"काळे रहस्य"

"काळे रहस्य" कादंबरी
लेखक : मकरंद साठे
पॉप्युलर प्रकाशन.
पहिली आवृत्ती : २०१५

Kale Rahasya - Makarand Sathe

अनेक पुस्तकं आपल्याला वाचताना आणि वाचून झाल्यावर उंचसखलतेचा अनुभव देतात. उंचसखल म्हणजे त्यातल्या आस्वादप्रक्रियेतली उंचसखलता. मकरंद साठे यांची "काळे रहस्य" ही कादंबरी वाचताना असा अनुभव आला.

माझी साठे यांच्याबद्दलची या आधीची ओळख नाटककार, कादंबरीकार आणि नाटकांच्या इतिहासाचे अभ्यासक या नात्याने होती. त्यांची सुमारे पंधरासतरा वर्षांपूर्वी आलेली "अच्युत आठवले आणि आठवण" ही कादंबरी माझा प्रयत्न असफल ठरलेला होता. "नेव्हल गेझिंग" या विभागात मी तिची वर्णी माझ्यापुरती लावलेली होती. त्यांच्या मराठी नाट्यव्यवहाराच्या इतिहासाचे खंड मी पाहिलेले आहेत आणि ते त्यांचं काम नक्कीच त्यांना आदरास पात्र बनवतं. (कधीतरी ते खंड वाचायची मनापासून इच्छा आहे.) त्यांचं सॉक्रेटिसच्या आयुष्यावरचं "सूर्य पाहिलेला माणूस" मला लागूंच्या भूमिकेमुळे आवडलेलं होतं. म्हणजे नाटक म्हणून कमी आणि लागूंच्या शेवटच्या वर्षांमधे त्यांनी केलेलं ताकदीचं काम या अर्थाने. अर्थात तेही मी व्हीसीडीवर पाहिलेलं आहे. प्रत्यक्ष नव्हे.

तस्मात साठेंची ओळख प्रायोगिक नाटककार/लेखक म्हणून मला पटलेली आहे. ते माझे अतिशय आवडते लेखक आहेत असं म्हणता येणार नाही. पण त्यांच्या कामाबद्दल उत्सुकता वाटेल असं मात्र सातत्याने वाटत आलेलं आहे.

"काळे रहस्य" वाचायला घेण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे लेखकाने या लेखनाचा बाज सस्पेन्स कादंबरी, गुन्हा, पोलिस तपास या अंगाने ठेवलेला आहे. माझ्यासारख्या इतर सामान्य वाचकांप्रमाणे , क्राईम थ्रिलरचं आकर्षण मलाही आहेच. त्यामुळे या कादंबरीबद्दलचं कुतूहल नक्कीच वाटलं.

---- आता इथे जरा कादंबरीच्या कथानकाचा भाग काही प्रमाणात येणार. तर स्पॉईलर अलर्ट --------
कथेचा नायक - किंवा न-नायक अजित देवधर. पुण्याचा नाटककार. पुण्यातल्या मध्यवस्तीत एका रात्री आपण आपल्या ओळखीच्या एका अभिनेत्रीचा खून केला आहे असं तो पोलिसांना येऊन सांगतो. बॉडी सापडली आहे. त्याला गजाआड केलेलं आहे. पोलिसांमधले विद्याधर गोडबोले आणि त्याचा सहकारी खोब्रागडे याचा तपास घेतात. त्यात अजित देवधरच्या पत्नीची, अन्य एखाद दोन लेखकांची, त्याच्या सायकीॲट्रिस्टची वगैरे जबानी येते. अजित देवधरच्या मानसिक गुंत्याच्या, त्याच्या आतल्या नैतिक/मानसिक संघर्षाच्या, अन्य पात्रांशी असलेल्या त्याच्या नाते संबंधाच्या, अजितच्या समाजस्थिती/देशस्थिती/मानवी अवस्था/मानवी व्यवहारादि गोष्टी यांबद्दलची मतं, त्याबद्दलचे त्याचे संज्ञाप्रवाही शैलीतले विचार या अंगाने कादंबरी विकास पावते. अजित देवधरच्या मानसिक गुंत्याचा भाग कादंबरीच्या केंद्रापाशी आहे असं म्हणाता येईल. हेच कादंबरीचं, खरं सांगायचं तर काळे रहस्य.
-- स्पॉईलर अलर्ट समाप्त ----

डिटेक्टीव्ह कादंबरीच्या निमित्ताने तत्त्वमीमांसा (किंवा त्याला सामाजिक/तात्त्विक/राजकीय वगैरे विचार असं म्हणा) हा प्रयत्न महत्त्वाकांक्षी म्हणायला हवा. तर या महत्त्वाकांक्षी संकल्पाची सिद्धी कादंबरीमधे कशी झालेली आहे? मी लेखाच्या सुरवातीला केलेला उंचसखलतेबद्दलचा उल्लेख येतो तो इथे.

कादंबरीमधे टाळता येणारी पुनरावृत्ती बरीच आहे. अजित देवधर निरनिराळ्या अंगांनी फ्रस्ट्रेटेड आहे हे त्याच्या आत्मसंवादांच्या आणि इतर लोकांबरोबरच्या संभाषणातून परत परत येत राहातं. ही पुनरावृत्ती एक वाचक म्हणून मला कंटाळवाणी वाटली आणि ती तर कादंबरीच्या केंद्रस्थानीच आहे असं नाही तर ती कादंबरीला व्यापते.

कादंबरीतल्या कंटाळ्यामधे या पुनरावृत्तीइतकीच भर टाकणारा दुसरा घटक म्हणजे कादंबरीचा निवेदक. तो सर्व पात्रांबद्दल, त्यांच्या मनातल्या छोट्यामोठ्या हेतूंबद्दल ज्या काँडसेन्शनने बोलतो ते त्रासदायक आहे. "बरे का वाचका" ही ह.ना आपटे शैली पण प्रयत्न मात्र पोस्टमॉडर्निझमचा.

असा हा काहीसा, "इदं च नास्ति परं लभ्यते" असा प्रकार. "आपला एकंदर मानवी व्यवहारांचा आणि एकूणच मानवी संस्कृतीचा सांगोपांग धांडोळा घेऊन झालेला आहे" या पवित्र्याचा लेखकाने त्याग केला असता, एका अडीचशे पानी कादंबरीऐवजी दीर्घकथा लिहिली असती, स्वत:ला इतकं सिरियसली घेतलं नसतं तर हा प्रकार जमला असता. 'काहीही झालं तरी आपल्या लिखाणात वाचनीयता म्हणून येऊन द्यायची नाही' अशी प्रतिज्ञा त्यांनी सोडून द्यायला हरकत नाही.

व्यक्ती आणि समष्टीतले संबंध, त्याला या एकविसाव्या शतकात आलेले आयाम, व्यक्तीला वाटणारा एकाकीपणा, "आंग्स्ट" याबद्दलचं लेखकाने केलेलं चिंतन वाचनीय नक्कीच झालेलं आहे. मात्र त्याकरता लागणारी कथानक/पात्ररचना/स्थलकालसंदर्भातली बांधणी यांमधे काहीतरी बांधून ठेवण्यासारखंसुद्धा करायचं असतं याची कुठे जाणीव ठेवलेली मला वाटली नाही. (कदाचित मीच कमी पडलो असेन. मलाच या कृतीमधलं सौंदर्य जाणवलं नसेल. पण ते तर आपल्याला जन्मापासूनच मान्य आहेच! Smile Smile )

I think he came close to come up with something worthwhile with this one. त्यामुळे जरा चुकचुकल्यासारखं झालं. ही कादंबरी "अच्युत आठवले पार्ट टू" असती तर इतपत अभिप्राय लिहिण्याच्या फंदात पडायचं कारण नव्हतं.

असो. मकरंद साठेंना मी एकदा भेटलो आहे. मृदु स्वभावाचे, उमद्या व्यक्तिमत्वाचे आहेत. एका सामान्य वाचकाची प्रतिक्रिया चुकून त्यांच्या कानांवर गेली तर त्यांनी त्यात कटुता आणू नये हीच त्या जगन्नियंत्यापाशी प्रार्थना.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कादंबऱ्या वगैरे मलाही झेपत नाहीत. पण साठेंना मीही एकदा भेटले आहे; गोड माणूस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

“काळे रहस्य” वाचली नाही. वाचेन असेही वाटत नाही.

‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ चे खंड मात्र वाचले आणि वैतागलो. याचे कारण म्हणजे, व्यावसायिक रंगभूमीचे दोन अत्यंत महत्त्वाचे खांब: मनोरंजन आणि अर्थकारण, त्यांनी आपल्या विवेचनातून पूर्णत: वगळले आहेत. नुसत्याच सामाजिक आणि राजकीय (त्यातही, केवळ समाजवादी) दृष्टिकोनातून मराठी रंगभूमीचे आकलन होऊच शकणार नाही. इतके मर्यादित परिप्रेक्ष्य एखादा नाटककार आणि समीक्षक घेऊ शकतो याचे आश्चर्य वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

अय्या म्हणजे त्यांनी *त्या* पुस्तकातूनही या दोन बाबी वगळल्याएत तर! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मराठीनं मदांध तख्त फोडायचं असेल तर मनोरंजन आणि अर्थकारण या दोन गोष्टी वगळून चालेल का कसं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसाद आवडला. ते तख्तबिख्त फोडणं म्ह णजे मनोरंजन आणि अर्थकारणच आहे खरं! प्रत्यक्षात, मोहिमेच्या ढिसाळ आर्थिक नियोजनामुळे फाके पडल्याकारणाने दिवाण-ई-आम च्या छताचा थोडासा उरलेला चांदीचा पत्रा काढून त्याचे रुपये पाडले होते. उगीच सुरेश भटांचा कांगावा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुमच्याच डोक्यावर तख्त पडून लागलंबिगलं नाही ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंक

खरंतर हे परीक्षण वाचून मी कादंबरीला हातच घातला नाही.

शिवाय परीक्षण अकादमिक वळणाचं असलं तरी, अतिशय वाचनीय वाटलं. त्यावर मला वाटतं साठ्यांनी उत्तरही लिहलं आहे. शोधावं लागेल.

आवेशानं अशी परीक्षणं, त्याला दिलेली उत्तरं हे सगळं मराठीत खूप दुर्मिळ होत चाललं आहे. म्हणून मला याची विशेष दखल घ्यावी लागली. दुसरी गोष्ट म्हणजे - परीक्षण कसं असावं याचा एक भारी नमुना वाचायला मिळाला. तळटीपा, या कादंबरीला पर्यायी काय वाचावं, कोरीव काम केल्यागत भाषा, दुर्मिळ झालेलं नेमकेपण या बाबी भावल्या.
काळे रहस्यचा हा मेटा-फायदा मला झाला असल्याने कादंबरी वाचण्याहून जास्त आनंद मिळालाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला