Skip to main content

दिवाळीची तयारी (२०२६)

‘ऐसी’च्या दिवाळी अंकाचं प्रकाशन (नेहमीप्रमाणे) साधारणपणे नरकचतुर्दशीच्या आठवडाभर आधी सुरू होईल. या वर्षी आम्ही काही नवीन प्रयोग करून पाहणार आहोत. त्याविषयी माहिती देण्यासाठी हा धागा.

 

१. दिवाळी अंकाचं प्रकाशन सुरू झाल्यावर ऐसीच्या मुख्य पानावर फक्त दिवाळी अंकातल्या साहित्याचे धागे दिसतील.

२. मुख्य पानावर एरवी जे दिसतं ते सगळं पाहायचं असेल तर ‘नवीन लेखन’ या दुव्यावरून बघता येईल. यात दिवाळी अंकातल्या लेखांचे धागे, आणि अंकाबाहेरचं साहित्य दिसेल.

३. दिवाळी अंकातल्या साहित्याच्या धाग्यांवर प्रतिक्रिया देता येणार नाहीत. अंकातल्या साहित्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी स्वतंत्र धागा असेल.

 

आधी सांगितलं नाही, असं म्हणू नका फक्त!