ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १७

प्रकरण १७ – ॲलोपथीतील बदल

सुधीर भिडे

विषय रचना

  • निदानासाठी चाचण्या
  • ॲलोपथीच्या प्रॅक्टिसचे बदलणारे स्वरूप
  • शल्य चिकित्सा
  • ॲलोपथीचे शिक्षण
  • चुकांची दुरुस्ती
  • शास्त्रीय वैद्यक आता परिपूर्ण झाले आहे का?
  • भारतात शास्त्रीय वैद्यकाच्या डॉक्टरांचे प्रमाण
  • शास्त्रीय वैद्यक 'पाश्चिमात्य' आहे का?
  • समालोचन

***

या भागात आपण गेल्या वीस-पंचवीस वर्षांत ॲलोपथीमध्ये बदल झाले त्या विषयी माहिती घेऊ. महत्त्वाचे बदल असे – निदानाच्या चाचण्या, विशेषज्ञांचे युग, टेलीमेडिसिन शल्यक्रिया आणि ॲलोपथीचे शिक्षण.


प्रतिमा तंत्र

निदानासाठी चाचण्या

गेल्या साठ-सत्तर वर्षांत ॲलोपथीच्या प्रॅक्टिसमध्ये जे अनेक बदल झाले आहेत त्यात एक मोठा बदल म्हणजे निदानासाठी चाचण्या. या चाचण्यांमुळे निदानातली अचूकता वाढत चालली आहे. दोन प्रकारच्या चाचण्या उपलब्ध आहेत.

शारीर द्रव्यांचे रासायनिक पृथक्करण (Chemical analysis of body fluids)

  • रक्तातील गुणतत्त्वे
  • यकृताचे काम कसे चालले आहे त्या संबंधी चाचण्या
  • मूत्रपिंडांचे काम कसे चालले आहे त्या संबंधी चाचण्या
  • शरीरात काही आजार असल्यास त्या संबंधीचे मार्कर्स
  • मूत्राचे पृथक्करण आणि मूत्रपिंडांचे कार्य
  • रक्तातील जीवनसत्वांचे प्रमाण

प्रतिमा तंत्र (Imaging techniques)
एक्स रे वापरून हाडांची स्थिति
हृदयाचे काम दाखविणाऱ्या चाचण्या

  • हृदयातील झडपांचे काम
  • हृदयातील रोहिण्यांमधले अडथळे
  • हृदयाचा आकार.

सॉफ्ट टिश्यूसाठी एम. आर. आय. आणि सी. टी. स्कॅन

  • मेंदूचे आजार
  • यकृताचे आजार

अल्ट्रासॉनिक वापरून आतल्या गाठींचा अभ्यास

  • पोटातील सर्व अवयवांचे आजार
  • एंडोस्कोपच्या साहाय्याने जठरापर्यंत स्थितीचा अभ्यास
  • एंडोस्कोपच्या सहाय्याने मोठ्या आतड्याचे आजार

ॲलोपथीच्या प्रॅक्टिसचे बदलणारे स्वरूप

विशेषज्ञांचे युग

साठ-सत्तर वर्षांपूर्वी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना होती. घरातील सर्वच व्यक्तींच्या सर्व आजारांवर उपचार ही व्यक्ती करत असे. गरज पडल्यास डॉक्टर घरी येऊन उपचार करत. कुटुंबाची नीट माहिती या डॉक्टरांना असे. औषधाचे प्रिस्क्रिप्शन हा प्रकार नव्हता. डॉक्टरांकडूनच औषध मिळत असे.

हळूहळू विशेषज्ञांचा काळ आला. स्त्रियांच्या आजारांसाठी तज्ज्ञ, हाडे आणि सांधे यांच्या उपचारासाठी निराळे तज्ज्ञ आले. आता सुपरस्पेशलायझेशन आले – गुडघे बदलणारी तज्ज्ञ निराळी तर मणक्याची तज्ज्ञ निराळी. डॉक्टरांनी घरी येऊन तपासणे हा प्रकार पूर्ण बंद झाला. घरी व्हिजिट पाहिजे असल्यास डॉक्टरांचा साहाय्यक येतो. हे साहाय्यक बहुतेक बी. ए. एम. एस. (आयुर्वेद) डॉक्टर्स असतात. त्यांची व्हिजिटिंग फी विशेषज्ञांच्या फीपेक्षा जास्त असते.

चाचण्या आणि चाचण्या

याच बरोबर रक्ताच्या चाचण्या आणि स्कॅन यांचे प्रमाण वाढले. अमेरिकेतील सी. डी. सी. यांच्या अंदाजाप्रमाणे अमेरिकेत १४०० कोटी चाचण्या दर वर्षी केल्या जातात आणि ७०% निदाने या चाचण्यांमधून केली जातात.

केवळ चाचण्यांवर निदान करणे किती सुरक्षित आहे? मेरीलंड मेडिकल स्कूलचे डॅनियल मॉर्गन यांच्या मते यात एक धोका असतो. बहुतेक चाचण्यांत ५% फॉल्स पॉझिटीव्हची शक्यता असते. केवळ टेस्ट पॉझिटीव्ह आली म्हणून लगेच इलाज चालू करणे धोकादायक होऊ शकते.

टेलीमेडिसिन

आता आपण टेलीमेडिसिनच्या काळात चाललो आहोत. माझ्या एका जवळच्या नातेवाइकाचा इंग्लंडमधील अनुभव सांगतो. या व्यक्तीस रोज संध्याकाळी थोडा ताप येऊ लागला. तिथल्या सरकारी आरोग्यव्यवस्था, नॅशनल हेल्थ सर्व्हिसला (एन. एच. एस.) कळविले. डॉक्टर टेलिफोनवरच बोलले. डॉक्टरांनी बऱ्याच चाचण्या करायला सांगितल्या. डॉक्टरने हाताला रक्तदाब आणि नाडी मोजणारे घड्याळ बांधायला सांगितले. ते घड्याळ निकाल डॉक्टरकडे पाठवीत असे. एन. एच. एस.च्या प्रयोगशाळेत चाचण्या करण्यात आल्या. निकाल डॉक्टराकडे गेले. या चाचण्यांमध्ये डॉक्टरांना मधुमेहाचा संशय आला. मग नवीन चाचण्या चालू झाल्या. या प्रकारात दोन आठवडे गेले होते आणि या व्यक्तीचा आजारही औषध न घेताच गेला होता. या नंतर आहारातज्ज्ञांकडून समुपदेशन चालू झाले. हे सर्व फक्त टेलिफोनवर. रोग्याने एन. एच. एस.मधील कोणाचे तोंडही पाहिले नव्हते. आता रोग्यास दर पंधरा दिवसांनी मधुमेहाच्या आहारतज्ज्ञाशी बोलावे लागते. आणि हे सर्व फुकट – एकही पैसा खर्च न करता आणि डॉक्टरांचे तोंडही न पाहता. (पैसे खर्च न करता याचा अर्थ पूर्ण फुकट नाही. इंग्लंडचा प्रत्येक रहिवासी उत्पन्नाच्या १२% विमा भरत असतो. - माझे इंग्लंडनिवासी मित्र प्रकाश कोरडे यांनी सुचविलेली सुधारणा)

उत्तरांचल सरकारने आता टेलीमेडिसिन अधिकृतरीत्या स्वीकारले आहे. २२ डिसेंबर २०२२ रोजी टाइम्समध्ये आलेल्या माहितीप्रमाणे तिथली चार मोठी इस्पितळे प्रत्येकी शंभर प्राथमिक आरोग्य केंद्रांना जोडली जातील. त्या केंद्रांतील रोग्यांची तपासणी टेलीमेडिसिनने केली जाईल.

शल्यचिकित्सा

पूर्वीच्या काळी आयुर्वेदात आणि पाश्चिमात्य वैद्यकात, एकंदर उपचारपद्धतींत शल्यचिकित्सेचे महत्त्व सीमित होते. युद्धात आणि अपघातात झालेल्या जखमांचा इलाज असे प्रामुख्याने शल्यचिकित्सेचे स्वरूप होते. ॲलोपथीने शल्यक्रियेत फार मोठी प्रगती केली आहे. अपघात आणि युद्धातील जखमा यांपलीकडे शल्यक्रिया मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. याची कारणे आहेत –

  • निरनिराळ्या मायक्रोबमुळे होणारे संसर्ग आणि त्यासाठी निर्जंतुकीकरणाचे महत्त्व लक्षात आले.
  • भूल देण्याच्या तंत्रात कमालीच्या सुधारणा झाल्या. आता शल्यक्रियेच्या वेळी रोग्याच्या तब्येतीचे नियंत्रण पूर्णपणे भूलतज्ज्ञाकडे असते. त्यामुळे सर्जन शल्यक्रियेवर लक्ष केंद्रित करू शकते.
  • काही शल्यक्रियांदरम्यान रोबॉट्स सर्जनला मदत करतात.
  • काही शस्त्रक्रिया दुर्बिणीतून होत असल्याने रोग्याच्या दृष्टीने कमी त्रासात होऊ लागल्या.

A total of 3646 surgeries were estimated annually to meet the surgical needs of 100000 Indian population as compared to the global estimate of 5000 surgeries per 100000 people. Caesarean section, cataract, surgeries for fractures and hernia are the major contributors to the surgical needs.

World J Surg, 2021 Jan;45

In an estimate for the year before Covid-19 struck India, a staggering two crore surgeries had been conducted in the country in a single year.

APN News Sept 2022.

अमेरिकेत एका वर्षात ज्या शल्यक्रिया सर्वाधिक प्रमाणात केल्या जातात त्या याप्रमाणे –

Type of surgery Number of surgeries
Cataract removal 3000000
C-section 13,00,000
Hip replacement 3,30,000
Knee replacement 7,20,000
Broken bones 6,70,000
Angioplasty 5,00,000
Stent 4,50,000
Hysterectomy 5,00,000
Gallbladder removal 4,60,000
Heart bypass 3,95,000

आपण हे पाहिले की आधुनिक चाचण्यांचे तंत्र आणि आधुनिक शल्यक्रिया यांविषयीचे शिक्षण आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांनाही दिले जाते.

ॲलोपथीचे शिक्षण

भारत सरकारने २०२२-२३पर्यंत एक लाख मेडिकलच्या सीट्सचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारतात सध्या ६१२ मेडिकल कॉलेजे आहेत ज्यात ९२,७९३ सीट्स आहेत. यांपैकी ४८,००० सीट्स सरकारी कॉलेजांमध्ये आहेत. याचा अर्थ जवळजवळ ५०% सीट्स खाजगी कॉलेजांमध्ये आहेत.

Obsession with the quantity of doctors has resulted in opening large numbers of private colleges with poor facilities leading to churning out of thousands of poorly trained doctors.

(TOI 9 – 9 – 22).

Common Entrance test, NEET is conducted by the National Testing Agency. In 2021, out of 16 lakh students who took the test, about 8 lakh cleared it. Generally, candidates who score 600 and above out of 720, can eye seats in government colleges and the ones below that, between 450 and 600 are left to the mercy of private colleges. While the government colleges offer subsidised undergraduate medical education at around Rs 5 lakh for MBBS, the lowest fee for the complete course in any private college is over Rs 70 lakh.

(Outlook 8 – 9 – 22).

भारतात ॲलोपथीच्या शिक्षणातील गुणवत्तेची जबाबदारी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे आहे. या बाबतीत एक लेख पाहू.

Quality can be assured by transparent selection procedures, well-established entrance examinations, centrally regulated curricula, self-evaluation and academic audits conducted by the institutions themselves, appointing external examiners and requirement of national examinations before licensure. The initiatives taken by MCI recently meet most of these criteria for quality assurance. MCI has proposed common entrance examinations, the curricula are regulated by MCI, and it has also proposed a national common licensure examination to be implemented from 2015. The final university examinations are conducted by using external examiners.

More than 70 countries in the world are following the quality assurance and accreditation systems based on an external review. In India, National Assessment and Accreditation Council (NAAC) was established in 1994, by the University Grants Commission (UGC), to assess and accredit higher education institutions in the country. Although NAAC has addressed the issue of accreditation of health science institutions, not all the medical colleges are eligible for external review by NAAC. Medical education in India needs to catch up with international accreditation standards, based on WFME (World Federation for Medical Education) global standards.

(Quality assurance in medical education, Medha A. Joshi, Indian Journal of Pharmacology. 2012 May-Jun; 44(3): 285–287.)

एम. बी. बी. एस.चे शिक्षण देणाऱ्या संस्था मोठ्या रुग्णालयांशी संलग्न असण्याची गरज असते. याबाबत वृत्तपत्रात आलेली एक बातमी पाहू.

Only institutions that have had a hospital functioning for at least three years will now be allowed to start MBBS courses and open medical colleges, the medical education regulator has now ruled. Government data shows that nearly 40 of around 90 medical colleges which got permission to operate since 2011 were denied renewals later following inspections, mainly because the hospitals attached with them were grossly inadequate on several counts.

(Indian Express, 19th April 2019)

National Medical Commissionच्या (NMC) नव्या आदेशानुसार १०० एम. बी. बी. एस.च्या जागांसाठी ४३० खाटांच्या रुग्णालयाची गरज आहे. (आयुष महाविद्यालयांसाठी हे प्रमाण १:१ आहे, असे का?)

अशा प्रकारच्या सर्व सतर्कतेमुळे सरकारी कॉलेजांमधून पदवी घेतलेल्या एम. बी. बी. एस. पदवीविषयी एक विश्वास निर्माण होतो. खाजगी कॉलेजांमधून शिकलेल्या डॉक्टरांची गुणवत्ता प्रश्नांकित असते; कारण –

Corruption in approval of colleges, lack of infrastructure and faculty, sale of seats (referred to as capitation fee).

– ToI, 28 Dec,22

College of Physicians and Surgeons (CPS)

या संस्थेची स्थापना १९१२ साली Royal College of Physicians and Surgeonsच्या धर्तीवर झाली. ही संस्था एम. बी. बी. एस. पास झालेल्या डॉक्टरांसाठी विशेषज्ञाचे डिप्लोमा आणि फेलो कोर्सेस शिकविते. सध्या सुमारे २००० डॉक्टर यांचा फायदा घेत आहेत. त्यांपैकी महाराष्ट्रात १००० डॉक्टर्स शिकत आहे. इतर सर्व संस्थांप्रमाणे ही संस्थासुद्धा सध्या वादात आहे.

चुकांची दुरुस्ती

शास्त्रीय वैद्यकात चुका झाल्या नाहीत किंवा होत नाहीत असे अजिबात नाही. पण त्या चुका उजेडात आणल्या जातात. याचा फायदा हा की दुसऱ्या कोणी ती चूक करू नये.

१९५७ साली एका जर्मन कंपनीने thalidomide औषध बाजारात आणले. असे लक्षात आले की या औषधाने उलट्यांचा त्रास कमी होतो. मग हे औषध गर्भार स्त्रियांना देण्यास सुरुवात झाली; ज्यांना सकाळी उलट्यांचा त्रास होतो. १९६०नंतर असे लक्षात आले की हे औषध घेतलेल्या स्त्रियांच्या मुलांना जन्मदोष आहेत. यानंतर हे औषध लगेच बंद करण्यात आले.

१९६० आणि ७०च्या दशकात शल्यक्रियेच्या वेळी भूल देण्यासाठी नायट्रस ऑक्साइड, इथर आणि क्लोरोफॉर्म यांचा वापर होत असे. या घटकांच्या वापरातून निरनिराळे प्रश्न दिसून आले. मग संशोधन होऊन नवीन औषधे आणि प्रणाली शोधून काढल्या गेल्या; आणि नायट्रस ओक्साइड, इथर आणि क्लोरोफॉर्म यांचा वापर बंद करण्यात आला.

जीवाणूंसाठी sulfonamide औषधे १९३५च्या सुमारास वापरली जाऊ लागली. साधारण १९६०च्या सुमारास हे लक्षात आले की या जिवाणूंनी या औषधांवर मात केली आहे. याशिवाय ही औषधे बरेच साईड इफेक्ट्स देत असत. त्याकरिता नवीन औषधे शोधण्यात आली, जी जिवाणूंशी लढा देतात आणि त्यांचे साईड इफेक्ट्स कमी आहेत. त्यानंतर सल्फा औषधांचा उपयोग कमी झाला.

ज्यांचे उत्पादन आता बंद झाले आहे अशी आणखी काही औषधे –
वालडेको क्सीब हे औषध २००१ ते २००५ या काळात विकले जात होते. या औषधामुळे हृदयरोगाचे प्रमाण वाढलेले दिसले. तेव्हा औषध बंद करण्यात आले. पेमोलीन हे औषध मज्जासंस्थेच्या आजारांवर १९७५पासून वापरले जायचे. १९९९ साली असे दिसून आले की औषधाचे यकृतावर दुष्परिणाम होतात. २०१० साली हे औषध वापरातून काढून टाकण्यात आले. ही दोन उदाहरणे नवीद सालेह यांनी एम. डी. लिंक्ससाठी लिहिलेल्या २५ मार्च २०२०च्या लेखातून घेतली आहे.

अशा प्रकारे अनुभवावरून शास्त्र शिकत जाते आणि बदल केले जातात.

शास्त्रीय वैद्यक आता परिपूर्ण झाले आहे का?

अर्थातच नाही! शास्त्रात परिपूर्णता अशी काही गोष्ट नाही. शास्त्र सदैव प्रगतीशील असते हे आपण पहिल्या भागात पाहिलेच. शास्त्रीय वैद्यकाचे असेच आहे. नवी औषधे येतील, नव्या चाचण्या येतील, आजार बरा करण्याच्या नव्या पद्धती येतील, नवीन शल्यक्रियेच्या पद्धती येतील आणि जुन्या गोष्टी इतिहासजमा होतील. हेच शास्त्रीय वैद्यकाचे शक्तीस्थान आहे.

भारतात शास्त्रीय वैद्यकाच्या डॉक्टरांचे प्रमाण

भारतात १५०० लोकांमागे एक डॉक्टर आहे. WHOच्या निर्देशांनुसार दर हजारी एक डॉक्टर असणे आवश्यक आहे. (हे उद्दिष्ट २०२४पर्यंत साध्य होईल असे वाटते.) जर आपण सरकारी हॉस्पिटलांचा विचार केला तर हे प्रमाण फारच वाईट आहे. बहुतेक प्रांतात १०,०००पेक्षा जास्त लोकांमध्ये एक सरकारी डॉक्टर आहे. याचा अर्थ बहुसंख्य डॉक्टर खाजगी प्रॅक्टिस करत असतात. ही आकडेवारी अजून एक सत्य लपविते. ते म्हणजे ग्रामीण भागात काम करणाऱ्या डॉक्टरांची संख्या फारच कमी आहे. याचा अर्थ ग्रामीण भागांत हे चित्र अजूनच वाईट आहे.

शास्त्रीय वैद्यक ‘पाश्चिमात्य’ आहे?

शास्त्रीय वैद्यकाची सुरुवात युरोपमध्ये झाली. अजूनही या क्षेत्रातील मोठे शोध पाश्चिमात्य जगातच लागतात. जपान, चीन, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर या देशांत पुष्कळ प्रगती होत आहे. परंतु तरीही हे शास्त्र अजूनही पाश्चिमात्य देशात जास्त वेगाने प्रगत होत आहे. भारत आता अशा स्थितीत येऊन पोचला आहे की जे नवे तंत्र विकसित होते ते आपण लगेच आत्मसात करू शकतो.

हे शास्त्र पाश्चिमात्य आहे म्हणून आपण फायदा घ्यायचा नाही का? मग तसा विचार केला तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितही पाश्चिमात्यच आहेत. कारण अजूनही शास्त्रातील नोबेल आणि तत्सम पारितोषिकेही बहुसंख्येने पाश्चिमात्य शास्त्रज्ञांना मिळतात. ज्ञान हे ज्ञान असते त्याला कोणताही रंग नसतो. शास्त्रीय वैद्यक पाश्चिमात्य जगात विकसित झाले यासाठी ते ज्ञान आपले नाही असा विचार चुकीचा आहे.

समालोचन

ॲलोपथीच्या प्रॅक्टिसमध्ये गेल्या पन्नास वर्षांत मोठे बदल झाले आहेत. विविध प्रकारच्या चाचण्यांमुळे रोगाचे निदान करणे सुलभ झाले आहे. टेलीमेडिसिनचा वापर अधिकाधिक होत जाईल अशी चिन्हे आहेत. शल्यक्रियेत फार सुधारणा झाल्या आहेत.

शिक्षणाचा विचार केला तर अधिक संख्येने डॉक्टर्स शिकत आहेत हे चांगली स्थिती आहे परंतु गुणवत्तेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

क्रमशः
***

भाग १ - शास्त्रीय दृष्टीकोनातून निरनिराळ्या वैद्यकीय प्रणालींचे मूल्यांकन
भाग २ - ॲलोपथीच्या आधीचे पाश्चिमात्य वैद्यक
भाग ३ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त
भाग ४ - आयुर्वेदाचे मूल सिद्धान्त – त्रिदोष
भाग ५ - परीक्षा आणि चिकित्सा
भाग ६ - आयुर्वेदाची औषधे – भाग १
भाग ७ - आयुर्वेदाची औषधे – भाग २
भाग ८ - आयुर्वेदाचे शिक्षण आणि नंतर
भाग ९ - आयुर्वेदाची प्रॅक्टीस
भाग १० - युनानी आणि सिद्ध
भाग ११ - निसर्गोपचार
भाग १२ - होमिओपॅथी आणि बाराक्षार
भाग १३ - होमिओपॅथी आणि बाराक्षार
भाग १४, १५ - ॲक्युपंक्चर आणि आयुष
प्रकरण १६ - ॲलोपथी

field_vote: 
0
No votes yet

क्लोरोफॉर्म किंवा तत्सम पदार्थ नाकावाटे हुंगवून बेशुद्ध करणे हा प्रकार वयाच्या पाचव्या वर्षी टॉन्सिल ऑपरेशन झालं तेव्हा माझ्यावर वापरला गेला होता. साधारण ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीचा काळ.

नाकावर काहीतरी स्पंज किंवा तत्सम दाबून धरले गेले. घुसमटून श्वास थांबतोय अशा प्रकारची काही क्षण प्रचंड घबराट झाली.
तो वास कधीही विसरणार नाही. पुढे बराच काळ दहशत बसली होती.
जवळपास मृत्यू असाच तो अनुभव होता. आता हे वापरत नाहीत असे वाचून बरे वाटले. मी ऐकले होते की काही प्रकारच्या सर्जरीज मध्ये अजूनही नाकावाटे भूल द्यावी लागते. खरे काय ते माहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोजून चार आठवड्यांपूर्वी माझी एक मोठी सर्जरी झाली. जनरल ॲनास्थेशिया दिला होता, तो सलाईनमधून. सर्जन तयार झाली तेव्हा काही पदार्थ, मला सांगून, त्यात टोचला. काही 'औषध' दिल्याचं मला काही समजलंही नाही. आणि जेमतेम चार-पाच मिनीटांत मी आऊट!

त्या ॲनास्थेशियामुळे सर्जरीनंतर जवळजवळ दीड दिवस नॉशिया आला होता. दुसऱ्या दिवशी थोडं खाऊ शकले; पण भुकेची भावना व्हायला दीड दिवस लागला.

सर्जरीनंतर जाग आली तर मध्ये चार तास गेले होते; ते मला समजलंही नव्हतं. जाग आल्यावर पुरेशी वेदनाशामकं सलाईनमधूनच देत होते; त्यामुळे फार दुखलंही नाही. सर्जरीनंतर दोन दिवसांत मी बसल्याजागी काम करायला सुरुवात केली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माझ्या (तीनचार वर्षांपूर्वी झालेल्या) कोलोनॉस्कोपीचे रसभरित वर्णन करण्याची उबळ या निमित्ताने आली होती, परंतु, कालमानपरत्वे नि वयोमानपरत्वे तपशील फारसे आठवत नसल्याकारणाने तूर्तास सोडून देतो.

बॉटमलाईन (पन इंटेंडेड):

मी ऐकले होते की काही प्रकारच्या सर्जरीजप्रोसीजर्स मध्ये अजूनही नाकावाटे भूल द्यावी लागते.

हे विधान खरे आहे.

(असो; माझे बोलून संपले. आता, इतर सर्वांना आपापल्या शस्त्रक्रियांच्या/वैद्यकीय प्रक्रियांच्या गुह्यतम (गुह्य = गोपनीय, लपविण्याजोगे; पर्यायाने, खाजगी.) तपशिलांचे तोंड (तथा आणखीही काही) फाटेपर्यंत वर्णन करावयास मैदान, रान, तथा मंच मोकळा करून देऊन मी विनम्रपणे खाली बसतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉक्टरच नव्हे तर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेची योग्य चचणी अनिवार्य असणे जरूरी आहे.
गुणवत्ते बरोबरच सावधानता देखिल महत्वाची ..

लेखात उल्लेख केलेल्या चुकांची दुरूस्ती उत्तमच परंतु ते वाचताना विचार आला, औषधाचे अथवा उपचार प्रणालीचे दुष्परिणाम लक्षात येईपर्यंत त्याचा वापर कितीजणांनी केला असेल? आणि त्यांचे किती नुकसान झाले असेल? कल्पना करवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

Microbiology ची मधील अती उच्च दर्जा चे तज्ञ.

रोग निदान करण्यासाठी, सर्व प्रकारची यंत्र बनवणारे अती उच्च दर्जा चे तज्ञ.
ही लोक सर्वोच्च स्थानी आहे...
शरीराचे कार्य , biochemical reaction
हे microbiology चे तज्ञ च उत्तम रित्या समजतात..
आणि त्यांच्या शी काही ही संबंध नसणारे स्वार्थी allopathy चे प्रॅक्टिस करणारे डॉक्टर संबंध जोडत असतात..

Allopathy असू किंवा homeopathy.
किंवा बाकी etc.
ह्यांचं सर्व डोलाराच वरील दोन क्षेत्रातील उच्च दर्जा च्या तज्ञ
लोकांवर च आहे.
एमबीबीएस किंवा बाकी डॉक्टर लोकांनी आरोग्य शास्त्र मधील सर्वोच्च स्थान त्यांचे आहे है समजू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेल्या वर्षीपासुन केन्द्र सरकारचे eSanjeevani नामक पोर्टल/अप सुरू झालेले वाचले होते. भारतातुन कुठनही डाक्टरला दाखवता येते त्या पोर्टल्वरुन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0