Skip to main content

जिम पोरी जिम


जिम पोरी जिम
पावर फ्लेक्स जिम
बर्न करो कॅलरी ऍन्ड
बन जाओ स्लिम.
जिम पोरी जिम
पावर फ्लेक्स जिम ...

2.

ओ, 20 मिन्टं ट्रेडमिल मारा
मॅम आज फक्त कार्डिओ करा
स्पीड कमी करा...स्पीड कमी करा...
आजच व्हायचं का प्रियांका चोप्रा ?
आज मारा कार्डिओ, उद्या मारा वेट्स
सहा दिवस प्रोग्रॅम, सन्डेला घ्या रेश्ट.
काळजी करु नका, होनार तुम्ही स्लिम.
गॅरेंटीड वेट लॉसची आहे तुमची स्कीम..

3.

नाही गं, नाही गं.. मला होत नाही गं
गणित मेलं कच्चं तुझं ,सेट्स किती सांग.
सोप्पा दे ना जमेल असा मला एक्सरसाईझ.
खाली नाही वाकता येतेय, बघ ना माझी साईझ.
गोळी बिळी नाही का, स्टेरॉईड्स घेऊ का ?
जिमला येण्याआधी रोज देवळात जाऊन येऊ का ?
बघ ना जरा शेड्यूलमध्ये चेंज होईल का एक ?
अर्धा तास 'खवय्ये' बघू , घेऊ छोट्टा ब्रेक.

4.

मॅम तुम्ही ऐका माझं, वाढवा आता वेग.
ब्रीदीन ब्रीदाऊट करा, उचला भरभर लेग.
किती दिवस झाले आता, धाप लागते कशी ?
डाएट जरा स्ट्रिक्ट करा, सीट दिसतेय उशी.
लेग-रेजच्या आधीच तुमचे पोट जम्प घेते.
भडकू नका माझ्यावरती, दिसतं तेच सांगते.
लोकांकडे बघू णका, आपली बॉडी आपला त्रास.
जिद नसेल तर होनार णाय, पर्फेक्ट तुमचा बॉडीमास.

5.

बेबी एसी वाढव जरा, चिकचिकाट झालाय नुस्ता.
झक मारली, जिम लावली, उपद्व्यापेय नसता .
जरा टीव्ही वळव इथे, रिमोट दे तो इकडे.
कंबर कशी वळते तुझी, खातेस काय गं सुकडे !
लग्न केलंस एकदा की ट्रॅजडी कळेल आमची
पोरं-बिरं झाली ना की दशा होते फॉर्मची.
आपल्याला कुठे करायचाय रॅम्पवर कॅटवॉक ?
नवरा ऍबरप्ट गपेल तेव्हा बसेल तुलाही शॉक.

6.

मॅडम तुम्ही लक्ष द्या, बोलू णका धावताना...
स्टॅमिना कसा वाढनार, रोज स्कूटीवर येता ना ?
माझी काळजी करु नका, माझं लग्ण झालंय.
मंगळसूत्र अडकतं म्हनूण बॅगेत काढून ठेवलंय.
पोरा-सोरांचं सांगू नका, मला पन मुलीयेत दोन.
जिबेवरचा कण्ट्रोल गेला की शरीर होतं गोन.
पोटात कोंबा तुम्ही, नाय होताना पिझ्झा, पास्ता.
नायकी विकत घेता, आनी जिमात येऊन बसता !
जगनंच तुमचं झालंय, चीझ, बटर अन व्हाईट सॉस.
पैसा खर्च करता तेवढा सोप्पा नाही वेट लॉस.

7.

जिम पोरी जिम
पावर फ्लेक्स जिम
बर्न करो कॅलरी ऍन्ड
बन जाओ स्लिम.
जिम गेली भरुन
पोरी आल्या दमून.

भरभर पोरी धावल्या.
घामाने भिजल्या सावल्या.
घाम काही सुकेना.
दंगा केला भुकेनं.

रमताराम Sat, 29/10/2011 - 21:40

पैसा खर्च करता तेवढा सोप्पा नाही वेट लॉस.
खरं आहे (सुस्कारा)

-(अनुभवी) रमताराम

राजेश घासकडवी Sun, 30/10/2011 - 05:48

तुमच्या आधीच्या दोन कविता आवडल्या. ही तितकी जमली नाही असं वाटलं. मूळ भोंडल्याच्या गाण्याची लय आली नाही. आणि नंतर भरकटली.

वंकू कुमार Sun, 30/10/2011 - 08:10

In reply to by राजेश घासकडवी

धन्यवाद. मूळ भोंडल्याच्या गाण्याची लय आली नसावी परंतु तसे करण्याची इच्छा नव्हती. दोन वेगवेगळ्या स्तरांतल्या व्यक्तींचे अगदी सरळ्सोट जगणे आणि त्याबद्दल निश्चिंत असणे, (काव्यासारखे सूचक न जगता)गद्याप्रमाणे रॅशनल, तार्किक आणि सुसंगत जगणे इथे यावे असा विचार होता त्याप्रमाणे अगदी थेट जे काय सांगायचे ते सांगणारी ही कविता. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

चिंजंश्रामो Sun, 30/10/2011 - 22:07

In reply to by राजेश घासकडवी

एकदम बाडिमारो* प्रतिसाद.

बाडिमारो: बाय डिफॉल्ट मार्मिक आणि रोचक

खाजगीवाले Sun, 30/10/2011 - 21:55

तुमची भोंडल्याची गाणी जरा अंतर ठेवुन प्रकाशित करा ना. रोजच तुमचा भोंडला दिसला तर सदस्य पळून जातील ना.

चांदणेसंदीप Tue, 03/12/2013 - 23:27

हलकी-फुलकी....मस्त वाटली....आवडली!!