दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
३ जून
जन्मदिवस : लेखिका आनंदीबाई शिर्के (१८८२), प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार व 'प्रभात'च्या सुवर्णकाळातील दिग्दर्शक बाबुराव पेंटर (१८९०), सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान (१८९०), संतवाङ्मयाचे अभ्यासक आणि संपादक तुकारामतात्या पडवळ (१८९८), ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मल्याळी साहित्यिक जी. शंकर कुरूप (१९०१), गायिका व नर्तिका जोसेफीन बेकर (१९०६), सिनेदिग्दर्शक आलँ रेने (१९२२), अभिनेता टोनी कर्टिस (१९२५), कवी अॅलन जिन्सबर्ग (१९२६), क्रिकेटपटू वसीम अक्रम (१९६६), टेनिसपटू राफाएल नादाल (१९८६)
मृत्युदिवस : संगीतकार जॉर्ज बिझे (१८७५), लेखक फ्रान्झ काफ्का (१९२४), उद्योगपती सर दोराबजी टाटा (१९३२), नाटककार, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक वीर वामनराव जोशी (१९५६), सिनेदिग्दर्शक रोबेर्तो रोसेलिनी (१९७७), स्नायूंमध्ये तयार होणारी उष्णता आणि यांत्रिक कार्य यांचा अभ्यास करणारा नोबेलविजेता आर्चिबाल्ड हिल (१९७७), अभिनेता अँथनी क्विन (२००१), संपादक व लेखक राम पटवर्धन (२०१४)
---
१८१८ : पेशवे दुसरे बाजीराव यांचे इंग्रजांसमोर आत्मसमर्पण. पेशवाईचा अंत.
१९४० : दुसरे महायुद्ध - डंकर्कची माघार.
१९४७ : भारताच्या फाळणीची माउंटबँटन योजना सादर.
१९६८ : चित्रकार व माध्यम कलाकार अँडी वॉरहॉलवर खुनी हल्ला.
१९८४ : 'ऑपरेशन ब्लू-स्टार'ची सांगता.
१९८९ : थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या निदर्शकांना पांगवण्यासाठी चीनने लष्कर पाठवले.
१९९१ : जपानमध्ये माऊंट उंझेन ज्वालामुखीचा उद्रेक. ४३ पत्रकार व संशोधकांचा मृत्यू.
२०१३ : 'विकीलीक्स'ला महत्त्वाची गुप्त कागदपत्रे पुरवल्याबद्दल अमेरिकन सैनिक ब्रॅडली मॅनिंगवर (नंतरची चेल्सी मॅनिंग) खटला सुरू.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- पुंबा
प्रतिक्रिया
ब्रह्मांड
संपूर्ण ब्रह्मांडात फिरवून आणण्याची ताकद असलेली ही कविता, तिसऱ्या ओळीत आम्हां मर्त्य मानवांना IPL मध्ये पोचवते.
?
स्वत:ला आवडलेल्या स्वत:च्या कवितांचा तुम्ही एक संग्रह का नाही करत? मी म्हणेन की तसं काहीतरी करून त्याची पीडीएफ करून स्वत:च्या जन्मदत्त नावाने आर्काईव्ह्स वर टाकून द्या आणि विसरून जा. लोक वाचतील. ज्यांना त्या आवडतील त्यांना आवडतील. कविता त्यासाठीच असतात.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
!
यावरून एक जुना विनोद आठवला.
एकदा एक मनुष्य आपल्याशीच मोठ्याने गाणे म्हणत असता त्याच्या मित्राने ते ऐकले, नि त्यासि वदता झाला: “मित्रा, तू रेडिओवर का बरे गात नाहीस?”
मनुष्य, खूष होत्साता: “का रे बुवा? मी इतका चांगला गातो काय?”
“तसे नव्हे रे! परंतु, रेडिओ बंद करता येतो.”
—————
(अवांतर: रेडिओ त्यासाठीच असतो.)
!?
स्वयंघोषित गायकाची मुंडी पिरगळून त्यास गप्प करण्याने जितके समाधान मिळेल तेवढे रेडिओची खुंटी पिरगळून तो बंद करण्याने मिळेल काय?
(अवांतर: मित्राच्या समाधानासाठी कायपण)
अर्थातच नाही!
अर्थातच नाही!
त्या परमोच्च सुखाची सर दुसऱ्या कशालाच नाही.
मात्र, समाजात काही गोष्टी करता येत नाहीत. सबब, कशाचीतरी तहान दुसऱ्या (समाजमान्य) कशानेतरी भागवावी लागते, झाले.१
(या प्रकारास sublimation असे संबोधले जाते.)
असो चालायचेच.
—————
१ “तुझे अपना नहीं सकता, मगर इतना भी क्या कम है, कि कुछ घड़ियाँ तेरे ख़्वाबों में खो कर जी लिया मैं ने?”? (साहिर लुधियानवी.)