Skip to main content

अलीकडे काय पाहिलेत? - २

यूट्यूब, नेटफ्लिक्स आणि अशाच अनेक ठिकाणी देशोदेशींच्या बघण्याजोग्या चित्रपटांचे खजिने उपलब्ध होऊ लागले आहेत आणि - विशेषतः यूट्यूबवर - ते सर्व विनामूल्य वा कधीकधी अल्प मूल्याने पाहण्यास उपलब्ध असतात. अशा चित्रपटांविषयी माहितीची देवाणघेवाण करता यावी असा हा धागा सुरू करण्यामागचा हेतु आहे.

सर्वप्रथम दोन चित्रपटांची येथे माहिती देतो. पहिला चित्रपट पाकिस्तानी (उर्दू भाषेत) असून त्याचे नाव आहे 'बोल'. कालबाह्य सामाजिक निर्बंधांमुळे आणि पुरुषप्रधान विचारांच्या वरचष्म्याखाली एका कुटुंबाची झालेली वाताहत हा चित्रपटाचा विषय आहे. पाकिस्तानी नजरेतून पाकिस्तानी समाजाचे चित्रण हेहि एक आकर्षण आहेच. हा चित्रपट http://www.youtube.com/watch?v=gTlLCmZfwWY येथे पाहता येईल.

दुसरा चित्रपट 'The Stoning of Soraya M.' अशा नावाचा इराणी चित्रपट आहे. भाषा फारसी असून इंग्रजी सबटायटल्स आहेत. स्वत:चा हेतु साध्य करण्यासाठी नवरा बायकोकडून तलाक मागतो आणि तिने नकार दिल्यावर गावातील अन्य पुरुषी विचाराचे लोक आणि मुल्ला ह्यांच्या मदतीने तिच्याविरुद्ध खोटे कुभांड रचून दगडांनी मारून टाकण्याच्या शिक्षेपर्यंत तिला पोहोचवितो असे हे कथानक आहे. यूट्यूबवर http://www.youtube.com/watch?v=Q58nLi5eA-I येथे पाहता येईल.

संपादकः अलिकडे काय पाह्यलंत - १ इथे वाचता येईल

सन्जोप राव Tue, 10/04/2012 - 06:08

ब्योमकेश बक्षीच्या एपिसोडसचा खजिना नुकताच यूट्यूबवर गावला आहे. तो उतरवून घेऊन एकेक एपिसोड चघळत चघळत मजेने बघतो आहे...

सागर Tue, 10/04/2012 - 12:46

In reply to by सन्जोप राव

उत्तम माहिती सन्जोपराव, धन्यवाद

व्योमकेश बक्षी मी पण तुनळीवरुन उतरवून घेईन. :)

अलिकडेच व्योमकेश बक्षी रहस्यकथा ३ पुस्तकांच्या संचाच्या माध्यमातून प्रकाशित झालाय.
फ्लिपकार्टवर फ्री शिपिंगसकट किंमत वाजवी आहे : हा पहा दुवा

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/04/2012 - 06:56

In reply to by सन्जोप राव

लिंक प्लीज?

गेल्या आठवड्यात शेवटी 'साऊंड ऑफ म्युझिक' पाहिला. त्याबद्दल मी काय लिहायचं?

मी Wed, 11/04/2012 - 10:43

"मनोरमा, सिक्स फिट अंडर" पाहिला, चित्रपट बरा आहे, अभय देओल ठीक, गुल पनागला वाया घालवले आहे, बर्‍यापैकी स्लो आहे.

रमताराम Wed, 11/04/2012 - 20:00

युरपियन फिल्म फेस्टिवल मधे 'अ टच ऑफ स्पाईस' नावाचा नितांतसुंदर ग्रीक चित्रपट पाहिला. आजोबा नि नातवाचे हृद्य नाते Culinary art च्या माध्यमातून फुलत गेलेले. आजोबाचा तो वारसा घेऊन पुढे जाणारा नातू, राजकीय भौगोलिक परिस्थितीच्या रेट्यामुळे विविध प्रकारच्या नातेसंबंधावर आलेला ताण, त्याचा त्या नातवाच्या जीवनपद्धतीवर झालेला परिणाम नि अखेर स्वैपाकामधे योग्य ते मसाले वापरण्यात तज्ञ झालेल्या त्या नातवाने आयुष्यातील हरवलेल्या, फिकट झालेल्या 'स्पाईसेस' कडे परतण्याचा केलेला प्रयत्न नि त्यातून तयार झालेली अ टच ऑफ स्पाईस नावाची कलाकृती. राजकीय भौगोलिक वळणे, नातेसंबंध नि Culinary art यांची अतिशय सुरेख गुंफण केलेला चित्रपट. अवश्य पहावा असा.

अनामिक Thu, 12/04/2012 - 18:51

'अ पेक ऑन द चीक' नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. मूळ तमीळ चित्रपटाला सबटायटल्स आहेत. जरूर बघा असे म्हणतो.