Skip to main content

बागकामप्रेमी ऐसीकरः २०१५ धागा - ५

व्यवस्थापकः धागा-४ वर १००पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढतोय.
-----------------

अपडेट्स: बटाटे, लिची, मेलन, पळस, शिरीष, बहावा

मी यावेळी बाटाट्याचे १-२ सेमीचे कोंब तोडून ते मातीत खोचले. त्याला आता मुळे आणि पाने आली आहेत. लिचीच्या रोपांनी वादळी पावसात जरा मार खाल्ला पण आता बरी आहेत आणि पहिली कोवळी तपकिरी पालवी हिरवी झाली आहे.मेलनच्या वेलाला आलेलं एकुलतं मेलन आता तीन इंच व्यासाचं झालं आहे.
पळसाची बी पेरली ती उत्सुकतेपोटी दीड महिन्याने उकरून पाहिली आणि त्याला आलेला कोंब तुटला...फार वाईट वाटलं पण आता त्याला कोंब फुटतो हे कळले. त्यामुळे एक बी जरी गेली तरी इतर आहेत त्यातून वर पाने येईपर्यंत वाट पहाणार. शिरीषाच्या बिया पेरल्या त्याला कोंब (दोन आठवड्यात) आले आहेत. बाहाव्याच्या बियाही पेरल्यात आणि त्या उगवण्याची वाट पहात आहे.

रुची Tue, 16/06/2015 - 00:12

पळस, शिरीष, बहावा वगैरे रोपे बियांपासून बनवायचा उपक्रम रोचक वाटला पण त्यांचे पुढे काय करणार याबद्द्ल उत्सुकता आहे, एवढी झाडे तुमच्या बागेत लावण्याएवढी जागा असेल तर भाग्यवान आहात. फोटो लाव ना तुमच्याही बागेचे!

ऋता Tue, 16/06/2015 - 08:48

In reply to by रुची

तसा केवळ उत्सुकता म्हणून बिया पेरण्याचा उद्योग सुरू केला आहे. मी बाल्कनीतच लावत आहे (बाल्कनीतली जागा मात्र भरपूर आहे म्हणायला आणि ऊनही येतं बर्‍यापैकी). यातील काही रोपे नात्यातील एकांच्या जमिनीत लावण्याचा विचार आहे. काही आसपासच्या टेकड्यांवर वगैरे. बाकी बाल्कनीतच थोड्या मोठ्या कुंड्यांमध्ये ठेवणार.
फोटो लावीन सवडीने; काढलेले असतात काही पण ते आधी कुठेतरी पब्लिक केल्यानंतर इथे देता येतात म्हणून राहून जातात दाखवायचे.

रोचना Tue, 16/06/2015 - 11:18

In reply to by ऋता

वा! आसपासच्या टेकड्यांवर झाडं लावायची आइडिया मस्त आहे. मी सुद्धा खतात बियांना फुटलेले कोंब छोट्या कुंडीत लावून ऑफिसच्या माळीला सतावत असते. पण अशीच दोन-तीन आंब्याची, जांभळाची, चिक्कूची रोपं त्याला दिली आहेत. कुठेही चांगले वाढले की झाले :-)

ऋता Tue, 16/06/2015 - 21:58

In reply to by रोचना

कुठेही चांगले वाढले की झाले

हो...असंच वाटतं मलाही.
पुण्यात वेताळ टेकडी (आणि इतर काही टेकड्यां)वर वृक्ष प्रेमींनी झाडे लावली आहेत आणि त्यांची निगाही राखताना दिसतात. काही टेकड्या तशा हिरव्या दिसल्या तरी त्यावर वनीकरणात लावलेली एकाच प्रकारची झाडे आहेत त्यामुळे तिथेही विविध झाडांची रोपे लावून हळू हळू परिसर आणखीन चांगला करता येऊ शकतो.

पिवळा डांबिस Tue, 16/06/2015 - 23:15

In reply to by रोचना

ऑफिसच्या माळीला सतावत असते. पण अशीच दोन-तीन आंब्याची, जांभळाची, चिक्कूची रोपं त्याला दिली आहेत.

तुमच्या हापीसचा माळी होण्यासाठी अर्ज कुठे करायचा? :)

रोचना Wed, 17/06/2015 - 14:11

In reply to by पिवळा डांबिस

हापिसचा माळी म्हणून नाही पण पुढेमागे कधी खरीखुरी जमीन लाभली, तर लँड्स्केपिंग कन्सल्टंट म्हणून नक्की याल ना! :-)

पिवळा डांबिस Thu, 18/06/2015 - 09:52

In reply to by रोचना

आणि फ्री ऑफ चार्ज फॉर यू!
फक्त महाराष्ट्राबाहेर रहाताय तेंव्हा अगोदर पुरेशी अ‍ॅडव्हान्स नोटीस द्या मॅडम!!!!
म्हणजे त्यानुसार ट्रीप प्लान करायला बरं!!!!
:)

ऋषिकेश Tue, 16/06/2015 - 08:38

मागे मागावलेल्या ऑर्गॅनिक बियांपासून उगवलेल्या पालकाने आता बाळसं धरलंय. पानांचा परिचित आकार दिसू लागलाय. आठवडाभरात किमान एकवेळची पातळ भाजी (ताक-पालक) होईल अशी स्वप्ने बघतोय!

--

दोराबजीमध्ये कोकोपीट मिळाले ३० रुपायात किलोभर! तिथे घरगुती बागकामाची बरीच साधने, वर्मकंपोस्ट वगैरे बरेच काही दिसले. उगाच इतके दिवस नर्सर्‍या फिरत शोधत होतो असे वाटले.

घनु Tue, 16/06/2015 - 10:25

In reply to by ऋषिकेश

कोको-पीट चा वापर रोपांसांठी कसा करावा ह्याबद्दल थोडी माहिती मिळाली तर फार बरं होईल. कोको-पीट पाणी साठवून ठेवतं (स्पंज सारखं) हे माहीत आहे पण त्याचा रोप लागवडी साठी कसा वापर करावा? कुठल्या रोपांसाठी ते वापरावं? ते वापरत असल्यास विशिष्ट कुंडी वापरावी का? ह्याबद्दल मार्गदर्शन हवे.

ऋषिकेश Tue, 16/06/2015 - 10:34

In reply to by घनु

कुंडी वेगळी लागत नसावी. (मी वापरलेली नाही).
५०-५०% माती आणि कोकोपीट मिक्स करून मी वापरतो.

मी पुन्हा एकदा मिरचीचा प्रयोग करणारे त्यासाठी, तसेच मुळ्यासाठी वापरणार आहे. कशासाठी वापरायला हवं हे माहिती नाही :)
बाकी ऐसीवरचे तज्ज्ञ माळी सांगतीलच! ;)

रोचना Tue, 16/06/2015 - 11:16

In reply to by घनु

कोकोपीट कुंडीतल्या मातीला थोडं सैल आणि हलकं सुद्धा ठेवतं. गच्चीत व बाल्कनीतल्या कुंड्यांसाठी हे चांगलं असतं. आणि सहसा सर्व झाडांना व कुंड्यांना ते चालतं. मी आत्तापर्यंत ५०% कोकोपीट आणि ५०% गांडूळखत वापरलंय, कारण येथील माती चिकणमातीसारखी फारच घट्ट आणि जड असते. पण भाज्यांची मुळे खोल रुतायला लागली की कुंड्यांमधून पाणी फारच लवकर वाहून जातंय असं लक्षात आलं. जास्त कोकोपीट असले तर कुंडीत एअर पॉकेट्स तयार होऊ शकतात, त्यामुळे मोठ्या फळभाज्यांसाठी तरी मातीत मिसळूनच ते वापरावे असं आमच्या एका शेजार्‍यांनी सांगितलं. म्हणून आता पुन्हा नवीन मिक्स तयार करताना १/३ चांगली गाळाची माती, १/३ कोकोपीट आणि १/३ खत, असं मिसळणार आहे. उद्या सकाळचा कार्यक्रम! इथे पाऊस लागल्याने हवामान थोडं सुधारलंय, आणि पुन्हा बागेकडे लक्ष द्यावेसे वाटतंय.

ऋ, ३० रु किलो म्हणजे चांगलाच दर आहे! आमच्या कडे ५०रु पर्यंत मिळतो.

अनु राव Tue, 16/06/2015 - 11:22

In reply to by रोचना

पुण्यातल्या जगताप नर्सरी मधे एकदा चक्कर मारा.

वेबसाईट पण चांगली आहे. कोकोपीट २० रुपये कीलो आहे.

http://www.jagtapnursery.com/garden-accessories/soil_other-growing-medi…
http://www.jagtapnursery.com/garden-accessories/soil_other-growing-medi…

ऋता Tue, 16/06/2015 - 22:14

In reply to by अनु राव

धन्यवाद...जाऊन पहायला हवे या नर्सरीत.

बाकी प्रतिसादांनाही इथेच लिहिते प्रतिसाद.
मीही अलिकडे दोराबजीतून कोकोपीट आणून पाहिले. कोकोपीटचे कॉम्पॅक्ट ब्लॉक (बहुतेक हे फक्त नारळ शेंडी मेटेरियल असतं, त्यात पीट नसतं) मिळतात तेही आणून पाहिले. त्यात वेगळ कधीतरी आणलेलं गांडूळ खत (२०-३०%) मिसळून वापरलं. दोन्ही चांगलच आहे. किती काळानी ते बदलावं लागेल माहित नाही.
माती आणि वाळलेल्या पानांचा चुरा असेही बिया रूजवायला वापरले; त्यातही चांगली जगत आहेत रोपं.

'अमॄत मिट्टी' हा प्रकार करून पहायचा आहे कधीतरी.

घनु Tue, 16/06/2015 - 11:29

In reply to by रोचना

अतिशय माहितीपूर्ण :)

साधारण जुलै-ऑगस्ट मधे बाल्कनीत छोटी बाग फुलवायची आहे, अगदी नव्याने/सुरुवातीपासून. त्याची पूर्वतयारी म्हणून ही सगळी माहिती आणि मुळातच ही संपूर्ण बागकाम मालिका फारच उपयुक्त ठरते आहे. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद :)

घनु Tue, 16/06/2015 - 12:19

In reply to by रोचना

धन्यवाद :)
सुरुवात फुलझाडांनीच करणार आणि सोबतीला कढीपत्ता/कोथिंबीर अश्या अगदीच साध्या भाज्या लावण्याचा विचार आहे. पुढे बागकाम निट जमतंय असा विश्वास आला की मग थोडी मोठी पावलं उचलणार, तेव्हा बटाटे, गाजर्, मिरच्या, मेथी असे काही प्रयोग करीन. अर्थात बाल्कनी एकच असल्याने आणि फार मोठी नसल्याने (१०४ sq.ft.) बघू कसं जमतंय. ह्या आधी कधीच एवढं कोअर-लेवल ला बागकाम केलं नसल्याने आधी बेसिक रोपांपासून आणि कोणत्याही हंगामात आणि फार कष्ट न घेता फुलतील अश्या रोपांपासून सुरुवात करुया म्हंटलं :)

पिवळा डांबिस Wed, 17/06/2015 - 09:37

मिरच्यांची रोपं वाढताहेत.
DSC_0033
त्यांना मिरच्याही लागल्या आहेत. सध्या प्रत्येक झाडाला ७-८च आहेत पण प्रचंड प्रमाणात नवीन फुलोराही आलेला आहे. त्यांच्यापासून कदाचित अजून नवीन मिरच्या मिळतील! काकी आहेत त्या मिरच्या तोडून त्यांचा मस्त ठेचा बनवीन म्हणाली होती, पण तिला तात्काळ बंदी केलेली आहे. मला सर्व मिरच्या लागलेल्या एकदा डोळे भरुन पहायच्या आहेत. त्यादरम्यान आत्ता लागलेल्या काही मिरच्या लाल होतील. पण मग कर म्हणावं ठेचा! लाल ठेचा खाल्ल्याने काही बिघडत नाही!!! :)
DSC_0034

टोमॅटो आता चांगले वाढले आहेत. चेरी आणि बीफस्टेक आता जवळ्जवळ पाच फुटाहून उंच झाले आहेत. त्यांना टोमॅटोही लागले आहेत. चेरीचे लाल झालेले टोमॅटो काढुन खात आहोत वेळोवेळी. अतिशय गोड जात आहे. बीफस्टेक टोमॅटो अजून हिरवे आहेत. ते लाल झाले की त्यांचा फोटो टाकीन!!!
DSC_0037

पाच सहा वर्षांपूर्वी नंदन एकदा घरी आला होता. तेंव्हा मी नुकताच गुलाबांत डॅबलिंग करत होतो. त्यावेळेस त्याला आपल्या कोबीइतके भलेमोठे गुलाब पहायला आमच्या कंपनीत घेऊन गेलो होतो. तेंव्हापासून असे मोठे गुलाब उगवायचं मनात होतं. पाच वर्षाच्या परिश्रमानंतर आता माझ्या बागेत उमललेला हा पहिलावहिला मोठा गुलाब! एक यशस्वी प्रयोग!! फुलाचा व्यास सहा इंचांचा आहे. पाठीमागल्या फेन्सच्या उभ्या दांड्या चार इंच अपार्ट आहेत, त्यावरून तुलना लक्षात यावी...
DSC_0040
हे रोप मला एका रस्त्याच्या काठी मिळालं होतं. जेमतेम चार पाच इंच उंचीचं! तेंव्हा त्याला चार पानं आणि एकच फूल होतं. पण त्या फुलाचा निळा-जांभळा रंग अतिशय आवडल्याने ते तिथून काढून माझ्या बागेत आणून लावलं. आज तीन वर्षांनंतर त्याचा हा अवतार मलाही थक्क करणारा आहे!त्या फुलांना एक अतिशय गोड असा, थोडासा वेलचीसारखा, सुगंधही आहे!!!
DSC_0039

सध्या हे गोड मानून घ्या.
अजून फोटो पुढल्या धाग्यात!!!!
:)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 17/06/2015 - 18:23

In reply to by आदूबाळ

आमच्या भारतीय वाण्याकडे कुंडीत छोटा वेल मिळतो. तुमच्याकडच्या हवेत ते किती वाढेल याबद्दल मला शंका आहे, पण उन्हाळ्याचे दोन-चार महिने बाहेर आणि बाकीचे दिवस कुंडी सूर्यप्रकाश येणाऱ्या खिडकीत ठेवली तर कदाचित वाढेलही. (पण तुमच्याकडे सूर्यप्रकाश कसा आणणार!)

पिवळा डांबिस Thu, 18/06/2015 - 10:00

In reply to by आदूबाळ

नागवेल कुंडीत उगवते. आणि कुंडी पुरेशी मोठी असेल तर आधारावर वर चढवताही येते.
फक्त उष्ण आणि दमट हवामान पाहिजे (रत्नांग्रीतल्या मधल्या आळीसारखं!!) :)
आमच्या इथं चांगली वाढत नाही कारण हवामान उष्ण असलं तरी कोरडं!!!!!

अमोघ Wed, 17/06/2015 - 23:06

पुण्यातल्या कुंडीत कोथिंबीर कशी लावायची सांगेल का कुणी? मी पंधरा दिवसांपूर्वी धणे रुजत घातले आहेत. पण अजून काहीही बाहेर पडलं नाही त्यातून :(

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 17/06/2015 - 23:37

In reply to by मेघना भुस्कुटे

धने भिजवून घातले तरी लवकर फुटेल. एक धन्याच्या दाण्यात दोन बिया असतात. त्यामुळे धन्याचे दाणे भरडताना त्यांचे दोन-तीन तुकडे केले तर लवकर फुटवा दिसेल.

आता फार काही करता येईल असं नाही, पण पाणी घालत रहा. अतिरिक्त पाणी वाहून जाईल याची सोय नसेल तर ती करा. रात्री तापमान फार कमी होत असेल तर कुंडीभोवती कापड गुंडाळून ठेवा.

कुठेतरी वाचलं होतं की न भिजवता धने पेरले तर उगवायला तीन आठवड्यांपर्यंत वेळ लागू शकतो.

अमोघ Wed, 17/06/2015 - 23:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धने भरडले होते रुजत घालताना. फक्त भिजवले नव्हते. तीन आठवडे म्हटले तर अजून एक आठवडा हातात आहे. पाहू काय होतंय.... शेवटी "उम्मीदों पे 'धनिया' कायम है" ;)

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 18/06/2015 - 00:08

In reply to by अमोघ

:ड

कोथिंबीर ही दुनिया म्हणण्याएवढी थोर असतेच. माझ्यासारख्या आळशी स्वयंपाक्याला विचारा. काय वाट्टेल ते, वाट्टेल तसं शिजवायचं आणि वर पदार्थांमधलं उणं लपवायला वर कोथिंबीरीचा जाडजूड थर लावायचा.

.शुचि. Thu, 18/06/2015 - 00:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काय वाट्टेल ते, वाट्टेल तसं शिजवायचं

हाहाहा सेम पिंच. मी डोळे मिटून हात फिरवते, जो मसाल्याचा डबा हाताला बरा लागेल्/वाटेल, तो मसाला घालते ;)
.
भारतात फार पूर्वी सी व्हायर्टॅमिन पोटात जावं म्हणून मी कोबीत पेरु घातला होता. नशीब लग्न झाल्यावर हा प्रयोग केला. नाहीतर नवरा आधीच सावध होऊन पळून गेला असता.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 18/06/2015 - 00:40

In reply to by .शुचि.

माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारा प्रतिसाद.

मी फार वाईट स्वयंपाकी नाही (किंवा माझ्यापेक्षाही भयंकर काही जगात अस्तित्त्वात असू शकतं) याची जाणीव मला तुझ्याशिवाय झाली नसती.

.शुचि. Thu, 18/06/2015 - 00:50

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी फार वाईट स्वयंपाकी नाही (किंवा माझ्यापेक्षाही भयंकर काही जगात अस्तित्त्वात असू शकतं) याची जाणीव मला तुझ्याशिवाय झाली नसती.

=)) हाहाहा

पिवळा डांबिस Fri, 19/06/2015 - 09:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी फार वाईट स्वयंपाकी नाही

मिष्टर अभीर, कटहरेमें हाजिर होऽऽऽ!!!
=))

बॅटमॅन Thu, 18/06/2015 - 00:52

In reply to by .शुचि.

शिर्‍यात कांदा घातलेलात का कधी?

आम्ही एकदा हा प्रयोग केलेला आहे. म्ह. बनवला नाही, तर आयत्या बनवलेल्या शिर्‍यात कांदा घालून घास दोन घास खाल्ले. (तितकेच खाववले हेवेसांनल.)

.शुचि. Thu, 18/06/2015 - 00:57

In reply to by बॅटमॅन

=)) ढॅण टॅ डॅण!!!! कोइ मिल गया .... मेरेसे गयागुजरा कोई मिल गया ... =))
___
माझी मुलगी एग-ड्रॉप सूप अन आइस्क्रीम चमच्यात एकदम घेऊन खाते. मला ते पाहूनच मळमळतं :(

बॅटमॅन Thu, 18/06/2015 - 01:08

In reply to by .शुचि.

अंडा अन आईसक्रीम???? व्हॉट द फिकन.....

बादवे आमच्या एका मित्रवर्यांची शिफारस म्ह. चहाभात. हे काँबो ट्राय करावे असे मनात होते पण सांबार-रसम वगैरेंसाठी राखीव ठेवलेल्या भाताला त्या चहा नामक चिखलरंगी द्रवाकरिता वाया घालवणे पटेना तस्मात कधी ट्राय औट केले नाही.

एकदा लहानपणी चिरमुरे + पाणी असे काँबो देखील ट्राय केले होते. अर्थातच चव लागायची तशी लागल्याने बेसिनमध्ये सगळे फेकून दिले आणि आपण त्या गावचेच नाही असे दाखवत झोपून गेलो. थोड्या वेळाने तीर्थरूप आले, काय ते बघितलं आणि सगळं समजले. आमची स्युडोझोप पार्श्वभागावरच्या केरसुणीप्रहाराने मोडली आणि बेसिन क्लीनिंगच्या कम्युनिटी सर्व्हिसवरती सुटका झाली.

.शुचि. Thu, 18/06/2015 - 01:11

In reply to by बॅटमॅन

आमची स्युडोझोप पार्श्वभागावरच्या केरसुणीप्रहाराने मोडली आणि बेसिन क्लीनिंगच्या कम्युनिटी सर्व्हिसवरती सुटका झाली.

=)) हसवून मारशील रे =)) =))
स्युडो झोप म्हणे =))

रुची Thu, 18/06/2015 - 00:02

In reply to by अमोघ

कोथिंबीर रुजायला दोन ते तीन आठवडे लागतात त्यामुळे अजून आठवडाभर थांबा, काही धनेतरी नक्की उगवतील. फ्लॅट लीफ पार्स्लीही या बाबतीत फार आळशी आहे, रुजायला तीन आठवड्यापर्यंत वेळ लागू शकतो. मी पहिल्या वर्षी लावली तेंव्हा निराश होऊन जमीन उकरायला गेले तेंव्हा तीन आठवड्यानंतर काही कोंब वर आलेले दिसले.
मेघना म्हणते तसे थोडे भरडून टाकले असते तर लवकर उगवले असते.

पिवळा डांबिस Thu, 18/06/2015 - 10:04

In reply to by अमोघ

'पुण्यातल्या' कुंडीत म्हणजे?
नाही म्हणजे राग मानू नका पण 'पुण्यातल्या थंडीत' हा वाक्प्रचार आम्ही मुंबैकरांनी बर्‍याच वेळा ऐकलाय. पण 'पुण्यातल्या कुंडीत' म्हणजे काय?
पुण्यातल्या कुंड्या (बॅटमॅना, हे कन्नड नाहिये!!!) काय वेगळ्या असतात काय हो?
:)

अमोघ Thu, 18/06/2015 - 11:06

In reply to by पिवळा डांबिस

अहो, म्हणजे पुण्यात ठेवल्या आहेत. तेव्हा सल्ले देताना पुण्यातलं सध्याचं हवामान लक्षात घेतलं जावं हा उद्देश!

ता.क. काल प्रश्न विचारल्यावर आज सकाळी पाहिलं तर लगेच पाचसहा कोंब तरारून आलेले दिसले. 'ऐसी कृपा'! दुसरे काय? Feeling happy, excited etc. etc. :) :) :)

रुची Thu, 18/06/2015 - 21:01

In reply to by अमोघ

सकाळी पाहिलं तर लगेच पाचसहा कोंब तरारून आलेले दिसले

अरे वा, उत्तम! कोथिंबीरीसाठी शुभेच्छा.
मी आतापर्यंत जेंव्हाजेंव्हा कोथिंबीर लावली आहे तेंव्हा तिला दोन-तीन इंच वाढल्यावर लगेचच फुले येऊन वाढ खुंटली आहे. कोणाला याचे काही कारण किंवा उपाय माहित आहे का?
अलिकडेच कोथिंबीर इथल्या थंड हवेत पेरिनियल आहे हे नवीन समजल्याने पुन्हा लावून पहाण्याचा मानस आहे.
बियांना रुजण्यासाठी लागणारा वेळ अनेक दृष्य-अदृष्य गोष्टींवर अवलंबून असतो हेहीअनुभवाने शिकतेय. मी मागे कुठेतरी लिहिले होते की लिंबाच्या बिया तब्बल महिनाभराने उगवून आल्या तसेच यावर्षी एकाच वाफ्यात पेरलेल्या एकाच वनस्पतींच्या अनेक बियांपैकी काही बिया इतरांहून तब्बल आठवडाभर उशीरा उगवून आल्या. एक चौरस फूट वाफ्यात चार लहान कांदे (शलॉट्स) असे तीन वाफे लावले होते, तर तीनही वाफ्यात प्रत्येकी तीन कांदे आठवडाभरात उगवले आणि चौथा त्यानंतर आठ दिवसांनी पूर्ण आशा सोडल्यावर बाहेर आला! त्यामुळे "उम्मीदपे बगीचा कायम है" हे तत्व मनाशी बाळगलेय.

चिमणराव Thu, 18/06/2015 - 07:28

चहा-भात,कुरमुरे भन्नाटच.
नागवेल: यात दोनतीन प्रकारची विड्याच्या पानांचे वेल असतात. देवपुजेत आणि कच्ची पाने वापरतात ती सांगली,वसई भागातून वेल आणि कुंडीत एक उंच बांबूची काठी रोवून त्यावर वेल वाढतो. दुसरा एक मघई वेल मिळतो तो मात्र पसरट ट्रेमध्ये लावा जमीनीलगत भरमसाठ वाढतो प्रत्येक पानाच्या बेचक्यात मुळे फुटतात.

पिवळा डांबिस Thu, 18/06/2015 - 10:27

In reply to by आदूबाळ

आणि कलकत्ता, बनारस, पूना वगैरे पानांच्या दुकानात मिळणारी पानं?

अवो आदुराया! ही समदी एकदम एकाच ठिकाणी घ्यायची म्हंता?
हे म्हंन्जे लासलगावच्या शेतकर्‍यांनी एकदम अननसाचं आनि सफरचंदाचं पीक एकाच शेतात घेन्यापैकी हाय वो!!!!
---------------------------------------------------------
....ए.....फीडबॅक दिलाय! इश्शऽऽऽऽ! घे नाऽऽऽ!!!!
तुझीच,
पिवळी शेवंता!
:)

ऋषिकेश Thu, 18/06/2015 - 20:41

In reply to by आदूबाळ

या पानांच्या जाती त्या त्या भागांत उगवणार्‍या पानांमुळे असाव्यात असा माझा समज होता. ते बरोबर का?

कलकत्ता वगैरे उगवायला किमान दमट हवामान हवं असेल.
पूना हा नागवेलीचा प्रकार मात्र पुण्यात ट्राय करता येईल असं काही असेल का?

राही Thu, 18/06/2015 - 23:42

In reply to by चिमणराव

मलाही रात्या भाताचे हाताने कांडलेले लाल गुलाबी पोहे किंचित गोड अशा कढत कढकढीत चहात भिजवून खायला आवडतात. संध्याकाळी चाय-बिस्कुट ऐवजी थोडासा (बरा असा) चेंज.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 19/06/2015 - 00:23

In reply to by राही

रात्या भात म्हणजे काय? लगे हाथ, भाताचे/तांदळाचे असे प्रकार काय काय ते ही सांगाल का? (आंबेमोहोर, बासमती, सुरती/वाडा कोलम असे दुकानात मिळणारे माहीत आहेत.)

ऋता Fri, 19/06/2015 - 08:46

मी सध्या 'विपुलाच सृष्टी' हे प्रयोग परिवारवाल्या दाभोळकरांचं पुस्तक वाचत आहे (अक्षरधारातल्या प्रदर्शनातून घेतलं होतं गेल्या वीकएंडला). शेतीतील विविध प्रेयोगांबद्दल वाचायला खरच खूप मजा येत आहे-लेखन माहितीपूर्ण असले तरी ओघवते आहे. फुकुओकांबद्द्ल तसे थोडेफार माहित होते पण इतर काही प्रयोग अजिबात माहित नव्हते. सगळ्यांनी नक्कीच ते वाचावे. प्रयोग करण्याला उत्तेजन तर मिळतेच पण शेतीतील ओ का ठो माहित नसणार्‍याला थोडी दिशाही मिळते.

रूचीने ऐसीवर प्रयोग परिवार बद्द्ल लिहिले होते. ते परत वाचणार.

चिमणराव Fri, 19/06/2015 - 10:13

वर लिहिलेला मघई वेल ही एक पानाची जात आहे आणि तो वेल सहज वाढतो एवढेच नाहीतर घराच्या बाहेरच्या भिंती ,कंपाउंड च्या सिमेंटच्या खडबडीत भागास त्याची मुळे घट्ट पकडतात .भिंत झाकायला उपयोगी। आहे.मनी प्लांटचे तसे नाही त्याला सिमेंटचा चटका सहन होत नाही. खरे मघइ पान बिहारमध्ये नदिकाठच्या मऊ गाळातच होते. {पुण्याच्या मुळा मुठा नद्यांच्या गाळाबद्दल काय बोलणार ?}
सांगली ,जुन्नर भागात गेलात तर पानवेलींचे { आणि केळीचे} मळे दिसतील.मळ्यात चपला घालून जात नाहीत,फक्त पुरुष मंडळीच पाने तोडणीसास जातात. फार शुचिता पाळतात.

नागवेल:-

अमोघ Sat, 20/06/2015 - 19:52

मिरचीचे रोप केव्हा ट्रान्सप्लान्ट करावे? म्हणजे रुजून आल्यावर किती दिवसांनी? किंवा साधारण किती उंचीचे झाल्यावर?

चिमणराव Sun, 21/06/2015 - 08:33

मिरची:आठ पाने आल्यावर अथवा एक महिन्यानी. खड्यात खाली पाव किलोतरी शेणखत आणि आधाराची काठी {खालच्या टोकास जुना टुथ ब्रश आडवा बांधून} लावणे.

पिवळा डांबिस Sun, 21/06/2015 - 10:54

In reply to by चिमणराव

अचरटशेठ, तुम्ही आजवर अभिप्राय देताय! (अर्थात त्यांचं स्वागत आहेच!)
पण तुमच्या बागेचे, विशेषतः मिरच्यांचे, फोटोही टाका ना, जास्त बहार येईल.......

रोचना Sun, 21/06/2015 - 12:02

In reply to by चिमणराव

{खालच्या टोकास जुना टुथ ब्रश आडवा बांधून} लावणे.

! आडवा टूथब्रश कशाला? त्याने जास्त बॅलंस येईल का?

चिमणराव Sun, 21/06/2015 - 18:10

In reply to by रोचना

बर्फाचा गोळा बनवणारा त्यात काडी खोचताना टोक थोडे मोडून बसवतो काडी निघू नये म्हणून.इकडे नॅाइलॅान दोरीने ब्रश आडवा बांधला की दोन अडीच महिने काठी मातीत पक्की अडकून राहते

चिमणराव Sun, 21/06/2015 - 18:12

In reply to by रोचना

बर्फाचा गोळा बनवणारा त्यात काडी खोचताना टोक थोडे मोडून बसवतो काडी निघू नये म्हणून.इकडे नॅाइलॅान दोरीने ब्रश आडवा बांधला की दोन अडीच महिने काठी मातीत पक्की अडकून राहते.

रोचना Sun, 21/06/2015 - 12:12

काल खूप दिवसांनी बागेत काम केलं - नवीन माती एकत्र करणे, काही जुनी, किडलेली रोपं उपटली, आणि पावसाळ्याच्या लागवडीचा आराखडा घातला. उन्हाळ्याचा उपक्रम बर्‍यापैकी अयशस्वी झाला, पण पुढच्या वर्षीसाठी नोट्स तरी आहेत आता. बरं वाटलं. घेवडा, पावटा, चवळी, कोलमी शाक (ipomoea aquatica - एक देशी पालेभाजी), वांगी, मिर्ची, आणि एखाद दुसरी काकडी आणि दोडका. आमच्या शेजारच्यांचा माळी म्हणतो की आत्ता पालक आणि मुळा लावला तरी चालेल, वाढतील म्हणून. त्यामुळे तो सुद्धा प्रयोग करायचा आहे, गेल्या वर्षाच्या मुळाच्या भरपूर बिया साठवल्या आहेत.
आणि आश्चर्य म्हणजे, पाऊस लागून एक आठवडाच झालाय, पण चवळीच्या वेली लगेच टवटवीत झाल्या! आणि असंख्य छोट्या छोट्या पडवळींमधे एक भली मोठी लोंकळताना दिसली. हवामानाने सगळ्यांचाच मूड सुधारलेला दिसतोय! आज माछेर झोल मधे अनेक शेंगा आणि सगळ्या छोट्या-मोठ्या पडवळीचे तुकडे घातले.

ऋषिकेश Mon, 22/06/2015 - 09:41

In reply to by रोचना

आणि आश्चर्य म्हणजे, पाऊस लागून एक आठवडाच झालाय, पण चवळीच्या वेली लगेच टवटवीत झाल्या! आणि असंख्य छोट्या छोट्या पडवळींमधे एक भली मोठी लोंकळताना दिसली. हवामानाने सगळ्यांचाच मूड सुधारलेला दिसतोय! आज माछेर झोल मधे अनेक शेंगा आणि सगळ्या छोट्या-मोठ्या पडवळीचे तुकडे घातले.

होय होय. कडीपत्ता, तुळस, कोथिंबी आणि पालक अशी आमची चिमुकली शेतीसुद्धा फारच खुष होऊन तरारली आहे.
पालक लुळा पडु लाहत होता तेव्हाच पाऊस आला. त्यामुळे फरक नजरेत भरणारा आहे.

ऋता Tue, 23/06/2015 - 09:13

In reply to by रोचना

आमच्या शेजारच्यांचा माळी म्हणतो की आत्ता पालक आणि मुळा लावला तरी चालेल, वाढतील म्हणून.

ह्या मुळ्याला किती खोल माती लागते ?१ फूट उंचीच्या कुंडीत येतो का ? किती महिने लागतात तयार व्हायला ?
मी छोट्या लाल मुळ्याचं बी पेरलं आणि ते उगवूनही आलय. याला २१ दिवस पुरतात असं वाचलय. आठवडा होऊन गेला; अजून प्रगती हळूच वाटते आहे.

चिमणराव Sun, 21/06/2015 - 17:56

सध्या मिरचीवर प्रयोग चालू नाहीत पण इतर पाहा-

हे घ्या फोटो.- बाल्कनितले बागेचे प्रयोग पन्नास पिशव्यांत- १)आले २)पालक ३)कीटकांची वाट पाहताहेत घेवड्याची फुले ४)फ्रेंच बीन्स /फरसबी शेंगा धरल्या आहेत. ५) ६)कणगर/कारिंदे/aerial yam चा वेल. दोन महिन्यांनी कणगर धरतील बहुतेक. ७)मागच्या वर्षाचे कोनफळ कंद -कोंब फुटले आहेत . ८)या कुंडीचे तोंड लहान असल्याने झाड लावले की काढता येत नाही. पाइपला एका टोकास पॅालिएस्टर कापडाची अरुंद पिशवी बांधून मनीप्लांट लावला आहे तो ठेवायचा. ९)असा राहील- १०) हे नेहमिचेच सदाफुली झाड. या पोर्सिलेन कुंड्यांची मूळची पाणी वाहून जाण्याची तळाची भोके सिमेंटने मुद्दामहून बुजवली आहेत.फक्त झाडाची पिशवी बदलायची .पाणी सांडत नाही,दिवाणखान्यात ठेवता येते.सकाळी फक्त झाड उन्हात ठेवायचे/बदलायचे. घेवडा ,फरसबीचे चांगले बियाणे कुठे मिळेल ? यासाठी नर्सरीकडे धावू नका. भाजी घेताना एक दोन जून वातड शेंगा घ्या. त्या न सोलता वाळवा. वरचे साल कुरकुरीत झाले की आतले दाणे हेड उत्तम बियाणे.

पिवळा डांबिस Mon, 22/06/2015 - 09:59

In reply to by चिमणराव

मस्त फोटो आहेत! विशेषतः तो आल्याच्या रोपांचा फोटो तर केवळ जीवघेणा!!!!

बाकी 'कोनफळ' म्हणजे काय? कधी ऐकलं नाही. याला काही दुसरं नांवही आहे का?

चिमणराव Tue, 23/06/2015 - 09:55

In reply to by पिवळा डांबिस

कोनफळ: फळ नाही.जाडजुड मोठ्या रताळ्यासारखे दिसते.मार्च ऐप्रिल मध्ये लावायचे आणि नोवहेंबरात वेल उपटायचा.खाली पाच सहा लहानमोठी जाड मुळे असतात. उकडून खायचे.पांढरा आणि जांभळट गर असतो आणि कणिदार लागतो चिक्कट नसतो.

नंदन Wed, 24/06/2015 - 06:40

In reply to by चिमणराव

कोनफळ हिवाळ्यात होत असल्याने उंधियोत हमखास हजर असतं. 'इंदोरी गराडू चाट'फेम गराडूही बहुधा याच कुटुंबातला एक सदस्य.

ऋता Mon, 22/06/2015 - 10:55

प्लास्टिक पिशव्या आणि पाण्याच्या ५ लि. कॅन्स मध्ये मीही रोपे लावली. ५ लि कॅन मध्ये वांग्याचं रोप अजून तरी व्यवस्थित आहे. प्लास्टिक पिशवीतील घोसाळे यशस्वी नाही झाले (ऊन,पाणी कमी पडले असण्याचीही शक्यता आहे त्याला).
दह्याचे कप बिया रूजवण्यासाठी चांगले आहेत. दह्याच्या कपात रूजलेली मेडशिंगीची रोपे आता कुंडीत लावली तेव्हा कपातच खाली एक फूटाहून जास्त लांबीचे मूळ वेटोळे होऊन वाढलेले होते. कपात कोको(-पीट)+गांडूळ खत या खाली सुकलेली पाने ठासून भरली होती त्यामुळे मुळे छान वाढली असावीत. लिचिलाही सुंदर मुळे फुटली होती. त्यात सगळ्यात खाली पिस्त्याची सालं एक इंचभर इतकी भरली होती.
आता ६ इंच कुंडीत लावली रोपे. थोडी अजून वाढली आणि पावसाचा जोर कमी झाली की बाहेर लावणार.
६ इंच उंचीच्या कुंड्या स्नॅपडीलवरून मागवल्या कारण अनेक दुकानांमध्ये शोध घेऊनही हवे तसे डिझाइन काही मिळत नव्हते, शिवाय किंमती अवाच्यासवा सांगत. ६ इंच उंचीच्या १२ कुंड्या ३७५ रूपयांना मिळाल्या. ही किंमतही अनेकांना फार वाटेल पण मला कुठल्याही दुकानात याहून स्वस्त दर आणि अशी क्वालिटी दिसली नव्हती. अजून चांगल्या दराने मिळत असल्यास जरूर कळवा.
मातीच्या तीन कुंड्या प्लास्टिकच्या मागवायच्या आधी जुना बाजार येथिल कुंभारवाड्यातून आणल्या. पण त्या जड आहेत. आणि त्यातून परत रोपे काढून घेणे थोडे जिकीरीचे वाटले.

चिमणराव Tue, 23/06/2015 - 09:45

मुळा:कु्ंडीत पाला चांगला येईल. जमीनीत म्हणण्यपेक्षा जमीनीवर उंचवटा करून लावणे उत्तम -मुळा हवा असल्यास. दहा दहा दिवसांनी पाच पाच बिया लावा.एवढे सारे मुळे/पाला एकाचवेळी आल्यास काय करणार?

ऋषिकेश Tue, 23/06/2015 - 10:15

In reply to by चिमणराव

आमच्याकडे जमिन नाही. कुंडीतच मुळा येण्यासाठी काय करता येईल? एका कुंडीत कमी (१/२) बिया पेरल्या तर काही उपयोग होईल का?

चिमणराव Tue, 23/06/2015 - 10:53

रुंद आणि खोल कुंडी/बांबूची टोपली/आता आंब्याची पाटी,लाकडी पेटी ठेवलेली असल्यास उत्तम. चिक्कण /चिक्कट/लाल माती नको.भुसभुशीत हवी. पाला हवा असल्यास दोन आणि मुळा हवा असल्यास तीन महिन्यांनी उपटा अथवा वातड होईल. थंडीतले मुळे कोमल आणि कमी तिखट होतात.

ऋषिकेश Tue, 23/06/2015 - 13:44

In reply to by चिमणराव

ओके. जुन्या कचर्‍याच्या डब्यात लाऊन बघेन. त्याची खोली पुरेशी ठरावी. पसरट (आंब्याच्या पेटी इतकी वगैरे) जागा एका झाडाला घालवणे फुट गुणिले इंच बाल्कनीत परवडत नाही ;)

ऋता Wed, 24/06/2015 - 10:50

In reply to by चिमणराव

आंब्याची पेटी नाहिये. एखादी मोठी प्लास्टिक पिशवी/खोका/बादली बघावी लागेल. भुसभुशीत माती कशी मिळवायची ? असलेल्या चिकट मातीत वाळू, वाळलेली पाने मिसळली तर होईल का ?

सानिया Wed, 24/06/2015 - 03:27

ब्लूबेरीची फळं हिरवी होती त्त्यावर किंचीत जांभळट झाक आली आहे. त्याला जमीनीतून नवीन फुटवेही येत आहेत.

चेरी टोमॅटोही येत आहेत. नेहेमीच्या टोमॅटोला मात्र फुलं आली असली तरी अजून फळली नाहीयेत. बेझीलही येत आहे भरपूर.

माझे अळूचे कांदे सशा-खारींनी पळवल्यावर उरलेला एकच कांदा मी भरपूर माती आणि गवताखाली लपवून ठेवला होता. त्यालाही पानं फुटली आहेत. आता हाताशी थोडा अधिक वेळ आहे, तेव्हा अजून ४/५ अळूचे कांदे आणून कुंडीत पेरले आहेत. प्राण्यांपासून बचाव व्हावा म्हणून कुंडी झाकून ठेवली आहे. पानं फुटल्याशिवाय झाकण उघडायचं नाही असं ठरवलं आहे. मजबून मुळ्ं धरली, की कांदे उकरायला सशांची ताकद कमी पडत असावी.

ऋता Wed, 24/06/2015 - 10:42

In reply to by सानिया

ब्लूबेरीज मस्त..जमिनीतून आलेल्या फुटव्यांची स्वतंत्र रोपेही होऊ शकतील.
बेसिल टोमॅटोही छान.
एवढा बेसिल खुडुन त्याचे काय करता येते ? पेस्तो वगैरे ?
बेसिल माझ्याकडे होता, पण मी त्याचे शेंडे खुडलेच नाहीत फारसे (एकदोनदा खुडून वापरले पास्त्यात तेवढेच). त्यामुळे मंजिर्‍या आल्या भरपूर आणि वाळून गेलं. बिया ठेवल्या आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 24/06/2015 - 18:06

In reply to by ऋता

बेझिल खुडताना देठांसकट पानं वरून खुडायची म्हणजे मंजिऱ्या धरायला वेळ लागतो आणि बरेच दिवस पानं मिळत राहतात. पानं कशी खुडायची यासाठी यूट्यूबवर व्हीडिओजही मिळतील.

टोमॅटो-बेझिल-मोझारेला सँडविच छान लागतं. आमच्याकडे उन्हाळ्यात टोमॅटो-बेझिल सूप बरेचदा होतं. (पाककृती) बरंच बेझिल असेल तर पेस्तो बनवून वापरता येईल, पेस्तो उरलं तर ते बर्फाच्या ट्रेमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवायचं. वापरायच्या वेळेस पेस्तोचा एकेक तुकडा काढून वापरता येतो.

सानिया Wed, 24/06/2015 - 18:29

In reply to by ऋता

जमिनीतून आलेल्या फुटव्यांची स्वतंत्र रोपेही होऊ शकतील.

होय. तोच विचार आहे. पण ती केव्हा आणि कशी बनवायची त्याचा तपास करायला लागेल.

एवढा बेसिल खुडुन त्याचे काय करता येते ? पेस्तो वगैरे ?

पहिलाच अनुभव आहे एवढे बेझिल उगवायचा. पेस्तोचा वापर मी मुख्यतः पनीनी किंवा साधे सँडवीच यात करते. नुसताच ब्रेड कुरकुरीत भाजून त्यावर पेस्तो लावून खायला मला आवडतं. होय, त्याशिवाय पास्ता, रॅवियोली, स्टफ्ड ब्रेड्च्या पुरणात, स्पॅनिश ऑम्लेट यातही वापर करायचा विचार आहे. पूर्वी माझ्याकडे भारतीय तुळस होती, तेव्हा माझा मुलगा रोज २,३ पानं नुसतीच खायचा. बेसीलची पानं किंचीत अधिक तीव्र चवीची असल्यामुळे सध्या एखादेच पान अर्धवट खातोय.

पानं वाळवूनही ठेवता येतील असा विचार करत आहे. त्याचं तंत्र शोधायला हवं

ऋता Thu, 25/06/2015 - 08:33

In reply to by सानिया

पानं वाळवूनही ठेवता येतील असा विचार करत आहे. त्याचं तंत्र शोधायला हवं

हो की...सुका बेसिल वापरत असून हे करता येईल हे सुचलं नाही बेसिल असताना.

चिमणराव Wed, 24/06/2015 - 07:23

गराडु चिक्कट अथवा रवाळ असतात.रवाळ /कणीदार खायला छान लागतो.
ते वरचे ब्लुबेरीचे फोटो आवडले.
मी बेझिल,थाइम,रोजमरी,लेमन गरास श्रीलंकावाले वापरतात ते मिळवण्याच्या खटपटीत आहे.

चिमणराव Wed, 24/06/2015 - 13:54

पेटी असली तर त्याचा वापर भाजीचा वाफा असा करता येतो एवढेच .चिक्कट मातीचं रुपांतर भुसभुशित मातीत नाही होणार त्यापेक्षा ती ज्यास चांगली त्यासाठी म्हणजे कढिलिंबासाठी वापरा.

ऋता Thu, 25/06/2015 - 08:27

In reply to by चिमणराव

ती ज्यास चांगली त्यासाठी म्हणजे कढिलिंबासाठी वापरा.

होय. माझ्याकडे कढीपत्ता फक्त पूर्ण मातीत लावला आहे आणि तो वाढतोय.
मी बिया पेरल्या चिकट मातीत तर काहीच येत नव्हत उगवून...किंवा थोडे येऊन मग मरून जात होते (मेथी आणि कोथिंबीर नीट वाढली नाही). सुकी पाने, कंपोस्ट/गांडुळ खत आणि कोकोपीट मध्ये मात्र बिया चांगल्या रूजल्या आणि रोपही चांगली वाढतायत.

.शुचि. Sun, 28/06/2015 - 03:20

We plant, it is true.
I start the tiny seedlings
in peat pots, water, feed.

But the garden is alive
in the night with its own
adventures. Slugs steal

out, snails carry their
spiraled houses upward,
rabbits hop over the fence.

The garden like a green
and bronze goddess loves
zucchini this year but will

not give us cucumbers.
She does as she pleases.
Purple beans but no yellows.

Serve me, she whispers,
maybe I will give you tomatoes,
or maybe I will hatch into

thousands of green caterpillars
maybe I will grow only bindweed,
joe-pye weed and dandelions.

All gardeners worship weather
and luck. We begin in compost
and end in decay. The life

of one is the death of the other.
Beetles eat squash plant. Bird
eats beetle. Soil eats all.

रोचना Sun, 28/06/2015 - 20:31

In reply to by चिमणराव

बॉरबोटीच्या बिया वाळवल्यावर अशा दिसतात (दोन देशी प्रजाती आहेत, एक लालसर, आणि एक काळसर) वालीचेच प्रकार आहेत का?

सॉरी चित्र तेवढे स्पष्ट नाहीय.

(मागे चवळीवरून अजून एक चर्चा झाली होती.... long beans आणि cow peas वरून....)

अजून एकः इतके दिवस घेवड्या एवढंच वाढणार्‍या पडवळाने बाळसं धरलंय!

चिमणराव Tue, 30/06/2015 - 18:20

In reply to by रोचना

वाली म्हणतात त्या ओल्या शेंगांना भाजीसाठी फार महत्त्व आहे. केरळमध्ये(त्रिशुर) गेलात तर आवर्जून त्या शेंगा आणून त्तले बी लावा.कोकणात ( कुडाळ ,सावंतवाडी) यास वाली म्हणतात.जरा मोठे तुकडे थोडे पाणी। घालून शिजवायचे.पाणी ठेवायचे नाही.शेवटी उडीद डाळीची फोडणी आणि ओलं खोबरं टाकायचं.या शेंगांत कधी कधी लाल चवळी असते ती वाळवूनही दाण्यांची उसळ केली तर पांढय्रा चवळीपेक्षाही चांगली लागते.

ओल्या शेंगा लांब ,फिकट हिरवट पांढुरक्या,मउसर केस विरहित साल,चरबरीत नसलेली असेल तर वाली.

चिमणराव Mon, 29/06/2015 - 13:51

In reply to by रोचना

याच फुलझाडाचे गलाबी,आणि पांढरी फुलांचेही प्रकार आहेत आमच्या इथे एकाकडे आता गुलाबी फुले बहरली आहेत.नाव माहित नाही.

ऋषिकेश Mon, 29/06/2015 - 14:08

In reply to by संजय पाटिल्

बहुदा रानफुलांचा प्रकार आहे.
एक अंदाज की हे हायड्रान्जीआ
हायड्रान्जीआ हे कॉमन नाव झाले. त्यात तुमचे कोण्या जातीचे शोधावे लागेल.