट दाखवत. या राजा नाल्याचं पाणी भाताला नको असतं तेव्हा थांबतं. तेव्हा वीज कशी निर्माण करतात, करतात का नाही हे माहित नाही. हिवाळ्यातल्या पेरणीसाठी शेतकर्यांच्या इच्छेनुसार (खरंतर मोसमानुसार) पाणी सोडतात.
मोडकसागर धरणात लेक टॅपिंग
मोडकसागर धरणात लेक टॅपिंग केल्याची बातमी वाचली आणि हा धागा आठवला
समयोचित महिती आहे. दुव्यावरील
समयोचित महिती आहे. दुव्यावरील चित्रे समजायला उपयुक्त आहे.
इथे शेअर केल्याबद्दल आभार