सँपादन करतायत!

'संपादक ही संस्था कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे का?' या धाग्यात झालेल्या चर्चेतून सुरू झालेला नवा उपक्रम.

पहिला खर्डा:

शेंबूड हा सर्वत्र आहे, चराचर मॅमलांत तो भरुन राहिलेला आहे. तो नासिकेत आहे, गळी स्थळी आहे. त्याची एखाद्यावर कृपा झाली तर तो कित्येक दिवस तो तिथेच कृपेचा वर्षाव करितो. तो कुठून येतो, कसा येतो हे मानवास पूर्वी ज्ञात नव्हते. तो संपत कसा नाही ह्याचे त्यास कुतूहल होते. तो नको तेव्हाच कसा येतो ह्या प्रश्नाने भल्याभल्यांचे नक चोंदले गेले गेले होते. तो वहायला लागला की पळता भुई गुळगुळित होते. पण तोच घट्ट झाला की अधिकच वैताग होतो.

थोरथोरांच्या लहानपणीच्या आठवणी शेंबडानेच भरलेल्या, माखलेल्या आढळतील. तुम्ही कितीही नाही म्हणालात, नको म्हणालात, दूर सारलेत तरी तो दयाळू आहे. तो तुमचा पिच्छा सोडत नाही.
शेंबूड वाहता असणे आणि शेंबूड घट्ट असणे ह्यावरून मानवांच्या प्रमुख प्रजातींची उत्क्रांती कशीकशी होत गेली ह्याचा मिळतो. आइसएजमधील काही मानवी वास्तवांच्या पुराव्यातून सोबत सापडलेला चिकट द्राव हा शेंबूडच आहे हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे. अर्थात शेंबूड हा वस्तुतः पृथ्वीतलावरील लोकल/स्थानिक द्राव नसून पृथ्वीबाहेरून आलेल्या अतिप्रगत मानवांनी त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून मानवी जनुकांत तो अल्प किरणोत्सारी द्राव तसाच इण्जेक्ट केला अशी कॉन्पिरसी थिअरीही समोर येत आहे.

पूर्वीच्या काळी शेंबडास महत्व होते.भटका मानव नव्यानेच नागर संस्कृतीत येत होता. ज्याचा शेंबूड अधिक त्याची भक्ती अधिक असे मानण्याचा असा तो नव-नागर संस्कृतीचा तो काळ होता. लहान पोरांना अधिक शेंबूड येत असल्यानेच तेव्हापासूनच ती देवाघरची फुले ठरली असावीत असे ज्येश्ठ विचारवंत श्री मुर्गा दाखवत ह्यांनी सोदाहरण स्पष्ट केले आहे. पण त्याचे भरावती धर्व्यांनी साक्षेप खंडन केले आहे. दोघांच्याही म्हणण्यात काही तथ्य असले तरी शेवटी संस्कृतीच्या उगमाशी एक शेंबडा अध्वर्यूच होता हे ह्यावर विद्वानांचे एकमत आहे. कुणा सतत शेंबूड वाहणार्‍यास सतत नाक पुसत शिकार करण्याचा कंटाळा आला असावा आणि योगायोगाने त्याला त्यामागील काही वर्षात उगवलेल्या धान्य वनस्पती नजरेस पडल्या असाव्यात. शिकारीसाठी मग नाक पुसत मरमर करण्यापेक्षा सध्या उगवलेले धान्य आयते खाउ अशा विचाराने तो तेव्हापुरता स्थायिक झाला असावा असाही एक तर्कप्रवाह आहे. मग साहजिकच इतर अशा नाक वाहणार्‍यांनी त्याच्या ह्या सवयीस दुजोरा देत एकत्रित शेती करणे सुरु केले असावे. आपल्या शेंबडाने त्याने त्याच्या कल्पनेतील धान्य देवतेची आराधना केली असावी. साहजिकच जो जितका अधिक शेंबडा तो तितका अधिक नागर अशी व्याख्या बनली असावी. ह्यांची संख्या वाढत गेली असावी. अशा प्रकारे मानवी संस्कृतीवर शेंबडाच्या कृपेचा चिकट वर्षाव झालेला दिसून येतो. म्हणूनच कित्येक आदिम संस्कृतीत आजही नद्यांचे पूजन केले जाते. नदी हा निसर्गाला आलेला शेंबूडच होय अशी त्यामागची श्रद्धा.
हा भाग फक्त श्रद्धेपुरता नाही. अग्नीचा शोध एखाद्याला शेंबड्यालाच सर्वप्रथम लागला असावा. मानवाने प्रगती करावी म्हणून त्याच्यातील शेंबूड नामक जनुक्/जीन्स धडपडत असावे. त्या प्रगतीसाठी त्याने तात्पुरते माणसास हैराणही केले असावे. मग थोडाकाळ स्वस्थता मिळावी म्हणून उष्णतेच्या शोधात शेंबड्या माणसाला अग्नीचा शोध लागला असावा. त्या अग्नीमुळे पुढे कित्येक मानवी पिढ्यांची प्रगती होउ शकली. त्यास कारण एकच शेंबुडाचाचे जनुक.
.
शिवाय शेंबड्या माणसास अति नाक वाहण्याच्या काळात इतर काहिच करता येत नसल्याने नुस्ते बसून राहण्यास त्याचा नाइलाज होता. असाच नुसता बसून राहिला असता आपल्या शेंबडाशी चाळा करत तो बसला असावा. चाळा करता करता केलेल्या गोल रिंगणातून त्यास चाकाची कल्पना सुचली असे आता स्पष्ट झाले आहे. धिअँडरथल मानवाच्या अस्तित्वातील काही प्रदेशातील भित्तीचित्रात सदर कल्पनेशी मिळतेजुळते चित्र सापडले आहे. तो माणूस एका हाताने शेंबूड पुसत असून दुसर्‍या हाताने गोल रिंगण करीत आहे.

तस्मात, कृषी, चाक आणि अग्नी ह्या तीनही महत्वाच्या क्राम्तीकारी स्थित्यंतराचे मूळ शेंबूडच आहे. म्हणूनच त्यास मान आहे. एका संस्कृतीत देवाला आलेला शेंबूड धो धो पृथ्वीवर कोसळल्याने अधिक हानी होउ नये म्हणून पुन्हा देवाने तो आपल्या जाडजूद मिशातून फिल्टर करत मग पृथ्वीवर अलवारपणे सोडल्याची कथा आहे. देवास हे करण्यास प्रवृत्त करणार्‍या मगीरथाचे त्या संस्कृतीत लै उपकार मानले आहेत.
इंद्राने वृत्राचे शंभर किल्ले फोडण्याचे काम केले, तो "पुरंधर" म्हणविला जाउ लागला इतकिच आपली माहिती होती. पण खरे तर त्याने हे कसे केले हे आता उलगड्त आहे. देवांच्याही देवांना त्याने पवित्र तुपाची य्ज्ञात आहुती दिली. हे तूप म्हणजे सात्विक प्रकारचा देवांचा शेंबूडच . त्याने प्रसन्न होउन देवांच्या देवाने इंद्रावर कृपा केली. तो वृत्राच्या नाकात जाउन वाहू लागला. वाहत्य नाकाने त्यास लढता येइना आणि त्याचा पराभव झाला, अशी खरी आख्यायिका आता समोर येत आहे.

मागे म्हटल्याप्रमाणे शेंबूड हा संस्कृतीचा कारक आहे. तो वाहतो म्हणून त्यास "वाहता" असे म्हणता येत नाही, कारण तो कधीही घट्ट होउ शकतो. तो घट्ट आहे, म्हणून त्यास मेकूड म्हणाल तर धो धो अधिक भर येउन तो कधी पुनश्च वाहता होइल ह्याचा नेम नाही. म्हणूनच तो घट्टही नाही, तो वाहताही नाही असे चारही सेद म्हणतात. त्यास आकार आहेही आणि आकार नाहीही. त्यास लिंग आहेही आणी नाहीही. तो जाती-पाती धर्म, लिंग, वंश ह्यांत विभागला गेलाय तो केवळ मानवी कल्पनेत. प्रत्यक्षात तो सर्वत्र आहे. हवी ती व्यक्ती त्याची आराधना करुन त्याला आवाहन किंवा आ"वाहित" करु शकते. वेगवेगळ्या काळातील थोरांनी मागच्या सातशे वर्षांत हेच सांगितले आहे. हवे त्याला शेंबूड प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे.पावसाळा व हिवाळा त्यातल्या त्यात इष्ट ऋतू आहेत. त्यासाठी साधनाही सोपी आहे.

अधिकाधिक भिजावे( स्वतःस जल अभिषेक करुन घ्यावा) व तसेच त्यात जमेल तितके थांबावे. मनोभावे शेंबडाची याद करावी. तो प्रसन्न होउन हजर होतोच.
वाहत्या अवस्थेत त्यास आकार नाही म्हणून त्यास निराकार मानणारी एक आक्रमक जमात तयार झाली. तर इकडिल प्रदेशातील लोकांच्या शेंबडाचा मेकूड लवकर होत असल्याने त्यास साकार मानणारे, मनोभावे पुजणारे इथले स्थानिकही त्याच्याच वेगळ्या रुपाचे भाविक होते. पहिला गट त्यास निराकार, निरुप मानी तर दुसरा गट त्यास आकार देउ पाही. सगुण साकार मानी. जो तो आपल्या परिने योग्यच होता. हत्ती आणी सात आम्धळ्यांसारखी ह्या गटांची अवस्था झाली होती.

"तू निव्वळ पाणी नाहीस, तू निव्वळ घट्ट मेकूडही नाहीस, तू नाकातही आहेस आणि गळ्यातही आहेस. तू दिसत नसलास तरी सर्व मानवांत निवास करुन आहेस. तू पावसाळाभर पुरतोस तरीही हिवाळ्यातही उरतोस. तू संपतही नाहिस आणि थकतही नाहिस. म्हटले तर एका माणसाचा शेंबूड आणि दुसर्‍याचा शेंबूड ह्यात काहीही अंतर नाही. म्हटले तर तो वेगळा आहे. एकच एक शेंबूड तत्वाची ती स्पष्ट,दर्शित रुपे आहेत. म्हणूनच शेंबडास इतर कशाचीही उपमा देणे शक्य नाही. तो हा नाही, तो हा सुद्धा नाही . असे हरेक वस्तूकडे पहात नाक गाळत आपण म्हणू शकतो. नेति नेति हेच त्याचे सार आहे." असे सेदान्तात म्हटले आहे.

***

याचं पहिलं वाचन करून तो उतारा प्रतिसादात टाकते. त्यावर मनोबा काय म्हणतात बघू. मग पुढे जाऊ.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

पहिला ड्राफ्ट उडाला... आता तो पुन्हा करावा लागेल. वीकान्तास. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

का.टा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

You can write & have written better than this. तुझा आय डी हॅक झालाय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खिक्क..

मनोबाची विकेट ?! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेम्बाई शेम
कपाळाचे शेम
साय्नसातले शेम
तुमचे आमचे शेम् बूड शेम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अत्यंत ओघवता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कैच्या कै ! (नाक उडवणारी स्मायली )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नजला जुकाम झाल्या वर थोड़ी घेतली की मन हलके होते. शेम्बूड वाहणे थांबते. पण वाहन चालकाची गाडी कुठे चालली ते त्याला हि कळत नाही. कदाचित याच अवस्थेला तंद्रा लागली असे म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह, मनोबासारख्या सिद्धहस्त लेखकला तुमच्या सारख्या राम पटवर्धनरूपी सँपादिका लाभल्या हे ऐसीचे भाग्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

इथेही 'पहावे मनाचे' हे धोरण पाहून गंमट वाटली Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'पहावे मनाचे'

मनोबा 'अश्लील' म्हणायच्या प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ओघवत्या शैलीत एका शारिरीक क्रियेची नोंद केलीत.आपल्याकडे वेद ,उपनिषदे वगैरेतून देवांची वारेमाप स्तुती करण्यात आली परंतू या आजुबाजूच्या चराचर सृष्टीची नोंद घेतली असती तर बरे झाले असते.प्रत्येक गोष्टीच्या मागे जाऊन तत्त्वज्ञानाचा अतिरेक झाला.द्वैत अद्वैत यावर वाद झाले.आयुर्वेद लिहिला गेला.'कु्ंभारिण माशी एका अळीस मातीच्या घरांत बंद करून ठेवते' ही नोंद 'नंतर ती अळी त्या परमात्मा का कोणाचे चिंतन करून स्वत:च कुंभारिण बनते या तत्त्वज्ञानी पुस्तीपेक्षा अती महत्त्वाची वाटते.इतकी युद्धे झाली अन इतके सैनिक ठार झाले वगैरे नोंदींपेक्षा जे जायबंदी झाले त्यांची अवस्था काय होती,पुढे हातपाय कापावे लागले का,काय औषधयोजना केली याची वर्णने करून ठेवायला हवी होती.रोगाचे अथवा शारिरीक{ शारीरिक ?} क्रियेचे वर्णन तेवढेच महत्त्वाचे आहे जेवढे औषधयोजनेचे.
लेखिकेने या लेखात शेंबुड या स्रावाचे सविस्तर वर्णन करून एक नोंदींत भर घातली आहे.आणखी अशाच लेखमाला अपेक्षित- सदरा शेंबुडपुसे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आक्षेप रोचक आहे. बोलूनचालून धार्मिक-आध्यात्मिक असलेल्या ग्रंथांवर "ते फक्त धार्मिक-आध्यात्मिक गोष्टींवरच फोकस जास्त करतात बॉ" असे आरोप करण्यात काय पॉइंट आहे?
वैद्यकीय डीटेल्स पाहिजे असतील तर वैद्यकग्रंथ उदा. अष्टांगहृदय, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता वगैरे आहेत ते वाचा की. व्हेज बिर्यानीत चिकन नाही म्हणून कशाला ओरडता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरं आहे. आक्षेप संकुचित झाला आहे.

सामान्य लोकांनी निरीक्षणं नोंदवावयास हवी होती.शिल्पकलेत थोडे अधिक स्वातंत्र्य कलाकारांनी घेतले आहे ती फारच वाखाणण्या सारखी झाली.चित्रकारांनी नेहमीच्या मोर,सिंह,कमळ व्यतिरिक्त इतरही पशुपक्षी चितारायला हवे होते.भीमबेटकात प्राणी चितारले हे फारच बरे केले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपादन संस्था कालबाह्य होण्याच्या मार्गावर वगैरे मूळ लेखनविषयाचा या शेंबडाशी काय बादरायण संबंध आहे अथवा त्या महाकाव्यत हे शंबुड उपाख्यान कसे वाहत आले ते कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपादनानंतर लेख कसा दिसतोय हे पाहण्यास उत्सुक.
.
.
अवांतर :-
मुळात http://www.aisiakshare.com/user/189/authored इथला कुठलाही लेख घ्या असं मी म्हटलोच कशाला असा विचार करतो आहे.
"मला अमुक अमुक धागे ह्या उपक्रमासाठी उचललेले चालतील" असं मी म्हटलं असतं; तर बरं झालं असतं असं मला वाटतं.
शेंबुड ह्या विषयावर हा धागा मी लिहिलाय किंवा हासुद्धा ह्या उपक्रमासाठी निवडला जाउ शकतो; हे त्यावेळी ध्यानात आलं नाही.
मला त्यातल्या त्यात स्वतःचे जे बरे धागे वाटतात(कन्सिडरेबल) त्यात हा नाही.
पण मुळात मी ब्लँकेट अप्रूवल देउन टाकलेलं असल्यानं ते तसच राहू दिलेलं उत्तम, सोपं आणि सुटसुटित.
कारण ह्यावरती काम आतापावेतो सुरु झालेलं असणार(किम्वा कदाचित संपतही आलेलं असणार.)
कुणीतरी त्यासाठी वेळ आनी कश्ट खर्च हे नक्कीच महत्वाचं आहे.
.
.
माझा मित्र अनुप ढेरे ह्याने हा धागा मुद्दाम ड्याम्बिसपणानं सुचवला असावा असा मला डौट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेंबुड पुराण शेंबडासारखे वाहत गेलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेंबुड पुराण शेंबडासारखे वाहत गेलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगागा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेंबूड हा सर्वत्र आहे, चराचर मॅमलांत तो भरुन राहिलेला आहे. तो नासिकेत आहे, गळी स्थळी आहे. त्याची एखाद्यावर कृपा झाली तर तो कित्येक दिवस तो तिथेच कृपेचा वर्षाव करितो. तो कुठून येतो, कसा येतो हे मानवास पूर्वी ज्ञात नव्हते. तो संपत कसा नाही ह्याचे त्यास कुतूहल होते. तो नको तेव्हाच कसा येतो ह्या प्रश्नाने भल्याभल्यांचे नक चोंदले गेले गेले होते. तो वहायला लागला की पळता भुई गुळगुळित होते. पण तोच घट्ट झाला की अधिकच वैताग होतो.

(लेखकाची अभिप्रेत शैली काय आहे, ती ओळखली पाहिजे, जमल्यास ती बदलता कामा नये. म्हणून टिपणे.)
या शैलीत थोडाशी जुनाट, विसाव्या शतकाच्या मध्य-काळात शाळेत शिक्षण देतानाची शैली आहे. मध्येच इंग्रजी शब्द वापरून, वा प्रादेशिक शब्दप्रयोग वापरून शब्दभांडाराबाबत अंतर्गत उपहास उत्पन्न करायचा आहे. संस्कृताळलेले शब्द "सर्वत्र", "वर्षाव"; इंग्रजी : मॅमल ; जुनाट प्रमाण शैली "मानवास, त्यास" (माणसाला, त्याला ऐवजी) ; प्रादेशिक हेल "भरून राहिलेला" (की येथे "राहिलेला"चा प्रमाणबोलीतील अर्थ अभिप्रेत आहे, कळत नाही - लेखकाकरिता प्रश्न आहे)
शब्दांतर्गत यमके वा द्विरुक्ती वापरून प्रवाहीपणा आणायचा आहे, "चराचर", "गळीस्थळी", "भल्याभल्यांचे", "गुळगुळीत". परंतु प्रवाहीपणाबरोबर या शब्दालंकाराचा अतिरेक करून शैलीचा उपहास लेखकाला साधायचा आहे का? हा प्रश्न लेखकाला केला पाहिजे.

---
लेखकाकरिता प्रश्न आणि सुचवण्या :
१. शब्दांतर्गत यमके वा द्विरुक्ती यांचा उपहासाकरिता अतिरेक करायचा, हे हेतुपुरस्सर आहे का? कदाचित थोडा हात राखला तर बरे होईल - म्हणजे सुडौल अलंकारांपेक्षा थोडाच जास्त वापर करावा, पण कंटाळा येण्यापेक्षा कमी वापर करावा. म्हणजे शैलीचा उपहास तर होईल, पण लेखन कंटाळवाणे होणार नाही. जर हेतू डौलदार अलंकरणाचा असेल, तर हा अलंकार पुष्कळच कमी वापरावा.
२. "भरून राहिलेला" याचा अर्थ सांगता येईल का - म्हणजे विदर्भातल्या बोलीतला चालू वर्तमानकाळ आहे, की प्रमाणबोलीतला "भरलेला आणि तसाच ठिय्या धरून राहिलेला" हा अर्थ सांगायचा आहे? की संदिग्धपणे दोन्ही अर्थ सांगायचे आहेत? जर संदिग्धपणा हेतुपुरस्सर नसला, तर या प्रयोगाबाबत थोडा अधिक विचार करा. शिवाय असा संदिग्धपणा पहिल्या-दुसर्‍या वाक्यात आणणे कितपत कार्यक्षम आहे? पण चालूही शकेल.
३. "नको तेव्हाच कसा येतो" या शब्दक्रमाची लय ठीक नाही. "प्रश्नाने नाक चोंदले" हे रूपक चित्रदर्शी नाही, कदाचित उपमा पूर्ण करून स्पष्ट होऊ शकेल. "नाक चोंदले गेले" येथे "चोंदले गेले" प्रयोग विचित्र वाटतो. हे वाक्य पुन्हा लिहिता येईल का?
(४. पहिल्याच खर्ड्याच्या प्रसंगी सांगितलेच पाहिजे असे नाही - मुद्रितशोधन. हे जवळजवळ शेवटच्या खर्ड्याच्या वेळी करता येते.)

---
(लक्षात घेणे - येथे मी कुठलेही पुनर्लेखन केलेले नाही. लेखकाशी अधिक चर्चा होईल, तर कदाचित विवक्षित वेगळ्या प्रकारे वाक्य लिहायचे उदाहरण देऊही शकेन. पण ते टाळून लेखकालाच अभिव्यक्त होऊ द्ययचे आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहा! आता धाग्यावर मजा येतेय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कसं बोललात! थोडक्यात - एखादं काम करायचा कंटाळा आला तर ते पुढे पुढे ढकलत राहावं. आपल्याला ते करावंच लागणार नाही, अशी गोड वेळही येऊ शकते. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मजा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुचवण्यांबद्दल आभार.मला काय आणि कसं लिहायचं होतं; ते सांगायचा प्रयत्न करतो.
.
.

या शैलीत थोडाशी जुनाट, विसाव्या शतकाच्या मध्य-काळात शाळेत शिक्षण देतानाची शैली आहे. मध्येच इंग्रजी शब्द वापरून, वा प्रादेशिक शब्दप्रयोग वापरून शब्दभांडाराबाबत अंतर्गत उपहास उत्पन्न करायचा आहे. संस्कृताळलेले शब्द "सर्वत्र", "वर्षाव"; इंग्रजी : मॅमल ; जुनाट प्रमाण शैली "मानवास, त्यास" (माणसाला, त्याला ऐवजी)

हो, शाळेतल्या मराठीच्या धड्यांत वगैरे जे उपदेशात्मक लिखाण असे किंवा अध्यात्माबद्दल, समाजशास्त्राबद्दल वगैरे तुटक तुटक(स्फुट) लिखाण वाचलेले आहे(लहान मोठी पुस्तकं किंवा बहुतांशानं लेख, दीर्घ लेखांक, वृत्तपत्रातली त्या-त्या विषयातील तज्ञांची सदरं) त्यांची मिश्किल नक्कल करण्याचा मानस होता. ह्यातल्या बहुतेक गोष्टी जुन्या वळणाच्या शैलीतच वाचण्यात आल्यात, नकलेतही त्या तश्याच उतरल्या असाव्यात.
.
.
"भरुन राहिलेला" हा प्रमाणबोलीतल्या अर्थानच वापरला(किंवा 'वापरलेला') आहे. प्रादेशिक हेलादरम्यान जो शब्द असतो; तो तसा इथे अभिप्रेत नाही.(तसंही मला फारशा बोली भाषाही येत नाहित, धड प्रमाणही लिहिता येत नाही. सवयीनं जे काही लिहितो ते बहुतांश वेळा प्रमाण लेखनाच्या जवळ जातं, असा माझा अंदाज आहे.)
.
.

शब्दांतर्गत यमके वा द्विरुक्ती वापरून प्रवाहीपणा आणायचा आहे,

अहो ते अध्यात्मिक लोकं किंवा समाजशास्त्राचे प्रवचनकार्,वक्ते नाही का पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी बोलतात,सांगतात दोन तीन वेगवेगळ्या वाक्यांत तसच लिहायचा मानस होता. उदा :-
उदा:- एका काल्पनिक भाषणातलं नेहमीचच एक प्रवाही वाक्य पहा :-

शिवाजी राजा शूर होता; धाडसी होता; साहसी व मुत्सद्दी होता. कशाला भिणारा नव्हता.

आता ह्यात सारी विशेषणं एकमेकांच्या जवळ जाणारी आहेत; आणि "अमुक होता, तमुक होता" म्हणत बोलताना लय येण्याची सोय आहे. लेखी भाषेत वरचच वाक्य

शिवाजी राजा शूर्,धाडसी,साहसी,मुत्सद्दी व निर्भय होता.

पण ते लागलिच छापील वाक्य म्हणून जाणवतं. मुद्दा ठसत नाहिच. प्रवाहीपना,जिवंतपणा त्या वाक्यात नाही. मोजून येक्कच क्रियापद, येक्कच वाक्य आणी विशेषणांची यादी! हे अभ्यासकाला ठीकय; पण प्रवचनकारानं, वक्त्यानं हे वाक्य जशाला तसं वापरुन कसं चालेल ?(बहुतांश सदरं आणि बारके लेख हे जणू भाषणच असतात. तपशीलवार व प्रमाणलेखन लेखन हे प्रॉप्पर मोठ्या पुस्तकात असणार.)
.
.

प्रवाहीपणाबरोबर या शब्दालंकाराचा अतिरेक करून शैलीचा उपहास लेखकाला साधायचा आहे का? हा प्रश्न लेखकाला केला पाहिजे.

हो उपहास तर साधायचाय.(उपहास म्हण्ण्यापेक्षा चेष्टा/थट्टा म्हटलेलं जास्त बरं राहिल.) पण अतिरेक करण्यातून नाही तर शैलीची नक्कल करण्यातून साधायचाय. अतिरेक होतो आहे हे लिहिताना ध्यानात आले नव्हते.
---

१. शब्दांतर्गत यमके वा द्विरुक्ती यांचा उपहासाकरिता अतिरेक करायचा, हे हेतुपुरस्सर आहे का? कदाचित थोडा हात राखला तर बरे होईल - म्हणजे सुडौल अलंकारांपेक्षा थोडाच जास्त वापर करावा, पण कंटाळा येण्यापेक्षा कमी वापर करावा. म्हणजे शैलीचा उपहास तर होईल, पण लेखन कंटाळवाणे होणार नाही. जर हेतू डौलदार अलंकरणाचा असेल, तर हा अलंकार पुष्कळच कमी वापरावा.

हे तत्व्/गाइअडलाइन म्हणून ठीकय. पण नेमकं वापरायचं कसं कळत नाहिये. वरच्याच काही परिच्छेदांत काही कुठे काटछाट करावी का म्हणून पाहिलं; पण सुचलं नाही.
.
.

२. "भरून राहिलेला" याचा अर्थ सांगता येईल का - म्हणजे विदर्भातल्या बोलीतला चालू वर्तमानकाळ आहे, की प्रमाणबोलीतला "भरलेला आणि तसाच ठिय्या धरून राहिलेला" हा अर्थ सांगायचा आहे? की संदिग्धपणे दोन्ही अर्थ सांगायचे आहेत? जर संदिग्धपणा हेतुपुरस्सर नसला, तर या प्रयोगाबाबत थोडा अधिक विचार करा. शिवाय असा संदिग्धपणा पहिल्या-दुसर्‍या वाक्यात आणणे कितपत कार्यक्षम आहे? पण चालूही शकेल.

"भरलेला आणि तसाच ठिय्या धरून राहिलेला" ह्याच अर्थानं लिहिलय. त्या शब्दरचनेमुळे वाक्यात संदिग्धता येते आहे हेसुद्धा पूर्वी ध्यानात आले नव्हते.
.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरील उत्तरे चांगलीच आहेत. तसा विचार करून आता त्या परिच्छेदाचा नवीन खर्डा करून द्यावा. मी बदल करणे हे तितकेसे योग्य नाही.

> शेंबूड हा सर्वत्र आहे, चराचर मॅमलांत तो भरुन राहिलेला आकंठ भरलेला आहे.
चराचर शब्द येहे अर्थातच चुकला आहे. ("चर-अचर"चा अर्थ "चालणारे आणि अ-चालणारे". साधारणपणे "हालचाल असणारे प्राणी, आणि हालचाल नसलेली झाडे-दगड-नद्या वगैरे"). मॅमले अचर अशी कधी नसतातच. असल्या निबंधांमध्ये निरर्थक शब्दांची भरणा असलेली वाक्ये असतात, त्यामुळे प्रस्तावनेदाखल हे वाक्य ठीकच आहे. परंतु ही सूक्ष्म बाब काही वाचकांच्या लक्षात येणार नाही. त्यापेक्षा "अखंड मॅमलसृष्टीत" किंवा असे काहीतरी म्हटले तर सुजलेले शब्दही लक्षात येतील, संस्कृताळलेला आणी इंग्रजी शब्दांचा कुरूप संकरही असेल, त्यामुळे उपरोध साधेल.

> तो नासिकेत आहे, गळी स्थळी आहे.
"नासिकेत" शब्दाने पुरेसा परिणाम होत नाही. एक तर "नासिकापुटांत/नासिकाविवरात" वगैरे अधिक सुजवावा, किंवा "नाकात" असा मराठमोळा करून "गळी स्थळी" या निरर्थक यमकी जोडीला खुलण्याचे स्वातंत्र्य द्यावे. कदाचित "नासिकाजळी गळास्थळी" असे काहीतरी साधता येईल का, ते बघा. जर "चराचर" हे आदल्या वाक्यातून काढून टाकले असेल, तर या ठिकाणी हा अनुप्रास-यमकांनी - विशेष करून "ळ" अक्षरांनी बुळबुळीत झालेला शब्दप्रयोग चांगला राहील.

> एखाद्यावर त्याची एखाद्यावर कृपा झाली तर तो कित्येक दिवस तो तिथेच कृपेचा वर्षाव करितो.
(शब्द हलवण्याची सुचवणी, पटल्यास बघा)

> तो कुठून येतो, कसा येतो हे मानवास पूर्वी ज्ञात नव्हते. तो नको तेव्हाच कसा येतो ह्या प्रश्नाने
> भल्याभल्यांच्या नाकी नऊ आले होते.
सुचवणी वाक्यांचा क्रम बदलला. सुचवणी "चोंदणे" रूपक हलवून पुढच्या वाक्यात घातले आहे. "नाकी नव/नऊ" अर्थाने लंगडा आहे, परंतु "न" अक्षराचा अनुप्रास साधतो, शैलीचा उपहास होतो.

> तो संपत कसा नाही ह्याचेही त्यांचे कुतूहल चोंदलेले होते.
(सुचवणी, "ही" शब्द)

> तो वाहायला लागला की पळता भुई गुळगुळित होते. पण तोच घट्ट झाला की अधिकच वैताग होतो.
अकार्यक्षम दुहेरी वाक्य {भुई गुळगुळीत<->अधिकच वैताग} ही जोडी ध्वनी आणि अर्थ दोन्ही बाबतीत असंबद्ध आहे. शैलीचा उपहास करण्याबाबतही काही खास वाटत नाही. या ठिकाणी लेखकानेच पुन्हा प्रयत्न करणे योग्य. संपादकाची सुचवणी म्हणजे संपादकाचे लेखन व्हायला नको. वरील काही सुचवण्या आधीच त्या सीमेचे उल्लंघन करणार्‍या आहेत.
--------------

(पुनश्च : या खेळाचे काही हशील असावे, तर तुम्ही पुनर्लेखन केल्याशिवाय मजा नाही. अर्थात अमुक ठिकाणी मूळ शब्दच कसा योग्य आहे, म्हणून नव्या खर्ड्यात त्या शब्दात बदल केलेला नाही, असे ठासून सांगणे, हासुद्धा संवादच. परंतु नवीन खर्डा हवा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे नेमकं काय चालू आहे ते कळेना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

ह्या प्रयोगासाठी जर अजून लेखन सुचवलेलं चालत असेल तर माझे काही इतर धागे सुचवू इच्छितो.
( मी ते गंभीरपणे लिहिलेत. ते धागे मला कन्सिडरेबल वाटतात.)
.
.
http://aisiakshare.com/node/3239
काही गमतीशीर आठवणी.--जशा आठवतात तशा ...गप्पा माराव्यात तशा लिहिण्याचा प्रयत्न
.
.
http://aisiakshare.com/node/2564
हे असच "काहीही". म्हणजे कधीकधी तुम्हाला अगदि काहितरीच काहीही सुचतं ना, तसच.
किंवा कल्पना करायचीच झाली तर -- एखाद्या नाटकाचा पडदा वर जातो; आणि समोर येणारा सूत्रधार नाटकाच्या विषयाकडे प्रेक्षकाला हळूहळू नेण्यासाठी सहज भाषेत समोरच्याशी संवाद साधायला सुरु करतो ना, तर त्या संवाद सुरु करण्याच्या धर्तीवर लिहिलय.नाटक-सिनेमाचे मुख्य पात्र अतिआळशी किंवा कामसू असेल तर त्याच्या एण्ट्रीसाठी ब्याकग्राउंडमधून हा उतारा वाचून दाखवता यावा.( बरीच उदाहरणे आहेत; पण कुणाला शोधून पहायचं तर चटकन आतह्वणारं म्हणजे 'बावर्ची' सिनेमाच्या सुरुवातीला ब्याकग्राउंडमध्ला निवेदक एकेका पात्राची ओळख करुन देत जातो; त्यासारख्या निवेदनाचा पूर्वार्ध म्हणून हा प्रकार चालून जावा. किम्वा शुद्ध वैचारिक टैम्पास म्हणूनही चालवता यावा.)
.
.
http://aisiakshare.com/node/1678
जर्रासं भावनिक लिहायचा प्रयत्न
.
.
http://aisiakshare.com/node/1705
डोक्यातला संभ्रम...जे विचार जसे येताहेत तसे लिहायचा प्रयत्न.
ज्या शंका येताहेत, जी उत्तरं मिळताहेत; त्यावरच्या पुन्हा ज्या शंका आहेत; त्या जशा डोक्यात आहेत; तशाच कागदावर लिहायचा प्रयत्न
.
.
http://aisiakshare.com/node/2157
वरीलप्रमाणेच.पण जरासं सामाजिक बाबतीत; आसपासचा बह्वताल जो दिसतो आहे; त्याबद्दल मला जे वाटतं ते.
.
.
http://aisiakshare.com/node/1131
कथा लिहायचा प्रयत्न
.
.
बाकीचं बरचसं लिखाण हे माहितीपर आहे(इब्राहिमी(ज्यू-ख्रिश्चन-मुस्लिम ) धर्माम्वरील धागे, बाबक खुर्रामुद्दिन बद्दलचा लेख वगैरे. ते इथे द्यावसं वाटत नाही. ते प्लेन -टेक्स्ट मटिरिअल आहे;पेप्रात बातम्या लिहाव्यात किंवा विकिपिडियावर माहिती लिहावी तसं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मन तू लिहीलेली कथा आवडीची आहे माझ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0