Skip to main content

सुट्टी म्हणजे

सुट्टी म्हणजे नुसती धमाल
पर्यटनाची भलती कमाल ..

गडावर जाऊ शिकू इतिहास
भुगोलातले प्रदेश खास ..

बसू घरात ऊन असल्यावर
पत्ते क्यारम गार फरशीवर ..

टीव्हीवर एनजी डिस्कव्हरी
डोरेमोन भीम बीनची मस्करी ..

अधूनमधून भेंड्या नि गाणी
आईस्क्रीम आणिक लिंबूपाणी ..

पुस्तकं वाचू खूप छान छान
माहितीची करू देवाणघेवाण ..

संध्याकाळी खेळू बागेत खेळ
खेळून खाऊ बागेबाहेर भेळ ..

सुट्टी म्हणजे क्रिकेट खेळणे
अभ्यासाशी गट्टी फू करणे ..
.

राजेश घासकडवी Fri, 05/06/2015 - 00:27

कविता काहीशी पुस्तकी वाटली. लहान मुलांच्या तोंडून आल्यासारखी वाटली नाही. 'पर्यटनाची भलती कमाल' म्हणण्याऐवजी मुलं 'भटकायची जाम मजा' वगैरे काहीतरी म्हणतील.