काही बोलायचे आहे (विरसग्रहण)

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

हाय का डेरिंग बोलायचं? डेरिंगच नाय तर कसा बोलशील. अन डेरिंग करुन बोललाच तर फुकाट जोड खाशीन याच भ्याव हाये ना. आन नको तोलु देवळाच्या दारात भक्ती. भक्तीत खोट निघाली तर चारचौघात खोटा पडशीन!

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही

आरं ते प्लास्टिकच फूल हाये, फुलाचा शेंट मारलेला! डिट्टो फुलावानी दिसतय! मधमाशाबी फशीत्यात. आता कलाकारीच हाये म्हन्ल्यावर कशी पाकळी फुलनं?

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

त्ये नक्षत्र का काय हाये त्येंच्या गावात बंटा मारलेले ल्वॉक ऱ्हात्यात. काही बी बरळत्यात. त्येंच्या बरळन्यात कोन्ला काय घावनं काय सांगता येत नाही. त्येन्ला शब्दात पकडायला गेल की तेल लावलेल्या पैलवानावानी निसटत्यात.

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

आबाळामधी पाखर असत्यात चान्न्या असत्यात तसे ढग बी असत्यात. काही ढवळे असत्यात काही काळे असत्यात. काही काळे ढग जांभळावानी दिसत्यात. ढग हाये म्ह्नून त पाउस पडतुया. ऱ्हातोय यखांदा ढग कोपर्या मदी पडून. वाऱ्या वावधनाचा त्योबी वाहून जातोय. समद्याच ढगातून काय पानी येत नसतयं. काही रहस्य बिहस्य नसतयं.

दूर बंदरात उभे एक गलबत रूपेरी
त्याचा कोष किनाऱ्यास कधी लाभणार नाही

आता गलबत म्हनल्यावर लांबच हुब ऱ्हानार ना. ती काय व्हडी हायका फळकुटाची किनाऱ्याव यायला. किनारा उथळ असतुय. किनाऱ्याकं यायच म्ह्नल तर तटून बसन. रुतून बी बसन वाळूत. समद्या दर्यावर्द्यांना माहीत अस्तय हे. व्हडीतुन गलबतापोतुर जात्यात ल्वॉक.

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखाऱ्यात कधी तुला जाळणार नाही

कह्याचा आलाय कृपाकटाक्ष? डोळ्यातून आग वकत होती. निस्ते आगीचे फव्हारे. मग वन्वा लागनार नाय तर काय व्हनार? अन आगीलाच निखाऱ्याव कसा जाळनार तू? याड लागलय का?

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Smile एक कै च्या कै रसग्रहण . आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच येऊ द्यात।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे नक्की कशाचे विरसग्रहण आहे, त्या मूळ कृतीबद्दल यत्किंचितही कल्पना नसल्याकारणाने, आपला पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुसुमाग्रजांचे गीत आहे. श्रीधर फडक्यांनी गायलेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

(आता ती मूळ कविता समजून घेणे आले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुसुमाग्रजांची ही कविता उगीच कांगावखोर आहे त्यामुळे तिचे वाभाडे काढलेले आवडले. सुरेश भटांच्या कांगावखोर कविता अनेक आहेत.* त्यांचाही समाचार घ्यावयास हवा. ही whataboutary नव्हे बरं का! तुमची समीक्षा आवडली ह्मणून लिहिले.

*उदा. “पूर्तता माझ्या व्यथेची”, किंवा “मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते!”

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

उगीच कांगावखोर आहे त्यामुळे तिचे वाभाडे काढलेले आवडले

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0