Skip to main content

राजीव साने यांचे वसंत व्याख्यानमालेतले व्याख्यान

राजीव साने यांच्या व्याख्यानावरील चर्चा खालील धाग्यातून वेगळी काढत आहोत. - संपादक
http://aisiakshare.com/node/3861#comment-100176
.
.
दिनांक १ मे .वसंत व्यख्यानमाला. साडेसहाची वेळ. टिळक स्मारक मंदिर. वक्ते राजीव साने.
त्यांची काही पुस्तकं गाजलित; काही पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कारही आहे.
मला त्यांचं लोकसत्तेतलं 'गल्लत गफलत फजहब ' हे सदर आवडलं. तार्किक मांडणी आवडली.
ऐसीवरील गब्बरसिंगचे विचार खूप सौम्य, अळणी केल्यास व भारतातल्या व्यावहारिकतेचा विचार केल्यावर
जे काही उरेल, ते म्हणजे राजीव सान्यांचं लेखन. 'आधुनिकता व भारत' हा विषय.
कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी पाच दहा मिनिटं नजर फिरवली. सभागृह अर्ध्याहून थोडं जास्त भरलं असावं.
ज्येष्ठ नागरिकांचा भरणा अधिक. तरुण थोडेच.(फार तर गर्दीपैकी वीसेक टक्केच.)
आख्ख्या सभाग्रुहात मिळून उपस्थित स्त्रिया आठ दहा असाव्यात. त्याही जवळपास सर्वच मध्यमवयीन किंवा सिनिअर सिटिझन गटातल्या.
ब्राम्हणी हौस असेल भाषणाची; असं मला वाटलं आधी; पण उपस्थितांत माझ्या समोरच्या एक दोन रांगांत ग्रामीण वेशभूषा व बोलणं( गावंढळ, खेडवळ, खेडूत म्हणता येतील तसे) असणारे बर्रेच जण होते. अर्थात भाषणाच्या शेवटी आम्ही वक्त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी मुद्दे चांगले उपस्थित केले.
शुद्ध उच्चारी लोकं मात्र तर्कात गंडले होते अध्यात्माच्या प्रेमामुळं.
असो.
.
.
मुद्दे मला आठवतील तसे लिहितोय. व्याख्यान ऐकून चोवीसहून अधिक तास झालेत.
किती,कसं , काय आठवेल ठाउक नाही. किती नेमकं समजलय ठाउक नाही; पण प्रयत्न करतो.
मला मुद्दे इंटरेस्टिम्ग वाटले.
.
.

  1. आधुनिक समाजात vertical mobility असते. खालच्या स्तरातल्या व्यक्तीला कष्ट करुन वरच्या स्तरात जायची अधिक संधी असते. सैद्धांतिकदष्ट्यातरी ते पूर्णतः मान्यच आहे. व्यवहारातही आधुनिक व्यवस्था ते अधिकाधिक आणू पाहते. पारंपरिक व्यवस्थेत जन्मजात भूमिका ही अंतिम असल्यासारखीच होती. किंबहुना एखाद्या व्यक्तीचा जन्म ते मृत्यू ह्यादरम्यान त्याने काय करायचे हे निश्चित केलेले असे. vertical mobility चा फरसा स्कोप नाही. एका अर्थानं ह्यामुळेच बेरोजगारी ही नसल्यासारखीच होती. वर्षभरात खूप काही काम नसले तरी एक ठराविक असा उत्पन्नाचा वाटा- बलुतं उपलब्ध असे.
  2. आधुनिक काळाचे अजून एक लक्षण म्हणजे अनोळखी लोकांशी अधिक प्रमाणात केले जाणारे व्यवहार. गावापेक्षा शहर मोठं असणार. उत्पादकता, ग्राहक वर्ग अधिक असणार. कोण कुठून येणार, कुठून खरेदी करणार; काही साम्गता येणार नाही. ह्याऐवजी पूर्वी परिचयातील व्यक्तीकडूनच खरेदी होइ. एका गावातील सर्वच व्यक्ती एकमेकांना ओळखत, ठराविक काम ठराविक लोकच करत. मला शेजारच्या गावातील एखादा कारागीर अधिक उत्तम काम करतो असे वाटले तरी मी शक्यतो त्याला बोलावत नसे. एकत्रित कुतुंबप्द्धती काय किम्वा ग्रामव्यवस्था काय, ही पूर्ण सिस्टिम एक इन्शुरन्स प्रॉडक्ट असल्यासारखी होती. तुम्ही अडीअडचणीत असाल तर तुम्हाला इतर कुणी मदत करेल; कुणी पुण्या,धर्मादाय कार्य म्हणून करेल. उद्या त्याच्यावर वाईट वेळ आली, तर तुम्ही मदत करणे अपेक्षित असे. पण हे सर्व लिखित अशा रुपात नव्हते. ठळक, औपचारिक असे इन्शुरन्सचे रुप त्यास नव्हते. त्यात एक अनौपचारिकता होती; कायदेशीर बंधन नव्हते. अध्याह्रुत अपेक्षा होती परस्पर सहकार्याची. आणि ह्या अपेक्षेवर खूपदा कामे होउनही जात असत कारण-- सर्वच माणसे परिचयातली!
  3. आधुनिक व्यवस्था व आधुनिक पूर्व (म्हंजे मध्ययुगापर्यंंतची ) व्यवस्था ह्यात अजून एक प्रमुख फरक म्हणजे व्यवस्थेचा समाजकेम्द्रित असण्याकडून व्यक्तिकेंद्रित होण्याकडे झालेला प्रवास. (ह्याबद्दल किमान ऐसीवर तरी अधिक काही लिहायची गरज नसावी. गरज वाटलीच, तर गब्बरला हाक मारावी, तो नक्कीच मदत करेल अशी आशा वाटते.)
  4. आधुनिक काळ म्हणजे लोकशाही. लोकशाही इतरही महत्वाची लक्षणे आहेत. काटेकोर व्याख्या आहेत; पण "आधुनिकता" ह्या संदर्भात पहायचे झाले तर महत्वाचे लक्षण म्हणजे लोकशाहीत विरोध इज नॉट इक्वल टू द्रोह. विरोध म्हणजे वैर नव्हे.
    हे मान्य होणे; त्यावर व्यवस्था चालणे हे खरोखर कौतुकास्पद व अधिक प्रगल्भ असन्याचे लक्षण आहे.
  5. मध्ययुगापासून आधुनिकतेकडे होणारा प्रवास irreversible आहे. अटळ आहे. पुन्हा परतवून लावण्यासारखा नाही.
    आपण सर्वच आधुनिक व्यवस्थेचा पुरेपूर(किंवा जमेल तितका) लाभ घेतो.
    पण खूपदा मनात कुठेतरी आधुनिक पूर्व व्यवस्थेबद्दल एक जबरदस्त आकर्षण असते; तो आपल्या मनातला जणू एक युटोपिया असतो.
    'प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट' अशी ती स्थिती असते. आपण त्याबद्दल फॅण्टसाइझ करत असतो.
    प्रत्यक्षात मात्र आपलं संपूर्ण जीवन हे नव्या व्यवस्थेतलच असतं.
    कुणीही व्यक्ती नव्या व्यवस्थेशी कधी जोडली जाते ? ती शिशु असताना पहिल्यांदा लस घेते; तेव्हापासूनच.
    साधा विचार करुन पहा. पेनकिलर अस्तित्वातच नाहित. तुमचा दात दुखतो आहे. कसं जगाल ?
    जीवनाचा काय दर्जा राहिल ? आपलं जीवन ह्याकाळात बरच सुसह्य झालेलं आहे; पण हे आपल्याच्यानं स्पष्ट, थेट मान्य होत नाही!
    मानवी मन मोठं गंमतीदार्/गुंतागुंतीचं आहे.
  6. मात्र तरीही मोठमोथ्या लोकांनाही जुन्या काळानं बरीच भुरळ घातलेली आहे. गांधींनी 'हिंदस्वराज' ह्या नियतकालिकात
    काही अशीच चमत्कारिक, विज्ञान विरोधी विधानं केलित.(सानेंनी उदाहरणं दिली, पण सध्या आठवत नाहियेत.)
    टिळकांनी 'संमतीवयाच्या कायद्या'ला विरोध केला. बालविवाहाचं एकप्रकारे समर्थन केलं. कारण काय ?
    तर 'ब्रिटिशांनी आमच्यात ढवळाढवळ करु नये. आम्हालाही चांगले-वाईट काय ते समजते. आम्ही काय ते करु'.
    नेमाडेंनी 'हिंदू-जगण्याची एक समृद्ध अडगळ' मध्येही मध्ययुगातलं क्रौर्य वगैरे रेखाटलय; पण पुन्हा ते सगळ्म सांगून
    झाल्यावर त्याबद्दल एक सुप्त आकर्षणही मांडलय. 'कोसला' लिहिणारे नेमाडेच स्वतः 'शामची आई' ही मराठीतली थोर कादंबरी
    आहे असं म्हणतात तेव्हा आश्चर्य वाटतं. श्यामची आई ही कथा श्यामच्या बापाच्या नजरेतून पहा. एका अपयशी, कर्तव्य न केलेल्या
    मानसाची व पर्यायाने त्याच्यामुळे कुटुंबाची जी परवड झाली, त्याची कहाणी आहे. खोत असणे ; हे श्यामच्याअ बाबांचं काम. खोत बनून,
    चाम्गली बक्कळ वसुली त्यानं करायला हवी. किंवा ते करवत नसल्यास इतर काही मार्गाने चांगले अर्थार्जन करावे. तेही हा इसम करत नाही.
    आणि ह्या असल्या घराचं, वातावरनाचं गौरवीकरण कसलं करताय ?
    त्याकाळात कामगारांना ठराविक आठवडी सुटी नव्हती.(ह्यावर आज विश्वास बसणं कठीण आहे; पण असं होतं खरं.)
    कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुटी मिळावी म्हणून जे आंदोलन सुरु होतं; त्यालाही टिळकांनी विरोध केला.
    प्रमुख कारण काय , तर सुटीचा दिवस रविवार--ख्रिश्चनांसाठीच काय तो सोयीचा असणार होता म्हणून.
    म्हणून सुटी नाही मिळाली तरी चालेल; प्ण ख्रिश्चनांच्या दिवशी कशाला घ्यावी, अशी टिळकांची भूमिका.
    एतद्देशीयांसाठी रविवारचे कुठे काय महत्व ? असा त्यांचा सवाल. पण नारायण मेघाजी लोखंडे ह्या ग्रेट्ट कामगार
    नेत्यानं ह्यातून एक मार्ग काढला. आम्हा (तत्कालीन) कामगार मंडळींपैकी बहुतेकांचं दैवत खंडोबा आहे;
    खंदोबाचा वार रविवार आहे; म्हणून रविवारीच सुटी देणं समर्थनीय आहे; असा त्यांनी युक्तीवाद केला.
    तो मान्यही झाला.
    ही कामगार मंडळी तीच होती ज्यांनी टिळकांना सतत पाठिंबा दिला; टिळक तुरुंगात गेले तेव्हा ह्यांनी लाक्षणिक संपही केला.
    त्यांच्याबद्दल टिळकांची ही भूमिका!
  7. हे विज्ञान बिज्ञान, आधुन्निक व्यवस्था 'त्यांची' फ्याडं. आपल्याला काय त्याचं. भांडवलशहांनी आणलेलं कैतरी. तिथं आम आदमीला विचारतो कोण, त्याची किंमत कोणाला. ह्या व्यवस्थेत कोनाला काही करण्यासारखं आहे का. असं म्हणत नाकं मुरडत असाल तर ... थांबा. दोन मिनिटं विचार करा.
    तिकडच्या सार्वकालिक थोर व्यक्तींपैकी एक मानला जातो तो फ्यारडे. आज जे इंडस्ट्रियल युग आलय, त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे ह्याचे शोध.
    ह्यानं वीज-चुंबकशक्ती-मेक्यानिकल यम्त्रना ह्यांचं जबरदस्त परस्परांत होणारं रुपांतर अभ्यासलं. आजचा सगळा इंडस्ट्र्यांचा, आपल्या घरात चालनार्या वीज-पंखा-प्रकाश डोलारा त्यावर उभा आहे. असा हा फ्यारडे. ह्याची आर्थिक स्थिती उत्तम म्हणावी अशी नव्हती. तो फार तर पहिली दुसरीपर्य्म्तच शाळेत शिकला असेल.
    नंतर तो चक्क रद्दीत मिळतील ती पुस्तकं उत्सुकता म्हणून वाचू लागला. त्यातून इतका तरबेज झाला. ह्या व्यवस्थेत जो काम करेल, योगदान करण्यास तयार आहे, त्यास नक्कीच संधी आहेत. त्याचप्रमाणे लुई पाश्चर हा 'तिकडचा' की 'इकडचा' ह्यानं नक्की काय फरक पडतो ?
    त्याच्या शोधांचा सगळ्या मानवजातीलाच फायदा होतो आहे ना ?
    त्याच्या कालात त्यालाही बराच त्रास्/विरोध झाला. आधुनिक काळ, व्यवस्था ब्रिटिशांनी आणली म्हणून केवळ ती वाईट असं कसं म्हणायचं मग ?
  8. आधुनिक काळात पेट्ण्ट कायद्याच्या नावाखाली ज्ञानाची मक्तेदारी निर्माण केली जाते आहे; ज्ञानाची फक्त विक्री होत आहे; एकूण समाज म्हणून ते आपनास नुक्सानकारक आहे वगैरे प्रचार केला जातो. पण त्यात खरच तथ्य आहे ? मुळात ज्ञाननिर्मितीसाथी प्रचंड कश्ट घ्यावे लागतात. त्या ज्ञानाची किंमत घेतली जाते म्हनजे त्या ज्ञानाची समाजाला गरज आहे; हेच त्यातून सिद्ध होते. अशा ज्ञाननिर्मितीस उत्तेजन म्हणून पेटण्ट कायदा आहे. शिवाय तुम्ही कोणतेही पेटण्ट अनंत काळ आपल्याकडे ठेवू शकत नाही. पाच-सात वर्षात ते जगाला फुक्कट उपलब्ध होतेच. उलट पेटण्ट कायदा म्हनजे एकप्रकारे पाच-सात वर्षात ज्ञान सर्व जगाला खुले करण्याची सक्तीच आहे. शिवाय तुम्ही पेटण्ट घेतले आणि त्याचा वापर न करता ते तसेच कुजवत ठेवले; तर तेही चालत नाही. ते वापरणे भाग असते कायद्यानुसार. आणि पेटण्टचा तो पिरियद संपल्यावर पहा ना किंमती कशा धडाधड कमी होतात ते.
  9. पेटण्टच्या गाजलेल्या दोन केसेसबाबतही असे बर्रेच गैरसमज आहेत. एक म्हणजे हळदीच्या पेटण्टची कथा.
    तेव्हा दोन भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांनी हळदीचा औषधी गुणधर्म आपणच शोधत असल्याचा दावा केला.
    त्याचे पेटण्ट क्लेम केले. प्रत्यक्षात त्यांचा डोळा अमेरिकन ग्राहकावर होता; ते त्यांच्याकडून बक्कळ पैसा उकळू पाहत होते.
    ह्यातून भारतीय नागरिकांना थेट असा काहिच धोका नव्हता. पण वातावरण मात्र तसे उभे केले गेले.
    पेटण्टवर दावा करु पाहणार्‍यांविरुद्ध माशेलकरांनी केस जिंकली. म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी अमेरिकन ग्राहकांवर अनेकानेक उपकारच केले होते.
    भारतीयांना तसाही त्यातून काहिच धोका नव्हता. पण तसा धोका असल्याचा समज मात्र भारतात पसरला.
  10. पेटण्टची अजून एक गोष्ट म्हणजे बासमती तांडलाच्या तथाकथित पेटण्टची.
    जगभरात भारताचा बासमती हा ब्रॅण्ड बराच फेमस/लोकप्रिय आहे. टेक्सासम्धील अमेरिकन शास्त्रज्ञांनी स्वतंत्रपणे
    एक तांदूळ प्रजाती विकसित केली. जी तिथलीच होती. तीही बासमती सारखीच लांबसडक होती. बर्‍यापैकी चविष्ट होती.
    त्यांनी त्यांच्या त्या नव्या तांदूळ प्रजातीचं नाव 'टेक्समती' ठेवलं. पण अशा 'बासमती'शी साधर्म्य राखणार्‍या नावानं ग्राहकांत संभ्रम होउ शकतो.
    बासमती ब्रांडचे ग्राहक प्रभावित/मिसलीड होउ शकतात म्हणून अशा नावाला बासमतीवाल्यांनी विरोध केला. केसही जिंकले.
    पण म्हणजे काय झालं ? 'टेक्समती'चं उत्पादन वगैरे थांबलं का? त्यावरचा शास्त्रज्ञांचा हक्क गेला का ? तर अजिबात नाही!
    त्यांनी फक्त नाव टेक्समती ऐवजी काहीतरी वेगळं नाव वापरलं. बस्स. इतकच झालं. पण आपल्याकडे मात्र तोवर भलतीच हवा झाली होती.
  11. स्वाध्याय परिवारातील पांडुरम्गशास्त्री आठवले ह्यांनीही अशीच कै च्या कै विधानं केलीत. बालविवाहाचं समर्थन करताना
    "स्त्री वयात येताना पहिला मनात भरलेल्या पुरुषाचे गुणच अपत्यात उतरतात. त्यामुळे लहान वयातच विवाह उरकावा हे उत्तम" अशी भूमिका त्यांनी घेतली.
    आता ह्यात शास्त्रीय तथ्य नाहीच; पण क्षणभर ते आहे असं ग्रुहित धरलं तरी लवकर लग्न केल्यानं इतर कोणता भलताच पुरुष मनात भरनार नाही; ह्याची काय ग्यारंटी; ह्याबद्दल ते काहे बोलत नाहित. आणि शिवाय मनात भरलेला पुरुष खरोखर नेमका भला,सज्जन असेल; तर चांगलय की; अहो आख्खी मानवजात भली,सज्जन, कर्तबगार वगैरे होणार नै का ?
    आठवल्यांची अजून काही अशास्त्रीय विधानं --" ज्याप्रमाणं घोडी -गाधव ह्यांच्या संकरातून खेचर न्निपजतं; जे पुनरुत्पादन करण्यास असमर्थ असतं; त्याचप्रमाणं घोडीचा पुन्हा घोड्याशी संब्म्ध घदला तर त्या घोडा-घोडीच्या संबंधातून निर्मिलेली अपत्येसुद्धा पुनरुत्पादनास असमर्थ असतात ! ह्याचे कारण पूर्व-संस्कार.
    एकदा गाढवाशी संब्म्ध घडला, म्हणजे इथून पुधे घोड्याम्शी संबंध घडला तरी उपयोग नै. पूर्व-स्म्स्कारानं सगळ्याची वाट लावली आहे."
  12. वीज वाईट? औश्णिक वीज नको. फार ग्लोबल वॉर्मिंग होतं. राख वगैरे बनते. मग जलविद्युत ? नै नै , नको. त्यासाठी तर धरणं लागतात. त्यातून सगळं वाटोळं होतं. डिझेल-पेट्रोल नको. ते तर घातक व मर्यादित! आणि अणु ऊर्जा? त्याचे तर नावही काढणे फार मोठे पाप. ते तर फक्त दुरितच आहे.
    वस्तुतः जैतापूरच्या प्रकल्पात इतकं धोकादायक असं काहीहीए नाही. त्या जमिनी तशाही कसल्या जात नव्हत्या. अगदि तिथले सातबारेही अगदि अलिकडेपर्यंत अपडेटेड नव्हते.(राबत्यात नसलेल्या जमिनिकडे कोण कशाल लक्ष देत बसेल ?) पण प्रकल्प बननार म्हटल्यावर लोकांनी धावाधाव करुन सातबारे वगैरे काढले. कंपन्यांना अडवून पाहिलं; चांगली मस्तपैकी डील पदरात पाडून घेतली. इतकं केल्यवर मग निदान प्रोजेक्टतरी सुरु व्हावा ना ? तर तेही नाही. कारण राजकीय विरोध!
    खरं तर जैतापूर प्रकल्प वाजपेयी सरकारच्या काळातच अप्रूव्ह झालेला. त्यावेळी शिवसेनेनंही मान्यता दिलेली.(केंद्र सरकारात तेही मंत्री होते ना.)
    पण आता वेळ बदलली. राजकीय नफे-तोटे व त्याची गणितं बदलली. विरोध सुरु!
    मग महाराष्ट्र वीजेवाचून तडफडला तरी हरकत नाही.
  13. GM बियाणांविरोधात हल्ली बरच बोललं जातय.(ननिंचा धागा 'लढवय्या शेतकरी' आठवतोय ?)
    पण त्यात नेमकं काय वाईट आहे कुणी सांगत नाही. सलग काही दशकं अमेरिकेत वापरात आहेत GM तरी काही झालेले नाही.
    मागील पंधरावर्षापासून खुद्द भारतात GM कापूस वापरतोच की आपण. त्याचं कापड-कापूस नॉर्मलच असतं की. त्याची सरकी निघते , त्या सरकीचं तेल आपण वापरतोच की. शिवाय ती नुसती सरकीसुद्धा कैक लाख पाळीव पशू खातातच की. इतक्या दिवसात काही दिसलय विचित्र ? मग नक्की भीती कशाची आहे ?
    GM ला सर्वात कडादून विरोध आहे ग्रीनपीस ह्या स्म्स्थेचा. ह्या संस्थेला कीटकनाशकांच्या लॉबीचं बक्कळ फंदिंग आहे.
    GM बियाणांत जनुकातच असे काही बदल असतील की कीटकनाशकांची गरज असणार नाही. मग त्यांचं दुकान कसं चालेल ?
    म्हणून मानवतेचं नाव घेउन कंथशोश सुरु आहे.
    "GM कापूस आपण वापरत असलो तरी कापूस उत्पादक आत्महत्या करतोय हे वास्तव आहे " असलं एक आर्ग्युमेंट आहे.
    हे आर्ग्युमेंत तार्किक नाही. आत्महत्या प्रामुख्याने विदर्भात होतात; इतरत्र तितक्या होत नाहित तेच बियाणं वापरुनही.
    कारण आत्महत्यांचं खरं कारण सरकारचं 'कापूस एकाधिकारशाही ' हे जुलमी धोरण आहे; ते बियाणं नव्हे.
  14. स्त्री अधिक वयस्कर पुरुषाला पती म्हणून निवडते ह्यामागे उत्क्रांती आहे.
    'लीथल जीन्स'चं लॉजिक त्यामागं आहे. अधिक सशक्त प्रजा निर्माण होण्याची अधिक शक्यता त्यामागं आहे.
  15. अजूनही दोन चार मुद्दे बाकी आहेत; त्यात भारतीय वृत्तीबद्दल काय दोष वाटतात त्याबद्दल साने बोलले. ते नंतर लिहितो

आदूबाळ Sun, 03/05/2015 - 02:11

बाप्रे, मनोबा! चोवीस तासांनंतर १४-१६ मुद्दे लक्षात राहिलेत! लै भारी.

सारांश आवडला हेवेसांनल.

राही Sun, 03/05/2015 - 20:29

In reply to by आदूबाळ

सान्यांचं भाषण लक्षात ठेवायला कठिण. एकातून एक असे मुद्दे आणि उदाहरणं उलगडत राहातात. ऐकताना भारी वाटतं पण भाषण संपल्यावर नक्की काय काय ऐकलं ते आठवावं लागतं. समांतर (कदाचित असमांतर)उदाहरण कुमार केतकरांचं. त्यांच्या भाषनात प्रचंड माहिती आणि संदर्भ जुन्या चित्रपटातलं एखादं रीळ फास्ट फॉर्वर्ड केल्यासारखे डोळ्यांकानांसमोर धावत असतात. अगदी अंगावर धडाधड कोसळतात. हे सगळे अठरा खंडांतले, अठरा विश्वांतले संदर्भ अतिरोचक असतात, इतके की वक्ता कधीकधी मूळ मुद्द्यावर परततच नाही तरीही आपण विस्मयचकित होऊन गुंगी आल्यासारखे ऐकतच राहातो. सान्यांचं लिखाण मात्र मुद्देसूद असतं.
तशातही बरेचसे मुद्दे लक्षात राहिले हे विशेष.

नगरीनिरंजन Sun, 03/05/2015 - 12:25

मस्त मनोबा! सारांश आवडला! सानेंचे बहुतेक सगळे मुद्दे पटण्यासारखे आहेत. "ज्याप्रमाणे ग्लासातल्या पाण्यातला बर्फ वितळल्याने पाण्याची पातळी वाढत नाही, त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सगळा बर्फ वितळला तरी समुद्रपातळी वाढणार नाही" असं आपल्या "गल्लत गफलत गहजब" सदरातल्या लेखात लिहिणारे हेच ते साने यावर विश्वास बसत नाही.
बाकी जीएमचा आरोग्यावर परिणाम होत नाही हा मुद्दा मान्य केला एकवेळ तरी इतर आक्षेपांवर (बायोडायव्हर्सिटी, कॉर्पोरेट मोनॉपली) काही बोलले का? व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरांसाठी वेळ होता का?

अनुप ढेरे Sun, 03/05/2015 - 16:42

मुद्दा क्र ४ आणि ५ एक्दम रोचक आहेत.

मध्ययुगापासून आधुनिकतेकडे होणारा प्रवास irreversible आहे. अटळ आहे. पुन्हा परतवून लावण्यासारखा नाही.
आपण सर्वच आधुनिक व्यवस्थेचा पुरेपूर(किंवा जमेल तितका) लाभ घेतो.
पण खूपदा मनात कुठेतरी आधुनिक पूर्व व्यवस्थेबद्दल एक जबरदस्त आकर्षण असते; तो आपल्या मनातला जणू एक युटोपिया असतो.
'प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट' अशी ती स्थिती असते. आपण त्याबद्दल फॅण्टसाइझ करत असतो.
प्रत्यक्षात मात्र आपलं संपूर्ण जीवन हे नव्या व्यवस्थेतलच असतं.
कुणीही व्यक्ती नव्या व्यवस्थेशी कधी जोडली जाते ? ती शिशु असताना पहिल्यांदा लस घेते; तेव्हापासूनच.
साधा विचार करुन पहा. पेनकिलर अस्तित्वातच नाहित. तुमचा दात दुखतो आहे. कसं जगाल ?
जीवनाचा काय दर्जा राहिल ? आपलं जीवन ह्याकाळात बरच सुसह्य झालेलं आहे; पण हे आपल्याच्यानं स्पष्ट, थेट मान्य होत नाही!
मानवी मन मोठं गंमतीदार्/गुंतागुंतीचं आहे.

हपिसातल्या काही मित्रांबरोबर मुद्दा क्र. ५ वर बरीच चर्चा झाली मध्ये. इंफ्रास्ट्रक्चर या नावाखाली जे असतं त्याचा शेतकरी खूप कमी उपयोग करतो, इंडस्ट्रीचा शेतकर्‍याला काहीही उपयोग नाही अशा काही प्रकारची आर्ग्युमेंट होती. जी इंडस्ट्री तुम्हाला खतं, कीटक नाशकं, ट्रॅक्टर, पंप देते, माल वाहतूक करायला ट्रक, रस्ते देते तिचा काहीच उपयोग नाही का? असं विचारता पूर्वी कसा गावगाडा होता, गावातल्या गावत सगळं असायच तेव्हा सगळ नीट चालायचं. काय प्रॉब्लेम होता असही एक-दोन महाभाग म्हणाले. औषधं, लसी याची उदाहरण दिल्यावर पूर्वीचे लोक हट्टे-कट्टे होते त्यांना काही व्हायचं नाही असही म्हणाले एक दोन लोक. मग वाद घालायचा नाद सोडून दिला मी. आता हे सगळे लोक आत्ता ४०-५० एकर जमीनीचे धनी आहेत. २-३ पिढ्यांपूर्वी नक्कीच याहून जास्तं असावी. तु म्हणतोस त्याची चपखल उदाहरण वाटली ही.

नगरीनिरंजन Sun, 03/05/2015 - 17:41

In reply to by अनुप ढेरे

असाच एक विचार आला मनात, भारतात पहिला प्लेग कधी झाला याचे काही रेकॉर्ड आहे का? देवी, पटकी, प्लेग वगैरेंच्या साथीत इतके लोक मरत अस्स्तील पण त्याची आठवण अजिबातच कशी नाही समाजमानसात? हाही एकप्रकारचा सर्व्हायवरशिप बायसच म्हणायचा का?
पूर्वीच्या लोकांना खोडच होती वाटतं जगलेल्याचं अमाप कौतुक करायचं अगदी पहाडासारखा माणूस वगैरे आणि मेलेल्यांना पटकन विसरुन जायचं.

अजो१२३ Sun, 03/05/2015 - 17:52

In reply to by नगरीनिरंजन

देवी, पटकी, प्लेग वगैरेंच्या साथीत इतके लोक मरत अस्स्तील

मुळात हे साथीचे रोग थांबावेतच का? संपूर्ण मानव प्रजातीचा, तेव्हा लस नसताना, नाश करून थांबले पाहिजेत. आता जर काही लोकांना इनबिल्ट इम्म्यूनिटी होती म्हणावं तर या लोकांचा पुन्हा साध्या लोकांशी संपर्क आल्यावर ते साधे लोक (त्यांची स्वतःची अपत्ये धरून) मेली पाहिजेत. आणि एकदा फक्त इम्म्यून लोक उरले तर वारंवार साथ येऊच नाही शकली पाहिजे.

नगरीनिरंजन Sun, 03/05/2015 - 18:08

In reply to by अजो१२३

एकदा फक्त इम्म्यून लोक उरले तर वारंवार साथ येऊच नाही शकली पाहिजे.

स्टॅटिक जगात तसंच होईल पण खर्‍या जगात जंतूही इव्हॉल्व्ह होत असावेत.

अजो१२३ Mon, 04/05/2015 - 14:14

In reply to by नगरीनिरंजन

लोक उत्क्रांतीवादी आहात कि योगायोगवादी हे कळणं फार अवघड आहे. एका पक्षाची संपूर्ण सरशी होईल असं इवोल्यूशन लाखो वर्षांत नको?

अजो१२३ Mon, 04/05/2015 - 16:11

In reply to by बॅटमॅन

मागे वर्ल्डकप मधे टाय होण्याची शक्यता या चर्चेत टाय अंधुक शक्येतेचा वाटायचा. पण माणसाच्या आणि विषाणूंच्या मॅचमधे नेहमीच टाय व्हावा हे नॉर्मल वाटावे मंजे ...गडबड आहे.

बॅटमॅन Mon, 04/05/2015 - 16:21

In reply to by अजो१२३

असं काय नाय.

पहिले विषाणू इव्हॉल्व्ह झाले, लै लोक पटापट मेले. काही वर्षे हाच क्रम चालला. मग माणसे इव्हॉल्व्ह झाली, विषाणू गंडले. मग परत विषाणू इव्हॉल्व्ह झाली आणि हे चक्र कायम सुरूच राहिले, इ.इ.इ. यात सार्वकालिक टाय नसतो.

अजो१२३ Sun, 03/05/2015 - 17:57

In reply to by अनुप ढेरे

इंफ्रास्ट्रक्चर या नावाखाली जे असतं त्याचा शेतकरी खूप कमी उपयोग करतो, इंडस्ट्रीचा शेतकर्‍याला काहीही उपयोग नाही अशा काही प्रकारची आर्ग्युमेंट होती.

अ‍ॅग्री जीडीपीच १५% च्या आसपास आहे. त्याच्यासाठीचे हे इनपुट्स अजूनच कमी भावाचे. मग इतर ८५% (प्लस) कामांकरता जर इंडस्ट्रीयल इंफ्रा वापरले जात असेल तर शेतकर्‍यांना असे वाटणे साहजिक आहे.

गब्बर सिंग Mon, 04/05/2015 - 00:22

In reply to by अजो१२३

मग इतर ८५% (प्लस) कामांकरता जर इंडस्ट्रीयल इंफ्रा वापरले जात असेल तर शेतकर्‍यांना असे वाटणे साहजिक आहे.

पण ते इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासाठी शेतकर्‍याचे योगदान कितीसी होते ते सुद्धा बघा ना. ते शून्य होते असे मी म्हणत नाहिये. शेतकर्‍यांच्या जमीनी त्यांना द्याव्या लागल्या. जमिनीची अधिग्रहण किंमत = PVFCF + Control Premia. त्या जमिनी संकलन करण्याचे काम सरकारने केले. संकलनाचा खर्च सरकारच्या डोक्यावर. नंतर कन्स्ट्रक्शन व ऑनगोईंग मेंटेनन्स याचा ही खर्च. हे खर्च करण्यासाठी आलेला निधी सरकारने कुठुन आणला ? कर्ज घेतले असेल तर ते मार्केट रेट ने घेतले का ? राष्ट्रीयीकृत ब्यांका वापरून लोनेबल फंड्स मार्केट मधे क्राऊड-आऊट केले का ?? जेव्हा कर्ज खूप झाले तेव्हा करन्सी प्रिंट करून इन्फ्लेशन वाढवून चुकते केले का ? कर्ज न घेता जो निधी उभा केला तो कशातून आला - इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स की इतर मार्ग ?? असा सगळा विचार करा. मग समजेल की शेतकर्‍यास जे वाटते ते साहजिक आहे किंवा कसे ते.

अजो१२३ Mon, 04/05/2015 - 14:12

In reply to by गब्बर सिंग

पण ते इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यासाठी शेतकर्‍याचे योगदान कितीसी होते ते सुद्धा बघा ना.

१. काय संबंध?
२. अ-शेतकर्‍यांचे बरे काय योगदान असते?
३. अगदी हे रस्ते, बंदरे वापरून वापरून तोडणार्‍या उद्योगपतींचे म्हणे काय योगदान असते?

जमिनीची अधिग्रहण किंमत = PVFCF + Control Premia.

एकतर अधिग्रहण या संदर्भात माझा कमेंट नाही. पन तरी ...
१. तुम्ही (अभिव्यक्ति)स्वातंत्र्यवादी आहात हे मधेच विसरत जाऊ नका. उद्या तुमच्या ऑफिसातल्या ७०% कलिगनी त्यांचा मेंदू (जे काय ते) विकला तर तुमची इच्छा नसताना तुम्हे देखिल तो विकला आहे असे मानण्यात यावे का?
२. अधिग्रहणाच्या किंमतीचे हे सूत्र वास्तवात आहे का?
३. आणि हो, या सूत्रातल्या डिस्काउंटीग रेट पेक्षा जास्त दराने हा नॉन-डिप्रेशिएटिंग असेट अप्रिशिएट होत जातो. मी स्वतःची जमीन नही विकली आणि शेजारी प्रोजेक्ट आला तर अजूनच.
४. प्रिमियम कसा डिसाइड करता म्हणे? उद्या एका कंपनीचे सगळे शेअर ओपन मार्केट मधून उचलायला चालू करा. शेवटच्या शेअरचा प्रिमियम किती असेल?
सगळी सूत्र तुमची, सगळ्या प्रोसिजर तुमच्या, सगळा फायदा तुमचा ... आणि खरं बोललं कि राग येतो.

अजो१२३ Sun, 03/05/2015 - 18:06

सैद्धांतिकदष्ट्यातरी ते पूर्णतः मान्यच आहे.

वेदकाळातही असंच होतं असं ऐकलं आहे.

व्यवहारातही आधुनिक व्यवस्था ते अधिकाधिक आणू पाहते.

साने नीड्स टू गेट हिज कंसेप्ट्स ऑफ फायनान्स एंड इको क्लिअर.

अजो१२३ Sun, 03/05/2015 - 18:09

आधुनिक व्यवस्था व आधुनिक पूर्व (म्हंजे मध्ययुगापर्यंंतची ) व्यवस्था ह्यात अजून एक प्रमुख फरक म्हणजे व्यवस्थेचा समाजकेम्द्रित असण्याकडून व्यक्तिकेंद्रित होण्याकडे झालेला प्रवास.

आणि त्यासोबत असलेला एक व्यक्ति आपल्या आयुष्यात सगळी मूल्ये इवॉल्व करू शकते आणि पाळू शकते हा मूर्खपणाचा विचार.

गब्बर सिंग Mon, 04/05/2015 - 00:25

In reply to by अजो१२३

आणि त्यासोबत असलेला एक व्यक्ति आपल्या आयुष्यात सगळी मूल्ये इवॉल्व करू शकते आणि पाळू शकते हा मूर्खपणाचा विचार.

या वाक्याचा अर्थच लागत नैय्ये मला. अजो, तुम्हाला काय म्हणायचेय ते स्पष्ट कराल ?

मन Sun, 03/05/2015 - 18:40

बहुतांश मुद्दे वरती लिहून झालेत. उरलेल्या मुद्द्यांत त्यांनी भारतीय मानसिकतेत त्यांना कोणत्या गोष्टी खटकतात, ते सांगितलंय.

  1. "देशीवाद" ही जी काही संकल्पना आहे; त्यास मुलात अधिकाधिक हवा काही प्रगत देशच देताहेत आडून आडून. "आधुनिकता हे पाश्चात्त्य पिल्लू आहे. आपलं स्वतःचं असं काही खास असावं. आपण आपल्या मुळांकडे परत जावं." असं जे काही लोकांना वाटतय त्यास अप्रत्यक्षपणे पण जानीवपूर्वक्/मुद्दाम प्रगत देश हवा देताहेत.
    इतरांनी प्रगत होउन आपल्याशी स्पर्धा करु नये असा त्यांचा प्रयत्न आहे.(अगदि अस्साच मुद्दा सान्यांनी गल्लत गफलत गजहब ह्या सरातही मांडला होता. त्यांच्या मते,; जागतिकीकरणाची थासून आग्रही मागनी करनारे देश चीन-देश-ब्राझील हेच आहेत. प्रगत देशांना ते नको आहे. प्रगत देशातल्या काही कामगार संघटना मुद्दाम इथल्या काहींना फण्डिंग देउन जागतिकीकरनाविरोधात हवा करु पाहतात. त्यांना त्यांचा रोजगार वाचवायचा आहे. जागतिकीकरनाचा उलट भारत चीन ब्राझील ह्यांना फायदाच आहे; त्यांना ते हवे आहे. आणि प्रगत देश आज ते इच्छा असूनही अडवू शकत नाहियेत. ) देशीवाद ह्या प्रकाराबद्दल बोलायला धनुश कुट्टी हे ऐसीकर असते तर फार बरं झालं असतं असं मला वाटतं. त्याला कुणीतरी ह्या धाग्यात ट्याग करा राव.
  2. आधुनिक व्यवस्थेत लोकांना "प्रजा " समजत नाहित; तर "नागरिक" समजतात. प्रजा हा शब्द सरळसरळ प्रजनन ह्या शब्दातून आलेला आहे. टोळीतला सर्वात ताकतवान नर स्वतःची प्रजा वाढवणार . एका अर्थानं तो त्यांचा पालक. त्यातून 'प्रजा' ही संकल्पना आलेली. 'नागरिक ' ह्या संकल्पनेत लोकांचं अधिक जबाबदारीपूर्ण वर्तन अपेक्षित आहे.
  3. युग ही संकल्पना घसरगुंडी सारखी आहे. सत्ययुग --> त्रेतायुग --> द्वापरयुग -->कलियुग ही जणू काही लोकांमधील चांगुलपणाची उतरंडच आहे. इथे फक्त चांगल्याकदून वाईटाकडे प्रवास होतो. जे जे होणार ते अधिकाधिक वाईटच होनार अशी मानसिकता त्यामुळे बनते. उलट प्रवास नॉर्मल केसेस मध्ये शक्य नाही. अपवाद फक्त एकच. तो म्हणजे प्रलय! त्यावेळी सगळं काही आधी नष्ट होणार. पुन्हा जवळपास शून्यातून सुरुवात केल्यासारखी स्थिती. पुन्हा सत्ययुग; आणि हो.
    पुन्हा तीच घसरगुंडी सुरु! दर युगाच्या शेवटी अभ्युत्थानम् अधर्मस्या, तदात्मानं सृजाम्यहम् म्हनत साक्षात परमेश्वर अवतार घेतो. पण हाती काय लागतं ?
    घसरगुंडी थांबते का ? दरवेळी उलट अधिक वाईट असे पुढचे युग सुरु होते. रामावताराच्या शेवटीही तेच; कृष्णावताराच्या शेवटीही तेच. ही घसरगुंडी साक्षात देवही थांबवू शकत नाहित. मग सामान्य माणसाला काही करावसं वाटणं तर दूरच. तो तर सतत नियतीच्या हातातीलच कुणीतरी असल्याच्या मानसिकतेत वावरणार. पुरुषार्थ गाजवायला स्कोप आहे कुठे ?
  4. 'मायावाद ' हा प्रकार असाच. ऐहिक जगात काही नाही; ऐहिक जग हे खओटे/मिथ्याच आहे; पारमार्थिक अचिव्हमेंट हेच काय ते यश असे म्हटल्याने भौतिकाकडे दुर्लक्ष. सगळे लक्ष स्वतःपुरती मुक्ती-मोक्ष मिळवण्याकडे; तीही पारमार्थिक जगातील; ऐहिक तर सोदून देण्यायोग्य. एका मायावादाच्या फ्यान असलेल्या मित्राला सानेंनी साम्गितलं -- "होय, आहे हे स्वप्नच आहे; मान्य. पण हे स्वप्न आम्ही दु:स्वप्न नव्हे तर सुखद स्वप्न म्हणून जगू/घडवू. ते संपेल तेव्हा बघता येइलच की बाकी काय ते. तोवर ह्याच भौतिक जगात कर्तबगारी गाजवावी." अजून एक मुद्दा सानेंनी डिट्टो कुरुंदकराम्सारखाच मांडला. 'ब्राम्हनांनी बहुजनांना ज्ञानापासून वंचित ठेवले' असे म्हटले जाते. पण नीट पाहू गेल्यास प्रश्न पडतो की ज्ञान ब्राम्हणांकडे तरी होते कुठे ? त्यांनी फार तर स्वतःचे अज्ञान चांगले मस्त प्याकेजिंग करुन लपवून ठेवले; इतरांकडे जे प्र्याक्टिकल्/व्यावहारिक ज्ञान्/कौशल्य होते; ते ज्ञानच नव्हे; असे त्यांना पटवले. उदा:- कुंभारकाम, नक्षीकाम, बांधकाम , शेतीतील अवजारे बनवणे, सांभाळणे, लोहारांची कामं... ही खरोखर अधिक उपयुक्त होती गावगाडा चालवायला. पण ह्यांनी त्यालाच दुय्यम ठरवण्याची लबाडी/हुशारी केली.
    शिवाय 'न्याय' ही संकल्पना पुरेशी रुजलेलीच नाही समाजात, मानसिकतेत. अस्तेय, अपरिग्रह पाळायचे; दुसर्‍याचे काही चोरायचे नाही; ही शिकवण.
    ही शिकवण म्हणून चांगलिच आहे. पण "दुसर्‍याचे चोरु नये; कारण त्यावर त्याचा हक्क आहे" ही न्यायाची संकल्पना त्यामागे नाही. "आपण अस्तेय, अपरिग्रह पाळले नाहित; तर आपली हानी होइल; मोक्ष मिळणार नाही " ही भीती. सगळा स्वतःपुरताच स्वार्थी विचार. व्यापक दृष्टी नाही. न्यायविचार स्पष्ट नाही.
    अर्थात ह्या विचारसरनीविरोधातही वेळोवेली वैचारिक बंडे झाली; सुधारणांचे प्रयत्न झाले. उदा:- मर्यादित प्रमानात टिळकांसारख्या एरव्ही सनातनी वाटणार्‍याने ते केले. किंवा पूर्णवादाचा प्रसार्/प्रचार करणार्‍या पारनेरकर महाराजांनीही सुधारणांचे बरेच विचार मांडले.
    त्यांनी आपल्या सुधारणांनाही वेदांताचाच कसा आधार आहे; हे ही दाखवले. होय; एका अर्थाने ही सर्व समावेशकता आपल्या संस्कृतीत आहे;
    ही चांगली गोष्ट आहे.
  5. तपश्चर्या ही संकल्पना. स्वतःला त्रास करुन घेणे चांगले; गौरवास्पद.आत्मक्लेशाचं गौरवीकरण. का ? तर म्हणे त्याने तुमच्या पापाचा ब्यालन्स संपत जातो; भोग भोगण्म त्यामुळे बरच असतं एका अर्थी. आणि हो चुकून आनंदी असाल, मजा करत असाल तर प्रत्यक्षात तुम्ही सुखाचा ब्यालन्स कमी करत असता; कन्झ्युम करत असता. हा पाप-पुण्याचा ब्यालन्स पर्फेक्ट झिरो करणं जमलं तर मोक्ष म्मिळणार. नैतर अम्गाला कर्म चिकटनार. मुक्ती नाही; सुटका नाही. तुम्ही काय क्रुती केली; त्यातून काय निर्मिती झाली; कर्म्/कार्य किती ऊपयुक्त होतं; ह्यास महत्व नाही; फक्त तुम्ही त्यात ते न गुंतता केलं की नाही; इतकच महत्वाचं. कारण न गुम्तता केलं की तुमचा ब्यालन्स शून्याजवळ असतो; मुक्ती पक्की होत असते. प्रत्यक्षात तुमच्या क्रुत्यावरून व तुम्ही जी निर्मिती केली आहे; त्यावरुन तुमचे महत्व ठरायला हवे. पण असे होत नाही आपल्याकडे. आधुनिक व्यवस्थेत मात्र हे होते; म्हणून ती त्यातल्या त्यात बरी.(त्यातही दोष आहेतच. पण ती काही अपरिवर्तनीय नाही. तीही प्रवाही आहे. त्यात सतत सुधारणा कालानुरुप करत राहता येणं शक्य आहे.) निर्मिती ऐवजी भोगाला महत्व आहे आपल्याक्डे.
    आंधळा नवरा मिळाला तर आपणही त्याच्यासारखच आंधळं व्हावं; असं वाटणारी गांधारी. तिचं आपल्याला कोण कौतुक.
    आपण जग पाहून नवर्‍याची मदत करावी असं तिच्या डोक्यात येत नाही. ती स्वतःलाही डोळ्यावर पट्टी बांधते-- आत्मक्लेश.
    त्याचं आपल्याला कौतुक --गौरवीकरण. डोळ्यावर पट्टी बांधली म्हणून "पट्टीची " पतिव्रता आपण तिला समजतो. (इथे हशा पिकला)

.
.
.
व्याख्यान झाल्यावर मी त्यांना विचारलं. "तुम्ही म्हणता मध्ययुगाकडून आधुनिकतेकडे प्रवास म्हणजे म्हणजे समाजकेंद्री व्यवस्थेकडून व्यक्तिकेंद्री व्यवस्थेकडे प्रवास आहे. पण उलट लोकशाही म्हणजे अधिकाधिक समाजाला सामावून घेणे, अधिकाधिक समाजाचे इन्क्लुजन नै का. उलट मध्ययुगात एकाच व्यक्तीकडे--राजकडे किंवा फर त्याच्या निकटवर्तीयांकडे--राजमंडळाकडे अधिकार असत. त्यामुळं तुम्ही म्हणता त्याच्या बरोब्बर उलट परिस्थिती नाहिये का. मध्ययुगात उलट अधिक व्यक्तिकेंद्री व्यवस्था होती. आता ती अधिक समाजकेंद्री होते आहे. " त्यांचं उत्तर :- "personal आणि individual ह्या दोन सारख्या वाटनार्‍या शब्दांत सूक्ष्म पण महत्वाचा फरक आहे.मध्ययुगाबद्दल तुमचं म्हण्णं personal ह्या प्रकारात येतं. पण त्या काळात इतर प्रजेचे अधिकार किती होते ? individual म्हणून त्यांना कितपत मान होता ?
मी म्हणतो आहे ते हे की individualism आता प्रवास सुरु आहे. काही ठराविक लोकांनाच जणू अनिर्बंध व्यक्तिस्वातंत्र्य असं नाहिये. सर्वांनाच सारखे अधिकार असावेत व म्हणून, हे तत्वतः तरी सर्वत्र मान्य आहे.
.
.
भारतीय स्म्स्कृतीचे काही चाहते मात्र ह्यामुळे दुखावले गेले असावेत. त्यांनी भाषणानंतर सान्यांना साधारणतः "तुम्ही अमुक अमुक मुद्दे भाषणात सामील करुन घायला हवे होतेत(पक्षी :- स्वत; समजून घ्यायला हवे होतेत)" असच त्यांना सांगितलं. "आमच्याकडे खूप काही होतं. उडती विमानंही असण्याची शक्यता होती" असा त्यांचा मुद्दा असावा असं वाटलं. उलट ग्रामीण वेशभूषा, बोलणं वगैरे असणारी मंडळी अधिक तार्किक बोलताहेत असं वाटलं. "साने, तुम्ही म्हणताय ते बरोबर असेल तर हजारो वर्षापूर्वी विमानं उडण्याचा दावा करणार्‍यांवर कारवाई का होत नसावी" असा प्रश्न त्यातल्या एकानं विचारला.
मला ऐसीअक्षरेवर "अनश्व रथ " अशा टायटलचा उत्पलचा लेख आठवला. सान्यांचे काही मुद्दे त्यासारखेच होते.
.
.
बाकी सर्व वाचकांचे आभार.
@आदुबाळ्/बॅटमॅन :-
कौतुकाब्द्दल थ्यांक्स. पण हे सगळं लक्षात ठेवलं म्हणजे १००% दोक्यात आहे असं नाही. प्रवेशासाठी पाच रुपये तिकिट होतं. आपल्या बेस्ट किंवा पीएमटीच्या तिकिटाइतक्या आकाराचं. भाषण रंगात आल्यावर मला त्यातले महत्वाचे कीवर्ड्स लिहून घ्यावेत असं वाटलं. त्या तिकिटावर मी पंधरावीस कीवर्ड्स लिहून घेतले.(एकेका मुद्द्याला एकेक कीवर्ड्.)
.
.
@ननि

बाकी जीएमचा आरोग्यावर परिणाम होत नाही हा मुद्दा मान्य केला एकवेळ तरी इतर आक्षेपांवर (बायोडायव्हर्सिटी, कॉर्पोरेट मोनॉपली) काही बोलले का? व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरांसाठी वेळ होता का?

नाही. इतर आक्षेपाम्वर ते काहीही बोलले नाहित. व्याख्यानानंतर खास शेप्रेट असं प्रश्नोत्तर सेशन नव्हतं. पण आम्ही स्टेजवर जाऊन, भेट घेउन प्रश्न विचारले तर त्यांनी जमतील तितपत तपशीलवार उत्तरं दिली, पॉइण्टर्स दिले. ह्या बाबी विचारल्या सत्या, तर ह्यावरही बोलले असते कदाचित.
.
.
@अनुप ढेरे :-
येस यू आर राइट. त्यांना तेच म्हणायचय(४०-५० एकरचा मुद्द्दा.) असच मलाही वाटतं.

अजो१२३ Sun, 03/05/2015 - 18:20

लोकशाहीत विरोध इज नॉट इक्वल टू द्रोह. विरोध म्हणजे वैर नव्हे.
हे मान्य होणे; त्यावर व्यवस्था चालणे हे खरोखर कौतुकास्पद व अधिक प्रगल्भ असन्याचे लक्षण आहे

आज कोणाकडे किती खासदार आहेत, इ इ समीकरणे आणि गतकाळातली वेगवेगळ्या सरदारांच्या प्रभावांची समीकरणे समानच आहेत. आणि मागे जर एककल्ली हुकुमशहा असतील तर आजचे हिटलर, मुसोलिनी आणि आयसेनहॉवर हे देखिल लोकशाही पद्धतीनेच निवडून आलेले होते.
लोकशाहीत हुकुमशहांची संख्या लोकांच्या हातात असते पण हुकुमशाहीची तीव्रता लोकशाहीतही तीच असते.

अंतराआनंद Mon, 04/05/2015 - 07:35

In reply to by अजो१२३

अजो तुम्ही जे उद्धृत केलय ते एक तत्व किंवा नियम म्हणून लोकशाहीत मान्य केलं जातं या नियमाला सरंजामशाहीत स्थान्च नव्हतं ईथेच नाही तर जगात कुठेही. एक गोष्ट तत्व म्हणून मान्य करणं महत्वाचं नाही का? त्यामुळे दडपून केलीस तरी ही गोष्ट चुकीची करतोयस हे करणार्^याला समजवायला जागा उरते ना. बाकी कोणत्याही नियमाला उधळून लावणार्या व्यक्ती असणारच. (नसल्या तर आयुष्य अळणी होईल) पण दडपशाही करण्यारया व्यक्तीच नियम म्हणून असणे हे त्या व्यक्ती अपवाद म्हणून असणे यापेक्षा भयंकर नाही का?

हुकुमशाहीची तीव्रता लोकशाहीत किमान लोककल्याणाचा बुरखा पांघरुन येते आणि तिला नियमांचा सरळसरळ आधार घेता येत नाही हे कमी महत्वाचे आहे का? त्यामुळे हुकुमशाहीला विरोध करण्यार्^यालाही बळ मिळते.

हे आपण असं कोणावरही लिहू शकतोय ते हुकुमशाही देशात लिहू शकलो असतो का? भलेही मिडीया प्रगल्भ का काय ते नसो पण टीव्हीवर रागां पासून नमोंपर्यंत सगळ्यांची रेवडी उडवणारे कार्यक्रम होत असतात ते झाले असते काय? (ते छान असतात असं म्हणायचं नाहीय)

जुने ते सोने म्हणणार्^या कोणीही आजीबाई चूल फुंकायला नाहीतर पंप किंवा वातीवाला स्टोव्ह वापरायला तयार होणार नाहीत की कोणी आजोबा पडशी खांद्यावर टाकून जायला. ( पूर्वी माझे बाबा हातात सूटकेससारखी बॅग घेउन ऑफिसला जायचे, ते आठवलं :D )

अजो१२३ Mon, 04/05/2015 - 17:04

In reply to by अंतराआनंद

हुकुमशाहीची तीव्रता लोकशाहीत किमान लोककल्याणाचा बुरखा पांघरुन येते आणि तिला नियमांचा सरळसरळ आधार घेता येत नाही हे कमी महत्वाचे आहे का?

सहमत आहे.

अंतराआनंद Mon, 04/05/2015 - 07:00

_/\_

कीवर्ड्स लिहून घेतले तरी ईतकं सविस्तर लिहून काढण म्हणजे खायचं काम नाही.

राजीव सानेंच लोकसत्तेतलं सदर आवडायच.

अणु ऊर्जा? त्याचे तर नावही काढणे फार मोठे पाप. ते तर फक्त दुरितच आहे.

बाकीच्या गोष्टी ठिकायत पण जैतापूरच नाही तर भारतात कुठेही अपघातप्रतिबंधक उपाययोजनांची परिस्थिती पहाता त्यादृष्टीने अणूउर्जा झेपणारी आहे का? अर्थात जिवितहानी ही फारशी मनावर घ्यायची गोष्ट नाही अशी सवय आहेच आपल्याला.

बाकी मुद्दे पटण्यासारखेच.
पूर्वकाळचा युटोपिया हा मुद्दा तर बिनतोडच.

सानेंसारखी मंडळी वृक्षतोड , जंगलं कमी होणं याकडे कसं बघतात हे समजून घेणं आवडलं असतं. पर्यावरणस्नेही शहरं, पावसाची शेती, सौरउर्जा या संकल्पनाबद्द्ल त्यांचं मत समजून घ्यायला आवडलं असतं.( कुणाच्या कुठे काही वाचनात असेल तर सांगा) कारण आपली आधुनिकतेच्या कल्पना शहरीकरणाशीच निगडीत आहे.

adam Mon, 04/05/2015 - 07:07

In reply to by अंतराआनंद

http://www.loksatta.com/sampadkiya-news/nature-exactly-a-pure-nonsense-…
.
.
अजून एक इंटरेस्टींग लेख आहे. तो सान्यांनी लिहिलेला नाही.
पण साने स्कूल ऑफ थॉट्सचा नक्कीच म्हणता यावा (गिरीश कुबेरांनी लिहिलाय बहुतेक) :-
"चंगळवादी व्हा "
http://www.globalmarathi.com/20120928/5310331379683010162.htm
.
.
आता ह्यातलं किती आणि काय काय बरोबर ते ठौक नै.
पण उपस्थित केलेले मुद्दे नेहमीच्या मुद्द्यांहून थोडेसे तरी वेगळे होते; इंटरेस्टींग वाटले.
ह्या धाग्यात दिलेल्या मूळ भाशणातील मुद्द्यांबद्दलही तेच.

ऋषिकेश Mon, 04/05/2015 - 08:39

धन्य आहेस मनोबा! छान वृत्तांकन!

तुला अशीच व्याख्याने अटेंड करायला वेळ मिळो ही आधुनिक युगाचरणी प्रार्थना :)

चिंतातुर जंतू Mon, 04/05/2015 - 18:02

सारांश चांगला लिहिला आहे. सान्यांच्या व्याख्यानाबद्दलचं माझं मत -
'आधुनिकता' म्हणजे काय, ह्याविषयीची त्यांची मांडणी प्रमाण मांडणीच होती त्यामुळे ती मला सुपरिचित होती, पण ती आज भारतीय समाजापुढे मांडणं गरजेचं आहे. भाषणातल्या नंतरच्या भागात मात्र त्यांनी 'इझी टारगेट्स' निवडली असं वाटलं (मायावाद, देशीवाद, तपश्चर्या, किंवा आण्विक उर्जा, जीएम बियाणं, वगैरे). आधुनिकतेच्या संदर्भात भारतीय समाजात मला ज्या गोष्टी खटकतात, त्यातल्या काही अशा -

समष्टी ते व्यक्ती, व्हर्टिकल मोबिलिटी वगैरेंच्या संदर्भात - मला आज अगदी सुशिक्षित कुटुंबांतही असं जाणवतं, की व्यक्तीचे अनेक महत्त्वाचे निर्णय कुटुंबाला किंवा परिसरातल्या / जातीतल्या समष्टीला साजेसेच बहुशः घेतले जातात - म्हणजे उदा. कुणब्याच्या घरातल्या मुलाला शास्त्रज्ञ व्हायचं असलं, तर त्याला ब्राह्मणाच्या घरातल्या मुलाला होईल त्यापेक्षा अधिक विरोध सहन करावा लागतो. ह्याउलट, ब्राह्मण घरातलं मूल जर फाइन आर्ट्सला जाऊ इच्छित असेल, किंवा मराठी साहित्यात एम.ए पीएच.डी करायला जाईल, तर त्याला घरच्यांची नापसंती किंवा विरोध सहन करायला लागतो. थोडक्यात, 'माझं आयुष्य मी बांधायचं आणि त्याचे चांगलेवाईट परिणाम भोगण्याची जबाबदारीही माझीच असते' हा आधुनिक विचार अजूनही पुष्कळ लोकांना त्रासदायक ठरतो.

संमतीवयाच्या संदर्भात : ताजं शास्त्रीय / समाजशास्त्रीय संशोधन काय सांगतं आणि कोणता विचार अधिकाधिक लोकांचे मानवी हक्क आणि स्वातंत्र्यं सांभाळतो, ह्यापेक्षा आमचे बाबा, महाराज, धर्मगुरू, पूर्वज वगैरे कशाला अनैतिक समजतात ह्याला अधिक महत्त्व अजूनही आहे. उदा : समलिंगी संबंध, लिव्ह-इन, वगैरे प्रश्नांबाबतचं सार्वजनिक संभाषित (पब्लिक डिसकोर्स). मला ते आधुनिकतेला छेदणारं वाटतं आणि सुशिक्षित माणसंही त्यात गोंधळताना दिसतात.

>> विरोध इज नॉट इक्वल टू द्रोह. विरोध म्हणजे वैर नव्हे
अगदी ताजं प्रकरण - बाबासाहेब पुरंदरे 'महाराष्ट्रभूषण' - ह्या निर्णयाला विरोध करणं किंवा त्याबद्दल आनंद व्यक्त करणं गैर नाही, पण ज्या भाषेत दोन्ही बाजूंचे लोक परस्परांना विरोध करत आहेत ते पाहता तसं घडताना दिसत नाही.

असे मुद्दे त्यात भारतीय समाजाच्या संदर्भात येते तर मला ते अधिक आवडलं असतं.

अजो१२३ Sun, 10/05/2015 - 17:32

In reply to by चिंतातुर जंतू

आमचे बाबा, महाराज, धर्मगुरू, पूर्वज वगैरे कशाला अनैतिक समजतात ह्याला अधिक महत्त्व अजूनही आहे.

नशीब.
-----------------------------------------------------------------------------
मंजे त्यांच्या समजूतीत चार चुका असतील, पंण लार्जली ते स्ट्रक्चरच नसतं तर लै घोळ झाला असता.
उदा. पूर्वजांनी राष्ट्रवाद शिकवला. लोक तो विसरले असत भारतात आणि चीनमधे प्रशासन चालवायला किंवा सीमा सुरक्षित ठेवायला लोकच मिळाले नसते. मक्काय कुणी कुठेही शिरावे आणि काहीही करावे.

अजो१२३ Sun, 10/05/2015 - 17:40

In reply to by चिंतातुर जंतू

कुणब्याच्या घरातल्या मुलाला शास्त्रज्ञ व्हायचं असलं, तर त्याला ब्राह्मणाच्या घरातल्या मुलाला होईल त्यापेक्षा अधिक विरोध सहन करावा लागतो.

उदाहरण देण्यात अंमळ चूक झाली आहे काय?
शास्त्रज्ञ काय असतो, काय करतो, त्याचे जीवन कसे असते याची कल्पना कुणब्यास असल्यास तो विरोध का करेल? नुस्तं मास्तरापेक्षा लै भारी म्हटलं तरी खुष होईल.
परिथितीजन्य घटकांच्या प्रभावाला (आपली स्थिती नाही, पैसे नाहीत, इ इ) आधुनिकतेचा प्रभाव कमी आहे कसं म्हणता येईल?

अनु राव Tue, 05/05/2015 - 12:01

बाकी बरेसचे माझ्या मता प्रमाणेच असल्यामुळे ओके, पण खालील गोष्ट पटण्यासारखी नाही.

मध्ययुगापासून आधुनिकतेकडे होणारा प्रवास irreversible आहे. अटळ आहे. पुन्हा परतवून लावण्यासारखा नाही.

गेल्या काही दशकात जगाच्या बर्‍याच मोठ्या भागात हा प्रवास उलटा चालू झालेला दिसुन येत आहे.

नगरीनिरंजन Sun, 10/05/2015 - 13:22

In reply to by अनु राव

जगाच्या बर्‍याच मोठ्या भागात हा प्रवास उलटा चालू झालेला दिसुन येत आहे.

+१००.
आणि त्याला कारणीभूत असलेल्या क्लायमेट चेंज व रिसोर्स डिप्लीशन या दोन गोष्टी नाकारणारी ही निओ-लिबरल दांभिक आधुनिकता आहे.

नगरीनिरंजन Sun, 10/05/2015 - 13:40

In reply to by बॅटमॅन

सीरियातल्या असंतोषामागे तिथला अनेक वर्षांचा दुष्काळ आहे. इजिप्तातल्या अरब स्प्रिंगच्या मागे घटते तेल-उत्पन्न व प्रचंड महागाई ही कारणे आहेत. इराकवर हल्ला तर निव्वळ लुटीसाठी होता हे सगळ्यांना माहितच आहे. आयसिसचा उदय हाही योगायोग नाहीच. कोणताही उठाव किंवा युद्ध आली लहर केला कहर या तत्त्वावर होत नाही.

बॅटमॅन Sun, 10/05/2015 - 23:33

In reply to by नगरीनिरंजन

याबद्दल अधिक वाचायला आवडेल, कारण ही मीमांसा सकृद्दर्शनी तितकी पटत नाही. (मला त्यातलं फार कै कळतं अशातला भाग नाही पण तरीही.) सबब दोनपाच लिंका देणेचे करावे ही इणंती.

नगरीनिरंजन Mon, 11/05/2015 - 17:12

In reply to by बॅटमॅन

लिंका शोधाव्या लागतील; पण यासंबंधीच्या अभ्यासाबाबतची
नॅशनल जिऑग्राफिकची बातमी पाहा किंवा यासंबंधीच्या Leaked Cables पाहा.
तेवढे एकच कारण नसले तरी बराच हातभार लागला आहे.

अजो१२३ Sun, 10/05/2015 - 17:22

In reply to by नगरीनिरंजन

बीबीसी, सी एन एन पाहिले कि सुलटा प्रवास दिसतो. अल जजिरा पाहिलं कि उलटा दिसतो.

मग प्रवास सुलटा चालू ठेवायचं एक सोपं साधन आहे, अल जजिरा बघायचाच नाही.

अजो१२३ Mon, 11/05/2015 - 15:04

वर मनोबाने लिंक दिली आहे. सान्यांचा लेख. सम्यक निसर्ग -एक शुद्ध भंकस म्हणून लेख आहे. तथाकथित विचारी लोकांना तो फार अपिल करतो.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/nature-exactly-a-pure-nonsense-…

मला या लेखावर (पुनश्च) विचार व्यक्त करायचे आहेत.

खासकरून खालील -

परंतु काही पर्यावरणवादी प्रवाह, ही सीमा ओलांडून व गूढवादाचा आश्रय घेऊन, 'स्वत:ला 'सम्यक' (नॉर्मल) राखण्यासाठी धडपडणारा निसर्ग नावाची गोष्ट अस्तित्वात आहे व त्याची हाक फक्त 'आम्हालाच' ऐकू येते,' अशा थाटात प्रचार करतात. नॉर्मल म्हणजे अ‍ॅव्हरेज नव्हे, तर 'जसे असायला हवे तसे'! सम्यक आहार, सम्यक विहार इत्यादी सांगताना बुद्धाने जसा वापरला होता, तसा आपण 'सम्यक' हा शब्द 'नॉर्मल'साठी वापरत आहोत.

'खुद्द निसर्गाला एक सम्यक अवस्था असते व ती मानवामुळे ढळते,' ही चक्क एक अंधश्रद्धा आहे. खोल (डीप) व जहाल (रॅडिकल) पर्यावरणवादी, कोणत्या मखलाशा करून ही अंधश्रद्धा पसरवतात, हे आपण आज पाहणार आहोत.

पर्यावरणवाद्यांतील, 'माणूसघाणे निसर्गप्रेमी', वरील अर्थाची फिरवाफिरवी करून, असा 'सिद्धान्त' पसरवतात की, 'जे कृत्रिम (३) असते ते विकृत (४) असते आणि त्यामुळे स्वाभाविकतेचा (२) भंग होऊन भौतिक-संतुलन ढळून (१) विनाश अटळ आहे.' हा 'सिद्धान्त' पसरतोसुद्धा, कारण बऱ्याच जणांची निसर्गविषयक कल्पना 'शहरात सहसा न आढळणारे प्रेक्षणीय स्थळ' अशी असते.
तेव्हा तंत्राच्या मानवघातक परिणामांविषयी सावधता एवढाच पर्यावरणवादाला अर्थ आहे. सम्यक-निसर्ग नावाची, नसलेलीच गोष्ट राखण्याकरिता, माणसांना विकासापासून वंचित ठेवण्याचा, कोणालाही अधिकार नाही.

ही कॉमेडीची हाईट आहे -

निसर्गसौंदर्य हासुद्धा मानवी संवेदनांनी आणि कल्पनांनी घातलेला 'घाट' असतो. क्रौर्य व विध्वंस नको वाटणे, सुसंवाद व सौंदर्य हवेसे वाटणे या निखळ मानवीच भावना आहेत. निसर्गनियमांत त्यांना तसूभरसुद्धा स्थान नाही. मनुष्याचा मुख्य स्वभावधर्म, अंतर्बाहय़ कृत्रिमता निर्मिणे हाच आहे. कृत्रिमतेला हीनार्थ चिकटविणे, म्हणजे संस्कृती (आंतरिक) व समृद्धी (बाहय़) या दोन्हींना नाकारणे होय. त्यातूनच माणूसघाणे निसर्गप्रेम उद्भवते.

=================================================================================================================
यातल्या प्रत्येक विधानाचा प्रतिवाद फार लांबलचक होईल. तो असू द्यात.

आपण खालिल प्रश्नांचा विचार करू...
१. राजीव साने नॅच्यूरल आहेत कि एक्स्ट्रॉ-नॅच्यूरल? तर अर्थातच नॅच्यूरल. मंजे ते स्वतः एकटेच वेगळ्या स्रोताचे, वेगळ्या मटेरियलनी बनलेले वा ज्या विश्वाच्या असम्यकेतबद्दल ते बोलत आहेत त्याच्या बाहेरचे आहेत काय? नाही!!!
२. आता, म्हणून ... राजीव साने सम्यक आहेत काय? याचं उत्तर द्यायला एक सेकंद तरी लागतो का? उनकी मानो तो ते स्वतः असम्यक आहेत. (लक्षात घ्या एवढ्या प्रचंड ब्रह्मांडात त्यांचं मास (जे काय ६०-७०किलो असेल) तितकंच सवत्यानं सम्यक आहे असं मानलं तर मग अजूनही इतर अपवाद असू शकतात असे म्हणायला जागा उरते. (मग विषय लांबतो. उदा. कोणी म्हणेल कि साने आणि देव सम्यक, बाकी सगळं अस्मक्यक. इ इ ) म्हणून विश्व असम्यक असेल तर झाडून सगळे काही असम्यक असणार. त्यात साने देखिल आले.

३. आता असम्यक म्हणजे काय?
लेख वाचाच पण हे जरूर:

स्वत:ला 'सम्यक' (नॉर्मल) राखण्यासाठी धडपडणारा निसर्ग नावाची गोष्ट अस्तित्वात आहे व त्याची हाक फक्त 'आम्हालाच' ऐकू येते,' अशा थाटात प्रचार करतात. नॉर्मल म्हणजे अ‍ॅव्हरेज नव्हे, तर 'जसे असायला हवे तसे'! सम्यक आहार, सम्यक विहार इत्यादी सांगताना बुद्धाने जसा वापरला होता, तसा आपण 'सम्यक' हा शब्द 'नॉर्मल'साठी वापरत आहोत.

(जो वापरायला नको.) हे पुन्हा प्रचंड काळजीपूर्वक वाचा. असं दिसतं कि जगाच्या सिस्टिममधे जसा असायला हवा तसा नसलेला म्हणजे असम्यक. आता लेखात निसर्गासाठी वापरल्लेली सारी विषेशणे सान्यांसाठी वापरा (क्र्र, अचेतन, विध्वंसक, अनागोंदी असलेला, विकृत, हत्यारे, चूकून योगायोगाने घडलेला, इ इ)

४. आता इथवर जी माहिती आणि तत्त्वज्ञान निर्माण झाले आहे ते वरचा एक पॅरा रिफ्रेज करण्यासाठी वापरू-
ऐसीवरच्या वाचकांना सान्यांच्या लेखाचे वाटलेले सौंदर्य हे सुद्धा मानवी संवेदनांनी आणि कल्पनांनी घातलेला 'घाट' असतो. क्रौर्य व विध्वंस नको वाटणे, सुसंवाद व सौंदर्य हवेसे वाटणे, सान्यांचे लेख प्रभावी वाटणे या निखळ असम्यक मानवीच भावना आहेत. निसर्गनियमांत अशा भावनांना तसूभरसुद्धा स्थान नाही*.
================================================================================================================================
आता काळजीपूर्वक समरी केली असता असे दिसते कि साने खुद्द आणि त्यांचे विचार सम्यक, सुयोग्य, वा "जसे असावयास हवे तसे" आहेत काय? अर्थातच नाहीत. मंजे काय? - राजीव साने एक शुद्ध भंकस आहेत.
================================================================================================================================
(एक स्वगत) तर साने, दुराग्रही पर्यावरणवाद्यांचा प्रतिवाद चांगलाच. पण दुसर्‍या टोकाचा दुराग्रह नको. आणि तरीही मी तुमचा प्रतिवाद केलाच नाही. फक्त तुम्ही काय म्हणताय त्याचे काय काय अर्थ निघताहेत ते सांगतोय.

अबापट Sat, 20/11/2021 - 15:30

मा राजीव साने गुरुजी यांची या व्याख्यानानंतरची वैचारिक वाटचाल रोचक आहे .
त्यांच्या एकंदरीत लिहिण्यातील विसंगती नगरी निरंजन यांनी पट्टकन दर्शवली आहे. ( माणूस फेकतो . हो बऱ्याचदा , भारदस्त भाषेत आणि त्यावर वैचारिक इमले बांधतो )
एकंदरीतच पुनरावलोकन करावे अशी मूळ लेखकास विनंती.

श्री अजो यांच्याशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांच्या या वाक्याशी सहमत आहे . " राजीव साने एक शुद्ध भंकस आहेत."

पुंबा Sat, 20/11/2021 - 21:34

त्यांचे गल्लत, गफलत, गहजब सदर वाचून पुस्तक खास विकत घेतले होते. त्यावर त्यांची सही देखिल घेतली होती. सध्या साने वेगळ्याच मूडमध्ये आहेत. हिंदूराष्ट्र बनवण्यासाठी सज्ज आहेत. ट्रोल म्हणावे इतकी वैचारिक अधोगती झालीये सानेंची.

माचीवरला बुधा Sun, 21/11/2021 - 02:03

In reply to by पुंबा

सानेंचे भगवीभवन ही एक शोककथा आहे. एक पॅालिमॅथ आणि आधुनिक विचारवंत ह्मणून मला त्यांच्याबद्दल एकेकाळी आदर होता. पण त्यांचे पाय मातीचे निघाले या वाईट वाटते. त्यांचे विचारपरिवर्तन होवो, ही आशा.