Skip to main content

ए०आय० आणि देशाचे भविष्य

ए०आय० आणि देशाचे भविष्य
===================

-राजीव उपाध्ये

काल माझ्या एका वृत्तपत्र संपादकांबरोबर फोनवर ए०आय० वर प्रदीर्घ गप्पा झाल्या. ए०आय० ने नोकर्‍यावर आणलेल्या संक्रातीमुळे ते पण हादरलेले वाटले. नोकर्‍यांच्या समस्येवर आणि त्या अनुषंगाने "मानवी श्रमप्रतिष्ठा" या वर आज थोडा (मार्केट बंद असल्यामुळे) विचार करायला वेळ मिळाला. या समस्या सोडवता येण्यासाठी अधिक खोलवर असलेले प्रश्न तपासून घेता आले पाहिजेत.

० कोणतीही अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होते तेव्हा प्रत्येक व्यक्तीने, कुटुंबाने आणि समाजाने वेगळ्या पद्द्धतीने प्रश्न/समस्यांचे स्वरूप तपासून उत्तरे शोधणे आवश्यक ठरते. सध्या अशी उत्तरे शोधायचा प्रयत्न होतो तेव्हा ही उत्तरे धर्म, संस्कृती यांच्या चष्म्यातून बघितली जातात. त्यांना भावनिक प्रतिसाद कसा मिळतो हे आत्ता सोन्याच्या खरेदी संदर्भात मोदीनी केलेल्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादात दिसले आहे. बहुतेक वेळा समाज जुने सांस्कृतिक फ्रेमवर्क वापरून नवीन संकटे समजावण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काही काळ “भावनिक स्थैर्य” मिळते, पण मूळ प्रश्न सुटत नाहीत.

० पण ए०आय० च्या युगात उत्पादनक्षमता मशीनकडे सरकली, तर “मानवी प्रतिष्ठा” कोणत्या आधारावर उभी राहणार? हा खरा प्रश्न आहे. कारण अनेक लोकांच्या जीवनात “मी कोण?” याचे उत्तर त्यांच्या कामातूनच येत असते. जर मोठ्या प्रमाणावर कामांचे स्वरूप बदलले, तर फक्त उत्पन्नाचा नव्हे तर अस्तित्वाचा आणि आत्ममूल्याचा प्रश्न निर्माण होतो.

इथे धर्म आणि संस्कृती पुन्हा पुढे येतात. कारण ते व्यक्तीला “भूमिका” आणि “अर्थ” देतात. पण त्यातही दोन शक्यता असतात:

एक म्हणजे समाज नव्या वास्तवाशी जुळवून घेणारे नवे नैतिक तत्त्वज्ञान निर्माण करतो. दुसरी म्हणजे समाज भूतकाळातील प्रतीकांना अधिक घट्ट पकडून ठेवतो.

आज जगभर दुसरी प्रतिक्रिया जास्त दिसते आहे — ओळखींचे राजकारण, सांस्कृतिक राष्ट्रवाद, धार्मिक पुनरुज्जीवन, परंपरांचा आग्रह इत्यादी. कारण तांत्रिक बदलांची गती मानवी मानसिक अनुकूलनापेक्षा खूप वेगवान झाली आहे.

० जोपर्यंत समाज वेगळा विचार करणार्‍यांना, प्रश्न विचारणार्‍यांना नाऊमेद करतो तो पर्यंत फार काही साधले जाईल असे मला वाटत नाही.

त्यामुळे सध्या तरी माझे भारताच्या भविष्याविषयीचे मत फारसे चांगले नाही. आपण ए०आय०ची स्पर्धा हरलो आहोत...

सुधीर Thu, 28/05/2026 - 11:15

पण ए०आय० च्या युगात उत्पादनक्षमता मशीनकडे सरकली, तर “मानवी प्रतिष्ठा” कोणत्या आधारावर उभी राहणार? हा खरा प्रश्न आहे. कारण अनेक लोकांच्या जीवनात “मी कोण?” याचे उत्तर त्यांच्या कामातूनच येत असते. जर मोठ्या प्रमाणावर कामांचे स्वरूप बदलले, तर फक्त उत्पन्नाचा नव्हे तर अस्तित्वाचा आणि आत्ममूल्याचा प्रश्न निर्माण होतो.

Big Data algorithms might create digital dictatorships in which all power is concentrated in the hands of a tiny elite while most people suffer not from exploitation, but from something far worse – irrelevance.

It is much harder to struggle against irrelevance than against exploitation. 

हा मुद्दा हरारीने त्याच्या २१ लेसन्स मध्ये मांडला होता... तरीही येणारा काळच ठरवेल नेमके किती जॉब्स जातील, त्याप्रमाणात नवीन किती तयार होतील? सध्यातरी कोडींग स्किल्स आउट्डेटेड होताना दिसत आहेत...
 

तर्कतीर्थ Thu, 28/05/2026 - 11:27

In reply to by सुधीर

सहमत आहे.

नुकतेच मी क्लॉडचे सशुल्क सभासदत्व घेतले. मला पुढच्य १० वर्षात ज्या कल्पना सुचल्या नसत्या त्या १० दिवसात इम्प्लीमेण्ट करून दिल्या.

मी "आर" मध्ये प्रोग्रामिंग करतो. आयुष्यात १४००० ओळींचे "आर कोड" ते पण १० दिवसात लिहीन असे वाटले नव्हते. लोकांचे जॉब गेले नाहीत तर नवल ते काय?

Rajesh188 Thu, 28/05/2026 - 20:21

Ai वर मी अनेक प्लॅटफॉर्म जाऊन वाचतो ऐकतो.
Ai human work फोर्स कमी करेल काही तर human work फोर्स पूर्ण नष्ट करेल असे च सांगत असतात.

आणि हे सांगणारे सर्व 45 प्लस वय असणारे च असतात. अगदी 65 प्लस वय असणारे पण आहेत.
ह्यांचे स्वतः चे आयुष्य स्थिर नोकरीं मध्ये गेलेले असते. त्यांना भविष्यातील ai विषयी काही हि ज्ञान नसते कोडींग भोवती च हे फिरत असतात कारण त्यानं तेच माहित असते.
Ai चे परिणाम ह्या वर 20 ते 30 minus वय असणारे तरुण पिढी च एक पण लेख तुम्हाला शोधून सापडणार नाही. ना you tube वर video सापडेल. कारण त्यांना आधुनिक ai माहित आहे त्याचे परिणाम पण माहित आहेत.
ज्यांनी मार्गदर्शन करायचे ते फक्त भीती पसरवण्यात पुढे आहेत. त्यांच्या कडे उपाय नाहीत कारण त्यांना तितक आधुनिक ai समजलेले नाही.
Ai म्हणजे सर्व काही असते, ai सर्व च काम करणार असेल तर ज्या देशांची लोकसंख्या वेगाने कमी होत आहे आणि zero वाढ कडे त्यांची वाटचाल चालू. आहे त्यांना भीती ने ग्रासले नसते. अनेक प्रगत देश लोकसंख्या च्या घडत्या आकड्या नी चिंतीत आहेत..

तर्कतीर्थ Thu, 28/05/2026 - 20:43

In reply to by Rajesh188

>>> स्वतः चे आयुष्य स्थिर नोकरीं मध्ये गेलेले असते. त्यांना भविष्यातील ai विषयी काही हि ज्ञान नसते

हे विधान तुम्ही कशाच्या जोरावर केले बुवा?