अनुराग कश्यपचा बॉलिवूडला रामराम
अनुराग कश्यपचा बॉलिवूडला रामराम
'मला नव्याने सुरूवात करायची आहे. मला अशा ठिकाणी जायचं जिथे चित्रपटांवर लोकांची फारशी बंधनं नसतील. मला स्वतःला पुढे न्यायचं आहे. मला मर्यादा आल्या आहेत. आणि इथे राहून मी स्वतःला पुढे नेऊ शकणार नाही', असं अनुरागने सांगितलं. इतरांपेक्षा कायम वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवणाऱ्या अनुरागला सेन्सॉर बोर्डाच्या नव्या नियमांमुळे फटका बसला आहे. त्यामुळे तो देश सोडून जातोय, असं सांगण्यात येतंय.
जाता जाता : 'बॉम्बे वेलव्हेट'मध्ये सबंध चित्रपटभर खाली एका कोपऱ्यात धूम्रपानाविषयीची सूचना कायमची टाकलेली आहे. चित्रपटात अधूनमधून झळकणारी आणि मग अदृश्य होणारी सूचना पाहण्यापेक्षा ही कल्पना बरी वाटली. टीव्हीवर चॅनलचा लोगो जसा सवयीनं दुर्लक्षित होतो, तसंच झालं.
अवाजवी तुलना !
पुस्तके आणि चित्रपट या दोन माध्यमांची तुलना अवाजवी आहे. पुस्तके वाचणारी टाळकी एकंदरीत किती आहेत अशी ? त्याच्यात तरुण पिढी, म्हणजे जे कशानेही लगेच इंप्रेस होऊ शकतात असे किती ? शिवाय पुस्तकात लिहिलेल्या धुम्रपानाचे वर्णन वाचून त्यावरुन कल्पनाचित्र उभे करुन त्याबरहूकूम कृती करु शकतील असे कितीक आहेत?
एक प्रश्न
>> व्यावसायिक चित्रपटात - जिथे गिर्हाईक पैसे देऊन चित्रपट बघतो आणि दिग्दर्शक/निर्माते पैसे घेऊन 'चित्रपट' नावाचे एक प्रॉडक्ट विकतात - तिथे दिग्दर्शकाची सत्ता खरंच सार्वभौम असते?
दिग्दर्शक सर्वसत्ताधारी किंवा सार्वभौम आहे असा माझा दावा नाही, पण एक साधा प्रश्न इथे विचारू इच्छितो - 'बॉम्बे वेलव्हेट' वाईट आहे म्हणून सर्वात जास्त शिव्या कुणाला बसत आहेत? अनुराग कश्यपला, की निर्मात्यांना? फॉक्स स्टुडिओजचं नाव चित्रपटात सुरुवातीला झळकतं. आयएमडीबीवर निर्मात्यांची नावं आहेत. त्यांपैकी कुणाकुणाला लोकांनी किती शिव्या दिल्या आहेत?
प्रिसाईजली!
'बॉम्बे वेलव्हेट' वाईट आहे म्हणून सर्वात जास्त शिव्या कुणाला बसत आहेत? अनुराग कश्यपला, की निर्मात्यांना?
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. चित्रपट वाईट आहे म्हणून अनुराग कश्यपला शिव्या देतंय पब्लिक
त्या "Smoking Kills" या पाटिमुळे रसभंग होतो म्हणून कोणीही दिग्दर्शकाला शिव्या देत नाहीये. ती सुचना कायदेशीर अनिवार्यता आहे म्हणून त्याचं पालन केलं जातंय हे प्रेक्षकांनाही माहिती आहे, त्याची जबाबदारी दिग्दर्शकाची नाही!
जसं सबटायट्ल्स देणं हे फिल्म फेस्टिव्हलचा नियम आहे म्हणून पाळला जातो तसा Smoking Kills हा मेसेज देशाचा नियम आहे म्हणून का पाळला जाऊ नये याचे उत्तर का टाळलं जातंय?
का पाळला जाऊ नये? तो पाळला
का पाळला जाऊ नये?
तो पाळला जातो आहे. कुणीच सविनय वगैरे कायदेभंग केलेला नाही. पण तो असू नये अशी इच्छा आहे.
(समांतर पण अगदी सारखं नसलेलं उदाहरण: राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ ऊठसूट दर कार्यक्रमापूर्वी उभं राहण्याची अपेक्षा (एकदा तर म्हणे सिनेमात वाजलं तरी उठून उभं राहिलं पाहिजे, असलं एक राष्ट्रवादी आर्ग्युमेंट ऐकलं होतं) असू नये, अशी इच्छा आहे, तशीच.)
त्याच्याजागी अजून निराळं काय
त्याच्याजागी अजून निराळं काय करता आलं असतं, हा अगदीच वेगळा प्रश्न झाला. पण असं फ्रस्टेशन येऊ शकतं का? हो, येऊ शकतं. समजू शकतं. त्याबद्दल उदासीनता वाटते की काही भावना आहेत? तर वाईट वाटतं, लाज वाटते, असं व्हायला नको होतं असं वाटतं. उलटा कश्यपला दोष देण्याच्या पंथात मी नाही.
पण असं फ्रस्टेशन येऊ शकतं का?
पण असं फ्रस्टेशन येऊ शकतं का? हो, येऊ शकतं. समजू शकतं.
+१
त्याबद्दल उदासीनता वाटते की काही भावना आहेत?
भावना आहेत. एखाद्याला त्रास होत असेल तर सहानुभुती वाटू शकते. या केसमध्ये असल्या कारणाने देश वगैरे सोडायचे ठरल्यावर तीही उरली नाही!
तर वाईट वाटतं, लाज वाटते, असं व्हायला नको होतं असं वाटतं.
छे छे! असे अजिबात वाटत नाही. इतकं काही झालं नसताना थेट देश वगैरे सोडून जायचाय त्याने जावं.
सार्वजनिक हितासाठी लोकांनीच बहुमताने घातलेले नियम पाळायचे नसणार्यांनी ते बदलण्यासाठी इथेच राहुन शक्य त्या मार्गाने लढावं - तसं झालं असतं तर सहानुभुती वाटली असती, आता ती ही नाही.
इथे काही त्याच्या जीवावर बेतलेलं नाही की त्याला असे चित्रपट बनवू नकोस कोणी सांगितलेलं नाही. तरीही जातोय म्हणतोस! तर जा बाबा, आनंदच आहे!
का पाळु नये? याचे काहि लॉजिकल
का पाळु नये? याचे काहि लॉजिकल उत्तर द्यावे नी करावा 'सविनय कायदेभंग' नी त्याचे परिणाम भोगायला व्हावे तयार!
इथे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून नियम पाळायचा आणि मग आता मी चाललो देश सोडून म्हणायचं याला काय अर्थय!
इतका त्रास होत होता तर करायचा नव्हता चित्रपट रिलीज! तो तर करायचा, त्यातून कमी/अधिक पैसे मिळवायचे, भली/बुरी प्रसिद्धी मिळवायची नी मग अप्रत्यक्षपणे लोकांनाच शिव्या देत निघुन जायचे! जा की! कोणी अडवतही नाहीये!
अडचण काय आहे
>> चित्रपट वाईट आहे म्हणून अनुराग कश्यपला शिव्या देतंय पब्लिक
त्या "Smoking Kills" या पाटिमुळे रसभंग होतो म्हणून कोणीही दिग्दर्शकाला शिव्या देत नाहीये. ती सुचना कायदेशीर अनिवार्यता आहे म्हणून त्याचं पालन केलं जातंय हे प्रेक्षकांनाही माहिती आहे, त्याची जबाबदारी दिग्दर्शकाची नाही!जसं सबटायट्ल्स देणं हे फिल्म फेस्टिव्हलचा नियम आहे म्हणून पाळला जातो तसा Smoking Kills हा मेसेज देशाचा नियम आहे म्हणून का पाळला जाऊ नये याचे उत्तर का टाळलं जातंय?
मुद्दा असा आहे -
चित्रपटाच्या दर्जाबद्दल जबाबदारी कुणाची? दिग्दर्शकाची.
मग चित्रपटात जे दाखवलं जातंय ते सर्वप्रथम त्याला पसंत हवं. जर त्याला आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी घालाव्या लागत असतील , किंवा गाळाव्या लागत असतील, आणि त्यामुळे जर त्याला फ्रस्ट्रेशन आलं असेल, तर त्यात नवल ते काय?
(तुझ्या कामाच्या ठिकाणी तुझ्या अखत्यारीतल्या एखाद्या बाबीत कुणी तरी मनाविरुद्ध तुला काही तरी करायला लावलं तर फ्रस्ट्रेशन येत नाही का तुला? म्हणजे तू लगेच उठून नोकरीचा राजीनामा देशीलच असं नाही, पण फ्रस्ट्रेट होणं तरी तुला साहजिक वाटतं की नाही?)
राहता राहिला नियम : आज देशातला एखादा कायदा एखाद्या नागरिकाला कालबाह्य किंवा चुकीचा वाटत असला, तर त्याविरुद्ध चिडण्याचा आणि आवाज उठवण्याचा हक्क त्याला आहे ना? नियम तर अनुराग कश्यपनं पाळला आहेच.
आज देशातला एखादा कायदा
आज देशातला एखादा कायदा एखाद्या नागरिकाला कालबाह्य किंवा चुकीचा वाटत असला, तर त्याविरुद्ध चिडण्याचा आणि आवाज उठवण्याचा हक्क त्याला आहे ना? नियम तर अनुराग कश्यपनं पाळला आहेच.
प्रश्न हा नाही कि त्याला हक्क आहे कि नाही. हक्क आहेच. त्याने नियम पाळले त्याचे कौतुक आहेच. पण त्याने घेतलेली भूमिका तात्विक दृष्ट्या बरोबर आहे काय ही चर्चा आहे.
पळपुटेपणा
(तुझ्या कामाच्या ठिकाणी तुझ्या अखत्यारीतल्या एखाद्या बाबीत कुणी तरी मनाविरुद्ध तुला काही तरी करायला लावलं तर फ्रस्ट्रेशन येत नाही का तुला? म्हणजे तू लगेच उठून नोकरीचा राजीनामा देशीलच असं नाही, पण फ्रस्ट्रेट होणं तरी तुला साहजिक वाटतं की नाही?)
>> फ्रस्ट्रेशन येणं, त्याविरुद्ध इथे राहुन आवाज उठवणं हे योग्यच आहे असे आधीच म्हटलंय. त्यासाठी देश सोडून जाण्याच्या पळपुटेपणामागे काय कारण?
कामाच्या ठिकाणी आलेल्या फ्रस्ट्रेशनमुळे प्रत्येक जण लगेच नोकरीचा राजीनामा देत नाही, पण एखादा देऊ शकतो. तो लगेच पळपुटाच ठरतो का?
चित्रपट नक्की कोणाचा?
चित्रपट नक्की कोणाचा? www.aisiakshare.com/node/2480 हा धागा आठवला.
तिच्यावरची दिग्दर्शकाची
तिच्यावरची दिग्दर्शकाची सार्वभौम सत्ता, त्या सत्तेचं महत्त्व आणि जबाबदारी हेच मान्य नाहीय.
जबाबदारी हा शब्द वगळून सर्व मान्य आहे. सार्वभौम सत्ता असली तर दिग्दर्शक कोणती जबाबदारी कोणत्या प्रकारे घेतो ? जबाबदारी हा उगीचच एक बॅलन्सिंग शब्द वाटतो याठिकाणी. धूम्रपान ग्लॅमरस पद्धतीने दाखवलं, स्वातंत्र्य असल्यास वॉर्निंग दाखवल्या नाहीत, आणि काही अल्प प्रमाणात का होईना, प्रेक्षक व्यसनाकडे वळला.. तर त्याची जबाबदारी दिग्दर्शक कधी आणि कशी घेतो?
हेच चित्रपटाच्या अन्य दुष्परिणामांबद्दलही म्हणता येईल.
तुमचं असं म्हणणं आहे का, की दिग्दर्शकाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण त्याने त्याचा वापर करुन काहीतरी दाखवलं.. आणि एखाद्या गुन्हेगाराने त्यावरुन मोटिव्हेट झाल्याचं कबूल केलं.. (जे आत्ताही अनेक गुन्हेगार करतात - "शॉर्टकट मनी","किडनॅपिंग्","खुनाची पद्धत","बलात्काराची पद्धत" अशा अनेक बाबी सिनेमावरुन प्रेरित होऊन केल्याचं).. तर अशा वेळी त्या स्वातंत्र्याची दुसरी बाजू ऊर्फ जबाबदारी, तो दिग्दर्शक घेणार का?
आणखी
>>तुमचं असं म्हणणं आहे का, की दिग्दर्शकाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण त्याने त्याचा वापर करुन काहीतरी दाखवलं.. आणि एखाद्या गुन्हेगाराने त्यावरुन मोटिव्हेट झाल्याचं कबूल केलं.. (जे आत्ताही अनेक गुन्हेगार करतात - "शॉर्टकट मनी","किडनॅपिंग्","खुनाची पद्धत","बलात्काराची पद्धत" अशा अनेक बाबी सिनेमावरुन प्रेरित होऊन केल्याचं).. तर अशा वेळी त्या स्वातंत्र्याची दुसरी बाजू ऊर्फ जबाबदारी, तो दिग्दर्शक घेणार का?
इतकं पुढे कशाला? काल मनोबांनी स्वामीनाथन अय्यरचा जो लेख चिकटवला आहे त्यात सिनेमात दाखवल्या जातात असे म्हटलेल्या गोष्टीची जबाबदारी ते ते दिग्दर्शक घेतात काय?
खवचट मोड ऑन> शिवाय अॅटेनबराने सिनेमात दाखवल्यावर (आधी टकल्या/थेरडा वाटणारा) गांधी पटू लागला. माझ्यासारख्या अनेकांना पटू लागला असेल. त्यामुळे देशाचं जे नुकसान झालं (त्यांचं नाव घेणार्या पक्षाला माझ्यासारख्या अनेकांनी वारंवार मत दिलं) त्याची जबाबदारी कोण घेणार? खवचट मोड समाप्त>
एक प्रयत्न
१. अनुराग कश्यप भारत सोडून फ्रान्समध्ये स्थायिक होणार अशी बातमी.
२. सेन्सॉर बोर्डाच्या त्रासामुळे असं बातमी (मटाची!) म्हणते आहे.
३. त्याच्या मुलाखतीत मात्र इन-जन्रल भारतीय समाजातली सद्य असहिष्णुता, कलाकारांवरचे निर्बंध असं कारण. (त्याने सांगितलय. )
४. निर्बंधांचं एक उदाहरण हे सिनेमामध्ये धुम्रपानाची वॉर्निन्गं (हे आवश्यक आहे का जाचक आहे यावर एक उपचर्चा.)
५. हुसेन यांच बाहेर जाणं आणि कश्यपचं बाहेर जाणं हे सेम आहे का हा अजून एक मुद्दा.
६. कलाकाराचं त्याच्या कलेवर पूर्ण वर्चस्व असतं का/असावं का हा अजून एक उपमुद्दा (सिनेमा, पुस्तक यांमधली साम्य/फरक)
७. एका स्टेक होल्डरने दुसर्या स्टेक होल्डरवर निर्बंध घालणं (उदा प्रकाशकाने लेखकावर किंवा निर्मात्याने दिग्दर्शकावर) आणि तिर्हाइताने कलाकारवर (बोर्डाने दिग्दर्शकावर) निर्बंध घालणं हे सारखं का वेगळं यावर एक चर्चा.
सो इन शॉर्ट, यात अनेक मुद्दे आहेत. तुम्ही एकाच मुद्द्याच्या अपेक्षेने वाचलात धागा तर अवघड आहे!
चिंताजनक
ही बातमी मटा मध्ये सोडून अजून कुठेच नाही. तसे नसेल तर चांगलाच आहे . तसे असेल तर ती चिंताजनक आहे. आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य काळजी करण्याएवढे कमी होत चालले आहे. अनुराग कश्यपचा वाद फक्त सिगरेट संदर्भात नाही. त्याच्या पांच वर सेन्सॉर ने बंदी घातली होती आणि अजूनही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्यात हिंसाचाराचा आरोप आहे. मी तो नेट वर पाहिला आणि मला त्यात काहीही आक्षेपार्ह वाटलेले नाही. माझ्या आवडत्या सिनेमा पैकी एक आहे. घडलेल्या घटनेसमोर याच्यातली हिंसा काहीच नाही. आणि अनेक हिंसक चित्रपट याच्यापेक्षाही आहेत आणि सेन्सॉर ने मान्यता दिलेली आहे.
सिगरेट संदर्भात बोलायचे तर सिनेमाचा थोडा परिणाम होतो हे मान्य आहे. त्यासाठी आधी सूचना किंवा फिल्म दाखवतातच. त्या जास्त परिणामकारक करा. पण लहान मुलासारखे प्रत्येक सीन वर पाटी लावणे याने नक्कीच लक्ष विचलीत होते.
ही बातमी केवळ मटातच आलीये की
ही बातमी केवळ मटातच आलीये की अजून कुठे?
सुरूवातीला दिग्दर्शकाला हवी तशी फिल्म करायची तर फायनान्स जमवण्यात नको एवढी एनर्जी खर्च होते.
ते जमले तर मग सेन्सॊर. सध्याचा सेन्सॊरचा अध्यक्ष कोण आहे, त्याची आधीची चित्रपट कारकीर्द(त्यातली द्व्यर्थी गाणी) आणि संस्कृती वाचवण्यासाठी त्यानी उचललेली पावले याचा जरा आढावा घ्या. फारच मनोरंजक प्रकरण आहे ते.
सेन्सॊरचा अधिकार भारतीय जमिनीवर, व्यावसायिकरित्या प्रदर्शन करण्यापुरताच असतो. म्हणजे फिल्म रिलीज होणे आणि भारतामधे चॆनेल्सवर दिसणे. भारतातले वा बाहेरचे फिल्म फेस्टिव्हल्सच्या इथे सेन्सॊरचा अधिकार चालत नाही त्यामुळे अनेकदा रिलीजपूर्वी फिल्म फेस्टिव्हल्समधून गाजलेली असू शकते. मग त्या गाजलेल्या फिल्मला ठरवून अडवले जाऊ शकते सेन्सॊरसाठी.
सेन्सॊर सर्टिफिकेट मिळाले की किंवा बरोबरीनेच डिस्ट्रिब्युटर्स असतातच. जो बिकता है वो डालो करत.
हा सगळ्या प्रकारामधे झुंजत एनर्जी वाया घालवायचा एखाद्या दिग्दर्शकाला कंटाळा आला आणि त्याला स्वत:ला हव्या तश्या फिल्म्स करायची संधी/ शक्यता/ स्वातंत्र्य मिळत असेल बाहेर कुठेतरी तर त्याने जायचा निर्णय घेतला यात मला काहीही चूक दिसत नाही.
सध्याचा सेन्सॊरचा अध्यक्ष कोण
सध्याचा सेन्सॊरचा अध्यक्ष कोण आहे, त्याची आधीची चित्रपट कारकीर्द(त्यातली द्व्यर्थी गाणी) आणि संस्कृती वाचवण्यासाठी त्यानी उचललेली पावले याचा जरा आढावा घ्या. फारच मनोरंजक प्रकरण आहे ते.
द्वयर्थी गाणी संस्कृती विरोधी कशी?
बाकी त्यांनी उचललेली काही पावले मूर्खपणाची आहेत.
-------------------------------------------------------------------------------------------
बाकी सगळं सगळ्या इंडस्ट्रीत होतं. फायनान्स अरेंज करणे, क्लिअरान्सेस घेणे, सेल्स प्रचंड अवघड कामे आहेत. इथल्या सिस्टिम्स, चाली, परंपरा, लाचलुचपत, गुंडागर्दी, इ इ चा त्रास होतो तेव्हा लोक भारताबाहेर व्यवसाय थाटतात. कश्यपाने ते केले तर काही म्हणायचं नाही. रिस्क रिटर्न कॉल आहे तो.
पण उगाच भारतीय चित्रपटस्रूष्तीतील अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून भोकाड पसरण्यात अर्थ नाही.
द्वयर्थी गाणी संस्कृती विरोधी
द्वयर्थी गाणी संस्कृती विरोधी कशी? जर त्याने दिलेल्या गाइडलाइन्स वाचल्या असत्यात तर हा प्रश्न विचारायची गरज पडली नसती.
द्व्यर्थी संवाद, शब्द, गाणी असता कामा नयेत असा त्याचा फतवा आहे.
पण उगाच भारतीय चित्रपटस्रूष्तीतील अभिव्यक्तिस्वातंत्र्य म्हणून भोकाड पसरण्यात अर्थ नाही.
बॉर त्याला इंडस्ट्रीत राहून जे अनुभव आले त्यापेक्षा तुम्हालाच जास्त माहिती.
फार करमणूक होतेय इथले दावे वाचून.
दिग्दर्शकांची आणि कलाकारांचं
दिग्दर्शकांची आणि कलाकारांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ढिगभर पद्धतीने आणि सोर्सेसने बंधने आहेत नि येताहेत. त्यातील बहुतांश गैरही आहेत - त्यविरुद्ध कलाकारांनी एकत्र येऊन कायदेशीर लढा द्यायला हवा.
पण कश्यपच्या बाबतीत म्हणायचं तर त्याच्यावर आतापर्यंत हे स्मोकिंगची पाटी त्याला दाखवायची नाही या व्यतिरिक्त बंधन आल्याचे त्याने तरी सांगितलेले नाही. आणि तसे असल्यास हे कारण, देश सोडून जायला पुरेसे नाही असे माझे मत आहे.
हा आपल्या चित्रपटाच्या गुणावगुणांपेक्षा अन्य कारणाने स्वतःचे नाव चर्चेत ठेवायचा प्रयत्न आहे असा आरोप कोणी केल्यास तो मला मुळातून झिडकारता येणार नाही!
कश्यप आणि सेन्सॉर बोर्ड
>> पण कश्यपच्या बाबतीत म्हणायचं तर त्याच्यावर आतापर्यंत हे स्मोकिंगची पाटी त्याला दाखवायची नाही या व्यतिरिक्त बंधन आल्याचे त्याने तरी सांगितलेले नाही.
'Bombay Velvet': Anurag Kashyap hits out at Censor Board
No adult tag but Bombay Velvet loses steamy kiss
"He will have to snip out two cuss words - 'son of a bitch' and 'haramzada'. The members of the RC were far more open-minded than the EC, but even they felt that these two expletives were not suitable for an under-18 audience," a source said.
That's not all. Anurag will also have to leave out a sizzling kiss on the editing table. "The liplock is part of a passionate lovemaking scene between Ranbir and Anushka. The RC thought it was a little too bold for a film catering to a universal audience," adds the source.
Interestingly, CBFC chairperson Pahlaj Nihalani presided over the RC screening, clearly exceeding his brief."He made a number of suggestions much to the annoyance of the other members. But at the end of it, even the Bombay Velvet team went home relieved as they got the rating they wanted," the source concluded.
The liplock is part of a
The liplock is part of a passionate lovemaking scene between Ranbir and Anushka. The RC thought it was a little too bold for a film catering to a universal audience," adds the source.
Interestingly, CBFC chairperson Pahlaj Nihalani presided over the RC screening, clearly exceeding his brief."He made a number of suggestions much to the annoyance of the other members. But at the end of it, even the Bombay Velvet team went home relieved as they got the rating they wanted," the source concluded.
सदर बदल बॉम्बे व्हेल्वेटच्या टीमला 'हवे ते रेटिंग' (U/A) मिळवण्यासाठी सांगितलेले होते.
विदाउट कट त्यांना 'A' मिळू शकले असतेच की! ते का नाही घेतले?
जर मुलांना बघण्यासाठी योग्य असे रेटिंग हवे असेल तर हे बदल करावेत असा बोर्डाचा स्टँड असेल तर तो नियमांना सोडून नसावा! अन्यथा हा चित्रपट फक्त प्रौढांसाठीच असावा असे सर्टिफिकेट त्यांनी विदाउट कट दिलेही असते
प्रौढांसाठी का?
>> सदर बदल बॉम्बे व्हेल्वेटच्या टीमला 'हवे ते रेटिंग' (U/A) मिळवण्यासाठी सांगितलेले होते.
विदाउट कट त्यांना 'A' मिळू शकले असतेच की! ते का नाही घेतले?जर मुलांना बघण्यासाठी योग्य असे रेटिंग हवे असेल तर हे बदल करावेत असा बोर्डाचा स्टँड असेल तर तो नियमांना सोडून नसावा! अन्यथा हा चित्रपट फक्त प्रौढांसाठीच असावा असे सर्टिफिकेट त्यांनी विदाउट कट दिलेही असते
'सन ऑफ अ बिच' आणि 'हरामजादा' हे शब्द ऐकण्यासाठी भारतीय प्रेक्षकाची १८ वर्षं पूर्ण झालेली असावीत हा सेन्सॉर बोर्डाच्या रिव्हायजिंग कमिटीचा आग्रह काही लोकांना अवाजवी वाटू शकतो.
इथे वैयक्तिक वाजवी अवाजवी
इथे वैयक्तिक वाजवी अवाजवी वाटण्याचा प्रश्नच नाहीये.
'सन ऑफ अ बिच' आणि 'हरामजादा' हे शब्द ऐकण्यासाठी भारतीय प्रेक्षकाची ३० वर्षं पूर्ण झालेली असावीत हा सेन्सॉर बोर्डाच्या रिव्हायजिंग कमिटीचा आग्रह काही लोकांना अतिशय वाजवी वाटू शकतो. मग?
===
इन एनी केस, ठराविक सर्टिफिकेट न मिळणे हा अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला कसा? उगाच कै च्या कै!
शतशः
शतशः सहमत.
-------------------------------------------------------------------------------------------
एखादी गोष्ट बोलूच न देणे म्हणजे अभिव्यक्तिवर घाला. एखाद्या धंद्यांचे नियम म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर घाला कसे?
कुठे, कसे, काय याचे नियम, संकेत, कायदे नकोत का?
जाऊ द्या, ते असोच, डूकराला नेपोलिअन बोनापार्ट नाव देखिल फ्रान्समधे ठेवणे कठीण असावे.
तिथे जाऊन काय फायदा?
व्यक्ती आणि व्यवस्था
>> इथे वैयक्तिक वाजवी अवाजवी वाटण्याचा प्रश्नच नाहीये.
'सन ऑफ अ बिच' आणि 'हरामजादा' हे शब्द ऐकण्यासाठी भारतीय प्रेक्षकाची ३० वर्षं पूर्ण झालेली असावीत हा सेन्सॉर बोर्डाच्या रिव्हायजिंग कमिटीचा आग्रह काही लोकांना अतिशय वाजवी वाटू शकतो. मग?===
इन एनी केस, ठराविक सर्टिफिकेट न मिळणे हा अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर घाला कसा? उगाच कै च्या कै!
मुद्दा काहीसा असा आहे -
- अनुराग कश्यपच्या मते रिव्हायजिंग कमिटीचा आग्रह अवाजवी असू शकतो.
- तरीही, निर्मात्यांच्या गुंतवणुकीचा आणि पब्लिसिटीवर झालेल्या खर्चाचा वगैरे आदर ठेवत त्यानं ती तडजोड मनाविरुद्ध स्वीकारलेली असू शकते.
- अशा अनेक तडजोडी आपल्या कारकीर्दीदरम्यान त्यानं स्वीकारलेल्या असू शकतील.
- अखेर, उंटाच्या पाठीवरच्या शेवटच्या काडीप्रमाणे त्याला आता हे सततचं तडजोडी करणं आणि त्यातून येणारं फ्रस्ट्रेशन नकोसं झालं असेल.
- म्हणून अखेर तो म्हणाला, आता बास!
त्या परिस्थितीत तू असतास, तर तुला इतकं फ्रस्ट्रेशन कदाचित आलंही नसतं. पण इतर कुणाला येऊ शकतं. विशेषतः 'सत्या'सारख्या चित्रपटापासून (१९९८) भारतीय चित्रपटसृष्टीची रूढ चाकोरी सोडून चित्रपट माध्यमात काही महत्त्वाचे आणि ऐतिहासिक बदल घडवून आणण्यात अग्रगण्य असलेल्या एखाद्या व्यक्तीला व्यवस्थेशी झगडत राहण्याचा कधी तरी कंटाळा येऊ शकतो ही गोष्ट समजून घ्यायला इतकी अवघड आहे का?
बरोबर आहे, उद्या टाटा,
बरोबर आहे, उद्या टाटा, अंबानी, मूर्ती एकत्रित भारत सोडून गेले तरी आपण समजून घ्यायला हवं. हे सगळं त्यांना देखिल लागू आहे.
--------------------------------------------------------
फक्त जाता जाता भारतीय ग्राहक आमचे सामान विकत घेत नाहीत, फॅक्टरी फोडून चोरून घेऊन जातात असल्या काहीही बोंबा ठोकू नका इतका मुद्दा आहे.
जाऊदे हो त्याला काय म्हणायचे
जाऊदे हो त्याला काय म्हणायचे ते म्हणून. कोणतीही व्यक्ती अपयश किंवा तत्सम वेदनेच्या प्रसंगावर काहीतरी प्रतिक्रिया देतेच, आणि अनेक घटकांना दोष देण्याचा नैसर्गिक भाग त्यात आलाच. रेझिग्नेटरी अप्रोच हाही यातलाच एक भाग.
"पहुंचना कॉलेज हमेशा लेट
वो कहेना सर का 'गेट आउट फ्रॉम द क्लास'
वो बाहर जाके हमेशा कहेना 'यहां का सिस्टीम ही है खराब'"
आपणही अनेकदा असं करतो रिअॅक्टिव्ह मोडमधे, तात्कालिक.
अशावेळी मनुष्य जितके जास्त बोलतो तितकं त्याचं साधासुधा नॉर्मल "माणूस" असणं आपोआप बाहेर येतं.
यात न समजण्यासारखं काही
यात न समजण्यासारखं काही नाही.
मात्र, त्याने देश सोडून जायचे कारण अभिव्यक्तीस्वातंत्र्य नाही असे म्हटले आहे. त्याला कराव्या लागलेल्या तडजोडी ही त्याच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची मायामल्ली आहे का हा प्रश्न आहे? आणि वर दिलेल्या कित्येक उदाहरणांतून त्याच्या वैयक्तिक योग्य/अयोग्य मतांमुळे त्याला त्रास झाल्याचे दिसते त्यात (नो स्मोकिंगची पाटी वगैरे) त्याच्या अभिव्यक्तीवर मर्यादा आलेली दिसत नाही - जिथे अभिव्यक्तीवर मर्यादा आली आहे (जसे डायलॉग्ज्/किसिंग सीन्स कापणे) त्याने आर्थिक कारणांसाठी/ हवे ते सर्टिफिकेट मिळवण्यासाठी स्वतःच ती तडजोड केली आहे.
तेव्हा देश सोडून जाताना चुकीची कारणे देऊ नयेत इतकेच म्हणणे आहे किंवा मग कुठे मर्यादा आलीये ते तरी दाखवावे, असो मोघम गोलगोल बोलू नये!
तडजोड म्हणजे काय?
>> त्याला कराव्या लागलेल्या तडजोडी ही त्याच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याची मायामल्ली आहे का हा प्रश्न आहे? आणि वर दिलेल्या कित्येक उदाहरणांतून त्याच्या वैयक्तिक योग्य/अयोग्य मतांमुळे त्याला त्रास झाल्याचे दिसते त्यात (नो स्मोकिंगची पाटी वगैरे) त्याच्या अभिव्यक्तीवर मर्यादा आलेली दिसत नाही - जिथे अभिव्यक्तीवर मर्यादा आली आहे (जसे डायलॉग्ज्/किसिंग सीन्स कापणे) त्याने आर्थिक कारणांसाठी/ हवे ते सर्टिफिकेट मिळवण्यासाठी स्वतःच ती तडजोड केली आहे.
निर्मात्यांचा अडकलेला पैसा, सेन्सॉर बोर्डाचे त्याला जाचक वाटणारे नियम आणि अशा इतर गोष्टींचा विचार करून त्याला जर सातत्यानं आपल्या चित्रपटात मनाविरुद्ध बदल करावे लागत असतील, तर ह्याचा अर्थ आपल्या चित्रपटांमध्ये आपल्याला हवं तसं आपल्या मनानुसार त्याला व्यक्त होता येतंय की नाही?
निर्मात्यांचा अडकलेला पैसा,
निर्मात्यांचा अडकलेला पैसा, सेन्सॉर बोर्डाचे त्याला जाचक वाटणारे नियम आणि अशा इतर गोष्टींचा विचार करून त्याला जर सातत्यानं आपल्या चित्रपटात मनाविरुद्ध बदल करावे लागत असतील, तर ह्याचा अर्थ आपल्या चित्रपटांमध्ये आपल्याला हवं तसं आपल्या मनानुसार त्याला व्यक्त होता येतंय की नाही?
पण त्याच्याकडे अन्य पर्याय असतानाही (A सर्टिफिकेट स्वीकारण्याचा) ती मर्यादा आर्थिक लाभाकडे बघुन तो स्वतः घालून घेतोय - त्यावर जबरदस्ती होत नाहीये!
ज्या बाबतीत जबरदस्ती होतेय (स्मोकिंग बद्दलची सुचना) त्याचा नी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा नीटसा संबंध मला तरी समजलेला नाही
=========
एक उदाहरण देतो. मला एक खेळणं विकायचंय. कंट्रोलिंग अथॉरीटी सांगते त्याचं टोक लहान मुलांना लागण्याचा संभव आहे तेव्हा हे खेळणे "५ वर्षांवरील मुलांना देणे अधिक श्रेयस्कर" अशी सुचना पॅकिंगवर लिहिणे अनिवार्य आहे तसे लिहायचे नसेल तर या डिझाईनमधून हा टोकदार भाग काढा, नाहितर सुचना लिहा. माझ्या मते ३ वर्षाच्या मुलांना बर्यापैकी हॅण्ड आय को-ऑर्डिनेशन असल्याने तसे लिहिण्याची आवश्यकता नाही. मात्र जर ५ वर्षांचा नियम आहे नि मला ते प्रोडक्ट 'सार्वजनिक'रित्या विकायचे आहे तर मला तो पाळायला हवा आणि त्याच बरोबर इतरही खेळणी उत्पादकांना एकत्र करून तो नियम बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत (हे एकट्याचे काम नाही). पण हे काही योग्य नाही माझ्या मताप्रमाणे नियम नाहीत ही माझ्या खेळणी डिझाईन करण्याच्या हक्काची पायामल्ली आहे मी चाललो देश सोडून" असे म्हटले तर काय म्हणावे?
जबरदस्ती
>> ती मर्यादा आर्थिक लाभाकडे बघुन तो स्वतः घालून घेतोय - त्यावर जबरदस्ती होत नाहीये!
आर्थिक लाभाचा मुद्दा त्याच्यापेक्षा निर्मात्याला अधिक लागू होतो. म्हणून त्याला इतरांसाठी आपल्या मनाविरुद्ध तडजोडी कराव्या लागताहेत असं मी पुन्हा पुन्हा म्हणतोय.
>> माझ्या मताप्रमाणे नियम नाहीत ही माझ्या खेळणी डिझाईन करण्याच्या हक्काची पायामल्ली आहे मी चाललो देश सोडून" असे म्हटले तर काय म्हणावे?
ह्याआधी तो झगडला आहेही. त्यामुळे नियम बदलण्यासाठी त्यानं अजिबातच हातपाय हलवले नाहीत असं नाही.
'पाँच'चा झगडा (२००१)
Anurag Kashyap: Will fight with the Censor board till the end (२०१३)
करतोय, त्या दृष्टीनेही
करतोय, त्या दृष्टीनेही प्रयत्न करतोय तो. भारी स्क्रिप्ट आणि भारी सिनेमांचं दिग्दर्शन या जोडीने अनुराग कश्यपचं अजून एक महत्वाचं योगदान म्हणजे चांगल्या दिग्दर्शकांना पाठबळ देउन त्यांचे सिनेमे निर्माण करणं. 'फँटम' ही त्याने एक दोन पार्टनर्स बरोबर सुरु केलेली संस्था हे काम करते (आणि उत्तम करते). या सिनेमाचं बजेट १०० कोटींच्या आसपास होतं म्हणून दुसरा फायनान्सर होता बहुदा.
फँटम चालूच रहाणार आहे. फँटमने
फँटम चालूच रहाणार आहे.
फँटमने प्रोड्युस केलेले सिनेमे हे आहेत.
2013 Lootera Vikramaditya Motwane Ranveer Singh, Sonakshi Sinha
2014 Hasee Toh Phasee Vinil Mathew Parineeti Chopra, Sidharth Malhotra, Adah Sharma
2014 Queen Vikas Bahl Kangana Ranaut, Rajkummar Rao, Lisa Haydon
2014 Ugly Anurag Kashyap Rahul Bhat, Ronit Roy, Girish Kulkarni, Siddhanth Kapoor, Tejaswini Kolhapure, Vineet Kumar Singh, Vipin Sharma, Surveen Chawla
2015 NH10 Navdeep Singh Anushka Sharma, Neil Bhoopalam
2015 Hunterrr Harshavardhan Kulkarni Gulshan Devaiah, Radhika Apte
2015 Bombay Velvet Anurag Kashyap Ranbir Kapoor, Anushka Sharma, Kay Kay Menon, Karan Johar, Raveena Tandon
यशिवाय अनुराग कश्यपने वैयक्तिक प्रोडुस केलेले सिनेमे इथे सापडतील.
http://en.wikipedia.org/wiki/Anurag_Kashyap_filmography
फँटम चालूच रहाणार आहे. फँटम
फँटम चालूच रहाणार आहे.
फँटम तर बॉलिवूडसाठी फिल्म्स बनवते..
हे महाशय स्वतः बॉलिवूड सोडून जाणार, फँटम चालूच रहाणार, चित्रपटही बनवणार?
मग बॉलिवूड सोडून जाणार म्हणजे नक्की काय करणार?
स्वतः चित्रपट नाही बनवणार का?
अच्छा! फक्त भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या जाचक वगैरे नियमांखाली नव्या/इतर गुणी दिग्दर्शकांच्या अभिव्यक्तीवर मुरड घालण्यासाठी ही संस्था चालु रहाणार आहे काय!
असो असो!
???
>> फँटम तर बॉलिवूडसाठी फिल्म्स बनवते..
हे महाशय स्वतः बॉलिवूड सोडून जाणार, फँटम चालूच रहाणार, चित्रपटही बनवणार?
मग बॉलिवूड सोडून जाणार म्हणजे नक्की काय करणार?स्वतः चित्रपट नाही बनवणार का?
अच्छा! फक्त भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या जाचक वगैरे नियमांखाली नव्या/इतर गुणी दिग्दर्शकांच्या अभिव्यक्तीवर मुरड घालण्यासाठी ही संस्था चालु रहाणार आहे काय!
इथे दिलेल्या माहितीनुसार ती एकचालकानुवर्ती संस्था नाही. मग एका व्यक्तीच्या जाण्यामुळे ती ठप्प व्हावी अशी अपेक्षा का ते समजलं नाही.
बरोबरे. अशा हिशेबानं क्राईम
बरोबरे. अशा हिशेबानं क्राईम न्यूज सुद्धा बॅन केली पाहिजे. "तीन जणांनी एका निर्बल स्त्रीवर बलात्कार करण्याचा महान पराक्रम केला" असली काय बातमी द्यायची पद्धत झाली? तिथे पण वॉर्निंग पाहिजे.
============================================================================
अॅनि वे, ज्या लोकांना "वाईट गोष्टी" नि "न्यूरॉलॉजिकली अॅडिक्टीव वाईट गोष्टी" मधला फरकच पाहायचा नाही त्यांना काय बोलावे?
उगी उगी
. अशा हिशेबानं क्राईम न्यूज सुद्धा बॅन केली पाहिजे. "तीन जणांनी एका निर्बल स्त्रीवर बलात्कार करण्याचा महान पराक्रम केला" असली काय बातमी द्यायची पद्धत झाली
बातमी आणि सिनेमातला फरक जरा समजावून घ्या हो आधी. नाही सिनेमा पाहून त्या बातम्याच आहेत का काय असा गैरसमज तुमचा होत असावा, म्हणूनच भलतेसलते दावे तुम्ही सतत करत असता.
हैदोस दुलाबे धुला
ओके. मला कल्पना नाही की इथल्या किती जणांनी अनुराग कश्यपचे चित्रपट पाहिले आहेत आणि त्यामागची पार्श्वभूमी कितींना माहिती आहे.
(माहिती थोडीफार इथे तिथे असू शकते, पण चू.भू.)
सुरूवात -२००१.
तर पाच- हा रिलीज करू दिला नव्हता, तेव्हा सेन्सॉर बोर्डाने अडवला होता, फारच हिंसा वगैरे कारणं सांगून.
अजूनही टूटू शर्मा नामक निर्मात्याने तो रिलीज होऊ दिला नाही.
त्यानंतर ब्लॅक फ्रायडे - १९९३ चे बॉंबस्फोट अतिशय तपशीलवार चित्रित करणारा, जवळपास डॉक्युमेंटरी म्हणता येईल असा चित्रपट. हाही रिलिज होऊ दिला गेला नाही. जवळपास ३ वर्षांनंतर रिलीज झाला.
मग ह्या सगळ्यावर सूड (प्रेक्षकांवरही) म्हणून बनवलेला नो स्मोकिंग. केवळ चित्रपट रिलिज झालेला बघता यावा, ह्या अपेक्षेने बनवला असावा, एरवी स्टार लोकांना घ्यायची काय गरज म्हणा!
साल -२००७.
इथवर डिप्रेशन, व्यसनं आणखी बरेचसे प्रॉब्लेम्स ह्या सगळ्यातून अनुराग कश्यप गेला होता. एकही चित्रपट रिलिज न होणं असला धब्बा बसलेला दिग्दर्शक, तेव्हा करीअर म्हणून काय घंटा दिग्दर्शन करणार?
मग शेवटी देव डी, गुलाल च्या रूपाने जवळपास ६ वर्षांनी २ चित्रपट रिलिज झाले. पुढची गोष्ट सर्वज्ञात आहे. नसली, तरी फार फरक पडत नाही. अनुराग कश्यपचे चित्रपट प्रसिद्ध झालेत.
आता-
पाच किंवा ब्लॅक फ्रायडे हे उत्तम चित्रपट म्हणून गणले जातात. त्यात काही आक्षेपार्ह आहे असं आज कुणालाच वाटत नाही.
तेव्हा उत्तम चित्रपट लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, अकारण १० वर्षं रक्त आटवावं लागत असेल, तर त्याने ते का करावं? आणि इतर पर्याय उपलब्ध असताना कशासाठी करावं? उगाच !
बरं, तो त्याच्या पैशांनी न्यूझिलंडला जाऊन झक मारील किंवा टिंबक्टूला जाऊन लंगडी खेळील, कुणाला काय फरक पडतो?
================================
एका आय.टी इंजिनेराला machine learning किंवा तत्सम cutting edge (म्हणे!) तंत्रज्ञानावर काम करायला भारतात पुरेशी संधी भारतात मिळत नाही म्हणून तो परदेशात कुठल्याशा ठिकाणी जाऊन काम करतो - ऑल ओके. कूल.
एका चित्रपट दिग्दर्शकाला हवा तसा चित्रपट बनवता येत नाही म्हणून तो परदेशात कुठेशी जाऊन तिथे चित्रपट बनवतो - पब्लिक हंगामा! What a lol.
================================
अवांतर -कश्यप, कौशिक मुखर्जी आणि प्रसून जोशी ह्यांची चर्चा इथे पहा-https://www.youtube.com/watch?v=gu8YFsEmzoU
त्यात काय चित्रपट आपल्याला बनवता येतात, कुठले विषय taboo आहेत ह्यावर झकास चर्चा आहे.
जाऊ दे. परत एकदा देव डी बघितला की बरं वाटेल, काय?
पाच किंवा ब्लॅक फ्रायडे हे
पाच किंवा ब्लॅक फ्रायडे हे उत्तम चित्रपट म्हणून गणले जातात. त्यात काही आक्षेपार्ह आहे असं आज कुणालाच वाटत नाही.
तेव्हा उत्तम चित्रपट लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, अकारण १० वर्षं रक्त आटवावं लागत असेल, तर त्याने ते का करावं?
बॅन होणारा प्रत्येक चित्रपट तो "असत्य" आहे म्हणून होत नाही. म्हणजे सगळं काही खरं खरं असताना देखिल कधी कधी चित्रपट बॅन करावा लागतो. गुणी निर्माते आणि गुणी रसिक (शब्दसौजन्य - अदिती) इतकं जग लहान नसतं. शीखांचा अजून गुरु दाखवला, स्वतःला देव दाखवलं, कुराण वाचताना हिंदू प्रेमिकाने बोलावले म्हणून ते तस्सेच ठेऊन पळणे, एका चित्रपटात(सरफरोशमधे) दुष्ट पाकी मुस्लिम गायकाला मारलेले असूनही इतरत्र (पीकेमधे) फक्त एकाच धर्मावर टिका करणे, सिनेमातच एका धर्माच्या माणसाने दुसर्या धर्मात जास्त रस घेणे, इ इ स्फोट, पंगा होण्यासाठी बरेचदा पुरेसं ठरलं आहे.
सेन्सॉर बोर्डाला असं फालतूचं लफडं, दोन कम्यूनिटींतील तणाव इ इ वाढवणार्या घटना नको असतात.
गुणी निर्माते आणि गुणी रसिक यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यापेक्षा असा तणाव नसणं जास्त महत्त्वाचं. (तरी पोलिस लावून सिनेमा रिलिज करायचे प्रकार झालेत. पण शक्यतो टाळतात. परिस्थिती पाहून काही राज्यांत बॅन करतात.) And that makes sense.
आता चित्रपट रिलिज होण्याआधी नक्की काय हंगामा होइल याचा अंदाज प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. कधी कधी तो चुकतो. उदाहरणार्थ बाबरी मजिदिच्या निकालाच्या वेळेस अख्ख्या भारतात पोलिस, इतर फोर्सेस तैनात (हाय अलर्ट) केलेली, काय काय उपाय केलेले!!! सरकारला वाटलं १९९२ सारखा हंगामा होईल. पण काहीच झालं नाही. पोलिस काढल्यावरही काही झालं नाही.
कश्यप साहेब, सत्य जशास तसे मांडू पाहतात. अर्थातच रसिकांना नि समीक्षकांना ते भावते. पण ... काहींना ते रुचणार नाही ... आणि हंगामा होईल ...असे तेव्हा बोर्डाला वाटले असेल.
पण ही त्याने निवडलेल्या नीश मार्केटची रिस्क आहे बॉस. He has to live with it.
=================================================================================================================
एका चित्रपट दिग्दर्शकाला हवा तसा चित्रपट बनवता येत नाही म्हणून तो परदेशात कुठेशी जाऊन तिथे चित्रपट बनवतो - पब्लिक हंगामा! What a lol.
इश्श्यू जाण्याचा नाही. कोणीही जिथे धंदा जिथे नीट, जास्त, डोके न खाता चालतो तिथे जावे. यात दुमत नाही.
हंगामा आहे असं म्हणण्याबद्दल कि
इथली सिस्टीम फेल आहे.
असं नाही. It has its own considerations.
कश्यपला, किंवा एकट्या कश्यपला छळून, कोणाला काय मिळणार आहे?
वैज्ञानिक कम्यूनिटीने मॅगी
वैज्ञानिक कम्यूनिटीने मॅगी अॅडिक्टीव आहे म्हटले तर वॉर्निंग द्यायला हवी.
सिगारेटची वॉर्निंग ही
१. ती फक्त हार्मफूल आहे म्हणून(च) नै देत. ती अॅडिक्टीव आहे म्हणून देतात.
२. ही कृती कदाचित व्हिलन करत नाही आणि हिरो करतो असं देखिल सिनेमात असू शकतं. प्रचंड गैरसमज व्हायची शक्यता आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------
आणि वॉर्निंग ही मॅगीबद्दल नसून तिच्यातल्या पीबी कंटेंट बद्दल आहे. नैतर साले लोक शेवाया खायचं बंद करतील.
मुटके साहेब, असे गुणी लोक
मुटके साहेब, असे गुणी लोक देशातच राहावेत आणि त्यांचे हस्ते भरीव कार्य व्हावे असेच रेसिडेंट भारतीय (आय होप हे रेसिडेंट भारतीय प्रकरण ऐसीवर अल्पसंख्यांक वैगेरे नाही.) म्हणून वाटते. ते त्याचं फ्रस्टेशन असावं, त्याचा सेंसॉर बोर्डावर इष्ट परिणाम व्हावा आणि असा निरोप, फोन कधी न येओ अशी इच्छा करू यात.
राकट हात आणि उन्नत उरोजांनी ?
In reply to का हो प्रभाव नाही टाकत by गवि
वाक्यातील फक्त ५०% वर्णनाने प्रभाव टाकला असावा.