सूचना
सध्यापुरतं अपडेटचं काम झालेलं आहे. याचे कुठलेही दृश्य बदल नाहीत.
दिनवैशिष्ट्य
७ डिसेंबर
जन्मदिवस : रोमन राजकारणी व लेखक सिसेरो (४३), चित्रकार व शिल्पकार बर्निनी (१५९८), प्राच्यविद्या संशोधक द्यूपेराँ (१७३१), जादूगार हुदिनी (१८०५), लेखक इंतजार हुसेन (१९२३), विचारवंत व भाषाशास्त्रज्ञ नोम चॉम्स्की (१९२८)
मृत्युदिवस : कवी भा.रा. तांबे (१९४१), लेखक, पत्रकार, मुंबई पत्रकार संघाचे संस्थापक आणि दैनिक ‘प्रभात’चे संपादक श्रीपाद शंकर नवरे (१९५९), कवी रॉबर्ट ग्रेव्हज (१९८५), अभिनेत्री व लेखिका स्नेहप्रभा प्रधान (१९९३)
---
जागतिक नागरी विमान उड्डयन दिन.
ध्वजदिन (भारत).
१८७७ : एडिसनने पहिल्या फोनोग्राफचे प्रात्यक्षिक दाखवले.
१८८८ : जॉन डनलॉपने हवा भरलेल्या टायरसाठी पेटंट दाखल केले.
१९४१ : दुसरे महायुद्ध - जपानच्या नौदलाने अमेरिकेवर पर्ल हार्बर येथे हल्ला केला.
१९७५ : इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.
१९८८ : सैन्य आणि शस्त्रकपातीची घोषणा करून रशियन अध्यक्ष गोर्बाचेव्ह यांनी जगाला धक्का दिला. सोव्हिएत महासत्तेच्या विसर्जनातला एक टप्पा.
२००१ : अमेरिकन हवाई हल्ल्यांमुळे तालिबानला कंदाहारवरचा ताबा सोडणे भाग पडले.
२००४ : हमीद करझाई अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी.
२००९ : कोपनेहेगन येथे हवामान परिषद सुरू.
दिवाळी अंक २०२४
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
.
हा जो काही प्रकार आहे, त्यामागील प्रयोजन कळले नाही.
(अर्थात, आम्हाला काय समजते म्हणा! शिवाय, लेखाखाली ‘धनंजय’ असे नाव पाहिले, की मागचापुढचा विचार न करता ‘वावा’ म्हणावे, हा जालप्रघात अंमळ जुनाच आहे. दुर्दैवाने, आम्हाला ते जमत नाही — (स्वतःशीच) प्रामाणिकपणा नको तेथे आड येतो — नि मग (आमची) अशी गोची होते. त्यात पुन्हा, हिंदुस्तानी काय किंवा पाश्चात्य काय (किंवा फॉर्दॅट्मॅटर कर्नाटक काय), शास्त्रीय संगीतातले किंवा तुमच्या त्या पांढरी पाच–आसावरी थाट–Aeolian mode–मूर्छना (की मूर्च्छना?)–ग्राम/किलोग्राम–झालेच तर बाखच्या कृतींतील वैशिष्ट्ये-चर्चसंगीतातल्या थाटांचा इतिहास वगैरे भानगडींतले आम्हाला काही म्हणजे काही कळतही नाही, नि कळत असल्याचा आव चारचौघांत आणताही येत नाही. उपस्थित सज्जनांना कदाचित हे सर्व समजत (आणि/किंवा जमत) असेलही; मला त्यांच्याविषयी कोणताही आकस नाही. मात्र, एकीकडे हे वाजविलेले नि बडबडलेले डोक्यावरून जाते, नि दुसरीकडे पब्लिक त्यावर टीका करते त्यातलेही (बरोबर असो, वा चूक असो, परंतु) काही समजत नाही. मग मी फक्त त्या व्हिडियोत धनंजय बोलत असताना त्याच्या तोंडावर होणाऱ्या कथ्थक नर्तकांच्या (कथ्थकच ना ते? घ्या! आम्हाला त्यातलेही काही कळत नाही.) चेहऱ्यावरील बदलत्या हावभावांसारख्या हावभावांचे निरीक्षण करून स्वतःची करमणूक करून घेतो, झाले! (ते योग्य नसेलही कदाचित, परंतु, इलाज काय?) चालायचेच!)
परंतु मी काय म्हणतो, की ठीक आहे, धनंजय इथे जे काही करीत आहे, ते उच्च, इंप्रेसिव वगैरे असेलही, आणि, चारचौघांना त्यावर लेक्चर देण्याची ऊर्मी/हुक्की त्याला येणे हेही समजण्यासारखे आहे; नव्हे, ते स्वातंत्र्य त्याला आहे. त्याकरिता त्याने यूट्यूबवर काही व्हिडियो चढविला, हेही ठीकच आहे. ज्यांना त्यात रस अथवा गम्य आहे, ते तेथे जाऊन ते पाहू शकतात आणि वाटल्यास त्यावर बरीवाईट टीकाही करू शकतात. (दुर्दैवाने, मला त्यात यत्किंचितही समज नसल्याकारणाने, मी त्या वाटेस फिरकत नाही, आणि, हा व्हिडियो जर फक्त यूट्यूबवर प्रकाशित केला असता, तर मी त्याकडे ढुंकून पाहिलेही नसते.) इथवर कोणालाच काही आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु…
…हा प्रकार आम जनतेच्या माथी नक्की कशासाठी? तेही, दिवाळी अंकात?
लक्षात घ्या, एका आम वाचकाच्या पर्स्पेक्टिवातून मी हे लिहीत आहे. कदाचित माझी तुलनेने नीचभ्रू लेव्हल यातून प्रकट होत असेलही, परंतु… सामान्य वाचक हाच प्रश्न विचारणार आहे, की बाबांनो, हे सर्व थोर असेलही (किंवा नसेलही), परंतु, दिवाळी अंकात हे छापून नक्की काय साधलेत?
असो चालायचेच.
प्रयोजन
तुम्हाला प्रयोजन समजले नाही, असे तुम्ही म्हणता, ते प्रामाणिकच आहे; खात्री आहे. परंतु क्रियेच्या दृष्टीने तुमच्या प्रतिसादातून जे काय प्रयोजन आहे, ते साध्य होते.
ऐसीअक्षरे स्थळाने प्रकाशनाच्या वेळी उपलब्ध असलेल्या यूट्यूब प्रतिसादांचा स्क्रीनशॉटही यूट्यूब विजेटखाली जोडला आहे. तुमच्या प्रतिसादातील नेमकी रूपके आणि प्रतिभा त्यांत नाहीच, तरी साधारण त्या सारांशाचे, किंवा आनुषंगिक मुद्दे असलेले काही प्रतिसाद त्यात सापडावेत. विचारपूर्वक प्रतिभा, रूपके वापरून तुम्ही कृती अलंकृत केली आहे.
तोंडावर होणाऱ्या कथ्थक
कथकली. (चुभूदेघे.)
कथकही चालेल वाटते
भारतातील सर्व नृत्य-नाट्य परंपरांमध्ये चेहऱ्यावरच्या प्रदर्शक हावभावांचे - मुद्रांचे - उपशास्त्र असते. कथकली, कथक (कुचिपुडी-यक्षगान) कुठलेही रूपक चालून जावे. अर्थात अधिक विवक्षित रूपक असेल -- म्हणजे रंगभूषेकरिता वापरलेली रंगसंगती, वगैरे, तर मग विवक्षित नृत्यपरंपरेचा उल्लेख अधिक नेमकी निवड करावी लागेल.
प्रतिसादासाठी माझा पास..
प्रतिसादासाठी माझा पास.....
पण विडिओ डाऊनलोड करून घेतला आहे ऐकण्यासाठी.